षड्यंत्र २४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र २४ |
वकील ने सुंदर रावांच्या जमानत चे पेपर आणले होते. ते इन्स्पेक्टर तानाजी कडे दिले. इन्स्पेक्टर तानाजी ने जमानत पेपर नीट तपासले नि गृहमंत्र्यांच फोन आला होता, आम्ही आता त्यांना सोडणार च होतो. पण बरे झाले तुम्ही त्यांच्या जमानत चे कागदपत्र घेऊन आला ते. त्या पेपरवर सुंदर रावांच्या सह्या घेतल्या नि त्यांना सोडले.
पुढे
सुंदरराव ना माधवरावांनी आपल्या घरी बोलविले होते.
म्हणून सुंदर राव सरळ त्यांच्या घरी पोहोचले. त्याना पाहून
माधवराव म्हणाले," या सुंदर राव आम्ही तुमचीच वाट पाहत
होतो." त्यावर सुंदर राव म्हणाले," हो म्हणून निरोप मिळताच
ताबडतोब निघून आलो इकडे. अजून घरी देखील गेलो नाही."
" आता घरी जाऊन काय करणार आहात घरच्यांना कळले
आहेत तुमचे कारनामे ."
" पण तुम्हाला माहित आहे ना, ते सर्व खोटे आरोप आहेत."
" असं तुम्ही म्हणता जग थोडी म्हणणार आहे? जगाने जे
ऐकलं तेच खरे मानणार ना ?"
" पण लोकांना कसं कळलं ? नाही म्हणजे खटला अजून कोर्टात दाखल नाही झाला आहे."
" तो काय आज नाहीतर उद्या कोर्टात दाखल होईल की!"
" म्हणजे तुम्हाला खरंच वाटतं की मी असं केलंय ?"
" आता निदान माझ्या जवळ तरी खोटं बोलू नका. मला सर्व
माहीत आहे की, तुम्ही काय आहे नि काय करू शकता ? पण
जाऊ दे, माझं त्याच्या शी काही देणंघेणं नाही फक्त मला माझं काम झालं पाहिजे."
" ते होईल हो."
" कसं होईल? आता तर शक्यच नाहीये."
" मी शक्य करून दाखवीन."
" कसं ?"
" त्याबद्दल मी अजून विचार केलेला नाहीये."
" मग कधी करणार ?"
" आता आलोय ना, करेन काहीतरी !"
" कसं तरी नाही त्या लीला चा एकदम काटा काढला पाहिजे
कारण ती आता प्रेग्नेंट आहे, तिला जर मूल झालं तर माझ्या
मुलीचा पत्ता कट च झाला म्हणून समजा."
" नाही नाही तसं नाही होणार."
" ते आता कसं करायचं ते तुझं तू बघ. मला फक्त आपलं
काम झालं पाहिजे ? नाहीतर मग तुला तुरुंगात जाणे हे निश्चितच आहे."
" पण मी कुठं खून केलाय तिचा ?"
" तू केला नाहीस पण पुरावे तर तू खून केल्याचे सिध्द
करतात ना ?"
" हे सारे खोटे पुरावे आहेत."
" असं तू म्हणतोस पण कोर्ट असं म्हणणार नाही, कारण
कोर्टात सादर केलेल्या पुराव्या वरूनच कोर्ट सिध्द करतंय ना की तू अपराधी आहेस किंवा नाहीस ? आणि पुरावे तर सर्व तुझ्या विरुध्द आहे. मग तूच ठरवतुला जेल मध्ये जायचं आहे का माझं काम करायचं ते."
" मी तुमचं काम करेन म्हटलं ना ?"
" नुसतं म्हणून नाही चालणार,ते करून दाखवा. म्हणजे तुम्हांला काय करायचं आहे ते माहीत आहे ना ?"
" हो, लीला ला प्रेमच्या जीवनातून कायमची दूर करायची
आहे. आणि ते मी एका चुटकीसरशी करीन परंतु ....?"
" परंतु काय ?"
" मागच्या प्रमाणे माझ्या प्रेम च्या डोक्यावर काही परिणाम झाला तर, म्हणून जरा माझं मन तयार होत नाही त्या गोष्टीला."
" तसं काही होणार नाही, आणि समजा झालंच तर काही
दिवस ठेवू त्याला वेड्यांच्या इस्पितळात. त्यात काय ?"
" तेवढी वेळ मात्र आणू नका माझ्या मुलांवर."
" मग ठीक आहे, तुरुंगात जायची तयारी ठेवा.एक पुरावा
पोलिसांकडे आहे नि दुसरा पुरावा माझ्या कडे आहे."
" दुसरा पुरावा ?" एकदम धक्का बसल्यागत उद्गारले.
कारण त्याना माहीत नाही माधवरावाणी त्याना शारदा बाईचा
खून केल्याचे प्रकरणात अडकवण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे.असे यावरून तर असेच वाटते.
" हां तुला माहीत नाही ?" सुंदर रावांनी नकारात्मक आपली
मान डोलावली. तसे ते हसून म्हणाले," सुंदर राव आम्ही राजकारणी लोक उगाच सरकार चालवत नाही. आम्हांला
जर ससाची शिकार करायची असेल ना, तर आम्ही वाघाच्या
शिकारीची तयारी करून ठेवतो. न जाणो ससा ऐवजी वाघच
समोर आला तर काय करणार ? त्याचं तोंड बघत बसणार का ? नाही ना ? आणि समजा तसं केलं तर आपलीच शिकार नाही का तो करणार ? तेव्हा तुम्हाला त्या प्रकरणात अडकवण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे, तेव्हा आता माघार नाही. कारण वणवे मार्गा ला परतीची मार्ग नसतो मुळी ! कळले का काही ?" सुंदरराव बिच्चारे काय बोलणार, माधवरावां च्या जाळ्यात पूर्ण फसले होते ते. आता त्यातून निघण्याचा मार्ग नाहीये. आपल्या नशिबाला दोष देत सुंदर राव
तेथून निघून गेले.
घरी आल्यावर त्यांच्या पत्नी ने म्हणजेच मधुरा बाईंनी विचारले की काय हो, त्या शारदा बाईंने तुमच्यावर जे आरोप केलेत ते खरे आहेत का ?" त्यावर साळसूद पणाचा आव आणत सुंदर राव म्हणाले," अगं काय ऐकतेस तू पण ? मी असं करेन का ?"
" म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तिने आपल्या डायरीत जे
लिहून ठेवलंय ते सारं खोटं आहे, असंच म्हणायचंय ना तुम्हाला ?"
" एकदम करेक्ट !"
" पण मला नाही वाटत तिने तुमच्या बद्दल जे काय लिहिलंय ते खोटं असेल म्हणून. कारण या पूर्वी सुध्दा तुम्ही असे पराक्रम
केले आहेत, आठवतंय का?....नाही आठवत मी आठवण करून देते , राधाबाई सोबत...तुम्ही काय केलं ते आठवते का ?"
" ते सूड भावनेत झालं होतं त्याची आठवण कशाला देतेस ?"
" तुम्ही विसरताय म्हणून आठवण करून दिली हो, दुसरा
काही हेतू नाही माझा."
" बस कर ते तुझं रामायण."
" रामायण नाही हो, रामायण मध्ये असं काही घडलं नाही.
ह्याला वेगळचं नाव द्यायला हवं काय बरं नाव देवू ह्याला. नाव
देखील आठवत नाही."
" आता बस कर म्हटलं ना ?"
" बरं राहिलं , आता मी काय सांगते ते ऐका, तुम्ही म्हणताय
तुमचा शारदा बाईशी काहीच सबंध नाही, मग मला सांगा,आपण गावातून इथं शिफ्ट झालो, मग आपल्या सोबत
ती बया पण का शिफ्ट झाली ? नाही म्हणजे इथं संशयाला
जागा आहे की नाही ?"
" त्याला कारण ही माधवराव च आहेत, त्यांनीच मला
सांगितले होते की शारदा बाईला पण आपल्या सोबत घ्या
म्हणून."
" हे माधवरावांनी सांगितलं ?"
" हो "
" पण तुम्ही का ऐकलंत त्यांचं ?"
" काय करणार,आमदारकीचे तिकीट हवं होतं ना मला ?"
" मग मिळालं तिकीट ?"
" म्हणजे मिळालं होतं पण वरून हाय कमांड वरून आदेश
आल्याने माघार घ्यावी लागली."
" ते कारण काही असू दे. पण तुम्हाला त्यांनी तिकीट दिलं
नाही हेच खरे !"
" पण ह्यावेळी देणार आहे."
" मला नाही वाटत असं."
" म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, असं म्हण की !"
" विश्वास तुमच्यावर कुणी आणि कसा ठेवावा ते तुम्हीच
सांगा बरं ? नाही म्हणजे आपल्याच मित्राच्या पत्नी सोबत....
मधुरा बाई आपलं वक्तव्य पूर्ण करण्या अगोदरच सुंदर राव
मोठ्या ने ओरडुन मधुरा बाईंचे वक्तव्य मध्येच खंडित केलं.
ते म्हणाले," मधुरा तुला किती वेळा सांगू की तो एक सुड
होता,माझ्या बहिणीने म्हणजेच मिरा ने त्या दोघांमुळे आत्महत्या करावी लागली मग मी काय करायला हवं होतं ते सांग बरं."
" तुमच्या बहिणीला त्यांनी आत्महत्या करायला सांगितली
नव्हती, तुमच्या बहिणीने स्वतःच्या मर्जीने आत्महत्या केली.
त्यात त्यांचा काय दोष बरं ?"
" तुला ना, त्यांचा कधीच दोष दिसला नाही,सदैव माझाच
दोष दिसतोय तुला."
" हे बघा जे खरं आहे त्याला नाकारू शकत नाही मी ! हां
आता शारदा बाई सोबत तुमचं अनैतिक सबंध होते की नव्हते
त्या बद्दल माझ्या मनात शंका जरूर आहे,म्हणून मी तुम्हाला
विचारते की खरं काय ते सांगा. तुम्ही दोषी असा अथवा निर्दोष असा आम्ही तुम्हाला त्यातून वाचविण्याचा प्रयत्न अवश्य करू, पण जर मला नंतर समजलं की तुम्ही दोषी होता तर मात्र मी तुम्हाला कदापि माफ करणार नाही. तेव्हा तुम्हीच ठरवा तुम्हाला
काय मान्य आहे ते."
" हे बघ मधुरा, खरं तेच सांगतोय माझे नि तिचे अनैतिक सबंध
नव्हते. पण हां मी सुध्दा दोन तीन वेळा झोपलो आहे तिच्या
सोबत."
" लाज नाही वाटत दोन तीन वेळा तिच्या सोबत झोपलो
आहे म्हणून सांगायला ?"
"आता तूच म्हणालीस ना, खरं काय ते सांगा म्हणून."
" होय. मग त्यात तिने तुमचं नाव लिहिलं त्यात काय चुकीचं
केलं हो तिनं ?नाही म्हणजे एकदा झोपा किंवा दहा वेळा झोपा
अर्थ एकच ना ?"
" अर्थ एकच कसा ? शारदा बाई अस्सल मध्ये माधवराव ची
रख्खेल होती. तिने माझं नाव लिहिलं तर त्याचं पण तर लिहायला हवं होतं ना ?"
" त्याचं कसं लिहिल ,कारण असली खिलाडी तर माधवराव च आहे ना, तो तुम्हां साऱ्याना कठपुटली सारखा नाचवतोय
नि तुम्ही सारे त्याच्या इशाऱ्यावर नाचाताय बरोबर ना ?"
" पण आता काय करायचे ?"
" आता एकच उपाय आहे."
" कोणता ?"
" त्याच्या पोरीला सरळ हाकलून देवू ."
" अगं पण असं केलं तर तो सोडेल का आपल्याला ?"
" फार काय होईल तुम्हाला तुरुंगात जावं लागेल इतकंच
ना, मग जा तुरुंगात आपल्या एकुलत्या एक मुलासाठी एवढं
करू शकत नाही का तुम्ही ?"
" अगं तुरुंगात जाईन ही मी, पण मला फाशी झाली तर !"
" तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या शरीराचा तुम्ही भोग घेतला मग
त्या अपराधाची शिक्षा नको का भोगायला ?"
" तू नक्की माझी बायकोच आहेस ना, नाही म्हणजे नवऱ्याला सरळ तुरुंगात पाठवायला निघालीस म्हणून म्हणतोय
कारण कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला तुरुंगात पाठविनार
नाही."
" मी एक पत्नी आहे, तशी मी एक आई सुध्दा आहे, माझ्या
मुलांच्या सुखाच्या आड कुणी येत असेल तर मी गप्प बसणार
नाही. आजपर्यंत खूप गप्प बसले. त्यामुळेच एका मुलाला
गमावून बसले, पण आता नाही मी गप्प बसणार,कारण आता
प्रश्न माझ्या नातवाचा आहे. दुधा पेक्षा दुधावरच्या शाईला जास्त
जपायचं असतं हे तर कबूल." त्यात सुंदर राव काय बोलणार
ना ? पण क्षणभर वेळाने म्हणाले," यावर एक उपाय आहे बघ.
तो जर उपाय केला तर मला ही तुरुंगात जावं लागणार नाही
आणि आपल्या सूनबाई च्या जीवाला ही धोका होणार नाहीये."
" असा काय उपाय आहे,मला सांगा बरं." मधुरा बाईने विचारले.तेव्हा त्यांनी थोडक्यात आपलं प्लॅन सांगितले ; परंतु
मधुरा बाईना ते प्लॅन जरा रिस्की वाटले शिवाय आपल्या
सूनबाई ने का पलायन करावं ? आपल्या मुलाचं माधवी वर
प्रेम नाहीये. तीचं आपल्या मुलावर प्रेम आहे. त्यात माझ्या
मुलांचा दोष थोडीच आहे ? पहिलं तर वेगळे कारण सांगितले
आणि आता वेगळेच काही सांगताहेत. ह्यांच्या वर विश्वास तरी
कसा करावा ? आपली पत्नी सहमत नाही हे पाहून सुंदर राव गयावया करत म्हणाले," मधुरा कसं पण करून मला तुरुंगात
जाण्यापासून वाचव गं, मला तुरुंगाची फार भीती वाटते गं , हे
कसं कळत नाहीये तुला ?"
" हा विचार गुन्हा करण्या अगोदर करायचा असतो. अपराध
केला आहे तर त्याची शिक्षा तर भोगायला लागणार ना ?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा