Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज १८

छत्रपती शिवाजी महाराज १८
छत्रपती शिवाजी महाराज १८

 


     मलिक अंबर ने दरबार बरखास्त केला.सगळे उठून निघून
गेल्यावर फतेह खान सह तो खिडकी पाशी आला तेव्हा
जिजाबाई आणि गोमाजी जिना उतरत होते. त्यांच्या कडे
मलिक अंबर म्हणाला," बिजली है, बिजली जल्दी से उसे नहीं रोखा  गया तो सबको जलाकर राख कर देगी ।"
   " आप उनकी तारीफ कर रहे है ।"
   " तारीफ नहीं हाकीगत बयान कर रहा हुं।"

पूढे

    मुराद खान आपके दावत नामे पर नहीं आया उसने अपने
वकील को भेजा तो आपको बुरा लगा, और यहां शाहजी राजे
खुद नहीं आया तो अपने जनाने को भेजा तो उन पर गुस्सा
होने के बजाय आप उनकी तारीफ कर रहे है, हमारे समझ में
कुछ नहीं आता ?" फतेह खान उद्गारला. मालिक अंबर म्हणाला, " तुम्हारे समझ में कुछ आएगा भी नहीं."
     मलिक अंबरच्या मुलाने अर्थात फतेह खान ने समजून
बापाला विचारले की, क्या मतलब है आपका?" मालिक
अंबर म्हणाला," उन्होंने क्या गलत कहा ? जरा बात को समझो
फिर कहो । मान लो की अगर आप वजीरे आलम होते, और यही बात अगर शाहजी राजेने आपसे कही होती तो आप क्या करते ?" फतेह खान गर्जला की  हम उन्हे कह देते की हम
वजीरे आलम है तो हमारी मर्जी चलेगी ।" मालिक अंबर ने कहा," जो समशेर चलाकर मैदानी जंग जीतते है, ना वो ऐसी वाय्यात बात हरगिज नहीं सुनते दो  दिन में ही बगावत कर देते. हर बात अपने हिसाब से नहीं होती मिया इसलिए सोच समझकर कदम उठाना पड़ता है ।" त्यावर फतेह खान काही
न बोलता निघून गेला.
  

   

  
       जिजाबाई वाड्यात कुठं दिसत नाही म्हणून उमा बाईंनी चिंता व्यक्त केली. परंतु  सोयरांबाईंनी मात्र तिखट मीठ लावून जिजाबाई विरुध्द उमाबाईंचे कान भरले. म्हणाल्या की त्यांना काय गरज होती सदरेवर जाऊन इकलाक खानला उलट बोलण्याची ? मान्य आहे की  त्यांच्या माहेरी त्यांच्या आऊ साहेब कारभार पाहतात. म्हणजे तुमच्या आत्याबाई हो !" असे म्हणताच उमाबाई त्यांच्या कडे रागा ने पाहतात. तसा त्यांचा स्वर थोडा खाली आला आणि लगेच साळसूद पणाचा आव आणत त्या म्हणाल्या," नाही रास्त आहे, पुरुष मंडळी नसल्याने घरातल्या बाईने कारभार पाहणे रास्त आहे, परंतु इथं मंबाजी राजे नीट कारभार सांभाळत आहे ना, मग ह्यांना मध्ये लुडबुड करायची काय गरज आहे ?" त्यावर उमाबाई फक्त इतकंच म्हणाल्या , " पुरे झाले कौतुक !  माहित आहे आम्हाला." इतक्यात एक बाई आली आणि तिने विचारणा केली की मालकीण बाई आपण आम्हाला बोलविलेत का  ?" तेव्हा उमाबाई म्हणाल्या की, गोदा कुठं आहे ते बघ आणि तिला म्हणावे आम्ही बोलवले आहे, जिजाबाई वाड्यात नाहीयेत. कदाचित तिला ठाऊक असावे ." त्यावर त्या बाई निघून गेल्या नि मंबाजी राजे तेथे आले नि म्हणाले की , आम्ही सांगतो ना, त्या कुठं गेल्या आहेत त्या ?" उमा बाईंनी त्यांच्या कडे आश्चर्याने पाहत विचारले," म्हणजे  तुम्हाला माहित आहेत तर , जिजाबाई कोठे गेल्या आहेत त्या ?" मंबाजी राजे उत्तरले की,
  " हो ; उमाजी ला सोबत घेऊन त्या वजीरे आलम का
भेटायला गेल्या आहेत." हे ऐकून उमाबाई ना एकदम धक्काच
बसला. पण सोयरा बाई ह्या संधीचा फायदा कशा सोडतील.
त्यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, " काय वजीरे आलम कडे,  जिजाबाई गेल्या ?" लगेच मंबाजी राजे उद्गारले " हो, वहिनी साहेबांना गरीब लोकांचा पुळका भारी ना, त्या खाना ने फर्मान दाखवले नि म्हटलं की सारा माफी हवी असेल तर वजीरे आलम पाशी जाऊन बोला. मग काय वहिनी साहेब झालेत
लगेच तयार. मोठेपणा करायची सवय ना त्यांना.मग त्या मागे
कशा राहतील." उमा बाईंनी विचारले," मग तुम्ही का नाही गेल्यात ? रात्र रात्र जागून कामं करता तुम्ही !  मग तुम्हीच जायला हवं होतं ना ?" मंबाजी राजे गोंधळले. त्यांना कळेना
की आपल्या बद्दल ही खोटी माहिती कुणी दिली म्हणून त्यांनी
एक वेळ नजर आपल्या आऊ साहेबाकडे टाकली. पण उमाबाई
समोर असताना त्या तरी कशा बोलू शकणार की आम्ही सांगितले म्हणून. आपल्या आऊ साहेब काही बोलत नाही हे
पाहून मांबाजी राजे म्हणाले की,  रात्र रात्र जागून आम्ही काम
करतो हे कोणी सांगितले तुम्हाला   ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या की ," असं तुमच्या आऊ साहेबच तुमचं कौतुक करत होत्या." उमाबाई एकदम मुद्देसूदपणे बोलल्या. सोयरा बाईना मेल्या हून मेल्या सारखे झाले. उमाबाई पुढे म्हणाल्या," तुम्ही तहान भूक विसरता नि काम करता हे जर खरं असेल तर तुम्हीच जबाब द्यायला जायला हवं होतं ना ?" तश्या सोयरा बाई म्हणाल्या, मंबाजी राजे का जातील त्यांच्या चुकीची माफी मागायला?" आपल्या पुत्राची बाजू घेत त्या म्हणाल्या.
   " छे छे छे ! आम्ही नाही जाणार, आम्ही त्यांना कालच स्पष्ट
सांगितले होते. पण त्यांनी ते  ऐकले नाही. मग आम्हीच म्हटले की तुम्ही स्वतःच जाऊन भेटा वजीरे आलम ला !" त्यावर उमाबाई भयंकर चिडल्या," तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतय का ? जरा तरी तारतम्य आहे का ? " तश्या सोयरा बाई समजून चुकल्या की आता मंबाजी राजे चे
काही खरं नाही जाऊ बाई चिडल्या. म्हणूनच की काय त्या आपल्या पुत्राची बाजू घेत म्हणाल्या," ह्यांना काय माहित त्या शब्दार्थ अर्थ घेतील त्या ? ह्यांनी म्हटलं म्हणून त्या गेल्या. ही तर कमालच झाली बुवा !" उमाबाई म्हणाल्या ," मंबाजी राजे, तुम्ही आताच्या आता निघा आणि त्यांच्या सुरक्षेतेचे अगोदर पहा. चला निघा." पण मंबाजी राजे जागचे हलले नाहीत.
तशा उमाबाई अधिकच  चिडल्या ," मी काय सांगतेय ते
ध्यानात येतेय की नाही. निघा म्हणते ना ?" तसा मंबाजी
राजे आपल्या मातोश्री कडे पाहतो नि  मुकाट्याने तेथून जायला
निघाला. पण  त्या दालनाच्या बाहेरच त्यांची भेट जिजाबाईंशी झाली. तसे ते म्हणाले," या वहिनी साहेब साक्षात दंडवत तुम्हाला. तुम्ही करा नि आम्हाला निस्तरायला भाग पाडा.
बरे झाले  तुम्ही इथच भेटलेत ते . नाहीतर काय आमचे खरे
नव्हते."
   " हो का ?"
   " आम्हाला समजलं की तुम्ही वजीरे आलम ला गेले होते."
   " आम्ही खोटे बोलणार नाही हो गेलो होतो."
   " तुम्ही शब्दार्थी अर्थ घ्याल असे आम्हाला वाटले नव्हते.
या पुढे आम्ही तशी चूक करणार नाही. कारण आज  तुमच्या मुळे आम्हाला काकी साहेबांकडून खूप सारे  ऐकून घ्यावे लागले. आम्ही ते मनावर घेत नाही म्हणा. पण मला सांगा. तुम्ही वजीरे आलम ला भेटायला गेले होते तेथे काय झाले ?"
   " तुम्ही जे सांगितले होते तेच आम्ही तेथे जाऊन सांगितले.
बस्स इतकेच." असे म्हणून त्या तेथून निघून गेल्या. मंबाजी
राजे त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहत म्हणाले की, तिथं
काय झालं ते कळूच दिलं नाही.

  उमा बाई त्यांच्या वर भयंकर चिडल्या होत्या. पण त्यांच्याकडे
न पाहताच आपला राग व्यक्त करत होत्या. म्हणाल्या," तुम्ही
लहान होता तेच बरं होतं. निदान तुमच्या वर रागवता तरी येत
होतं. आता मोठ्या झाल्यात ना, मग आता कसं रागवणार  ?"
त्यावर जिजाबाई  म्हणाल्या ," तुम्ही आमच्यावर बेलाशक
रागवा, तुमचा तो अधिकारच आहे, पण निदान आमच्या कडे बघून तरी रागवा ." पण त्या त्यांच्या कडे न पाहताच आपला संताप व्यक्त करत होत्या. आणि जिजाबाई त्यांना आपल्या कडे पाहून रागवायला सांगितले. निदान आमच्या कडे पहा तरी ! " पण त्या न पाहताच बोलत होत्या. त्यावर जिजाबाई म्हणाला,
   "  आम्हाला माहीत आहे आपण आमच्यावर का रागवलाय ते, आम्ही आपल्याला न सांगता  वजीरे आलमला भेटायला गेलो होतो.  आपली बाजू मांडला. याचाच राग आला असेल आपल्याला. हो ना ?"  तेव्हा उमाबाई त्यांच्या कडे पाहतात. तेव्हा जिजाबाई त्यांच्या चेहऱ्यावर कुठच राग दिसला नाही. आणि थोड्या वेळात त्या खुदकन हसल्या मी म्हणाल्या,
   " आम्ही तुमच्या कडे यासाठीच पाहत नव्हतो की तुमच्या
कडे पाहिल्या वर आमच्या मनात राग रहातच नाही. एकदम पळून जातोय. पण तुम्ही सुखरूप परत आलात म्हणून आम्ही शंभू महादेवाचे आभार ही मानतो. आणि पुन्हा असं धाडस करू नका. तिकडे विपरीत काय घडलं  असतं म्हणजे आम्ही काय जबाब देणार होतो."
  " कोणाला जबाब द्यायचा होता तुम्हाला ?"
  " तुमच्या स्वारी ना ?" तसा जिजाबाईंना चेहरा एकदम खुलला म्हणजे स्वारी येणार तर !"
   " म्हणजे शरीफ जी येणार असं कळलं पण शहाजी राजे
येणार आहेत किंवा नाहीत ते माहीत नाही." असे म्हणताच
त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात गायब झाला. त्याची
जागा उदासिने घेतली. त्या हीरमुसल्या नि म्हणाल्या की
हे असं का आम्हाला छळतात कोण जाणे ?" असे म्हणून त्या
तिकडून गेल्या. तश्या त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहत
म्हणाल्या की, केवळ शहाजी राजे येणार आहेत म्हणून तुमच्या
वरचा राग आमचा गेला. नाहीतर चांगलच खडे बोल ऐकवले
असते तुम्हाला. तुम्ही अजून लहान आहात. म्हणून आम्हाला
तुमची काळजी वाटते. इतकंच."

   जिजाबाई ना मध्येच जाऊबाई आणि संभाजी राजे भेटतात.
त्यांना पाहून त्या हसून म्हणाल्या की,  शिखर शिंगणापूर आलं वाटतं. तसे संभाजी राजे म्हणाले," आमचे बंधू राज येणार
म्हटल्यावर यायला नको का ?" जिजाबाई म्हणाल्या ," आमचे
स्वारी येणार तर !" त्यावर संभाजी राजे थट्टेने म्हणाले," शरीफ
जी येणार आहेत, इतकंच माहिती आहे. शहाजी राजे येणार
आहेत किंवा नाहीत हे माहीत नाही. असे म्हणताच त्यांचा
चेहरा एकदम पडला. तेव्हा जाऊ बाईंनी विचारले की, पण
तुम्ही तर आमचे बंधू येणार आहेत असं म्हणाला होता ना ?"
त्यावर संभाजी राजे म्हणाले," हो मग शरीफ जी राजे पण
तर आमचे बंधू आहेत."असे म्हणून संभाजी राजे तेथून निघून गेले. तेव्हा जिजाबाई चेहरा एकदम पाहण्या सारखा होता.
म्हणजे एकदम उदास आणि चिंताग्रस्त होता. त्या उद्गारल्या ,
  "  आता कसं ओळखायचं बरं ?" त्यावर जाऊबाई उद्गारल्या,
   "  चला कोणाला तरी विचारू ?" इतक्यात त्यांना गोमाजी भेटले. तेव्हा  गोमाजी काकाला पण तोच प्रश्न केला. पण गोमाजी ने सुध्दा उत्तर देण्याचे टाळले. माहित करून सांगतो असे म्हणून ते तेथून निघून गेले. सर्वजण सदरेवर हजर होतात. प्रथम  खेलोजी राजे आले नंतर शरीफ जी राजे येतात. त्यांना जाऊबाई आरती ओवाळून आंत घेतात. मग गोमाजी येतात तेव्हा जिजाबाई  त्याला खुणेने विचारतात की काय खबर आहे, पण गोमाजी काका नकारात्मक मान डोलावली. त्यामुळे जिजाबाई जास्तच हीरमुसल्या. नि आपली नजर खाली
जमिनीकडे वळविली. इतक्यात शहाजी राजे पटकन गोमाजी च्या मागे येऊन लपतात.थोड्या वेळा नंतर गोमाजी बाजूला
होतात. तसे शहाजी राजे समोर येतात. तश्या जाऊबाई म्हणाल्या ," आधी बघा तरी कोण आलंय ते." तश्या जिजाबाई आपली खालची मान वर करून पाहतात तशी त्यांची नजर शहाजी राजेंच्या  पडली. तसा त्यांच्या चेहरा हर्षभराने एकदम फुलला. तेव्हा जिजाबाईंनी आपल्या जाऊबाईच्या हातून आरतीचे ताट घेऊन शहाजी ना ओवाळले. त्यानंतर शहाजी राजे नि शरीफ जी राजे या दोघांनी मीहीमेवर केलेला पराक्रम सांगितला. रणदुल्ला खान आणि मोगल फौजाना कसे पळवून लावले.त्याबद्दल माहिती देतात. इथं जिजाबाई  आपल्या दालनात त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. पण ते काही
येत नाहीत. ते आपले मोहीमे वर केलेल्या शौर्याचे वर्णन करून
सांगत असतात. म्हणून  जिजाबाई त्या गोदावरीला सांगतात की आमच्या स्वारी ना बोलवून आण म्हणून. पण गोदावरी सांगते की एवढ्या लोकांसमोर मी जाणार नाही. म्हणून शेवटी स्वतःच जातात. पण त्यांच्या गप्पा ऐन रंगात आलेल्या पाहून त्या माघारी येतात आणि शमशेर शी एकट्याच बोलत असतात. त्याच वेळी शाहजी राजे हळूच त्यांच्या मागे येऊन उभे राहतात. जिजाबाई शमशेरला म्हणाल्या की, आता आम्ही रागावलो आहोत, आम्ही आता तुझ्याशी ही बोलणार नाही. आणि दुसऱ्या कुणाशी ही बोलणार नाही. एवढं कळू नये, कमाल आहे." त्यावर शहाजी राजे म्हणाले की, सारखे सारखे मागे मागे फिरायचे ते काय आम्ही पाहिलं नसेल असं वाटतंय का ? वाड्यात आल्या पासून एक शब्द पण बोलायला मिळाला नाही. पण सर्वांना सोडून आम्ही इथं आलो असतो आणि तुमच्याशीच बोलत राहिलो असतो तर आपले सारे सगेसोयरे काय म्हणाले असते." त्यावर त्या मागे वळून शहाजी राजे कडे पाहत म्हणाल्या " तर काय म्हणाले असते ?" शहाजी राजे उत्तरले," म्हणाले असते की हे रितीला धरून झाले नाही. रितीला आम्ही किती मानतो हे आपण जाणता." जिजाबाई उद्गारल्या ," म्हणून काय  आमच्याशी एक ही शब्द बोलू नये?" शहाजी राजे म्हणाले की कस्तुरी मृगाला जसे हे ठाऊक नसते की कस्तुरी आपल्या कडेच आहे तसेच काही लोकांना हे माहीत नसते की आपल्या केवढे मोठे अमोघ शस्त्र आहे ते ?" त्यावर त्यांच्या मुखावर थोडेसे स्मित हास्य उमटले. पण अजुनी ही लटका राग दाखवत त्या म्हणाल्या ," शस्त्रापुढे राजे हार मानू लागले वाटते." त्यावर शहाजी राजे उद्गारले की,  " भाले, दान पट्टा अश्या शस्त्रा पुढे आम्ही हार मानत नाही. परंतु इथली शस्त्रे अलग आहेत. नेत्र बाण !" असे म्हणताच जिजाबाई गालात हसत म्हणाल्या की त्याचा एक ही शब्द न बोलण्याचा काय संबंध ?"
  " एकच शब्दाने कुणाचे समाधान झालं नसतं नि मग वेळ
काळाचे बंधन सुटलं असतं मग ? बाहेर कुणाच्या नावाने बोल
लावले असते, तुम्हीच सांगा. काळजी आमची नव्हतीच म्हणा.
   " वर्धी देताना आपण येणार याची कुणी आम्हाला वर्धीच
दिली नाही. उलट आमचा छळ मांडला होता, त्याचं काय ?"
   " नीट आठवा. ज्यांनी शरीफ जी येणार अशी वर्धी दिली
होती. त्याने हे तर सांगितले नाही ना, की शहाजी येणारच नाही
म्हणून. नीट आठवा." तसा त्यांच्या डोळ्या समोरून एक एक
प्रसंग सरकतो. प्रथम उमाबाई काय म्हणाल्या ते आठवले. नंतर संभाजी राजे काय म्हणाले ते आठवले. त्यानंतर कारभारी आणि पंत काय म्हणाले ते आठवले. पण कोणीही शहाजी राजे येणारच नाहीत असे म्हणाले नव्हते. त्या शिवाय सर्वात प्रथम खेळोजी आले, मग शरीफ जी आले. आणि शहाजी राजे आले हे जसे आठवले तश्या त्या शहाजी राजांना बिलगल्या. जिजाबाई शहाजी राजे पासून दूर होत म्हणाल्या," शी बाबा !
पूर्वी तुम्ही असे नव्हता." त्यावर शहाजी राजे म्हणाले," हे तर परंपरा गत चालत आलेले. म्हणजे रुक्मिणी सुध्दा श्रीकृष्णा ला
हेच म्हणाली,  सत्यभामा सुध्दा श्रीकृष्णा ला हेच म्हणाली. पण
नेमके काय हे नाही कळाले."
  " तुम्ही श्रीकृष्ण नाही आहात हां आधीच सांगून ठेवते."
  " हेच ते नेत्र बाण आम्ही म्हणतो ते हेच, आम्हाला घायाळ
करतात."
   " विषय बदलू नका. तुम्ही श्रीकृष्ण नाहीत. आम्ही एकट्याच
आहोत. आणि एकट्याच राहू. म्हणून तुम्ही श्रीकृष्ण नाही तर
तुम्ही श्रीराम आहात. काय ?"
   " अरे बाप रे ! ही विचारणा आहे का धमकी ?"
   " ही विचारणा नाहीच आहे मुळी आम्ही हक्क बजावत आहोत."
   " बरं."
   " बघा, हो मंजूर असं ही म्हणत नाहीत."
   " पण तुम्ही अगोदर पूर्ण बोलू द्याल तेव्हा ना ?"
   " ते नंतर बोला. आधी हो मंजूर असं म्हणा."
   " बरं , हो मंजूर ..
   " नुसतं हो मंजूर नाही."
   " नुसतं मंजूर मंजूर ..."
   " शी बाबा आम्ही नाही सांगणार जा !" रुसल्याचे नाटक
करतात. तसे शहाजी राजे हसून म्हणाले,' बरं मंजूर मंजूर मंजूर
आता झालं समाधान."  तश्या त्या खुश होऊन म्हणाल्या," हो !
झालं."
   "  अजून काही ?"
   " अजून काही नाही, पण तुम्ही काही तरी मघाशी सांगत होता ते."
   " आम्ही पूर्वी सारखे राहिलो नाही म्हणजे कसे ?"
   " ते तुम्हीच ओळखा. आम्ही नाही सांगणार "
    " आम्ही पूर्वी सारखे राहिलो नाही म्हणजे कसे राहिलो नाही ?"
   " बघा. एखादा विषय धरून ठेवला की मग तो सोडतच नाही. आम्ही आपलं  असं सहजच म्हणालो होतो."
    " तुम्ही आणि असं सहजच म्हणाल शक्यच नाही."
     " काही नाही झोपा आता."
    "  आम्हाला आमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही तर  झोप कशी येईल ?"
    " मघापासून इतक्या वेळा विचारले तरी आपल्याला ओळखता आलं नाही. अगोदर आम्ही न सांगता आमच्या मनातले सगळे ओळखता येत होते स्वारी ना, पण आता  मनातले तर राहू ध्या पण पुढतल्या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही."
   " कोण म्हणतंय असं की आम्हाला उमगत नाही.आम्ही आल्या आल्या कारण सांगितले."
    " कुणाला ? आम्हाला .... आम्हाला सांगितलेत का त्या शमशेरीला ना ?"
    " म्हणजेच तुम्हालाच ना ?"
    " मग आमच्या डोळ्यात बघून का नाही सांगितलंत ? चला
काही सांगू नका. आम्हाला ठाऊक आहे....असे म्हणून त्यांच्या
दंडाला पकडले असते ते आ ss करून ओरडले. तश्या त्या घाबरून म्हणाल्या ," काय झालं ?" त्यावर ते हसून म्हणाले ,
  "  कुठं काय ?" जिजाबाई म्हणाल्या की, वेदना मस्तकात गेल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज तुमच्या मुखातून आला. तेव्हा घाव दाखवा बरं."
   " मघापासून तुम्ही आमच्या मनावर घाव घालून घालून आमचं
फार....?" तोंडावर हात ठेवून म्हणाल्या की काहीतरीच काय
बोलता ? आणि असा विषय टाळायचा नाही. मला घाव दाखवा
म्हणजे दाखवा."

     मलिक अंबर ने आपल्या पुत्राला आपल्या दालनात बोलविले असता. तो हजर झाला नि त्याने विचारले की आपले
हमे याद किया ?" मलिक अंबर ने फक्त आपली मान वर करून
त्याच्या कडे पाहिले. तसा तो स्वतःच बोलला की, हमने नशा
नहीं की हैं." मलिक अंबर ने कहा की, आप गैरमौजूद थे।"
   " अब हम बड़े हुए है ।" फतेह खान उत्तरले.
   " आप बड़े हो गए है, इसका मतलब यह है की, आप अपनी जिम्मेदारियां अब उठा रहे है । तो आज भी आपने एक
मिसाल कायम की होगी  है ना ?" मलिक अंबर ने पूछा
   " हां अलबत." फतेह खान उत्तरला.
   " अच्छा तो आज क्या काम करके आए हो ? हम भी वही जानना चाहते है।" फतेह खान म्हणाला ," कल से हम ठीक से सोये भी नहीं है !" तेव्हा मलिक अंबर न समजून विचारले की,
   " वह क्यों ?" फतेह खान उत्तरला , " कल शाहजी राजे का जनाना आया था, तभी आपने सबके सामने हमे जलील  किया था। " मलिक अंबर ने त्याला समजावत म्हंटले की," अब मुझे यह बताओ उन्होंने क्या गलत पूछा अगर वही बात शाहजी राजे पूछते तो आपका क्या जबाब होता ?" फतेह खान उत्तरला की,  " वही तो हम ने जबाब ढूंढ निकाला की कल कही हुई बाते उनकी तरफ से थी शाहजी राजे आज वेरुल में पहुंचे है। हमे लगा की आप हमारी तारीफ करेंगे ?" मलिक अंबर विचारले की ,  " किस बात की तारीफ ?"
    " यही शाहजी राजे आज वेरुल में पहुंचे यह खबर हमने
आपको दीं ।" फतेह खान उद्गारला. तभी मालिक अंबर ने कहा
की, " बेटे पूरी बात यह  है की खेलोजी राजे, शरीफ जी राजे, और शाहजी राजे आज वेरुल गए है लेकिन हारकर नहीं, रणदुल्ला खान को भगाकर  तो आपकी तारीफ किस बात की करूं ? आपकी आधी अधूरी बात की मैं तारीफ करू ?"
    " नहीं, इजाजत हो।" असे बोलून जायला निघाला पण
काहीतरी आठवलं तसे तो मागे वळला नि म्हणाला की अब
आप उसकी ....?" त्याचं अपुरे वक्तव्य पूर्ण करत मलिक
अंबर म्हणाला की, हम उसकी खबर लेंगे ."

     मंबाजी राजे इकलाक विचारतो की खान साहब आप हमारे
मेहमान नवाजी पर खुश हो तो है ?" तसा इकलाक खान
चिडून म्हणाला," यह कैसी मेहमान नवाजी है, हमे तो यह
कैदखाना लग रहा है । " इ खान च्या स्वरात संताप होता.
    " वह क्यों ?" मंबाजी राजे न कळून विचारले.
    " एक तो यह हवेली आपके हवेली से बहुत दूर लग रही है,
और जो आप चीज लाए है, वो रात में नहीं दिन में आने वाली
थी यह बात आपने खुद बताई थी । दिन भर हमे तड़पाने के बाद आप कह रहे की कैसा लग रहा है, आखिर आप हमसे
उम्मीद क्या रख रहे है । दिन भर कहां थे आप ?"
  " माफी चाहते है हम, लेकिन हम जहां पर थे खुश नहीं थे ।" "अच्छा जहां पर थे वो खुलकर बताएंगे तो समझ में आएगा ।"
" हम दिनभर वही पर थे क्योंकि हमारे जहांगीर भाई साहब जो
आए थे ।" मंबाजी राजे उद्गारले. त्यावर इकलाक खान ने विचारले की, " कौन शाहजी राजे ? आप उनसे डरते है ?"
  " क्या करे, आखिर जो जहागीर दार है, और हम कुछ नहीं ।
हमारे पास ऐसा कोई रुतबा नहीं, और वो बड़े बड़े जंग मारते
है, बचपन से ही श्मशेर बहाद्दार है, पकड़ मजबूत है। आप
जानते ही होगे बचपन में वजीरे आलम के बेटे फतेह खान को
म्यान से मारा था । यह हमारे सामने हुआ था ।" मंबाजी राजे
शहाजी राजेंची स्तुती करत असल्याचे पाहून इकलाक खान
भयंकर राग आला नि क्रोधाने म्हणाला की," मांबाजी राजे आप हमारी तौहीन कर रहे है। फतेह खान को मारना और इकलाक का सामना करना दोनो बात अलग है। हम कब, कहां और कैसे उन्हे मात देंगे यह उन्हे भी पता नहीं चलेगा ।" मंबाजी राजे
उद्गारले की,   " वो भी तेज है। आपसे कौन लड़ेगा, हम से नहीं होगा लेकिन शाहजी राजे की बात अलग है।" इकलाक खान उद्गारला," कल देखिए हमारा रुतबा.

      शहाजी राजे नि जिजाबाई शंभू महादेवाच्या समोर बसून प्रार्थना करत असतात. तेव्हा शहाजी राजे वळून जिजाबाई
कडे पहात असतात आणि हळूच त्यांना कोपरखळी मारतात.
त्या डोळे उघडून त्यांच्या कडे पाहत म्हणाल्या," हे काय
आपण कोठे बसलो आहोत याचे तरी भान आहे ना ?" तेव्हा शहाजी राजे हसून म्हणाले की, शंभू महादेव फक्त देव घरातच असतो असे आपणास म्हणावयाचे आहे की काय ?"
  " नाही पण ...?"
  " पण काय ?"
  " कुणी बघितले तर काय म्हणेल ?"
  " आऊ साहेब बाहेर गेल्या आहेत. म्हणून धाडस केले आणि
काहीतरी विचारायचं होतं म्हणून ढोंसले बाकी काही चुकीचा
इरादा नव्हता आमचा ."
  " हो का ? मग काय विचारायचं होतं ? ते विचारां  ना ?.....
काही नाही नुसते बहाणे."
   " नाही. आम्हाला हे विचारायचं होतं की आम्ही इथं नसताना
शंभू महादेवाना किती अश्रूंचे अभिषेक घातले तुम्ही ? त्याला किती वेटीस धरलं  वगैरे ?"
   " राहू दे, त्यांना वेटिस नाही धरणार तर मग कुणाला वेटीस
धरणार ? झालं समाधान ?" असे म्हणून हात जोडून पुन्हा
दोघांनी डोळे मिटले. थोड्या वेळाने जिजाबाईंनी डोळे उघडुन
हलकेच कोपरखळी शहाजी राजेंना मारली. परंतु कोपरखळी
जखमी असलेल्या खांद्याला लागल्या मुळे शहाजी राजे वेदनेने
कळवले. तसे जिजाबाईंच्या ध्यानात आले की आपण चुकीच्या
जागी मारले. तश्या  त्या दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या की, " आम्ही हळूच मारले. पण आपल्याला अगोदरच लागलेले आहेत ना, म्हणून दु:खलं आम्ही वैद्य बुवांना बोलवून घेतो." त्यावर शहाजी राजे म्हणाले , राहू दे." त्यावर त्या म्हणाल्या की, राहू दे कसं किती कळवळात. खरं तर आम्हाला हळूच मारायचं होतं."
  " लगेच बरोबरी..... आता म्हणाल आम्हाला पण काहीतरी
विचारायचं होतं......पण मला माहित आहे की तुम्हाला काहीही
विचारायचं नाहीये...... नुसता बहाणा हो की नाही ?"
   " नाही खरंच आम्हाला विचारायचं होतं की आपण जेव्हा
मोहीमे  असता तेव्हा आमची आठवण येत असेल का ? मला
तर वाटतं शक्यच नाही. हो ना  ?......सांगा ना ?"
   " हा काय प्रश्न झाला ?"
   " का ?तुमची आठवण आली की आम्ही शंभू महादेवाला
अभिषेक घालायचा आणि आमची आपल्याला साधी आठवण
पण येऊ नये ?"
   " असं कोण म्हणतं ?"
   " आम्ही म्हणतोय अजून कोण म्हणेल ?"
   " आम्हाला आपली आठवण येत होती की नव्हती हे फक्त
शंभू महादेवच सांगू शकेल. कारण केवढ्याचे फुल आधी शंभू महादेवाना अर्पण करून मग तुम्हाला खलीता लिहिला . मोगऱ्याचे फुल आधी त्याला अर्पण करून मग तुम्हाला खलीता लिहिला." त्यावर  जिजाबाईंनी हर्षभराने स्मित हास्य केले.

क्रमशः






  



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..