छत्रपती शिवाजी महाराज १३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज १३ |
पण तुम्हाला पटत नसेल तर जाऊ दे. कालांतराने तुम्हाला कळेलच की आम्ही सांगत होतो ते कुणाच्या भल्यासाठी ! " असे म्हणताच विठोजी राजेंच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले आणि ते स्वतःशीच बोलले की आम्ही असं होऊ देणार नाही म्हणून. मध्ये रत्यात मलिक अंबर भेटला त्यांनी सांगितले की आम्हाला देखील पाहुण्याचे स्वागत करण्याची संधी द्या.
पुढे
लखुजी जाधवांचे म्हणणे असते की जिजाबाईंनी आपल्या
सोबत सिंदखेडला चालावे. कारण त्या अजून वयाने लहान
होत्या. परंतु म्हाळसा बाईचे म्हणणे असते की नाही त्यांनी
आता वेरुळ ला म्हणजे आपल्या सासरी राहावे. उमाबाईचे
म्हणणे असते की त्यांनी अजून माहेरीच राहावे. शेवटी असे
ठरले की हा निर्णय जिजाबाईंनीच घ्यावा की त्यांनी कोठे
राहायचे . त्यानंतर जिजाबाईंना बोलवण्यात आले तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या मधल्या नि धाकट्या आऊ साहेब पण आल्या. पण जेव्हा लखुजी जाधवांनी जिजाबाईंना विचारले की तुमचा विचार काय आहे, म्हणजे तुम्ही आमच्या सोबत सिंदखेडला चलणार का वेरुळला ? " त्यावर जिजाबाई म्हणाल्या की मधल्या आऊ साहेबांनी आम्हाला अन्नपूर्णा बनण्याचा सल्ला दिला तो वेरुळला जाण्यासाठीच होता ना होय ना मधल्या आऊ ?" तेव्हा मधल्या बाईंनी होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर त्या धाकट्या आऊ साहेबांकडे गेल्या नि म्हणाल्या की, धाकट्या आऊ नि आम्हाला माणसांचे मन जिंकायला सांगितले ते पण ह्याच इराद्याने होय ना ? त्यावेळी त्यांनी म्हटलेले शब्द आठवले. त्या म्हणाल्या होत्या की त्या वाड्यातील स्त्री प्रसन्न असेल तर ती वास्तू प्रसन्न असते. तुम्ही आनंदित राहिलात तर ती वास्तू देखील आनंदित राहील. आणि ती वास्तू आनंद देईल सुध्दा नि आनंद घेईल सुध्दा." तेव्हा धाकट्या बाई साहेबांनी होकारार्थी मान डोलावली. थोरल्या आऊ साहेबांनी आणि स्वतः आबासाहेबानी सुध्दा आम्हाला हेच सांगितले. जिजाबाईंनी प्रत्येक आऊ साहेबांनी आपल्याला दिलेली शिकवण सांगितली नि शेवटी त्या म्हणाल्या की आम्हाला वेरुळ ला जाणे गरजेचे आहे, कारण आता मालोजी मामा नाहीयेत." त्यामुळे आता पुढे बोलणेच खुंटले. लखुजी जाधव म्हणाले," जिजाऊ आम्हाला तुमचा फार मोठा अभिमान वाटतोय. कारण तुमची समजदारी तुमच्या वया पेक्षा फार मोठी आहे."
गोमाजी झोपायची तयारी करत होता. जमिनीवर घोगडे
टाकत होता. पण समोरून लखुजी राजेंना आपल्या कडे
येताना पाहून त्याने चटकन घोगडी बाजूला सारली नि विचारले
की धनी आपण इथं कुठं आलेत ? आमच्या कडे काही काम
होतं तर आम्हाला बोलवायचे होते." त्यावर लखुजी राजे म्हणाले, " आमचेच तुमच्या कडे काम आहे, मग आम्ही तुम्हाला कसं बोलवणार बरं ?" त्यावर गोमाजी ने विचारले,
" धनी मला आपण अहो जाहो करून परके करता आहात ?"
" परके नाही,तुम्ही स्वामी निष्ट आहात याची कल्पना आहे
आम्हाला. परंतु आम्हाला देखील तुम्ही केलेल्या कामगिरीची
परतफेड करायला आलोय ?"
" धनी तुम्ही काय म्हणताय खरंच कळले नाही मला."
" सरपोच उचलून पहा. म्हणजे कळेल तुम्हाला." गोमाजीनी
तबका वरचा सरपोच उचलताच त्यांना तबकात वस्त्र आणि सोन्याचे कडे दिसले." ते पाहून गोमाजी ने न कळून विचारले
की , पण हे सारे कशासाठी ?" त्यावर लखुजी राजे उत्तरले की,
" सांगतो." किंचित थांबून दीर्घ श्वास घेतला नि मग पुढे
म्हणाले की, जिजा उद्या वेरुळ ला जाणार आहेत. इथं सिंदखेड
मध्ये आपल्या सर्वांचे हात त्यांना धीर द्यायला नि सावरायला
होते. डोळे कौतुक सांगत होते. वेरुळ ला आमचे डोळे हात
सगळे काही तुम्हीच व्हायचे आहे. व्हाल ?" लखुजी जाधवानी विनंती केली. गोमाजी ने एकदम भावनावश होऊन त्यांचे चरण धरत म्हटले ," धनी एवढा विश्वास टाकताय आपल्या ह्या सेवकावर ?" त्यावर लखुजी राजे उद्गारले की," सेवक नाही आम्ही तुम्हाला सेवक समजलोच नाही कधी ! जसे आमचे धाकटे बंधू जगदेव राव तसेच तुम्ही ! तुम्ही कष्ट केले. त्यामुळे जिजाच्या आवडी निवडीला खत पाणी मिळालं. मुद खाण्यात मन रमायच्या ऐवजी त्यांचे मन तालीम खाण्यात रमायला लागले. तुम्ही त्यांना तलवार बनविले, आता त्यांची ढाल पण तुम्हीच व्हा ! व्हाल ना ?" लखुजी राजेनीं गोमाजी ना
विनंती केली. त्या वर गोमाजी म्हणाले," धनी आपण माझ्या
वर इतका मोठा विश्वास दाखविला. त्या विश्वासाला मी तडा
जाऊ देणार नाही." असे म्हणताच लखुजी जाधवानी त्यांना
आलिंगन दिले.
दुसऱ्या दिवशी वरात निघाली तेव्हा सर्वांच्या डोळ्यांच्या
कडा ओल्या झाल्या होत्या. सर्वजण भावनाविभोर झाले होते.
प्रथम म्हाळसा बाईंचे दोघांनी चरण स्पर्श केले. तेव्हा त्यांनी दोघांना आशीर्वाद दिला नि जिजाऊंचा त्यांनी माथा चुंबला
नि म्हटले की, काळजी घ्या." त्यानंतर त्या दोघांनी मधल्या आऊ साहेबांचे म्हणजेच भागीरथी बाईंचे चरण स्पर्श केले.
त्यांनी देखील त्या दोघांना आशीर्वाद दिला नि जिजाऊचा
हातात अन्नपूर्णा ची मूर्ती दिली नि म्हटले की, सुखी संसार
करा." त्यानंतर धाकट्या आऊ साहेबांचे चरण स्पर्श केले.
त्यांनी देखील त्या दोघी प्रमाणेच आशीर्वाद दिला नि म्हटले
की आमच्या जिजांची काळजी घ्या." त्यानंतर शेवटी आपल्या आबा साहेबांचे चरण स्पर्श केले. तेव्हा त्यांनी आशीर्वाद देत
म्हटलं," काय पाहिजे ते मांगा." त्या जिजाऊ म्हणाल्या,
" आमचा आवडता अलंकार." त्यावर लखुजी जाधव न
समजून म्हणाले," म्हणजे तुम्हाला अजून तुमचा आवडता अलंकार मिळालाच नाही, बोला काय देवू तुम्हाला ? सर्व अलंकारांची त्यांनी नावे घेतली. तेव्हा जिजाऊ म्हणाल्या की हे सारे शोभेचे अलंकार आमचा खरा आवडता अलंकार म्हणजे कमरेला लटकणारी शमशेर आहे . आबासाहेब आम्हाला ऐश्वर्य नाही शौर्य हवंय." असे म्हणताच लखुजी जाधवानी भावना विभोर होऊन त्यांना आपल्या हृदयाशी धरले. आणि अभिमानाने ते वेरुळ कराना म्हणाले," बघा, ही शमशेर आम्ही तुम्हाला देत आहोत." त्यानंतर स्वतःच्या कमरेला लटकत असलेली तलवार कमेरेची काढून जिजाऊंच्या हाती देत म्हणाले," ही घ्या आमची तलवार तुम्हाला." जिजाऊंनी ती तलवार आपल्या हाती घेऊन मस्तका लावली. तसे लखुजी जाधवानी त्यांना पुन्हा आपल्या हृदयाशी घट्ट पकडलं. त्यानंतर त्यांनी उमाबईचे चरण स्पर्श केले. त्यांनी सुध्दा त्यांना आशीर्वाद दिला नि पालखीत बसून घ्यायला सांगितले. लखुजी जाधवानी सर्व वेरुळ कर मंडळीला हात जोडले. त्यानंतर जिजाऊंनी सर्वांना हात जोडून प्रणाम केला नि पायातील वहाणा काढून त्या पालखीत बसल्या. तशी भोईनी पालखी उचलली. वरात निघाली वेरुळच्या दिशेने.
वेरुळ ला आल्यानंतर उंबरठ्यावरील माप पायाने पाडून
आंत येणे वगैरे चा कार्यक्रम उरकला. त्यानंतरचे इतर कार्यक्रम
जे असतात तेही आटोपले. परंतु मीआण राजू शी भेट झाल्या
पासून म्हणण्या ऐवजी आपण असं म्हणू की, मीआण राजू ने
विठोजीच्या मनात विष भरवल्या पासून त्यांच्या वागण्यात
नि बोलण्यात भरपूर फरक झाल्याचे जाणवू लागले. छोट्या
छोट्या गोष्टी वरून ते आपला राग व्यक्त करत होते. ते तसे
वागायला लागल्या मुळे त्यांच्या पत्नी सोयराबाई सुध्दा तशाच
वागत होत्या. आणि ही गोष्ट उमाबाईंच्या ध्यानात आल्या वाचून
राहिली नव्हती. परंतु त्या जाणूनबुजून त्यांच्या बोलण्या कडे
दुर्लक्ष करत होत्या. कारण त्यांना ठाऊक होते की त्यांच्या
स्वारी आता या जगात नाहीयेत. शिवाय दोन्ही पुत्र अजून
लहान आहेत. अर्थात विठोजी राज्यांशिवाय दुसऱ्या कोणाचाही
त्यांना सहारा नव्हता. वडील वनगोजी राव जरी असले तरी
ते आपली जहागिरी सोडून वेरुळ ला तर येऊन राहू शकत नव्हते. आणि ते रास्त ही ठरले नसते. म्हणून त्या साऱ्या गोष्टी हसण्यावर न्यायच्या. परंतु विठोजी राजे खुजकट आणि टोचून
बोलण्याची एक सुध्दा संधी सोडत नव्हते. एके दिवशीची गोष्ट जिजाबाई शंभू महादेव समोर रेणुका देवीचे स्तोस्त्र म्हणत होत्या. तेव्हा विठोजी राजे सुध्दा तिथं जवळच बसलेले होते . स्तोस्त्र पूर्ण म्हणून होईपर्यंत ते काहीच बोलत नाहीत. स्तोस्त्र
पूर्ण बोलून होताच विठोजी राजेंनी जिजाबाईंना विचारले की,
आता स्तोस्त्र कोणते म्हणत होता ?" तेव्हा जिजाबाई नम्रपणे
म्हणाल्या की, रेणुका मातेचे स्तोस्त्र होते ते. आम्ही सिंदखेड
मध्ये होतो तेव्हा हेच स्तोस्त्र आम्ही रोज म्हणत असू." त्यावर विठोजी राजे म्हणाले की, हे सिंदखेड नाही तर वेरुळ आहे, त्यामुळे तिकडच्या सारखे इथं काहीही नसेल. अर्थात शंभू महादेवा समोर रेणुका मातेचे स्तोस्त्र वाचून काय होणार आहे ?" त्यावर जिजाबाई एकदम शालिंनतेने म्हणाल्या ," हो खरंच की, शंभू महादेव चुकलं बरं, पण आम्ही लवकरच तुम्हाला आवडेल असं स्तोस्त्र म्हणू पण आता रागवू नकोस ह !" असे म्हणून विठोजी राजे कडे पाहत त्या म्हणाल्या,
" माफी मागितली बरं का शंभू महादेवाची आता नाही
ते कुणावर रागवणार." असे म्हणून त्यांनी विठोजी राजे ना प्रणाम केला आणि त्या तेथून निघून गेल्या. तसे विठोजी राजे म्हणाले की," शंभू महादेव, आम्ही आपल्या पूजेत काही कमी करतो का रे ? आमच्या एका ही मुलामध्ये असे गुण नाहीत." खरं सांगायचं तर मुलांमध्ये संस्कार त्यांच्या आई - वडिलांनी
करायचे असतात. संस्कार आपोआपच येत नसतात. जिजाबाई चे आई - वडिलच संस्कारी आहेत, तर का नाही त्यांच्यात संस्कार असणार ? जर आई - वडीलामध्येच चांगले संस्कार नसतील तर मुलामध्ये तरी कोठून येणारं ना ? जसं की आडातच पाणी नसेल तर पोहरा मध्ये कोठून येणारं ना ? परंतु लोकांना स्वतःमध्ये काय कमी आहे असे कधी वाटतच नाही. फक्त दुसऱ्याच्या चुका काढण्यात धन्यता मानतात. असो.
उमाबाई मुद पाक खाण्यात काम करणाऱ्या बायाना सांगत असतात की आता चाल रीती बदलायला पाहिजे. त्यांना जास्त तिखट खाणे आवडत नसेल तर !" इतकं म्हणे स्तोवर तिथं
सोयरा बाई आल्या नि म्हणाल्या की, थोरल्या जाऊ बाई मी काय म्हणते म्हणजे स्पष्ट बोलते म्हणून राग मानू नये,म्हणजे कसं आहे, उगाचच पिढ्यानिपिढ्या चालत आलेल्या रीती
मोडायच्या कश्या ? नाही म्हणजे एवढं मोठेपण करायची गरज काय ?" उमाबाई समजल्या की सोयरा बाईना काय म्हणावयाचे आहे ते. म्हणूनच की काय त्या म्हणाल्या की,
जाऊबाई , तुम्ही जिजाबाई बद्दल बोलत आहात ना ?" त्यावर त्या म्हणाल्या ," हां जिजाबाई बद्दलच बोलत आहे मी, म्हणजे बघा ना, इतक्या लहान वयात सासरी येण्याची काय गरज होती का ? आता बसली असेल कोणत्या तरी कोपऱ्यात बसून रडत."
" जाऊबाई जिजाबाई भरपूर समजदार आहेत. त्या कधीही
अश्रू काढणार नाहीत. श्रीकृष्णाच्या वंशातल्या आहेत त्या.
श्रीकृष्णाने एकदा गोकुळ कडे पाठ फिरविल्या नंतर परत
गेला का गोकुळात , नाही ना ?" उमाबाई उद्गारल्या. हे वक्तव्य
सोयरा बाईना झोंबले. त्या म्हणाल्या की, त्याची तुलना इथं कशाला ?" त्यावर उमाबाई उत्तरल्या," आम्ही त्यांची तुलना करत नाही तर त्यांच्या अंगी असलेल्या गुणा विषयी सांगतोय." पण सोयरा बाईना , उमाबाईंनी जिजाबाईंची केलेली प्रशंसा अजिबात आवडली नाही. आणि खरं सांगायचं तर लखुजी
राजेंनी लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात केला. तोच मुळी
आवडला नाही त्यांना. त्यांचे २७ वीस वाडे, १२ हजार मनसबदारी वगैरे स्वतःच सांगत असतात, पण जसे विठोजी
राजे येतात तशी त्या आपली भाषा बदलतात.आणि आपण
बोललेले वक्तव्य उमाबाईंच्या वर टाकतात. पण तरी देखील उमा बाई बिच्चाऱ्या काहीच बोलत नाहीत आणि विठोजी राजे उमाबाईना ऐकवतात. म्हणजे उपदेश देतात की, आम्ही तुमच्या हिताचेच बोलतोय वहिनीसाहेब सिंदखेडची जहागीर किती आहे ते पाहण्या पेक्षा तुमच्या सूनबाई ना जरा इकडच्या चाली रीती शिकवा. नाहीतर नाका पेक्षा मोती जड होईल. काय ? असे ही टोमणा मारतात. तेव्हा उमाबाई म्हणाल्या की, जिजाबाई कडून काही चुकलं तर आम्ही माफी मागतो." पण विठोजी राजे तेथून
निघून जातात. तशा उमाबाई स्वतःशीच उद्गारल्या की, काहीतरी वावगं घडलंय हे खरंय." तेव्हा जाऊबाई म्हणाल्या की, जाऊबाई गैरसमज करून घेऊ नका. दादा साहेब गेल्या पासून तुमची सारी जबाबदारी ह्यांच्या वरच आहे नाही का ? म्हणून स्वारी तुमच्या काळजी पोटी म्हणाले तसे. आणि सूनबाई बद्दल तेड असायला त्या इतक्या काही मोठ्या झालेल्या नाहीत अजून. मी समजावते त्यांना." असे बोलून सोयराबाई पण तिकडून निघून गेल्या. उमाबाई मात्र स्वतःशीच विचारत करत बसल्या की असं काय घडलं असं बरं ? शंभू महादेव जसं आतापर्यंत गुण्या गोविंदाने वागले आहेत सारे, तसेच पुढे ही गुण्या गोविंदानेराहू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना."
वजिरे आलम मालिक अंबर भरपूर खुश होता. म्हणजे
हे लग्न होऊ नये म्हणून मीआण राजू ने किती अडथळा आणला. पण जाधवांची नि भोसल्यांची सोयरिक झालीच. परंतु
मलिक अंबर ला हे कुठं ठाऊक होते की मी आण रजून ने
विठोजी राज्यांच्या मनात विष भरून दिलं ते.एकदा का मनात
संशय ने प्रवेश मिळविला की मग सरळ सरळ असणाऱ्या
गोष्टी सुध्दा वाकड्या दिसू लागतात. मलिक अंबर मी आण
राजू ला मोठ्या अभिमानाने म्हणाला की, देखा मीआण राजू
आखिर हमने जो कहा था वो करके दिखलाया की नहीं ?"
त्यावर मीआण राजू स्मित हास्य करत म्हणाला की, शादी सिर्फ जे सिर्फ सात फेरे लेनेसे शादी मुक्कमल नही होती जबाब
अभी मंजिल बहुत दूर हैं." असे म्हंटल्यामुळे मलिक अंबर
समजला की हा मी आण राजू नक्कीच काहीतरी नवीन कारस्थान रचत असणार म्हणून तर तो असा बोलला. पण
नेमकं काय कारस्थान रचले आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने
विचारले की " मतलब अभी भी तुम्हारी साजिश जारी है।"
मी आण राजू म्हणाला की, हां और जब तक हम अपने मकसद में कामयाब नहीं हो जाते तब तक यह जंग जारी रहेगी ।" त्यावर मलिक अंबर त्यांचे आवाहन स्वीकारत म्हणाला," अच्छा तो हम भी देखते है की उन दोनो को कौन और कैसे जुदा करता है।" मी आण राजू उत्तरला ," मालिक अंबर जी आप समझ नहीं रहे है,बदलेकी आग नफरत की आंधी और बगावत उस रिश्ते के बीच में आई तो तब क्या करेंगे आप ?" मालिक अंबर विचारमग्न झाला.
जिजाबाई आणि गोदा ताई दागिन्यांचे सेट लावत असतात.
इतक्यात संभाजी राजेंच्या पत्नी तिथं आल्या. इतके सारे डाग
पाहून त्या हरखून जातात. पण इतके सारे डाग असूनही आपण
लंकेची पार्वती बनून का राहता असा ही प्रश्न त्या जिजाबाईंना
विचारतात. त्यावर जिजाबाई आपल्याला दागिन्यांची इतकी
हौस नसल्याचे सांगतात. त्यांना त्याचे नवल वाटते. म्हणून
त्या जिजाबाईंना विचारतात की , मग तुम्हाला आवडते तरी
काय ? " त्यावर जिजाबाई उद्गारल्या की ते केव्हातरी सांगू
आम्ही तुम्हाला. पण आता आधी आम्हाला आमचा वाडा
पाहायचा आहे." त्यावर त्या म्हणाल्या,' ठीक आहे चला
दाखवते." असे बोलून त्या दोघींना सोबत घेऊन गेल्या.
वाडा पाहत तिथं पोहोचतात जिथं गोमाजी आणि शहाजी
राजे यांच्या मध्ये पैज लागलेली असते. मुदगल दोन्ही हाताच्या
मनगटावर ठेवून कोण जास्त वेळ ते सावरेल त्याच्या वरून
हार जीत ठरते. म्हणजे ज्याच्या मनगटावरून ते मुदगल पडेल तो हरला असे सिद्ध होते. जिजाबाई तेथे आल्या हे पाहून गोमाजी चे लक्ष त्यांच्या कडे जाते नि त्यांच्या मनगटावरील मुदगल खाली पडते.अश्या प्रकारे शहाजी राजेंची जीत होते. पण शहाजी राजे ते मान्य करत नाही. त्यांचे म्हणणे असे असते की तुमचे लक्ष जिजाबाई कडे गेल्या मुळे तुमच्या मनगटावरील
मुदगल खाली पडले. पण गोमाजी म्हणतात की असं नाहीये.
तुमच्या मनगटात अजून बळ येईल पण त्यासाठी तुम्हाला
चांगले खूराक म्हणजे दूध वगैरे घ्यावे लागेल मग तुम्हाला हत्तीचे बळ येईल. तेव्हा शहाजी राजे उत्तर दिले की जर
आम्हाला जिजाबाईंनी खुराक दिले तर ते आम्ही अवश्य घेऊ." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," स्वारीनी फक्त आदेश द्यावा. आम्ही पेला भरच काय हंडा भर दूध देवू." या विधानावर सर्वजण हसू लागले. तश्या जिजाबाई तेथून लाजून पळ काढतात. तेवढ्यात जिजाबाईंना त्यांच्या जाऊबाई भेटतात. त्या जिजाऊंना विचारतात की भेटलेत का आपल्या स्वारी ना ?"
तेव्हा त्या होकारार्थी मान डोलावली नि शेष वाडा दाखविण्याची
विनंती केली. इतक्यात वेगवेगळ्या प्राण्याचा आवाज कानी
पडतो तेव्हा जिजाबाईंनी विचारणा केली की इथं प्राणी
संग्रलाय आहे का ?" त्यावर त्यांनी विचारले," म्हणजे ?"
" जनावर खाना."
" हो चला ना दाखवते." असे बोलून त्या दालनात जातात.
ज्या दालनातून आवाज येत असतो. पण तेथे गेल्यावर समजले
की ते प्राणी नाहीत तर आपलेच धाकटे दीर म्हणजे संभाजी राजेंचे धाकटे बंधू निरनिराळ्या प्राण्यांचे तोंडाने आवाज काढत
होते. तसे जिजाबाईंना त्यांच्या धाकट्या आऊ साहेबांचे
वक्तव्य आठवले. त्या म्हणाल्या होत्या की, जनावरांना प्रेम
लावले ते जनावरे सुध्दा प्रेमळ होतात. मग ही तर माणसेच आहेत. असा विचार करून त्या माघारी वळल्या. त्या तिघिजनी
एका दालना जवळ येतात. परंतु जाऊबाई त्या दालनात यायला
नकार देतात म्हणून जिजाबाई नि गोदाताई तेथे जाऊन पाहतात
तर सगळे दालन अस्तव्यस्त पडलेले असते. म्हणून त्या दोघी ते
नीट करून निघून जातात. थोड्या वेळाने ते सर्वजण त्या
दालनात येतात. संपूर्ण दालन नीटनेटके पाहून ते एकमेकांना
विचारू लागतात की हे कोणी केले ?" तेव्हा जिजाबाई तेथे
आल्या नि म्हणाल्या,' आम्ही केलं." त्यावर ते चिडतात नि
उलट विचारतात की कोणी करायला सांगितले हे तुम्हाला ?"
जिजाबाई उत्तरल्या की कुणी नाही आम्हीच केलं. कारण आम्हाला वाटलं की माणसाना नीट निटके पना आवडतो. नाहीतर आपली गणना जनावरात नाही का होणार ? आता तुम्ही ठरवा तुमची गणना कशा मध्ये व्हायला हवी ते " असे बोलून त्या निघून गेल्या. त्या सर्वांनी खजील होऊन आपल्या माना खाली घातल्या.
विठोजी राजांनी पंताना बादशहाच्या मुंशीजिना नक्कल पाठविण्या बद्दल विचारणा केली असता पंत नाही म्हणाले. म्हणून विठोजी राजे त्यांच्या वर भयंकर चिडले म्हणाले की, तुम्हाला एक काम दिलं होतं तेही जमले नाही. जर तुम्हाला कामे करायला जमत नसतील तर तसे सांगा."त्यावर पंत म्हणाले की नक्कल आजच तयार करतो. इतक्यात तेथे शहाजी राजे आले नि म्हणाले, " काका साहेब, मी मध्ये बोलतोय म्हणून राग मानू नये. परंतु आपली परवानगी असेल तर मी नक्कल तयार करायचा प्रयत्न करू का ?" असे विचारताच विठोजी राजे ना भयंकर राग आला त्यांनी शहाजी राजे ना उलट विचारले की, आबासांहेबांची जहागीर मिळविण्या इतकं सोपं वाटलं की काय हे काम ? आणि कोणी सुचवलं हे तुम्हाला ? मला वाटतं नवीन सूनबाई चे काम असणार हे ? होय ना ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले ," नाही त्यांनी आम्हाला काहीच सांगितले नाहीये." परंतु विठोजी राजे ना काही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी उलट विचारले की, नाही कसं ? आजपर्यंत कधी विचारलं नाही ते. मग आजच कसं एकदम कामात लक्ष घालावया सारखे वाटले. हे नक्कीच नवीन सूनबाईचे काम असणार आहे, म्हंटले असतील काकासाहेब एकटेच मनसबदारीचे काम सांभाळत आहेत, तुम्ही पण पाच हजार मनसबदारीचे हकदार आहात तर तुम्हाला देखील मनसबदारीच्या कामात लक्ष घालायलाहवे. असेच त्या म्हणाल्या असतील. होय ना ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले की क्षमा असावी काकासाहेब, आपली इच्छा नसेल तर आम्ही नक्कल करण्याचे काम करणार नाही.पण उगाचच त्यांना बोल लावू नका. त्यांनी असं आम्हाला काहीही सांगितले नाहीये." त्यावर विठोजी राजे म्हणाले," थांबा.जमत असेल तर करून बघा. पण तयार झाल्यावर आम्हाला अगोदर आणून दाखवा. आणि हां आम्ही काम करायला मनाई केली म्हणून वहिनी साहेबांना जाऊन सांगू नका. काय ?" शहाजी राजेंनी फक्त होकारार्थी मान डोलावली. विठोजी राजे तेथून निघाले खरे पण मार्गात जिजाबाईंची गाठ पडली. शहाजी राजे वरचा राग त्यांनी त्यांच्या वर काढला. त्यांना अजूनही वाटत होते की शहाजी राजेंचे कान जिजाबाईंनीच भरले असावेत. म्हणून ते त्यांना नको नको ते बोलले. म्हणजे आमच्या कारभारात लक्ष द्यायचे नाही, शहाजी राजे ना नको ते सल्ले द्यायचे नाहीत, लपून छपून काही करायचं नाही, जे काय करायचं ते उघड करायचं ?" गोदाताई च्या हातात तलवार पाहून विचारले की हे काय ?" त्यावर जिजाबाई
म्हणाल्या की, ते होय आमची तलवार , आम्ही सराव करायला निघालो आहोत." त्यावर विठोजी राजे म्हणाले," त्याची इथं काही गरज नाहीये. आमच्या इथं स्त्रिया हातात तलवार पकडत
नाहीत. त्यासाठी पुरुष सक्षम आहेत. नस्त्या उठाठेवी करायच्या नाहीत कळलं." जिजाबाई फार गोंधळून गेल्या. त्यांना कळत नव्हते की काकासाहेब आपल्यावर का बरं चिडले आहेत ते. नाही म्हणजे आपल्या कडून काही चुकलंय का ? हे जाऊन घेण्यासाठी त्यांनी हिम्मत करून विचारले की आमचं काही चुकलं का ?" त्यावर विठोजी राजे म्हणाले, नाही तुमचं नाही चुकलं. खरं सांगायचं तर आमचंच चुकलं. नाही म्हणजे तुमच्या आबा साहेबांची इच्छा नसताना केवळ बादशहा आणि वजीरे आलम मलिक अंबरच्या मध्यस्ती ने इथं आल्या आहात. आम्ही तुम्हाला इथं येऊ दिलं हेच आमचं चुकलं." असे बोलून चालते झाले. जिजाबाईंना प्रश्न पडला की पुढे जावे की मागे परतावे ? असा विचार करून पुढे जाण्यासाठी उचलले पाऊल त्यांनी मागे
घेतले. तेव्हा गोदाताईंनी त्यांना समजावले की , एकदा पुढे
उचलले पाऊल परत मागे घ्यायचे नसते. शिवाय गोमाजी
काकांनी सांगितलेले विसरले काय ?" असे विचारणा केली
असता जिजाबाईंना गोमाजी काकांचे वक्तव्य आठवले की
काही झाले तरी सराव हा झालाच पाहिजे. हा विचार मनात
येताच त्या सराव करू लागल्या. ते पाहून गोदाताईना फार
आनंद झाला. इतक्यात तेथे शहाजी आले नि त्यांनी ते पाहिले
तसे ते अत्यंत खुश झाले. शहाजी राजेंना पाहून त्यांनी सराव
थांबविला . त्यांना वाटले की काकासाहेब जसे ओरडले तसे
शहाजी राजे पण आपल्यावर रागवणार पण तसे काही घडले
नाही. उलट शहाजी राजे त्यांची प्रशंसा करत म्हणाले," सराव
चालू राहू द्या." तेव्हा जिजाबाई म्हणाल्या की, म्यान ने कसं लढता ते मला पाहायचे आहे." त्यावर शहाजी राजे म्हणाले ,
" आपण उद्याच सामना करू." ही गोष्ट हा हा म्हणता संपूर्ण वेरुळ गढीत पसरली. तेव्हा अनेकांनी त्या गोष्टीला आपला विरोध दर्शविला. इतकंच नाही तर ही गोष्ट जेव्हा उमा बाईना समजली. तेव्हा उमा बाईंनी जिजाबाईंना खूप समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या की , आपल्या स्वारी शी कुणी सामना करतो का ?" त्यावर जिजाऊनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. की मी सामना विषयी बोललेच नव्हते. मी फक्त म्यान ने कसे लढता ते मला दाखवा. असे मी म्हणाले होते. पण स्वारीच म्हणाले की उद्या आपला सामना होईल म्हणून." तेव्हा उमाबाईंनी शहाजी राजेंना ह्या संदर्भात विचारणा केली असता. शहाजी राजे म्हणाले," हा सामना नाहीच आहे मुळी ! परंतु लढून दाखवायचे म्हटले तर प्रतिस्पर्धी नको का ? म्हणून आम्ही जिजाबाईंना म्हटलं की आपल्या दोघांत सामना होऊ दे म्हणून. परंतु हा सामना नाही केवळ दोन वीरांची युद्ध कौशल्यता आहे. तेव्हा आपण चिंता करू नये." असे म्हणून तेथून चालते झाले.
विठोजी राज्याच्या पत्नी जाऊबाईंचा अगोदर ह्या सामन्याला
विरोध होता. म्हणजे त्यांचे मत होते की तलवार चालवणे हे
पुरुषांचे काम आहे, स्त्री चे नाही, आणि कोणतीही स्त्री आपल्या
पती समोर शस्त्र धरील काय वगैरे ... परंतु विठोजी राजे
सांगतात की चांगलेच आहे ना, जाधवांना पण कळू दे, भोसल्यांच्या तलवारीची ताकद ....त्यामुळे हा सामना व्हायला
हवा." तेव्हा त्यांच्या पत्नी जाऊबाई म्हणाल्या की, बघा, त्या
सिंदखेड वाल्यांनी आपल्या मुलीला मुला सारखे वाढविले आहे
नि आपली मुलं संभाजी राजे सोडले तर बाकी चे काही कामाचे
नाहीयेत.खा प्या नि मौज करा फक्त तेवढेच त्यांना येतं.आणि
दादासाहेबांची दोन्ही मुलं तलवार बाज आणि आता ह्या त्यांच्या
सूनबाई सुध्दा तलवार बाज !" त्यावर विठोजी राजे म्हणाले,
" ते आता कळेलच उद्याच्या सामन्यात."
दुसऱ्या दिवशी आधी ठरल्या प्रमाणे सामना झाला. सामना फार
रंगला. उमा बाईंच्या तर पोटात भीतीने गोळा उठला.काय होते
नि काय नाही ? विपरीत काही घडू नये. केवळ हीच अपेक्षा
होती. कुणी कल्पना देखील केली नसेल की जिजाबाई तलवार
चालवण्यात इतक्या तरबेज असतील. शेवटी सामना बरोबरीने
सुटला. तेव्हा कुठं उमाबाईच्या चेहऱ्यावर चे दडपण दूर झालं नि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. परंतु ज्यांना असं वाटत होतं की जिजाऊ हरतील त्यांचे स्वप्न मात्र भंग झाले. इतकंच नाही तर मुद पाक खाण्यात ही आपलं कौशल्य दाखवून दिलं. ते पाहून विठोजी राजेंच्या पत्नीचा अर्थात सोयरा बाईंचा जळफळाट झाला. त्या आपल्या सुनेला म्हणाल्या देखील ,
" शिका शिका जिजाबाई कडून काहीतरी ! तुमचं कशामध्ये ही कौशल्य नाहीये." त्यावर संभाजी राजेंच्या पत्नी म्हणाल्या,
" आम्हाला नाही आमच्या आऊ साहेबांनी असले काही शिकविले. आम्ही सेवेकरांची कामे करायला जन्माला नाही आलोत. आमच्या आऊ साहेब म्हणायच्या की भिकेचे डोहाळे लागले. त्यांनाच करू दे काय करायचे ते. आम्ही नाही करणार असंले काही !" असे बोलून फनकाऱ्याने त्या निघून गेल्या. तशा सोयराबाई उद्गारल्या की नवीन सूनबाई किती संस्कारी आणि आमच्या सूनबाई ह्या अश्या आपली सासूबाई काही रीतीचे सांगते आहे ते ऐकून घ्यावे हे देखील ह्यांना जमेना झालंय कसं
होणार ह्याचं ते देवच जाणो !"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा