बेवफा ७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ७ |
" पण त्यासाठी बाहेर जाण्याची काय गरज आहे ?"
" कारण त्यांना कोणाकडून तरी असं समजलं आहे की
आपल्या दोघांमध्ये पती पत्नी सारखे नाते नाहीये."
आता इथून पुढे
" काय सांगतेस ?"
" खरं तेच सांगतेय." प्राची उद्गारली. ऋषी ला एकदम
टेंशन आलं की, " मग आता काय करायचं ?" प्राची पण
मुद्दामच म्हणाली, " त्यांच्या समोर नाटक तर करावं
लागेल की आम्ही दोघेही आदर्श पती- पत्नी आहोत, तुम्ही समजता तसं नाहीये. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे." ऋषी शेवटी नाईलाजाने म्हणाला की ," ठीक आहे, चल जाऊ चित्रपट पाहायला." प्राची एकदम खुश झाली. तिच्या मना सारखे झाले. खरे तर ही आयडिया तिच्या सासू ने तिला दिली होती. काही वेळा
पूर्वी म्हणजे तिचा नवरा ऋषी कामावरून येण्याच्या अगोदर तिच्या बेडरूम मध्ये तिची सासूबाई आल्या होत्या. त्या तिला म्हणाल्या," सुनबाई, जर तुला असं वाटत असेल की तुझा नवरा त्या सटवी ला विसरून तुझ्या
जवळ यायला हवा असेल तर तुलाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. " त्यावर प्राची ने न समजून विचारले,
" हां पण काय केलं म्हणजे माझा नवरा माझ्या जवळ येईल ?" त्यावर तिची सासू तिला म्हणाली," तेच ता
तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी !"
" सांगा बरं, तुमच्याकडे काय आयडिया आहे ती ?"
" माझ्या कडे तुझा कान कर, तुझ्या कानात सांगते
सारे." असे म्हणताच प्राची ने आपला कान त्यांच्या
तोंडापाशी नेला तेव्हा त्यांनी तिच्या कानात एक आयडिया
सांगितली. तेव्हा त्यांची आयडिया ऐकून तिला आनंद तर
झाला. परंतु थोडं वाईट ही वाटले आणि वाईट वाटण्याचे कारण हे आहे की ऋषी शी खोटं बोलून त्याला आपल्या सोबत पिक्चर ला घेऊन जाणे हे तिच्या मनाला पटत नव्हते. परंतु सासूबाई ला नाराज करणे पण तिला पटत
नव्हते. पण करणार पर्याय नव्हता तिच्या पुढे म्हणून
नाईलाजाने ती शेवटी आपल्या सासूबाई च्या सांगण्या नुसार नाटक करण्यास ती तयार झाली आणि त्या प्रमाणे तिने आपले आई-वडीलाना पण त्याने राजी केले. फक्त पण तिला भीती एकाच गोष्टीची वाटत होती आणि चित्रपट पाहून आल्या नंतर ऋषी ने जर विचारले की तुझे आई-वडील कोठे आहेत तर काय सांगायचं ? असा विचार तिच्या आला ही होता आणि तिने आपला हा विचार आपल्या सासू समोर बोलून दाखविला होता. तेव्हा तिच्या सासूबाई तिला आश्वासन दिले होते की तू त्याची अजिबात चिंता करू नकोस. मी ते सारेकाही पाहून घेईन. तू फक्त मी सांगते तसे करायला तयार हो बस्स !" असे सांगितले होते आणि तिने देखील ते हुबेहूब वटविले होते. ऋषी तिच्या सोबत चित्रपट पाहण्यास राजी पण झाला. हे जसं तिला आठवलं तशी ती स्वतःशीच हसली. परंतु ही
गोष्ट काही ऋषीच्या नजरेतून काही सुटली नाही. त्याने
नोटीस केलं की हिच्या मनात काहीतरी सुरू आहे, परंतु
काय हे मात्र कळू शकले नाही म्हणूनच की काय त्याने
दोन बोटांची चुटकी वाजविली. तशी ती भानावर आली.
" अं ss काय झालं ?"
" चलायचं नाही आहे का मॅडम ?"
" हां चलायचं ना ? "
" मग कधी ? टाइम निघून गेल्यावर ?"
" मग चला ना , मी कुठं नाही म्हणाली."
" ह्याच कपड्यावर येणार आहेस का तू माझ्या सोबत ?"
" हो. "
" काय ? ह्या कपड्यावर ? डोकं भिके फिरले नाही ना
तुझे ? नाही म्हणजे घरात घालायच्या कपड्यावर येणार
आहेस का तू चित्रपट पाहायला ?"
" हो. नाही म्हणजे , कपडे कोणाच्या खुशीसाठी घालू ?"
" कोणाच्या खुशी साठी म्हणजे ? माझ्या खुशीसाठी घालू शकत नाहीस का तू ? असं त्याला म्हणायचं होतं पण तसे न म्हणता तो पुढे म्हणाला की आई-बांबाच्या समोर ह्याचं बॅड इंन्प्रेशन नाही का पडणार ? "
" मग काय करू म्हणता ? "
" दुसरे कपडे घाल, आणि ते पण माझ्या पसंतीचे."
" पण तुमची पसंद मला कुठं माहीत आहे ?" प्राची
ने खरं सांगून टाकले. तेव्हा मग त्याने आपला फेव्हरेट कलर तिला सांगितला. तसा तिने त्याच्या फेव्हरेट कलर ची साडी नेसली नि त्या साडीला मॅचिंग ब्लाउज पण घातले. ऋषी तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. साडी
मध्ये फार सुंदर दिसत होती ती. आता त्याला साऱ्या जगाचा विसर पडला.... त्याला आता बाकीचं काहीच दिसत नव्हतं त्याला फक्त रेड साडी मधली फक्त प्राची दिसत होती. कमरेपर्यंत मोकळे सोडलेले केस , एकदम स्त्रेट केस , कपाळावर छोटीशी चमकणारी लाल टिकली , डोळ्यात काजळ, ओठावर लाल लिपस्टीक , कानात हलणारे झुमके , अन साडी मध्ये मादक अन घायाळ करणारे फिगर, उफ त्याला हृदय बंद पडते की काय असं वाटलं ....त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती ... ती त्याच्या जवळ उभी राहिली तरी तो तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याची ती नजर पाहून तिला लाजल्यासारखं झालं तिने त्याला विचारले की, एवढं काय पाहताय माझ्याकडे कधी न पाहिल्या सारखं.?" त्यावर तो मंत्रमुग्ध झाल्या सारखा म्हणाला," या पूर्वी तुझ्याकडे कधीच निरखून पाहिलं नव्हतं. तू ह्या कपड्यात खूपच सुंदर दिसतेस."
" खरंच ?"
" एखादी खरं !"
" चला तर मग ."
" कुठं ?"
" अहो कुठं म्हणून काय विचारताय ? पिक्चर पाहायला
जायचं नाही का आपल्याला ?" तसा ओशाळून म्हणाला,
" ओह ! विसरलो की मी ! "
" अगदी कमालच करता तुम्ही ! चला आता !"
" हो चल." असे म्हणून दोघेही बेडरूम मधून बाहेर
पडले. तशी बाहेर प्राची ची सासू त्या दोघांना पाहून खुश
झाली . आपले प्लॅन सक्सेफुल झाले म्हणून त्या फार खुश
दिसत होत्या. त्या प्राची ला म्हणाल्या," सुनबाई, तुझ्या
आई-बाबांची अजिबात चिंता करू नकोस. मी ठेवीन बरं
त्यांची बडदास्त !" त्यानंतर ऋषी आणि प्राची दोघेही
रस्त्यावर आले त्यांनी एका रिक्षावाल्याला हात दाखवला.
रिक्षा त्या दोघांच्या जवळ येऊन थांबली. त्यानंतर दोघेही
रिक्षात बसले तसे ऋषी ने सिनेमा थिएटर चे नाव सांगितले. तशी रिक्षा निघाली. लग्न झाल्या पासून आज प्रथम दोघेही बाहेर पडले होते. प्राची ला थोडे बरे वाटले आपण आपल्या नवऱ्या सोबत सिनेमा थिएटर ला चाललोय चित्रपट पहायला. हा विचारच तिच्यासाठी मनाला आनंद देणारा होता. त्यावेळी ती हे विसरली की आपल्या नवऱ्याची पसंद आपण नाही तर सुरभी आहे, परंतु सुरभीचे लग्न झालंय अर्थात आता ऋषी वर केवळ आपला अधिकार आहे, परंतु ऋषी अजूनही आपल्या पासून दूर आहे, आज प्रथमच लग्नानंतर आपल्या सोबत बसला आहे, नाहीतर एकाच बेडरूम मध्ये आम्ही दोघेही असूनही एकमेकांपासून दूर आहोत. आपण बेडवर झोपतो परंतु ऋषी मात्र खाली फरशीवर चटई टाकून झोपतात. आपण त्यांना कितीवेळा तरी सांगितले असेल की एकाच बेडवर झोपू या म्हणून. कारण आपण दोघेही पती-पत्नी आहोत , असं वेगळं झोपण्याचे कारण नाहीये. पण ऋषी ऐकायला तयार नाहीत म्हणाले," आपण दोघेही एकाच बेडवर झोपलो नि आपल्या दोघानाही कंट्रोल नाही झालं तर ! वगैरे वगैरे ....पण असं कसं असे कसे एकत्र येऊ शकतो आम्ही म्हणजे मनाची तयारी होत नाही तोपर्यंत." पण आज सासूबाईंनी तर फार कमालच केली. नाही म्हणजे माझे आई-वडील आले नाहीत तरी ह्यांना त्यांनी खोटंच सांगितले आणि मला ही खोटे बोलायला
लावले. पण आश्चर्य करण्याची ही गोष्ट आहे म्हणजे ह्यांनी आपल्या आईचे सांगणे ऐकले देखील. आता पाहू या हे आपल्याला खरोखरच चित्रपट दाखवतात का ? का आपले असेच कोठून तरी फिरवून आणतात. असाही एक
विचार तिच्या मनात येऊन गेला आणि त्याच वेळी तिच्या ध्यानात आलेच नाही की ऋषी मघापासून तिला तिरक्या नजरेने न्याहाळत आहे . आजपर्यंत त्याने तिला इतक्या जवळून कधीच पाहिलं नव्हते. त्यामुळे ती दिसायला किती सूंदर आहे, हे अद्याप ठाऊकच नव्हतं.
त्याने आणि तिला कधी अनुभवलंही नव्हतं. कारण त्याच्या मनात सारखा सुरभी बद्दल विचार सुरू असायचा त्यामुळे त्याने कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही
की आपली पत्नी खरोखरच किती सूंदर आहे. प्राची सुरभी पेक्षा ही सुंदर आहे हे त्याला आज कळाले. परंतु त्याला मात्र हे कळत नव्हतं की प्राची कोणत्या स्वप्न नगरीत इतकी तल्लीन झाली आहे की त्याच्या कडे तिने एकदा पण पाहिले नाही. तेवढ्यात रिक्षा ला ब्रेक लागला नि रिक्षा थांबली. तसे ते दोघेही भानावर आले. रिक्षा का थांबली हे पाहण्यासाठी त्यांनी रिक्षावाल्याकडे पाहिले असता रिक्षावाला म्हणाला," तुम्हांला नक्की रिगल टॉकीज ला जायचं आहे ना ?"
" हो ; पण तू असं का विचारत आहेस ?"
" रिगल टॉकीज आली,तरी तुम्ही उतरायला तयार
नाहीत म्हणून म्हटलं. तेव्हा ऋषी ने रिक्षावाल्याला पैसे दिले नि ते दोघेही रिक्षेतून खाली उतरले. थिएटर समोर लोकांची फार गर्दी जमलेली होती. ते दोघेही गर्दीतून आंत शिरले तर तिकीट खिडकीवर हाऊसफुल्ल चे बोर्ड लागले होते. आता काय करायचं ? असा विचार त्याच्या मनात
आला. तेवढ्यात एक ब्लॅक टाकीत विकणारा ओरडत होता. त्याच्या कडून दोन तिकिटे ब्लॅक ने विकत घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात तीन सहाचा शो संपला नि टॉकीज मधून प्रेक्षक बाहेर पडत होते आणि त्यानंतर सहा ते नऊ शो पाहणाऱ्याना आंत सोडण्यात आले. ऋषी आणि प्राची दोघेही आपली सीट नंबर शोधून त्यावर जाऊन बसले..... आणि थोड्याच वेळात चित्रपट सुरू झाला. चित्रपट संपल्या नंतर दोघेही एका चांगल्या श्या हॉटेलमध्ये गेले नि एक कोपरा निवडला नि एका
टेबला वर येऊन बसले. त्यानंतर ऋषी ने मेनुकार्ड पाहून
प्राची ला विचारले," तू काय खाणार बोल."
" तुम्ही जे मागवाल ते खाईन."
" असं नाही, तुला काय आवडतं ते सांग."
" तुम्हांला जे आवडतं ते तुम्ही मागवा. मग मीही तेच
खाईन म्हणते."
" मी नॉनव्हेज खाणार आहे."
" मग मला ही नॉनव्हेजच मागावा " मग ऋषी ने चिकण मसाला नि त्याच्या सोबत भाकऱ्या मागविल्या आणि थोड्याच वेळात वेटर टेबलावर प्लेट आणून ठेवल्या. त्यानंतर दोघांनी खायला सुरुवात केली. ते खाऊन झाल्या नंतर अजून काय हवे ते मागविले. जेवण उरकल्या नंतर दोघेही रिक्षा पकडण्यासाठी रस्त्यावर आले. तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला. आता थांबायचं कुठं म्हणून दोघेही इकडे पाहू लागले परंतु थांबण्यासाठी त्यांना एक पण उपयुक्त जागा दिसेना तसे ते तसेच पुढे निघाले. परंतु तोपर्यंत दोघेही भिजून चिंब झाले होते. भिजल्यामुळे प्राची ची साडी ठीक ठिकाणी अंगाला चिटकली होती. त्या पातळ साडीतून तिचे ते दुधाळ गोरे अंग जबरदस्त आकर्षक दिसत होते. तिचे ते भिजलेले
सौंदर्य पाहून तो बेभान झाला होता. क्षणभर तो आपण
कोठे आहोत हे देखील विसरला. ती सुरभी नसून प्राची आहे हे देखील तो विसरला. तसाच पुढे तिच्या जवळ आला नि तिला प्राची समजून तिच्या नाजूक कमरेवर आपला हात ठेवला. तशी शहारली नि घाबरून त्याच्या कडे पाहू लागली. परंतु त्याच्या नजरेत एक वेगळीच नशा तिला दिसत होती. त्याने तिला वर उचलली नि गोल गोल फिरवू लागला. क्षणभर तिला ही पण त्याचे असे वागणे तिच्या मनाला सुख देऊन गेलं. परंतु क्षणभर वेळाने ती भानावर आली की लोक आपल्या दोघांकडे पाहत आहेत. तशी ती लाजली नि शर्मेने म्हणाली," असं काय करताय खाली उतारा ना, अहो, लोक बघताहेत सारे ." असे म्हणताच तो ही भानावर आला आणि तिला खाली ठेवले.
तो स्वतःला त्याला आवरता आले नाही. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले नि तिच्या ओठांवर किस केले.
खरं तर तिला ते फार आवडलं. परंतु लोक लज्जे खातेखातर ती म्हणाली," अहो , लोक बघताहेत की सारे ! " असे म्हटल्यावर त्याने तिच्या कडे पाहिले. तेव्हा
सुरभीच्या ऐवजी त्याला प्राची चा चेहरा दिसला तसा तो
ओशाळून म्हणाला ," सॉरी मला माफ कर, मी तुला
सुरभी समजलो." बस हे त्याचे शब्द त्याला इगळी डसल्यावणी भासले. म्हणजे मघापासून तुम्ही मला सुरभी
समजत होता की काय ?" तेवढ्यातच समोरून
रिक्षा आली त्या रिक्षेला हात दाखवून ती रिक्षा थांबविली
नि त्यात दोघेही बसले नि रिक्षा निघाली खरे ! परंतु प्राची
साठी मात्र कुठंतरी हरवल्यागत एकदम गुपचूप बसली
होती. ती कळत नव्हतं की हसावे की रडावे ?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा