षडयंत्र २३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षडयंत्र २३ |
स्मिता ने ती डायरी इन्स्पेक्टर तानाजी ला नेऊन दिली
असता त्यांनी ती वाचून काढली नी मग इन्स्पेक्टर तानाजी ने
पोलीस पथक घेऊन सुंदरराव सावंत च्या घरी गेले असता
सुंदर राव सावंत ने विचारले की, इन्स्पेक्टर माझा अपराध काय
तो तर कळू दे मला ." त्यावर इन्स्पेक्टर तानाजी हसून म्हणाले,
" तुम्हाला माहित नाही की, तुम्ही काय अपराध केला आहे तो." असे सुंदर राव समजून गेले की, हा इन्स्पेक्टर आपल्या का शारदा बाईच्या खुना बद्दलच विचारत असावा. पण त्यांना हे माहित होतं की त्यांच्या विरुध्द ह्यांच्या जवळ कोणताही पुरावा नाहीये. परंतु पोलिसांना सवयच आहे की, अंधारात तीर मारायचा लागला तर लागला नाही तर नाही. बहुधा हाच प्रयत्न असावा ह्याचा . परंतु शारदा बाईंचा खून तर आपण केलेला नाहीये. मग आपल्याला घबरण्याचे काय कारण आहे ? असा विचार करून म्हणाले," म्हणजे अजूनही तुमचा संशय आमच्यावरच आहे असं म्हणा की ! नाही म्हणजे तुमच्या
मनाची अजून खात्री झाली नसेल तर मी येतो पोलीस स्टेशन ला
बापडा ! पण मला माहित आहे की, ह्या वेळी सुद्धा तुमची निराशाच होणार आहे. " त्यावर इन्स्पेक्टर तानाजी म्हणाले,
" आता आमच्या हाती तुमच्या विरुध्द भक्कम पुरावा आहे."
" कसला पुरावा ?"
" ते पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेलच." असे म्हणून इन्स्पेक्टर तानाजी कॉन्स्टेबल शिंदे कडे पाहत म्हणाले," शिदे,
पहाता काय बेड्या ह्यांच्या हातात घाला." तेव्हा प्रेम म्हणाला,
" इन्स्पेक्टर साहेब, आपल्या कडून काहीतरी गफलत होत
आहे, माझ्या वडिलांचा शारदा बाईंचा खुनाशी काहीही संबंध
नाही.उलट शारदा बाईंनी माझ्या पत्नीला....प्रेम पुढे बोलणार
होता पण इतक्यात सुंदर रावांनी त्याला ते सांगण्यास रोखले.
कारण त्यांना माहित होतं की पोलिसांना हे समजले की शारदा
बाईला आम्ही कामावरून का काढले तर ह्या केसला अजून
फाटे फुटतील. आणि पोलिसांना सुता वरून स्वर्ग गाढण्याची
आयती संधि मिळेल. पोलिसांना संशय येईल अशी चूक करू
द्यायची नव्हती त्यांना. म्हणूनच ते म्हणाले," प्रेम राहू दे. तसं
पण त्यांना आपण काही सांगितले तरी पटायचं नाही. म्हणून
तू काही सांगू नकोस त्यांना. मला पोलीस स्तेशनलाच घेऊन
जाताहेत ना, घेऊन जाऊ दे, आणि आपल्या मनातील शंका
दूर करू दे, आपण काही केलंच नाही तर कशाला घाबरायचे
कुणाला ? चल रे, इन्स्पेक्टर , कुठं न्यायचं तेथे ने मला."
पोलीस सुंदर रावांच्या हातात बेड्या ठोकल्या नि त्यांना जीप
मध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टशनमध्ये
आणल्यावर त्यांना विचारण्यात आले की, शारदा बाई नि तुमच्या
मध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते ?" असे विचारल्यावर सुंदर
राव चिडून म्हणाले,"काय वाटेल तसे आरोप करताय तुम्ही
माझ्यावर. याचे परिणाम चांगले होणार नाहीत इन्स्पेक्टर."
" परिणाम काय होईल ते नंतर पाहू, मला आधी हे सांगा.
तुमच्या मध्ये नि शारदा बाई मध्ये अनैतिक संबंध सुरू होते
ही गोष्ट खरी आहे ना ?" सुंदर राव चिडून म्हणाले," खोटं आहे ते सर्व ." पण तरी देखील त्यांच्या मनाला प्रश्न तर पडलाच की
शारदा बाई सोबत आपले अनैतिक सबंध होते हे ह्या इन्स्पेक्टर
ला कसे समजले ? इन्स्पेक्टर ही त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या शटांचे अवलोकन करत ते म्हणाले," मग खरं काय आहे ते तुम्हीच सांगा." तेव्हा सुंदर राव म्हणाले," इन्स्पेक्टर , तू माझ्यावर जे आरोप करतो आहेस ना, ते बिन बुडाचे आहेत. काही पुरावा आहे का तुझ्याकडे ?" त्यावर एकदम शांतापूर्ण स्वरात इन्स्पेक्टर म्हणाले," मला वाटलेच होते की तुम्ही पुरावे मागणार, म्हणून आम्ही पुरावा आणि साक्षी हे दोन्ही आहेत आमच्या कडे." असे म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त चिन्ह उमटली.पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला की हा इन्स्पेक्टर मुद्दाम असं बोलत तर नाही आहे ना, जेणेकरून आपण घाबरून चटकन काहीतरी खरे बोलून जावे नि त्याचे त्याने भांडवल करावे. बहुधा हाच प्रयत्न दिसतोय त्याचा. परंतु मी देखील कच्चा खिलाडी नाहीये.
असे स्वतः विषयी अभिमान व्यक्त करत ते पुढे म्हणाले," हो
का ? मग वाट कुणाची पाहता, सिध्द करून दाखवा ना ?"
" अस्सं मग ठीक आहे, तुम्हाला पुरावाच पाहिजे ना, तर
मग ऐका आमच्या हाती एक डायरी लागली आहे, त्या डायरी
मध्ये तुमच्या अपराधाचे सारे कारनामे स्वतः शारदा बाईंनी
लिहून ठेवले. असे बोलून त्यांनी डायरी मध्ये लिहिले सारी
हकीगत ऐकवली. ते ऐकल्यावर सुंदर राव हसून म्हणाले,
केवळ डायरी चा आधारावर तुम्ही मला गुन्हेगार सिद्ध करू
शकत नाही. कारण ही डायरी शारदा बाईंनीच लिहिली ह्याला
पुरावा काय ? शिवाय जर मी तिच्या नवऱ्याला मी अडकवले
असे जर तिचे म्हणणे आहे तर ती इतकी वर्षे गप्प का राहिली ?" त्यावर इन्स्पेक्टर म्हणाले," तुम्ही तिला धमकी दिली
होती की तिच्या मुलांना जिवानिशी ठार मारण्याचा. नवरा तर
गमवून बसलीच होती आता मुलांना देखील गमवून बसण्याची
वेळ आली होती. म्हणून त्यांनी पोलिसा जवळ तक्रार केली
नाही त्यांनी." त्यावर सुंदर राव हसून म्हणाले," ह्याचा अर्थ
पोलिसांवर विश्र्वासच नाही लोकांचा.असेच ना ?"
" म्हणजे तुमचा शारदा बाईच्या खूनाशी काही सबंध नाही.
असेच म्हणायचे आहे ना तुम्हांला ?"
" अगदी बरोबर ."
" ठीक आहे, डायरी चं राहू द्या मला हे सांगा, मरण्यापूर्वी
तुम्हाला त्यांनी तुमच्या कडे पाच लाख का आणि कशासाठी
मागितले ?" असे बोलून इन्स्पेक्टर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे
शटांच अवलोकन केले. तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की शारदा
बाई सुंदर रावाना ब्लॅकमेल करत होत्या. हे नक्की ! मागच्या
वेळी जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनला बोलविले होते तेव्हा त्यांनी
सांगितले होते की शारदा बाई त्यांना पगारासाठी फोन करत होत्या. पण पांच लाख ही रखम काही कमी नाही आणि एवढा
मोठा पगार कोणीही आपल्या नोकरांनीला कदापि देणार नाही.
ह्याचा अर्थ शारदा बाई सुंदर रावांना ब्लॅकमेल करत होत्या , हे
नक्की पण क करत होत्या ते मात्र अजून कळलेलं नाहीये.
पण हरकत नाही. लवकरच ते कळेल. सुंदर रावांनी मात्र
या गोष्टीस नकार दिला. पण इन्स्पेक्टर तानाजी पण कुठं
एकण्यातला होता. तो म्हणाला ," आमच्या कडे तुमच्या मोबाईलच्या सिमकार्ड नंबरचे सारे डिटेल्स आहेत. तेव्हा
मुकाट्याने कबूल करा नाहीतर आमच्या कडे अजून हि असे
काही उपाय आहेत की गुन्हेगार पोपटानी बोलू लागतो. घ्या रे
ह्यांना रिमांड मध्ये." तेव्हा सुंदर राव म्हणाले," इन्स्पेक्टर ,
फार मोठी तू ही चूक करतो आहेस. ह्याचे परिणाम फार
भयंकर होतील." परंतु त्यांच्या धमकीला न घाबरता त्यांना
पोलीस कोठडीत कोबले. तेवढ्यात माधवरावांचा फोन
पोलीस स्टेशनला आला की का पकडले आहे सुंदर रावांना." तेव्हा इन्स्पेक्टर तानाजी म्हणाला ," त्यांच्या वर खुनाचा आरोप
आहे." तेव्हा पलीकडून माधवराव म्हणाले," फक्त आरोप च
आहे ना, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला नाही ना अजून ?"
" नाही."
" मग आताच्या आता सोडून द्या ना ?"
" पण साहेब ?"
" एकदा सांगितलेले कळत नाही का तुम्हाला ?"
" पण साहेब , त्यांच्या विरुध्द ....?" त्यांचे वक्तव्य पूर्ण
होण्या अगोरच माधवराव चिडले नि म्हणाले, " जेवढं सागितलं
आहे ना, तेवढं कर. पुढचं मी पाहून घेईन."
" ओके सर !" शेवटी नाईलाजाने इन्स्पेक्टर तानाजी कॉन्स्टेबल शिंदे ल आदेश देतात की सुंदर रावांना कोठडीतून
बाहेर काढून इथ आण. कॉन्स्टेबल शिंदे सुंदर रावांना पोलीस
कोठडीतून बाहेर काढण्यासाठी जातो. तेव्हा इन्स्पेक्टर तानाजी
लाल स्वतः चाच फार राग येतो . पण करणार काय गुन्हेगारांचे
हात वरपर्यंत पोहोचलेले असतात हेच खरे ! म्हणून क्राईम
कधी बंद होत नाही. ते सारखं घडतच असतं. कॉन्स्टेबल शिंदे
सुंदर रावांना कोठडीत काढून आणेपर्यंत प्रेम एका वकीला
सोबत तेथे पोहोचला. वकील ने सुंदर रावांच्या जमानत चे
पेपर आणले होते. ते इन्स्पेक्टर तानाजी कडे दिले. इन्स्पेक्टर
तानाजी ने जमानत पेपर नीट तपासले नि गृहमंत्र्यांच फोन
आला होता, आम्ही आता त्यांना सोडणार च होतो. पण बरे
झाले तुम्ही त्यांच्या जमानत चे कागदपत्र घेऊन आला ते.
त्या पेपरवर सुंदर रावांच्या सह्या घेतल्या नि त्यांना सोडले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा