Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र २७

षड्यंत्र २७
षड्यंत्र २७

 



   " तिला जिवानिशी मारू नकोस.तिला एका सुरक्षित ठिकाणी
ठेव." तेव्हा अपहरण कर्त्या ने विचारले की, पण का ?"
तेव्हा पलीकडून आवाज आला की आपली माधवी आपल्या
दुश्मनाच्या ताब्यात आहे, तिला जर सहिसलामत ठेवायचे
असेल तर लीला ला जिवंत ठेवायला लागेल." मग काय
नाईलाजाने लीला चे डोळे बांधले नि पुन्हा मोटारीत कोबले
नि निघाले.

पूढ़े
 

    माधवी मी अंधाऱ्या खोलीत फार वैतागली होती पण करणार
काय ? मला कोणी kidnap केले होते हेच कळत नव्हते. आणि मी कोठे आहे तेही कळत नव्हते. मोबाईल सुध्दा नाही स्वतः जवळ आता पप्पा ना सूचना तरी कशी देणार मी कुठं आहे ते. काय करू ? कशी सुटका करून घेऊ स्वतःची तेही कळत  नाहीये. आणि ज्याने आपल्याला kidnap केलंय त्याचा ही  पत्ता नाही. भूक पण फार लागली आहे, पण काय करणार इथून बाहेर पडण्याचा मार्ग ही दिसत नाही. आपण शहराच्या कोणत्या स्थानी आहोत तेही कळत नाहीये. हा कधी येतोय मेला कुणास ठाऊक भुकेने जीव माझा खासाविस झाला आहे पण करू काय ? इथून बाहेर पडण्याचा मार्ग पण दिसत नाहीये. अश्या परिस्थिती मध्ये त्या हरामखोराची वाट पाहण्या
व्यतिरिक्त दुसरं काय  करू शकते मी ? एकदा कळू दे कोण आहे तो नराधम ? नाही त्याची चामडी सोलायला लाविन तर नावाची मी माधवी नाही. असा ही एक विचार तिच्या मनात
येऊन गेला. इतक्यात बाहेर कसला तरी आवाज आला,
तशी ती सावध झाली नि स्वतःशीच उद्गारली की,  कोण तरी आलं वाटतं  ? दुसरा कोण असणार , तोच नराधम असणार  ? एक काम करते दरवाजा मागे लपून राहते. आणि तो जसा  आंत मध्ये प्रवेश करील तसा  मी त्याच्यावर अटॅक करीन.
तो बेसावध असणार, त्यामुळे तो गडबडून जाईल नि
मी त्याच संधीचा फायदा घेईन . असा विचार करून ती उठली
नि अंधारातूनच दरवाजाच्या दिशेने सरकली. दरवाजा पर्यंत
पोहोचलीच होती तेवढ्यात दरवाजाची कडी काढल्याचा आवाज कानी पडला. मी पवित्रा घेतलाच होता.त्याने आंत प्रवेश
करताच मी त्याला जोराने धक्का दिला. माझ्या अपेक्षा प्रमाणे
तो बेसावधच होता. तो कोलमडून खाली पडणार होता. पण
त्याने स्वतः ला सावरले. मी मात्र संधी मिळताच तेथून पळ
काढला. त्या रूम मधून बाहेर तर पडले , परंतु जायचे कोठे
ते काही कळेना कारण बाहेर आल्यावर असे वाटले की मी कोणत्यातरी मोठ्या बंद कंपनी मध्ये आहे, त्यामुळे बाहेर
जाण्याचा रस्ता कोणत्या बाजूला आहे ते कळेना,पण तरी
देखील वाट फुटेल त्या दिशेने पळत सुटले. पण व्यर्थ समोरून
तो मास्क घातलेला गुंडा  माझ्या समोरून आला. मला प्रश्न
पडला की हा इथून कुठून आला ? म्हणजे गोल फिरून मी
त्याच जागी तर नाही ना आले ? काही कळत नाहीये. भुल
भुलैया झालं आहे की सगळं ; पण तरी देखील मी त्याच्या वर
हल्ला केला. बहुधा त्याला त्याची कल्पना असावी त्याने सिताफिने माझा हात पकडला नि पिरघळला तशी मी मोठ्याने किंचाळली. " अग s s आई ग मेले ss मी ss ?" त्यावर म्हणाला," मेलीस कुठं जिवंत तर आहेस ?" त्यावर ती त्याच्या वर चिडून म्हणाली,   " नालायक माणसा किती दुखला माझा हात. तुझा हा हात आहे का लोखंड ?"
   " इसे कहते हैं मर्दो का हाथ जीस पर पडता है, ना उसे
अपणी नानी याद आती है, समझे ! म्हणून बाई माणसाने
पुरुषा पुढे आपला  शहाणपणा करायचा नसतो हे कळत कसे नाहीये  तुला ?"
  " ए sss तू मला बाई का म्हणतो आहेस ?*
   " बाई नाहीतर काय आई म्हणू तुला ? लग्न झालेल्या स्त्रीला
बाईच  म्हणतात. म्हणून तू बाईच आहेस. पण हां तुला बाई म्हणून घ्यायला आवडत नसेल तर तू माझी प्रेमिका बन. सिंपल."
   " तू आधी मला हे सांग, कुणाच्या सांगण्यावरून माझे अपहरण केले आहेस ."
   "मी कधी दुसऱ्या कुणाचा हुकूमाचे पालन नाही , कारण  मीच माझा बॉस आहे, तेव्हा मी दुसऱ्यांना ऑर्डर देतो दुसऱ्या ऑर्डर स्वीकारत नाही कधी ."
    " बरं तू आहेस तरी कोण ?"
    " हां यह हुई ना मर्दोवाली बात . अब सूनो, मैं तुमसे बहुत
प्यार करता हुं, लेकीन तुम हो की दुसरोपर अपना प्यार लुटना
चाहती हो, जो तुम पर प्यार करते ही नहीं, इसलिए मैने सोचा कि क्यों हम तुम्हे अपना बना ले !"
   " तुला कळतय तरी काय तू काय बोलत आहेस ते?"
   " बहुत अच्छी तरह अगर पता न होता तो तुम्हे यहां लाताही
क्यों ?"
   " पण तू कोण आहेस ते सांगत का नाहीयेस  ?"
   "  ते सांगितल्याने काय होईल ? म्हणजे तुझी सुटका होणार
आहे का इथून ? नाही ना, मग कशाला उगाच त्रास करून
घेतेस ? त्या पेक्षा मी सांगेन तशी वागशील तर लवकर सुटका
होईल तुझी इथून."
   " तुझ्या म्हणण्या सारखे वागायला मी काय तुझी बायको
नाही."
   " मग मी कोण आहे हे का जाणून घायचंय तुला ? त्या पेक्षा
तूच ओळख ना मला ? म्हणजे स्वतःच्या मेंदूवर जरा जोर दे
म्हणजे सारे आठवेल." त्याच्या तोंडावर मास्क असल्याने त्याचा चेहरा ओळखता येईना, परंतु त्याचा आवाज कुठं तरी  ऐकल्या सारखा वाटत होता, परंतु नक्की तो आवाज कुणाचा आहे हे आठवत नव्हतं. तिने खूप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काही आठवेना तेव्हा ती म्हणाली," हे बघ तू कोण आहेस, हे मला आठवत नाहीये. तेव्हा तूच सांग कोण आहेस तू ?" त्यावर तो म्हणाला," सांगेन पण इतक्यात नाही तू जेव्हा माझी होशील ना तेव्हाच सांगेन मी तुला की  मी कोण आहे ते. तूर्तास इतकंच समज की तुझ्यावर आपला जीव ओवाळून टाकणारा तुझा एक आशिक बस इतकी ओळख पुरेशी आहे, नाही का ?"
   " ओ हॅलो नको ती स्वप्ने पाहू नकोस मी तुझ्याशी कदापि
लग्न करणार नाही, कारण माझं लग्न झालं एका मुला सोबत."
त्यावर तो कुत्सित पने हसला नि म्हणाला की, त्याला लग्न
म्हणत नाही तर भातुकलीचा खेळ म्हणतात.भातुकलीच्या खेळामध्ये एक राजा नि एक राणी असते.पण त्यांचा अर्ध्यावरच
डाव मोडतो जसा तुझा मोडला. मग तूच सांग  ह्या खेळाला भातुकलीचा खेळ नाही म्हणायचं ते दुसरे काय म्हणायचंय ?. प्रेम चे आणि तुझं लग्न भातुकलीचा खेळ तर होता तो, खोटा खोटा म्हणून तर अर्ध्या वरती डाव मोडला आणि अधुरी एक कहाणी ठरली. खरी कहाणी आता सुरू होईल. जेव्हा तू माझ्याशी लग्न करशील."
  " अरे पण आहेस तरी कोण तू ? आणि मी का करेन तुझ्याशी लग्न.?"
" तूच काय तुझा बाप देखील करेल."
" मग जा आणि माझ्या बापाशीच लग्न कर."
" अग बापाशी म्हणजे तुझा बाप लावून देईन तुझं माझं लग्न."
  " वाट बघ."
  " वाट मला नाही बघायची आहे तर तुला पहायची आहे. स्वतःहून राजी झालीस तर ठीकच आहे, नाहीतर बळजबरी
पण करते येते मला."
   " मला हात तर लावून बघ."
   " आणि लावला तर काय करशील ?"
   "  जीव घेऊन मी तुझा !" दात ओठ चावून म्हणाली.
  " मी जीव द्यायला तयार आहेस कधी घेतेस जीव ते सांग. कारण तुझ्यावरून मी पूर्ण जीव ओवाळून टाकला आहे  माझा. मला तुझ्या हातून मरायला पण फार आवडेल पण आता नाही आपल्या दोघांचे लग्न झाल्यावर तुला पूर्ण परवानगी ! पण त्या अगोदर थोडसं जेवून घे. भूक लागली असेल ना ?" असे म्हणून त्याने कुणाला तरी हाक मारली तसा एक व्यक्ती जेवणाचे थाळी घेऊन आला. मला भूक तर फार लागली होती. पण उगाचच मी म्हणाले," मला नको तुझं जेवण मला फक्त  इथून कधी सोडणार आहेस ते सांग."
   " इतकी घाई का आहे ? आपलं अजून लग्न व्हायचंय
मग सुहागरात होईल. त्यानंतर तुझी सुटका नक्की होईल."
  " तुला माहित नाही मी कुणाची मुलगी आहे ती, माझ्या वडिलांना जर कळलं ना, की मी कुठं आहे ती, मग बघ कशी तुझी वरात निघते ती."
   " अग वरातच तर काढायची आहे, पण आपल्या दोघांची !"
   " ए बस झालं हं तुझं म्हणे वरात काढणार आहे लग्नाची !
वरात निघेल पण लग्नाची नाहीरे तुझे काळे तोंड करून तुझी
गल्ली बोळातून धिंड काढली जाईल रे,तू कुणाच्या मुलीवर
हात टाकला आहेस ह्याची कल्पना तरी आहे का रे तुला ?"
  " तुझा बाप माधवराव नाही का ? ओळखतो मी त्याला.
शारदाबाई चां असली खुनी तुझा बाप आहे,  पण फसला  बिच्चारा तुझा सासरा सुंदर राव सावंत."
    " हे सर्व तुला कसं माहीत ?"
    " मला सर्वांची जनम कुंडली ठाऊक आहे, म्हणून सांगतोय
वेडा हट्ट सोड, नि माझ्याशी लग्न कर , एकदम सुखी होशिल."
   " माझं लग्न झालंय ."
   " जसे सिनेमात होतं. अगदी तसं होय ना ?"
   " नाही खरेखुरे !"
   " कुणाला फसवतेस मला का स्वतःला ? नाही म्हणजे
एक पत्नी जिवंत असताना दुसऱ्या लग्नाला समत्ती नसते.
होय ना ?"
   " नाही आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालय ?"
   " हो पण त्याचा उपयोग काय ? तुला मुलं तर होणार नाही
कारण तो तुला जवळच जाणार नाही. त्यापेक्षा तु माझी हो एकदम राणी सारखी ठेवीन मी तुला."
  " माझ्या पाया जवळ बसायची पण तुझी लायकी नाही
आणि माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतोस."
   " स्वप्न तर फार मोठी पाहिलीत मी ! तुझ्याशी लग्न करायचे
तर फार छोटं स्वप्न आहे, राजीखुशीने तयार झाली तर ठीकच
आहे, नाहीतर जबरदस्ती सुध्दा करते आम्हाला. पण ती वेळ
तू आणू नकोस. मुकाट्याने आलीस तशीच चल आपल्या
खोलीत तुझ्यासाठी तीच खोली एकदम सुरक्षित आहे, कारण
तिथं माझ्या शिवाय दुसरा कोणी येणार नाही, परंतु इथून जर
बाहेर पडलीस ना, तर जंगली हिंस्त्र प्राणी तुझ्या शरीराचे
लचके तोडून आपली भूक भागवतील. खूप दिवसाचे उपासी
असताना ना ते ? खोटं वाटत असेल तर बाहेर जाऊन पाहून
ये." मला वाटलं की तो खोटं बोलतोय म्हणून मी विचारले
की बाहेर जायचा रस्ता दाखव." त्यावर तो म्हणाला," असाच
पुढे जा, उजव्या बाजूला एक बोळ दिसेल त्या बोळातून
बाहेर पड. आणि तुला काय दिसते ते बघ." मी खरोखर त्याने
सांगितलेल्या दिशेने गेले तर तिथं खरोखर एक बोळ दिसला.
त्या बोळातून मी बाहेर पडले नि समोरचे दृश्य पाहून माझ्या
अंगावर काटा उभा राहिला. एका वाघाला सशाची शिकार
करताना मी पाहिले आणि  किंचाळून आल्या मार्गाने वापस पळाली. तो समोर मास्क धारी उभा होता. माझ्याकडे पाहून कुत्सित पने हसत होता. मला त्याचा भयंकर राग तर आला पण करणार काय ? इतक्यात त्याचे स्वर माझ्या कानावर पडले की, आता तूच ठरव तुला वाघाची शिकार बनायची आहे का माझी राणी बनायचं आहे ते." त्यावर मी काहीच बोलली नाही.

   चंदन ने फोन करूनच विचारले की आता पुढे काय करायचं
ते सांगा." त्यावर माधवराव म्हणाले," आता एक काम कर
सुंदररावांची पत्नी मधुरा बाई नि आमचा भावी जावई प्रेम
या दोघांनाही पकडुन आपल्या गुप्त स्थानावर घेऊन ये."

       प्रेम पोलिसांना फोन करून विचारतो की लीलाचां काही पत्ता लागला का ? तेव्हा पलीकडून त्याला सांगण्यात आले की पोलीस तपास सुरू आहे." त्यावर मधुराबाई उद्गारली की, मला काय वाटतं माहितेय आपण माधवरावकडे जाऊन चौकशी करू या का ? म्हणजे कळेल तरी सूनबाई चे अपहरण त्यांच्या गुंडांनी केलेय का ? का दुसरा कोणी माणसाने केलंय ?"
   " दुसरा कोण कशाला करील ? माझा तर पूर्ण डाऊट त्यांच्यावरच आहे, त्यांच्या शिवाय दुसरा कोणी असं कृत्य
करणार नाही ?"
   " अरे या राजकरणी लोकांचे अनेक लोकांशी वैर असतं."
   " म्हणजे तुला म्हणायचंय की पप्पांचे वैर असावे कोणाशी तरी ?"
    " असे आपलं मला वाटतं रे, तुझ्या सासऱ्या बरोबर नव्हतं
का  त्यांचे वैर ?"
  " पण माझ्या सासऱ्यानी त्यांच्याशी वैर नाही केलं."
  " हो रे ते तुझ्या सासऱ्याने वैर नाही केले, परंतु सर्वच तुझ्या
सासऱ्या सारखे सज्जन असणार नाहीत ना "
  " हो तेही खरं पण मला नाही वाटत पप्पांचे आणखीन कोणा बरोबर वैर असेल असं." मायलेकाचे इतकं बोलणं झालंच होतं इतक्यात तिथं माधवरवांचे गुंड आले नि जबरदस्तीने मधुराबाई आणि प्रेम या दोघांना पकडुन मोटारी मध्ये बसवून घेऊन गेले. आणि त्यांना बंद कंपनीत आणून बांधून ठेवले नि चंदन ने माधवरावांना फोन करून बोलवून घेतले. माधवरावांनी अगोदर प्रेमळ पणाने विचारले की, प्रेम , तुला जर तुझी बायको जिवंत
हवी असेल तर मला सांग माझी मुलगी कुठं लपवून ठेवली आहेस ?" त्यावर प्रेम म्हणाला," मला खरंच माहित नाहीये की तुमची मुलगी कुठं आहे ती ?"
   " खोटे ! साफ खोटं ! तूच कुठं तरी लपवून ठेवले आहेस
तिला. तेव्हा बऱ्या बोलणं खरे काय आहे  ते सांगून टाक. नाहीतर तुमच्या पैकी कुणीही इथून जिवंत जाऊ शकणार नाहीये." माधवराव किंचित रागावून म्हणाले. त्यावर प्रेम म्हणाला," काका, मला खरंच  माहित नाहीये की,  तुमची मुलगी कोठे आहे ती ? आणि मला जर माहीत असती तर मीच नाही
का  तिला सोडवून आणली असती."
  " तू खोटं बोलत आहेस."
  " तर मग काम करा, तुम्हाला आमचा जीव घ्यायचाच असेल
तर अगोदर माझा घ्या. मग इतरांचा."
  " तू असा नाही बोलणार , जा रे ह्याच्या बायकोला इथं आण." आणि थोड्याच वेळात लीला ला तिथं घेऊन येतात.
लीला ला तिथं आणल्यावर माधवराव म्हणाले," आता तरी
खरं सांग नाहीतर तुझ्या बायकोचा अगोदर मी जीव घेईन
मग तुझा." त्यावर मधुराबाई म्हणाली," भावोजी मी खरं तेच सांगतेय आम्हाला तुमच्या मुलीं विषयी खरंच काही माहीत नाही ये.पण तरी देखील तुमचा आमच्या सांगण्यावर जर विश्वास बसत नसेल तर सर्वात अगोदर माझा जीव घ्या. मग इतरांचा." तशी लीला म्हणाली," नाही काका , आईचे ऐकू नका. मी काय सांगते ते ऐका, तुमच्या मुलीच्या सुखाच्या आड मी येते म्हणून तुम्ही माझं ऐकायला पाहिजे." त्यावर माधवराव हसून म्हणाले," अरे वा ! तुम्हा दोघांचे तर  एकमेकावर अफाट प्रेम आहे तर ! त्यातले थोडे तरी प्रेम जर तू माझ्या मुलीवर केले
असते तर आज माझी मुलगी फार सुखी दिसली असती मला.
पण नाही तुझं सारे प्रेम तर ह्या भिकार मुलींसाठी मग माझ्या
मुलीने काय करावं ? फक्त तुम्हां दोघांचे प्रेमाचे चाळेच पाहायचे
का ? म्हणून तुझ्या ह्या बायकोचे मी माझ्या माणसा कडून
अपहरण करविले. ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली नि तुम्ही
लोकांनी भाडोत्री गुंडाकडून माझ्या मुलीचे अपहरण करविले.
पण हरकत नाही. जर तुम्ही लोकांनी माझ्या मुलीला कोठे
ठेवले आहेत हे जर सांगितले तर मी वचन देतो की तुम्हा दोघांना
इथून सहिसलामत देईन.कारण माझ्या मुलीच्या संसारात ला
काटा ही लीला आहे, तेव्हा हीचा मी काटा काढल्या शिवाय
राहणार नाहीये. तेव्हा माधवीला कोठे बंद करून ठेवले आहे
ते सांगा नि स्वतःचा जीव वाचवा नाहीतर तुम्हां तिघांपैकी
कोणीही जिवंत इथून जाणार नाही. तेव्हा विचार करा नि
पटकन माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या." तेवढ्यात त्यांच्या मोबाईल ची रिंग वाजली. त्यांनी मोबाईलच्या स्क्रीन वर पाहिलं असता त्यावर माधवी चे नाव दिसले त्यांनी लगेच कॉल घेतला समोरून माधवी चा आवाज होता. त्यांनी विचारले," बोल बेटा कोठून बोलते आहेस तू ?"
   " ही जागा नेमकी कोठे आहे ती माहीत नाहीये मला , परंतु फार मोठे जंगल आहे, आणि जंगली प्राणी सुध्दा आहेत इथ
मला फार भीती वाटते ड्याडी "
   " काही चीता करू नकोस बेटा तुझ्या सासरच्या सर्व माणसांना पकडुन आणले आहे मी ,  जोपर्यंत तू कोठे आहेस
ते हे लोक सांगत नाही तोपर्यंत मी त्यांना सोडणार नाही."
   " पप्पा माझ्या सासरच्या माणसांना कशापायी पकडले
आहे तुम्ही ? मला सासरच्या माणसांनी नाही तर माझे अपहरण करणारा दुसराच कोणीतरी आहे."
   " काय म्हणतेस काय पोरी ?" पण तेवढ्यात पलिकडून
संपर्क च तुटला.माधवरावांचे बोलणे अर्धवटच राहिले. ते फक्त हॅलो ss हॅलो च करत राहिले थोड्यावेळ. पण क्षणभर वेळाने एक भारदस्त आवाज मात्र त्यांच्या कानी पडला की,

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..