Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

बेवफा १०

बेवफा १०
बेवफा १०

 



   " अगं मग एक फोन तरी करायचा होतास, मी किती
घाबरले होते काय झालं नि काय नाही."
   " चुकलं खरं आमचं. पण खरं सांगू मला काही सुचेनासे
झालं होतं बघ. म्हणून तुला फोन करायचे विसरून गेले."

    पुढे

     मग मॉम ला एकदम आपल्या जावयाची आठवण आली
तसे तिने विचारले," काय गं तू एकटीच आली ती ? नाही म्हणजे जावई सोबत आले नाहीत म्हणून म्हटलं." तेव्हा मी मनात म्हटलं की, मॉम आता तुला मी कसं सांगू की तुझ्या जावयाचे माझ्यावर नाही तर दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू आहे. खरं तर मी त्या दोघांच्या मध्ये भिंत म्हणून उभी आहे, काही करून मला त्या दोघांच्या जीवनापासून दूर जायला हवं. अर्थात मला ऋषी सोबत घटस्फोट घ्यावा लागणार. परंतु हे तुला कसं सांगू ? कारण तुम्हा दोघांना दुःख तर होणारच आहे, आम्हा दोघी बहिणीच्या नशिबी असं का आलं ? काही कळत नाहीये. मी माझ्याच विचारात गुंग असलेली पाहून मॉम च्या मनात शंका
आली तिने मला विचारलेच की, अगं मी काय विचारते आहे  ?
कोणत्या विचारात गर्क झाली आहेस एवढी ?" मॉम च्या अचूक
प्रश्नाने मी पूर्ती भांबावली म्हणजे काय उत्तर द्यावे हे मला चटकन सुचतच नाही म्हणूनच की काय मॉम ने मला पुन्हा तोच
प्रश्न केला  की , अगं काय विचारते आहे मी तुला , हे ध्यानात
येतंय का तुझ्या ?" तेव्हा मी होकारार्थी फक्त मान डोलावली.
तशी मॉम पुढे म्हणाली की, तुम्हां दोघांमध्ये काही बिनसलं आहे
का ? तुझ्या ह्या मौनव्रताचा नेमका अर्थ काय लावू मी ? पण तरी देखील मी काहीच बोलले नाही , कारण काय उत्तर द्यावे
तेच कळत नव्हते मला. पण उत्तर तर द्यावेच लागणार होतं,
नाहीतर मॉम एक सारखे प्रश्न विचारून भंडावून सोडेल मला यात तिळमात्र शंका नाही. असा मी विचार करतच होती की काय उत्तर देऊ ? इतक्यात ऋषींचा फोन मला आला. तशी मी मनातुन वैतागून म्हणाली," ह्याना सुध्दा हीच वेळ मिळाली का मला फोन करण्याची ? त्यानंतर मी त्यांना त्रागाने म्हणणार होती की कशाला फोन केला म्हणून ; पण असं नाही बोलू शकली
याचं कारण असं की, लगेच माझ्या मनात एक विचार येऊन
गेला की, आपण जर ह्यांच्याशी तुसडे पणाची वार्ता केली ती तर मॉम लगेच समजून जाईल की आम्हां दोघांमध्ये काहीतरी
बिनसलं आहे , अर्थात इतकं दिवस मॉम पासून लपविले सत्य सगळ्या समोर येईल आणि माझी अजिबात इच्छा नाही की
माझ्या मॉम ड्याड ना यातलं काही कळावे म्हणून. कसं असतं
ना स्त्री चं जीवन सासरी कितीही जाच होत असला तरी ती
आपल्या आई-वडिलांना कळू देत नाही. कारण आपल्या
आई- वडिलांना त्याचं फार दुःख होईल. म्हणून ती आपलं सारं
दुःख पोटातच दडवून ठेवते. मनी एक आणि ओठी एक असं
दुहेरी जीवन जगत असते ती. हा विचार जसा माझ्या मनात आला तशी मी अगदी प्रेमाने विचारले," हां , बोला." मग त्यांनी देखील एकदम साळसूद पणाचा आव आणला.जणू काही तो
मी नव्हेच ! खासा न्याय आहे जगाचा. खरं तर हे आठवताच
मला हसू येत होतं परंतु मी हसले नाही. फक्त ते पुढं काय
म्हणतात हे ऐकण्यासाठी मी माझे कान टवकारले. तेव्हा ह्यांनी
म्हटलं की, मला नाही का सांगायचं ? मी नसतो का आलो असतो तुझ्या सोबत ?" त्या क्षणी मला काय झालं
होतं ते कुणास ठाऊक मी पटकन बोलून गेले की, मग यायचं
तर आता पण येऊ शकता ? मी येऊ नका म्हणाले का ?"
   " अगं तसं नाही, पण जाऊ दे, तू आधी मला हे सांग तुझ्या
भावाची तब्बेत आता कशी आहे ?" माझ्या मनात आलं की ह्यांना सरळ बोलून टाकावं की जशी काही तुम्हाला माझी
नि माझ्या माहेरच्या माणसांची फार चिंता आहे जणू ! कशाला
दिखाऊपणा करताय ? पण असं मनात असूनही बोलू शकले
नाही मी ! फक्त इतकंच म्हणाली," हो, बरी आहे आता."
तसे ते मला म्हणाले की, तू येण्याची काही घाई करू नकोस.
तुला जेवढं दिवस राहायचं तेवढं दिवस रहा." असं त्यांनी म्हटलं
मात्र तशी मी मनात म्हणाली," असं म्हणाल तर, तशी पण मी
तुम्हाला नकोच आहे म्हणा. फुकटचं लोढणे हवे कशाला , नाही
का ? असा विचार सर्रकन माझ्या मनात येऊन गेला. आता माझे कान ऋषी पुढं काय बोलताहेत या कडे लागले. ते पुढे म्हणाले की, जमल्यास मी येईन तुझ्या भावाला बघायला. " तशी मी मनात म्हणाली की, याल तर ,आदर्श जावई म्हणून इंप्रेशन नको का पडायला माझ्या मॉम आणि डयाड समोर, जगामध्ये दिखाऊपणाचा मुखवटा घालून वावरणारी माणसं काही कमी नाहीत हे यावरून स्पष्ट दिसते. असो पुढे काय म्हणतात ते ऐकून दे जरा. "  असे मनात म्हणाले तसे ते पुढे म्हणाले," मॉम ला फोन दे जरा. " तसा मी मुकाट्याने मॉम कडे फोन मग त्याचं नि मॉम चं काय बोलणं झालं ते कुणास ठाऊक ? पण मॉम च्या चेहऱ्यावर स्माईल उमटलेले मला दिसले. त्यावरून तर असं जाणवत होतं की, मॉम ला ह्यांनी नक्कीच काहीतरी थाप मारली असणार, किंवा आपण जावई म्हणून किती सज्जन आहोत, हे मॉम ला पटवून दिले असेल बहुधा. एकाअर्थी ते चांगलंच झालं म्हणा. नाहीतर मॉम ने आपल्याला अनेक प्रश्न विचारून एकदम भंडावून सोडलं असतं मला. निदान आता तरी मॉम च्या मला काही विचारणार नाही. हे एका अर्थी बरंच झालं म्हणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अजून काही दिवस माहेरीच राहता येईल. ऋषीनी स्वतःहूनच परवानगी दिली आहे म्हटल्यावर आता काही दिवस तरी विना टेन्शन चं राहता येईल आपल्याला इथं. शिवाय मॉम पण काही विचारणार नाही आपल्याला की इतके दिवस झाले तर सासरी का जात नाही म्हणून ? ही पण एक अजबच गोष्ट आहे, नाही का ? नाही म्हणजे मुलगी घरी आली तर माहेरच्या माणसांना खरं तर अत्यानंद व्हायला पाहिजे. पण तसे होत नाही काही दिवसांत च त्यांना प्रश्न भेडसावू लागतो की आपली मुलगी माहेरी इतकी दिवस का राहात आहे ? तिचं तिच्या नवऱ्या सोबत भांडण वगैरे झालं आहे का ? वगैरे वगैरे .....?

   संध्याकाळी स्वारी आपली हजर मी कल्पना देखील केली
नव्हती ऋषी खरोखरच आपल्या घरी येतील म्हणून. मॉम शी
असं काही  बोलत होते की मॉम ला वाटलं असेल की, किती आदर्श जावई आहे  आपला. तसं नाटक करण्यात आणि गोड बोलण्या मध्ये कोणी हात पकडणारा नाही ह्यांचा. मी नाही का
ह्यांच्या गोड बोलण्या मध्ये फसले. पण खरी असलीयत तर नंतर समजली मला. आता आलेत आहेत तर आपल्याला देखील आदर्श पत्नी होण्याचा दिखावा करावाच लागणार , नाही
का ?" असा विचार माझ्या मनात सुरू होता इतक्यातच ऋषी माझ्या बेडरूम मध्ये आले नि मला म्हणाले ," हे बघ प्राची आपल्या दोघांमध्ये जे काय सुरू आहे, त्याबद्दल मॉम  ड्याड ना अजिबात समजता कामा नये." त्यावर मी म्हणाले," पण असं किती दिवस आपण त्यांच्या पासून लपवून ठेवणार आहोत ? कधी न कधी खरं तर सांगावंच लागणार ना ?" त्यावर ऋषी म्हणाले की, सध्या ते कोणत्या टेन्शनमध्ये आहेत, नि अश्या वेळी आपल्या नात्या बद्दल जर त्याना सांगितले तर माझ्या मॉम ड्याड  ना किती दुःख होईल याची कल्पना तरी केली आहेस का ?" मला त्यांचं म्हणणं पटलं. माझे मॉम ड्याड सध्या तरी टेन्शन मध्येच आहेत. त्यात माझं आणखीन कळलं तर फारच टेन्शन घेतील ते. सध्या त्याना काहीच न सांगितले बरे . खरं तर या क्षणी मला ऋषींचे आभार मानावे असे वाटलं ; पण  मुखातून माझ्या शब्द मात्र बाहेर पडले नाहीत. मी विस्मयकारक त्यांच्या कडे पाहत राहिली. कदाचित माझ्या चेहऱ्यावरील भाव त्यांनी वाचले असावेत. म्हणूनच की काय ते म्हणाले ," त्यात आभार मानायचे काही कारण नाही, उलट मी तुझे आभार मानायला हवेत." असं त्यांनी म्हटल्या मुळे माझ्या मनात त्यांच्या बद्दल सहानुभूती निर्माण झाली. कसं असतं हं आम्हां स्त्रियांचे मन आपल्या बद्दल जरा कुणी आपुलकी पणा दाखविला की आम्हीं स्त्रिया लगेच मागील त्याचे अपराध माफ करतो. आता माझंच बघा ना, काल रात्री ऋषी माझ्या सोबत कसे वागले ? म्हणे मी तुला सुरभी समजलो म्हणून माझ्या कडून असा अपराध घडला. पण खरं सांगायचं तर तो अपराध नव्हता. आम्ही दोघेही पती -पत्नी आहोत म्हटल्यावर तसं वागणं स्वाभाविक होतं उलट स्वतःच्या पत्नी समोर आपल्या प्रेयसी चे वर्णन करणं खऱ्या अर्थाने तो माझा अपमान होता. पण तो मी मुकाट्याने गिळला. परंतु आज त्यांनी माझ्या घरच्यांचा मान काय राखला मी त्यांचे सारे अपराध विसरून एका टिपिकल बायको सारखी वागू लागली. आम्हीं स्त्रियां म्हणजे एक न उलगडणारे कोडेच आहोत, नाही का ? असा विचार करत असता माझंच मला हसू आलं . ते पाहून ऋषी म्हणाले," हंस हंस कारण मी हसण्या सारखाच वागतो , नाही का ?" त्यावर मी म्हटलं की, मी असं म्हटलं का ?" त्यावर ते लगेच म्हणाले,
   "  म्हणायला कशाला हवं, मला कळत नाही असं थोडेच आहे ?" मग मी जास्त काही न बोलता म्हणाले," खरंय तुमचं. सॉरी !"
   " आता सॉरी कशा बद्दल ?"
   " बस्स मला बोलावसं वाटलं तर मी बोललं. काही चुकलं
का माझं ?"
   " नाही. माझंच चुकलं. मला यायला नको हवं होतं इथं ."
असे बोलून ऋषी जाण्यासाठी मागे वळतात. मला अचानक
काय झालं ते कुणास ठाऊक नाही मी पटकन पुढे झाली
नि त्यांचा हात पकडला. माझ्या हातून आपला हात सोडवून
घेण्यासाठी त्यांनी तो खेचला मग मी ही ताणून धरला.मग
काय ओढा-ओढीत आम्हां दोघांचा ही तोल गेला नि आम्ही
दोघेही बेडवर कोसळलो. मी खाली नि ते माझ्या अंगावर मग
त्या क्षणी आम्हां दोघांच्याही शरीरात एक वेगळीच संवेदना
चमकून गेली. आम्ही दोघेही भावनावश होऊन एकमेकांकडे
पाहतच राहीलो. ऋषी एकटक लावून माझा चेहरा न्याहाळत
होते. मीही स्वतःला विसरून दूर होण्यास न सांगता अगदी
तशीच मंत्रमुग्ध होऊन त्यांचा चेहरा न्याहाळत होते. पण थोड्याच ते भानावर आले नि माझ्या अंगावरून बाजूला होतं
म्हणाले," सॉरी !"मी लगेच म्हटलं की, कशाबद्दल ?" त्यावर
ऋषी म्हणाले," जे आता माझ्या कडून कृत्य घडलं त्या बद्दल."
    " तो काही अपराध नव्हता."
    " म्हणजे ?"
    " आपण दोघेही पती-पत्नी आहोत , हे नेहमी विसरता तुम्ही !"
    " पण मी तुला आपली पत्नी मानत नाही, हे ठाऊक आहे
ना तुला ?"
    " मानणं वा न मानणं हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे, आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी स्वतःला तुमची पत्नी मानते."
    " का असं करते तू ?"
    " मी तर काहीच करत नाही. जे काय करताय ते  तुम्हीच
करताय , म्हणजे बघा ना, माझ्या घरी मला मागणी घालायला
कोण आलं होतं .... तुम्हीच ना ?"
     " तीच माझ्या कडून घडलेली सर्वात मोठी घोडचूक."
     " म्हणजे तुम्हाला मान्य आहे की चूक तुमच्याकडून घडली
आहे , मग दोष मला का देता ?" मी म्हटलं.त्यावर ते म्हणाले,
    " दोष तुझा नाही गं सारा दोष माझाच आहे."
    " बरं तर तो विषय आता इथंच संपवा नाहीतर आईने
आम्हां दोघांचे संभाषण ऐकलं तर फार घोटाळा होईल."
    " बरं मग मी निघू आता ?"
    " कुठं जाताय ?"
    " कुठं म्हणजे घरी नको का जायला ?"
    " आता आलातच आहात तर दोन-चार दिवस रहा ना
सासुरवाडीला ?"
    " दोन -चार दिवस वेड लागलंय का तुला ?"
     " दोन -चार दिवस नाहीतर आजची रात्र तर रहा."
    " आजची रात्र आई ती पण एका खोलीत .....?
   " का ? तिकडं राहत नव्हतो का आपण एका बेडरूम मध्ये."
     " तेव्हाची गोष्ट फार वेगळी होती."
     " आणि आज काय वेगळं आहे ?" मी असं मुद्दामहून म्हटलं. तसं मला माहित होतं की ते कशा बद्दल बोलत आहेत. पण एकदा जे घडलं ते पुन्हा घडेल असं जरुरी थोडे आहे. पण मी तर म्हणते की असं रोज घडावे. तेव्हाच तुमच्या मनात प्रेम
निर्माण होईल. कारण तुमची नि माझी जोडी काही इथून
ठरून आलेली नाहीये. अर्थात स्वर्गात सर्वांच्या जोड्या ठरविल्या जातात म्हणून तर तुमच्या प्रेयसी सोबत लग्न होऊ शकलं नाही आणि हे कदाचित आता तुम्हांला ही जाणवलं असावं म्हणूनच तर आपण माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत. हे खरे की नाही ? मी हे माझ्या मनातच बोलले. परंतु त्यांना कसे कळले ते माहीत नाही. ते मला म्हणाले," तुझ्या प्रश्नांचे उत्तर मला देता येत नाहीये. कारण मला ही कधी कधी असं वाटतं की तुझे नि माझे आपल्या मागील जन्माचं कांहीतरी
ऋणानुबंध आहेत का ? नाही म्हणजे मी तुझ्या पासून दूर
जाऊ इच्छित आहे, परंतु माहीत नाही मी तुझ्या कडे कसा
आपोआपच खेचला जातो. म्हणजे बघ ना, मला इथं यायचं
नव्हतं पण घरी आल्यावर तू घरी दिसली नाहीस आईला
विचारलं तर आई म्हणाली," ती गेली आपल्या माहेरी तशी
पण तुला नकोच आहे ना ती बायको म्हणून." नकळत मी
बोलून गेलो की असं कोण म्हणाले ?" तर आईच म्हणाली,
    " तुझी वागणूकच सांगते ना,आम्ही तुझ्यावर ही बायको
लादली नव्हती. तू स्वतःहूनच तयार झाला होतास ना लग्नाला
मग आता काय झालं ? का नांदवत नाहीयेस तिला ?"
    " असं कोण म्हणाले की मी नांदवत नाहीये तिला ?"
    " म्हणायला कशाला हवे , मला दिसत नाहीये का ?
कसा वागतो आहेस तो आपल्या बायकोशी ? थोडीशी जरी
शरम असेल ना, तुझ्याजवळ तर आत्ताच आपली सासरी जा
तुझ्या मेहुण्याचे अक्सिडंट झालंय. चांगलेच निमित्त मिळालंय.
सासुरवाडीला जा , मेहुण्याला पण बघून ये नि बायकोला
पण भेटून ये, जमल्यास स्वता सोबत घेऊनच ये."असं आईने
मला फर्मावले म्हणून मी बाईक घेऊन आलो तुला भेटायला."
   " मग आलं तर  चांगलच झालं ना ? तुम्ही स्वतः मला
भेटायला आल्यामुळे माझ्या आईच्या मनात ही आता संशय
येणार नाहीये."
  " मला अजूनही कळत नाहीये की मी जे केलं ते योग्य का
अयोग्य ?"

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..