छत्रपती शिवाजी महाराज १५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज १५ |
मंबाजीच्या हातात कारभाराची सूत्रे दिली म्हणून त्याचा
इतका रुबाब वाढला होता की तो आपल्या सख्ख्या भावांडाना देखील ताकीद दिली की या पुढे मी म्हणेन तेच ऐकायचे.माझा
आदेश म्हणजे आऊ साहेबांचा आदेश आहे असे समजायचं.
त्यावर एकाने आपला विरोध दर्शविला तर त्या बदल्यात त्याच्य
कानाखाली एक चपराक बसली.
पुढे
जिजाऊंच्या डोळ्यासमोरून काही केल्या ते दृश्य जात नव्हते. त्यामुळे त्या जास्तच खासविस होत होत्या.इतक्यात
पाठी मागून शहाजी राजे येतात नि त्यांना चिंताग्रस्त पाहून
म्हणाले," विसरता येत नाहीये का सती ची वस्त्रे हाती घेतल्याचे
दृश्य ?" तसे जिजाबाईंनी चमकून मागे पाहिले. आणि त्याच
क्षणी त्यांच्या मनात एक विचार ही येऊन गेला आणि तो म्हणजे
आपण कोणत्या गोष्टी मुळे रुष्ट आहोत, हे स्वारी ना कसे कळाले ? त्याच बरोबर जाणून घेण्याची जिज्ञासा पण मनात
बळावली. त्यांनी मागे वळून शहाजी राजे कडे पाहत विचारले
" आम्ही का दुःखी आहोत,हे तुम्हाला कसं कळाले ? नाही
म्हणजे ही गोष्ट आम्ही कुणा जवळ बोललो देखील नाही."
त्यावर शहाजी राजे हसून म्हणाले," आम्ही स्वतःला तुमच्या
जागी ठेवल्या मुळे आम्हाला तुमच्या मनातले कळले."
" असं कळते दुसऱ्याच्या मनातले ?"
" हो , असे आमचे आऊ साहेब म्हणाले होते. तेव्हा आम्हाला
थोडे कठीण वाटले, पण आता जमते बरोबर. आणि आपलं
तर दोघांचे लग्न झालंय मग तर आपल्याला एकमेकाच्या
मनातले कळायलाच पाहिजे. होय ना ?" त्यावर जिजाबाई
स्मित हास्य करत म्हणाल्या," मग आम्ही पण प्रयत्न करून
पाहू ? आम्हाला जमेल ना ?"
" ही नक्की जमेल. आणि हो तोच तोच विचार करत बसू
नका. नाहीतर पाठीला मोठं कुबड येईल."
" असे आम्ही सांगायचे लोकांना तेच तुम्ही आम्हाला सांगताय. "
" आता तुमचं एकट्याचे काही राहिलं नाही जे काही आहे ते
आपल्या दोघांचे. हो की नाही ?"
" हो; पण एक विचारू ?"
" अवश्य."
" तुम्ही मनसबदार असताना सर्व कारभार मंबाजी दादा
का बघताहेत ?"
" त्याचं काय आहे,फर्मान आले तर आम्हाला देखील
मोहीमे वर जावे लागणार, आणि तुम्हाला खरे सांगू का आमच्या
आबा साहेबांना देखील मोहीमे वर जायला फार आवडायचं. कारभारात ते कधी लक्ष घालत नसत. मला वाटतं पुढच्या पिढीत ही असेच चालू राहणार असं वाटतंय." जिजाबाई
काही न बोलता जाऊ लागल्या तर लगेच शहाजी राजेंनी
विचारले की, नाही पटलं ना ?" जिजाबाई उत्तरल्या," हो
नाही पटलं " शहाजी ने विचारले की, मग बोलला नाही ते."
" आम्हाला माहीत आहे, आपण ओळखले असणार."
मंबाजी राजेंनी नोंद वही फेकून देत पंताना विचारले की
हे काय दिलं ? आणि सारा वसुली ची नोंद कोठे आहे ? "
त्यावर पंत काहीच बोलले नाहीत. त्यावर सोयरा बाई चिडून
म्हणाल्या की, पंत मंबाजी राजे काय विचारत आहेत ? उत्तर
का देत नाहीत तुम्ही ?" पण तरी देखील पंत गप्पच उभे होते.
तेव्हा सोयरा बाई उमाबाई कडे पाहत म्हणाल्या की , काय
जाऊ बाई मी बोलतेय ते बरोबर आहे ना ?" त्यावर उमाबाई
म्हणाल्या की, संभाजी राजे मोहीमे वर आहेत, अर्थात सारा
कारभार सगळ्यांनी मिळून मिसळून करावा. तुमचा ही सल्ला
हवाच आहे." त्यावर सोयरा बाई म्हणाल्या की,जाऊबाई
तुम्ही मुद्द्याचे बोलतच नाहीयेत. थांबा आता मीच बोलते.
दौलतिचा सारा कारभार आता मंबाजी राजे पाहतील. असे आमचे म्हणणे आहे. तेव्हा पंतांना त्याचा जवाब द्यावाच लागेल."
" निदान पंतांच्या वयाचा तरी विचार करावा. दादा साहेब
तुम्ही हे त्यांना कसे विचारत आहात ? हा त्यांचा अपमान आहे."
" दौलतिच्या व्यवहारात तुम्ही न बोललेलेच बरे. इथं आम्ही
आहोत , जाऊबाई साहेब आहेत , दौलतीच्या व्यवहारात वयाचा
विचार करून चालत नाही कडक व्हावेच लागते.आणि हे जर
तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही इथं थांबुच नका. मंबाजी राजे
तुम्ही रास्त आहात. " तसा मंबाजी राजे उद्गारले की, आता
माफी बिफी काही नाही सारा वसुली दाखवा." त्यावर कोणीच
काही बोलले नाही. जिजाबाईंना काही त्याचे वागणे नि बोलणे
पटले नाही; परंतु उमाबाईच जर काही बोलत नाहीत तर त्या काय बोलणार ? खरे तर उमाबाई बोलू शकत होत्या. कारण
त्या थोरल्या होत्या. अर्थात निर्णय घ्यायचा अधिकार पण
त्यांचाच होता. पण सज्जन माणसं असतात ती कधी अन्यायाला विरोध करत नाहीत. त्यामुळेच दुर्जनाचे नेहमीच
फावते. आपला थोरल्या जाऊबाई आपल्या विरोधात बोलल्या
नाहीत म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर विजयी श्री चां आनंद
ओसांडताना दिसत होता. जणू काही त्यांनी शर्यत जिंकलीच.
जिजाबाई सदरे वरून आपल्या दालनात आल्या. आपल्या
अंगावरील शाल रागाने बाजूला फेकली नि शहाजी राजांचे
लक्ष आपल्या कडे वेधण्यासाठी त्या थोड्याशा खाखरल्या.
शहाजी राजेंनी वळून त्यांच्याकडे पाहिले. तश्या त्या म्हणाल्या
आज तुम्ही ओळखू शकणार नाही, आमच्या मनात काय आहे
ते. " त्यावर शहाजी राजे उद्गारले की, इतकं तर आमच्या
ध्यानात आलंच आहे की आपल्या मना विरुध्द घडलं आहे."
" अय्या कसं ओळखले ?"
" सोपं आहे, सुर एकदम वरचा लागला आहे. कारण इथं
आपण दोघंच आहोत तरी देखील वरचा सुर लागला म्हणजे
नक्कीच मना विरुध्द घडलं आहे."
" हो मना विरुध्द तर आहेच. पण ते जर तुम्हाला सांगितलं
तर तुम्ही म्हणाल की तुम्ही तिथं बोलू नका म्हणून आम्ही
सांगितलं होते.पण तुम्ही ऐकलं नाही असंच म्हणाल. पण
आम्ही का ऐकलं नाही ते तर ऐकून घ्याल."
" हुं सांगा बरं." त्यानंतर जिजाबाईंनी सविस्तर हकीगत सांगितली. इतक्यात तेथे उमाबाई आल्या नि म्हणाल्या की जे चुकीचे आहे त्याला चुकीचेच म्हणणार ना ?" असे म्हणून त्यांनी
कसे चुकीचे आहे, ते जिजाबाईंना सांगितले. त्या म्हणाल्या की, सर्वांसमोर बोलणे हे चुकीचे आहे, कारण ती जागा कोणती आहे ते पाहणे आवश्यक आहे. कारण त्या जागेला महत्व आहे. सदरेवर लहान कोण त्यानंतर कोण याचा आदर केला जातो. तुम्ही साऱ्यांना बाजूला सारून बोललात. हा केवळ मंबाजी राजेंचाच अपमान नाही तर तिथं उपस्थित असलेल्या सर्व थोरांचा अपमान होता. लक्षात घ्या. हा मामला कौटुंबिक नव्हता. व्यवहार निगडित होता. तिथं मान अपमानाचा पायऱ्या सांभाळाव्या लागतात. समजलं." असे बोलून त्या चालत्या झाल्या. त्यावर जिजाबाई काहीच बोलल्या नाहीत.
विठोजी राजे निवर्तले ही खबर सिंदखेड ला पोहोचली.
म्हाळसा बाईना ही खबर लखुजी जाधवानी जेव्हा ऐकवली तेव्हा एकदम त्यांना धक्काच बसला. कारण विठोजी राजे पण राहिले नाही याचा अर्थ आता शहाजी राजे ना पण मोहीमे वर
जायला भाग पडणार होते आणि शहाजी राजे मोहीमे वर जातील ही याची त्यांना खात्री होती. पण का कुणास ठाऊक
त्यांना वाटत होते की शहाजी राजे अजून लहान आहेत. त्यांचे
वय मोहीमे वर जाण्या इतपत नाहीये. पण हे बादशहा ला
कसे सांगणार बरं ? म्हणून त्या लखुजी जाधवांना सांगू इच्छित
होत्या की आपण वजीरे आलम पाशी जावे नि त्यांना विनंती
करावी की मोहीमे वर जाण्या इतके शहाजी राजांचे अजून वय झालेले नाहीये. तेव्हा काही दिवस मूबा द्यावी." त्यावर लखुजी जाधवांनी सांगितले की तुम्ही शहाजी राजेंच्या वयाकडे पाहू नका. शहाजी राजे वयाने जरी लहान असेल तरी शुर आहेत नि पराक्रमी सुध्दा आहेत. तेव्हा त्यांची चिंता करायचे सोडा." पण तरी देखील त्या म्हणाल्या की, पण मी म्हणते एक वेळ वजीरे आलम पाशी विनंती करून पहायला काय हरकत आहे ?" तेव्हा लखुजी जाधव म्हणाले," विनंती करायला आम्ही करू शकतो पण त्याने काय होईल बादशहा वाटेल की वयाचे सबब सांगून आम्ही वेळ मारून नेतोय म्हणून. आणि खरं सांगायचं तर तसं अजून काही झालेलं नाहीये. परंतु उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला की ज्ञानेश्वर माऊलींनी चारशे वर्षाूर्वी या भूमीत जे कार्य केलं. त्यावेळी त्यांचे वय किती होते ? तेव्हा वयाचा नि पराक्रमाचा सबंध इथं येत नाही. तेच कशाला तुमचे बंधू वनगोजी राव जेव्हा पहिल्यांदा मोहीमे वर गेले तेव्हा त्याचे वय किती होते ? हे ठाऊक आहे ना तुम्हाला ? शहाजी राजे किती पराक्रमी आहेत हे आम्ही आपल्याला सांगायला हवंय का ? अंधार पाहून न घाबरता मशाल पेटविण्याची ही खरी सुवर्ण संधी आहे.असे ज्याला वाटतं. आणि मिळालेल्या संधीचां जो सोने करतो त्यालाच खरा वीर म्हटलं जाते." तेव्हा म्हळासा बाईंनी होकारार्थी आपली मान डोलावली. जगदेव राव म्हणाले,
" वहिनी साहेब दादा साहेब म्हणतात ते आम्हाला ही पटते. बादशहाकडे अर्जी करायला काही हरकत नाही पण वयाची सबब पुढे करून आम्ही पळवाट शोधन काढली असं नाही का
होणार ? आणि शहाजी राजे ना त्याची गरज नाहीये. तशी गरज भित्र्याना असते.
जिजाबाईंना वाटले की काकीसाहेबांची नाराजी घालविण्यासाठी त्यांनी त्यांचे आवडीचे सर्व पदार्थ बनविले.
गोदाताईच्या हातात थाळ्या देवून गोमाजी काका ना द्यायला
सांगितले. गोदाने जेवणाचे ताट गोमाजी काकांना नेऊन दिले.
त्यानंतर उमाबाई ना आणि सोयरा बाईना थाळ्या वर यायला
सांगितले. त्या दोघी थाळ्या वर बसल्या. सोयरा बाईंनी पहिलाच घास घेतला असता. तो बेचव लागला म्हणून थुकुन टाकला. त्यांना बोलायचे होते जिजाबाईंना पण त्या आपल्या सुनबाई ला बोलल्या सारखे करतात. पण त्या म्हणाल्या की मी फक्त कोशंबिर बनवली आहे. मग त्यांनी मोर्चा जिजाबाई कडे वळविला. त्यांना खरिखोटी सुनावली. जिजाबाईचा चेहरा एकदम रडवेला झाला होता. उमाबाई नी सर्व पदार्थ चाखून पाहिले. काहीच कमी नव्हते. त्यांच्या ध्यानात आलं की सोयरा बाई मुद्दाम हे सारे करत आहेत. त्या अगोदर काहीच बोलल्या नाहीत.फक्त ऐकून घेतले. पदार्थ खरेच छान झाले होते पण ज्यांना खोटच काढायची असेल त्याला इलाज काय ? त्यांनी जिजाबाईंना चांगलेच सुनावले. तेव्हा उमाबाई ने आपल्या नजरेच्या खुणेने सांगितले की लक्ष नका देवू पण ते करत असताना सोयराबाईंची नजर त्यांच्यावर पडली नि मग त्यांनी खोचक पने विचारले की, काय हो जाऊबाई तुम्हाला असं तर नाही वाटत ना, की नव्या सूनाबाईनी पदार्थ बनविले म्हणून आम्ही त्यात खोट काढत आहोत. त्यावर उमाबाई म्हणाल्या की, नाही, जिजाबाईंनी तुमच्या आवडीचे सारे पदार्थ बनविले.पदार्थ झाले देखील छान ..... बहुधा तुमच्या तोंडाला चव नसेल म्हणून तसे बेचव लागताहेत तुम्हाला."
" हो का ? म्हणजे आम्ही मुद्दाम असं करतोय. असं च ना ?
ठीक आहे, राहील आमचं आम्हीच खोट्या बरं का ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या की, मला इतकंच म्हणायचंय की थाळ्या वर बसल्यावर अन्नाला नाव ठेवू नये. असे आपणच नाही का लहान मुलांना सांगतोय. मग तीच चूक आपण करणे योग्य आहे का ?" त्यावर सोयरा बाई निरुत्तर झाल्या.
गोदाताईंच्या हातात पूजेचे तबक असते म्हणून त्यांनी
मंबाजी राजांना मुजरा नाही केला. त्याचा मंबाजी राजेंना
भयंकर राग आला नि त्यांनी गोदावरी ला भरपूर सुनावले. त्याच वेळी जिजाबाई तेथे आल्या नि त्यांनी मंबाजी राजेंना सांगितले की मान मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो. त्यावर दोघांचा बराच वाद झाला. मंबाजी राजे जिजाबाईंना पण उलट बोलू लागला. तसे तेथे गोमाजी आले त्यांनी मंबाजी राजेंना
जरा धीराने घ्या. " असे म्हटले तर मंबाजी राजे गोमाजी ना उलट बोलायला लागले. त्यावर गोमाजी म्हणाले," जिजाबाई
इथं एकट्या आहेत असे समजू नका. मी सिंदखेड वरून उगाच
आलेलो नाहीये. जिजा आक्का च्या आम्ही ढाल बनून आलोय
हे ध्यानात राहू द्या." इतक्यात सोयराबाई आपल्या सूनबाई सह तेथे आल्या. त्या देखील मंबाजी राजेंची बाजू घेऊन वाद घालू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून उमाबाई तेथे आल्या. त्यांनी जिजाबाईंना आपल्या नजरेच्या खुणेने सांगितले की गप्प रहा. सोयरा बाईंच्या समाधानासाठी त्या म्हणाल्या," जिजाबाई आपल्या सासूबाई शी बोलण्याची ही पद्धत नव्हे!" बस सोयरा बाईना बोलायची संधी मिळाली त्या म्हणाल्या," त्याच नाहीत तर हे दोघेही !" असे म्हणताच गोमाजी म्हणाला की, रेणुका आईची आण घेऊन मी सांगतो एक शब्द सुध्दा मी चुकीचा बोललो नाही. पण हां आमच्या जिजा आक्का ना कुणी नाहक बोल लावत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही त्यांची ढाल बनून इथं आलोय." असे म्हटल्याने उमाबाई ना जरा समाधान वाटले. त्या मागे फिरल्या नि सरळ देव घरात निघून गेल्या. त्या गेल्या तश्या संभाजी राजेंच्या पत्नी सुध्दा आपल्या दालनात निघून गेल्या. तश्या सोयराबाई म्हणाल्या ," मंबाजी
राजे देव घरात चला.जाऊबाई ना सगळं सांगू नाहीतर कुणीतरी अगोदरच त्यांचा कान भरायचा. असे टोमणे मारले नि मंबाजी राजे ना सोबत घेऊन त्या गेल्या. तेव्हा गोमाजी म्हणाले," मी पण येतो देव घरात." त्यावर जिजाबाई म्हणाल्या ," गोमाजी काका तुम्ही नका येऊ आम्ही पाहतो काय ते." त्यावर गोमाजी म्हणाला," पण त्या काकीसाहेब खोटं नाटे काहीतरी सांगतील." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," सासूबाई समजून गेल्या आहेत. त्या थोरल्या आऊ साहेबा सारख्या आहेत फार बोलत नाहीत पण समजून जातात. चल गोदाताई !" त्या दोघीही निघाल्या.
देव घरात उमाबाई पूजा करत असतात तेथे सोयराबाई
जातात नि त्यांना सगळं सांगतात. मंबाजी राजेंनी शंभू महादेव वर बेल पत्र ठेवून खोटे बोलतो. इतक्यात तेथे गोदाताई आणि
जिजाबाई येतात. तेव्हा उमाबाई त्यांना समजवतात की काही
झालं तरी तुम्ही कुणाला उत्तर द्यायचे नाही. तुमचं बरोबर
असले तरी ही आणि मोठ्यांचे चुकत असेल तरीही तुम्ही कुणाला काही बोलायचं नाही. एक तर मला येऊन सांगा. अथवा आपल्या स्वारी ना सांगा. कळले. ह्यात कसूर होता
कामा नये." जिजाबाई होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर त्या मंबाजी राजे जवळ वळल्या नि म्हणाल्या की , मंबाजी राजे
गोदाने तुम्हाला मुजरा नाही केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर
रागवला. हो ना ? तुम्ही जेव्हा तिथं आला तेव्हा त्यांच्या हातात
काय होते आरती चे ताट ना ? " त्याने हो म्हंटले." तश्या त्या
म्हणाल्या की आता मला सांगा त्यांचे हात रिकामे होते का
मुजरा करायला नाही ना ? मग राग यायचे कारण काय ?
आज तुम्ही कुणी नाही आहात तर इतका राग उद्या जर खरंच
मनसबदार झालात आणि कुणी मुजरा नाही केला तर त्याची
गर्दन माराल. राग कुणाला येतो माहितेय ज्याच्या अंगात
खरंच कर्तुत्व असते त्यालाच. नुसता कारभार हाती आला
म्हणजे सर्वकाही अधिकार मिळाले असा त्याचा अर्थ नाही.
तेव्हा आपल्या रागावर संयम ठेवा." तेव्हा सोयरा बाईंनी
मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला तर उमाबाई म्हणाल्या की
आम्ही काही चुकीचे बोललो का ? आमच्या कडून काही
सांगायचं राहिलं का ? हां आता आठवलं ...मघाशी तुम्ही म्हणालात की जिजाबाईंनी आणि गोदाने तुमची माफी मागायला पाहिजे बरोबर ना ? मग आता आम्ही सांगतो की तुम्ही गोदाची आणि जिजाबाईची माफी मागा ." असे म्हणताच दोघांचाही चेहरा खळखन उतरला. त्यांनी कल्पनाच केली नव्हती की असे काही घडेल याची. तो जागचा काही हलला नाही. तश्या उमाबाई म्हणाल्या की, मला माहितेय तुम्हाला नाही जमणार आहे ते. कारण तेवढं समजण्या इतकी तुमची उमज नाहीये. पण तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं चुकलं तर देवाची तर माफी मागू शकता अर्थात देवाला मानत असाल तर ? ते तरी जमेल ना ?" तेव्हा त्याने सोयरा बाईंच्या कडे पाहिले. तेव्हा सोयरा बाईंनी आपल्या नजरेच्या खुणेने तसे करायला सांगितले. नाईलाजाने का होईना शेवटी मंबाजी राजेंना शंभू महादेवाची माफी मागायला लागली. त्यानंतर सोयराबाई आपल्या सूनबाई च्या दालनात गेल्या नि त्यांना खरी खोटी सुनावली. पण सूनबाई म्हणाल्या की आम्हाला भांडणात रस नाही. आणि खरे काय आहे नि खोटे काय असेल ते दादा साहेबांनाच माहित असेल ना ?" त्यावर सोयरा बाई जास्तच चिडल्या त्या म्हणाल्या की सख्खे कोण आणि चुलत कोण याची जाणीव नाहीये तुम्हाला. असे जर चालत राहिले ना तर अपमानाचे विष सतत प्यावे लागणार तुम्हां सर्वांना. तेव्हा जरा सुधारा." पण त्यांच्या बोलण्याचा संभाजी राजेंच्या पत्नी वर काहीच परिणाम झालेला
दिसला नाही. कारण त्यांना चांगले ठाऊक होते की आपले दीर कसे आहेत नि सासूबाई कश्या आहेत त्या.
मंबाजी राजे आपल्या सगळ्या बंधूंना धमकावत होते. मी म्हणेन तेच व्हायला हवे. आज मला गोदा मुळे माफी मागावी लागली. गोमाजी चे खडे बोल ऐकावे लागले. तेव्हा त्यांच्या बंधूनी त्याला सांगितले की त्या गोमजीचा वाट्याला जाऊ नका. दहा बारा तलवार बाजाना पण ते लोळवतात . " त्यावर मंबाजी राजे म्हणाले ," अरे हट्ट ,आमच्या कडे कारभार आहे असे किती जण येतील तळवे चाटत." तेवढ्यात एकजण म्हणाला ,
" हो पण कारभार हातात संभाजी राजे येईपर्यंतच राहील ना ?" त्यावर मंबाजी राजे म्हणाले की," कोणाला ठाऊक ते येतील की नाही ते." सर्वांनी एकदम प्रश्न केला," म्हणजे ?"
तसा लगेच भाषा बदलत मंबाजी राजे म्हणाले ," म्हणजे कसं आहे, मोहीमे वर गेलेल्या माणसाची परत येईल की नाही याची खात्री देता येत नाही ना ?"
गोदा रेणुका देवी ला साकडं घालत असते की आमच्या
धन्याला लवकर माघारी पाठवून द्या." तेव्हा तिथं जिजाबाई
येतात नि तिला विचारू लागतात की एकटी कुणा सोबत
बोलत आहेस म्हणून. तेव्हा गोदावरी सांगते की मोहीमे वर
गेलेल्या आपल्या धन्याला लवकर पाठवून दे बस हेच सांगत
होते रेणुका मातेला. इतक्यात कुणीतरी काकी साहेबांना
संभाजी राजे आल्याची वरधी दिली. तेव्हा त्या म्हणाल्या की
असं कसं देतो का कुणी वर्धी ? म्हणजे नौबत नाही का नगारा नाही. तेव्हा ते सांगतात की गरम पाणी घेऊन या त्यांना फार लागलं आहे. तश्या त्या घाबरून म्हणाल्या," काय सांगता काय?" त्यावर तो शिलेदार म्हणाले," संभाजी राजे जखमी
झाले आहेत.त्यांना आणलं गेलं आहे." असे म्हणून तो गेला
निघून सोयरा बाई पळतच आंत गेल्या. हिराजी ने गोमाजी ला
गरम पाणी आणायला सांगितले. गोमाजी विचारले की काय
झालं ? " हिराजी म्हणाले की, मग सांगतो आधी पाणी आणा."
गोमाजी गेले पाणी आणायला. संभाजी राजेंना जखमी अवस्थेत
घोड्यावरून आणले. त्यांना अगोदर खाली उतरविले. आणि
बाज वर झोपविण्यात आले. तोपर्यंत एक एक करून सर्वजण
हजार झाले. संभाजी राजेंचे सर्व भाऊ त्यांची पत्नी , त्यांच्या
आऊ साहेब, शहाजी राजे, उमाबाई सर्वजण तेथे हजर झाले.
हिराजी ने आपले हात पाय धुतले नि जायला वळले तोच
समोर गोदावरी दिसली. त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला.
नि काही न बोलता आंत निघून गेले. गोदावरी ने हिराजी च्या
जमिनीवर उमटलेल्या चिन्हाला स्पर्श करून आपल्या माथी
लावले नि रेणुका मातेचा हात जोडून वंदन केले. संभाजी राजे
हळूहळू शुध्दीवर आले आपल्या सभोवती जमलेल्या घरच्या
सर्व सदस्या कडे पाहत म्हणाले," चिंता करण्याचे कारण नाही
फक्त जखमी झालोय.जीव नाही सोडला." तसे सर्वांच्या
चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. शहाजी राजेंनी विचारले ,
हिराजी काय घडलं ते सांगशील का ?" हिराजी म्हणाले,
" विशेष काही नाही, आम्ही होतो तिथं. म्हणून राजांना
घेऊन आलो बस." तेव्हा संभाजी राजे म्हणाले," हिराजी
स्वतःचे कौतुक नाही करणार कधी ! मी सांगतो." हिराजी
म्हणाला," आम्ही चाकर माणसं. आमचं ते कर्तव्यच आहे."
तेव्हा उमाबाई म्हणाल्या की आम्ही तुम्हाला कधी चाकर
मानलंय आहे का ? नाही ना ? संभाजी राजेंना इथवर घेऊन आला हेच खूप केलं तुम्ही आमच्यासाठी " हिराजी काहीच बोलत नाहीत पाहून शहाजी राजे म्हणाले ," हिराजी तसेच आहेत ते काही सांगणार नाहीत. तेव्हा दादासाहेब तुम्हीच सांगा." मग संभाजी राजे ने तसे का घडलं ते सांगितले. म्हणजे त्यांनी आपलंच चुकल्याचे कबूल करत म्हंटले की, आमचंच माथे टनकले नि आम्ही दुश्मनावर तुटून पडलो. पण दुश्मना चाही आमच्यावर वार झाला. प्रसंग आणा बाका होता. पण हिराजी माझ्या मदतीला धाऊन आले नि आम्ही वाचलो ." शहाजी राजे एकदम खुश झाले आणि आपल्या हातातील कडे काढून हिराजी ना देवू केले पण हिराजी घेईना त्यांचे म्हणणे होते की आम्ही इथले चाकर आणि इथल्याच अन्नावर पोसलेले. अर्थात आम्ही जे केले ते आमचं कर्तव्यच होतं. असं त्यांचे म्हणणे होते. पण शहाजी राजे म्हणाले की, आमचे आबा साहेब असते तर त्यांनी सुध्दा हेच केलं असते. म्हणून आम्ही ही तेच करत आहोत. घ्या." हिराजी नाईलाजाने कडे घेतात आणि त्यांना प्रणाम करतात. तेव्हा संभाजी राजे प्रसन्नतेने म्हटले की, वा शहाजी राजे वा ! आज तुम्ही सिद्ध केलात की तुम्ही आमचे धाकटे बंधू नसून थोरले आहात." हे ऐकून जिजाबाईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा