बेवफा ११
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ११ |
" म्हणायला कशाला हवे , मला दिसत नाहीये का ?
कसा वागतो आहेस तो आपल्या बायकोशी ? थोडीशी जरी
शरम असेल ना, तुझ्याजवळ तर आत्ताच आपली सासरी जा
तुझ्या मेहुण्याचे अक्सिडंट झालंय. चांगलेच निमित्त मिळालंय.
सासुरवाडीला जा , मेहुण्याला पण बघून ये नि बायकोला
पण भेटून ये, जमल्यास स्वता सोबत घेऊनच ये."असं आईने
मला फर्मावले म्हणून मी बाईक घेऊन आलो तुला भेटायला."
" मग आलं तर चांगलच झालं ना ? तुम्ही स्वतः मला
भेटायला आल्यामुळे माझ्या आईच्या मनात ही आता संशय
येणार नाहीये."
" मला अजूनही कळत नाहीये की मी जे केलं ते योग्य का
अयोग्य ?"
पुढे.
ऋषी
मी घरी जाण्याचा विचार करीतच होतो इतक्यात प्राचीच्या
मॉम चां फोन आला नि त्यांनी मला आजची रात्री इथंच
राहण्याचा आग्रह केला.मी नकार पण देवू शकलो नाही.
आता राहणे भागच होते.मी मनात म्हटलं की आज ची रात्र
तर इथं राहायचं आहे, त्यात राहू इतके दिवस सोबत होतोच
ना, एका खोलीत मग तेव्हा काही झालं नाही आम्हा दोघां
मध्ये तर एका रात्री ने काय होणार आहे ? असा विचार करून
मनावर आलेले दडपण क्षणात दूर झालं.थोड्या वेळाने प्राची
चे वडील आले रुग्णालयातून.त्यांना जेवून परत इस्पितळात
जायचं होतं कारण रात्री ला एकट्यालाच पेशंट सोबत
राहण्याची परवानगी होती. मी विचार केला की आपणच
आजच्या वस्तीला इस्पितळात प्राचीच्या भावाची सोबत करू
आपल्या सासू सासऱ्याना पण बरे वाटेल नि आपल्यालाही
प्राची सोबत एका खोलीत झोपायला नको म्हणून मी प्राचीच्या
वडिलांना म्हटलं की, ड्याड आज मी रोहन सोबत राहतो
इस्पितळात " त्यावर प्राची चे वडील म्हणाले," नाही नको.
उगाच तुम्हाला कशाला त्रास तुम्ही रहा इथच मी जेवण करून
जाईन म्हणतो. आता ते नाहीच म्हणाले तर आपण काय बोलणार ना ? नाईलाजाने मला तेथे मुक्काम करणे भाग पडले.
सासरे बुवा जेवून इस्पितळात गेले रोहन साठी जेवण घेऊन.
त्यानंतर सासूबाई घरल्या आल्या. जेवणं वगैरे झाली आणि
आम्ही बसलो थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत
नंतर झोपायला म्हणून प्राचीच्या बेडरूम मध्ये जाणे आवश्यक होतं नाहीतर प्राचीच्या आईला संशय जेण्याची शक्यता होती. मी प्राचीच्या बेडरूम मध्ये गेलो नि प्राचीच्या बेडवरच झोपलो.
मला वाटलं की बेडवर झोपलो आहे, प्राची झोपेल कुठं तरी
बेडरूमच्या कोपऱ्यात पण तसे घडले नाही प्राची माझ्याच
बाजूला येऊन झोपली. मी जरा झोपेतच होतो त्यामुळे मी
नेमका कोठे झोपलो आहे, हेच विसरलो आणि प्राची ला
सुरभी समजलो आणि तिला मी माझ्या मिठीत घेतले. प्राची
पण विरोध केला नाही. ती पण मला बिलगली. मग काय
दोघांच्या ही भावना चाळवल्या आणि दोघं एक झालो. खऱ्या
अर्थात आज आम्ही एकरूप झालो. सर्व बंदने गळून पडली
आपोआपच. एकदम तृप्त मनाने एकमेकाच्या मिठीत झोपी
गेलो. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा ध्यानात आले की काल
रात्री आपल्या कडून काय घडलं ? इतके दिवस मी प्राची पासून
दूर पळत होतो तेच नेमके आपल्या कडून घडलं ? पण असं कसं घडलं आपल्या हातून ? नक्कीच प्राची ने आपल्या कडून
बळजबरी ने करून आपल्या कडून करवून घेतलं असणार ?
कारण असं पण मी तिच्या वर प्रेम करत नव्हतो. म्हणून मुद्दाम
हे घडवून आणलं असणार ? असा विचार माझ्या मनात येताच
माझ्या तळपायाची मस्तकाला भिडली मी तिच्या खांद्याला
पकडुन जबरदस्तीने हलवून जागे केले. ती झोपे मध्येच असल्या
मुळे मला ती स्वतःची मॉम समजली," ती मला म्हणाली, मॉम
कशाला मला जागे करतेस झोपमोड करायला." तसा मी चिडून
म्हणालो," अंग मी आहे, तुझा नवरा ऋषी ?" तशी डोळे
न उघडता म्हणाली," ऋषी तुम्ही कधी आले ?"
" अग डोळे उघड अगोदर." मी अधिकच चिडून म्हणालो.
तसे तिने आपले डोळे उघडुन माझ्या कडे पाहिले. आपल्या
बेडवर मला पाहून ती गडबडून उठली. तशी तिच्या अंगावर
असलेली चादर खाली सरकली तेव्हा तिला जाणीव झाली
की तिच्या अंगावर वस्त्र नाहीये. तशी लाजून पटकन चादर
उचलून आपले अंग झाकत म्हणाली," तुम्ही इथं कसे आणि
हा काय प्रकार आहे ?" त्यावर ऋषी चिडून म्हणाले," हे तू
मला विचारतेस उलट हे मी तुला विचारायला पाहिजे ? कारण
मी एकटाच झोपलेला असताना तू का माझ्या बाजूला येऊन झोपलीस ? "
" का झोपली म्हणजे ? मी बायको आहे तुमची माझा पूर्ण
अधिकार आहे, तुमच्यावर."
" हो, पण आपलं काय ठरले होतं ?"
" ते तुमची आठवा लग्नाच्या पहिल्या दिवशी मला एकटीला
सोडून गेले होते, तेव्हा आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर
आपण मला काय आश्वासन दिले होते ते आठवा जरा." तेव्हा
मला मी तिला काय सांगितले ते आठवलं. मी तिला म्हटलं
होतं की, मी माझं पाहिलं प्रेम विसरण्याचा प्रयत्न करीन नि
तुझा स्वीकार करीन पण त्या साठी मला थोडीशी सवड पाहिजे.
आणि त्या प्रमाणे मी तुम्हाला सवड दिली. आता तुम्ही तुमच्या
पहिल्या प्रेमाला विसरत नाही त्याला काय करणार ?"
" अच्छा म्हणून तू मला प्राप्त करण्याचा हा नवा मार्ग निवडला ?" त्यावर प्राची म्हणाली," मी नाही निवडला तर तुम्हीच तो निवडला."
" मी नको म्हणत असताना देखील तुम्ही माझं ऐकलं नाही
मग मी काय करणार ?"
" साफ खोटं तू आणखीन नको म्हणणार, उलट तूच चिकटली असशील मला."
" तुम्हाला नाही पटत तर जाऊ दे, नकळत घडलं असं समजा
नि विसरून जा."
" मी ही तेच म्हणतोय भावनेच्या भरात नकळत माझ्या कडून
ही घडलं असेल. झालं गेलं विसरून जाऊ काय ?"
" ते तुम्हां पुरुषासाठी विसरणे सोपे आहे हो, परंतु आम्हा स्त्रियांसाठी विसरणे हे एवढे सोपे नाही." असे प्राची ने म्हटलं
त्या वर मी विचारात पडलो की प्राची असं का म्हणाली असेल
काही कळत नाही. परंतु माझ्यासाठी म्हणाल तर विसरणे सोपे होते. त्यात होऊ नये पण झाली चूक त्याला काय करणार ?"
त्यानंतर मी रात्री घडलेला प्रंसंग विसरता यावा म्हणून झटपट
स्नान केले नि सासूबाई आणि प्रचीचा निरोप घेतला. तेव्हा
प्राची चेहऱ्यावर टेन्शन वगैरे काही दिसलं नाही त्यावरून
मी समजून गेलो की तिने सुध्दा रात्री जे काय घडले आम्हा
दोघांना पण विसरणे भाग आहे. मी मुंबईला आपल्या घरी
आलो नि सुरभी ला भेटायला तिच्या नवऱ्याच्या घरी गेलो तर
मला पाहून तिचा नवरा म्हणजे प्रकाश मला म्हणाला," जा आहे
आपल्या खोलीत भेटून घ्या. मला थोडं आश्चर्य वाटलें की
प्रकाश सुरभी चा नवराच मला सुरभी ला भेटण्याची संधी
देतोय म्हणजे काय ? मी जर त्याच्या जागी असतो तर मी
तिच्या प्रियकराला अजिबात भेटू दिलं नसतं भले तो तिच्यावर
प्रेम करत नाही परंतु लग्न तर झालं आहे तिच्या बरोबर. अरे
पण हा विचार मी का करतोय ? माझ्यासाठी तर ही गोष्ट
चांगलीच आहे ना, असा विचार करून मी सरळ सुरभी च्या
बेडरूम मध्ये गेलो तर सुरभी आपल्या बेडवर झोपलेली
मला दिसली. माझ्या पावलांची चाहूल लागली तसे तिने डोळे
उघडले नि मला पाहून उठून बेडवर बसली नि आश्चर्य व्यक्त
करत म्हणाली," तू आतमध्ये आलास कसा तुला माझ्या
बापाने ठेवलेल्या बॉडीगार्ड रोखले नाही का तुला ?"
" रोखले होते, परंतु तुझ्या नवऱ्या ने तसे करण्यास मनाई
केली."
" त्या वरूनच तू समजायचं होतं कशाला आलास आंत ?
तुला माहितेय त्या दोघांनी माझ्या बापाला फोन देखील केला
असेल इतक्यात."
" मग करू देत ना,मी घाबरतोस का त्यांना ?"
" इतक्यात विसरलास मागे केले होतं त्यांनी, तुझ्या सोबत."
" मी काहीही विसरलो नाही, पण तुला भेटायला मी आल्या
शिवाय राहणार नाही."
" तू वेडा आहेस का रे ?"
" हो वेडाच आहे मी , म्हणून तर तुझ्या प्रेमात पडलोय ना ?"
" बस कर, तुझं प्रेम आणि निघ इथून."
" अग पण मी तुला बघायला आलोना "
" इस्पितळात आलास मला पाहायला ते एक चालण्या सारखे
होतं परंतु हे माझं सासर आहे, इथं येत जाऊ नकोस. माझ्या
सासू ने जर तुला इथं पाहिलं तर सारे घर डोक्यावर उचलून
घेईल. म्हणून त्या घरी यायच्या अगोदर निघ जा इथून."
" पण तुझा नवरा तर काहीच बोलला नाही."
" तो नाही बोलणार , कारण त्याचं दुसरी कडे अफेर सुरू आहे."
" मग तू का राहतेस त्याच्याकडे ? चल आपण पळून जाऊ
कुठंतरी !"
" पळून जाणं एवढं सोपं नाहीये. माझ्या बापाने बॉडीगार्ड
ठेवले आहेत. त्यांनी जर समजलं ना तर तुझं काही खरं नाही. म्हणून सांगतोय मला भेटायला अजिबात येऊ नकोस. नाहीतर तुझं काही खरं नाही." इतकं बोलणे होईपर्यंत दोन बॉडीगार्ड शिरले आंत आणि त्यांनी मला पकडले मी गयावया करू लागलो, पण कशाचे काय ? त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. तरी बरं सुरभी मध्ये पडली नि म्हणून बच बचं वाचलो ; परंतु ते दोघेही मला वार्निग देत म्हणाले," पुन्हा जर सुरभीच्या आसपास जरी दिसलास तर आपल्या पायाने चालत जाणार नाही घराला तर सरळ तिरडी वरून स्मशानात जाशील." असे बोलून त्यांनी मला सोडून दिले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा