छत्रपती शिवाजी महाराज १४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज १४ |
आमच्या आऊ साहेबांनी असले काही शिकविले. आम्ही
सेवेकरांची कामे करायला जन्माला नाही आलोत. आमच्या
आऊ साहेब म्हणायच्या की भिकेचे डोहाळे लागले. त्यांनाच करू दे काय करायचे ते. आम्ही नाही करणार असंले काही !"
असे बोलून फनकाऱ्याने त्या निघून गेल्या. तशा जाऊबाई
उद्गारल्या की नवीन सूनबाई किती संस्कारी आणि आमच्या
सूनबाई ह्या अश्या आपली सासूबाई काही रीतीचे सांगते
आहे ते ऐकून घ्यावे हे देखील ह्यांना जमेना झालंय कसं
होणार ह्याचं ते देवच जाणो !"
पुढे
पंतांनी शहाजी राजेंनी बनविलेला मसुदा विठोजी राजेंना
दाखविला. मसुदा पाहून अंत्यंत खुश होत ते म्हणाले," पाहिलंत
आमच्या दादासाहेबांनी बनविलेला मसुदा किती पद्धतशीर असतो. म्हणून आमचा मसुदा रद्द करून हा मसुदा मोहर लावून
पाठवून द्या." काकासाहेबाना आपण तयार केलेला मसुदा
आवडला म्हणून शहाजी राजे खुश झाले. पण जेव्हा पंत म्हणाले की , हा मसुदा थोरल्या साहेबांनी बनविलेल्या मसुदाची
नक्कल नाहीये." असे सांगताच विठोजी राजे म्हणाले,
" तुम्हाला काय वाटतं की आम्ही दादासाहेबांचे अक्षर
ओळखत नाही." तेव्हा पंत म्हणाले की, हा मसुदा शहाजी राजेंनी बनविला आहे.आणि हे अक्षर ही त्यांचेच आहे " असे ऐकताच मात्र क्षणापूर्वी झालेला आनंद क्षणात मावळला. आणि त्याची जागी राग आणि द्वेष ने घेतली. कदाचित त्यांना असं वाटलं असावं की दादासाहेबांसारखा मुसुदा त्यांच्या मुलाला बनविता येतो , पण आपल्याला येत नाही. हे कारणही असू शकतं किंवा शहाजी राजेंना त्यांच्या कामाचे श्रेय्य विठोजी राजे देवू इच्छित नसतील. असं ही कारण असू शकतं. त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते कोण जाणे ? परंतु त्यांच्या वक्तव्यातून
द्वेष आणि तिरस्कारच जाणवत होता. हे त्यांच्या पुढील
वक्तव्यावरून ध्यानात येते. ते शहाजी राजे कडे पाहत म्हणाले
की, कोणी सांगितला तुम्हाला हा आगावूपना करायला ? आमची नक्कल करायला सांगितली होती ना, दादा साहेबांचा
वेळचा काळ वेगळा होता. नि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता दादा साहेबांच्या काळात होणाऱ्या गोष्टी होणार नाहीत. हे
आम्ही ठरवू तेच व्हायला हवं आहे. " असे बोलून पंत कडे पाहत पुढे म्हणाले," पंत हा मसुदा रद्द करून आम्ही बनविलेला मसुद्याची नक्कल करून पाठवून द्या. त्यावर शहाजी राजे काहीच बोलले नाहीत.इतक्यात तेथे सोयरा बाई आल्या नि म्हणाल्या की आपली मुलं कुठं दिसत नाहीत." त्यावर विठोजी राजे म्हणाले,
" कुठं जातील असतील इथच कुठतरी !"
" सर्वत्र शोधलं कुठच नाहीत."
" मग तालीम खाण्यात असतील. बघा तिकडे."
" आमची मुलं नि तालीम खाण्यात..... कसे शक्य आहे ?"
कारण प्रत्येक आई वडिलांना ठाऊक होतं की आपली मुलं
किती लायक आहेत ती."
दुसऱ्या दिवशी सकाळी सोयरा बाई तेथे आल्या. आपल्या पुत्रांचे दालन आज इतके नीट निटके कसे काय आहे याचेच मोठे आश्चर्य वाटले होते. पण त्यांना आणखीन प्रश्न पडला की
आपली सात ही मुलं कधी इतक्या लवकर उठत नाहीत. मग आज इतक्या लवकर कसे काय उठले ? इतका बदल कसा काय झाला आणि हा अकस्मात बदल कुणी केला ? पण उत्तर काही मिळालं नाही, म्हणून मग त्या आपल्या पुत्राचा शोधत तिथं येऊन पोहोचल्या. जिथं ते सारेजण तालीम करत होते. हा दुसरा धक्का त्यांना बसला. इतक्यात तेथे संभाजी राजे पण आले आपल्या साऱ्या बंधू ना सकाळीच तालीम करताना पाहून एकदम खुश होत म्हणाले," अरे वा , फारच छान. तुमच्यात इतका चांगला बदल घडून आलेला पाहून मला फार आनंद
झाला. अशीच अंग मेहनत करा."
" पण दादा साहेब , अंग फार दुखतंय ."
" दुखणारच या पूर्वी कधी अशी मेहनत केली नाही ना म्हणून." इतक्यात तेथे सोयरा बाई आल्या नि म्हणाल्या की
परंतु हे तुम्हाला करायला सागितलं कुणी ?"
" आमच्या जिजा वहिनी साहेबांनी केलं असेल हे."
" म्हणजे हे सारे नवीन सूनबाई ने सांगितले का ?"
" नाही. त्या कधीच कुणाला काही सांगत नाहीत तर
त्या प्रथम स्वतःच करून दाखवतात. मग त्याचं पाहून इतर ही करू लागतात."
" म्हणजे त्या इथं कसरत करत होत्या ?" सोयराबाईंनी
विचारले. त्यावर संभाजी राजे म्हणाले की नाही नाही. त्या
कसरत करत नव्हत्या . पण काल पाहिलं नाही का त्या कशा तलवार चालवत होत्या त्या . तशी तलवार चालवायची म्हणजे
अंग मेहनत ही करावीच लागणार ना , आणि सगळ्यांना ते मान्य आहे." संभाजी राजेनी जिजाबाईंची केलेली स्तुती मंबाजी
ला मुळीच आवडली नाही. म्हणूनच की काय मंबाजी राजे म्हणाले की, पण हे आम्हाला मान्य नाही." जमिनीवर उताणा पडून एक पाय गुडग्या वर घेऊन झोपलेला मंबाजी उठून उभा रहात म्हणाला. तेव्हा संभाजी राजेंनी विचारले की , का मान्य नाहीये ?" त्यावर मंबाजी म्हणाला," तलवार घेऊन सरळ रणात लढण्या मध्ये कौशल्य आहे. त्यासाठी सराव करायची काय गरज आहे, आणि तसं पण आपण राजे आहोत , आपल्याला शस्त्र हाती घ्यायची काय गरज आहे , आपल्याला मुजरे करणारे
आहेत ना, ते कधी कामाला येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आलेल्या वहिनी साहेबांचे ऐकणे म्हणजे आमच्या आऊ साहेबांचा अपमान करण्या सारखे आहे. म्हणजे आमच्या आऊ साहेबांना हे जमलं नाही ते काम काल आलेल्या नवीन वहिनीने करून दाखवलं. याचा अर्थ आमच्या आऊ साहेबांनी आम्हाला शिस्त शिकविली नाही असाच त्याचा अर्थ होत नाही काय ? म्हणून आमच्या समोर त्या नवीन वहिनी साहेबांचे कौतुक करू नका. आम्हाला मान्य नाही ते." त्यावर संभाजी राजे काही न बोलता तेथून निघून गेले. सोयराबाई ना मात्र आपल्या मुलाचा अभिमान वाटला. पण अश्या वागण्याने आपलंच नुकसान आहे, हे काही त्यांच्या ध्यानात आलं नाही. कदाचित आलं ही असेल, पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही. उलट त्या म्हणाल्या की, आमचंच रक्त ना ते आमच्या सारखं असणार अर्थात आमचं हे लेकरू एकदम आमच्या स्वारी वर गेलंय.यात तिळमात्र शंका नाही." हात जोडून पुढे म्हणाल्या," शंभू महादेव अशीच तुझी कृपा असू दे माझ्या या लेकरावर."
मोहीमे वर जाण्याचे फर्मान बादशहा कडून आले ते विठोजी
राजेंनी वाचले नि आपल्या सहकाऱ्यां कडे वळून म्हणाले की आपल्याला बादशहाचे फर्मान आले आहे नि उद्याच मोहिमे वर
निघायचे आहे, तेव्हा आपल्या सर्व जाबाझ शिपायाना जाऊन सांगा की त्यात रहा. आणि हां आमच्या सोबत संभाजी राजे नि शहाजी राजे पण असतील." जशी ही खबर सर्वत्र पसरली. तशी सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतानलजनक भाव उमटले. जिजाबाईंना मात्र त्याचे कारण कळेना. मोहीमे वर जायचे तर
चिंता कशाची करायची ? त्यांनी त्याचे कारण गोदाताईला विचारले पण गोदाताई कसं सांगणार होती ? म्हणून ती काही
बोललीच नाही. पण त्याच वेळी उमाबाई तेथे आल्या नि त्यांनी
त्या दोघींचे संभाषण ऐकले. मोहिमेवर जायचे म्हंटले की घरातल्या स्त्रियांच्या डोळ्यात पाणी का येते ? त्या बद्दल माहिती
देताना त्या म्हणाल्या की मोहिमे वर गेलेला आपला पुरुष
परत माघारी येईल की नाही याची काही शाश्वती नसते. मोहीमे वर जाताना जो चेहरा दिसला तो परत दिसेल की नाही ? या चिंतेने त्यांचे डोळे भरून येतात. आमचे स्वारी पानावरून उठून मोहीमे गेले ते परत आलेच नाहीत. म्हणून आम्ही तुमच्या कुकु ला मोहीमे वर जाऊ देणार नाहीये." असे म्हणून त्या तिकडून निघून गेल्या.
विठोजी राजे आपल्या पत्नीला सांगतात की आम्ही गेल्या नंतर कारभारात लक्ष घालावे. त्यावर त्या उलट प्रश्न विचारतात
की आम्ही लक्ष घालावे ?" तेव्हा विठोजी राजे उद्गारले की,
आम्ही जेव्हा मोहीमे जात असू तेव्हा वहिनी साहेब पंत सोबत
कारभारात लक्ष घालायचे. तेच काम आता तुम्हाला करायचे
आहे, नाहीतर तुम्ही एका कोपऱ्यात लक्ष्मी बनून राहाल. म्हणून म्हणतोय."
" पण मला जमेल का हे ?"
" का नाही जमणार ? आणि तुम्ही एकटे कोठे आहात ते
सात गुंड आहेत ना ?"
" त्यांना गुंड काय म्हणताय ? आपल्याच पोटेचे गोळे आहेत ना ते, आणि सात नाही आठ आहेत."
" संभाजी राजे आमच्या सोबत जाणार आहेत, मग तुमच्या
जवळ सातच राहणार ना ? त्या साता पैकी कोण लायक
आहेत ते पहा, आमच्या समोर सदरेवर येत नाहीत. पण आपल्याशी मन मोकळे पणाने बोलतात. म्हणून तुम्ही त्यांच्याशी
संवाद साधा." तेवढ्यातच तेथे उमाबाई येत म्हणाल्या," राजे
माफ करा, काम तसं जोखीमचे होते म्हणून वर्धी न देता आले."
त्यावर सोयराबाई म्हणाल्या ," त्यात काय झालं या ना ?"
तेव्हा उमाबाई आपल्या मनातील चिंता विठोजी राजे समोर
व्यक्त करतात. त्यांचे म्हणणे असे असते की शहाजी राजेंचे मोहिमे वर जाण्या इतके सध्या त्यांचे तेवढे वय नाहीये. म्हणून विठोजी राजेंनी त्यांन मोहिमे वर घेऊन जाऊ नये." तेव्हा विठोजी राजे कुत्सित पने म्हणाले की, वय नसताना ही पाच हजारी मनसबदारी मिळाली तेव्हा का नाही वयाचा विचार केला ? आता मनसबदारी घेतलीच आहे तर मोहिमे वर जावे लागणार ना ? आणि हे बादशहाचे फर्मान आहे, माझे नाही." त्यावर त्या बिच्चाऱ्या काय बोलणार ना ?
विठोजी राजे मोहिमेवर जायला निघाले. तश्या सोयराबाई
आपल्या हातात तलवार घेऊन त्यांच्या समोर येतात. पण त्यावेळी त्यांचे हात थरथर कापत असतात. ते पाहून विठोजी
राजेंनी त्यांना हात थरथर कापण्या मागचे कारण विचारले तर त्या म्हणाल्या की , भीती ही वाटणारच ना ?" त्यावर विठोजी राजे उद्गारले की तुम्हाला असं तर वाटत नाहीये ना, की आम्ही एकदा मोहीमे वर गेलो की परत येणारच नाही. म्हणजे कैलास वासी होऊ असे तर वाटले नाही ना ?" असे म्हणताच सोयरा बाईंनी त्यांच्या तोंडावर आपला हात ठेवला नि उसना राग दाखवत त्या म्हणाल्या," काहीतरीच काय बोलणे हे ? असं भरल्या घरात अभद्र बोलतं का कुणी ?" त्यावर विठोजी राजे म्हणाले की, तुमची ही अवस्था मग शहाजी राजेंच्या दालनात तर रडारडच सुरू झाली असेल." सोयरा बाई उदारल्या ,
" त्यांचं मला नका सांगू. त्यांचे त्यांच्या जवळ , पण तुम्ही असं आधी का बोललात ते सांगा."
" तू काय आजच आली आहेस का इथं ? या पूर्वी आम्ही कधी मोहीमे वर गेलो नाही का ? आणि ही मोहीम काही फार मोठी नाहीये. तेव्हा चिंता करू नको. आम्हाला काहीही होणार नाहीये."
" तुम्ही तिघं तिघं जाताय आणि...?"
" म्हणजे तुम्हाला पण असं च वाटलं का ? की आम्ही
शहाजी राजेंना पण घेऊन चाललोय म्हणून."
" म्हणजे त्यांना नेणार नाही आहात तुम्ही "
" फर्मान फक्त आमच्या नावाचे आहे, त्यांच्या नावाचे नाहीये.
आणि सभांजी राजेंना फक्त अनुभवासाठी सोबत नेत आहोत.
शहाजी राजेंना नाही."
" मग कालच्या रात्री असं का म्हणालात शहाजी राजे ना पण मोहीमे वर जायचं आहे म्हणून." सोयरा बाईंनी विचारले.
" अहो चेष्टा केली. त्यामुळे रात्र भर वहिनी साहेबांची झोप पार उडाली असेल. इतकं पुरेसे नाहीये का ? आता जाऊन सांगा त्यांना आम्ही शहाजी राजेना सोबत नेत नाही आहोत म्हणून."
" बरं ." असे म्हणून त्या निघाल्या.
शहाजी राजे मोहीमे जाण्यासाठी एकदम तयार झाले.
जिजाबाईंनी तर त्यांच्या हातात तलवार पण दिली. तेव्हा शहाजी राजेच जिजाबाईंना म्हणाले की आमच्या आऊ साहेबांची आता तुम्हीच समजूत काढा." तश्या जिजाबाई आपल्या सासूबाई जवळ आल्या नि त्यांचा हात पकडुन त्या म्हणाल्या की, स्वारी कधीचेच तयार झाले आहेत, पण तुम्ही त्यांच्या कडे पाहतच नाहीयेत. तेव्हा असं करू नका. त्यांना आशीर्वाद द्या बरं ."असे म्हणून जबरदस्तीने त्यांचा हात पकडुन त्यांना शहाजी राजांच्या जवळ घेऊन जातात. तेव्हा त्या म्हणाल्या की, आमचं धीरच होत नाहीये तुम्हाला मोहीम वर पाठवायला." तेव्हा शहाजी राजे म्हणाले," असं करून कसं चालेल बरं ? म्हणजे असं किती दिवस आपल्या पदरा खाली झाकून ठेवणार आहात आम्हाला ? कधी ना कधी मोहीमे वर जायलाच लागेल ना, मी तर म्हणतोय की उलट आपल्याला आमचा अभिमानच वाटायला हवा." त्यावर उमाबाई म्हणाल्या," अगदी आपल्या आबा साहेबांवर गेला आहात."
इतक्यात तेथे सोयरा बाई आल्या नि म्हणाल्या की, जाऊबाई
आपण आपल्या मनाला घोर लावून घेऊ नका. आम्ही आमच्या स्वारी ना ठाम सांगितले की तुम्ही वजीरे आलम किंवा बादशहा काय सांगायचं ते सांगा पण शहाजी राजे मोहीमे वर जाणार नाहीत."
" मग काय म्हणाले ते."
" अगोदर तयार नव्हते म्हणा. पण आम्ही पण हट्टच सोडला
नाही. म्हणालो ते काही नाही शहाजी राजे मोहीमे वर येणार
नाहीत. जाऊन सांगा तुमच्या त्या बादशहाला. मग काय झाले
तयार." तश्या उमाबाई खुश झाल्या नि त्यांचे आभार मानले.
तश्या त्या तिकडून निघाल्या. तसे शहाजी राजे म्हणाले की,
पण आऊ साहेब, आम्हाला वाटतं की आम्ही मोहीमे वर
जायला हवे. म्हणून आम्हीच काका साहेबांशी या संदर्भात बोलूच." हे शब्द जसे सोयराबाईंच्या कानी पडले. तश्या
त्या किंचित थांबल्या. उमा बाई म्हणाल्या," आता ते झालेत
ना तयार मग उगाचच कशाला आता त्यात मोडता घालता आहात ? आताच आम्ही आमचं कुंकू गमावलं आहे,म्हणून आम्ही तुम्हाला पाठवू इच्छित नाही." इतकं ऐकलं नि मग सोयरा बाई पुढे निघून गेल्या. शहाजी राजे काही न बोलता निमूटपणे तलवार जिजाबाईच्या हातात दिली नि तेथून चालते झाले. विठोजी राजे निघाले तसे त्यांच्या मागे पळत शहाजी राजे
नि म्हणाले की, काका साहेब आम्हाला ही घेऊन चला."
" यायचंच होतं तर वय कमी असल्याचे सबब पुढे करून
आपल्या मातोश्री ना आमच्या जवळ का पाठविले होते ?"
" आम्ही नाही पाठविले त्यांना. हां त्यांना असे वाटतं की
आम्ही मोहीमे वर जाऊ नये, परंतु आम्हाला वाटतं की आम्ही
आपल्या सोबत यावे. आमचे आबा साहेब असते तर ...?"
" तर त्यांच्या नावाचं फर्मान आले असते. तुमच्या नावाचे
फर्मान आलेले नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला नेऊ शकत
नाही. पण हां जेव्हा फर्मान येईल तेव्हा कोणीही किती अडवले
तरी जावेच लागणार आहे नि राजे तालमीत लढणे वेगळे नि
मैदाने जंग मध्ये शत्रू समोर लढणे वेगळे. तुम्हाला जेवढे वाटते इतके सोपे नाहीये ते ." असे बोलून ते तेथून चालते झाले. शहाजी राजे ना तोंडघशी पडल्या सारखे जाणवले. पण ते काहीच बोलले नाहीत. कारण बोलून काही उपयोगच नव्हता.
दुसऱ्या दिवशी विठोजी राजे नि संभाजी राजे मोहीमे वर
निघाले. सोयराबाईंनी आणि त्यांच्या सूनबाई म्हणजे संभाजी
राजे यांच्या पत्नी दोघींनी औक्षण केले.
दोन आठवड्या नंतर
मोहीमे वरची काहीच खबर आली नव्हती. त्यामुळं भोसल्यांच्या वाड्यावर शोककळा पसरली होती. म्हणजे दालनात बसलेली माणसे अंधार करून बसली होती. संभाजी राजे ची पत्नी मुद पाक घरात निघाली म्हणून सोयराबाईंनी त्यांना विचारले की कुठं निघालात ? तर त्या म्हणाल्या की कुठ तरी मन रमायला हवं ना ? म्हणजे कामात गुंतून राहिले तर स्वारी ची आठवण तरी येणार नाही."इतक्यात तेथे जिजाबाई आणि गोदाताई पण आल्या. कदाचित आपल्या जाऊ बाईंचे वक्तव्य त्यांनी ऐकले असावे म्हणूनच की काय त्या म्हणाल्या की, सासूबाईंनी सारा स्वयंपाक बनविला आहे." तेवढ्यात त्यांच्या ध्यानात येते की दालनात अंधार पसरला आहे, म्हणून त्या गोदाताईला बत्ती ची वात वर काढायला सांगतात. तश्या
सोयरा बाई चिडून म्हणाल्या," काही नको, वात मोठी करून काय आमच्या डोळ्यात किती पाणी साचलं आहे ते पाहायचं आहे का तुम्हाला ?" त्यावर जिजाबाई उद्गारल्या," काकी साहेब असं का म्हणताय ? काकासाहेब आणि दादा साहेब किती पराक्रमी आहेत हे आपल्याला माहीत नाहीये का ?" जिजाबाई असं म्हटलं खरं पण सोयरा बाईना त्यांचा भयंकर राग आला. त्या म्हणाल्या," तुम्ही तर बोलूच नका. आणि तुमच्या वयाला शोभेल इतकंच बोला. आणि आम्हाला सल्ले देण्याचा शहाणपणा करूच नका. चला निघा इथून." तेव्हा गोदाताई उद्गारल्या की, जिजा आक्का मी ना तुळशी जवळ दिवा लावायला विसरली. चला येता का माझ्या सोबत."
" हो चल." त्या दोघीही जातात. तुळशी जवळ दिवा
लावत असताना जिजाबाईंनी गोदाताई ला विचारले की, काका
साहेबांना मोहीमे वर जाऊन किती दिवस उलटले ?" तेव्हा
गोदाताई ने दोन आठवडे झाल्याचे सांगितले. तसे लगेच
जिजाबाईंनी विचारले की तुझे दोन आठवडे कसे गेले ?"
गोदाताई उद्गारली," जागून गेले." तसे जिजाबाईंच्या लगेच
ध्यानात आले की गोदाताईची पण स्वारी मोहीमे वर गेली
आहे तर ती आनंदित कशी असणार ? तीच अवस्था संभाजी
राजेंच्या पत्नीची होती. त्या आपल्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मनाची समजूत काही केल्या होईना. इतक्यात तेथे त्यांच्या सासूबाई आल्या त्या देखील तेच म्हणाल्या की आम्हाला वाटलं की आमच्या चिरंजीवांची आठवण फक्त आम्हालाच येतेय. पण इथं आल्यावर कळलं की तुम्हाला पण त्यांची फार आठवण येतेय हो ना ?" तेव्हा त्यांनी होय म्हणून सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या की, इतकी आठवण येत होती तर मोहीमेवर जाऊ द्यायचे नव्हते ना , हट्ट धरायचा होता ना ? धरला आहे का कधी हट्ट ?" तेव्हा सूनबाईनीं फक्त होय म्हणून मान डोलावली. तसे त्यांनी विचारले की, मग काय म्हणाले ते." त्यावर सूनबाई म्हणाली," दुसरं काय म्हणणार हेच की गालावरच्या पुऱ्या कशा फुगल्या बघ !" मग काय मला हसू आले. असे बोलून ती खुदकन हसली. त्यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या," असं हसून आता नाही चालणार, तुला माहितेय दादा साहेब नेहमी मोहीमे वरच असायचे. मग आमच्या जाऊबाई त्यांच्या माघारी सारा राज्य कारभार चालवायच्या तसा तुम्ही ही तसा हिरीने भाग घ्यायला पाहिजे. नाहीतर माझ्या सारख्या एका बाजूला पडाल नि नवीन आलेल्या सूनबाई घेऊन जातील सारे श्रेय्य ! तेव्हा आता पासूनच जरा कारभारात लक्ष द्या. काय येतय का ध्यानात ?" इतक्यात जिजाबाई पळत आल्या नि म्हणाल्या की, काकी साहेब आपले काकासाहेब...इतकंच बोलून त्या थांबल्या. पुढेचे बोलूच पावल्या नाहीत. म्हणून सोयराबाई चिडल्या नि म्हणाल्या ," काकासाहेब च्या पुढे काय ? बोला लवकर." तेव्हा दीर्घ श्वास घेऊन जिजाबाई म्हणाल्या की, काका साहेबांची तलवार म्यान झाली." ते वक्तव्य कानी पडताच त्यांच्या हातात असलेला कुंकू चां करंडा हातातून सुटून खाली पडला.
जिजाबाईंनी काकासाहेबांची तलवार म्यान झाल्याची खबर काकी साहेबांना प्रथम दिली हाच काय तो त्यांचा अपराध
सोयराबाईंनी तो राग जिजाबाई वर काढला. झाले असे की,
विठोजी राजेंच्या अंत्यसंस्कारच्या वेळी सोयराबाई सती जाऊ
इच्छित होत्या. परंतु उमाबाई नि त्यांना समजावले की तुमच्या
पाठी मागे तुमची मुलं आहेत, निदान त्यांचा तरी विचार करा.
आम्ही पण सती जाऊ इच्छित होतो. पण आपणच आम्हाला
रोखले ना, आमच्या मुलांचा हवाला देवून. म्हणून आम्ही देखील
तुम्हाला रोखत आहोत. "त्यावर त्यांनी आपल्या हातातील
सती जाण्याची वस्त्र जिजाबाईंच्या हातात दिली. वास्तविक
सती जाण्याची वस्त्र सुहासिनी बाई कडे दिली जात नाहीत.
परंतु त्यांच्या मनात जिजाबाई विषयी राग असल्याने त्यांनी
हे कृत्य केले. जिजाबाईंना त्याचे फार वाईट वाटले.पण त्या
तिथं काही बोलल्या नाहीत. आपल्या दालनात जाऊन रडत
बसल्या. जेव्हा उमाबाईंची नजर त्यांच्या हातातील वस्त्रा वर
पडली तशी त्यांनी ती त्यांच्या हातातून काढून घेतली नि म्हणाल्या की , तुमच्या हातात ही वस्त्रे कोणी दिली ?" तेव्हा जिजाबाई रडत म्हणाल्या की काकी साहेबांनी का दिली ही वस्त्रे माझ्या हातात ? काका साहेब गेल्याची खबर दिली हाच का माझा अपराध ? " असे बोलून त्या रडू लागल्या. त्यावर
उमाबाई म्हणाल्या की, तुम्ही हा विचार आधी मनातून काढून
टाका बरं आणि आम्हाला शब्द द्या की पुन्हा हा विषय दुसऱ्या
कुणा समोर तुम्ही बोलणार नाही. त्यावर जिजाबाईंनी त्यांना शब्द दिला.
दुसऱ्या दिवशी सोयराबाईंनी मंबाजीला बोलवून सांगितले की संभाजी राजे मोहीमे वर गेले आहेत. तेव्हा उद्या पासून इथल्या कारभाराची सारी सूत्रे आपल्या हातात घ्या." त्यावर मंबाजी म्हणाला की, मी कसे घेणार ? मनसबदार तर शहाजी राजे आहेत, आणि मी मनसबदार ही नाहीये."
त्यावर सोयराबाई म्हणाल्या की , शहाजी राजे मनसबदार
जरी असले तरी त्यांच्या जवळ अजून अधिकार गेलेले नाहीत.
म्हणून शहाजी राजे नि जिजाबाई ह्यांना ह्या पासूनच दूरच ठेवा."
" पण नवीन वहिनी साहेब कशाला कारभारात लक्ष देतील ?"
" तुम्हाला नाही माहित आहे, त्या किती हुशार आणि तल्लक
बुद्धीच्या आहेत त्या. जर त्यांनी आपल्या हातात कारभार घेतला ना तर तांदूळातीलल खड्या प्रमाणे तुम्हाला वगळून कधी बाहेर फेकून देतील हे तुम्हाला कळणार देखील नाही , म्हणून सांगतोय की त्या कारभारात लक्ष घालण्या अगोदर त्यांना त्या पासून दूर ठेवा. आणि खरं सांगायचं तर मला त्यांचा इतका राग येतोय की त्यांचे तोंड सुध्दा पाहण्याची इच्छा नाहीये माझी . कसली अभद्र खबर ऐकवली त्यांनी मला ."
जिजाबाई उमाबाईंच्या दालनात आल्या नि म्हणाल्या की
बघा ना, आम्ही सोयरांबाई काकी साहेबाचा अजून आमच्या
वरचा राग गेलेलाच नाही. आम्ही त्यांना सांगायला गेलो तर
आमच्या वरच त्या रागवल्या." उमाबाई म्हणाल्या की , जिजाबाई तुम्ही शब्दाला जागत नाहीत काय ?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या की, आधी आम्हाला जिजा म्हणा. आणि आता ऐका. आम्ही आपल्या कडे कोणतीही तक्रार घेऊन आलेली नाहीये ."
" मग ?"
" काकी साहेबांनी काल पासून काही खाल्लं नाहीये. म्हणून
तुम्ही त्यांची समजूत काढून दोन घास खायला सांगा. आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो पण त्यांनी आमच्या वरच राग धरला
आहे. मग सांगा आम्ही आमचा शब्द पाळला नाही का ?" जिजाबाईचे हे वक्तव्य ऐकून उमा बाई म्हणाल्या की, जिजा तुम्ही फार गुणी आहात. हुशार आहात. या वयात तुमच्यात भरपूर समजसपना आहे, तो आमच्या जवळ नव्हता.
आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो. आम्हाला त्या वयात कळत देखील नव्हते. पण तुम्हाला कळते. ठीक आहे. आम्ही जाऊन समजवतो त्यांना." असे बोलून त्या निघून गेल्या. तेव्हा जिजाबाई उद्गारल्या की, आम्ही शब्द दिला म्हणून गप्प आहे.
परंतु काकी साहेबांनी आमच्या सती ची वस्त्रे दिली हे आम्ही
कदापि विसरणार नाही."
मंबाजी च्या हातात कारभाराची सूत्रे दिली म्हणून त्याचा
इतका रुबाब वाढला होता की तो आपल्या सख्ख्या भावांडाना देखील ताकीद दिली की या पुढे मी म्हणेन तेच ऐकायचे.माझा
आदेश म्हणजे आऊ साहेबांचा आदेश आहे असे समजायचं.
त्यावर एकाने आपला विरोध दर्शविला तर त्या बदल्यात त्याच्य
कानाखाली एक चपराक बसली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा