बेवफा ६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ६ |
" निर्णय चुकला खरा, पण या पुढे तो सुधारायचा मी प्रयत्न करीन. अर्थात प्रकाश ला मी आपलासा करण्याचा प्रयत्न अवश्य करीन." सुरभी असं मुद्दाम म्हणाली. कारण
तिला माहीत होतं प्रकाश चं दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू
आहे ते. आणि तिला पण त्याच्याशी कुठं संसार करायचा
आहे,माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे माझं ऋषी ! मी दुसऱ्या कोणाची होऊ इच्छित नाही. परंतु ती हे ऋषी ला सांगू शकत नव्हती , म्हणून ती तशी बोलली.
" मग मीही प्रयत्न जरूर करीन. प्राची ला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा "
" व्हेरी गुड ! मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून."
आता इथून पुढे
असे त्याने सुरभी ला आश्वासन दिलं खरं , पण त्याच्या
मनात एकच विचार घोळत होता की प्रकाश सुरभी च्या
भावनांशी खेळत आहे, त्याचं अफेर दुसऱ्या कुण्या मुलाशी आहे, पण हे सुरभी ला का कळत नाहीये. अचानक त्याच्या मनात एक विचार आला की, असं तर
नाही ना ? सुरभी ने केवळ माझा प्राण वाचविण्यासाठी
प्रकाश शी लग्न केलं असेल. हो असेच आहे, म्हणून तर
तिच्या नवऱ्याचे अफेर दुसरीकडे सुरू असतानाही ती
त्याच्या सोबत राहू इच्छित आहे ? नक्कीच आपल्यासाठी तिने ही तडजोड केली असावी. बाकी तिचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. हो असेच आहे. आपण मात्र तिला बेवफा समजत होतो, परंतु बेवफा ती नाही तर आपण आहोत. आपण फक्त आपलाच विचार केला. तिची मनस्थिती काय असेल याचा कधी विचारच केला नाही. इतके कसे आपण कृतज्ञ असू शकतो ? छे छे छे हे आपण काय करून बसलो ? खरं तर आपण एक माणूस म्हणहून घेण्याच्या लायकच नाहीये. पण आता आपण प्राची ला स्पष्ट शब्दात सांगूनच टाकू की तुला हवं असलेले प्रेम मी देऊ शकत नाही. कारण त्या प्रेमावर केवळ सुरभीचाच अधिकार आहे. आम्हां दोघांना लग्न करता आलं नाही म्हणून काय झालं ? आमचं एकमेकांवर प्रेम तर आहे, आणि ते करत राहायला आम्हां दोघांना कोणीही रोखू शकत नाही आणि शकणार नाहीये परंतु प्रश्न असा आहे
की प्राची ला आपण ह्याचे कारण काय सांगणार , ते
कळत नाहीये. तसे आपण तिला आश्वासन दिलं आहे की
आपले पहिले प्रेम विसरण्यासाठी मला थोडा अवधी
हवाय म्हणून. कारण पण पहिले प्रेम विसरणं इतकं सोपे का आहे ? छे छे छे ! आता तर ते अजिबात शक्य नाहीये. आपण उगाचच प्राचीशी लग्न केलं. इतक्यात ऋषी च्या
मनात एक विचार येऊन गेला की जशी आपली गर्लफ्रेंड
प्राची आहे , तसा प्राची चा पण एखादा बॉयफ्रेंड असू शकतो ना ? शक्यता नाकारता येत नाही. कारण आजकाल फँशनच झाली आहे. प्रत्येक तरुणीचा बॉयफ्रेंड आणि तरुणांचा गर्लफ्रेंड असतोच मुळी ! क्वचितच एखादा तरुण अथवा तरुणी सापडेल की त्यांचा कुणी बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड नसेल. आता प्राची चा बॉयफ्रेंड आहे की नाही ते माहीत नाही म्हणा. पण आपण विचारू तर शकतो ना तिला ? मग विचारायचं का तिला ? छे छे छे ! तिचा कुणी बॉयफ्रेंड नसला तर तिला राग पण येऊ शकतो. पण त्यात राग येण्यासारखे काय आहे ? येस किंवा नो मध्येच तर उत्तर द्यायचं आहे. जर तिचा बॉयफ्रेंड असलाच तर आपण तिला फुल परवानगी देऊ की बिनधास्त आपल्या बॉयफ्रेंडला भेटू शकतेस म्हणून. पण आपण असं केलं तर आपल्या घरच्यांना आवडेल का ते ? कारण आपले आई-वडील म्हणजे एकदम जुनाट विचारांचे आहेत त्यांना कदाचित हे पटणातर ही नाही.
मग काय करू ? प्रयत्न करायचा का नाही ? प्रयत्न
करायला काय हरकत आहे ? झालं तर झालं नाहीतर
नाही त्यात घाबरायचं काय कारण आहे ?" असा विचार
करीतच घरी पोहोचलो. घरी पोहोचताच आई ने मला
विचारले की , काय रे, आज घरी यायला इतका उशीर
का केलास ? कारण तुझं ऑफिस तर साडे पाच वाजता
सुटते ना ?" आई ने एकदम अचूक प्रश्न केला. तेव्हा
मी म्हटलं," हो , बरोबर आहे तुझं म्हणणं मी साडे पाच
वाजताच सुटतो कामावरुन , पण आज जरा जास्त काम
होते म्हणून बसलो काम करत, का ? काय झालं ?"
" काय झालं म्हणून काय विचारतोस, तुझे सासू-सासरे आले आहेत ?" तसा तो मनात म्हणाला," अरे
बाप रे, आता तिने आपल्या आई-वडिलांना काय सांगितले असेल आपल्या बद्दल ते देवच जाणे !" असे
मनात बोलून त्याने स्पष्टपणे विचारले," कधी आलेत ?"
" आज दुपारी !"
" ते लोक दुपारी ,आणि तू मला आता सांगतेस ?"
" तूच म्हणाला होतास ना, माझ्या ऑफिस मध्ये विना
कारण फोन करायचा नाही म्हणून."
" अगं विना कारण म्हणजे उगाचच नाही करायचा."
" उगाचच करायला वेड लागलंय का कुणाला ?" असं
आई ने म्हटल्यामुळे त्याच्या द्यानात आले की उगाचच
आईशी हुज्जत घालण्यात अर्थ नाही, असा विचार करून
तो शरणागती पत्कारत म्हणाला," आय एम रियली सॉरी
आई ! चुकलं माझं." तेव्हा त्याची आई त्रासून म्हणाली,
" हां ठीक आहे ठीक आहे, जा लवकर , बायको
कधीची वाट पाहतेय तुझी !" बायको म्हणजे प्राची
माझी वाट पाहतेय ही तर माझ्यासाठी दुसरी शाँकीग न्यूज होती , परंतु मी तसे न दाखविता म्हणालो, " कुठं आहे ती प्राची ?" खरं प्राची चा मला राग आला होता. तो यासाठी
की भले आई ने मला फोन करून नाही सांगितले पण
प्राची तर सांगू शकत होती ना, मला की माझे म्हणजे
तिचे आई-वडील आले म्हणून. पण नाही महाराणी ला
तेवढा पण वेळ नाही, किंवा मुद्दाम केले असेल हे तिने.
आता जाऊन विचारतोच मी तिला , असा विचार माझ्या
मनात सुरू असतानाच आई ने मला विचारले की अरे आता विचार कसला करतोस , जा ना तिच्याच खोलीत असेल ना ती." त्यावर मी एकदम खजिल झाल्यागत तेथून निघालो. खरं तर माझा प्रश्न चुकीचा होता. मी अडाणी माणसावाणी प्रश्न केला खरं तर हे चुकलंच माझं. पण आता काय करणार ? चुकलं तर चुकलं म्हणायलाच हवं ना ? म्हणून मी देखील म्हटलं की बा चुकलं माझं. खरं तर मला असा प्रश्न नको विचारायला हवा होता. पण विचारला. त्याबद्दल सॉरी !"
" अरे , आता सॉरी किती वेळा बोलशील ? जा लवकर
तिला जास्त वाट पाहायला लाऊस नकोस ?" आई असं काही सांगत होती, जणू आईला तिच्या मनात काय आहे ते कळलं होतं , पण माझ्या मनाला प्रश्न मात्र पडला की
खरंच प्राची माझी वाट पाहत असेल का ? तिचे
आई-वडील आले आहेत, त्याना आमच्या रिलेशनशिप
बद्दल काही कळू नये म्हणून असेल कदाचित. हो हेच
कारण असेल. किंवा असे ही असेल की तिला वाटलं असावं की कधी ना कधी आपले संबंध सुधारतील म्हणून.
कारण आपण तसे तिला अगोदरच सांगितले होते ना, की मला थोडा वेळ दे म्हणून , कारण पाहिलं प्रेम इतक्या
सहजासहजी विसरणं शक्य नाही ना ? आणि आता तर
ते अजिबात शक्य नाहीये. कारण आपली सुरभी सुखात
नाहीये तिथं. ती जर दिल्या घरी सुखी असती तर कदाचित
आपण प्राची ला आपली बनवायला राजी झालो ही असतो पण आता ते शक्य नाहीये." असा विचार करतच
मी माझ्या बेडरूम मध्ये शिरलो , प्राची खरोखरच सजून
धजून बसली होती. मला तर एकदम शॉक लागल्यागत
झालं. अशी कशी ही तयार होऊन बसली ? आणि कोणी
सांगितले हिला तयार होऊन बसायला ? असा माझ्या
मनात एक विचार येऊन गेला. मी तिला विचारणारच
होतो, तेवढ्यात प्राची च म्हणाली," आलांत तुम्ही , मी तुमचीच वाट पाहत होते." खरं तर मला तिचा फार राग आला. तिने आपले आई-वडील आपल्या घरी आल्याचे
न सांगितल्या बद्दल. पण लगेच मनात दुसरा विचार आला
की त्यात तिची काय चुकी आहे ? नाही म्हणजे आपणच
नाही का तिला बजावून सांगितले होते की मी ऑफिस
मध्ये असताना मला फोन करायचा नाही म्हणून. मग तिचं काय चुकलं. पण तरीही तिचे आई-वडील आल्याचे तिने
सांगायला हवं होतं. म्हणजे मी आदर्श जावई प्रमाणे
लवकर घरी आलो असतो ना, आता ते दोघेही माझ्या
बद्दल काय विचार करत असतील. तेव्हा तिच्यावर थोडं
रागवायलाच पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळी अशी चूक
होणार नाही. पण मनात होतं पण विचारलं मात्र दुसरंच
मी तिला विचारले की, काय गं कुणी येणार आहे
का आपल्या कडे ? नाही म्हणजे तू आज सजून धजून
तयार होऊन बसली आहेस म्हणून म्हटलं. " मी शक्य तितके स्वतःवर नियंत्रण ठेवून विचारले. त्यावर ती खुश होत म्हणाली," अय्या ss तुम्ही कसं ओळखले ?" असं म्हटल्यामुळे मला अजूनच गोधंळल्या सारखे नाटक
केले. मी विचारणारच होतो तिला तेवढ्यात ती स्वतःच मला म्हणाली," आई-बाबा आले आहेत." ते ऐकून मी एकदम घाबरून म्हटलं ," काय ? खरंच आई-बाबा आले आहेत?"
" हो तुम्हांला नाही माहीत?" असं पटकन बोलून
गेली पण लगेच तिच्या द्यानात आले तशी ती ओशाळून
म्हणाली," सॉरी! तुम्हाला कसं माहीत असणार ना ? तुम्ही
तर कामावर गेले होते नाही का ?" त्यावर ऋषी म्हणाला,
" मग हे सांगायचं काम कोणाचं होतं ?"
" अर्थात माझंच काम होतं ते , पण तुम्ही मनाई केली
होती ना, ऑफिस मध्ये फोन करायला , म्हणून नाही केला. सॉरी !" आता पुढं काय बोलणार सॉरी म्हटलं की
सगळं संपलंच की असं मी मनात म्हणून तिला म्हटलं की,
" बरं ते जाऊ दे, ते दोघेही आहेत कुठं ?"
" ते आत्ताच कुठं तरी बाहेर गेले आहेत, त्यांचा कोणीतरी मित्र राहतोय म्हणे इथं . आलोच आहोत तर
त्याच्यापाशी पण जाऊन येतो असे ते म्हणाले."
" बरं मला हे सांग ,आपल्या रिलेशनशिप बद्दल त्याना
काही सांगितले नाहीस ना ?"
" ते कसं सांगेन , इतकी का मूर्ख आहे मी ?"
" तसं नाही रागाच्या भरात सगळं सांगून टाकलं तर !"
" रागाच्या भरात ....मी कुठं रागावली होती तुमच्यावर !"
" सकाळी नाही का मी उगाचच चिडलो होतो तुझ्यावर ,
म्हणून मला वाटलं की तू माझ्यावर रागवली असणार,
आणि म्हणूनच आपल्या आई-वडिलांना बोलवून घेतलं
असणार , असं आपलं मला वाटलं."
" छे छे छे , एवढ्या क्षुल्लकशा गोष्टींवरून रागवत
नसते मी कधी ! आणि तसं पण पती-पत्नी मध्ये अश्या छोट्या मोठ्या घटना घडतच असतात. मग काय गोष्टींवरून भांडत बसायचं असतं."
" हो बरोबर आहे तुझं. मीच नको तो विचार करत होतो."
" ते सोडा, आणि मी काय सांगते ते नीट ऐका."
" काय सांगू इच्छित आहेस ?"
" आपल्या दोघांमध्ये वैवाहिक संबंध कसे आहेत हे माझ्या आई-वडिलांना अजिबात कळता कामा नये. म्हणून नाटक समजा हवं तर , पण ते दोघेही इथं असेपर्यंत तरी आपण दोघेही पती-पत्नी सारखे वागू या, म्हणून तुम्ही मला आता कुठं तरी बाहेर घेऊन चला. म्हणजे त्यांना वाटेल की आम्ही दोघेही फार खुश आहोत नि पूर्ण एन्जॉय करतोय."
" पण त्यासाठी बाहेर जाण्याची काय गरज आहे ?"
" कारण त्यांना कोणाकडून तरी असं समजलं आहे की
आपल्या दोघांमध्ये पती पत्नी सारखे नाते नाहीये."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा