बेवफा ४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेवफा ४ |
मी ते नाईलाजाने मान्य केलं. ऋषी ला जीवदान तर मिळालं. पण अर्धमेला करून त्याला सोडून दिलं. म्हणून मग त्याला भेटायला इस्पितळात गेली ना तेव्हा मी त्याला खोटं खोटं सांगितले की माझं तुझ्यावर प्रेम कधीच
नव्हते. वगैरे आणि त्याला ही ते खरे वाटले. हे विशेष.
भले तो मला बेवफा समजेल. परंतु मी बेवफा नाहीये.
आता इथून पुढे
माझं तुझ्यावरच प्रेम आहे रे, परंतु तुझी मी होऊ
शकत नाही. कारण माझ्या आई-वडिलांना ते मान्य नाही.
म्हणून तुझा प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पसंद केलेल्या
मुलाशी लग्न करायला तयार झाले. खरं सांगायचं तर मला
त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी त्याला एकांत
मध्ये भेटून सांगितले की , माझं एका मुलावर प्रेम आहे
तर तू माझ्याशी लग्न नकार दे म्हणून. पण तो निघाला
पक्का बिजनेसमन त्याला फक्त आपला फायदा कसा
होईल हेच पाहायचं असल्याने त्याने मला नकार दिला
नाही तर उलट मला म्हणाला की , मला तुझा प्रामाणिकपणा फार आवडला. त्यामुळे मी तुझ्याशिच
लग्न करणार, आणि डोन्ट व्हरी काही चिंता करू नकोस
जोपर्यंत तू मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श
देखील करणार नाही. त्यावेळी मला त्या मागचे कारण नव्हते माहीत. म्हणून मी फसले. त्याच्याशी माझं लग्न
झाले. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याने आपले
खरे रूप दाखविले. तो मला म्हणाला," सुरभी काही
चिंता करू नकोस , तुला इथं कसलाच त्रास होणार नाही.
माझ्या आई-वडिलांची सून होऊन तू इथं आरामात रहा.
माझ्याकडून तुला कसलाच त्रास होणार नाही. परंतु एक
सिक्रेट आहे, आणि ते तुझ्यात नि माझ्यातच राहिले पाहिजे. " तेव्हा मी न समजून कोणते सिक्रेट आहे ?"
त्यावर तो म्हणाला," माझं ही तुझ्या प्रमाणे एका दुसऱ्या
मुलीवर प्रेम आहे, आणि ती मुलगी माझ्या आई-वडिलांना
सून म्हणून पसंद नाहीये. आणि तुझं ही तेच आहे, म्हणून
तू तुझ्या लव्हर ला फोन करू शकतेस आणि भेटू ही
शकतेस. माझा त्याला काहीच विरोध नाही. मीही माझ्या
गर्लफ्रेंड जाऊन भेटणार आणि तिच्याशीच मौजमजा करणार , पण हां आपलं हे सिक्रेट आपल्या दोघांच्या
आई-वडिलांना कळणार नाही याची काळजी मात्र तू घ्यायची बस्स ! जमेल ना हे ?" मला काहीच कळत नव्हतं. काय देऊ त्याच्या प्रश्नाला उत्तर ? पण तरी देखील मी त्याला विचारलं की , लग्नापूर्वी तर आपण वेगळं च काही सांगितले होते. " त्यावर तो म्हणाला," त्यावेळी जर मी तुला खरं सांगितले असते तर तू लग्नाला तयार झाली
असतीस का ? म्हणून नाही सांगितले. आणि तसे पण
तू आपलं पहिलं प्रेम विसरू शकणार आहेस का ? "
तेव्हा मी नकारात्मक आपली मान डोलावली. तसा तो
पुढे म्हणाला ," मला हे माहीत होतं म्हणून मी तुला
तसं सांगितले." त्यावर मी काय बोलणार ? तसं पण
मला त्याच्याशी संसार तर करायचाच नव्हता म्हणा.
झालं ते पण एकार्थाने बरेच झाले असे म्हणायला काही
हरकत नाहीये. आपण ऋषी व्यतिरिक्त अन्य कुणावर
प्रेमच करू शकणार नाहीये. म्हणून या पुढे फक्त त्याच्या
आठवणींवर जगायचं बस्स ! असा विचार केला होता
खरा परंतु जसं आपल्या मैत्रिणी ने आपल्याला फोन
करून सांगितले की ऋषी चे लग्न एका प्राची नावाच्या
मुलीशी होणार आहे, तसे मला ते सहन झालं नाही.
मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा
प्रयत्न केला. पण त्यात ही मला यश आले नाही. माझ्या
सासूची नजर माझ्यावर पडली नि पट्कन बोबाबोंब
केली त्यामुळे झाले काय मला ताबडतोब इस्पितळात
दाखल करण्यात आले आणि माझ्या मैत्रिणी ने फोन
करून ऋषी ला ही खबर सांगितली. ऋषी आपली
मधुचंद्राची रात्र सोडून मला भेटायला आला. त्याला पाहून
मी एकदम शॉक झाली आणि त्याच बरोबर जरा भीती
पण वाटली. भीती ह्यासाठी वाटली की बाहेर माझे आई
वडील, सासू-सासरे शिवाय नवरा असतांना ह्याला आंत
कसे येऊ दिले. अर्थात त्याच्या कडून सत्य काय आहे , हे
जाणून घेण्यासाठी त्याला मी विचारले की बाहेर इतकी
सारी माणसे असताना तुला आंत येऊ दिलं ?" तर ऋषी
म्हणाला," तुझ्या नवऱ्याने तुझ्या आई-वडिलांना सांगितले
की भेटू दे त्यांना ?" खरं माझा त्याच्या वक्तव्यावर विश्वासच बसेना, कसं शक्य आहे ? एक नवरा आपल्या
बायकोच्या प्रेमीकाला आपल्या बायकोला भेटू देईल का ?
परंतु असं घडलं होतं ?" म्हणून मी ऋषी ला तुला कुणी
अडविले नाही ?"
" अडविले ना ?"
" तुझ्या वडिलांनी ."
" आणि काय म्हणाले ते ?"
" म्हणाले की तू इथं का आलास ? तेव्हा मी म्हटलं, " फक्त एक वेळ सुरभी ला भेटायचंय मला. तुझे वडील तर
नाहीच म्हणाले परंतु तुझा नवरा म्हणाला," बाबा, अडवू
नका .....भेटू दे त्यांना." मग काय झाले बाजूला. ते ऐकून
मला मोठं आश्चर्य वाटलं ; परंतु तसे न दाखवता मी त्यालाच विचारले की पण तू इथं कसा ? तुझा तर आज
मधुचंद्र होता ना ?"
" हो ; पण मी तिला एकटीला तसाच सोडून इथं आलो." तेव्हा मी त्याला म्हटलं की , पण तू हे चांगले नाही केलेले ? लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीला
एकटी ला आपल्या पहिल्या प्रेयसी ला भेटायला आलास
हे चुकीचेच आहे."
" ते जाऊ दे, पण मला तू आधी हे सांग की तू आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केलास ? त्या आपल्या
पती सोबत खुश नाही आहेस का ?"
" मी माझ्या नवऱ्या सोबत खुश नाहीयेस हे कोणी सांगितले तुला ? मी फार खुश आहे."
" खुश आहेस तर, मग आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केलास ?"
" त्याला कारण तू आहेत. कारण तू माझं पहिलं प्रेम
होतास आणि पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही."
" याचा अर्थ अजूनही तुझं माझ्यावर प्रेम आहे."
" हो; आणि ते मरेपर्यंत करतच राहणार."
" असं होतं तर तू मला असं का सांगितलेस की तुझं
माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून."
" ते करणे जरुरी होते. केवळ तुझ्यासाठीच."
" माझ्यासाठी ते कसं का बुवा !"
" ते तुझा प्राण वाचावा यासाठीच केलं होतं ते."
" माझा प्राण वाचावा .... मला कळलं नाही बुवा ! तेव्हा
मला कळेल अश्या शब्दात सांग."
" मी जर तसं केलं नसतं तर माझ्या वडिलांनी तुझा जीव घेतला असता. आणि तेच मला नको होतं. तू जरी
माझा झाला नाहीस तरी चालेल. परंतु तू जिवंत असणे
माझ्यासाठी महत्वाचे होतं."
" असं जगण्याचा तरी काय उपयोग ? ज्या व्यक्तीवर
आपण जीवापाड प्रेम करतोय ती व्यक्ती पासून आपल्याला दूर राहावे लागत असेल तर ! असं जीवन
जगण्यापेक्षा मेलेले चांगले नाही का ?"
" आणि मरून काय करणार ?"
" काय करणार म्हणजे ? सुटका नाही का होणार या
दुःखातून ?"
" असं कोण म्हणतं , सुटका होते म्हणून ? म्हणजे
खरं काय होतं हे माहीत आहे का कुणाला ? नाही ना ?
कारण जो मरतो तो सांगायला परत येतच नाही की तिथं
व्यक्तिशः काय घडलं ? म्हणून ज्या गोष्टी बद्दल निश्चित
काही सांगता येत नाही त्या गोष्टी बद्दल माणसाने विचारच करू नये ?"
" असं होतं तर मग तू का केलास हा मरण्याचा प्रयत्न ?"
" हा केवळ प्रयोग होता, खरंच मरता येत का हे पाहण्याचा शिवाय तुझ्या पर्यंत संदेश पोहोचविण्याचा."
" माझ्यापर्यंत संदेश पोहोचविण्याचा ....मला कळलं
नाही कळलं नाही तुला काय म्हणायचं आहे ते."
" मी बेवफा नाहीं हेही तुला सांगायचं होतं शिवाय मला विसरून जिच्याशी आता लग्न केलं आहेस हे तिच्याशी आता प्रामाणिक पणे वाग. हेच सांगायचं होतं मला."
" हे सांगण्यासाठी तू फोन सुध्दा करू शकली असतीस त्या मरण्याचे नाटक करण्याची काही गरज नव्हती."
" बरोबर आहे तुझं . परंतु मरण्याचे हे नाटक नव्हतं
मी खरोखरच मरू इच्छित होती. पण मरण आलं नाही.
परंतु मरण्याचा प्रयत्न केल्यामुळे एक गोष्ट माझ्या द्यानात
आली की आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या
आई-वडिलांना कायमचं दुःखी करून जात होतो. खर तर
आपण फक्त आपला स्वतःचाच विचार करतो,आपल्या
आई-वडिलांचा विचार करत नाही. जीवनात सर्व गोष्टी
प्राप्त होतात असं नाहीये. म्हणून जे मिळालंय त्यात
समाधान मानायला शिकलं पाहिजे. तरच जीवनाचे खरे
सुख प्राप्त होईल."
" तू तर फार मोठ्या विद्वान माणसा प्रमाणे बोलू लागलीस."
" नाही रे, विद्वान कसली मी , हे सर्व काळानुसार
आपोआपच शिकता येते. एक गोष्ट लक्षात ठेव. प्रेम
करणं म्हणजे प्राप्त करणे नव्हे ! प्रेम असं ही करता येते
लग्न न करता. जसे मी तुझ्यावर कायम प्रेम करतच
राहणार आहे. म्हणजे अंतरातुन कळलं ?"
" आणि तुझा नवरा ?"
" त्याला जे हवे आहे, ते त्याला देतेच आहे, प्रेम हे
अंतरात असायला हवे. जसे आपण देवावर करतो.ते
कुणी हिरावून घेते का ? नाही ना ?"
" कळलं गं बाई कळलं.बरं, येऊ मी आता ?"
" हो." असं सुरभी म्हणाली. तसा ऋषी तेथून निघाला.
पण बाहेर त्याला कोणीच काही बोलले नाही. कारण प्रकाश ने सगळ्यांना सांगितले होते की कुणी काही बोलू
नका त्याला. तो निघून गेल्यानंतर सुरभी आई त्याला
म्हणाल्या," जावई बापू का तुम्ही केलं ?"
" करणं जरुरीचं होतं."
" का बरं ?"
" या पुढे ते एकमेकांना भेटणार नाहीत."
" म्हणजे तुम्हांला माहीत होतं ? तो कोण आहे तो ?"
" हो."
" तरी सुद्धा भेटू दिलेत त्याला."
" हो." त्याच्या ह्या उत्तराने सर्वजण आवा्क झाले.
त्याची आई त्याला म्हणाली," अरे काय बोलतोस तू हे ?"
" खरं तेच बोलतोय. मला माहित होतं की ऋषी चा
सुरभी चा प्रियकर आहे." तशी आई कोकीला बेन चिडून
म्हणाली ," काय हो , हे सत्य तुम्ही आमच्या पासून लपवून ठेवले." तशी सुरभी आई म्हणाली," तुम्ही पण
तर तुमच्या मुलाचे दुसऱ्या कुण्या मुली बरोबर प्रेम आहे
हे लपवून ठेवलं. मग आम्ही ही तेच केलं. मग त्यात बिघडलं काय ?" असे म्हणताच कोकिला बेन चा चेहरा
साफ पडला. त्यांना कळत नव्हते की आपण लपविलेली
गोष्ट ह्यांना कळली कशी ? आपल्या मुलाने तर नाही ना
ह्यांना सांगितले असा विचार करून ती आपल्या मुलाकडे
पाहू लागली. तेव्हा प्रकाश च्या ते द्यानात आलं तस तो
म्हणाला," बा तुला वाटत असेल की मी त्यांना सांगितले
तर तसे अजिबात नाहीये." तशी कोकिला बेन चिडून
म्हणाली," मग त्यांना कसं कळलं ?" तेव्हा सुरभी ची
म्हणाली," तुम्ही त्यांना काय विचारताय मला विचारांना
मी सांगते कसं कळलं ते."
" हां हां सांगा तुम्हांला कोणी सांगितले ?"
" माझ्या मुलीने आणि त्यामुळेच तिने हा आत्महत्या
करण्याचा प्रयत्न केला."
" काय सांगताय ? सुरभी ने सांगितले ?"
" हां !"
" पण तिला कसं समजलं ?"
" मी सांगितले." प्रकाश मध्येच बोलला.
" काय गरज होती , तिला हे सर्व सांगायची ?"
" गरज कशी नाही , तिने आपलं पास्ट सांगितले मग
मला नको का आपलं पास्ट सांगायला."
" अरे देवा, काय ऐकतय मी हे ?" कोकिला बेन उद्गारल्या
" बा, तुम्ही दोघांनी एकाचंच नाहीतर तीन तीन
व्यक्तींचे जीवन उद्ध्वस्त केलात. केवळ आपल्या खोट्या
प्रतिष्ठेसाठी ! काय मिळालं तुम्हां लोकांना हे सगळं करून.
कायमचं दुःखी करून टाकतात आम्हां साऱ्यांना. म्हणून
आम्ही ठरविले आहे, तुमच्या इच्छेनुसार जगायचं. स्वतःची इच्छा नसताना." त्यावर त्या दोघी खजील झाल्या. कदाचित त्यांना वाटत असावे की खरंच आपलं काही चुकलं का ?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा