छत्रपती शिवाजी महाराज १२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज १२ |
दुसऱ्या दिवशी वेरुळ कर मंडळी पुन्हा वेरुळ ला परतली.
त्यानंतर दोन्ही ठिकाणी लग्नाच्या जोरदार तयारीला सुरुवात
झाली. लखुजी जाधवाणी गोमाजी ला आदेश दिला की आपण
सारे दौलताबाद असू तेव्हा इथला बंदोबस्त काही विश्वासू
माणसावर सोपविण्यात आला. दाग दागिने कपडे लत्ते सर्वकाही
संदुकित भरले गेले.
पुढे
लखुजी जाधवाचे सारे कुटुंब रेणुका माते समोर एकवटले.
लखुजी जाधवाणी रेणुका मातेचा सांगणे केले की हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. त्यानंतर सर्व मंडळी दौलताबादला निघाले.
वेरुळ
उमाबाई शहाजी राजे ना काही महत्त्वाच्या गोष्टी समजवितात. तेव्हा प्रामुख्याने लग्न झाल्यानंतर तुमच्या काय
जबाबदाऱ्या आहेत त्या विषयी सांगताना त्या म्हणतात की
लग्न म्हणजे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे, तुमची भर्या ही आता तुमची जबाबदारी असणार आहे."
" पण त्या तर खूप मोठ्या आहेत. कुक्कुल बाळ नाहीत काही."
" हो मान्य पण त्या आपले घर सोडून तुमच्या कडे येणार आहेत त्या कोणाच्या विश्वासांवर केवळ आमच्या नव्हे तर तुमच्या विश्वासावर. तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे नि त्यांचा तुमच्यावर. कळलं ?"
" हो आऊसाहेब "
" त्या आता तुमच्या प्रत्येक बाबतीत आपला हक्क सांगणार आहेत.."
" प्रत्येक बाबतीत ..?" शहाजी राजेंनी प्रश्न केला.
" हो , पण तो हक्क असेल प्रेमाचा, नात्यांचा, आणि
विश्वासाचा आणि त्याच्या बरोबरीने मिळेल ते प्रेम सेवा आणि
त्यागाचे ते दान असते आणि ही देवाण घेवाण करणे म्हणजे लग्न करणे होय आणि विश्वासाचे बंध जर घट्ट असतील ना तर देवाण घेवाण आनंदाची वाटते. हे एक व्रत आहे आणि ते सुरूवातीच्या काळातच असते असे नाही, तर आयुष्यभरासाठी
असते. हे राहील ना लक्षात ?"
" एवढं कठीण आहे?"
" मानलं तर कठीण नाहीतर नाही. आता मला सांगा की
तलवारीच्या पात्याशी म्यानेने लढने सोपे का अवघड ?"
" ते मानण्यावर असते."
" हेच तर आम्ही लग्नाच्या बाबतीत म्हणालो. तुम्ही हे व्रत
मानलं ते सोपे नि मानलं तर कठीण ?"
" आम्हाला तर हे सारे अवघडच वाटतंय ?"
" आम्ही तुम्हाला मागे एकदा सांगितले होते ते आठवतेय
स्वतःच्या नजरेतून दुसऱ्याला पाहणे नि दुसऱ्याच्या नजरेतून
स्वतःला पाहणं ? ते तुम्हाला चांगलं जमलंय हो ना ?"
" हो आऊ साहेब."
" मग इथं ही तेच करायचंय हे व्रत तुम्हाला तेव्हाच सोपे जाईल जेव्हा तुम्ही जिजाबाईच्या नजरेतून तुम्ही स्वतःकडे पाहाल. मग तुम्हाला सर्वकाही सोपं जाईल." उमाबाई उद्गारल्या.
दुसऱ्या दिवशी सर्व कुटुंब शंभू महादेवाच्या द्वारी उभे राहून
देवाला साकड घालतात की शंभू महादेवा, आम्ही आज शुभ कार्यासाठी निघालो आहोत. तेव्हा आमचं कार्य निर्विघ्न पने पार पाडण्याची जबाबदारी आता तुझी आहे. अर्थात तू आमच्या पाठीशी उभा रहा. बोला हर हर महादेव ! चला आता निघायची तयारी करा."
लखुजी जाधव पूर्ण वरांती सह दौलताबादला निघून आले.
गोमाजीनी तिथं सर्व व्यवस्था व्यवस्थित केली होती. लखुजी राजे गोमाजीच्या काम करण्याच्या पद्धतीवर एकदम खुश झाले होते. तेवढ्यात कुणीतरी म्हणजे लखुजी जाधवांच्या पुत्रापैकीच कोणीतरी बोलला की आम्हाला फार भूका लागल्यात." तेव्हा गोमाजी म्हणाला की, जेवणे तयार आहेत. हात पाय धुवून पाटावर बसा. आणि जेवण करून घ्या." तसे सगळेजण तिकडेच निघाले. म्हाळसा बाई जिजाऊंना शोधत त्यांच्या शिबिरात आल्या. पाहतात तर काकी साहेबांच्या हातून जिजाबाई चक्क जेवत असतात. त्यांना तसं जेवताना पाहून त्या जिजाऊ कडे पाहत म्हणाल्या की, किती नशीबवान आहात तुम्ही रामराया सारख्या चार चार आऊ मिळाल्या आणि आता लग्न झाल्यानंतर अजून एका आऊ ची भर पडणार आहे , पण हां त्यांच्याकडे जेवण भरविण्याचा हट्ट कधी करायचा नाही ह " असे म्हणून त्या दोघीही हसल्या.
लखुजी राजे आपल्या धाकट्या भावाला नि गोमाजीला
विचारतात की , पाहुण्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली
आहे ना ?" तेव्हा ते दोघेही म्हणाले ," हो, सर्व तयारी झाली
आहे." तेव्हा लखुजी राजे हात जोडून म्हणाले की, रेणुका
माते आता सारा भार तुझ्यावरच आहे बरं का ?" असे म्हणून त्या दोघांकडे पाहत ते पुढे म्हणाले," आता थोड्याच वेळात वेरुळ कर मंडळी पोहोचतील इथं . बरं का ? त्यांच्या स्वागताची तयारी करा काहीच उणीव पडता कमा नये. परंतु कोणत्याही कार्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कमतरता असतेच. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. त्याचाच प्रत्यय वेरुळ करांच्या शिबिरात आला. म्हणजे झालं असं की शिबिरात मशाली लावण्यात थोडा उशीर शिबिरात अंधार दाटला होता. बस्स फक्त इतकंच निमित्त घडलं. संभाजी राजे मोठमोठ्याने ओरडू लागले. उमाजी नि दत्ताजी काय झालं म्हणून पळतच त्यांच्या शिबिरात आले. संभाजी नि दत्ताची या दोघांची नजरानजर झाली मात्र ते दोघेही एकमेकावर आग पाखडू लागले. कारण रंगपंचमीला दौलताबादला दोघांच्या मध्ये वाद झालेला होता. तो राग अजूनही दोघांच्या मनातून गेला नव्हता. म्हणूनच की काय दोघेही एकमेकावर चाल करून गेले नि एकमेकावर आरोप
पत्यारोप करू लागले होते. पण तेवढ्याच लखुजी राजे
नि विठोजी राजे तेथे पोहोचले नि संधर्ष टळला. त्या दोघांनीही आपापल्या पुत्रास मागे हटण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच दोघेही मागे हटले. परंतु एकमेका बद्दल मनात द्वेष ठेवूनच. लखुजी राजेनी आपल्या पुत्राला एका बाजूला नेऊन
चार समजूतदारच्या गोष्टी सांगितल्या. तसेच विठोजी राजे नि आपल्या पुत्रास समजूतदार पणाचा चार गोष्टी सांगितल्या. पण
स्वभावाला काय करणार ? त्या क्षणी ते ते दोघेही गप्प बसले.
परंतु एकमेकाबद्दलचा राग मनात ठेवूनच. त्यानंतर पुढील
कार्यक्रमाला सुरुवात झाली. हळदीच्या कार्यक्रमात ही थोडे
गालबोट लागलेच. म्हणजे झाले असे की संभाजी राजे उष्टी
हळद घेऊन चालले होते. नवरी कडे द्यायला. पण रस्त्यात
त्या दोघांची पुन्हा धडक बसली. संभाजी भयंकर चिडले.
परंतु गोमाजीनि वेळेचे महत्व ध्यानात ठेवून संभाजी राजेंची
क्षमा मागितली. त्यामुळे संघर्ष होता होता टळला. इकडे
हळदी चां कार्यक्रम उरकला. मात्र त्याच वेळी वजीरे आलम मीआण राजू च्या गटात मात्र खळबळ मांजळी म्हणजे इतके सारे प्रयत्न करून ही शेवटी जाधव आणि भोसल्याची सोयरिक झालीच. पण म्हणून काय ते स्वस्थ थोडीच बसणार होते. त्यांनी दुसरे कारस्थान रचले. त्यात काही जणांचे म्हणणे होते की वधू चे किंवा नवरदेवाचे अपहरण करावे. पण त्या गोष्टीस मीआण
राजू ने विरोध केला. कारण त्याला ठाऊक होते की असं केलं
तर जाधवांचा किंवा भोसल्यांचा रोष पत्करावा लागला असता
म्हणून मग लग्न रोखण्याचा दुसरा उपाय शोधून काढला. तो
उपाय म्हणजे भटजीचे अपहरण करावे. म्हणजे भटजीच
नसेल तर लग्न कसं होईल ? शिवाय हिंदू लोकामध्ये मुहूर्ताला
फार महत्व आहे. मुहूर्त चुकला नि लग्नाची वेळ टळून गेली तर लग्न होणार नाही. आणि दुसरा मुहूर्त शोधून काढे पर्यंत आपल्याला वेळ मिळेल. पुढील डाव खेळायला. मीआण राजू ला हा उपाय एकदम पसंद पडला नि त्यांनी त्या गोष्टीस आपली संमती दर्शविली. मग काय मीआण राजू ची माणसे शिबिरात गुपचूप पने शिरली नि भटजी ला पळविले. पण त्यात एक गडबड झाली आणि ती गडबड म्हणजे भटजीचे अपहरण करत असताना नेमके तिथे शरीफजी राजे आले. ते ओरड घालून सगळ्यांना सावध करतील म्हणूनच कि काय मागून एका ने त्यांच्या डोक्यावर वस्त्र टाकून त्यांना पकडले नि त्याला सुध्दा त्या भटजी सोबत घेऊन गेले आणि थोड्याच वेळात शरीफजी राजे नि भटजी गायब असल्याचे सर्वांना समजले. तशी शोधा शोध सुरू झाली. पण कुठेच त्यांचा त्याग पत्ता लागत नव्हता. त्यावरून निष्कर्ष काढण्यात आला की त्या दोघांचे अपहरण झाले असावे. तशी त्यांना कल्पना होतीच म्हणा हे कोणी केले असावे ? मग त्या नुसार सर्वत्र शोधा शोध सुरू झाली. शहाजी राजे स्वतः तलवार घेऊन आपल्या धाकट्या बंधू चां शोध करायला निघाले. परंतु घरच्या वडीलधारी मंडळीने त्यांची समजूत काढली की एकदा अंगाला
हळद लागल्या नंतर कोठेही बाहेर जायचं नसतं आणि आम्ही
सारी माणसे असताना तुम्ही चिंता कशाला करता वगैरे सांगून
त्यांना पुन्हा आपल्या मातोश्रीच्या दालनात पाठवून दिले.
मीआण राजूला कासिम खान ने खबर दिली की काम फत्ते
झाले. तेव्हा मीआण राजू एकदम खुश होऊन म्हणाला," तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला म्हणून जहागीर दिली जाईल.
पण तेवढ्यातच वनगोजी राव निंबाळकर तेथे पोहोचले. त्यांच्या
कानावर मीआण राजू चे शब्द पडले. ते ऐकून वनगोजी राव
उद्गारले की जिवंत राहाल तेव्हा ना ?" अशी गर्जना केली नि
त्या तिघावर ते तुटून पडले. एकेक करून वनगोजी राव
निंबाकरानी त्यांचा खात्मा केला नि शेवटी मीआण राजुच्या गळ्याला तलवारीची टोक लावून म्हणाले," बोल कुठं आहेत आमचे नातू आणि भटजी ? बऱ्या बोलाने सांग. नाहीतर ही तलवार तुझ्या गळ्या वरून फिरेल आरपार . असे म्हणताच त्याने आपला अपराध कबूल केला. परंतु त्या दोघांना कुठं बंधीस्थ करून ठेवले आहे ते माहित नाही. तेव्हा वनगोजी म्हणाले," जोपर्यंत माझा नातू मला सापडत नाही तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तर दुसरीकडे कासिम खान सगुणा बाईला भेटून सांगतो की लखुजी जाधवांच्या मुलीचा अर्थात जीजाचा बळी घे. " ती अगोदर नाहीच म्हणते. पण शेवटी तयार होते. सुरा घेऊन निघते तर दुसरी कडे वनगोजी आपल्या साथीदारांसह मीआण राजुच्या गुप्त स्थानावर पोहोचले. तिथं
मीआण राजू च्या माणसांशी झुंज दिली नि शेवटी भटजी आणि शरीफ जी राजे यांची सुटका केली. शरीफ जी राजे आपल्या आजोबांना येऊन बिलगले. त्याच वेळी सगुणा बाई योग्य संधीची वाट पाहत होती. परंतु जिजाबाई एकट्या नव्हत्या. त्यांच्या सोबत त्यांच्या काकी आऊ साहेब आणि गोदाताई असल्यामुळे त्यांना संधी मिळत नव्हती. परंतु स्वतः जिजाऊंनी त्यांना बाहेर काय चालले आहे ते पाहून यायला सांगितले. त्या बाहेर गेल्या. तश्या संधी साधून सगुणा बाईंनी जिजाऊंच्या वर पाठीमागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या पाळती वर असलेल्या मधल्या आऊ साहेबांनी तिचा हात पकडुन हतीतील सुरा हीचकावून घेतला नि त्यांच्या कांनशिलावर सटासट चपराक ठेवून दिल्या. नि मोठ्याने गर्जल्या की, " तुझी ही हिम्मत आम्ही जिवंत असताना तू आमच्या जिजाऊ वर हल्ला करतोस म्हणजे काय ?" त्यानंतर शिपाई ना बोलून सगुणा बाईला कैद करण्यात आले. इतक्यात वनगोजी राव निंबाळकर आपल्या नातवाला नि भटजी ना सुरक्षित पने घेऊन आले. विठोजी राजेंनी वनगोजीचे आभार मानले. तेव्हा जगदेव राव म्हणाले की, इथं सुध्दा मधल्या वहिनी साहेबांनी फार मोठा पराक्रम गाजविला. असे सांगून त्यांनी त्या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. एकीकडे नवरा मुलगा सजत असतो तर दुसरी कडे नवरी मुलगी सजत असते. अर्थात गोदाताई आणि काकी आऊसाहेब जिजाबाईना सजवित असतात. इतक्यात तिथं म्हाळसा बाई , मधल्या बाई नि धाकट्या बाई येतात. कपड्यांचा पसारा पाहून म्हाळसा बाई उद्गारल्या की काय हा असा पसारा आणि हा करून कोणी ठेवला आहे ?" तेव्हा धाकट्या बाई म्हणाल्या की, हे आमच्या सांगण्यावरून करण्यात आले. कारण विचारताच त्यांनी सांगितले की आता मनात इतकी भीती बसली आहे की ताक जरी प्यायचे झाले तरी फुंकून प्यावे लागणार, आणि खरे. सांगण्याचे कारण असे की कपड्या मध्ये विंचू वगैरे असला तर ? म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे." म्हाळसा बाईना पण ते योग्य वाटले. कारण घटनाच अश्या घडताहेत की कधी काय घडेल हे सांगणे कठीण म्हणून प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलणे जरुरीचे आहे, हीच जबाबदारी घेण्यात येत आहे.
नवरदेव शहाजी राजे यांना लग्न मंडपाच्या द्वारी येताच त्यांचे आरती ओवाळून स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांना उचलून मंडपात आणले जाते. त्यानंतर जिजाऊंना देखील वनगोजी अर्थात जीजांचे मामा त्यांना उचलून मंडपात आणतात. त्यानंतर लग्न विधीला प्रारंभ होतो. दोघांच्या मध्ये अंतरपाट धरला जातो. इतक्यात बादशहा हजरत आल्याची सूचना दिली जाते. तसे सर्वजण बादशहा आलेल्या दिशेकडे धाव घेतात. आणि बादशहा हजरतला मुजरा करतात. परंतु
हे शहाजी राजे नि जिजाबाई ना अजिबात आवडले नाही.
आम्हाला हा सलुक मंजूर नाही." असे शहाजी राजे उद्गारले.
" म्हणजे मी समजले नाही."
" आम्हाला सांगितले होते की वाजत्री वाजतील, अंतरपाट
दूर होईल, आणि मग आम्ही एकमेकांस वरमाला घालायची
पण बादशहा येताच सगळे तिकडे धावले ते आम्हाला मंजूर
नाही." तसे जिजाबाईंना मागील प्रसंग आठवला. त्या म्हणाल्या
होत्या की आपण हमेशा मुजरे करीच कारण आपल्याला बादशहा व्हायचेच नाही. त्या शहाजी राजे कडे पाहत म्हणाल्या की काय मंजूर नाहीये ?" तेव्हा शहाजी राजे म्हणाले की आपले लग्न आणि बादशहाची सरपराई." त्यावर जिजाबाई न समजून म्हणाल्या की, मघापासून हेच ऐकते की आपल्याला सलुक मंजूर नाही म्हणजे काय ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले की, तह कोंडीत फसले गेलेल्या माणसाची शरणागती म्हणजे सुलुक." त्यावर जिजाबाईंनी विचारले की, मग आमच्या कडे
पाहून का म्हणालेत ?" शहाजी राजे उद्गारले," तो सूलुक
वेगळा नि हा सुलूक वेगळा राजकारणातला हा सुलूक
लाचारीचा आहे, म्हणून तो आम्हाला मान्य नाही."
" तो आम्ही बदलू."
" आपलं ठरलं तर ! आपण सर्व बदलू."
" जी महाराज." जिजाबाई उद्गारल्या. वनगोजी निंबाळकरानी विचारले की काही त्रास तर झाला नाही ना ?"
" अजिबात नाही." बादशहा उद्गारला.आणि सर्वजण
वधू - वरा पाशी आले. आणि लग्न सोहळ्याला सुरुवात झाली.
मंगलाष्टके पूर्ण होताच अंतरपाट मधून हटला. त्यानंतर प्रथम
जिजाबाईंनी शहाजी राजेंच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर
शहाजी राजेंनी जिजाऊंच्या गळ्यात वरमाला घातली. त्यावेळी
बादशहा हजरत पायातील पादत्राणे काढून मंचकावर चढले.
त्यांच्या मागोमाग दोन शिपाई पण हातात जडजवाहीर ची तबके
घेऊन समोर घेऊनी उभे राहिले. तेव्हा जिजाबाई आणि शहाजी
राजे यांना त्या तबकावर हात ठेवण्यास सांगितले . तसा त्या
दोघांनी तबकावर हात ठेवला. त्यानंतर बादशहाच्या पायांना
स्पर्श करण्याचे वनगोजी राजे यांनी त्या दोघांना सांगितले.
त्या दोघांना ते मंजूर नव्हते. परंतु वडीलधाऱ्याचा मान ठेवणे
तितकेच महत्वाचे असल्याने दोघांनीही पण बादशहाचे
चरणस्पर्श केले. त्या दोघांना बादशहा ने आशीर्वाद दिला नि
आमिन म्हणून तेथून जायला निघाले. ते गेल्यावर शहाजी राजे
म्हणाले की, हे आम्ही विसरणार नाही." तेव्हा वनगोजी राजेंनी
न समजून विचारले," काय ते ?" तेव्हा जिजाबाईंनी
विचारले की बदशहाचे चरण स्पर्श करायला आम्हाला का
सांगितले गेले ?" तेव्हा वनगोजी म्हणाले," मोठ्या माणसांचा
माण ठेवायचा असतो. शिवाय बादशहा आपले अतिथी होते
आम्ही नाही का त्यांना अभिवादन केले."
" पण आम्हाला नाही आवडले ते." जिजाबाई उद्गारल्या.
तेवढ्यात धाकट्या आऊ साहेब विषयांतर करत म्हणाल्या की
बरं बरं आता पुढच्या विधी साठी वस्त्र बदला पाहू ." तश्या जिजाबाई मागे वळून पाहत शहाजी राजेंना म्हणाल्या की, आता तुम्ही सुद्धा वस्त्र बदलून या." दोघेही गेले नि वस्त्र बदलून आले
नि पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. कन्यादान कार्यक्रम
उरकल्यावर सप्तपदी ला सुरुवात झाली. सप्तपदी झाल्यानंतर
सर्व वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडणे वगैरे कार्यक्रम सुरू
झाला. सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर मीआण राजू ने डाव
साधलाच. विठोजी राजेंच्या एका बाजूला घेतले. तेव्हा विठोजी
राजे संतापले. आम्ही जर आमच्या मुलखात असतो तर तुम्हाला
दाखवून दिलं असतं. परंतु मीआण राजू त्यांच्या समोर असा
काही कांगावा केला की आम्ही तुमचे शत्रू नाही तर हितचिंतक
आहोत.आणि त्या गोड बोलण्या मध्ये विठोजी राजे पुरते फसले. त्याने लखुजी राजे नि निंबाळकर विरुध्द कान भरले. महाभारतचे उदाहरण दिले की पांडू महाराज नंतर परिस्थिती तिचं राहिली काय ? पांडव आणि कौरव एक झाले का ? नाही ना ? तसेच तुम्हाला एकाकी पाडले गेले. मलिक अंबर ने तुमच्या बरोबरीने शहाजी राजेंना मनसबदारी द्यायला लावली. त्यावर काय ते समजा आम्ही आपल्या हिताचा विचार करून हे सर्व केले. पण तुम्हाला पटत नसेल तर जाऊ दे. कालांतराने तुम्हाला कळेलच की आम्ही सांगत होतो ते कुणाच्या भल्यासाठी ! " असे म्हणताच विठोजी राजेंच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले आणि ते स्वतःशीच बोलले की आम्ही असं होऊ देणार नाही म्हणून. मध्ये रत्यात मलिक अंबर भेटला त्यांनी सांगितले की आम्हाला देखील पाहुण्याचे स्वागत करण्याची संधी द्या.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा