छत्रपती शिवाजी महाराज १६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज १६ |
हिराजी नाईलाजाने कडे घेतात आणि त्यांना प्रणाम करतात. तेव्हा संभाजी राजे प्रसन्नतेने म्हटले की, वा शहाजी राजे वा ! आज तुम्ही सिद्ध केलात की तुम्ही आमचे धाकटे बंधू नसून थोरले आहात." हे ऐकून जिजाबाईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.
पुढे
शहाजी राजे विचारमग्न अवस्थेत बसलेले असतात. तेव्हा तेथे
जिजाबाई आल्या नि त्यांचे लक्ष आपल्या कडे केंद्रित व्हावे
म्हणून त्या थोड्याशा खाखरल्या. तेव्हा शहाजी राजे त्यांच्या कडे वळून पाहतात. तेव्हा जिजाबाई म्हणाल्या की, तुम्ही आमचा, आऊ साहेबांचा, संभाजी दादा साहेबांचा विचार करत नसणार हे आम्ही ओळखले. परंतु आपण कसला तरी गहन विचार करत आहात हे नक्की ? पण कसला विचार करताय ते नाही कळलं ? " त्यावर शहाजी राजे म्हणाले की, दादा साहेब तर मोहीमे वरून आले, परंतु शत्रू सोबत झुंज देत असलेल्या फौज फाट्याचे काय ? म्हणजे त्यांच्या कडे कोण लक्ष देत असेल ? आणि ते कुणाचे आदेश पाळत असतील. मनगटात शौर्य असूनही ते मनातून खचले तर नसतील ना ? आणि जर का ते मनातून खचले असतील तर जनावरांचे काय त्यांना तर लगेच कळते ? ते उधळले तर नसतील ना ?" तेव्हा खिडकीत उभ्या असलेल्या उमाबाई शहाजी राजेंचे वार्तालाप ऐकत असतात. त्या पुढे येत म्हणाल्या, " राजे तुम्ही ही पारखी नजर कधी शिकलात स्वारी कडून. तीच नजर तेच विचार, स्वारी आज जर असते तर बेहद खुश झाले असते."
" पण आऊ साहेब नुसता विचार करून काय उपयोग ?
आम्ही तर म्हणत होतो....." त्यांना पुढे बोलू न देता उमाबाई
म्हणाल्या की तुम्ही पुढे बोलूच नका. हा विषय इथच संपला.
" आऊ साहेब आपल्याला कसली तरी चिंता लागून राहिली
आहे, म्हणून हा विषय इथं संपवत आहात."
" तुमच्या पेक्षा जास्त पावसाळे काढलेत आम्ही, चिंता
तर वाटणारच. पण ते तुम्हाला नाही कळणार ?"
" पण काय ते तर कळायला हवं ?"
" एकदा सांगितलेले कळत नाहीये का तुम्हाला ? विषय
संपला म्हणजे संपलाच. उगाच नाही ते बोलायला भाग पाडू
नका मला. चला जिजाबाई !" उमाबाई गरजल्या. जिजाबाईंना
सोबत घेऊन गेल्या. शहाजी राजे मात्र विचारमग्न झाले. त्यांना
कळत नव्हतं की नेमके कारण काय आहे ते ? पण कळणार कसं ?"
संभाजी राजेंना त्यांच्या पत्नी आपल्या सासूबाई विषयी माहिती देताना म्हणाल्या की , आबा साहेब गेल्या पासून सासूबाई सारख्या चिडचिड करत असतात. आता जिजाबाई किती लहान आहात ,पण तरी देखील त्यांना नको नको ते बोलतात." संभाजी राजेंनी विचारले," रागवायचे काय कारण ?" त्यावर त्यांच्या पत्नी त्यांना म्हणाल्या की, आबा साहेब गेल्याची खबर जिजाबाईंनी सासूबाईंना दिली. त्या दिवसा पासून सारखा राग करतात." संभाजी राजे म्हणाले
की स्वभावाला औषध नसते हे खरंय. पण काही चिंता करू
नका सर्वकाही ठीक होईल."
" आता सारा कारभार मंबाजी दादा साहेबाकडे गेला नि
मंबाजी राज्यांचा स्वभाव कसा आहे, हे तर आपल्याला ठाऊकच आहे ,म्हणून मी काय म्हणत होते की सारा कार्यभार आपण आपल्या हातात घ्यावा."
" मी आणि कारभार शक्यच नाही."
" काय शक्य नाहीये."
" आम्हाला फक्त मोहीमे वर जायला आवडतं . तेव्हा कारभार
कोणाला सांभाळायचा त्याला सांभाळू दे."
" तुम्हाला माहितेय मंबाजी राजे दादा साहेब कुणालाही
काहीही बोलतात. वयाचा ही मान ठेवत नाहीत."
" असं काय केलं त्याने ?" तेव्हा मग त्यांनी थोडक्यात
सांगितले. तेव्हा संभाजी राजे म्हणाले," ठीक आहे, आम्हाला
बोलावेच लागेल त्यांचीशी !"
दरवाजा उघडा sss असा बाहेरून आवाज आला हिराजी नि
गोमाजी उठून दरवाजा पाशी येतात नि दरवाजा उघडतात.
तेव्हा एक व्यक्ती वजीरे आलमचा फर्मान घेऊन आलेला
असतो. गोमाजी ते फर्मान आपल्या हातात घेतात नि हिराजी
सांगतात की ह्यांच्या थाळ्याची व्यवस्था कर , आणि घोड्यांच्या
दाणा पाणीची व्यवस्था कर मी आलोच फर्मान देवून." असे
बोलून गोमाजी ने ते फर्मान शहाजी राजेंच्या दालनात नेऊन
दिलं. शहाजी राजे फर्मान वाचतात नि गोमाजी ला आदेश
देतात की मोहिमे वर जाण्याची तयारी करा." गोमाजी ने
होकारार्थी मान डोलावली नि तेथून निघून गेले. इतक्यात
जिजाबाई आल्या नि विचारू लागल्या की काय आहे ते? "
शहाजी राजे उद्गारले की, आता कळले आऊ साहेब कशाची
चिंता करत होते ते."
" कशाची करत होते, सांगा बरं."
" आबा साहेब आणि काकासाहेब आता हयात नाहीत.
संभाजी राजे दादासाहेब आजारी आहेत, अश्या परिस्थिती
मध्ये बादशहाचे फर्मान आम्हालाच येणार, म्हणून त्या घाबरत
होत्या. पण तुम्हाला पण असं वाटत होतं ना, की आम्ही मोहीमे
वर जावे ? पण तुम्ही कोणता विचार करताय ?"
" तुम्ही शमशेरचे मन ओळखले. पण आमचे नाही."
" ते कसं ?"
" तुम्ही गेल्यावर आम्ही घागर कोठे खाली करणार ?"
" मग ही शमशेर तुमच्या पाशी ठेवा. कारण तुमचं नि माझी
लग्न ह्या तलवारी शी लागलं. तुम्ही ह्या तलवारी जवळ जे
काय बोलाल ते आमच्या पाशी पोहोचेल."
" हो खरंच ?"
" हां !" असे बोलून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.
सोयराबाई एकदम खुश होत्या. कारण आता शहाजी राजे
मोहीमे वर जाणार होते. मंबाजी राजे आले नि आपल्या आऊ
साहेबांना म्हणू लागले की, म्हणजे ही खबर तुमच्या पर्यंत
पोहोचली तर !" त्यावर सोयरा बाई म्हणाल्या ," मग आमच्या
पर्यंत खबर पोहोचल्या शिवाय राहील का ? आता जिजाबाईंना
कळेल मोहिमे वर जाणे काय असते ते. चार दिवस स्वारी दुष्टीस
पडली नाही तर काय अवस्था होते ती."
" मागे आमच्या वहिनी साहेबांना हसत होत्या. आता पाहू
ना, किती दुःख सहन करतात ते.." मंबाजी राजे उद्गारले.
शहाजी राजे मोहीमे वर जाण्यासाठी तयार होऊन संभाजी
राजाच्या पाशी येतात नि चरण स्पर्श करतात. तेव्हा संभाजी
राजे खेद व्यक्त करत म्हणाले," माझ्या या अश्या अवस्थे मुळे
तुम्हाला मोहीमे वर जावे लागत आहे." त्यावर शहाजी राजे
उद्गारले की, त्याची आपण अजिबात चिंता करू नये. आपण
फक्त आम्हाला आशीर्वाद द्या." त्यावर संभाजी राजे म्हणाले,
" आशीर्वाद सोबत मोलाचे दोन शब्द सांगणारे काका साहेब
आणि आबासाहेब हवे होते. पण काही हरकत नाही. तुम्ही
प्रचंड पराक्रम कराल यात तिळमात्र शंका नाही. डोळ्यांच्या
पाती करून आम्ही तुमच्या येण्याची वाट पाहू. तुम्ही
पराक्रम करून जेव्हा माघारी याल तेव्हा आम्ही साऱ्या वेरुळातच नव्हे साऱ्या जगातच तुमच्या शौर्याचा डंका पेटवू !
हिराजी मला जरा घेऊन चल. मोहिमे वर जाण्याची व्यवस्था
कशी केली आहे ती पाहू या." हिराजी आपल्या खांद्याच्या
आधार देवून घेऊन गेला. त्यानंतर सारेजण शंभू महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी देव घरात आले. शंभू महादेवा समोर बेल पत्र वाहून त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा उमाबाई उद्गारल्या,
" राजे शेवटी आपण मोहीमे वर निघालेच तर !" तेव्हा
शहाजी राजांनी विचारले, " याचीच भीती वाटत होती का तुम्हाला ? जो काल विषय अर्ध्यावरच सोडला " त्यावर उमाबाई ने म्हटलं की, आमच्या मनात आलं म्हणूनच हे सारे घडलं, नाहीतर शंभू महादेवाने एक वेगळीच वाट दाखविली असती."
जिजाबाई उद्गारल्या, " ज्या अर्थी ही वाट आपल्या पुढ्यात आली त्या अर्थी ही इच्छा सुध्दा शंभू महादेवाची असणार."
" हो तेही खरंच आहे म्हणा. शंभू महादेव आणि तुमच्या
आबा साहेबांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे, शौर्य तुमच्या
रक्तात आहे. तुमच्या आबा साहेबांना अभिमान वाटेल असे
शौर्य गाजवून दाखवा." असे बोलून त्या जिजाबाई कडे
पाहत म्हणाल्या," घ्या. तुमच्या कामाला सुरुवात करा." त्यानंतर जिजाबाईंनी शहाजी राजेंना आरती ओवाळून शहाजी राजेंच्या हातात तलवार दिली. तेव्हा जिजाबाईंच्या चेहऱ्यावर अजिबात चिंतेचे भाव नव्हते. ते पाहून शहाजी राजेंनी विचारले की, तुम्हाला भीती वाटत नाही का ?" त्यावर जिजाबाई उद्गारल्या," नाही." शहाजी राजेंनी न समजून विचारले," कसे काय ? म्हणजे इथं सर्वांच्या डोळ्यात पाणी दिसतंय आणि तुम्हाला भीती वाटत नाही म्हणजे मोठे आश्चर्यच आहे."
" आपण प्रंचड पराक्रम करून वापस याल याची खात्री
आहे आम्हाला." जिजाबाईंनी स्मित हास्य करत म्हटले. आणि
मोहीमे वर निघताना जिजाबाईंनी शहाजी राजेंच्या हाता वर
दही ठेवले. ते त्याने खाल्ले. तेव्हा डोळ्यांनी डोळ्यां शी
हिजगुज केलं. डोळ्यांची डोळ्यांना भाषा समजली. त्यानंतर
शहाजी राजे मोहीमेवर निघाले. तेव्हा जिजाबाई ते गेलेल्या
दिशेकडे किती वेळ पाहत उभे असतात. आता मात्र त्यांच्या
डोळ्यात उदासीनता जाणवली. सोयराबाई त्यांच्या मागे उभ्या
होत्या.
शहाजी राजे मोहीमे वर गेले नि एकामागोमाग एक मोहीम
फत्ते करू लागले. त्यांच्या नावाचा डंका सर्वत्र उमटू लागला.
हा हा म्हणता दहा वर्षाचा काळ लोटला. तिकडे शाहजी राजे
मोहीम फत्ते करत होते तर इथं जिजाबाई घोड्यावरून बसून गावोगाव फिरून आपल्या रयतेची काळजी घेत होत्या. त्यांच्या
घरी जाऊन त्या त्यांची विचारपूस करू लागल्या.त्यामुळे त्यांना
कळू लागले की आपल्या रयत वर अन्याय सुरू आहे.अश्याच
अशाच एका शिलादराच्या घरी गेल्या असता. त्यांच्या घरातील
वडील मंडळी बाहेर आले. तेव्हा जिजाबाई ने विचारले की हे
हनुमंत शिंदे चे घर आहे ना ?" त्यावर त्याच्या आई वडिलांनी
होय म्हणत विचारले की आमचा लेक कामी आला का ?"
त्यावर जिजाबाई म्हणाल्या," नाही नाही असं काही बोलू नका.
आम्ही खात्री करून घेण्यासाठी विचारले." असे बोलून त्या
खाली बसू लागल्या तर त्या उभयतांना कसं तरी वाटलं म्हणून
त्यांनी खाली बसायला मनाई केली. तर जिजाबाई उद्गारल्या
काही हरकत नाही, असे म्हणून त्यांनी तिथली खरी परिस्थिती
जाणून घेतली.तेव्हा त्यांनी विचारले की ही परिस्थिती केव्हा पासून आहे ?" तेव्हा हनुमंत शिंदे च्या आई - वडिलांनी सांगितले. आमचे मालोजी राजे जोपवर होते तोवर आम्हाला काही पडू दिले. ते गेल्या नंतर मात्र परिस्थिती बद्दली बघा. दहा वर्षे झाली. ही अशीच परिस्थिती आहे, घरात धान्याचा कण नाही.घरात पोटिशी बाई आहे, तिला कंदमुळं खाण्याची वेळ आली." तेव्हा जिजाबाई म्हणाल्या," की तुम्ही वाड्यावर या नि धान्य घेऊन जा. " असे म्हणून त्या उठल्या नि गोमाजी कडे पाहत म्हणाल्या," गोमाजी काका चला धान्याला कुठं पाय फुटले ते पाहू." असे बोलून त्या परत घोड्यावर स्वार झाल्या
आणि निघाल्या. तेव्हा हनुमंत शिंदेच्या वडिलांनी गोमाजी ना
विचारले की ह्या कोण म्हणायच्या ?" त्यावर गोमाजी म्हणाले,
" ह्या शहाजी राजेंच्या राणी सरकार जिजाबाई !"
सदरेवर शेतकरी आले होते.सारा माफ अशी विनंती करायला
पण पंत म्हणाले," सारा माफ नाही होणार तो भरावाच लागेल."
त्या वर ते खेडूत म्हणाले की आम्हाला राज्यांना भेटावयाचे आहे." त्यावर पंत म्हणाले," मंबाजी राजे पण सारा माफ
करू शकणार नाहीत." इतक्यातच मंबाजी राजे आले. तेव्हा
त्यांच्या जवळ शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. दुष्काळ
पडल्या मुळे पीक आले नाही मग सारा कसा भरणार, म्हणून
सारा माफ करा." तेव्हा मंबाजी राजे म्हणाले," सारा घेऊन
जर का तो आम्हाला आपल्या दौलतीत जमा करायचा असता
तर तो आम्ही माफ देखील केला असता परंतु हा सारा बादशहा
च्या कोठारात जमा करायचा आहे, तेव्हा सारा हा भारावाच
लागणार .आणि सारा नाही भरला तर बादशहा आमची गर्दन
.....हां मी असंच करतो. माझी गर्दन मारायला सांगतो बादशहा.
म्हणजे तुम्ही सुटाल.... आम्ही राजे म्हटल्या वर इतकं तर
आम्हाला करायलाच हव की नाही."
" नाही नाही आमच्यासाठी आपली गर्दन देवू नका बादशहाला."
" मग दुसरा उपाय काय आहे बरं ते तुम्ही सांगा बरं.बादशहा
काय ऐकणार आहे, तो म्हणेल धान्य नाही तर तुमच्या बायकांच्या अंगावरील दागिने द्या. दागिन्यांचे मोल आपल्या
लोकांना त्यांना त्याचं काय म्हणा." मंबाजी राजे इतक्या मधुर
भाषेत सांगत होते की लोकांच्या मनावर त्यांच्या गोड भाषेचा
प्रभाव पडलाच पाहिजे. आणि तेच झाले.शेतकरी लोक आपल्या बायकांचे दागिने विकून शेत सारा भरण्यास तयार
झाले. तसे मंबाजी राजे खुश झाले.त्याच वेळी दुसरी कडे
जिजाबाई स्वतः आपल्या वाड्यातील धान्य लोकांना वाटत
होते. इतकेच नाही तर वाड्यावर आलेल्या सुहासनी ची खणा
नारळाचे ओठी भरून त्यांना पाठवत होत्या. ते पाहून मंबाजी
राजेंच्या तळ पायाची आग मस्तकाला भिडली.
मलिक अंबरच्या मुलाने त्याला येऊन सूचना दिली की
वेरुळ वाले लोकावर दया करत आहेत. सांगितल्यावर मलिक
अंबरने विचारले की, यह तारीफ है या शिकायत ?"
" अलबत शिकायत है, सल्तनत को नए सोच की जोश की,
अपने इलाके म्हासूस रखें और सरहद बढ़ाए इसलिए ना
आपने उनका रिश्ता बनाया था । मकसद था सरहद बड़ानेका।"
" मकसद यह भी था की वो अपने इलाके को महसूस रखें ।"
" आपने उनको बहुत छूट दे रखी है, एक दिन यही रहमदिली
मुसीबत बन जायेगी ।"
" फतेह खान यह मत भूलो की तुम
" मतलब ?"
" फर्क बताता हूं,आप जनाना के तेवर्से घायल हो जाते हों
और शाहजी राजे मैदाने जंग में दुश्मन को तीर से घायल हो
जाते है, किसके बातों में दम ज्यादा होगा सोच लो ।"
" दस साल पहले भी अपने बेटे से ज्यादा शाहजी से
हमदर्दी जताई थी । हमारे बात का कभी गौर नहीं करते ।"
" यह मत सोचो की तुम्हारे बातें हम नजर अंदाज करते है
हमे पता है, की भोसले जहागिरी से सारा नहीं आता वो
मसला हम सुलाझेंगे लेकिन बदशाहा को कहकर नहीं अपने
तरीकेसे ।"
" वो कैसे ?"
" हम इकलाक खान को वहां भेजेंगे ।"
मंबाजी राजे ने आपल्या आऊ साहेबांना येऊन खबर दिली
की वहिनी साहेबांनी लोकांना आपल्या वाड्या मधील धान्य
वाटले. ओट्या भरल्या जाताहेत हे ऐकून त्यांचे माथे टनकले.
त्या रागाने म्हणाल्या," अशी उधळ पट्टी केली तर एक दिवस
त्या आपल्यालाच रत्यावर आणतील. त्यांना बोलावणे पाठवा
कोणालातरी !" त्यावर मंबाजी राजे म्हणाले," निरोप पाठविला
आहे येतीलच त्या." इतक्यात जिजाबाई तेथे आल्या. आणि
विचारले की, सासूबाई आम्हाला बोलविले का आपण ?"
" हो, औक्षण करावं लागेल ना ?"
" औक्षण कोणाचं ?"
" तुमचं.एवढं महान कार्य जे करत आहात त्या बद्दल औक्षण
नको का करायला ?"
" मी समजले नाही आपल्याला काय म्हणावयाचे आहे ते."
" ज्यांनी सारा भरला नाही अश्या लोकांना वाड्यातील धान्य वाटताय ही कोणती रीत ?" जिजाबाई त्यांना सडेतोड उत्तर देवू शकल्या असत्या. परंतु सासूबाईंनी सांगितले आठवले की या पुढे कोणालाही उलट उत्तर द्यायचे नाही. म्हणून त्या गप्प राहिल्या . पण त्याचा फायदा मंबाजी राजे उचलणार नाहीत असं कधी झालं आहे का ? त्यांनी लगेच जिजाबाईंना सुनावले. म्हणजे सारे पुण्य आपल्याच पदरात पडणार नाही का ?....आणि आम्ही वसुली करतोय ती आमचीच दौलत भरायला. हो की नाही वहिनी साहेब ? आम्हीच मूर्ख आम्हीच सारे पाप आमच्या डोक्यावर घेतोय." त्यावर जिजाबाई म्हणाल्या की आम्ही धान्य कोणाला दिलं आहे ते तरी विचारा." त्यावर मंबाजी राजे म्हणाले," येसाजी शिंदे ना दिलं ते आम्ही पाहिलं. आधी बघणे त्यांनी सारा भरला आहे किंवा नाही ? आम्हाला विचारावे असे गरजेचे वाटले नाही आपल्याला. उद्या
बादशहा ने विचारले तर त्याला उत्तर कोण देणार ?" मंबाजी राजे ने म्हंटले. त्यावर जिजाबाई म्हणाल्या ," त्यांचा नवरा
स्वारी बरोबर मोहीमे वर गेलाय बायको गर्बवती असतानाही. सारा भरला नाही म्हणून आपण त्यांना उपाशी ठेवलं तर आपल्यात नि बादशाहीच्या वागणुकीत फरक काय उरला ? आणि मुख्य म्हणजे स्वारीच्या हुकुमारून वाड्या वरून दिलेली मदत वहीत तर नोंद असते. पण ती मदत पोहोचत नसेल तर त्याला जबाबदार कोण ?" तश्या सोयराबाई चिडून म्हणाल्या ," तुम्ही आमच्या समोर बोलताय याचे भान ठेवा. वाड्यातील धान्य कुणाला द्यायचे नि कुणाला द्यायचे नाही हे वडीलधाऱ्या माणसांना विचारले का ? वाड्यात तुमच्या पेक्षा मोठी माणसे आहेत म्हटले. आम्ही आहोत, जाऊबाई साहेब आहेत. मग आम्हाला विचारलं..... का जाऊ बाईना विचारलं ? मग एवढा अधिकार कशाच्या जिवावर गाजवताय ?"त्यावर जिजाबाई " चुकलं " असं म्हणाल्या नि तेथून निघून गेल्या. तसा मंबाजी खुश होऊन म्हणाला की, आऊ साहेब आपल्या पुढे कुणाचा निभाव लागणार नाही." तश्या त्या खुश होत
म्हणाल्या ," नाहीच लागणार , पण त्या आधी जाऊबाई कडे जाऊ , त्या एकदम भोळ्या आहेत त्यामुळे त्या कुणाच्याही ही बोलण्यावर विश्वास ठेवतात." दोघेही जातात नि उमाबाई समोर आपली सगळी कैफियत मांडतात. उमाबाई अगोदर सगळं ऐकून घेतात नि मग शहाजी राजांनी पाठविलेला खलीता मंबाजी राजेंच्या हातात देतात. मंबाजी राजे खलीता वाचून
पाहतात . त्यात शहाजी राजेंनी लिहिलेले असते की , दुष्काळ
पडला आहे, लोकांची पिके जळाली आहेत, तेव्हा तिथल्या लोकांकडून सारा वसूल करू नये. बादशहाच्या दरबारी काय उत्तर द्यायचे ते आम्ही देवू ." असे ऐकल्यावर माय लेकाची दातखिळी बसण्याची वेळ आली. पण तरी देखील सोयराबाई म्हणाल्या की, अच्छा म्हणजे शहाजी राजेंच्या हुकुमावरून जिजाबाईंनी ही मजल मारली तर !" त्यावर उमाबाई म्हणाल्या की, शहाजी राज्यांचा खलीता आला आहे, हे जिजाबाईंना ठाऊक ही नाहीये. त्यामुळे ध्यानात येतं की दोघानाही रयत ची किती काळजी आहे. दोघांचे ही मिळते जुळते विचार ." उमाबाई अभिमानाने उद्गारल्या. मात्र त्यावेळी त्या माय लेकरांचे चेहरे पाहण्या सारखे होते. जे करायला आले होते ते साध्य झालं नाही. हीच खंत होती त्या दोघांच्या चेहऱ्यावर.
जिजाबाई मात्र आपल्या स्वारी ने दिलेल्या तलवारी शी बोलत
असतात. आज आम्हाला तुम्ही हवे आहेत , आम्हाला समजून
घेणारे, इथं आमच्या प्रत्येक चांगल्या कामाचा वेगळाच अर्थ
काढला जातो. आणि आम्ही बोलू ही शकत नाही. मग कशाला
करताय झुंज ? जर माणुसकी पणाला लागतय तर झुंज देवून काय मिळविणार आहात ? तुमच्या सोबत झुंज देणाऱ्याच्या
धान्य दिलं तेव्हा त्याने सारा भरला आहे की नाही हा हिशोब ठेवायचा होता का आम्ही ? त्याचे आई वडील, गरबवती पत्नी ह्यांची काय चूक ? त्यांनी ह्या मातीत जन्म घेतला हीच त्यांची चूक नव्हे का ? सांगा ना ? आम्हाला वाटलं आम्ही चागलं काम करतोय. नाही त्याचं कौतुक नको पण निदान बोल तरी लावू नका." असे म्हणून त्या जाऊ लागतात तोच त्यांची नजर खलीता वर गेली त्यांनी लखोटा उघडला. तेव्हा त्यांच्या नाकात फुलांचा सुगंध शिरला. तश्या त्या स्वतःशीच उद्गारल्या,
" फुलांचा सुगंध अर्थात स्वारीचा खलिता आहे." त्यांनी तो खलिता उघडला नि वाचला. तेव्हा त्यांच्या चेऱ्यावर एकदम
विलक्षण छटा उमटल्या.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा