बेवफा ५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ५ |
" बा, तुम्ही दोघांनी एकाचंच नाहीतर तीन तीन
व्यक्तींचे जीवन उद्ध्वस्त केलात. केवळ आपल्या खोट्या
प्रतिष्ठेसाठी ! काय मिळालं तुम्हां लोकांना हे सगळं करून.
कायमचं दुःखी करून टाकतात आम्हां साऱ्यांना. म्हणून
आम्ही ठरविले आहे, तुमच्या इच्छेनुसार जगायचं. स्वतःची इच्छा नसताना." त्यावर त्या दोघी खजील झाल्या. कदाचित त्यांना वाटत असावे की खरंच आपलं काही चुकलं का ?"
आता इथून पुढे
सकाळी ऋषी घरी आला तर त्याच्या वडिलांनी
त्याला त्याच्या बेडरूममध्ये जाण्यास रोखले नि विचारले,
" ऋषी , आपल्या खोलीत जाण्या अगोदर माझ्या
प्रश्नःचे उत्तर दे."
" विचारा काय विचारायचे आहे ते."
" तू रात्रभर होतास कुठं ?" त्याने सत्य सांगायचे टाळत
म्हणाला," माझ्या एका मित्राने आत्महत्या करण्याचा
प्रयत्न केला होता, त्याला पाहायला इस्पितळात गेलो
होतो." त्याच्या वडिलांना त्याच्या बोलण्यावर अजिबात
विश्वास नव्हता. म्हणूनच की काय त्यांनी विचारले की ,
मित्राने आत्महत्या केली होती का मैत्रिणी ने ?"
" बाबा , तुम्हांला नेमके काय म्हणायचंय ?"
" मला नेमकं काय म्हणायचंय ते तुला चांगलं
ठाऊक आहे , म्हणून विचारतोय ?
" मैत्रिणीच्या ?"
" आणि ती मैत्रीण सुरभी च असणार , होय ना ?"
" माहीत आहे तर विचारता कशाला ?"
" लाज नाही वाटत विचारता कशाला म्हणून विचारायला ?"
" वाटते ना, म्हणून तर तुम्हांला खोटं सांगत होतो
पण तुम्हांला खरंच ऐकायचं होतं माझ्या तोंडून, होय ना ?" त्यावर विलासराव काहीच बोलले नाहीत. कारण
ऋषी जे बोलला ते खोटं नव्हतं. ऋषी म्हणाला,"बाबा,
तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होतं का हो ?"
" हा कसला प्रश्न ?"
" नाही म्हणजे कसं आहे, ज्याने जिवनात कधी
कुणावर प्रेम केलं नसेल ना, त्याला प्रेमाचं महत्व काय
कळणार ना ?"
" आम्ही लग्नापूर्वी जरी कुणावर प्रेम केलं नसलं तरी
आम्हांला प्रेमाचं महत्व कळत नाही , असं नाहीये. कारण
लग्नानंतर तुझ्या आई वर फार प्रेम केलंय त्यानंतर तू जन्माला आलास तेव्हा तुझ्यावरही आम्ही प्रेम केलंच की !" विलासराव उद्गारला
" ते प्रेम वेगळे नि हे प्रेम वेगळे." ऋषी उद्गारला.
" वेगळे कसे ? प्रेम हे प्रेमच असतं."
" नाही. आई- वडील आपल्या मुलावर जे प्रेम करतात
ते वात्सल्य प्रेम असतं नि तरुण मुलं जे प्रेम करतात ते
एक वेगळ्या स्वरूपाचे असते बाबा ! त्या मध्ये दोघेही एकमेकांसाठी जीवन मरण्याच्या आणाभाका घेतात. त्यांच्या प्रेमात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो."
" अस्सं ! मग आम्ही तुझ्यावर प्राचीशी लग्न करच अशी जबरदस्ती तर नव्हती ना केली ?"
" त्यावेळी मला माहित नव्हतं बाबा की , माझा नाद
सोडण्यासाठी सुरभी च्या आई-वडिलांनी सुरभी ला धमकी दिली की जर तिने माझा नाद सोडला नाही तर त्याला
आपलं जीवन मुकावे लागेल. कारण अगोदर त्यांनी मला भाडोत्री गुंडाकडून बेदम ठोकून काढले होते. माझी ती अवस्था पाहून बिचारी फार घाबरली आणि माझे प्राण वाचवण्यासाठी तिने स्वतः बेवफा असल्याचे खोटे खोटे नाटक केले जेणेकरून मी तिचा तिरस्कार करावा. हा त्यामागचा तिचा हेतू होता आणि तो सफल ही झाला. मी तिचा खरोखरच तिरस्कार करू लागलो होतो. परंतु ज्या दिवशी माझं प्राची शी लग्न झालं. त्या दिवशी ती स्वतःला रोखू शकली नाही आणि तिने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता मला सांगा
माझ्यासाठी तिने एवढा मोठा त्याग केला. त्या बदल्यात
मी तिला पाहायला इस्पितळात गेलो तर ती माझी चूक होती असं मला वाटत नाहीं. विलासराव एकदम निरुत्तर झाले. त्यांना काही कळेना की काय बोलावे ते ? पण क्षणभर वेळाने म्हणाले, " तू म्हणतोस ते ही बरोबर आहे म्हणा. परंतु आता तुझं प्राची शी लग्न झालं आहे, त्यात तिचा काही दोष आहे का ? नाही ना ? मग तिच्या हिस्सा चे प्रेम नको का तिला मिळायला ?"
"बाबा , तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, ह्यात
प्राची चा काही दोष नाहीये. उलट तिचा मी दोषी आहे."
" हो ना ? मग जा तिची समजूत काढ आणि तिचा
स्वीकार कर बस्स ! दुसरे काहीच सांगू इच्छित नाही मी
तुला."
" मी प्रयत्न करीन "
" मग जा आधी तिची समजूत काढ. रात्रभर रडून
रडून फार डोळे सुजवले आहेत तिने आपले " असे विलासराव ने सांगितल्या नंतर ऋषी तिच्या बेडरूम मध्ये गेला. तेव्हा त्याने पाहिले की प्राची चे रडून रडून खरंच डोळे सुजले होते. ऋषी तिच्या जवळ गेला खरा परंतु बोलायला सुरुवात कोठून आणि कशी करावी हे त्याला कळेना. शेवटी हिंम्मत करून म्हणाला," प्राची आय एम व्हेरी व्हेरी सॉरी ! हनिमून च्या रात्री तुला एकटीला काही न सांगता सरळ निघून जाणे योग्य नव्हतं. खरं तर चुकलं माझं. प्लिज माफ कर मला." त्यावर प्राची काहीच बोलली नाही. फक नजर वरती करून तिने त्याच्या कडे पाहिले. तेव्हा तिला ऋषी च्या नजरेत अपराधी भाव दिसले. याचा अर्थ तो तिच्या सोबत जे वागला हे चुकीचे होते हे त्याला ही पटलं असावं म्हणूनच तो माफी मागतोय. ती काय बोलण्या अगोदरच तो तिला म्हणाला," प्राची, तुला आज मी माझ्या पाष्ट विषयी सांगू इच्छित आहे, असे म्हणून त्याने स्वतःच्या नि सुरभी च्या प्रेमा विषयी सविस्तर माहिती दिली इतकंच नाही तर रात्री आपल्याला कुणाचा मॅसेज आला होता नि तो मॅसेज वाचल्या नंतर आपण कोणाला काही न सांगता निघून गेलो होतो नि मागचे कारण ही त्याने तिला सांगून टाकले आणि शेवटी म्हणाला ," मला जरा अवधी दे , माझं पाष्ट विसरण्याची ! कारण जोपर्यंत मी माझं पाष्ट विसरत नाही तोपर्यंत तुझं प्रेम स्वीकारू शकत नाही. तेव्हा मला जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. एकंदरीत त्याने आपल्या पाष्ट विषयी काही न लपविता सांगून टाकल्यामुळे प्राची मनात त्याच्या विषयी जो गैरसमज होता तो दूर झाला. म्हणून प्राची हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली," काही हरकत नाही तुम्हांला जितका अवधी पाहिजे तितका घ्या. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहीन." असं म्हणताच ऋषी ला इतका अत्यानंद झाला की त्याने चटकन प्राची ला हग केलं. पण लगेच त्याच्या लक्षात आलं की ही सुरभी
नसून प्राची आहे तसा तो चटकन तिच्या पासून दूर झाला.
" काय हो काय झालं ?" प्राची ने विचारले. काय बोलावे
ते न सुचल्याने तो फक्त इतकंच म्हणाला," नाही. काही नाही." असे म्हणून तिच्या खोलीतुन बाहेर पडला. तशी
त्याला त्याची आई दिसली. तिने विचारले," काय रे, सूनबाई ची समजून काढलीस का ?" त्यावर तो इतकंच
म्हणाला ,' हो !" तशी त्याची आई त्याला म्हणाली," या
पुढे लक्षात ठेवायचं असं बायकोला सोडून रात्री अपरात्री
बाहेर जाऊन नकोस कोठे . समजलं का ?" ऋषी ने आपली होकारार्थी मान डोलावली.
काही दिवसानंतर ऑफिस मधून सुटल्यानंतर त्याने
लोकल पकडली नि शिव स्टेशनवर येऊन उतरला आणि
पायी चालत निघाला होता. पण तेवढ्यात सायन किल्ला
जवळ येताच त्याच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
तो सुरभी सोबत अनेक वेळा ह्या किल्ल्यावर आला होता.
आता पण आपोआपच त्याची पाऊले त्या दिशेने वळली.
तो पायऱ्या चढून किल्ल्यावर आला जिथं ते दोघेही बसत
असत. त्या ठिकाणी तो आला. पण त्या जागी त्याला सुरभी चा नवरा प्रकाश कुण्या मुली सोबत गळ्यात गळा घालून बसलेला त्याला दिसला. तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला की हा तर सुरभी चा नवरा आहे, हा इथं काय करतोय नि त्याच्या सोबत ही तरुणी कोण आहे ? ह्याचं कुण्या दुसऱ्या मुलीवर अफेर तर नाहीये ना ? हो असेच असावे. याचा अर्थ हा सुरभिची चक्क फसवणूक
करतोय यात शंका नाहीये. या संबंधी सुरभी शी बोलायला
हवं. पण आपल्या सांगण्यावर विश्वास करेल का ती ?
का नाही करणार ? वाटल्यास पुरावा म्हणून त्याचा एक
फोटो काढून व्हाट्सएपवर पाठवून द्यावा. पुरावा म्हणून
पाठवून द्यावा. असा विचार मनात येताच त्याने लगेच
त्याची अंमलबजावणी केली त्याने त्या दोघांचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला नि व्हाट्सएपवर सुरभी ला फोटो पाठविला. परंतु सुरभी त्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. शेवटी त्याने सुरभी ला फोन करून सांगितले की पाहिलेस काय आपल्या नवऱ्याचे प्रताप ?"
" हो पाहिले."
" तरी सुध्दा तू गप्प ?"
" हो."
" का बरं ?"
" कारण त्याने आपल्या अफेर विषयी मला पहिलंच
सांगितले होते."
" काय ?....त्याने तुला आपल्या अफेर विषयी पहिलेच सांगितले होते ? आणि तरी सुद्धा त्याच्याशी लग्न केलेस."
" हां, कारण मला त्याचा प्रामाणिकपणा फार आवडला होता."
" पण त्याने हे देखील तुला सांगितले होते की लग्ना
नंतरही त्याच्याशी अफेर सुरू ठेवणार आहे म्हणून."
" हो सांगितले होते."
" आणि तरी देखील तू त्याच्याशी लग्न केलेस ?"
" हो."
" का केलेस ?
" बस्स केले. प्रत्येक गोष्टीला कारणच असावे लागते
असं नाहीये."
" पण माझं तर असं मत आहे की कारणाशिवाय कोणती गोष्ट घडतच नाही मुळी !"
" हे जरुरी नाहीये की प्रत्येक गोष्टीला कारण असायलाच हवे. काही गोष्टी अकारण पण घडतात."
" पण माझं मन काही वेगळेच सांगतेय."
" काय सांगतेय तुझं मन ?"
" हेच की तू माझ्या पासून काहीतरी लपवत आहेस."
" लपवत काही नाही. त्याचं फार आधीपासून अफेर
सुरू होते. माझ्याशी लग्न केलं ते फक्त आपल्या आई-वडिलांची इच्छा आहे म्हणून."
" आणि तुझ्या इच्छेचे काय ?"
" माझी इच्छा नव्हतीच काही !"
" म्हणजे अध्याप तू मला विसरली नाहीस तर !"
" आधी तू मला हे सांग की तू मला विसरलास का ?"
" नाही. कदापि विसरणार नाही मी तुला.
" मग हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे."
" मग तू असं का केलंस ?"
" तसं करणं फार जरुरीचे होते."
" ते का बरं ?"
" जीवनात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाहीये. म्हणून जे पदरी पडलं ते माणसाने स्वीकारावे."
" हे म्हणायला फार सोपं असतं पण निभवायला फार
कठीण असते ?"
" प्रयत्न करणाऱ्याला काहीही अशक्य नाहीये."
" असं आहे तर मग तू का हा निर्णय घेतलास ?"
" निर्णय चुकला खरा, पण या पुढे तो सुधारायचा मी प्रयत्न करीन. अर्थात प्रकाश ला मी आपलासा करण्याचा प्रयत्न अवश्य करीन." सुरभी असं मुद्दाम म्हणाली. कारण
तिला माहीत होतं प्रकाश चं दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू
आहे ते. आणि तिला पण त्याच्याशी कुठं संसार करायचा
आहे,माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे ऋषी ! मी तुझ्या शिवाय दुसऱ्या कोणाची पत्नी होऊ इच्छित नाही. परंतु ती हे ऋषी ला सांगू शकत नव्हती , म्हणून ती तशी बोलली.
" मग मीही प्रयत्न जरूर करीन. प्राची ला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा "
" व्हेरी गुड ! मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा