छत्रपती शिवाजी महाराज ४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ४ |
" त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना ?" तसे लखुजी जाधव
ना रंगपंचमी दिवशी स्वतःच केलेले वक्तव्य आठवले.ते म्हणाले
होते की वजीर आलम ने आमंत्रण दिले हे नुसते आमंत्रण नसते
हुकूम असतो हुकूम !" तश्या त्या पुढे म्हणाल्या," उमा बाईंचा
पुत्र शहाजी राजे आहेत ते, म्हणजे उमदे आणि देखणे तर नक्कीच असणार, आणि तुम्ही तर पाहिले देखील आहे, मग
जरा विचार करा. वजीरे आलमला पण हेच वाटत असणार
मग आपल्याला विचार करायला काय हरकत आहे, म्हणून
जरा शांत डोक्याने विचार करा म्हणजे उत्तर सापडेल." असे
म्हणून ते मुजरा करतात नि निघून जातात. लखुजी जाधव
किंचित विचारमग्न होतात.
पुढे
म्हाळसा बाई ही गोड आनंदाची बातमी आपल्या दोन्ही
सवती ना ही सांगतात. त्यावर त्या दोघीही खुश होतात. आणि
त्यांना देखील ही सोयरिक पसंद असल्याची त्या कबूल करतात. त्याचवेळी धाकटी मात्र आपली शंका बोलून दाखवितात. म्हणजे त्यांनी जे दौलताबादला घडलेली वार्ता त्या दोघींना ऐकवितात. त्यावेळी त्या दोघीही चिंताग्रस्त होतात. त्याच वेळी वेरुळ ला मालोजी राजेंच्या गढीवर मलिक अंबर ने पाठविलेली मिठाई घेऊन जातात नि त्यांचे अभिंदन करून सोयरिक जुळविल्या बद्दल मलिक अंबर ने आपणास मिठाई पाठविल्याची महती देतात. ती माहिती ऐकून मात्र मालोजी राजे एकदम गोंधळून जातात. ते त्या तिघांचा झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आमच्या तसे काही बोलणी झालेली नाहीत. असं सांगतात. त्यावेळी मीआन राजू म्हणाले," इसका मतलब है
की मालिक अंबर झूठ बोल रहे है , है ना ?" तसे मालोजी
राजे म्हणाले," नाही नाही मी असं कुठं म्हंटले ?" त्यावर तो
हसून म्हणाला," इसका मतलब आप भी ऐसा चाहते है ?"
मालोजी राजे उद्गारले," नाही नाही ?" मालोजी राजे पटकन
असं म्हणाले. पण नेमके त्यांना कळतच नव्हते की हां बोलावे
का नाही बोलावे ? आणि त्याला कारण ही तसेच होते. दौलताबादला लखुजी जाधव काय बोललेले होते त्यांना आठवले. आणि त्यांच्या मनात एक विचार आला की, मलिक अंबर ने न झालेल्या सोयरिकी बद्दल आम्हाला मिठाई का देत आहेत. बरे उघडपणे ह्यांना पण शकत नव्हते. म्हणून ते गप्पच राहिले. त्याच वेळी इकडे त्या तिघी जिजाबाई ने लग्न ठरले. म्हणून खुश तर असतात. परंतु त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली. कारण लखुजी जाधवांनी म्हाळसा बाईना होकार दिला
नव्हता. फक्त ते इतकंच म्हणाले की, विचार करू ? याचा अर्थ ते नकार पण देवू शकतात. म्हणून त्यांच्या मध्ये दडपण पण येते. पण त्याच वेळी त्या दोघी ठवितात की आपण दोघी स्वारींची बोलून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू , पण त्या दोघींनाही माहित नसते की भिंतीच्या पलिकडे जिजाऊ उभ्या असतात नि त्यांनी त्या दोघींचे बोलणे ऐकले आणि तेथून नाराज होऊन निघून जातात. तेव्हा त्यांना गोदाताई माहिती देतात की तुमचं आता लग्न होणार, वेरुळच्या भोसल्यांच्या मुलांशी परंतु कोणा सोबत हे माहित नाही. त्यानंतर मधली नि धाकटी दोघी मिळून लखुजी जाधवांची भेट घेतात. तेव्हा लखुजी जाधवांना वाटते की त्या दोघी आपल्याला थाळ्या वर बोलायला आल्यात की काय पण त्या दोघी एकदम जिजाऊंच्या लग्नाचा विषय काढतात. तसे लखुजी जाधव धाकटी कडे पाहतात. तशी धाकटी घाबरून म्हणाली," नाही नाही आम्ही आपला शब्द मोडलेला नाहीये." तेव्हा मधल्या बाई आपले मत व्यक्त करत म्हणाल्या," आम्हाला थोरली ने सांगितले ह्यांनी नाही." असे
बोलून त्या धाकली कडे पाहत त्या म्हणाल्या की, तेव्हा आता जे बोलायला आलात ते बोलून टाका." तशी धाकटी म्हणाली," आता जिजाचे वय झाले आहे तेव्हा त्यांचे लग्न जमवायला हवय नाही का ?" त्यावर लखुजी जाधव म्हणाले," हो, आम्ही त्या बाबत विचार करत आहोत." इतक्यात मधली म्हणाली," वेरुळ चे भोसले घराणे कसे आहे ?" त्यावर लखुजी जाधव म्हणाले,
"नाही घराणे ठीकच आहे. पण ..?"
" पण काय ? ते आपल्या तोलामोलाचे नाहीत असं वाटतं
का आपल्याला?"
" नाही नाही sss ? " पुढे काय बोलावे ते लगेच न सुचल्याने
फक्त नाही नाही म्हणून गप्प झाले. त्यावर त्या दोघी एकदम
उद्गारल्या की, " आम्हाला तर भोसले घरातच सोयरिक व्हावी
असेच वाटते. कारण नात्यातलेच आहेत ते." त्यावर लखुजी
राजे जाधव काही बोलूच शकले नाहीत. त्या दोघी लखुजी जाधवांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतात नि त्यात त्या यशस्वी पण होतात.
मालोजी राजे कुठेतरी जाण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यात
तिथं उमाबाई येतात. पण काही न बोलता माघारी वळतात. ते
मालोजी राजेंनी पाहिले म्हणूनच की काय ते म्हणाले," बोला
बोला काय बोलायला आलेत ते. मघापासून पाहतोय मी सारख्या येरझाऱ्या चालू आहेत तुमच्या तेव्हा मनात कोणतीही
शंका न ठेवता सांगा बरं.म्हणजे इतका आनंद कशाला झालाय
ते आम्हाला तरी कळू दे." त्यावर उमाबाई उद्गारल्या," असं नाही काही !" मालोजी राजे मुद्दामच म्हणाले," म्हणजे खास नाही असेच म्हणायचंय ना तुम्हाला .?"
" नाही नाही असं नाही."
" अहो मग सांगा की असं नाही तसं नाही, असं का म्हणत
आहात ?"
" आम्ही नाही सांगणार जा ?" रुसण्याचे नाटक करत त्या
उद्गारल्या. त्यावर ते हसून म्हणाले," अहो, तुम्ही असे रुसताय
जणू आपले नुकतेच लग्न झालंय. आता मुलांनी करायचे आपण
नव्हे!"
" तेच म्हणतेय मी !" त्या हर्षभराने उद्गारल्या.
" तुम्ही तर अजून काहीच बोलले नाहीत. फक्त आम्हीच बोलतोय."
" मी काय म्हणत होते की पुढे काय झालं ?"
" कशा बद्दल बोलत आहात ?"
" तुम्हीच म्हणालात ना की , जोडा एकदम शोभून दिसतोय
असे ते म्हणाले होते."
" ते आता त्यांनाच ठरवू दे. आपण काय बोलणार ?"
" म्हणजे आपण काहीच बोलायचं नाही ?"
" हे बघा काय आहे, आपली नि त्यांची बरोबरी नाहीये. तेव्हा
आपण पुढाकार घ्यायचा नाहीये. हां आता मी जातोय ते
शेख महंमद जवळ या संबधी बोलेन."
" नुसते बोलू नका. तर त्यांना विचारा, शेख महंमद पण संत
विभूती आहेत."
" हो, बाकी शंभू महादेवाची कृपा त्यांच्या मनात काय आहे
ते कुणी सांगावे ?" किंचित थांबून ते पुढे म्हणाले," बरं येऊ मी
आता ?" तेव्हा उमाबाई नि होकारार्थी मान डोलावली.
मलिक अंबर ला त्या तिघांनी माहिती दिली की काम फत्ते
करून आलोय. म्हणजे वर करणी नाही नाही म्हणत होते.
परंतु आतून हो हो म्हणत असावेत. आम्ही त्यांना एकदम
घोड्यावरच बसवून आलो." अंकुश उद्गारला. त्यावर मलिक
अंबर हसून म्हणाले," घोड़े पर उनको नहीं उनके शहजादा को
बैठना है, इसलिए उनको राजी करना कोई कठिन कार्य नहीं
है, अब सिर्फ लखुजी जाधव को मनाना है।"
" लेकिन हुजूर लखुजी जाधव ने इंकार किया तो, क्योंकि
पहले भी एक बार इंकार कर चुका है वो ।"
" अभी ऐसी नौबत नहीं आएगी , हमे सिर्फ लखुजी जाधव
से मुलाकात करनेकी है, उसके लिए हमने उनको यहाँ बुलाया
है, आते ही होंगे ।"
" अगर वो नहीं माना तो ?"
" नहीं मानने की कोई गुंजाइश ही नहीं है,फिर हम उसको
आजमाएंगे और जो मुनासिफ हो वही हम करेंगे ।"
" गुस्ताखी माफ हो, हम इसलिए बोल रहे है, हुजुर की
ऊन दोनो की बराबरी नहीं है, यह बात हम नहीं करेंगे लेकिन
मीआन राजू तो लखुजी जाधव से कर सकते है ना ?"
" हां उसके लिए हमने सोचा है, चिंता न करो, और हमे
उम्मीद है, लखुजी जाधव हमारी बात टालेंगे नहीं फिर भी
देखते है क्या होता है।
लखुजी जाधव एकटेच बसले आहेत. तेव्हा म्हाळसा बाई
तेथे आल्या नि त्यांनी विचारले की, ही सोयरिक व्हावी असे
वाटत नाहीये का आपणाला ?" त्यावर लखुजी जाधवांनी
विचारले की, असं कोण म्हणाले ?" त्यावर त्या उद्गारला की,
ते फार महत्वाचे नाहीये. परंतु रंगपंचमी दिवशी जो प्रकार
घडला तेव्हा पासून तर सोयरिक झाली असंच आम्ही मानून
आहोत धाकट्या बाई म्हणाल्या," तुम्हाला हा विचार फारसा
पटला नाही म्हणून." त्यावर लखुजी जाधव म्हणाले की , मधल्या नि धाकट्या बाई आमच्याकडे आल्या होत्या. तेव्हा
आम्ही असं काही बोललो नाही." म्हाळसा बाई उद्गारल्या की,
त्यावेळी भले नसाल म्हणाला काही पण धाकट्या बाईना
तुम्हीच सांगितले होते की तिथे घडलेला प्रकार कुणाला
सांगू नये.त्यावेळी तर तुमचे मत हेच असेल ना ?" त्यावर लखुजी जाधव म्हणाले," हो त्या क्षणी मी बोललो होतो, हे खरंय परंतु आता तर तुम्हा सर्वांना माहीत झालंय ना ." त्यावर म्हाळसा बाई उद्गारल्या," हो पण काय अडचण आहे ते तर सांगा." इतक्यात एक दुत आला नि म्हणाला," सरकार आहे
का ?" लखुजी जाधव म्हणाले," या !" असे म्हणून त्याच्या
हातातील संदेश घेतला नि वाचला नि पुन्हा पुन्हा वाचायला
लागले. तश्या म्हाळसा बाई चिडल्या नि म्हणाल्या," परत परत
काय वाचताय काय लिहिलं त्यात ?"
" वजीर आलम ने आम्हाला बोलविले आहे."
" पण आपलं काही महत्वाचे बोलणे सुरू आहे."
" हो माहितेय मला. पण एवढं तातडीने कशाला बोलविले
आहे याचा विचार करतोय आम्ही."
" म्हणजे आम्ही आता काही बोलायचं नाही. असंच ना ?"
" असे मी म्हटलं का ?"
" म्हणायला कशाला हवं ते दिसतेच आहे, आम्ही काय
बोलतोय त्या कडे तुमचं लक्षच नाहीये."
" असे नाहीये."
" असे नाहीये तर मग आपल्या लेकीच्या लग्नाचं अगोदर
पहा."
" अहो ते पाहणारच आहे, परंतु वजीरे आलम ने आम्हाला तातडीने अहदनगरला कशाला बोलविले आहे, ते पण बादशहा समोर,आपल्या काही सुभ्याच्या विषयी बोलायचे आहे का ? काही कळत नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा