Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षडयंत्र २६

षडयंत्र २६
षडयंत्र २६

 



     मधुराबाई तर नुसत्या भांबाहून  जाऊन सारे दृश्य पाहत होत्या. क्षणभर त्यांना कळलेच नाही काय करावं ते. पण नंतर भानावर आल्या तसे त्यांना जाणवले की आपला मुलगा इथं बेशुद्ध होऊन पडलाय नि सूनबाईचे अपहरण झाले आहे.पण हे सारे कोणी केले हे त्यांच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. प्रथम त्यांनी तिथे बघे म्हणून उभे असलेल्या लोकांच्या मदतीने प्रेम ला मोटारीत मागच्या सीट वर बसविले नि स्वतः ड्रायव्हिग सीट वर बसून मोटार रुग्णालयाच्या दिशेने पळविली.

पुढे

      इस्पितळात घेऊन जाई पर्यंत प्रेम शुद्धीवर पण आला.
शुद्धीवर येताच तो इकडे तिकडे पाहू   लागला तसे त्याला
जाणवले की आपण मोटारी मध्ये आहोत. तसे त्याला काही
वेळा पूर्वीचे सारे दृश्य डोळ्या समोर दिसले तसे त्याने विचारले
की लीला कुठं आहे ?" तेव्हा त्याची आई म्हणाली,"लीला चे कुणीतरी अपहरण केले आहे."  त्यावर प्रेम पटकन म्हणाला की, असं एकच व्यक्ती करू शकतो आणि तो म्हणजे माधवी बाप माधवराव ?"
   " पण तुला असं का वाटतं की हे काम त्यांचेच असेल."
   " दुसरा कोण आहे आपला दुश्मन ?"
   " तेही खरंच आहे म्हणा. पण आता पुढे काय करायचं ?"
   " काय करायचं म्हणजे त्यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला जाऊन  कम्प्लेंट करायची अजून काय करणार दुसरं ?"
   " ते ठीक आहे रे, पण असं हातावर हात घेऊन गप्प
बसून तर चालणार नाही."
   " गप्प थोडीच बसणार आहोत, माझ्या लीलाच्या केसाला
जरी धक्का लागणार ना, तरी त्यांच्या मुलीची मी वरात काढल्या
शिवाय गप्प राहणार नाही "
   " अरे पण त्यांच्या मुलीने काय केलंय ?"
  " काय केलंय ? तीच तर ह्या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. परंतु आता नाही सोडणार मी तिला."
   " हे बघ असा काही गडबडीने कोणताही चुकीचा निर्णय
घेऊ नकोस.अगोदर खरं काय आहे याचा शोध घे. मगच काय
तो निर्णय घे." इतकं बोलणे होईस्तोवर त्यांची मोटार पोलीस
स्टेशन ला पोहोचली होती. दोघेही माय लेक मोटारी मधून खाली
उतरली नि पोलीस स्टेशन मध्ये शिरले.त्यानंतर त्या दोघांनी पोलीस स्टेशनला  रीतसर तक्रार नोंदली. तेव्हा इन्स्पेक्टर तानाजी ने विचारले की, आपला कोणावर संशय आहे का ?" प्रेम ने पटकन माधवरावांचे नाव घेतले. तेव्हा इन्स्पेक्टर तानाजी विचारले , " पण ते का असं करतील ? नाही म्हणजे ते तुमचे सासरे आहेत ना  ?" तसा प्रेम चिडून म्हणाला," ते माझे कुणी नाहीत . जबरदस्तीने ते आपली मुलगी माझ्या गळ्यात बांधू पाहत आहेत."
   " अहो मग चांगलं आहे की लोकांना एक बायको मिळत
नाही आणि तुम्हाला तर दोन बायको एकदम वापरायला मिळतील तर तुम्हाला त्या नको आहेत. मला जर असा योग आला असताना ना , तर मी हत्तीवरून साखर वाटली असती. आणि एक तुम्ही आहात तुम्हाला मिळत असूनही तुम्हाला ती
नकोय, म्हणजे  तुम्ही त्याचा फायदा घेत नाहीयेत." तश्या मधुरा बाई एकदम करारी आवाजात म्हणाल्या की, इन्स्पेक्टर थट्टा पुरे ! जास्त खाल्याने अजीर्ण होतं तसच जास्त थट्टा पण हानिकारक ठरते. समजलं. प्रेम चल  आता आपल्याला निघायला हवं. इतक्यात पोलीस स्टेशन मधला लण्डलाईन फोन खणखणला. इन्स्पेक्टर तानाजी ने रिसिव्हर उचलून कानाला
लावला नि पलीकडच्या व्यक्तीचे बोलणे ऐकलं नि लगेच
ओरडुन प्रेम ला म्हणाले," थांबा. प्रेम sss " असं म्हणताच
ते दोघेही आपल्या स्थानी थबकले. त्यांना वाटलं की नक्कीच
लीला विषयी काही माहिती मिळाली असेल इन्स्पेक्टर  ला
म्हणून ते दोघेही पटकन मागे वळतात नि इन्स्पेक्टर तानाजी
जवळ येत म्हणाले," माझ्या पत्नी  विषयी काही माहिती मिळाली आहे का तुम्हाला ?" त्यावर इन्स्पेक्टर तानाजी
म्हणाला," हो तुमच्या दुसऱ्या पत्नीचे  अपहरण झाले आहे
आणि तिच्या वडिलांनी अर्थात माधवरावांनी तुमच्या वर संशय
घेतला आहे, आता तुम्हीच सांगा काय करावे आम्ही ?"
   " अहो, पण आम्ही कशाला करू तिचे अपहरण ? आणि
आम्ही तर इथं तुमच्या समोर बसलो आहोत. आम्ही जसे
करू शकतो तिचे अपहरण ?"
   " अपहरण कर्ता काही स्वतः जात नाही कोणाचे ही अपहरण
करायला ? फक्त एक कॉल केला ना, की सर्व काही शक्य होतं
आज काल मोबाईल मुळे मोठ्यात मोठी कामे चुटकी सरसी
होतात, इंटरनेट मुळे सर्वकाही शक्य झालंय आता लोकांना.
एक कॉल केला की जे पाहिजे ते घरी पोहोचते. त्यामुळे आम्ही
इथ होतो तर हे कार्य घडलं कसं ? हे विचारणे चुकीचे ठरेल
आता."
  " म्हणजे, तुम्हाला म्हणायचंय की हे काम आम्ही केलंय ?"
  " फिफ्टी फिफ्टी चान्स आहेत. म्हणजे पोलिसांच्या नजरेत
तर सर्वच गुन्हेगार असतात ना,जोपर्यंत खरे गुन्हेगार सापडत
नाही तोपर्यंत, म्हणून तुम्ही दोघांनी त्यांची कन्या सापडत नाही तोपर्यंत हे शहर सोडून कुठं जायचं नाही."
   " तुमचा न्याय तर अजिबच आहे.चोर सोडून सन्यासी ला
फाशी !"प्रेम त्रागाणे बोलला. त्यावर इन्स्पेक्टर त्याच्या वर
न रागावता म्हणाला," काय करणार साहेब, आम्हाला कळतंय
की हे चुकीचे आहे, पण करणार काय ? कुणाच्या चेहऱ्यावर
तर लिहिलं नाही ना, कोण चोर नि कोण साव ? म्हणून आमच्या
नजरेत सर्वच गुन्हेगार जोपर्यंत असली गुन्हेगार सापडत नाही
तोपर्यंत आमचा संशय तर राहणारच सर्वावर,त्याला इलाज काय ?" त्यावर प्रेम आणि मधुरा तेथून निघून गेल्या.तेव्हा
त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहत इन्स्पेक्टर तानाजी एका
कॉन्स्टेबल ला म्हणाले की ह्यांच्या वर पाळत ठेवा." कॉन्स्टेबल
ने होकारार्थी मान डोलावली.

   प्रेम आणि मधुरा बाई पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले तरी
त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता की माधवी चे अपहरण
कोणी केलं असेल ? आणि ते पण आपल्या घरातून ? कोण
करू शकतो असं ? परंतु त्या दोघांना काही उत्तर सापडले
नाही. ते आपल्या मोटारीत बसून घरी आले. घरी आल्यावर
त्या मायलेकाने आपल्या घरच्या नोकर माणसांकडे चौकशी
केली असता असे समजले की, तिला कोणाचा तरी फोन आला
होता. त्या फोन वर काय बोलणे झाले ते समजले नाही परंतु
त्या फार खुश होत्या. त्या फोन वर इतकंच म्हणाल्या की,
थँक्यू पप्पा तुम्ही आज सर्वात मोठे माझे काम करविले.मी येते
तिकडे आज आपण दोघांनी आज चा दिवस सेलिब्रेट करू या ." बस इतकंच समजलं त्या कोणत्या कामाविषयी बोलत
होत्या ते मात्र कळले नाही." एक नोकर उद्गारला. तसा प्रेम
म्हणाला,"पण मला कळले, ती असं का म्हणाली ते." लगेच
मधुरा बाई ने विचारले की ती असं का म्हणाली असेल ?"
   " सिपलं तिच्या बापाने फोन करून सांगितले असेल तिला
लीला चे अपहरण करण्यात आले म्हणून."
  " असे का वाटते तुला ?"
   " ह्या शिवाय दुसरी कोणती खुशीची बातमी असेल तिच्यासाठी ?"
   " हुं ss अगदी बरोबर बोलतो आहेस तू, पण मग माधवी
चे अपहरण कोणी केलं ?"
   " अग मॉम , ही त्यांची चाल असेल त्यांच्यावर कोणी संशय
घेऊ नये म्हणून.स्वतःच कुठं तरी लपवून ठेवलं असेल नि
खोटी कम्प्लेंट दिली असेल पोलीस स्टेशनला."
"  हुं sss तू म्हणतो आहेस तेही एका अर्थाने खरेच आहे.
पण आता आपण काय करायचं ?"
   " लीला चा शोध आपण घ्यायचा.फक्त पोलिसांवरच अवलंबून राहायचं नाही."
   " ते झालाच रे, पण शोध घ्यायचा कसा ?"
   " शोधा म्हणजे मार्ग सापडेल असे कुणीतरी म्हटलं आहे ना,
त्या उक्तीनुसार चालायचं आपण बस !"असा आपल्या आईला
विश्वास तर त्याने दिला; परंतु त्याला कळत नव्हतं की सुरुवात
कुठून आणि कशी करायची हे कळत नव्हतं.

  माधवी जेव्हा हळूहळू शुद्धीवर आली नि तिने डोळे उघडुन
पाहिले तर तिच्या आजूबाजूला सारा अंधार होता.त्यामुळे आपण नेमके कुठं आहोत हे कळत नव्हते. ती कॉट वरून
खाली उतरली पण तिला कळत नव्हतं की कोणत्या बाजूला
जावे ? हळूहळू अंधारातही थोडसं दिसू लागले त्यावरून तिला
कळले की आपण एका अंधार कोठडीत बंद आहोत.तिने
आजूबाजूला पाहिले तेव्हा तिला दरवाजा दिसला ती चाचपडत
कशी तरी दरवाजा पर्यंत पोहोचली नि मोठमोठ्या ने दरवाजा
ठोठावू   लागली. नि मोठ्याने ओरडुन विचारू लागली की कोण
आहे बाहेर आणि मला इथं बंद करून का ठेवली आहे ?
दरवाजा खोला अगोदर ? " पण बाहेर काहीच हालचाल
जाणवली नाही. तिला कळेना की आपले कोणी अपहरण
केले आहे ? दरवाजा वाजवून दमली तशी परत जाऊन बसली
त्या कॉट वर बसली आणि ती विचार करू लागली की आपण तर आपल्या वडिलांकडे निघालो होतो मोटारी मध्ये बसतच
होतो. इतक्यातच आपल्या पाठीमागून कोणीतरी आले नि त्याने आपल्या नाकाला कलोरोफर्म लावला नि आपल्याला बेशुद्ध केले. त्यानंतरचे आपल्याला काहीच आठवत नाही. जेव्हा आपण शुद्धीवर आलो तेव्हा आपल्याला जाणवले की आपले अपहरण झाले आहे. कुणी केले असेल आपले अपहरण ?
असे तर झाले नसेल ना, म्हणजे लीला चे अपहरण करायला
ते प्रेमच्या घरी आले असावेत नि आपल्याला लीला समजून
त्यांनी आपलेच अपहरण केले. असेच झाले असावे कदाचित. पण मग पप्पांच्या फोन कसा आला आपल्याला की लीला चे अपहरण झाले म्हणून ? कदाचित अपहरण कर्त्याने एडवांस,
मध्ये फोन करून सांगितले असावे की तुमचे काम झाले म्हणून. कारण काही लोकांना सवय असते की काम झालं नसले तरी झाले म्हणून सांगतात. बहुधा असेच काहीतरी झाले असावे. आपण एक काम करू ? पप्पांना फोन करून सांगायला हवे की आपल्या माणसांनी चुकून माझेच अपहरण केले आहे म्हणून. मग पप्पा त्याला चांगलेच धारेवर धरतील.मूर्ख लेकाचा !" असा विचार करून ती आपला मोबाईल शोधू लागली ; परंतु तिच्या जवळ मोबाईल नव्हता. तेव्हा ती किंचित विचार करते तेव्हा तिच्या ध्यानात येते की तिचा मोबाईल तिथच पडला जिथं तिचं अपहरण झालं होतं अर्थात त्याच ठिकाणी तिचा मोबाईल हातातून गळून खाली पडला असावा. आता काय करावे ?आपल्या वडिलांशी संपर्क तरी कसा साधावा ? खूप
विचार करुनही तिला उत्तर काही सापडले नाही. रात्र झाली आहे का दिवस हेही कळायला काही मार्ग नव्हता. आपण
कितीवेळ बेशुद्ध होते तेही आठवत नाही. आता आपल्या कडे
एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे जेव्हा अपहरणकर्ता
जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत कळायला काहीच
मार्ग नव्हता. त्या अंधार खोलीत कुबट असा वास येत होता.
त्यावरून तर असं वाटत होतं की त्या खोलीचा वापर होत नाहीये. त्यामुळे त्या खोलीची सापसफाई देखील कोणी केलेली
दिसत नाहीये. जीवनात पहिल्यांदाच अश्या किळसवाणी
खोलीत आपण बंद आहेत.  अपहरणकर्ता तिला भयंकर 
राग आलेला असतो. जर  तो तिच्या तावडीत सापडला असता तर तिने त्याची काय अवस्था करून टाकली असती ह्याची कल्पना करणे पण योग्य ठरणार नाही. पण करणार काय ?
म्हणतात ना  वाघ बसला जाळी आणि माकड वाकुल्या करुनी द्यावी. म्हणजे असे की वाघ म्हातारा झाला की त्याला कुणी घाबरत नाही. साधं माकड हे काय हे सुध्दा चिडवून दाखवते कारण त्याला माहित असते की वाघ आता फार म्हातारा झाला आहे, तो आपलं काहीच वाकडं करू शकणार  नाहीये.म्हणून त्याला चीडवण्यात त्याला मौज वाटते.  अगदी तीच अवस्था झाली होती माधवीची किती राग आला तरी ती आता त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. म्हणून नाईलाजाने दरवाजा उघडण्याचा ती वाट पाहू लागली.

    लीला चे अपहरण करून तिला अश्या एका ठिकाणी आणले
की तिथं जवळ पास कुठं वस्ती दिसत नव्हती. घनदाट जंगल
दिसत होते. तिला एका कड्यावर आणले. खाली वाकून पाहिले
तर खोल दरी दिसत होते. कड्यावरून जर तिला खाली टाकून
दिले तर तिची हाडे तरी मिळतील की नाही ती कोण जाणे ?
अपहरण कर्त्याने स्वतःच्या तोंडावर मास्क लावले होते. त्यामुळे
अपहरण कर्ता कोण आहे हे काही कळत नव्हते. तिला पकडुन
जेव्हा तिथं आणले तेव्हा ती समजून गेली की आता आपला
शेवट आहे, पण तरी देखील शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचे नसतात. असे म्हंटले जाते त्या प्रमाणे ती त्याला विनंतीच्या
स्वरात म्हणाली," दादा, मला ठार मारून तुला काय मिळणार ?" त्यावर तो कुत्सित पणे म्हणाला ," काय मिळणार
म्हणजे ? खूप सारे पैसे मिळणार मला."
   " बरं त्या पैशाचे काय करणार तू ?"
   " काय करणार म्हणजे ? मौज मजा करणार ?"
   " किती दिवस ?"
   " किती दिवस म्हणजे पैसे संपेपर्यंत."
   " आणि मग काय करणार ?"
   " काय करणार म्हणजे ? आम्ही नवीन नवीन सुपारी घेतच
असतो."
   " पण समजा तुमच्या बहिणी सोबत असं कुणी केलं तर ?"
   " कुणाची हिम्मत आहे, असं करण्याची ?"
  " देवाची !"
   " देव ह्या जगात   आहे तरी काय ? हे जग सैतानानी  भरलेल
आहे, देवाला राहायला आहे कुठं जागा ?"
   " आहे ना ?"
   " कुठं ?"
   " हृदयात ?"
   " हां हृदयात देव प्रत्येक माणसाच्या हृदयात असतो फक्त
आपल्याला तो ओळखता येत नाही बस्स इतकंच."
   " काय पण सांगू नकोस.तुझ्या अश्या बोलण्याने मला
तुझी दया येईल असे मुळीच समजू नको."
   " मी तुला माझ्यावर दया करायला सांगतच नाहीये. मला
फक्त इतकंच सांगायचं आहे तुला दादा, की माणसांचे जे मन
आहे ते मनच आपला आरसा असतो. आपण जे काही चांगले
वाईट जे काही करतो ना, त्याची जाणीव ते आपल्याला सतत करून देत असते  फक्त त्याला नजर अंदाज करतो असतो. पण
त्याचं ऐकत नाही पण वरती गेल्यावर त्याचे परिणाम मात्र
आपल्याला भोगायला लागतात. पण त्यावेळी इलाज नसतो
सुधारायची वेळ निघून गेलेली असते. फक्त पश्चात्ताप आपल्याला वाट्याला राहतो. म्हणून माणसाने वेळीच सावरले
पाहिजे. बाकी तुझी मर्जी मला वरून फेकायचे आहे ना तुझ्या
मनात तर अवश्य फेक. फक्त मी ईश्वर चरणी एक प्रार्थना करते की देवा ह्या माझ्या ह्या बंधुला क्षमा कर, कारण तो काय करत
आहे, हे त्यालाच कळत नाहीये." असे म्हटल्या नंतर मात्र
तो थोडा विचारमग्न झाला की मी हिला ठार मारण्यासाठी
आणलं तर ही मला क्षमा करण्यासाठी देवा जवळ प्रार्थना
करत आहे, खरंच असं असतं का ? म्हणजे आपण केलेल्या
अपराधाची शिक्षा खरच परमेश्वर देत असेल का ? लगेच दुसरे
मन लगेच म्हणाले की कुणाला माहीत आहे, परमेश्वर शिक्षा
देतो की नाही ती, पण एक गोष्ट खरी चांगले वाईट जे सुध्दा
आपण काम करतो तेव्हा आपले मन आपल्याला सांगत असते
की हे पाप आहे, हे तू करू नकोस. पण तरी देखील आपण
आपल्या मनाचे ऐकत  नाही पण मन आपल्याला जाणीव करून देते हे खरंय ! मग मन सांगतेय ते जर खरे असेल तर
देव आहे हेही खरे असेल नि तो आपल्याला आपण केलेल्या
अपराधाची शिक्षा नक्कीच देत असेल. मग काय करायचं
हिला ठार मारायचे की सोडायचे ? एक मन म्हणतेय तिला
मारू नकोस सोडून दे.पण दुसरे मन म्हणतेय तिला जिवंत
सोडू नकोस.तिला सोडलेस तर तू मरशील. कारण माधवराव
तुला जिवंत सोडणार नाही. आणि  आपण जर हिला ठार मारलं तर देव आपल्याला सोडणार नाही मग काय करावं ? असा एक
विचार मनात येऊन गेला तर दुसरा ही मनात एक विचार आला
आणि तो म्हणजे, अरे, काय करावं म्हणून काय विचार करतो
आहेस  ? अरे, भल्या माणसा ,देव तुला कधी शिक्षा देईल मेल्यावर स्वर्गात जाशील तेव्हा ना ? तेव्हा चे तेव्हा पाहता येईल. पण माधवराांचे नाही ऐकले तर ते आताच तुला  स्वर्गात पाठवून देतील आणि आतापर्यंत कमी का पापे केली आहेस ?
त्यामुळे  देव तर तुला शिक्षा करणारच.जसे की एक खून केल्याची शिक्षा पण फाशी नि दहा खून केल्याची शिक्षा पण फाशीच आहे. मग अजून एक खून केल्याने काय बिघडणार आहे ? असा विचार करून त्याने तिच्या कडे पिस्तूल ताणले नि म्हणाले," तू स्वतःहून खाली उडी मारणार आहेस का मी ढकलून देवू तुला ? कारण तुला जिवंत सोडलं तरी मला शिक्षा ही होणारच आहे. कारण या पूर्वी भरपूर अपराध केले आहेत मी मग देव मला काय सोडणार आहे, म्हणून तुझा जीव घेणे हाच अखेरचा निर्णय आहे माझा." असे म्हणून तो तिला ढकलून देणार असतो इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली म्हणून त्याने कॉल घेतला. माधरावांनी त्याला विचारले की , काम फत्ते झाले का ?" तर तो म्हणाला नाही अजून आता करणारच आहे." त्यावर माधवराव म्हणाले," तिला जिवानिशी मारू नकोस. तिला एका सुरक्षित ठिकाणी ठेव." तेव्हा अपहरण कर्त्या ने विचारले की, पण का ?" तेव्हा पलीकडून आवाज आला की आपली माधवी आपल्या दुश्मनाच्या ताब्यात आहे, तिला जर सहिसलामत ठेवायचे असेल तर लीला ला जिवंत ठेवायला लागेल." मग काय  नाईलाजाने लीला चे डोळे बांधले नि पुन्हा मोटारीत कोबले नि निघाले.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..