Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षडयंत्र २८

षडयंत्र २८
षडयंत्र २८

 



   " पप्पा माझ्या सासरच्या माणसांना कशापायी पकडले
तुम्ही ? माझे अपहरण करणारा  दुसरा कोणीतरी आहे."
   " काय म्हणतेस काय पोरी ?"पण तेवढ्यात पलीकडून
संपर्क च तुटला.माधवराव फक्त हॅलो ss हॅलो च करत राहिले
थोड्यावेळ. पण क्षणभर वेळाने एक भारदस्त आवाज
कानी पडला की,

 

पुढे

"  जे ऐकले तेच खरं आहे." त्यावर माधवराव चिडून म्हणजे की, तू आहेस तरी कोण ?" त्यावर तो म्हणाला," तेही लवकरच कळेल.चिंता करू नका, तुमची मुलगी एकदम सेफ आहे, मी तिला काहीही केलेलं नाहीये, उलट मी तिची फार काळजी घेतो तुमच्या पेक्षाही !" त्यावर माधवराव चिडून म्हणाले," अरे हे हिम्मत असेल तर समोर ये, नाही तुझे बोटी बोटी एवढे तुकडे करून कुत्र्याला  खाऊ नाही घातले तर नावाचा माधवराव नाही मी "
   " कोणी सांगितले की तुम्ही नुसते माधवराव राहणार आहात
म्हणून ? तुम्ही तर आमचे सासरे बुवा होणार आहात , मग तुम्ही आमचे कसे बरे तुकडे करणार , नाही म्हणजे तुमचीच मुलगी विधवा होईल ना हो, आणि जवान मुलीला कुणी विधवा करतं
का ? नाही ना ? बघा हां आताच काय तो नीट विचार करा, आयुष्यभर पांढरे कपाळ घेऊन फिरावे लागेल तुमच्या
मुलीला  , बरं दिसेल का ते ?" त्यावर माधवराव अजूनच चिडून म्हणाले, " माझा जावई बनण्याचे स्वप्न पाहतोस होय काय रे, रताळ्या !"
" अहो सासरे बुवा शिव्या काय देताय आपल्या होणाऱ्या जावयाला . अश्याने तुमचा जावई नाराज होईल. मग त्याचा
त्रास कोणाला होईल ..... तुमच्याच मुलीला ना , तेव्हा असं
करू नका. आपली पोरगी दिल्या घरी सुखी राहावी असे वाटत
असेल तर आपल्या जावयाला खुश ठेवायला लागतं. जसं की
तुम्ही आपल्या जावयाला म्हणजेच मला. मी खुश तर तुमची
मुलगी पण खुश ! आणि मी नाखूष तर तुमच्या मुलीचं काही
खरं नाही, म्हणून मला खुश ठेवा.हीच विनंती सासरे बुवा !"
   " चूप रे, आलाय मोठा माझा जावई बनायला.माझा जावई
बनण्याची लायकी तरी आहे का तुझी ?"
    " माझी लायकी काढता, आता बघाच तुम्ही, तुमच्या लाडक्या लेकीचे काय करतो ते. तिच्या शरीराचा एक एक अवयव कापून पार्सल करतो मी तुम्हाला .मग बसा त्या अवयवाला कवटाळून."असे म्हटल्यावर माधवरावांचा आवाज एकदम खाली आला. ते विंनतीच्या स्वरात म्हणाले," नको नको माझ्या मुलीला काही नको नकोस. तुला काय पाहिजे ते माग मी ते देईन पण माझ्या मुलीला काहीच करू नको. " त्यावर तो म्हणाला," आता कसं माणसा वानी बोललात तुम्ही सासरे बुवा ! हीच जर गोडीची भाषा वापरली असती तर आम्ही देखील मवाळ भाषा वापरली असती तुमच्यासाठी पण काही हरकत नाही. चूक झाली  ती सुधारु या. जसे की  चूक भूल द्यावी घ्या. नाही का ?"
   " मुद्याचे बोल."
  " मुद्याचे ना, लवकरच मुहूर्त काढतो नि लग्नाच्या दिवशी
बोलवतो मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला या फक्त." एवढे बोलून
फोन कट केला. माधवराव हॅलो हॅलो करत राहिले. पण समोरून आवाज येत नव्हता. म्हणून रागाने त्यांनी आपला मोबाईल भिरकावून दिला एका बाजूला . परंतु वस्तूवर राग काढून काय साध्य होणार आहे  ?उलट मोबाईल तुटला तर आपलेच नुकसान होणार  हे राग आलेला व्यक्तीला  कळत कसं नाही ? तेच कळेनासे झालंय मला. कदाचित कळत ही असेल म्हणा. पण वळत नाही. म्हणूनच की काय कुणीतरी म्हटलंय
कळतय  पण वळत नाही. हे पण एक कोडेच आहे , नाही का ? बायकांना राग आला की त्या तो राग त्या भांड्यावर काढतात. नाहीतर टेबलावर ठेवलेल्या वस्तू तरी राग काढतात. म्हणजे रागाने वस्तू इकडे तिकडे फेकतात. अगदी ती अवस्था माधरावाची झाली आहे .माधरावांना त्या अपहरण कर्त्याचा इतका भयंकर राग आला होता की विचारता सोय नव्हती. पण करणार काय  मुलगी अपहरण कर्त्याकडे होती. तो तिचं काय करील ते सांगता येत नव्हतं , म्हणून मनात आलेला राग गिळण्या व्यतिरिक्त ते काहीच करू शकत नव्हते. पण म्हणतात ना की राग आलेल्या माणसाची विवेक बुध्दी कुठं तरी हरवल्या गत होते. म्हणजे बघा ना,  त्यांच्या कडे एक उपाय होता आणि तो उपाय म्हणजे त्यांनी तो मोबाईल पोलिसांना नेऊन दाखवला असता तर पोलिसांनी लोकेशन वरून ओळखले असते ना त्यांना कॉल कोणत्या स्थानावरून आलाय तो, परंतु त्यांनी मोबाईल जोराने भिरकावून दिल्या मुळे तो जमिनीवर आपटला नि त्याचा डीस्लपे गेला. पण करणार काय शहाणपण नेहमी उशिरा सुचते ना ? तिथंच सारी गडबड होते.असो -
 
  तो जेव्हा माधवराव शी बोलत असतो तेव्हा माधवी  त्याच्या हातून मोबाईल काढून घेण्यासाठी झोंबाझोबी करत असते. परंतु तो काही तिला मोबाईल देत नाही. फोन कट केल्यावर मात्र तिला तो मोबाईल देतो, म्हणून ती लगेच आपल्या वडिलांना
फोन लावते. पण फोन लागतच नाही. म्हणजे स्विच ऑफ चा मॅसेज सारखा येऊ लागतो , म्हणून ती रागाने मोबाईल आपटणार असते. परंतु त्याच्या ते लक्षात आले तसा तो तिचा हात वरच्या वर पकडुन मोबाईल खेचून घेत म्हणाला," अरे, अरे, मोबाईल तोडून काय होणार आहे ? फोन लागणार आहे का ? नाही sss तुझ्या बापाने आपला मोबाईल तोडला म्हणून लागत नसेल कदाचित." तशी ती रागाने बोलली, " तुला कसं माहीत की त्यांनी आपला मोबाईल तोडला असेल?" त्यावर तो हसून म्हणाला ," सिंपल शी गोष्ट आहे , माणूस राग आल्यावर काय करतो तर आपला राग वस्तूवर काढतो, पण त्याचा काही उपयोग आहे का ? पण लोकांना कळत नाही त्याला काय
करणार आपण ?" त्यावर ती अधिकच चिडून म्हणाली,"अरे
पण तू आहेस तरी कोण ? आणि का पळवून आणले आहेस मला ?" त्यावर तो एकदम शांतपणे म्हणाला," सांगतो. तुझ्या पहिल्या प्रश्नांचे उत्तर हे आहे की मी तुझा प्रेमी आहे, फार प्रेम करतोय मी तुझ्यावर. आणि तुझ्या दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर हे आहे की मी तुला माझी राणी बनवू इच्छित आहे."
   " पण मला नाही करायचं तुझ्याशी लग्न."
   " पण मला करायचं आहे ना ?"
   " का ? जबरदस्ती आहे ?"
   " आता जर तू गोडी गुलाबीनेने ऐकली नाहीस तर जबरदस्ती
करावीच लागेल मला ."
   " बापाचा माल आहे."
  " माझ्या बापाचा नसला तरी तुझ्या बापाचा तर आहे ना ? आणि जेवढ्या लवकर तू हे समजशील तेवढं तुझ्या हिताचं आहे. नाहीतर जबरदस्ती पण करता येते मला. पण तेवढी वेळ
मात्र माझ्यावर आणू नकोस.आणखीन एक महत्वाचं म्हणजे
जेवण आणलय ते जेवून घे. नाहीतर रात्री सारखे उपाशी
राहावे लागेल. जेवण वेस्ट केलेलं मला चालत नाही. शिवाय
अन्न फेकून अन्नाचा अपमान नसतो करायचा. नाहीतर ते
पुन्हा मिळत नाही. जसे तू रात्री रागाने थाळी फेकलीस म्हणून तुला मी उपाशी ठेवले. तेव्हा पुन्हा तशी चूक करू नकोस. मी
परत येईपर्यंत जेवून घे. आपल्याला लग्न विषयी बोलायचे
आहे थोडे. म्हणून जेवून घे पटकन."असे म्हणून तो बाहेर
निघून गेला नि त्याने बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. माधवी चे लक्ष आता त्याने आणलेल्या थाळी कडे गेले. मघाशीच तो तिच्यासाठी जेवण घेऊन आला होता आणि घाई गडबडीत आपला मोबाईल तिथच विसरून गेला होता का मुद्दाम ठेवून गेला होता ते देवच जाणे ! पण मोबाईल टेबल वर विसरून गेला  होता.हे बाकी खरं तिची नजर मोबाईल वर पडताच ती पळतच आली नि मोबाईल उचलून तिने आपल्या वडिलांना फोन लावला. पण इतक्यात अपहरण कर्ता परत आला कदाचित त्याच्या ते ध्यानात आले असावे की आपण आपला  मोबाईल तिथच विसरून आलोय. दरवाजा उघडून तो जसा
आंत आला तशी त्याची नजर तिच्या हाताकडे गेली तिच्या
हातात मोबाईल पाहून तो तिच्या जवळ आला नि  तिच्या हातातून मोबाईल हीचकावून घेतला होता आणि जाता जाता
तो तिला धमकी देवून गेलाय की जेवून घे आणि जर का रात्री
प्रमाणे  जेवण फेकलेस तर परत मिळणार नाही . तेव्हा
जेवणावर राग काढायचा नाही जेवण हे अन्न परब्रम्ह असते.
कळलं का ? असे बोलून तो तेथून निघून ही गेला. एकदा
तिच्या मनात विचार आला की जेवण भिरकावून द्यावे पण
लगेच तिला त्याने दिलेली धमकी आठवली तशी ती न भिरकवता त्या जेवणा कडे पाहून म्हणाली," आता जेवण
जेवल्या शिवाय पर्याय नाहीये.उपाशी तर राहू शकत नाही.
आधीच रात्री पासून उपाशी आहे, आणि भूक पण फार लागली
आहे, खाऊन घेते. जोपर्यंत इथून सुटका होत नाही तोपर्यंत त्या अपहरण कर्त्याचे ऐकावेच लागणार,  नाहीतर ना काही खाता पिता असेच मरून जाईन मी !"  असा विचार करून ती जेवायला बसली. जेवण तिच्या आवडीचे होते. नॉनव्हेज असल्याने ती त्याच्या वर तुटून पडली. रात्री देखील उपाशी असल्याने तिला भूक पण लागली होती. मग काय भुके सारखी तिने पटापट खाऊन घेतले. ती जेवत होती तेव्हा दरवाजाच्या बारीक छिद्रातून दोन डोळे तिला पाहत होते ; परंतु हे तिला ठावूकच नव्हते. तिला जास्तच भूक लागली होती त्यामुळे तिचे पोट भरले नव्हते. अजून मिळाले असते तर अजूनही खाल्ले असते: पण त्याच्या कडे मागणार कसे ? म्हणून तेवढेच खाऊन उठली हात धुतले. रिकामे ताट बाजूला ठेवून कॉट बसली नि विचार करू लागली की ज्याला आपण आपला पती मानला त्याला आपली अजिबात फिकीर नाही. आणि ज्याला आपण कधी पाहिलं देखील नाही तो आपल्यावर जीवापाड प्रेम करतोय. गुंड जरी असला तरी आपल्या बद्दल त्याच्या मनात माया आहे, प्रेम आहे. आपल्या वर त्याचं फार प्रेम आहे ते जर नसतं तर त्याने आपल्या सोबत काही पण करू शकला असता की तो. आपण त्याचं काय बिघडवू शकले असते म्हणा ? त्यांचं म्हणणे आहे की त्याचं प्रेम मी शाळेत असल्या पासून चे आहे, पण मी कशी ओळखत नाही त्याला ? पण  त्याचा आवाज तर ओळखीचा वाटतोय पण ओळख पटत नाही.कोण असावा बरं हा ? छट काहीच आठवत नाहीये. शिवाय हा अकडू आपलं  नाव ही सांगत नाहीये. कसं कळणार ? आपण जर ह्याला लग्नाला होकार दिला तर हा आपल्याला आपला चेहरा दाखवेल. पण आपले प्रेम तर प्रेम वर आहे, मग ह्याच्या प्रेमाचा आपण कसा काय स्वीकार करू शकतो ? पण ह्याच्या प्रेमाचा आपण स्वीकार केला नाही तर हा आपल्याला काही सोडणार नाही. आणि प्रेम ला तर आपली अजिबात फिकीर नाहीये. त्याचं प्रेम फक्त नि फक्त लीलावर आहे, इतक्या दिवस आपण त्याच्या सोबत पत्नी म्हणून राहतोय परंतु त्याने आपल्याला पती चे प्रेम दिलेच नाही कधी ! त्या  पेक्षा हा kidnapar आपल्यावर किती प्रेम करतोय. जसा आपल्याला नवरा पाहिजे होता अगदी तसाच आहे हा, म्हणजे आपल्याला नवरा कसा पाहिजे होता तर आपली खूप काळजी घेणारा आणि हा तसा आहे,  परंतु हा मनुष्य आहे कोण,  हे जर कळलं असता तर बरं झालं असतं नाही का ? तिने स्वतःशीच प्रश्न केला.

   माधवराव एकदम सुन्न झाले त्यांना कळत नव्हते की
आपल्या मुलीचे अपहरण कोणी केले ? आणि का केले असेल ? आपला कुणी वैरी तर नसेल ना ? पण कोण वैरी आहे ते तर कळायला हवं ना ? त्यांच्या डोक्यात विचारांचे थैमान चालू होते. इतक्यात प्रेम म्हणाला," सासरे बुवा आता तरी खात्री पटली ना तुमची की तुमच्या मुलीचे अपहरण करण्या मागे आमचा हात नाहीये." पण माधवराव त्यावर काहीच बोलले नाहीत. तसा प्रेम पुढे म्हणाला," आता तरी सोडा आम्हाला."
त्यावर माधवराव म्हणाले," अजिबात नाही, जोपर्यंत माझी
मुलगी मला सापडत नाही तोपर्यंत तुम्हां लोकांची इथून सुटका
नाही. " असे बोलून माधवराव म्हणाले," चंदन ह्या सर्वांना
एका खोलीत बंद तर करून ठेवच. शिवाय ह्यांच्यावर करडी
नजर ठेव. मला अजून ही असंच वाटतंय की तो kidnapar
ह्यांचाच माणूस असावा." असे म्हणून ते तेथून चालते झाले.
तसा चंदन म्हणाला," प्रेम बाबू चला तुम्ही सर्वजण एका
खोलीत. " त्यावर प्रेम म्हणाला की, चंदन , खरंच तेच सांगतोय आमचा ह्या किडनपिंग मध्ये अजिबात हात नाहीये. उलट
मला सोडले तर माधवी शोध घेण्यास मी तुमची मदतच करीन
कारण मी जरी तिला आपली पत्नी मानत नसलो तरी तिचं
माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं आणि माधवी मला आपला
पती मानत होती, मग मी असं का करेन ?" त्यावर चंदन
म्हणाला," मला माहित आहे, तू असं करू शकणार नाहीत
पण मी हुकुमाचा ताबेदार मी तुझी मदत काय करू शकतो ?"
   " तू एक काम करू शकतोस ?"
   " ते कोणते ?"
   " मला तू सोड. मी तुझ्या सोबत येतो माधवी चां शोध घ्यायला."
    " पोलिस शोधताहेत ना, शोधू दे त्यांना. तू इथच रहा.कारण
मालकांनी मला तशी ऑर्डर दिली आहे.चल आंत हो मला
बाहेरून दरवाजा बंद करायचा आहे." असे म्हणून त्याने प्रेम
ला जबरदस्तीने आंत ढकलून दिले नि बाहेरून दरवाजा बंद
करून घेतला.

क्रमशः
   



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..