षडयंत्र २५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षडयंत्र २५ |
" असा काय उपाय आहे,मला सांगा बरं." मधुरा बाईने विचारले.तेव्हा त्यांनी थोडक्यात आपलं प्लॅन सांगितले ; परंतु
मधुरा बाईना ते प्लॅन जरा रिस्की वाटले शिवाय आपल्या
सूनबाई ने का पलायन करावं ? आपल्या मुलाचं माधवी वर
प्रेम नाहीये. तीचं आपल्या मुलावर प्रेम आहे. त्यात माझ्या
मुलांचा दोष थोडीच आहे ? पहिलं तर वेगळे कारण सांगितले
आणि आता वेगळेच काही सांगताहेत. ह्यांच्या वर विश्वास तरी
कसा करावा ? आपली पत्नी सहमत नाही हे पाहून सुंदर राव गयावया करत म्हणाले," मधुरा कसं पण करून मला तुरुंगात
जाण्यापासून वाचव गं, मला तुरुंगाची फार भीती वाटते गं , हे
कसं कळत नाहीये तुला ?"
" हा विचार गुन्हा करण्या अगोदर करायचा असतो. अपराध
केला आहे तर त्याची शिक्षा तर भोगायला लागणार ना ?"
पुढे
" म्हणजे तू निश्चय केला आहेस तर मला तुरुंगात पाठविण्याचा."
" मी तर म्हणते तुम्ही तुरुंगात जावून आपल्या पापाची
शिक्षा भोगावीच , कारण माणसाला एक पाप पचविण्याची दुसरं
पाप करावं लागतं त्यापेक्षा पहिल्या पापाच्या वेळी माणसाने
आपल्या कर्माची शिक्षा भोगली तर त्याला अनेक पाप करावे
लागत नाहीत. म्हणून तुम्ही आपला गुन्हा स्वीकारून तुरुंगात
जाच !" तसे सुंदर राव चिडून बोलले की, तू बायको आहेस
का हडळ आहेस, नवऱ्याला चक्क सांगतेस तुरुंगात जायला
ते पण त्याने न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगायला."
" अपराध कसा नाही तिच्या मना विरुद्ध तिच्या शरीराचा
भोग घेतला हा अपराध नव्हे काय ?"
" हो, मान्य आहे मला. पण मी तिचा खून नाही ना केला ?"
" खून नाही केला, पण अपराध तर केला ना, मग त्या नाही
तर ह्या कोणत्यातरी अपराधाची शिक्षा ही भोगायलाच हवी .
आणि तसं पण तुम्ही अपराधी आहेतच?"
" ते कसे ?"
" आपला मोठा मुलगा जो जिवंत नाही आहे, तो आपल्या
मुळेच मग त्या अपराधाची ही शिक्षा समजा हवी तर !"
" म्हणजे तू मला तुरुंगात पाठविण्याचा निश्चय केलासच आहे
तर !"
" मी नाही केला हो, तुम्हीच त्याला कारणीभूत आहात. कारण माणसाची वृत्तीच तशी आहे, एक पाप पचलं की तो
दुसरं पाप करण्याचे धाडस करतो, म्हणून पहिल्याच पापाची
शिक्षा मिळाली की मग तो दुसरं पाप करण्याचे धाडस करत
नाही."
" तुझ्याशी बोलून काही फायदा नाही, आता जे काय
करायचं ते मीच करिन." असे बोलून ते तिच्या बेडरूम मधून
बाहेर पडले. त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहत मधुरा
म्हणाली," पापाचा घडा भरला की तो फुटतोच ; परंतु हे तुम्हाला कळत नाहीये, हे माझं दुर्दैव ! असो ईश्वर जे करतो तेच योग्यच असतं म्हणा. पण आपल्याला ते कळत नाही बस इतकंच. तुम्हाला ईश्वर सत्बुध्दी देवो हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना !" असे बोलून त्या किचनरुतुम च्या दिशेने निघून गेल्या.
सुंदर रावांनी खूप विचार केल्यानंतर त्यांना मधुरा बाईचे
म्हणणे पटले की, आता काही झाले तरी माधवरावांचे ऐकायचे
नाही. एक मुलगा तर गमावून बसलोच आहे, आता दुसरा मुलगा
मला गमवांयचा नाहीये. आतापर्यंत सूनबाई सोबत सूड भावनेने
फार वाईट लागलो पण आता नाही.असा विचार करून
त्यांनी ठाम निर्णय घेतला की माधवरावाचे अजिबात काही
ऐकायचे नाही असा विचार करून त्यांनी सर्वांना हॉल मध्ये
बोलविले नि सर्वांसमक्ष माधवी ला स्पष्ट शब्दात सागितले की, माझ्या सूनबाई ला आता मुल होणार आहे, तेव्हा तू आपल्या घरी गेलेलच बरं !" ते ऐकून माधवी ला एकदम धक्काच बसला. तिने स्वप्नात ही असा विचार केला नव्हता की आपले
भावी सासरेबुवा असे अचानक बदलतील. तिने न कळून
विचारले," काका काय बोलतात तुम्ही हे ? मी ह्या घरची सून
आहे, मी माझ्या नवऱ्याला सोडून कशी बरं जाऊ शकते ?"
तसा प्रेम म्हणाला," ओ हॅलो, मी तुझा नवरा बिवरा कोणी
नाहीये? उगाच नको त्या भ्रमात राहू नकोस."
" भ्रमात मी नाही भ्रमात तू आहेस ."
" तो कसा ?"
" आपल्या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे, हे तर खरं !"
" हो मुलगा होईर्यंत तू माझी पत्नी बनून राहणार ?"
" मग झालंय का मला मुल ?"
" त्याची आता गरज नाहीये."
" पण मला आहे ना त्याची गरज ?"
" म्हणजे ?"
" जोपर्यंत मला मुल होत नाही तोपर्यंत मी इथून मुळीच
जाणार नाही."
" मग खुशाल रहा, पण पत्नी बनून नाही. फक्त घरची एक
सदस्य म्हणून. जसे घरचे नोकर राहतात ना अगदी तसे."
" प्रेम तोंड सांभाळून बोल. मी मोलकरीण नाही तर तुझी
पत्नी आहे, आणि मी ते कोर्टात सिद्ध ही करेन."
" मग ठीक आहे, तुला मुल होत नाही तोपर्यंत तू रहा इथं."
" नुसती राहणार नाही, तर पत्नी चे सारे अधिकार तुला
द्यावे लागतीलच मला." माधवी ठाम पूर्ण स्वरात म्हणाली
त्यावर मधुरा आपल्या नवऱ्यावर रागवत म्हणाली," हे सारे
तुमच्या मुळे घडलं.नको ती ब्याद घरात घेऊन आले."
" अहो, सासूबाई, मला ब्याद म्हणू नका.खरी सून मीच
आहे तुमची ! ह्या लीलाचां तर मी काटाच काढणार आहे.
बघाच तुम्ही !" तसा प्रेम चिडून म्हणाला," माझ्या लीलाच्या
केसाला जरी धक्का लागला ना , तर मी स्वतःच्या हाताने तुझा
गळा दाबूनजीव घेईन नि तुरुंगात जाईन."
" वाव ! काय पण प्रेम आहे, पहिल्या बायकोवर, तिच्यासाठी
तू मला ठार मारणार, पण एक लक्षात ठेव. जर तू माझा
झाला नाहीस तर मी तुला हीचा देखील होऊ देणार नाही."
असे म्हणून तिने एकदम लीला वर हल्ला केला. परंतु प्रेम
मध्ये पडला नि दोघांना एकमेकांपासून दूर केलं नि प्रेम ने तिच्या
कानशिलात एक चपराक ठेवून दिली. तेव्हा माधवी म्हणाली,
" हा ध्वनी मी कायमच लक्षात ठेवीन प्रेम. आतापर्यंत तू फक्त
माझं प्रेम पाहिले आहेस, आता या पुढे तू माझा तिरस्कार पण पाहशील." असे म्हणून ती आपला गाल चोळत तेथून निघून गेली. त्यावर मधुरा बाई आपल्या नवऱ्या कडे पाहत बोलल्या
की, हे सारेजे घडतय ना, हे केवळ तुमच्या मुळे. समजलं." असे म्हणून मधुरा स्वयंपाक घरात निघून गेल्या. सुंदर राव हतप्रभ झाल्यागत चुपचाप उभे राहून पाहतच राहिले. तसा प्रेम आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाला," पाहिलंत पप्पा
राजकरणी माणसं नेहमी धोकेबाज असतात, त्यांच्यावर कधीही
विश्वास ठेवू नये. ते कधी केसाने गळा कापतील याचा पत्ताही
लागायचा नाही.म्हणून त्यांच्या सोबत ना मैत्री चांगली नाही
दुश्मनी ते नेहमी फक्त स्वतःचां स्वार्थ साधतात.म्हणून त्यांच्या
पासून चार पाऊल दूर राहावे. आतापर्यंत झालं ते झालं. परंतु
आता तरी सावध व्हा ! आणि त्यांच्या पासून जरा दूरच रहा." असे बोलून मग प्रेम लीला कडे पाहत म्हणाला," चल लीला !" लीला काही न बोलता त्याच्या पाठोपाठ निघून गेली. सुंदर राव त्या दोघांकडे पाहत म्हणाले," तुझं खरे आहे पोरा ! मीच चुकलो. सुडाच्या भावनेने नको ते करूंन बसलो पण आता नाही, मला फाशी झाली तरी हरकत नाही, पण आता ह्या माधव रावला मी जिवंत सोडणार नाही." असे म्हणून त्यांनी बाबुराव ला फोन केला नि त्याला सांगितले की काही करून ह्या माधवी चा काटा काढून टाक. माझ्या मुलांच्या सुखाच्या आड कुणी येता कामा नये, मग तो मी का असेना ?"
" मालक काम होईल तुमचं. चिंता करू नका." सुंदर रावांनी
फोन कट केला नि आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले.
माधवी आपल्या वडिलांना भेटायला गेली तेव्हा तिने त्यांना
इथले सारे वृत्तांत ऐकविले. ते ऐकल्यावर माधवराव म्हणाले,
" काही हरकत नाही मेरी बिल्ली मुझ से ही म्यावं! अब तो
तुम्हे जेल जाना ही होगा असे म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला
फोन लावला नि शारदा बाईचा अक्सिडंट सुंदर रावांच्या
सांगण्या वरूनच करण्यात आले याचा पुरावा आहे माझ्याकडे." इन्स्पेक्टर तानाजी म्हणाले की, तुमच्या कडे
जो काही पुरावा आहे तो पोलीस स्टेशनला येऊन द्या. त्या प्रमाणे माधवरावांनी त्या माणसाला पोलीस स्टेशनला पाठविले ज्याने ट्रक ड्रायव्हर ला फोन करून सांगितले होते आणि ती
रेकॉर्डिंग पण पाठविली. जेव्हा सुंदर रावांनी माधव रावांना
शारदा बाईंचा काटा काढायचा सांगितले होते.पोलिसांसाठी
इतके पुरावे पुरेसे होते.त्यांनी लगेच त्या गुंडाच्या साक्षी वरून
सुंदर रावांना पोलिसांनी अटक केली नि पोलीस कोठडीत
डांबले. त्यानंतर त्यांच्या वर कोर्टात खटला दाखल करण्यात
आला. सुंदर रावांनी कबूल केले की आपण शारदा बाईचे
नि तिचे अनैतिक सबंध होते. परंतु आपण तिचा खून केलेला
नाहीये. तेव्हा पोलिसा जवळ असलेले रेकॉर्डिग न्यायधिश
मोहोदय ला ऐकविले. त्या वरून ग्रहित धरले गेले की सुदंर
राव तिचा खून करू इच्छित होते.कशावरून त्यांनीच सुपारी
दिली नसेल.कारण ट्रक ड्रायव्हरला फोन कॉल जो केला
होता तो आवाज सेम सुंदर रावांच्या आवाजा शी मंच होत होता.
त्यावरून सिद्ध झाले की शारदा बाईंचा खून सुंदर रावांनी च
केला आहे. शेवटी कोर्टाने दोषी करार देवून सुंदर रावांना
चौदा वर्षे तुरुंवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
माधवी एकदम खुश होती ती आपल्या बापाला म्हणाली,
" डॅडी आपण फार चांगलं केलेत.आता अजून एक काम करा." त्यावर माधवराव म्हणाले," सांग बेटा अजून काय हवय
तुला ?" माधवी म्हणाली," माझ्या सवतीचा काटा काढा बस्सं!" माधवराव म्हणाले," त्याचा देखील पूर्ण बदोबस्त केलाय चिंता करू नकोस." त्यावर माधवी खुश होत म्हणाली,
" थँक्यू डॅडी !" असे म्हणून फोन कट केला. माधव रावांनी लगेच चंदन नावाच्या गुंडाला फोन करून सांगितले की सुंदर रावांच्या सूनबाई चे अपहरण कर नि तिला अश्या ठिकाणी नेऊन ठार मार की तिची पोलिसांना बॉडी सुध्दा मिळता कामा नये." तेव्हा पलिकडून आवाज आला की बॉस होईल तुमचे काम !" इतके बोलून फोन कट झाला. तसे माधवराव विकट हास्य करत म्हणाले," माझ्या पोरीच्या सुखाच्या आड येतेस का तू ? आता भोग आपल्या कर्माची फळे ! जसा सासरा सुंदर राव आपल्या कर्माची फळे भोगतोय. तशी तू पण भोग. तुझ्या बद्दल फार दया येते मनात. पण काय करणार ? घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या ? इसलिए मजबूरन हमें तुम्ह्यारी जान लेनी पड रही हैं, पण काही हरकत नाही. तुला इथं प्रेम नाही मिळालं तरी स्वर्गात अवश्य मिळेल . परंतु. आमचं तसं
नाही आम्हाला जी वस्तू हवी ती आम्ही मिळविणार. मग त्या
साठी कुणाचा जीव घ्यावा लागला तरी आम्ही मागे पुढे पाहणार
नाही.क्योंकि हमारा असूल यहीं है, जो चीज मांगकर नहीं मिलेगी उसे छिन लो बस ! आता हेच बघ ना, सुंदर राव
माझं ऐकला असता तर त्याला तुरुंगात जावं लागलं असतं का ? पण नाही अचानक सूनबाई बद्दल त्याच्या आपुलकी
निर्माण झाली आणि मुळात तेच आम्हाला आवडले नाही. बरं का ? राजकरणी लोकांशी ना दोस्ती चांगली आहे ना दुश्मनी पण बराचशा लोकाना ते कळत नाही . म्हणून तोंडघसी पडतात
बिच्चारे !" असे बोलून स्वतःशीच हसतो.
प्रेम आणि लीला कोर्टातून बाहेर पडत असतात. इतक्यात
अचानक एक तिथं ओमणी मोटार येऊन उभी राहिली.त्यातून
काही गुंड उतरले नि त्यांनी अचानक प्रेम वर हल्ला केला. प्रेमच्या डोक्यावर एक फटका मारून त्याला बेशुद्ध केले नि लीला ला जबरदस्तीने दुसऱ्या मोटारीत कोंबून ते फरार देखील झाले. आणि हे इतके अचानक आणि झटपट घडले की लोक
बघतच राहिले. मधुराबाई तर नुसत्या भांबाहून जाऊन सारे दृश्य पाहत होत्या. क्षणभर त्यांना कळलेच नाही काय करावं ते. पण नंतर भानावर आल्या तसे त्यांना जाणवले की आपला मुलगा इथं बेशुद्ध होऊन पडलाय नि सूनबाईचे अपहरण झाले आहे.पण हे सारे कोणी केले हे त्यांच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. प्रथम त्यांनी तिथे बघे म्हणून उभे असलेल्या लोकांच्या मदतीने प्रेम ला मोटारीत मागच्या सीट वर बसविले नि स्वतः ड्रायव्हिग सीट वर बसून मोटार रुग्णालयाच्या दिशेने पळविली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा