छत्रपती शिवाजी महाराज ३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छत्रपती शिवाजी महाराज ३ |
" असे का वाटते आपल्याला ? तुमचा बहादुर दादा तुमच्या
साठी कायम दादासाहेबच असणार आहे, त्याच्याशी तुमचे
असलेले नाते बदलणार आहे का ? त्याच्या नावापुढे फक्त
तुमच्या आबासाहेबांच्या नावाच्या ऐवजी जगदेव रावांचे नाव लागणार आहे बस !" हे बोलत असताना त्यांच्या आवाजा मध्ये जो कातर पणा दिसला. तो काही जिजाऊंच्या नजरेतून सुटला
नाही म्हणूनच की काय त्यांनी म्हाळसा बाईंना अचुक प्रश्न
केला की, आऊ साहेब आपण कोणाची समजून काढताय माझी का स्वतःची ?"
पुढे
म्हाळसा बाईंना राग आलेला असतो. म्हणून त्या त्रागाने
उद्गारल्या की, " म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला ?" त्यावर
जिजाऊ उद्गारल्या की, " आम्हाला म्हणायचंय की आपल्याला ही हे पटत नाहीये मग हा अट्टहास का ? आणि कशासाठी ?"
त्यावर म्हाळसा बाई उद्गारल्या मी, " हे आम्ही का करत आहोत हे तुम्हाला आता नाही कळणार , कारण ते समजून घेण्या एवढं तुमचं वय नाहीये.तुम्ही जेव्हा मोठ्या व्हाल ना
तेव्हा कळेल की आम्ही असं का केलं ते. कधी कधी आपल्या हृदयावर दगड ठेवून असे नाईलाजाने निर्णय घ्यावे लागतात.
त्या मागे एकच उद्देश असतो की आपल्या लेकरांचे कल्याण
व्हावे." पण जिजाऊं आपल्या मतावर कायम राहिल्या.त्याना
काहीच पटेनासे झाले. म्हणूनच की काय त्या म्हणाल्या की,
" आम्ही लहान आहोत, आम्हाला तुमच्या इतकं कळत नाहीये, हे आम्हाला देखील मान्य आहे, परंतु आपण आपल्या मना विरुद्ध का वागत आहात , हेच आम्हाला कळत नाहीये."
" जिजा, जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की तेव्हा काही
गोष्टी आपल्या मना विरुध्द ही कराव्या लागतात.दुसऱ्यांच्या
सुख हेच आपले सुख मानायचं असतं " म्हाळसा बाई आपल्या लेकीला समजवण्याचा प्रयत्न करत त्या उद्गारल्या खऱ्या. पण जिजाऊंच्या मतामध्ये काहीच परिणाम झालेला दिसून आलेला दिसला नाही .उलट त्या प्रश्न करतात की," इथं कोणाचे हित होणार आहे ?" त्यावर म्हाळसा बाई चिडल्या. कारण समजून चुकल्या की जिजाऊ काही आपलं ऐकायला तयार नाही.अश्या वेळी रागावणे हा एकच उपाय उरला होता त्यांच्या कडे , म्हणून त्या आपल्या लाडक्या लेकीवर किंचित रागवत म्हणाल्या की, " ते जाणून घेणे आता गरजेचे नाहीये. योग्य वेळी कळेलच
ते तुम्हाला." त्यांच्या आवाजा मध्ये एक प्रकारजी जरब होती.
परंतू जिजाऊ पण कमी जिद्दी नव्हता. आपल्या आऊ साहेबां वरच त्या गेल्या होत्या.त्यांनी प्रति प्रश्न केलाच की," पण मी
म्हणते आता जाणून घेतले तर काय बिघडणार आहे ?" जिजाऊ अगदी हट्टाला च पेटल्या होत्या. त्यांचे म्हणणे असे होते
की जर कुंती माता नकुल सहदेव ना दत्तक न घेता त्यांना आपल्या पोटच्या बाळा सारखाच सांभाळ करू शकतात तर
काकी तसे का करू शकत नाही ? त्यांना कशाला हवाय दत्तक
पुत्र ? नाही म्हणजे आपण जर कुंती मातेचे वंशज आहोत तर मग त्यांनी जे केले ते आपल्याला का शक्य नाहीये. परंतु त्यांना
कुठं माहित आहे की म्हाळसां बाईंचा असं का करू इच्छित
आहेत ते ? आणि ते आपल्या लाडक्या लेकीला सांगू पण शकत नसतात की आपण असं का करत आहोत ते. म्हणून त्या काही ना काही बहाणा करत होत्या. पण जिजाऊ पण काही कमी जिद्दी नव्हता. त्या खरं कारण जाणून घ्याचेच होते. म्हणून च की काय म्हाळसा बाई चिडल्या नि म्हणाल्या," अहो, जिजा, तुम्हाला कळत कसं नाहीये ? बहादुर राजे इथं असेल काय नि तिथे असले काय ....काही फरक पडणार आहे का ?" पण त्यांचा आवाजामध्ये क्रोध जाणवत होता. म्हणूनच की काय त्यांनी प्रति प्रश्न केला की, " फरक पडणार नाही आहे तर आपण इतके चिडून का बरं बोलत आहात ? आपणच म्हणताय ना, की एखादी गोष्टी जेव्हा आपल्या मना विरुध्द होत असते तेव्हाच माणूस चिडून बोलतोय म्हणून. जसे आपण आता आमच्याशी बोलत आहात. बरोबर ना ?" त्यावर म्हळसा बाई म्हणाल्या ," नाही त्यामुळे मी चिडलेली नाहीये. तुम्ही आमचं ऐकत नाही आहात म्हणून आम्ही चिडून बोलत आहोत." त्यावर जिजाऊ म्हणाल्या," आम्ही काय लहानच आहोत , आपण आमच्या आऊ आहात, परंतु आम्हाला जे खटकते आहे त्याचे आमन निदान करतच नाही आहात. उलट आम्हाला अजून कोड्यात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे आपला .तो का आणि कशासाठी ? इतकंच तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे. पण तुम्ही ठरवलंच जर आहे की आम्हाला काहीच सांगायचंच नाही तर आम्ही तरी काय करणार ?" म्हाळसा बाईना कळत नाहीये की आपल्या लेकीची समजूत कशी काढावी ? म्हणून कंटाळून शेवटी म्हणाल्या," लहनानी नको त्या गोष्टीत आपले नाक खुपसू नये. इथं मोठी माणसे आहेत ना घरात, योग्य तो निर्णय
घ्यायला. मग आपण निवांत गप्प राहावे नि मोठी माणसे
असा का निर्णय घेत आहेत हे तुम्हाला आता नाही कळणार पण
नंतर कळेलच की आणि तेव्हा तुम्हीच म्हणाल की आऊ साहेब तुमचा निर्णय अगदी योग्य होता." परंतु जिजाऊ त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सडेतोड देत होत्या. त्या म्हणाल्या की
" परंतु मला तर असं अजिबात वाटत नाही की तुम्ही हा निर्णय घेऊन खुश आहात. आतल्या आत तुमचं ही मन दुखतय पण ते मान्य करायला आपण तयार नाहीयेत. ठीक आहे, जशी आपली इच्छा !" असे बोलून त्या तेथून चालत्या झाल्या.
मीआन राजू ने आणलेली खबर ऐकून बादशहा चिडला नि
म्हणाला की, क्या कहा, मलिक अंबर हमसे बगावत करना
चाहता है ?लेकिन तुम तो मसला जाधव और भोसले के
रिश्तों का लाया था ना । " त्यावर मीआन राजू म्हणाला,
" गुस्ताकी माफ हूजूर लेकिन मसला रिश्तों का नहीं है,
वजीरे आलम को सिर्फ और सिर्फ आपका तकता चाहिए कितना दिन वो आपकी खितमत करेगा ?" त्याने अचूक बाण सोडला होता. आणि त्याचा परिणाम चांगलाच झालेला दिसून आला. म्हणूनच की काय बादशहा उद्गारला की, " लेकिन उन्हें पता होना चाहिए की तक्त और ताज जितने सुनहरे दिखते है, उतने ही नुकीले होते है." त्यावर तो म्हणाला की," यह बात उनको नहीं समझ में नहीं आएगी , नहीं तो देखो, एक तरफ मुगल बैठा, फिर बीजापुर में आदिलशाह बैठा है, इन सब को छोड़कर वजीर आलम मालिक अंबर को जाधव और भोसले के रिश्तेदारी में क्यों दिलचस्पी है ?" त्यावर बादशहा म्हणाला की, " बड़ा शातिर है।"
" सब को साथ लाकर वो क्या साबित करना चाहता है ?"
" हूं तुम्हारी बात दुरुस्त है, तुम एक काम करो सिंदखेड़
और वेरूल में अपने नजर बाज रखो एक एक चीज ध्यान दो।
" आपका यकिन ही हमारा ताज हैं, हुजुर आप की अस्मत
कायम रहे ."
म्हाळसा बाई तेथून उठल्या नि सरळ लखुजी जाधवांच्या
दालनात गेल्या. तेव्हा लखुजी जाधव बसले होते. त्यांच्या कडे
एक कटाक्ष टाकला नि पुन्हा त्यांच्या मनात काय आले ते कुणास ठाऊक त्या माघारी वळल्या. ते लखुजी राजेनी पाहिले.
तसे ते म्हणाले," राणी सरकार, आलात नि निघालात काय ?
काहीतरी बोलायचं होतं ना तुम्हाला ? मग बोला की !"
" नाही. मला काही तरी सांगायचं होतं तुम्हाला पण आता
नको ?"
" आता का नको ?"
" बोलू केव्हातरी !" असे बोलून त्या जायला वळतात. तसे लखुजी जाधव म्हणाले," नंतर कशाला, आताच सांगा काय सांगायचं आहे ते तुम्हाला."
" मला इतकंच सांगायचं आहे की तुमची लेक सुध्दा तुमच्या
एवढी जिद्दी का आहे.?"
" अच्छा म्हणजे तुम्हाला सांगायचं की आमची लेक
आमच्यावर गेलीय असंच ना ?"
" हो, असंच किती प्रश्न विचारायचं ? त्याला काही मर्यादा
असेल की नाही ? म्हणजे बघा ना, एक प्रश्न संपला नाही की
लगेच दुसरा प्रश्न त्यांच्या प्रश्नांची मालिका संपतच नाही. मला
म्हणतात कशा की तुम्ही फार दुःखी आहात ? दत्तक पुत्र
कशासाठी हवाय काकी ना ? इतकंच नाही तर त्यांनी कुंती
मातेचे पण उदाहरण दिले आम्हाला. आणि प्रत्येक प्रश्नांचे
उत्तर त्यांना हवच आहे. किती समजावून सांगितले तरी ते
त्यांना पटतच नाही. किती हा जिद्दिपणा !" त्यावर लखुजी
जाधव हसून म्हणाले," मला तर वाटतं हा गुण नक्कीच
कोणाकडून तरी मिळावा असावा ?"
" मग स्पष्ट च सांगून टाका की , हा गुण आमच्या मुळे त्यांच्यात आलाय म्हणून. आम्हाला काही कळत नाही असं का
वाटतय आपल्याला ?"
" आम्ही असं म्हटलंय का ?"
" म्हणायला कशाला हवं ? आम्हाला कळत नाही असं थोडेच
आहे."
" बघा. काय असतं , जेव्हा मुलांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला
देता येत नाही, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा एकच काम करायचं असतं."
" त्यांना विवाहाच्या बंधनात अडकवून टाकायचं म्हणजे
आपली त्यांच्या प्रश्न मालिकेतून सुटका होईल ?"
" काय .....? तुम्ही जिजाच्या विवाहाचा विचार केलाय का ?"
" करावा तर लागणारच ना, आज ना उद्या !"
" कुठं पाहिलीत का सोयरिक ?" असे म्हाळसा बाईंनी
प्रश्न करताच त्यांना रंगपंचमी दिवशी दरबारात घडलेला प्रसंग
आठवला. तसे त्यांचे मन बेचैन झाले. ते पाहून म्हाळसा बाई
उठून त्यांच्या जवळ येत म्हणाल्या," काय झालं ? जिजाच्या
लग्नाचा विषय निघताच तुम्ही एकदम गंभीर का झालात ? काही घडलय का दरबारात ? नाही म्हणजे दरबारातून आल्या पासून मी पाहतेय तुम्ही नि धाकट्या बाई आमच्या पासून काहीतरी लपवीत आहात असं आम्हाला वाटतं." पण तरी देखील लखुजी राजे काहीच बोलले नाहीत. तेव्हा म्हाळसा बाई
उद्गारल्या ," आता आम्हाला सांगण्या सारखा नसेल किंवा
ते समजण्याची आमच्या मध्ये कुवत कमी असेल म्हणून सांगत
नसला तर हरकत नाही. तळाशी बुडालेले केव्हातरी वरती येतेच की तसंच तुमचं गुपित सर्वांसमोर येईलच की . असे बोलून त्यांनी प्रणाम केला नि तेथून जाण्यासाठी त्या वळल्याच होत्या.
इतक्यात लखुजी जाधव म्हणाले," थांबा , थांबा ऐका नि मगच
जा !" असे म्हणून ते किंचित थांबले नि दीर्घ स्वास घेतला.
मग लगेच म्हणाले," आम्ही लग्न वगैरे काही ठरविलेले नाहीये.
मात्र तसा गैरसमज नक्की झालाय."
" कुणाचा ....आमचा ?"
" तुमचा नाही हो.."
" मग ?"
" आम्ही दौलताबाद मध्ये घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलतोय."
" दौलताबाद ला काय घडला प्रसंग ?"
" सांगतो. नीट कान देवून ऐका" .असे म्हणून त्यांनी सुरवाती
पासून कसा प्रसंग घडला. त्यांचे संपूर्ण विवरण त्यांच्या पुढे
कथन केले. इथं लखुजी राजे आपल्या पत्नीला सांगत आहेत.
तर त्याच वेळी दुसरीकडे मालोजी राजे आपल्या पत्नी अर्थात उमाबाईला दौलताबादला घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करत आहेत. ते आपल्या पत्नीला म्हणाले," आम्ही बाहेर आलो हे लखुजी राजे ना माहीतच नव्हते. पण पाहिला गैरसमज झाला तो त्या फत्तेह खान मुळे." त्यावर उमाबाई नि विचारले की तुम्ही काही बोलला नाहीत ना ?"
" छे छे छे ! आम्ही कशाला काय बोलू ? उलट विठोजी
राजे चिडले होते. परंतु आम्ही त्यांना शांत केलं. आम्हाला
जेव्हा आंत बोलवले तेव्हा आमची नि त्यांची दरवाजात
ओझरती भेट झाली." तेव्हा उमाबाईनी विचारले ," तो होता
का ?" त्यावर न समजून मालोजी राजेंनी विचारले," तो
म्हणजे ? कुणाबद्दल बोलताय तुम्ही ?"
" फत्तेह खान हो !"
" नाही नाही तो नव्हता. आमची भेट एकदम दिलं खुलास
झाली. नवीन पिढीची ओळख पण झाली. तेव्हा लखुजी
जाधव आमच्या शहाजीला नि जिजाला एकत्र बसलेले पाहून
म्हणाले की जोडा एकदम छान दिसतोय म्हणून." त्याच वेळी
दुसरीकडे ऐकत असलेली म्हाळसा बाई उदारल्या ," काय
तुम्ही असं म्हणालात ?" त्यावर लखुजी जाधव म्हणाले की,
नाही नाही मी सहजच थट्टेने म्हणालो. त्यावर मालोजी राजे
पण म्हणाले की, मी सुध्दा थट्टाच केली म्हणून. पण त्या पुढे मालोजी राजे जे म्हणाले त्यावरून तर असंच वाटतय की काहीतरी गैरसमज नक्कीच झालाय."
" मग आता ?"
" आता काय जे ठरलच नाही त्याबद्दल बोलायचंच कशाला ?"
" असे होय मला वाटलं की जिंजाच्या सोयरिक चे पाहताय
म्हणून."
" अहो, लहान आहे ती अजून."
" प्रत्येक पित्याला असंच वाटतय पण मला तर वाटतय की
जींजाच्या नशिबात नात्यातीलच माणसं येत असतील तर
चांगलच आहे ना ?" पण लखुजी राजेंनी आपली कोणतीच
प्रतिक्रिया दिली नाही. तर दुसरीकडे जिजाऊ आपले बंधू
जिथं तालीम करत होते तेथे गेल्या नि बहादुरला तिथं पाहून
त्यांना थोडेसे आश्चर्य वाटले. त्यांनी बहादुरला विचारले की
दादा साहेब तुम्ही इथे आहात ?" तेव्हा बहादुर ने विचारले,
" मग कुठं असायला पाहिजे ?" तेव्हा त्यांनी विचारले की,
तुम्हाला माहित आहे काय ? "
" कशा बद्दल बोलत आहात तुम्ही ?"
" तुम्हाला दत्तक म्हणून दिलं जाणार आहे."
" हो माहित आहे." अलकोजी राजे उद्गारले.
" म्हणजे तुम्हां लोकांना काहीच वाटत नाही त्याचं ?"
" त्यात वाटायचं काय ? बहादुर राजेंना दत्तक दिले जाणार
म्हणून काय ते आपल्याला सोडून थोडेच जाणार आहेत. ते
इथंच आमच्या सोबतच असणार आहेत."
" म्हणजे दुःखी आम्हीच आहोत तर !" जिजाऊ म्हणाल्या.
" जिजा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, ते आधी दत्तक
पुत्र याचा शब्दार्थी अर्थ घ्यायचा नसतो कधी. बहादुर राजे
कायम आपल्या सोबतच राहणार आहेत." दत्ताजी राजे उद्गारले.
" आणि कुणी जाणारच असेल तर त्या तुम्हीच आहात.
म्हणजे आपले लग्न झाल्यावर. आम्ही इथच राहणार कायम."
" मनाने ही कुणी दूर जाऊ नये, असे जिजाचे म्हणजे आहे
होय ना ?" दत्ताजी राजे आपल्या अगदी मनातले बोलले
म्हणून जिजाऊ अत्यंत खुश होतात. तसे दत्ताजी राजे पुढे
म्हणाले," तुम्ही त्यांची थट्टा करणे बंद करा आधी !"
" जशी आपली. दादासाहेब ! " तेव्हा बहादुर राजे
म्हणाले की, हवे तर आम्ही तुम्हाला वचन देतोय की आम्ही
कुठं ही जाणार नाही." तेव्हा दत्ताजी राजे म्हणाले," आता झालं ना तुमच्या मनासारखे आता जरा हसा पाहू !" तश्या जिजाऊ हसल्या सारखे करतात. तसे अल्कोजी राजे उद्गारले," त्यांचे हसणे बघा, न फुगलेल्या पुरी सारख्या ." असे म्हणताच त्या खुदकन हसल्या.
मलिक अंबर उद्गारला की, हूनुर, दौलत और रिश्ता साथ
में क्यों जोड रहे है, मिआन राजू ?"
" हूजूर उत्तर से शहाजान आकर बैठा है, दूसरा बीजापुर
का आदिलशाह ताक में बैठा है, इन सबको छोड़कर वजीरे आलम को जाधव और भोसले के रिश्ते में क्यों दिलचस्पी है ? यह बतानेकी जनाब जहमत करेंगे ।"
" हुकूमत के उम्रवोंके शादी रिश्ते यह उनकी घर की बात
नहीं होती, रियासत का मसला माना जाता है ."
" अच्छा वो कैसे ?"
" सल्तनत को नए जोश , नए खून और नई सोच की अक्सर जरूरत होती है, जो अपने इलाके को महसूस रखे आवाम को खुश रखकर सरहद को बढ़ाए क्या यह बात वजीर आलम जानते नहीं तारीख गवाह है।"
" किसी भी मसले को तव्व्वजू देने से पहले याद रहे की कोई भी रियासत उसूलों के बुनियाद पर ठीकी होती है, हम परेशान है, तुम दोनो के आपसी दुश्मनी के वजह से आप दोनो वजीर है, रियासत को महसूस रखने के लिए दिल से नहीं दिमाग से सोचेंगे तो आपस में टकराव नहीं होगी ।"
" हुजूर वक्त और हालात के वजह से मसूल में कटौती हुई है.
मीआन राजू ने कहा
" उसका असर शाही खजाने में हो रहा है। बादशाह ने कहा
" शाही खजाने के तरक्की का खयाल हमे हमेशा रहता हैं ,
आवाम की खुशी, सरहद को बढ़ाना इसके शिवा हमारे जेहन
में और कुछ नहीं आता ।"
" बहुत खूब !"
" हमे दुसारोंके थाली में झांकना हमारी आदत नहीं है।" मलिक अंबर मीआन राजू नाव घेता म्हणाला. परंतु मी आन
राजू त्याच्या वक्तव्याचा अर्थ समजला.म्हणूनच की त्याने
विचारले की ," आपके बातों का इशारा हम पर है, तो साफ कर देते है। हुजूर जाधव और भोसले के कुछ इलाके हमारे सरहद में आते है उनके रिश्ते से जितने यह परेशान है, उतने परेशान हम भी है।
" लेकिन सोच की दिशा अलग अलग है ।"
" बिल्कुल दुरुस्त लेकिन हम नहीं चाहते की उनका रिश्ता
एक हो ।" मीआन राजू उद्गारला
" तो समझ लो जाधव और भोसले के बच्चों की शादी हो
चुकी है ।"मालिक अंबर उद्गारला.
म्हाळसा बाई लखुजी जाधव च्या दालनात आल्या. त्यांना
एकदम खुश पाहून लखुजी जाधव म्हणाले," आम्हाला अजूनही हेच कळत नाही की तुम्ही कधी खुश असता तर कधी दुःखी ?"
" म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला ?"
" नाही म्हणजे कसं आहे, काल तुम्ही दुःखी होता नि आज
किती खुश !"
" तसं कारणच घडलं मग खुश का होऊ नये ?"
" नेमकं काय घडलं ते तर सांगाल ?"
" तुम्ही नेहमी दोन रेघा काढता की नाही, एक छोटी
दाखविण्यासाठी एक मोठी काढता."
" बरं पुढे."
" बहादुर ला दत्तक देण्याचा जो वाद सुरू होता ना, तो आज
रेणुका मातेच्या आशीर्वादाने मिटला. कारण आपण जिजाची
सोयरिक करण्याचा विचार केल्याने."
" पण आम्ही तर नकारच दिला जिजा अजून छोट्या आहेत
म्हणून."
" तेव्हा आम्ही देखील म्हटलं होतं की प्रत्येक पित्याला
असंच वाटतं म्हणून. बोललो होतो की नाही ? बरं ते जाऊ दे
मी काय म्हणतेय ऐका. योग जुळून आलाच आहे, तर आपल्याला पुढाकार घ्यायला काय हरकत आहे, नाही म्हणजे
वेरुळच्या भोसल्या घराण्याशी नाते संबंध जुळले तर भाग्याचेच
होईल." तेवढ्यात ग्लास पडल्याचा आवाज होतो. तसे लखुजी
जाधव म्हणाले," कोण आहे तिकडे ?"
" सगुणा गर्जुवंत बाई आहे. मी काय म्हणते."
" बघू विचार करू ?"
" विचार करा पण उशीर करू नका म्हणजे झालं."
" परवा वाजीरे आलम मलिक अंबर पण हेच म्हणाले."
" बघा म्हणजे हुकूमच आला म्हणायचा."
" हुकूम कशाचा ?"
" त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना ?" तसे लखुजी जाधव
ना रंगपंचमी दिवशी स्वतःच केलेले वक्तव्य आठवले.ते म्हणाले
होते की वजीर आलम ने आमंत्रण दिले हे नुसते आमंत्रण नसते
हुकूम असतो हुकूम !" तश्या त्या पुढे म्हणाल्या," उमा बाईंचा
पुत्र शहाजी राजे आहेत ते, म्हणजे उमदे आणि देखणे तर नक्कीच असणार, आणि तुम्ही तर पाहिले देखील आहे, मग
जरा विचार करा. वजी रे आलमला पण हेच वाटत असणार
मग आपल्याला विचार करायला काय हरकत आहे, म्हणून
जरा शांत डोक्याने विचार करा म्हणजे उत्तर सापडेल." असे
म्हणून ते मुजरा करतात नि निघून जातात. लखुजी जाधव
किंचित विचारमग्न होतात.
क्रमशः
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा