Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

छत्रपती शिवाजी महाराज १७

छत्रपती शिवाजी महाराज १७
छत्रपती शिवाजी महाराज १७

 



"  फुलांचा सुगंध अर्थात स्वारीचा खलिता आहे."  त्यांनी तो खलिता उघडला नि वाचला. तेव्हा त्यांच्या चेऱ्यावर एकदम
विलक्षण छटा उमटल्या.

पुढे

   जिजाबाईंनी शंभू महादेवाला हात जोडून सांगणे केले की,
स्वारीनी खलिता पाठवून आमच्या दु:खावलेल्या मनावर हळूवार
फुंकर घातली. आता स्वारी ना लवकर पाठवून दे, नाही नाही
फक्त आमच्यासाठीच नाही कारण आम्ही इतके पण स्वार्थी नाहीये. साऱ्या रयतेसाठी ज्या रयतेसाठी स्वारी रक्ताचे पाणी करत आहेत ते सार्थकी लागतच नाहीये, हे त्यांना कळू दे. रयते मध्ये उरला सुरला सन्मान संपण्या पूर्वी त्यांना माघारी येऊ दे, आम्ही अभिषेक करू."

    गोदा शेणाचा सडा घालत असते इतक्यात इकलाक खान
दोन शिपाई सह तेथे येतो. त्याला पाहून हातातील सडा घालायचे मटके तिथच ठेवून पटकन लपते. पण त्याला त्याची चाहूल लागली तो संशय ने इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात तेथे मंबाजी राजे आणि पंत आले नि त्याला घेऊन जाऊ लागतात. तसा तो म्हणाले," यहां कुछ जानी पहचानीसी महक आ रही है, पहले मैं उसे देखू।" त्यावर मंबाजी राजे म्हणाले की, त्यासाठी तुम्ही कशाला हे आहेत ना ?" तसा तो  आपल्या शिपाई ना हळूच खुनवतो की इथ कुणीतरी होतं. पण आम्हाला
पाहून लपले आहे. त्याचा शोध घ्या." असे सांगून मंबाजी राजे सोबत निघून गेला. ते दोघे गोदाला शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच  गोमाजी ने एक भाला फेकून मटक फोडून टाकले नि त्या दोघांना उद्देशून म्हणाले," ते मटके आम्ही फोडले आहे, इथं दुसरे कुणी आलेले नाही जाऊन सांग तुमच्या इकलाख खानाला." तसे ते दोघेही माघारी वळले. गोदा तेथून पळाली. मंबाजी राजे इकलाख खान ची खुशामत करत होते. पंताना सांगत होते. खान साहेबांच्या राहण्याची नि खाण्याची व्यवस्था करा, आता सारखी चूक परत करू नका." तेव्हा पंतांनी न समजून चूक ? आम्ही काय चूक केली ?" त्यावर मंबाजी राजे म्हणाले," खान आले तेव्हा पायघड्या घातल्या होत्या का नाही ना ? पुन्हा अशी चूक करू नका. पहिला गुन्हा म्हणून माफ केला त्यांनी. इकलाख ती दोन माणसं आली त्यांनी  इकलाख खानाला माहिती दिली की तिथं कुणी नव्हता. पण इकलाख खानाचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही, तो ठाम पने म्हणाला की असं होऊ शकणार नाही, जिसे हम एक बार देख लेते है, उसे हम कभी नहीं भूलते है।"तेव्हा मंबाजी राजे ने विचारले की आप किसकी बात कर रहे है ।" तेव्हा इकलाख खान म्हणाला," एक पुराना घाव है। " एवढे बोलून तो गप्प झाला.

   गोदा हातात बिचवा घेऊन दारा आड लपली. तेवढ्यात
तेथे जिजाबाई आल्या नि तिला विचारू लागल्या की काय
झालं ? आणि तू अशी दाराआड का लपली आहेस ? आणि
तुझ्या डोळ्यात इतका अंगार मी कधीच नाही पाहिला."
  " तो आलाय."
   " तो कोण ?"
   " ज्याच्या मुळे माझा संसार विस्कटला. तोच इकलाख खान
आलाय."
    " तो इथं आलाय ?"
    " हां !"
    " चल तू माझ्या सोबत."
    " त्याचा आता काटा मीच ह्या बीचवा ने काढणार आहे."
   " तू काही करायचं नाहीस मी बघते काय करायचं ते."
असे म्हणून तिच्या हातातील बीचवा त्यांनी घेतला नि त्या निघाल्या. इकलाक जवळ आल्या . तेव्हा त्यांना पाहून इकलाख
उद्गारले," बहुत दिन के बाद मुलाकात हो रही है।"
  " इतने साल के बाद भी रियासत के आदोतेसे वाकीब नहीं
हुए है ।"
   " मतलब ?"
   " मतलब यह की ये शाहजी राजे की जहागीर है, यह
आप यूंही चलकर कैसे आ सकते है ? यह कोई बगीचा नहीं।"
  " हमे वजीरे आलम ने रियासत के मसले सुलझाने के लिए
भेजा है।"
   " तो क्या वजीरे आलम ने तसलीम पेश न करने का हुकुम
दिया है ?" असे म्हणताच त्याने आपल्या साथीदाराना तिकडून
जाण्यास नजरेने खुणावले. ते जसे गेले तसे इकलाख खान ने
जिजाबाईंना मुजरा केला नि तिकडून निघून गेला. जश्या त्या
गोदा जवळ आल्या तशी गोदा म्हणाली," का सोडलत
त्याला ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या,," तो रियासतच्या
कामासाठी आलाय. त्याला आपण हाकलून देवू नाही शकत."
    " मग काय त्याला असंच सोडून द्यायचे ?"
    " तुझ्या इतका मला ही राग येतोय त्याचा पण त्याला आपण
इथं मारू शकत नाही. शिवाय सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट
अगोदर घालायला हवी आहे. मगच काय तो निर्णय घेता येईल." त्यानंतर त्यांनी उमाबाई जवळ इकलाख खान विषयी सविस्तर माहिती दिली. ती ऐकून घेतल्या वर उमाबाई म्हणाल्या की तुम्ही किंवा गोदा ने त्याच्या विरुध्द काही हालचाल करू
नका. त्याला वजीरे आलम ने पाठविले आहे, हे ध्यानात राहू
द्या." त्यावर जिजाबाई नाराज होत म्हणाल्या की असं तुम्ही
म्हणताय सासूबाई ?" त्यावर उमाबाई त्यांना समजावत म्हणाल्या की, ज्यावेळी तुम्ही सिंदखेडला त्याच्या वर हल्ला
केला त्यावेळी तुमच्या आबासाहेबानी अडविले ते चुकीचे होते
असे तुम्हाला म्हणावयाचे आहे का ?" त्यावर जिजाबाई निरुत्तर
झाल्या. गोदा सडा टाकत असताना नेमका इकलाख
खान तिथं आला. परंतु गोदा ची त्याच्या कडे पाठ असल्याने
तिला काही तो दिसला नाही. तो सापा प्रमाणे जिबोल्या चाटत तिच्या पाठमोरी येऊन उभा राहिला नि तिच्या अंगाला हुगुन वास
घेतल्यागत करून म्हणाल्या," वही खुश्बू वही सबकुछ वैसा
का वैसा ही है तुम हमारा वही तोहफा हो जो अब तक हमारे
पास पहुचा नहीं है, अगर दो दिन के लिए तुम हमारी बेगम बन जाओगी तो तुम्हे ऐसे काम करने की जरूरत ही नहीं होगी ।"
     असे म्हणताच गोदा पटकन वळली नि त्याला मारण्यासाठी बिचवा उगारला. पण त्याच वेळी तेथे जिजाबाई आल्या नि तिला तसे करण्यास मनाई केली. नि तिला तेथून जाण्यास सांगितले. ती निघून गेल्यावर इकलाख खान ला जिजाबाईंनी चांगलेच धारेवर धरले. ज्या कामासाठी आला आहात तेच काम करा. त्या कामा व्यतिरिक्त बाया बापड्यावर नजर टाकाल तर आम्ही तुमचे ते डोळेच काढून तुमच्या हातात ठेवू आठवण आहे ना, सिंदखेडची का पण विसरलात पहिल्यांदा आम्ही तुमच्यावर शमशेर चालविली. तेव्हा आम्हाला अडवायला तेथे आमचे काका साहेब होते, पण इथं आम्हाला अडवायला कोणी नाही हे ध्यानात ठेवा. रियासतची कामे करायला आला आहात ना, मग तीच करा. पाहुणे बनून आला आहात तर पाहुणे बनुनच रहा. इथं तिथं मुह मारू नका." इकलाख खान चा इतका अपमान आजवर झाला नव्हता. परंतु जिजाबाईंना तो फार ओळखून होता. म्हणून मुकाट्याने त्याने क्षमा मागितली नि तेथून निघून गेला. पण हे जेव्हा मंबाजी राजे ना कळले तेव्हा ते म्हणाले," वहिनी साहेब असे म्हणाले का पाहुण्यासारखे आले आहात तर पाहुणेच बनून रहा म्हणून. जरा चुकलेच त्यांचे." तेव्हा इकलाख खान म्हणाला की, औरत जात है, इसलिए हम चुप रहे ।" त्यावर मंबाजी राजेंनी पंतांना  खान साहेबासाठी सरबत ची व्यवस्था करा. आम्ही आलोच !" असे म्हणून तेथून जो निघाला तो थेट जिजाबाई पांशी आला. आणि म्हणाला की वहिनी साहेब आम्ही तुम्हाला काय म्हणावे ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," वहिनी साहेब म्हणताय ना तेवढं पुरे आहे." त्यावर तो आपली चूक सुधारत म्हणाला," खान साहेब बद्दल बोलत आहोत." त्यावर जिजाबाई म्हणाल्या ," त्याला खान साहेब काय म्हणताय , इकलाख खान म्हणा."
  " हो हो तेच ते. आम्ही किती समजून घेत आहोत पण
तुम्ही ?"
" आम्ही काय बोला पुढे ?"
" तुम्ही त्यांना पाहुण्या सारखे रहा म्हणालात ."
" मग बरोबर आहे ना, सारा वसुलीच्या कामासाठी आले आहेत
तर त्यांनी तेच करावे, बाया बापड्यांच्या वाटेला जातील तर आम्ही खपवून घेणार नाही."
  " तुम्हाला काय आम्हाला जबाव द्यावा लागतो त्याचा ."
  " तुम्हाला कशाला जबाब द्यावा लागेल स्वारी येतील तेव्हा
स्वारीच देतील जवाब त्याला ?" तेवढ्यात नौबती वाजल्या. आणि खबर ही दहा कोसावर शहाजी राजे आले म्हणून. हे ऐकून जिजाबाई खुश झाल्या. मात्र मंबाजी राजे चेहरा फिका पडला. ते तेथून मुकाट्याने चालते झाले.

   शहाजी राजे येणार म्हणून जिजाबाई सजून धजून तयार
होतात. तिकडे मंबाजी राजे ,  शहाजी राजे दहा कोसावर आले
आहेत ही खबर खानाला सांगतात. पंत आणि कारभारी यांना
शहाजी राजेची येत आहेत ही खबर मिळताच तेथून घाई घाईने
निघून गेले. तसा इकलाख म्हणाला," आम्ही ही येतो."
   " तुम्ही कुठं निघालात ? तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत." असे मंबाजी राजे चापलुसी करत म्हणाले. त्यावर
इकलाख म्हणाला की आम्ही वेरुळ सोडून जात नाही आमची
दुसरी कडे राहण्याची व्यवस्था करा." असे सांगून खान तेथून
निघून गेला. जिजाबाईंनी सारा न भरल्याल्यांची यादी पाहिली
नि पंतावर चिडून म्हणाल्या ," तुम्हाला मी काय सांगितले होते.
इतक्यात मंबाजी राजे तेथे आले नि  म्हणाले," वहिनी साहेब, त्यांना काय विचारताय मला विचारा ना ?" तेव्हा जिजाबाई म्हणाल्या," ह्या लोकांनी सारा भरला नाही, ह्याला कारण ह्यांना पगार दिला गेला नाही. तो जर वेळेवर दिला गेला असता तर त्यांनी सारा भरला असता. जसा सारा वसूल करता, तसाच त्यांना पगार वेळेवर द्यायचे काम कुणाचे आहे ? आपलेच आहे ना ?" असे विचारल्यावर मंबाजी राजे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर नव्हते. जिजाबाई पंता कडे पाहत म्हणाल्या की उद्या स्वारी ने विचारल्या वर तुम्ही काय उत्तर देणार ?" पंत मंबाजी राजे कडे पाहू लागले. तसे मंबाजी राजे म्हणाले," माझ्याकडे काय पाहताय ?"

      जिजाबाई तयार होऊन वाट पाहत असतात. हातात आरतीचे ताट असते. इतक्यात संभाजी राजे येतात तसा सगळ्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. सगळ्यांना वाटत असते की त्यांच्या मागोमाग शहाजी राजे नि शरीफ जी राजे येतील म्हणून सर्वांचे डोळे वाटे कडे लागलेले असतात. खास करून जिजाबाई आतुरतेने वट पाहत असतात. सोयराबाई नेहमी कुजकटच बोलत असतात. त्या एक पण संधी सोडत
नाहीत.
       इतक्यात संभाजी राजे खबर देतात की वहिनी साहेब
शहाजी राजे नि शरीफ जी राजे आलेले नाहीत. ते दुसऱ्या
मोहीमे वर गेले आहेत. हे ऐकून जिजाबाईचां उत्साह निघून
गेला . त्या हिरमुसल्या नि तिकडून निघून गेल्या. संभाजी राजेंच्या पत्नीने संभाजी राजेंना ओवाळले. सोयराबाई
म्हणाल्या," पाहिलंत ना , मी म्हटलं होतं ना नजर लागते
म्हणून. " खरं तर उमा बाई ना सोयरा बाईंच्या कुजकट
बोलण्याचा भयंकर राग येत असतो, पण त्या तश्या दाखवत नाहीत. जिजाबाई हिरमुसल्या आहेत म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या दालनात गेल्या नि त्यांची समजूत
काढण्याचा प्रयत्न करत असतानाच बत्तीची ज्योत विझली.
त्यामुळे त्यांच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्याचे मन एकदम घाबरे घुबरे झाले होते " तेव्हा उमाबाई  म्हणाल्या,
    "  ज्योत वाऱ्याने विझली आहे, तुमच्या स्वारी ना काही होणार नाहीये. चिंता करू नका. पण त्या जास्तच व्याकूळ झालेल्या दिसल्या. त्यांची समजूत कशानेच होई ना तेव्हा शेवटी उमाबाई म्हणाल्या की, आमचे स्वारी शेख बाबाचे मोठे भक्त होते, शेख बाबांनी सांगितले होते की शहाजी राजेंना राज योग आहे, ते मोठा पराक्रम जागवतील. तेव्हा त्यांची चिंता करू नका. तेव्हा कुठं त्यांच्या गालावरची खली उमलली. उमा बाईंनी त्यांची समजूत काढली. पण स्वतःची कशी काढणार, त्या आपल्या दालनात जाऊन चिंतायुक्त मनाने बसलेल्या असतात. इतक्यात सोयराबाई तिथं येतात नि तक्रारी सुरात म्हणाल्या,
    "  जाऊ बाई , आम्ही बोललो म्हणून आमच्या वर रागवलेत का ?"
   " नाही नाही तुमच्या वर कशाला रागवणार  ?"
   " नाही तुम्ही संभाजी राजे ना आशीर्वाद द्यायला थांबले
नाहीत म्हणून म्हटलं की तुम्ही रागवले असाल तर आम्ही
माफी मागतो." उमा बाई म्हणाल्या," आम्ही संभाजी राजेंशी
स्वतः बोलू." बोलण्याच्या नादात त्या ज्योत विझल्याचे पटकन
बोलून गेल्या. मग काय उमा बाई समोर साळसूद पणाचा नि
समजूतदार पणाचा आव आणतात. पण काही मनात धरायचं
नसतं. वारा आला नि ज्योत विझली. त्यांचं काही एवढं मनावर
घेऊ नका." असे सांगून त्या तेथून निघाल्या. आपल्या सूनबाई
ला सांगण्याचा बहाणा करत जिजाबाईंना पण ऐकू जाईल ह्या आवाजात सांगतात की तुम्ही नशीबवान आहात, तुमची स्वारी सुखरूप आली. मोहिमे वर गेलेल्या पुरुषांची माघारी येण्याची शक्यता कमी असते. मी आताच जाऊ बाईंची समजूत काढून आली. शहाजी राजे नि शरीफ जी राजे आले नाहीत म्हणून
चिंतित आहेत त्यात करून अपशकुन झाला म्हणे. ज्योत
विझली ना ?" तशा संभाजी राजेंच्या पत्नी घाबरून म्हणाल्या
की अंगबाई मग आता ?" त्यावर सोयरा बाई म्हणाल्या,
   "  आता काय शंभू महादेवाच्या हाती चला." असे म्हणून त्या
जातात. ते ऐकून मात्र जिजाबाई हवालदिल झाल्या. केसात
माळलेली फुले काढून फेकून देतात. लुगडे सोडून दुसरे
परिधान करतात. पण नंतर त्यांच्या लक्षात येते की फुलावर
राग काढून काय फायदा त्यांचा काय त्यात दोष ? म्हणून मग
त्या फुलांशी बोलतात की आमचं चुकलं बरं का ? पण या
पुढे मी तुम्हाला शब्द देतो या पुढे आम्ही फुले केसात माळणार
नाही. आणि ही नोंद वहीत करून ठेवतात. तेव्हा गोदावरी
त्यांना विचारले की नोंद केल्याचा फायदा काय ?" त्यावर
जिजाबाई म्हणाल्या की, सगळ्याच गोष्टी काही आपल्या
लक्षात राहत नाही म्हणून नोंद करून ठेवायची असते.

    सोयराबाई नि मंबाजी राजे दोघेही मिळून संभाजी राजेंचे
कान भरू पाहतात. जेव्हा संभाजी राजे त्यांना विचारतात की
सारा कमी का भरला जातो ?" तेव्हा मंबाजी राजे सांगतात
की वहिनी साहेब सारा माफ करतात म्हणून." असे सांगितल्या वर मात्र संभाजी राजे बोलत काहीच नाहीत विचारात पडतात. पण त्यांना जिजाबाई वहिनी उगाच काही असं करणार नाहीत त्या मागे काहीतरी कारण असावे. असा विचार करून ते म्हणाले," ठीक आहे, आम्ही उद्याच त्याचा निर्णय घेऊ ."
असे सांगून निघून गेले. तसे मंबाजी राजे आपल्या आऊ
साहेबांना म्हणाले," पाहिलेत आऊ साहेब वहिनी साहेबांचे
नाव घेताच काही न बोलता निघून गेले.

     आपल्या दालनात गेले तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांना म्हणाल्या की तुम्ही इतक्या रागात का आहे, हे कारण कळेल का ?" त्यावर संभाजी राजे म्हणाले," तिथं मोहीमे वर काय घडलं हे जाणून घेण्याची कोणाला गरजच नाही. इथं आल्या पासून पाहतोय नुसत्या तक्रारी च सुरू आहेत." त्यावर त्यांच्या पत्नी म्हणाल्या," जिजाबाईंना सारख्या बोलत लावत असतात."
  " सारा वसुली बाबत त्यांच्या वरच आरोप केला त्यांनी."
  " मग आता ?"
   " वहिनी साहेबांना प्रत्यक्ष भेटूनच त्याचा सोक्षमोक्ष लावतो."
दुसऱ्या दिवशी संभाजी राजे जिजाबाई दालनात जाऊन
विचारतात की आंत येऊ का वहिनी साहेब ?"
    " दादा साहेब या ना ." असे म्हणून त्यांना नमस्कार करतात.
तसे संभाजी राजे म्हणाले," शिखरशिंगनापुरला चाललोय."
    " आताच मोहीमे वरून तर आलेत आणि लगेच जाण्याची
काय घाई आहे."
    " नेहमीच जातो आजच नाही काही."
    " बरं."
    " आता आलोच आहे, तर एक विचारू वहिनी साहेब."
    " हो विचाराना ना ?"
    " सारा माफी तुम्ही दिलाय."
    " थांबा. मी काही बोलण्या पेक्षा हा स्वारींचा खलीता वाचा. म्हणजे तुमच्या ध्यानात येईल." असे म्हणून जिजाबाईंनी तो खलीता संभाजी राजेंच्या हातात दिला आणि त्यांनी तो वाचून पाहिला नि म्हणाले," तुमचं काही चुकलं नाही वहिनी साहेब. तुम्ही योग्य तेच केलं. मग हे का घाबरताहेत इतके ? शहाजी राजे येऊ दे मग सगळं गढूळ पाणी निघून जाईल." असे बोलून
संभाजी राजे तेथून निघून गेल्यानंतर जिजाबाई त्या तलवारी
कडे पाहत म्हणाले," स्वारी या ना !" त्यानंतर दुसऱ्या दिवशी
सकाळी जिजाबाई देव घरात गेल्या शंभू महादेवाच्या समोर उभ्या राहून देवाला सांगतात की यश पराक्रम पेक्षा स्वारी ना
सुखरूप ठेव. ती आता जबाबदारी तुझीच आहे." इतक्यात
तेथे गोदा आली नि  शंभू महादेव ला हात जोडून नमस्कार
केला. तेव्हां जिजाबाईंनी तिला विचारले की काय झालं गोदा ?" त्यावर गोदा म्हणाली," ते आले आहेत."
   " कोण हिराजी.?"
   " नाही त्यांचे आबा साहेब ."
   " अग मग तुझे सासरे म्हण की ! बरं कुठं आले आहेत ते सांग."
    " ते इकलाख खान ला सांगायला आले आहेत की आमचे
धनी आले नाहीत म्हणून सारा भरायला उशीर होईल म्हणून.
तुम्ही सांगितलंत तर बरं होईल."
   " बरं."

     रायाजीला साखदंडांनी बांधून तेथे आणलेले असते. राया
सांगण्याचा प्रयत्न करत असतात की माझा पोरगा मोहीमे
वर गेलाय,पण इकलाख त्यांना पुढे बोलूच देत नाही. त्याच
क्षणी तेथे मंबाजी राजे येतात, परंतु त्यांच्या समोर येत नाही.
कारण त्यांना भीती वाटत असते की आपण समोर गेलो ते
आपल्या नावाची तक्रार करतील. त्या पेक्षा आपण इथच राहून
फक्त गमत पहायची. इकलाख खान त्यांना बोलू देत नसल्या
मुळे ते फक्त इतकंच बोलतात की हुजूर माफी द्या. पण तो
कशाचा ऐकतोय त्याने त्याच्या कोडे मारायला सांगितले.
पण जसा चाबूक ओढला तसा तो चाबूक जिजाबाईंनी पकडला. म्हणून तो रागाने जिजाबाई कडे पाहतो. तेव्हा
जिजाबाई त्या इकलाख खानाला स्पष्ट शब्दात सांगतात की ही  भोसल्यांची जहागीर आहे, इथं अन्याय खपवून घेतला जाणार नाही." तेव्हा इकलाख म्हणाला," जहागीर जरी भोसल्यांची असली तरी जवाब वजीरे आलमला द्यावा लागेल." असे
बोलून त्याने आपल्या हातातील फर्मान त्यांच्या समोर धरले.
जिजाबाईंनी ते फर्मान घेतले आणि वाचून पाहिले. आणि मग
म्हणाल्या ," जबाबाला  बांधील आम्ही आधी रयतेशी आहोत.
आमच्या रयतेवर कुणी अत्याचार करत असेल तर तो आम्ही
खपवून घेणार नाही. मग त्या साठी आम्हाला वजीरे आलमला जवाब द्यावा लागला तरी तो आम्ही देवू." त्यावर इकलाख
खान म्हणाला ," ठीक आहे, मग आपण वजीरे आलमलाच
जबाब द्या." असे म्हणताच जिजाबाईंनी फर्मान फेकून दिले.
रायाजीला प्यायला पाणी आणले दिले. तसा तो अपमानीत झालेला इकलाख खान त्वेषाने निघून गेला. तसा मंबाजी राजे ने पण काढता पाया घेतला. त्यानंतर जिजाबाई गोदा कडे पाहत म्हणाल्या," गोदा , रायाजीच्या थाळ्याची व्यवस्था कर, तू जर आम्हाला वेळीच येऊन  सांगितले नसतेस तर आम्ही वेळीच इथं येऊन पोहोचू शकलो नसतो." तसे रायाजी आपल्या सूनबाई कडे कृज्ञतापूर्वक नजरेने पाहतात. जिजाबाई जश्या आपल्या दालनात आल्या तसे त्याच्या मागोमाग मंबाजी राजे पण तेथे आले नि म्हणाले,  " वहिनी साहेब , तुम्ही हे काय केले ? नाही म्हणजे लोकावर उपकार करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आता वजीरे आलमला जवाब कोण देणार ?"
   " म्हणजे आपण  सारे आड लपून ऐकत होता तर !"
   " प्रश्नाला प्रती प्रश्न विचारणे म्हणजे आमच्या प्रश्नांचे उत्तर टाळणे होय ना ?"
   " ठीक आहे, अगोदर माझा प्रश्न मागे घेतो नि तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतो, कृतघ्न होणे हे आपल्यालाच नाहीतर आपल्या वाड-वडीलाना लाज आणणारे असते."
   " असे आम्ही काय कृतघ्ना चे काम केलं ?"
  " सारा भरला नाही म्हणून ज्यांना पकडुन आणलेत ते रायाजी
शितोळे हिराजी चे वडील आहेत. ज्या हिराजी ने आपल्या दादा साहेबांचा प्राण वाचविला हे देखील विसरायचं ? तेच हिराजी
आमच्या स्वारी सोबत मोहीमेवर झुंज देत आहेत, हे पण
विसरायचं ? ह्याला कृतघ्न नाही म्हणायचं तर आणखीन
काय म्हणायचं ?" त्यावर मंबाजी राजेंनी माकडीनीचे उदाहरण
दिले. जेव्हा माकडीनीच्या तोंडात पाणी जाऊ लागते तेव्हा
ती सुध्दा आपल्या पिल्लांना आपल्या पाया खाली घेऊन
स्वतःचा प्राण वाचवते ." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," वाहवा! काय उदाहरण पेश केलं. प्रगती चांगली आहे, इतक्या लवकर उत्तर पण तयार केलं."
   " आम्ही आपल्या भल्याचे बोलत होतो, पण आपण आम्हालाच बोल लावत असाल तर वजीरे आलमला काय
उत्तर द्यायचे ते तुम्हीच बघा." असे बोलून मंबाजी राजे चालते
झाले.

      मलिक अंबरच्या दालनात मुराद खांन नावाच्या व्यक्तीशी
काहीतरी चर्चा सुरू असतानाच फतेह खान ने आंत प्रवेश केला
म्हणून मलिक अंबर आपल्या मुलावर चिडला नि म्हणाला,
मिया रियासत में दस्तूर नाम की कोई चिज होती है ।"
  त्यावर फतेह खान म्हणाला," अब हम से क्या गुस्ताखी हुई
अब्बा हुजूर जो आप हमसे खफा हो गए. दो दिन पहले आप जिनपर नाराज थे वो आप को प्यारे हो गए और हम नादान हो गए ।" तेव्हा मलिक अंबर म्हणाला," मुराद खान आप बुरा
मत मानिए और ऊपर बैठिए । हम माफी चाहते हैं, इनको
कुछ गलतफहमी हुई है, जनाब आप हमारे नजरोसे दूर हो
जायेंगे ।" फतेह खान भयंकर राग आलेला असतो. पण तो आपल्या रागाला गिळतो नि चुपचाप तेथून निघून जातो. तसा
मुराद खान म्हणाला," आपका हम पर नाराज होना जाईज
है, क्योंकि आपका दावत नामा हम ठुकरा दिया था ।"
  " देखो मुराद साहब, मोगल और आदिलशाही के सामने
हमारे निजामशाह का पर्चम बुलंद लहराया है, वो इसलिए
आप जैसे जाबाज जहागिर दारोंके वजह से लेकिन हमारे
दावत नामे के बदले आपने हमे इजिप्त भेजा यह बात हम कांटे
की तरह चुबती थी । अब आप आए तो सारी गलतफहमी दूर
हुई । असे बोलून मलिक अंबर ने स्मित हास्य केले. फतेह
खान संतापाने लाल पिवळा झाला होता. तो उद्गारला की मामूली
जहागिरोंके वजह से अब्बु  हमको सुना रहे है। " इतक्यात एक
शिपाई म्हणाला," हुजूर वो देखो एक आदमी और एक औरत
आई है।" तेव्हा त्या फतेह खान चे लक्ष गेले. तसे त्याने लगेच
ओळखले. तो म्हणाला ," इन्हे हम जाणते हैं .अब्बा हुजूर को
बताकर आते है. " असे बोलून तो आंत गेला. तेव्हा मलिक
अंबर मुराद खान सोबत होत होता . त्यावेळी तो म्हणाला की, वैसे हर कोई जहागिरदार ऐसा सोच सकता है की जागीर उनकी
आवाम उनका हैं तो  वो जो चाहे कर सकते है, लेकिन हकीकत
यह है की हम उनका गुरूर टूटते देखा है. इतक्यात फतेह खान
आंत प्रवेश करतो त्याला पाहताच मलिक अंबर रागावला नि
म्हणाला की, इस गुस्ताखी की वजह ?" त्यावर फतेह खान
म्हणाला ," गस्ताखी की माफी मागते हैं हम. लेकीन हम यहाँ
क्यो आये है, यह भी जान लो ."
  " कहो."
   "   वेरुळ के जहागीर शहाजी भोसले उनकी बेगम आई हैं ."
   " बेगम सायबा वो भी यहाँ ?"
   " हां , और उनके साथ उनका वफादार गोमाजी भी है !"
    " यकीन नहीं होता की एक औरत अकेली यहाँ आ सकती हैं." मलिक अबर विचारमग्न झाला.त्याने स्वप्नात देखील विचार
केला नसेल की जिजाबाई अश्या एकट्या पण येऊ शकतील.

  
     गोमाजी म्हणाला,  " जीजा आक्का इथले काम होताच घराला जाऊ !" त्यावर जिजाबाई उद्गारल्या, " गोमजी काका आपण  हौस म्हणून इथं आलो आहेत का  ? रयतेची बाजू मांडता यावी म्हणून इथं आलोय ना आपण.." गोमाजी होकारार्थी मान हलवली नि म्हणाला,  " हो , ते बरोबर तुमचं म्हणणे ; पण आपण घरात कुणाला न सांगता आलोय ना, म्हणून जरा भीती वाटते. दुसरं काय ?"

     दरबारात बसलेले सर्वजण चकित झाले होते. कारण एक
एकटी बाई इथं येण्याची हिम्मत कशी करू शकते. असा
प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. मलिक अंबर सोबत वार्तालाप
करत असलेला,जहागीर दार मुराद खान आश्चर्य व्यक्त करत
म्हणाला की, " ताज्जुब हैं, एक औरत अकेली मिलने आई है ."
तेव्हा मलिक अंबर म्हणाला की,  "  मैं उन्हें बचपन से जानते है, उनकी शादी भी हमने करवाई थी . इसलिए हम उनसे जरूर मिलेंगे लेकिन इतने आसानी से नहीं उन्हें बिठाओ उन्हें इंतजार करने के लिए बोलो !" फतेह खान बाहेर आला नि म्हणाला ,
   "  आपको अभी इंजार करना होगा . " बराच वेळ झाला तरी आतून बोलवणे काही आले नाही. म्हणून जिजाबाई त्या फतेह खान ला म्हणाल्या की वजीरे आलम के पास अगर समय नहीं है तो हम चलते है। ते दोघंही माघारी जाण्यासाठी वळले तसा फतेह खान ने कहा की जरा रुक जाइए हम अभी पूछकर आते है, असे बोलून तो आंत गेला. तसा गोमाजी म्हणाला," म्हणजे हा मघाशी काय करायला गेला होता ?" जिजाबाई उद्गारल्या
की ,  " गोमाजी काका ही आपली परीक्षा होती, म्हणून
मी अशी परवानगी मिळविली. आपणच मला शिकविले आहे
ना, की नाक दाबले की तोंड उघडते." थोड्या वेळाने तेथे फतेह
खान बाहेर आला मी म्हणाला," सिर्फ आपको बुलाया वो भी
निशस्त्र !" तेव्हा गोमाजी जिजाबाईंना एकट्याला जायला मनाई
केली. पण जिजाबाई म्हणाल्या " गोमाजी काका काही घाबरु नका. मला शस्त्र चालवता येते." असे बोलून आपल्या हातातील तलवार गोमाजीच्या  हातात दिली बेधडक आंत शिरल्या.

    मलिक अंबरच्या दरबारात जिजाबाई हजर झाल्या.त्यांनी
आपले म्हणणे वजीरे आलम समोर मांडले.तेव्हा त्या म्हणाल्या
की आमची रयत गरीब आहे नि निजामशाहीचा परछम बुलंद
राहण्यासाठी मोहित फत्ते करत आहेत तर आमच्या रयतला
कोणीही त्रास  देऊ नये. आमच्यासाठी रयत अगोदर मग
सर्वकाही ! हां आता त्यांनी सारा का नाही भरला हे जर
वजीरे आलम ना विचारायचे असेल तर विचारू शकता." त्यावर
फतेह खान म्हणाला की, अब्बा हुजूर आप सवाल क्यों नहीं
करते?" त्यावर मलिक अंबर आपल्या मुलावर रागवत म्हणाला
की , एकच गोष्ट दिवसातून किती वेळा  सांगायची तुला हां ?
रियासत मध्ये काही नियम कायदे काही आहेत का नाहीत ?
ह्यांना आम्ही कोणत्या अधिकाराने प्रश्न विचारू शकतो ?
जहागीरदार शहाजी राजे आहे ना, काय आहेत ना ?" त्यावर
त्याने होकारार्थी आपली मान डोलावली. तसे मलिक अंबर
जिजाबाई कडे त्यांनी विचारले की, मग कधी येताहेत शहाजी
राजे ?" जिजाबाई उत्तरल्या की, माहित नाही." त्यावर मलिक
अंबर म्हणाला," त्यांना आधी मोहीमे वरून येऊ दे मग त्यांच्याशी आम्ही अवश्य बोलू ?" तेव्हा जिजाबाई म्हणाल्या,
  " मग आम्ही येऊ ?"
  " अवश्य !" असे म्हणताच जिजाबाई तेथून निघाल्या.
बाहेर गोमाजी वाट पाहत च होते त्यांनी विचारले," काय
म्हणाले वजीरे आलम ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या ," अगोदर आपण इथून जाऊ मग वाटेमध्ये सांगते."

       मलिक अंबर ने दरबार बरखास्त केला.सगळे उठून निघून
गेल्यावर फतेह खान सह तो खिडकी पाशी आला तेव्हा
जिजाबाई आणि गोमाजी जिना उतरत होते. त्यांच्या कडे
मलिक अंबर म्हणाला," बिजली है, बिजली जल्दी से नहीं रोखा नहीं  तो सबको जलाकर राख कर देगी ।"
  . " आप उनकी तारीफ कर रहे है ।"
   " तारीफ नहीं हाकीगत बयान कर रहा हुं।"

क्रमशः

    

 

 


 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.