षड्यंत्र २९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र २९ |
" पोलिस शोधताहेत ना, शोधू दे त्यांना. तू इथच रहा.कारण
मालकांनी मला तशी ऑर्डर दिली आहे.चल आंत हो मला
बाहेरून दरवाजा बंद करायचा आहे." असे म्हणून त्याने प्रेम
ला जबरदस्तीने आंत ढकलून दिले नि बाहेरून दरवाजा बंद
करून घेतला.
पूढ़े
बाबुराव तुरुंगात सुंदर रावांना भेटायला गेला आणि घडलेली
सविस्तर माहिती त्यांना दिली तेव्हा सुंदर राव म्हणाले की,
" म्हणजे माधवी चे तू अपहरण केले नाहीस ?"
" नाही साहेब, माझ्या अगोदर दुसऱ्या कुणी पोहोचला तिथं
आणि त्याने तिचे अपहरण केले."
" म्हणजे चोरावर मोर निघाला म्हण की !"
" हो तसेच काहीसे.पण आता पुढे काय करायचे ?"
" पुढे काय माधवरावा चां गेम करायचा. दुसरा काही पर्याय
नाही आपल्या कडे."
" पण मालकीण बाई आणि प्रेम बाबू त्यांच्या कैदेत आहेत
त्यांची सुटका केल्या शिवाय काय करू शकतो आपण ?"
" तू एक काम कर, त्याचा एक खास माणूस आहे,चंदन
त्याच्या वर पाळत ठेव.तेव्हाच त्याचा अड्डा सापडेल."
" ठीक आहे , येतो मी !" असे म्हणून बाबुराव तेथून निघाला.
माधवी बंद खोलीत राहून कंटाळली होती. पण करणार
काय इलाज नव्हता. पण तिच्या मनात एक विचार आला की
जर आपले पप्पा पोलिसांकडे गेले तर आपण केलेल्या फोन
नंबर वरून पोलीस नक्कीच पोहोचतील इथं नि मग आपली
सुटका करतील. तोपर्यंत वाट पहावी. तेवढ्यातच दरवाजा
उघडला नि तोंडावर मास्क लावलेला व्यक्ती आंत आला नि
मला म्हणाला," चल, पोलीस इथं पोहोचण्या अगोदर आपल्याला इथून दुसरीकडे जायला हवे आहे,चल लवकर."
असे म्हणून त्याने तिचा हात पकडला नि तिला ओढतच
बाहेर घेऊन गेला. बाहेर एक मोटार उभी होती त्यात मला
बसविले. त्यानंतर मोटार निघाली. आणि थोड्याच वेळात
जंगल संपले नि हायवे सुरू झाला. परंतु रस्ता अनोळखी
असल्याने ते लोक मला कोठे घेऊन चालले आहेत हे काही
कळेना. एक तास मोटार चालल्या नंतर ते एका गुप्त स्थानावर
घेऊन आले. तिथं त्या दोघांनी मला बंद करून ठेवले. तेव्हा
मी त्याला गयावया करत म्हंटले की, " तू माझ्यावर प्रेम करतोस ना ? मग आपल्या प्रेयसी ला असं कोणी बंद खोलीत बंद करून ठेवतो का ?" त्यावर तो म्हणाला ," जोपर्यंत तू माझ्याशी लग्न करण्यास होकार देत नाहीस, तोपर्यंत तुला
असेच बंद खोलीतच राहावे लागेल."
" तुला काय वाटतं माझे पप्पा तुला शोधून काढणार नाहीत ?"
" जेव्हा काढतील तेव्हा तू माझी झालेली असशील."
" हे तू कशावरून सांगतोयस ?"
" अनुभवातून."
" म्हणजे या पूर्वी पण तू असं केले आहेस ?"
" मी नाही केलं गं ?"
" मग ?"
" माझ्या एका मित्राने!"
" म्हणजे तुम्हां लोकांचा हा धंदाच आहे तर !"
" धंदा नाही ग आम्ही फक्त आमचं प्रेम मिळवीत असतो."
" असं जबरदस्तीने ?" असे बोलून तो चालता झाला.
" पर्याय नसल्यावर दुसरे काय करणार ?"
" प्रेम जबरदस्तीने केल्याने होत नाही."
" जे मागून मिळत नाही ते असे जबरदस्तीने मिळवावे
लागते."
" चुकीचे आहे हे."
" असेल ही चुकीचे.परंतु प्रेम आणि युद्धामध्ये सर्वकाही
क्षम्य असते . नाही का ?" माधवी ला प्रश्न पडला की कोण
आहे हा ? आणि मी ह्याला ओळखत कसे नाहीये. काय करू
कसे सुटू ह्याच्या तावडीतून? किंचित विचारमग्न झाली. क्षणभर
वेळानंतर तिला एक युक्ती सुचली की खोटे खोटे ह्याच्याशी
प्रेमाचे नाटक करावे ? तरच इथून सुटका होईल.हो असेच करते."
चंदन विचार करू लागला की प्रेम तर इथं आहे तर आपल्या
साहेबांच्या मुलीचे कोणी अपहरण केले असावे बरे ? साहेबांचा
कोणी जुना शत्रू तर नाहीये. छे छे छे ! असं कसं होईल आपण
साहेंबा सोबत अनेक वर्षे आहोत साहेबांचा कोणी वैरी असता
तर आपल्या माहित नसता का ? हा कोणीतरी नवीन शत्रू आहे,
पण कोण ? राजकारणात अनेक शत्रू बनतात त्यापैकी कुणीतरी असावा ?पण कळणार कसं ? कोण आहे तो ?"
असा विचार चंदनच्या मनात सुरू असतानाच त्याला माधवरावां
चां फोन आला त्याने लगेच रिसिव्ह करीत म्हंटले,"हुकूम करा
मालक ? " त्यावर माधवराव म्हणाले," बंद करून साऱ्यांना
आणि त्या साऱ्यावर करडी नजर ठेव. तोपर्यंत मी पोलीस
स्टेशनला जाऊन येतो." असे म्हणून माधवरावांनी फोन कट
केला नि आपली मोटार पोलीस स्टेशनला घ्यायला सांगितली.
पोलिस स्टेशनला आल्यावर त्यांनी पोलिसांना सविस्तर माहिती
दिली की काही वेळापूर्वी अपहरण कर्त्याचा फोन आला होता
मला. परंतु रागाच्या भरात मी मोबाईल तोडला. त्यामुळं कोणत्या नंबर वरून मला फोन आला होता हे कसे कळणार ?"
तेव्हा इन्स्पेक्टर तानाजी म्हणाले," परंतु तुमचे सिमकार्ड तर
तुमच्या कडे असेल ना ?"
" हो आहे, पण त्याने काय होणार ?"
" त्या नंबर वर तुम्हाला कोण कोणत्या क्रमांकावरून फोन
आले होते ते कळेल. त्यावरून त्या क्रमांकाचा शोध लावू ?"
" परंतु त्यात माझे काही गोपनीय नंबर सुध्दा आहेत."
" असू देत.आम्हाला तुमच्या गोपनीय नंबर शी काही देणे
घेणे नाही. आम्हाला फक्त शेवटचा कॉल कोणत्या क्रमांक वरून
आला होता तेवढे कळले म्हणजे पुरे !" माधवराव सिमकार्ड
पोलिसांना द्यायला तयार नव्हते. परंतु त्यांची पत्नी त्यांच्या
वर रागवत म्हणाली," तुम्हाला तुमच्या मुली पेक्षा ते नंबर
अधिक आहेत का ?" तेव्हा नाईलाजाने त्यांनी आपले
सिमकार्ड पोलिसांना दिले. ते सिमकार्ड कॉन्स्टेबल शिंदे जवळ
देत इन्स्पेक्टर तानाजी म्हणाले," शिंदे हे सिमकार्ड घेऊन सिमकार्ड कंपनीत जा नि ह्या नंबरचे सर्व कॉल डिटेल्स घेऊन या." कॉन्स्टेबल तो नंबर घेऊन सिमकार्ड कंपनीत गेले नि त्या नंबरचे सारे डिटेल्स घेऊन आले.लोकेशन वरून पोलिसांच्या ध्यानात आले की माधवी ला कोणत्या ठिकाणी kidnap करून ठेवले आहे. इन्स्पेक्टर तानाजी एक पोलीस पथक घेऊन तेथे पोहोचले जिथून माधवरावांना कॉल आला होता. ती एक बंद कंपनी होती कित्येक वर्षापासून ती बंद आहे, पण तिथे कोणीच सापडले नाही कारण पोलीस येण्या अगोदरच अपहरण कर्त्याने ती जागा बदलली होती. आता तो तिला कोठे घेऊन गेला असेल ते सांगणे कठीण होते. पोलिसांनी नीट तपासून पाहिले काही पुरावा मागे सोडला आहे का ? पण नाही.निराश मनाने पोलीस माघारी परतली.
चंदन जिथं जिथं मिळण्याची शक्यता होती तिथं तिथं बाबुराव
ने जाऊन चौकशी केली; परंतु सर्वांकडून एकच उत्तर मिळालं
की बरेच दिवस झाले चंदन इकडे फिरकला नाही. याचा अर्थ
चंदन त्याच गुप्त स्थानावर असेल जिथं मालकीण बाई आणि प्रेम आहे, मग हे गुप्त स्थान माहित कसे पडेल ? त्यासाठी
एकच उपाय आणि तो म्हणजे त्याच्या घराच्याना आपल्या
ताब्यात घ्यायला हवे. नाक दाबले म्हणजे तोंड आपोआपच
उघडेल. असा विचार करून तो काही गुंडांना सोबत घेऊन
सरळ चंदन च्या घरी गेला नि त्याच्या बहिणीला नि आईला
विचारले की, चंदन कुठं आहे सांगा." त्यावर त्याची आई
म्हणाली," तो कुठं जातोय ते काय आम्हाला सांगून जातोय."
" पण फोन तर करत असेल ना ?"
" कधी करतो तर कधी करत ही नाही."
" मग मला सांगा किती दिवसापासून तो घरात नाहीये."
" झाले दोन दिवस."
" मग दोन दिवसात एकदा पण फोन केला नाही का त्याने ?"
" नाही ना ?" चंदन ची बहिण चंद्रिका म्हणाली.
" मग चला माझ्या सोबत."
" कुठं ?"
" मी घेऊन जाईन तिथं."
" पण का आम्हाला तू घेऊन जात आहेस ?"
" कारण तुझ्या भावाने माझ्या मालकीण बाईला आणि
छोट्या मालकांना kidnap केलय. म्हणून मी तुम्हां दोघींना
Kidnap करत आहे."
" पण आम्हाला का म्हणून."
" त्या शिवाय तुझ्या भावाचा पत्ता मिळणार नाही."
तश्या त्या दोघीही घाबरल्या. चंदन ची आई म्हणाली,
" आम्हाला kidnap करू नकोस मी सांगते तो कुठं असेल
तो."
" मघाशी तर नाही म्हणाला होता. पण ठीक आहे, सांगा
लवकर." असे म्हंटल्यावर चंदनाच्या आई ने चंदन ला फोन
लावला.पण चंदन ची आई फोन वर बोलण्याच्या अगोदरच
बाबुराव ने मोबाईल तिच्या हातून काढून घेतला. आणि कानाला
लावला तसा पलिकडून चंदन चा आवाज आला, हां बोल आई !" तसा बाबुराव बोलला," आई, नाही तुझा बाप बाबुराव
बोलतोय ?" तसे त्याने विचारले," बाबुराव तू माझ्या घरी
काय करतो आहेस ?" बाबुराव उद्गारला," सांगतो, पण त्या
आधी मला हे सांग, आमची मालकीण आणि छोटे मालक
कोठे आहेत."
" सुखरूप आहे."
" मग एक काम कर, त्यांना घेऊन इथं ये, मी तुझी वाट
पाहतोय.अर्थात तुला तुझी आई नि बहिण सुखरूप हवी असेल तर ! कळले ना मला काय म्हणायचे आहे ते." तसा चंदन
म्हणाला," बाबुराव माझ्या आई आणि बहिणीला काही करू
नकोस.मी घेऊन येतो त्या दोघांना."
" नाही करणार काही, परंतु दगाबाजी केलीस तर मात्र
सांगू शकत नाही त्या दोघींचे काय होईल ते."
" मी आता येतो घेऊन त्या तिघांना." असे म्हणून चंदन
दरवाजा उघडून आंत जातो, परंतु आंत मध्ये कुणीच नसते.
अरे, बाहेरून दरवाजा बंद असताना हे तिघेही गेले कुठं ?
असा विचार करत असताना त्याचे समोरच्या खिडकीवर लक्ष
गेले.तो पळतच खिडकी जवळ गेला पाहतो तर काय खिडकीच्या काचा काढल्या त्याला दिसल्या. ह्याचा अर्थ ते
दोघेही इथून पळाले. तो लगेच बाहेर धावत आला नि आपल्या
साथीदारांना म्हणाला," अरे ते तिघेही पळाले.पकडा त्यांना."
तसे त्याचे साथीदार त्या दोघांना शोधत सुटले. पण प्रेम, लीला आणि मधुरा बाई खूप दूरवर पळत आले होते. पण मधुरा बाई पळून पळून थकल्या. लीला प्रेग्नेंट असल्याने तिला ही फार
थकवा आला होता. ती म्हणाली," प्रेम आता अजिबात पळू
शकणार नाही." तश्या त्या म्हणाल्या," प्रेम बाळा मी देखील
पळून पळून फार थकले रे, थोडी विश्रांती घेऊ या."
" अग आई, एवढ्यात त्याला कळले पण असेल की आपण पळालो ते. त्याचे ते गुंड आपल्याला शोधत इथपर्यंत येऊन
पोहोचतील."
" अरे, पण माझ्या पायात अजिबातच त्राण नाही रे, किती
पळणार मी या वयात."
" बरं ठीक आहे .थोडी विश्रांती घेऊ नि मग पळू." म्हणून
थोड्या वेळ विश्रांती साठी एका दगडावर बसले.पण तेवढ्यात
चंदन चे साथीदार तिथपर्यंत येऊन पोहोचले. पळण्याचा प्रयत्न
करत असताना त्या लोकांनी त्या तिघांना घेरले. मग ठरविले
की आता ह्यांच्या शी लढायचेच.असा विचार करून त्यांच्याशी
मारामारी सुरू केली.पण एकटा किती जनाशी टक्कर घेणार.
शेवटी त्या तिघांना ही पकडकेच. तेवढ्यात तिथं चंदन मोटार
घेऊन तेथे आला. त्या तिघांना मोटारीत घालून आपल्या घरी
आणले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा