बेवफा ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ९ |
सर्वांना चहा नाश्ता दिल्या नंतर प्राची आपल्या
सासू-सासऱ्यांची परवानगी घेऊन आपल्या आईच्या घरी
निघून गेली. पनवेलच्या लोकल मध्ये बसली नि खिडकी
जवळ बसली नि खिडकीतून बाहेर पळणाऱ्या झाडाकडे
पाहत आपल्या गत जीवना विषयी विचार करू लागली.
की कॉलेज मध्ये असतांना मला एका मुलाने प्रपोच केलं होतं पण मी त्याला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही
तेव्हा माझा विचार तू आपल्या मनातून काढून टाक."
त्यावर त्याने मला विचारले," पण तू का माझ्यावर प्रेम
करत नाहीस ? माझ्यात काय कमी आहे."
" तुझ्यात काही कमी नाही रे, पण मला प्रेम करायला आवडत नाही."
" आश्चर्य आहे,तुला प्रेम करायला आवडत नाही म्हटल्यावर."
" आश्चर्य तुझ्यासाठी आहे ते. माझ्यासाठी नाही."
" काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का ?"
" हो चांगलंच. मुलं अगोदर पूस लावतात आपल्या
प्रेमात ओढतात नि आपलं काम झालं की होतात मोकळे.
ती बसते नंतर रडत नाहीतर आत्महत्या तरी करते." आपण असं मी का म्हटलं ते त्यावेळी कळलं नसेल त्याला. आपल्याला तरी तेव्हा कुठं माहीत होतं. एका सोबत तसं घडलं म्हणजे सगळ्या सोबतच तसं घडतंय म्हणून पण तसं वाटणं पण तेव्हा साहजिकच होतं, कारण आपल्या चुलत बहीण सोबत तसं घडलं होतं. कॉलेज मध्ये असतांना तिचं एका मुलावर प्रेम जडलं , सुरुवातीला तिला वाटलं आपल्या इतकी भाग्यवान मुलगी दुसरी कुणी नाही. इतका तो तिला आवडत होता आणि का आवडू नये तिची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत होता. म्हणून ती त्याच्यावर डोळे झाकून विश्वास करू लागली होती. त्याच्याच फायदा घेत तिला त्याने मर्यादा ओलांडायला भाग पाडले. म्हणाला की आपण दोघेही एकमेकांवर प्रेम करतोय नि लवकरच लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहोत ना, मग शारीरिक भूक आता भागवली काय नि नंतर भागवली काय दोन्ही सारखेच की, माझी ताई त्याच्या भूलथापांना फसली आणि नको ती चूक करून बसली. मग काय एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा होऊ लागली. परंतु निसर्ग मात्र कधी चूक करत नाही. लवकरच तिला दिवस गेले. तिला जशी जाणीव झाली तशी तिने त्याला कल्पना दिली. तेव्हा तो तिला म्हणाला," लग्ना अगोदर मूल नकोय आपल्याला. हे मूल तू पाडून टाक." त्यावर माझी ताई त्याच्या वर चिडली नि म्हणाली," अरे, असं कसं म्हणतोस आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे ही." त्यावर तो चिडून म्हणाला," हे बघ प्रेमा , प्रेम वगैरे ठीक आहे, पण दोघांच्या प्रेमात हा तिसरा अडथळा कशाला तेव्हा हे मूल नकोस. गर्भपात करून टाक तू ." त्यावर प्रेमा म्हणाली ," अजिबात नाही. मी ह्याला जन्म देणार." त्यावर तो म्हणाला," असं असेल तर मग
आजपासून तुझा मार्ग वेगळा नि माझा मार्ग वेगळा."
" अरे काय बोलतोहेस तू हे , मूल फक्त माझंच आहे का ते ?"
" म्हणून तर सांगतोय गर्भपात कर म्हणून." पण माझी
ताई त्या गोष्टीस तयार झाली नाही. म्हणून त्याने ही तिच्या सोबत असलेले संबंध तोडून टाकले. माझी ताई एकाकी पडली काय करावे ते तिला सुचेना, आणि ही गोष्ट
काही जास्त दिवस लपून राहत नाही. तिच्या आईला म्हणजे माझ्या काकी ला एक दिवस समजलेच. तेव्हा
माझ्या ताई वर चिडली नि म्हणाली," काय करून बसलीस तू हे, उद्या जर तुझ्या बापाला हे समजलं तर इज्जतीपाई विष खाऊन मरेल तुझा बाप. आता मी काय
करू ?" स्वतःच्या कपाळावर हात मारून घेत त्या म्हणाल्या. तसे ताईने रडत रडत काकू ला सविस्तर हकीकत सांगून टाकली. तेव्हा काकूंनी ताईला विचारले
की, " कोण आहे तो मुलगा, चल मला घेऊन त्याच्या घरी !" ताई काकू ला घेऊन त्या मुलाच्या घरी गेली. परंतु
त्या मुलाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाची चूक तर कबूल केलीच नाही उलट काकू ला उपदेशाचे डोस पाजले.
तेव्हा माझी ताई म्हणाली," जरा रुद्र ला बोलवा ना बाहेर ?" त्यावर त्याची आई म्हणाली," कशाला ? आमच्या मुलाला आम्ही चांगले वळण दिले आहे,तो असं
गैरवर्तन करणारच नाही. आम्हाला खात्री आहे त्याची.
पण तरी देखील तुम्हां लोकांची खात्री होण्यासाठी मी त्याला बाहेर बोलावते. " असे म्हणून त्यांनी रुद्र ला बहर बोलविले. तसा रुद्र बाहेर आला. ताई वाटलं की आपल्या आई-वडीला तो समोर कबूल होईल. पण तसं काही घडलं नाही. त्याने चक्क सांगितले की ह्या मुलीला मी ओळखत च नाही म्हणून. मग काय त्याच्या आईने माझ्या काकू ला चांगलं च सुनावलं. आपल्या मुलीला चांगले वळण लावले नाही. केले असेल दुसऱ्या कुणा मुला सोबत आपलं तोंड काळं नि आता कुणी नाही मिळालं तसं माझ्या मुलाच्या नावावर बिल फाडलं. तेव्हा माझ्या ताईला खूप राग आला गेली तरातरा चालत त्याच्या जवळ नि त्याच्या थोबाडीत ठेवून देत म्हणाली. माझ्या सोबत स्वतःचं तोंड काळं करतांना तुला लाज कशी वाटली नाही रे तुला ? " पण त्यावर तो काहीच बोलला नाही ; परंतु त्याच्या आई ने मात्र ह्या दोघींना अपमानित करून घरातून बाहेर काढलं. त्या दोघी मायलेकी घरी यायला निघाल्या. परंतु काकू ने ताईला शिव्यांची लाखोली वाहिली. कशाला जन्माला आलीस ? आम्हांला जिवंतपणी मरण्याच्या यातना
भोगायला ? त्या पेक्षा जन्मतःच मेलीस का नाही ?
निदान हा दिवस तरी पहावा लागला नसता ? वगैरे...
ताई मुकाट्याने घरी आली. आपल्या खोलीत गेली नि
ओढणी पंख्याला टांगून गलपाश लावून घेतला. काकू चा
राग शांत झाल्यावर बेडरूम मध्ये जाऊन पाहते तर ताई लटकत आहे पंख्याला. तिने एकदम हंबरडाच फोडला. तिने आपल्या आईचे शब्द खरे करून दाखविले होते तिने. त्या दिवसापासून आपल्याला प्रेम या शब्दाचा तिटकाराच आला म्हणून मी कुणाशी ही प्रेम नाही केलं. म्हटलं अरेंज मॅरेज चांगलं. पण इथं ही तोच प्रकार आता विश्वास तरी कुणावर आणि कसा ठेवावा ? एकदा एकदा असं वाटतं की सरळ माहेरी निघून यावे. परंतु परत मनात विचार येतो की माहेरी येऊन तरी काय करणार ? आई-वडिलांना दुःखीच करणार ना ? त्या पेक्षा सासरी राहून जेवढं जमेल तेवढं सोसत रहायचं बस्स ! " विचार करण्याच्या नादात कधी पनवेल स्टेशन आलं ते कळलंच नाही. मला मानव
सरोवर स्टेशनवर उतरायचं होतं. परत त्याच लोकल मध्ये
बसून मानवसरोवर स्टेशन ला नि उतरले नि रिक्षा पकडून पटेल प्लाझा जवळ उतरली नि चालत माझे आई-वडील राहत असलेल्या टॉवर मध्ये शिरली. घरी गेले तर घरी कुणी नव्हते म्हणून शेजारच्या काकूंना विचारले तर त्या म्हणाल्या," तुझे आई-बाबा इस्पितळात गेलेत." तेव्हा मी न समजून विचारले ," कशाला ?" त्यावर त्या आश्चर्य व्यक्त करत म्हणाल्या ," म्हणजे तुला ठाऊकच नाही की काय ?"
" कशा संबधी बोलताय तुम्ही ?"
" तुझ्या भावाचं आक्सिडंट नाही का झालं काल ?"
बातमी ऐकून मला एकदम धक्काच बसला. माझ्या भावाचं
अक्सिडेंट झालं नि मला कुणी सांगितलं ही नाही." असा
विचार केला नि मग काकूंना विचारले," कोणत्या इस्पितळात ऍडमिट केलंय त्याला." त्यावर त्या म्हणाल्या
" डॉ. डी. व्हाय. पाटील इस्पितळात ऍडमिट केलंय त्याला. तिथं तू जाणार असलीस तर मी सुद्धा येते तुझ्या सोबत ." आता काय बोलावे या बाईला , म्हणे तू येणार
असशील तर ! माझ्या भावाचं अक्सिडेंट झालंय मी जाणार नाही का , इस्पितळात त्याला पाहायला ?"
" अगं एवढ्या दुरून आली आहेस तर घटका भर बैस
तरी! पाणी वगैरे पी जरा, मग दोघी पण जाऊ सोबत."
मग मी त्यांच्या घरात सोफ्यावर बसली. काकूंनी मला
प्यायला पाणी आणून दिले. त्यानंतर चहा आणला.
मी चहा घेतला नि काकू सोबत निघाले. तेव्हा मनात म्हणाले," अगोदर जर माहीत असते तर नेरुळ स्टेशन लाच उतरली असती. उगाच एवढा लांब हेलपाटा झाला.
मांनवसरोवर स्टेशनवर आलो तर लोकल आलेलीच होती
लगेच लेडीज बोगीत चढलो. नेरुळ स्टेशन येताच लोकल
मधून उतरलो नि प्लॅटफार्म वरून हायवे वर आलो नि एका
आटो रिक्षात बसलो नि त्याला म्हटलं, " डॉ. डी व्हाय पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. थोड्याच वेळात डॉ.
डी व्हाय पाटील हॉस्पिटल समोर त्या रिक्षावाल्याने सोडले. मी लगेच माझ्या मोबाईल वरून आईला कॉल करून विचारले ," कोणत्या मजल्यावर आहात तुम्ही ?" तेव्हा आईने विचारले की तू कोठून बोलत आहेस ?" मी म्हटलं, डॉ. डी. व्हाय पाटील इस्पितळाच्या तळ मजल्या वरून बोलतेय." तेव्हा आई म्हणाली," सहाव्या मजल्या वर ये." मग आम्ही लिफ़्ट मध्ये शिरलो नि सहाव्या मजल्या वर उतरलो नि जनरल वार्ड मध्ये गेलो तिथं आई-बाबा उपस्थित होते नि बेडवर बँडेज मध्ये लपेटलेला माझा भाऊ मला दिसला. मी त्याच्या बाजूला जाऊन बसले नि त्याची विचारपूस करत त्याला विचारले की हे कसं झालं ? " त्यावर तो म्हणाला ," काही नाही गं मी माझ्या बाईक ने चाललो होतो, अचानक एक म्हातारा रोड क्रॉस करत होता. त्याला वाचवण्यासाठी मी अर्जंट ब्रेक घेतला तर माझी बाईक स्लिप झाली नि मी जमिनीवर कोसळलो. म्हातारा वाचला पण माझा पाय पक्चर झाला."
" अच्छा म्हणजे त्या म्हताऱ्याचा जीव तू वाचविलास. असंच ना ?"मी विचारले
" हो." रोहन उद्गारला. मी आईवर नाराज होत म्हणाली,
" काय गं आई, काल तुम्ही दोघे मला भेटायला आला नि
मला न भेटताच निघून आला."
" अगं तुझ्या भावाचं अक्सिडंट झाले हे ऐकून च आमचे
हात पाय गळाले मग कशाला थांबतोय तेथे आम्ही लगेच निघालो."
" अगं मग एक फोन तरी करायचा होतास, मी किती
घाबरले होते काय झालं नि काय नाही."
" चुकलं खरं आमचं. पण खरं सांगू मला काही सुचेनासे
झालं होतं बघ. म्हणून तुला फोन करायचे विसरून गेले."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा