बेवफा ८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ८ |
ओशाळून म्हणाला ," सॉरी मला माफ कर, मी तुला
सुरभी समजलो." बस हे त्याचे शब्द त्याला इगळी डसल्यावणी भासले. म्हणजे मघापासून तुम्ही मला सुरभी
समजत होता की काय ?" तेवढ्यातच समोरून
रिक्षा आली त्या रिक्षेला हात दाखवून ती रिक्षा थांबविली
नि त्यात दोघेही बसले नि रिक्षा निघाली खरे ! परंतु प्राची
साठी मात्र कुठंतरी हरवल्यागत एकदम गुपचूप बसली
होती. ती कळत नव्हतं की हसावे की रडावे ?"
पुढे
रिक्षा थांबली. तेव्हा दोघेही रिक्षेतून खाली उतरले
पण त्यांना आता प्रश्न पडला होता की घरी काय सांगायचे
म्हणजे पावसात भिजले कसे म्हणून विचारले तर ? रात्रीचे
अकरा वाजले होते. दरवाजा वरील बेल वाजताच ऋषींच्या आई ने दरवाजा उघडला. दोघांनाही भिजलेले पाहून त्याच्या आई ने विचारले , अरे तुम्ही दोघेही भिजले कसे ?" त्यावर ऋषी म्हणाला," छत्री सोबत नेली नव्हती. अचानक पाऊस आला नि भिजलो आम्ही त्यात काय ."
" अरे मग कुठं तरी थांबायचं होतं आसऱ्याला. पाऊस जाईपर्यंत वाट पहायची होती. एवढी काय घाई होती येण्याची !"
" अगं आई , भर रस्त्यावर थांबणार कुठं ?"
" बरंबर आता एक काम करा. बाथरूम मध्ये जावा
नि लवकर कपडे बदली करा नाहीतर सर्दी पडसे खोखला वगैरे होईल." इतकं म्हणतात असं म्हणत असतांना
त्यांनी प्राची चेहरा न्याहाळला तेव्हा तिचा चेहरा साफ
उतरलेला त्यांना दिसला. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार येऊन गेला की प्राचीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसायला हवा होता तो का दिसत नाहीये. याचा अर्थ आपण ह्या दोघांना ज्या हेतूने पाठविले होते तो हेतू साध्य झालेला दिसत नाहीये. तेवढ्यातच प्राची शिंकली. आ ss छि s s प्राची चे अंग भिजल्यामुळे ती थरथर कापत होतं. दातांवर
दात तिचे आपटत होते. प्राची पटकन वाँश रुम मध्ये शिरली. गरम पाण्याचा शॉवर घेतल्यामुळे तिच्या अंगात
थोडीशी गर्मी आली. ओल्या केसांना टॉवेल्स गुंडाळून ती
बाहेर आली परंतु सारखी शिंकत होती. त्यानंतर ऋषी
शिरला बाथरूम मध्ये. तोही गरम पाण्याने स्नान करून
बाहेर आला. पण त्याला ही सारख्या शिंका येतच होत्या.
म्हणून त्याच्या आईने ताजं आलं छान बारीक करून त्यात एक कप गरम पाणी मिसळून काही वेळ उकळविले नि तो काढा दोघांनाही प्यायला दिला. काढा पिल्याने दोघांनाही आता बेटर वाटू लागले. तेव्हा प्राची ला आपल्या आई-वडिलांची आठवण झाली तसे तिने विचारले की , आई, माझे मम्मी-पप्पा आलेत का हो ?
कोणाकडे गेले होते ते ?"
" हो आले ही नि गेलेही ."
" गेलेही ? म्हणजे कुठं गेले ?"
" स्वतःच्या घरी !"
" मला न भेटताच ?"
" अगं त्याना कुणाचा तरी फोन आला होता म्हणून ते
आले तसेच ताबडतोब निघून गेले ही ."
" कोणाचा फोन आला होता ?"
" ते काही सांगितले नाही, म्हणाले आम्हाला आत्ताच
निघायला हवं. मी त्यांना त्याचं कारण विचारलं तर म्हणाले
आता सांगत बसायला वेळ नाहीये नंतर सावकाशपणे
सांगेन, असं ते म्हणाले. त्यामुळे नेमकं काय झाले ते कळले नाही." तशी प्राची विचारात पडली की, कुणाचा फोन आला होता बरं होता त्यांना ? कळायला काहीच मार्ग नाही. फोन करून विचारू का त्यांना ? तशी ऋषी ची आई म्हणाली," अगं कशाला नंतर सांगतो म्हणाले ना ?"
" हो पण तोपर्यंत माझा जीव टांगणीला येईल त्याचं काय ? ते काही नाही मी आत्ताच फोन करून विचारते."
असे बोलून तिने आपला मोबाईल मोबाईल हातात घेतला नि नंबर डायल करू लागली. तशी ऋषी ची आई मनात म्हणाली," आता काय करू ? कसं रोखू हिला ? हिच्या
भावाचे आक्सिडं झाले आहे , हे हिला सांगू नका असे
हिचे आई-वडील म्हणाले. पण ही ऐकणार थोडीच आहे.
करू दे फोन त्याना देऊ दे हिच्या प्रश्नाचे उत्तर असे स्वतःशीच म्हणून त्या गप्प राहिल्या. प्राची कशाची ऐकते तिने फोन केलाच परंतु फक्त रिंग वाजत होती पण फोन कोणीही रिसिव्ह केला नाही. त्यामुळे ती अधिकच चिंतायुक्त झाली. फोन का बरं उचलत नाहीत ? काही अघटित तर घडलं नसेल ना ? अशी शंका मनात येऊन
गेली पण लगेच दुसरे मन म्हणाले," छे छे छे ! आपण उगाचच काहीतरी विचार करतोय. ते दोघेही अजूनही लोकल मध्ये तरी असतील किंवा मोबाईल सायलेंट वर असेल कदाचित. असे बोलून तिने स्वतःच्या मनाची समजूत घातली. फोन लागला नाही म्हणून ऋषीच्या आईने मनातल्या मनात देवाला धन्यवाद दिले आणि प्राची ला उद्देशून म्हणाली," अगं असेल काही अर्जंट काम निघाले असेल म्हणून गेले असतील. कामातून फ्री होतील
तेव्हा स्वतःच करतील ना ते फोन . त्यांना चिंता नाहीये
का आपल्या मुलीची " असे म्हटल्यावर प्राची ला पण त्यांचे म्हणणे पटले. आपल्याला वाटलं होतं की सासू-सासरेआलेत तर निदान त्यांच्या समोर तरी ऋषी नीट
वागेल. पण कशाचं काय ? ह्याने प्राची ला नाराज करून आणलं. नक्कीच हा प्राची शी नीट वागला नसेल. म्हणूनच ती मला जरा नर्व्हस दिसली मला. पण आता तिची नाराजी घालविणे अत्यावश्यक आहे. असा विचार करून त्या म्हणाल्या की, त्यात काय ? तू उद्या जाऊन भेटून ये
हवं तर आपल्या आई-वडिलांना."
" हो असेच करते."
" तुम्ही दोघेही आता जेवणार आहात का ? नाही म्हणजे मला झोप येत आहे, म्हणून विचारते."
" नाही आई, आम्ही दोघेही बाहेरून जेवून आलो."
" हो का ? बरं केलंत. झोपा आता." असे बोलून त्या बेडरूम मधून बाहेर पडल्या. प्राची बेडवर पडली पण तिला झोप काही येत नव्हती. कारण तिच्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती. तिला कळत नव्हतं की आपले आई-वडील आपल्याला भेटायला आले नि न भेटताच निघून गेले. असं का बरं केलं असेल त्यांनी ? आपण त्यांची येण्याची वाट न पाहता चित्रपट पहायला गेलो म्हणून ते आपल्यावर रागावले तर नसतील ना ते ? छे छे छे ! ते रागावतील कशाला ? उलट त्यांना आनंदच व्हायला हवा की त्यांची मुलगी त्यांच्या जावई संग फिरायला गेली म्हणून. खरं तर आज आपण फार
खुश आहोत. म्हणजे कधी नव्हे तर आज प्रथम ऋषी
आपल्याला चित्रपट पहायला घेऊन गेले. त्यानंतर सोबत
डिनर केला. पावसाने तर आम्हांला एकदम जवळ आणले
म्हणजे त्यांनी मला उचलून घेतले, पण लोक बघत होते
म्हणून आपल्याला लाज वाटली आणि आपणच त्यांना खाली उतरायला सांगितले. पण तरीही त्यांनी लोकांची
पर्वा न करता मला आपल्याला मिठीत घेतले नि आपल्याला किस केले. तेव्हा आपल्याला क्षणभर
वाटले की आपण स्वप्नात तर नाही ना ? पण ते स्वप्न नव्हते. तर असलीयत मध्ये होते. पण नंतर अचानक काय
काय ते कुणास ठाऊक ? त्यांनी आपल्याला सॉरी म्हटलं.
आणि त्यानंतर त्यांच्या सॉरी चे कारण ही समजले. ते प्रेम आपल्या साठी नव्हते मुळी ! अर्थात ते आपल्याला सुरभी समजले होते......आणि सुरभी समजूनच त्यांनी आपल्याला मिठी मारली नि किसही केलं. किती आनंदात होतो आपण पण तो आनंद क्षणात मावळला. आपला आनंद ऋषींनी क्षणात हिरावून घेतला आपल्या कडून.
खरं तर खूप राग आला मला त्यांचा. ऋषी हे तुम्ही चांगले
नाही केलं. त्यावेळी तरी गप्प बसायचं होतं. माझ्या आनंदावर विरजण घालायचा काय अधिकार होता तुम्हाला ? असं करून काय मिळविले तुम्ही ऋषी ? जरा वेळ नसता बोलला तर जमलं नसतं का तुम्हांला ? झूठ ही सही लेकिन कुछ देर जी तो लेते हम थोडी देर चुप रहते तो आपका क्या जाता ? तिच्या आनंदावर पाणी पडले होते.
ती मनातून फार दुःखी झाली होती. पण तिच्या मनात एक
विचार आला की ह्यांना विचारू का ? तुमचं प्रेम अजूनही
सुरभिवरच आहे तर मला चित्रपट दाखवायला घेऊन जायचे नाटक तरी कशाला करायचं होतं ? कदाचित हे
नाटक नसेल त्यांचे. म्हणजे पहिलं प्रेम आहे ते त्यांचे ते
विसरणं इतकं सोपे का आहे ? उगाच आपण काहीतरी
विचारत करत बसलोय. उलट आपण त्यांना समजून घ्यायला हवं. नाही का ? असा ही एक विचार तिच्या
मनात येऊन गेला. ऋषी तिच्या कडे पाठ करून झोपला
होता आणि त्याच्या ही मनात विचार सुरू होते. त्याला
आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता. आपण
इतके कसे भावना विभोर झालो होतो की आपल्याला
सुरभी आणि प्राची मधला फरक ही जाणवला नाही. प्राची ला हट केलं. काय वाटलं असेल तिला ? खरं तर आपण तिची माफी मागायला पाहिजे. पण माफी मागून काय होणार आपण तिला तसं वचन दिले होते की सुरभी ला हळूहळू विसरू म्हणून; परंतु आता सुरभी ला विसरणं शक्य आहे का आपल्याला ? पण जरी शक्य नसले तरी ते आपल्याला शक्य करायला हवं . कारण आपण प्राची शी लग्न केलंय. खरं तर आपलंच चुकलं ? प्राची बरोबर लग्न करण्याची घाई उगाच केली आपण ? थोडे दिवस वाट पाहायला हवी होती पण आता या सर्व गोष्टींचा विचार करून उपयोग काय उपयोग आहे ? काय करावं ते खरंच कळत नाहीये. असा विचार करत असता त्याचे मन त्याला म्हणाले की तू एक गोष्ट करू शकतोस आणि ती गोष्ट म्हणजे प्राची ला अंधारात न ठेवता तिला सत्य काय आहे ते सांगून टाक म्हणजे तिला पण म्हणायला नको की
आपल्याला काही सांगितले नाही म्हणून. तशी प्राची फार
समजदार मुलगी आहे म्हणा. आपली मजबुरी ती नक्कीच समजेल. म्हणजे निदान तिला धोका दिल्या सारखे तर होणार नाही ना ? असा विचार करून त्याने आपले मन तिच्या समोर मोकळं केलं. सुरभी ने आपल्या प्रेमासाठी केलेला त्याग ही तिला जाणवला. तशी ती मनात म्हणाली, आपणच ह्या दोघांच्या मार्गामध्ये आलो आहोत. खरं तर आपल्याला ह्या दोघांच्या मार्गातून दूर व्हायला पाहिजे. असा विचार तिने आपल्या मनामध्ये पक्का केला. तर दुसरीकडे ऋषी देखील आपण सारे सत्य प्राची ला सांगून टाकल्या बद्दल ऋषी एकदम खुश होता. कारण या पुढे प्राची त्याला विश्वासघातकी तरी म्हणणार नाही ना म्हणून तो खुश होता. नंतर विचार करता करता मग कधी त्याचा डोळा लागला ते त्याला ही कळलं नाही.
सकाळी नेहमी प्रमाणे प्राची लवकर उठली नि स्नान
केले नि सासूबाई सोबत किचनमध्ये नाष्टा बनवत होती. तेव्हा तिने आपल्या सासूबाई ला विचारले," आई मी माझ्या आई वडिलांना भेटून येऊ का ?" त्यावर तिची सासू म्हणाली, " जायला जाऊ शकतेस माझी तुला मनाई नाही. पण मला काय वाटतं माहितेय की तू आपल्या
बाबांच्या फोन ची वाट पाहणे."
" अहो आई, कसं सांगू तुम्हांला , आई बाबा मला
काही न सांगता परस्पर निघून गेले म्हणून चिंता वाटते.
दुसरे काही नाही."
" ठीक आहे, पण मला एक सांग. काल तुम्ही दोघेही
घरातून निघाला तेव्हा फार उत्साहित होता. पण जेव्हा
तुम्ही दोघे घरी आला तेव्हा तुम्हां दोघांच्या चेहऱ्यावर तो
उत्साह नव्हता. दोघांमध्ये काही तू तू मैं मैं झाली आहे का ?"
" नाही. तसं काहीही झालेले नाहीये."
" मग तुम्हां दोघांचे चेहरे उदास का बरं होते ?"
" ते होय. " ती हसून म्हणाली, मग तिने काल रात्री
घडलेला प्रसंग जसाच्या तसा सांगितला. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. काय बोलावं ते त्यांना सुचेना त्या एकदम गप्प झालेल्या पाहून प्राची म्हणाली," आई , तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी जरी आईच्या घरी गेले तरी इथलं काहीही सांगणार नाही त्यांना याची खात्री बाळगा." त्यावर तिची सासू म्हणाली," नाही सांगितले तरीही कधी ना कधी समजणारच आहे, फार दिवस लपणार नाही ते."
" माहितेय मला. पण जेवढं लपविता येईल तेवढं आपण लपवू शकतोच ना ?"
" हां पण त्याचा फायदा काय ?"
" फायदा तर नाहीच आहे, पण या व्यतिरिक्त आपण
दुसरे काय करू शकतो."
" मला ही काही कळत नाहीये. कसा हा पोरगा ? काय
सांगू मी आता याला ."
" तुम्ही त्यांना काहीही सांगू नका."
" मग हातावर हात घेऊन गप्प बसायचं ?"
" सध्या तर दुसरा पर्याय नाहीये." त्यावर ऋषी आई
स्पष्टपणे तर काहीच बोलली नाही. परंतु प्राची कडे
अभिमानाने पाहत होती. आणि मनात म्हणाली," खरंच
मी मागच्या जन्मी काही तरी पुण्य केलं असावे, म्हणून
प्राची सारखी समजदार सून मिळाली. परंतु आपला पोरगा
कपाळ करंटा आहे, त्याला हिऱ्या ची पारख नाही हेच खरे !" सर्वांना चहा नाश्ता दिल्या नंतर प्राची आपल्या
सासू-सासऱ्यांची परवानगी घेऊन आपल्या आईच्या घरी
निघून गेली. पनवेलच्या लोकल मध्ये बसली नि खिडकी
जवळ बसली नि खिडकीतून बाहेर पळणाऱ्या झाडाकडे
पाहत आपल्या गत जीवना विषयी विचार करू लागली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा