षड्यंत्र ३०
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र ३० |
" बरं ठीक आहे .थोडी विश्रांती घेऊ नि मग पळू." म्हणून
थोड्या वेळ विश्रांती साठी एका दगडावर बसले.पण तेवढ्यात
चंदन चे साथीदार तिथपर्यंत येऊन पोहोचले. पळण्याचा प्रयत्न
करत असताना त्या लोकांनी त्या तिघांना घेरले. मग ठरविले
की आता ह्यांच्या शी लढायचेच.असा विचार करून त्यांच्याशी
मारामारी सुरू केली.पण एकटा किती जनाशी टक्कर घेणार.
शेवटी त्या तिघांना ही पकडकेच. तेवढ्यात तिथं चंदन मोटार
घेऊन तेथे आला. त्या तिघांना मोटारीत घालून आपल्या घरी
आणले.
पूढ़े
बाबूराव चा एक साथीदार बाहेर उभा होता. त्याने पाहिले की
चंदन त्या दोघांनाही सोबत घेऊन आलाय तेव्हा तो आंत मध्ये
गेला नि त्याने बाबुराव ला चंदन त्या तिघांना घेऊन माहिती दिली तसा बाबुराव चंदनच्या आई ला नि बहिणीला घेऊन बाहेर आला. तिकडून चंदन ने मधुराबाई प्रेम आणि लीला ला पाठवून
दिले नि इकडून बाबुराव ने चंदनच्या आईला नि बहिणीला त्याच्या कडे पाठविले . कोणी चलाखी करू नये म्हणून दोघांच्या ही साथीदारांनी एकमेकांवर बंदुका रोखून धरल्या होत्या. प्रेम आणि मधुरा बाई बाबुराव जवळ येताच बाबुराव ने त्या तिघांना मोटारीत बसला सांगितले तसे प्रेम आणि मधुरा बाई आणि त्याचे साथीदार मोटारीत बसले तसा बाबुराव पण
मोटारीत बसला नि मोटार निघाली. तेव्हा चंदनच्या साथीदारांनी चंदन ला विचारले की, काय करायचं दादा, त्या लोकांच्या मोटारीची पाठलाग करायची का ?" त्यावर चंदन
म्हणाला," काही गरज नाही त्याची, जाऊ दे त्यांना."
" पण साहेबांना काय सांगायचं ?"
" त्याची तुम्हां लोकांना चिंता करायची गरज नाहीये.त्यांना
काय सांगायचं ते मी पाहून घेईन." त्यावर त्याचे साथीदार गप्प बसले. पण चंदन ची आई गप्प बसण्यातली नव्हती. ती त्याच्यावर भयंकर चिडली. त्याला म्हणाली," तुला काय सांगितलं होतं मी ? त्या माधवरावाचां नाद सोड म्हणून ना ?"
" अग आई, काम नाही केलं तर पैसे कोण देईल मला?"
" का ? दुसरं काम मिळत नाही का तुला ? फक्त हे एकच
तुझ्यासाठी काम राहिलेय ?"
" माझ्या सारख्या गुंडाला कोण देईल बरं काम ?" त्यावर
त्या निरुत्तर झाल्या. कारण एकदा गुंडगिरीचा शिक्का माथी
बसला की दुसरं काम मिळणे मुश्कीलच आहे, हे त्यांना ही
माहित होतं म्हणून त्या किंचित विचारमग्न झाल्या. पण
क्षणभर वेळाने त्या म्हणाल्या की, तू माझं एक ऐकशील ?"
" ऐकेन. सांग,काय सांगायचं आहे ते तुला ."
" आपण हे शहर सोडूनच दुसऱ्या शहरात जाऊ जिथं
आपल्याला कोणी ओळखणार नाही."
" पण हे शहर का वाईट आहे ?"
" तुला एकदा सांगितलेले कळत नाही का ? हे काम नाही
करायचं तू बस्स मला दुसरं काही ऐकायचं नाही तुझं."
" ठीक आहे, तुझ्या इच्छेनुसार करतो मग तर झालं."
" आता कसं एकदम शहाण्या माणसा वाणी बोललास तू ?"
" पण आई, मला एकदा साहेबांना भेटून त्यांना सांगायला
हवं की या पुढे तुमचं कोणतही काम करणार नाही, तुम्ही दुसरा माणूस बघा."
" बरं जा सांगून ये." त्याची आई म्हणाली. तसा चंदन
तेथून चालता झाला. तो जेव्हा माधवरावांच्या ऑफिस ला
पोहोचला तेव्हा माधवराव एकटेच ऑफिस मध्ये बसले होते.
त्यांचा सेक्रेटरी कुठं तरी गेला होता. चंदन सरळ ऑफिस मध्ये
शिरला. त्याला तिथं अकस्मात आलेले पाहून ते आश्चर्य व्यक्त करत म्हणाले, ' तू इथं आलास तर तिथं पहारा द्यायला कोणाला बसविलेस"
" कुणाला नाही." चंदन ने एकदम शांत पूर्ण स्वरात उत्तर दिलं. तसे माधवराव चिडून म्हणाले," याचा अर्थ काय समजायचां मी ?" त्यावर चंदन बोलला की, याचा अर्थ इतकाच की आपल्या कैदेत आता कुणी नाही. सोडले मी त्या
सर्वांना." तसे माधवराव चिडून म्हणाले," काय म्हणालास ?
सोडून दिलेस त्या सर्वांना ?"
" हां !"
" पण कुणाच्या हुकुमावरून ?"
" कुणाच्या नाही."
" म्हणजे ?"
" साहेब, माझा नाईलाज होता त्यासाठी, कारण सुंदर रावांच्या माणसांनी माझ्या आईला नि बहिणीला ओलीस ठेवले होते मग तुम्हीच सांगा, दुसरा काय उपाय होता माझ्या कडे ?" तसे माधवराव म्हणाले," काही हरकत तू एक काम कर."
" माफ करा साहेब, या पुढे मी तुमचे कोणतेच काम करू
शकणार नाही."
" याचा अर्थ काय समजायचा मी ?"
" याचा अर्थ एकच की आजपासून मी तुमची नोकरी सोडत
आहे."
" पण का नोकरी सोडत आहेस, ते नाही सांगितलेस ?"
" आईची तशी इच्छा आहे."
" पण तुला हे तर ठाऊक आहे ना, की एकदा ह्या धंद्यात
उतरल्यानंतर परतीचा रस्ता नाही. कारण हा मार्ग वणवे आहे.
" माहित आहे मला."
" तरी देखील काम सोडायचं म्हणतोस ."
" मी हे शहरच सोडून जात आहे."
"मग ठीक आहे, तुला जायचं तर जा, मी तुला काही अडविनार नाही." तसा चंदन तेथून चालता झाला. तसा माधवराव ने लगेच पोलिस स्टेशनला फोन करून इन्स्पेक्टर तानाजी ला सांगितले की चंदन हे शहर सोडून चालला आहे, तेव्हा त्याची मागची केस परत ओपन करा नि त्याला त्यात
अकवून टाका पुन्हा बाहेर येता कामा नये."
" पण साहेब, तो आपला माणूस आहे ना?
" इथं आपलं परके कुणी नसतं गरजेनुसार सर्वांना जवळ
केलेले असतं गरज संपली की त्याच्या बरोबर असलेले नाते
पण संपले. कळलं ना तुला ? मला काय म्हणावयाचे आहे ते."
" मी आताच निघतो त्याला अटक करायला."
"त्याला अटक तर कराच, पण त्याची बेल पण होऊ देवू
नकोस. मला सोडून चाललाय त्याला माहित नाही की गुन्हेगारी
ही अशी दलदल आहे की त्यात एकदा शिरला की त्यातून बाहेर
पडता येत नाही, जेवढा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातो
तेवढा तो अजून दलदलीत फसतो.मूर्ख लेकाचा !"
" पण साहेब, त्याने तुमचं नाव घेतलं तर !"
" माझं नाव घेऊन तो काय सिद्ध करणार ? आम्ही नेते
लोक इतके चलाख असतो ना, ह्या हातावरची थुकी त्या
हातावर कधी फिरवतो ते कुणाला कळत देखील नाही."
" ते खरंय पण ?"
" आता शंका कुशंका काढत बसू नकोस, जसे मी सांगितले
आहे तसेच कर."
" ओके सर !"
"मग कामाला लागा आज च्या आज अटक करा, आणि
जरुरत असेल तर एनकाऊंटर करा त्याचा." असे बोलून त्यांनी
रिसिव्हर खाली ठेवला. इतक्यात त्यांची समोर उभा असलेल्या
चंदन वर पडली तशी त्यांच्या पाया खालची जमीन सरकली.
मनात एक विचार येऊन गेला की ह्याने आपलं नि इन्स्पेक्टर
चे बोलणे ऐकले तर नसेल ना ? लगेच दुसरे मन म्हणाले की
छे छे छे ! ऐकले नसेल ऐकले असते तर अजून गप्प बसला
असता का ? असा विचार करून त्याने ऐकले की नाही जाणून
घेण्यासाठी मुद्दामच विचारले," अरे चंदन तू अजून गेला नाहीस ?" त्यावर चंदन उद्गारला," नाही गेलो म्हणून तर तुमच्या
मनातील कपट कळले मला ."
" कपट कसले कपट ?"
" तोंडावर गोड आणि पाठीमागे फितुरी सरडा सुध्दा इतक्या
लवकर रंग बदलत नसेल इतक्या जलद गतीने तुम्ही नेते लोक
रंग बदलता तुम्ही तर त्या सरड्या ना पण मागे टाकले आहे."
" अरे काय बोलतो आहेस तू ?"
" योग्य तेच.वेड पांघरून पेड गावाला जाऊ नका. मी सर्व ऐकले आहे. पोलिसांना माझं एनकाऊंटर करायला सांगतात
काय ? आता मी तुझाच एनकाऊंटर करतो पाहू तर खरं तुला
कोण वाचवायला येतोय ते ." असे म्हणून चंदन ने त्यांच्यावर आपले पिस्तूल रोखले. पिस्तूल पाहून माधवरावांची बोबडीच
वळली. त्यांनी विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत म्हणाले की, तुझा काहीतरी गैरसमज होतोय चंदन, मी असं
म्हणेन का ? ते पण तुझ्या बाबतीत ? कसं शक्य आहे ?"
" तुम्ही नेते लोक स्वतःच्या माणसांचे नसता, मग इतरांचा
काय पर्वा ?"
" तुझा काहीतरी गैरसमज झालाय चंदन."
त्यावर चंदन म्हणाला," गैरसमज झाला नाही, आतापर्यंत होता गैरसमज माझा. पण आता तो दूर झाला. गेंड्याच्या कातडीचे माणसे तुम्ही तुमच्या वर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःचाच विश्वासघात करण्या सारखा आहे, खरे तर मी तुझ्या कडे थोडे पैसे मागण्यासाठी परत आलो होतो, पण आलो ते
पण एकाअर्थी बरं झालं म्हणा. तुझं खरं रूप माझ्या समोर आले. मी तर तुरुंगातजाणारच आहे ; परंतु तुरुंगात जाण्या अगोदर हिशोब पूर्ण करून जातो. नंतर भेट होणार नाही ना
आपली. " असे म्हणून त्याने चाप ओढला. त्याच्या पिस्तुलातून सू सू करत जी गोळी निघाली ती सरळ माधवरावांच्या छाती मध्ये रुतली. तशी त्याने करून किंकाळी फोडली. पण तो
एकच गोळी मरून थांबला नाही एका पाठोपाठ सहा गोळ्या
त्याच्या शरीरात टाकल्या. त्यामुळे माधवराव जागच्या जागी
ठार झाले नि धाडकन जमिनीवर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचां प्राण शरीर सोडून अंनतात विलीन झाला. गोळीचा आवाज ऐकून एक शिपाई पळत तिथं आला आणि त्याने समोरील दृश्य पाहिले नि मोठ्याने ओरडला की,
तू हे काय केलेस ?" त्यावर चंदन उद्गारला," काय केलंय ते
दिसतय ना का तुझी पण खोबडी उडवू ! "
" नको मला मारू नकोस."
" नाही मारणार,पण माझं काम ऐकलेस तर !"
" ऐकेन तुझं सर्वकाही ऐकेन."
" शाब्बास ! आता ऐक मी काय सांगतो ते." तसे त्याने
चंदन कडे पाहिले तसा चंदन पुढे म्हणाला, मी इथून गेल्यावर
पोलिस स्टेशनला फोन करायचा नि त्यांना सांगायचं की साहेबांना कुणी अनोलख्या व्यक्तीने मारले. जमेल ना असं सांगायला ?" शिपाई ने होकारार्थी आपली मान डोलावली.चंदन जसा तिथुन निघून गेला. तसे त्याने पोलीस स्टेशनला फोन करून घडलेल्या दुर्घटनेची खबर दिली. थोड्याच वेळात तेथे पोलीस आले आणि त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. आणि मृतदेह पोष्टमार्टम साठी सरकारी रूग्णालय मध्ये पाठवून दिला आणि शिपाईला पकडुन पोलीस स्टेशनला आणले. अगोदर आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगत होता. साहेबांची किंकाळी ऐकून मी पळत तेथे आलो तर साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मला दिसले." तेव्हा इन्स्पेक्टर तानाजी ने विचारले," म्हणजे मारेऱ्यांना तू पाहिलेच असशील."
त्यावर तो शिपाई म्हणाले," नाही साहेब, मी आलो तेव्हा तिथं कोणीच नव्हतं." परंतु त्याच्या बोलण्याच्या टोंड वरून इन्स्पेक्टर तानाजी समजले की हा काहीतरी लपवत आहे.म्हणून
त्यांनी खोदून विचारले," असं कसं होऊ शकते ? इतक्या
गोळी मारेपर्यंत तू तिथं पोहोचला नाहीस ,हे कसं शक्य आहे ?
तू काही तरी लपवीत आहेस, पोलिसांपासून."
" नाही साहेब, मी खरं तेच सांगतेय.*
" शिंदे ह्याला जरा पोलिसांचा खास खाक्या दाखव पाहू !"
पोलिसांनी खास खाख्या दाखवताच तो पोपटा वाणी
बोलू लागला नि त्याने खरे खरे सांगून टाकले.मग पोलिसांनी
चंदनच्या राहत्या घरी जाऊन त्याला अटक केली नि पोलीस
स्टेशनला आणले. सुरुवातीला चंदन कबूल होत नव्हता.पण
शेवटी कबूल झाला की त्यानेच माधवरावांचां खून केला.
लवकरच त्याच्यावर कोर्टात खटला दाखल करण्यात आला.
ही खबर जेव्हा माधवीला अपहरण करत्याने दिली तेव्हा
माधवी धाय मोकलून रडू लागली नि त्याला विनंती करू लागली
मला माझ्या वडिलांचे अंतिम दर्शन घेऊ दे. प्लीज !" त्यावर तो म्हणाला," सोडेन पण एका अटीवर." लगेच तिने विचारले की,
" कोणती अट ?" त्यावर तो उद्गारला की , " आपली अट एकच आहे, आणि ती म्हणजे तू माझ्याशी लग्न कर बस्स !"
" ठीक आहे, लग्न करेन मी तुझ्याशी पण आदी मला माझ्या वडिलांकडे घेऊन चल."
" ओके ! मी तुला तुझ्या बापाच्या घरी नेऊन सोडतो.
पण वचनाला जागली नाहीस तर तुझी गाठ माझ्याशी आहे.
हे ध्यानात ठेव.आता फक्त तुझे अपहरणच केले आहे. पण
वचन पाळले नाहीस तर मात्र तुझे काय करीन ते आत्ताच सांगता येणार नाही."
" नाही फिरणार. पण एकदा मला तुझा चेहरा तर दाखव."
" ठीक आहे." असे म्हणून त्याने आपल्या चेहऱ्यावरचे
मास्क काढले. त्याचा चेहरा पाहून तिला आठवले की प्रार्थमिक
शाळेत असताना तिला एका मुलाने छेडले होते. त्यानंतर तिने
त्याची तक्रार मुख्यधापकाकडे केली.मुख्याध्यापकांनी त्याच्या
वडिलांना शाळेत बोलविले. आणि त्याची रवानगी पोलीस स्टेशन मध्ये करविली . पुढे त्याला त्या शाळेतून काढून टाकण्यात आले. वय लहान असल्याने कोर्टाने त्याला बाल सुधार गृहात पाठविले. परंतु तो तिथं सुधारला तर नाहीच उलट तो टपोरी झाला. रंगेश हे त्याचे नाव आहे. बदला घ्यायचा
म्हणून त्याने तिचे अपहरण केले होते. तिने त्याला
ओळखले ती त्याला म्हणाली," रंगेश तू ?"
" हां मीच रंगेश , तुझ्यामुळे माझं सारे करिअर बरबाद झाले
म्हणून तूच ते आता आबाद करायचे आहे, अर्थात माझ्याशी
लग्न करून. काय मग करशील ना माझ्याशी लग्न ? "
" हो करीन."
" आणि जर का मला धोका देण्याचा प्रयत्न केला तर ज्या
मार्गाने तुझा बाप गेला आहे ना, त्याचं मार्गाने तुझी आई पण
जाईल आणि शेवटी तू देखील जाशील. म्हणून विचार कर."
" ठीक आहे, नाही देणार मी तुला धोका." त्यानंतर रगेश
तिला तिच्या आई कडे घेऊन गेला. आईला तिने त्याची ओळख
एक मित्र म्हणून करून दिली आणि ह्यानेच मला गुंडाच्या
हातून सोडविले असे खोटेच सांगितले. तिच्या आईला पण ते
खरे वाटले. त्यानंतर माधवरावांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
करण्यात आला. तेव्हा त्याने तिला तिच्या वचनाची आठवण
करून दिली. तेव्हा ती म्हणाली," मी तुझ्याशी लग्न करेन परंतु
त्यासाठी तुला थोडं थांबावे लागेल. कारण तुझ्या बद्दल माझ्या
मनात थोडेसे प्रेम तर निर्माण झालं पाहिजे. म्हणून काही दिवस वाट पहा. तू जर माझ्या आईची देखभाल सख्या मुला सारखी केलीस तर मी तुझ्याशी नक्की लग्न करेन." त्यावर तो म्हणाला," ठीक आहे मी वाट पाहीन त्या दिवसाची."
पोलिसांनी चंदन ला अटक केली नि कोर्टात त्याच्या विरुध्द
खटला दाखल केला. लवकरच कोर्टात केस उभी राहिली. पोलिसांकडे त्याच्या विरोधात भक्कम पुरावा होता. तो म्हणजे
तो शिपाई अर्थात आय विटनेस. त्या आय विटनेस मुळेच चंदन
केस हरला. म्हणून त्याला अद्दल घडविणे जरुरीचे होते म्हणून तो न्यायमूर्तीलां म्हणाला, " न्यायमूर्ति महोदय मी कबूल करतो की मंत्री माधवरावाचा खून मीच केला. कारण तो खून करणे फार जरुरीचे होते. माधवराव सारखी माणसचं आम्हां सारख्या तरुणांना वाम मार्गी लावतात. अर्थात गुन्हेगारीच्या दलदलीत
फसवितात आणि एकदा का माणूस दलदलीत फसला की त्याला दलदलीतून बाहेर पडता येत नाही. माधवराव सारख्या मंत्र्यांना वेळीच ठेचायला हवं आणि मी ते काम चोख बजावले आहे. म्हणून मी जे केलं त्याचा मला मुळीच पश्चात्ताप नाहीये. उलट अभिमानच आहे." असे बोलत असताना त्याने आपल्या
आजूबाजूला पाहिले. जवळच इन्स्पेक्टर तानाजी उभा होता.
त्याच्या कमरेला पिस्तूल लटकत होती. सर्व्हिस रिव्हॉल्वर त्याची
नजर पडताच त्याने मोठ्या शिताफीने हस्तगत केली नि सर्वांना
रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवत तो पुढे म्हणाला," न्यायधिश
महाशय एक खुनाची शिक्षा पण फाशी आणि दोन खुनाची
शिक्षा पण फाशीच मग मी दोन खून का करू नये ?" असे
म्हणून त्याने ते रिव्हॉल्वर विटनेस बॉक्स मध्ये उभा असलेल्या
शिपाई वर रोखली नि चाप ओढला. त्या रिव्हॉल्व्हर म्हणून
निघालेली गोळी आय विटनेस ला लागली नि तो जागीच
ठार झाला. त्यानंतर ते रिव्हॉल्व्हर इन्स्पेक्टर तानाजी कडे
फेकले. त्या नंतर न्यायधीश महाशय नी त्याला फाशीची
शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी सेंट्रल जेल मध्ये झाली
तिथे त्याची भेट सुंदर रावांशी झाली.तेव्हा सुंदर रावांनी त्याला
विचारले की, तू इथ कसा ?" तेव्हा त्याने घडलेली सारी हकीगत त्यांना ऐकवली.ते ऐकून त्यांना फार अत्यानंद झाला .
त्यानंतर त्यांनी विचारले की, त्याच्या मुली बद्दल काही कळले
काय ? म्हणजे तिला कोणी kidnap केले वगैरे ?"
" फार काही माहित नाही.पण रंगेश नावाच्या तिच्या एका
मित्राने तिची त्या गुंडांच्या हातून सुटका केली आणि त्याच
मुलाशी तिचं आता लग्न ठरले असे कळले आहे." हे ऐकून
सुंदर रावांना अतिशय आनंद झाला. कारण त्यांच्या मुलाच्या
नि सूनबाई च्या जीवनाला लागलेले गृहण कायमचे आता सुटले
होते.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा