षड्यंत्र ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र ९ |
जर त्यांचा घटस्फोटच झाला नाही तर लग्न झालं काय आणि नाही झालं काय त्याला अर्थ काहीच उरत नाही आणि घटस्फोट झाला तरी पहिली पत्नी आपल्या नवऱ्या कडे का राहते असा कुणी प्रश्न कधी विचारत नाही. कारण लोकांना माहीत. पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट दिल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही म्हणून घटस्फोट झाल्याचे दाखविले जाते. दोघांचे पटत जर नसते तर ती पतीचे घर सोडून गेली असती. पण तसं इथं आहे का ? तर नाही. मग कोण कशाला प्रश्न विचारील बरं ? सुंदर रावांनी त्याला पटवून दिलं. त्यामुळे त्याचा मनातील संशय दूर झाला.
आता इथून पुढे
परंतु सुंदर रावांच्या मनात काय सुरू आहे, हे फक्त
त्यांनाच माहीत होते. जेव्हा ही गोष्ट त्यांनी माधवरावाना
सांगितली तेव्हा तेही खुश झाले. एकदा दोघांचे लग्न
उरकल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला पर्मनंट मॅरेज कसं बनवायचे त्या बद्दल त्यांचे पूर्ण प्लॅन तयार होते. त्यात
त्यांची मुलगी म्हणजे माधवी पण सामील होती. म्हणजे
असे की खायचे दात वेगळे नि दाखवायचे दात वेगळे.
तिचा एकच हेतू होता आणि तो म्हणजे प्रेम ला प्राप्त
करणे. उघडपणे ते शक्य झालं नसतं म्हणून तिने हे
नवीन रूप धारण केले. ह्याला म्हणतात गोड बोलून
काटा काढणे. त्यामुळे की काय खऱ्या लग्ना सारखीच
जोरदार तयारी सुरू होती. प्रेम ला हे सर्व पसंद नव्हते.
परंतु लिला मुळे त्याला गप्प बसावे लागे. जेव्हा त्या
दोघांचा साखरपुडा करण्याचा ठरला तेव्हा प्रेम ने त्या
गोष्टीस विरोध केला. तेव्हा लिला त्याला म्हणाली," करू
दे ना त्याना पण आपली इच्छा पूर्ण !" त्यावर प्रेम तिच्यावर चिडून म्हणाला," तुला कळतंय का ? साखरपुडा करणे म्हणजे अर्धं लग्न करणे , त्यानंतर
तिच्याशी लग्न केले म्हणजे कायदेशीर पत्नी झाली ती
माझी ! मग ती आपला अधिकार नाही का सांगणार ?"
" कशी होईल ती तुमची पत्नी जोपर्यंत तुम्ही मला
घटस्फोट देत नाहीत तोपर्यंत ह्या लग्नाला काही अर्थ
उरत नाहीये. हे का समजत नाहीयेत तुम्ही ?"
" ते तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज
आहे ना, मग हे सर्व कशासाठी ?"
" त्यांच्या पण काही इच्छा असतील ना, करू देत ना
पुरी , आणि खरं सांगू जोपर्यंत तुम्ही माझ्या संग आहात
तोपर्यंत मला कशाचीही फिकीर नाहीये. "
" ते झालंच गं पण तरी सुध्दा ....?" तिच्या तोंडावर
आपला हात ठेवून म्हणाली की , आता पण आणि परंतु
जरा बाजूला ठेवा नि जरा हसा बरं. कारण तुमच्या
चेहऱ्यावर हे चिंतायुक्त भाव चांगले दिसत नाहीत. तुमचा
हसरा चेहरा मला फार आवडतो." असे म्हटल्यानंतर प्रेम
आपल्या चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणतो. तशी ती खुश होत म्हणाली," पहा बरं आता तुमचा हसरा चेहरा किती छान वाटतोय ते." तो आपल्या पत्नीच्या इच्छेखातर हसला खरा ; परंतु त्याच्या डोक्यातून अजून काही माधवीच्या घरची मंगळी जे काय करत होती त्यात काहीतरी कपट लपले आहे, असं सारखं वाटत असते त्याप ; परंतु त्याला हे कळेनासे झालंय की जे मला दिसतेय ते लिला का दिसत नाहीये. लिला ला कपट माणसांची कपट कारस्थाने कशी दिसणार कारण माधवी तिच्या समोर इतकी गरीब गाय बनली होती की लिला ला म्हणायची की ताई , माझ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नकोस हं ! खरं तर मला हे प्रेम शी खोटं खोटं लग्न करणं अजिबात पसंद नाहीये. परंतु माझ्या आई-वडिलांच्या इच्छेखातर मी हे सर्व करायला तयार झाली. पण तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या संसारात मी अजिबात विष कालवणार नाहीये. बाळ जन्माला येतात मी तुझ्या जीवनातून कायमची निघून जाईन. हे नाटक फक्त माझ्या आई- वडिलांच्या खुशीसाठी करायला मी तयार झाली आहे. कारण मी जर त्यांचे म्हणणे मानले नसते तर त्यांनी मला तुम्हां दोघांच्या बाळाची आई होऊ दिले नसते. " त्यावर लिला म्हणाली," मला माहीत आहे , तुझी मजबुरी म्हणून तर मी तुझ्या या नाटकात सामील झाली. तू मला ताई मानतेस ना , तर मीही तुला माझी धाकटी बहीण मानते. आणि एक बहीण दुसऱ्या बहिणीचा संसार कसा बरं उध्वस्त करील ? तेव्हा लोकं काय म्हणतात हे माझ्यासाठी फार महत्वाचे नाहीये. आपल्याला काय वाटते ते महत्वाचे आहे. नाही का ?" असे म्हणून त्या दोघीनी
एकमेकिना आलिंगन दिले. त्यावेळी माधवी चेहरा लिला
च्या पाठीमागे गेल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जे कुटील
कारस्थानाचे जे भाव उमटले होते, ते लिला काही दिसू शकते नाहीत. आता ती सर्रास प्रेम च्या घरी येत जात
होती. तिला कसलीच मनाई केली जात नव्हती. ती जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या घरी येत असे. कोणी विरोध केलाच तर ती म्हणे की मी लिला ताई ला भेटायला आली आहे. त्यामुळे तिला सहजपणे त्या घरात प्रवेश मिळवत असे. इतकेच नाही लिला शी गोड बोलून प्रेम ला काय आवडते नि काय आवडत नाही याची ती माहिती काढत असे. पण तिच्या समोर असं जाहीर करत असे की तुझी मी मदत करू इच्छित आहे. बस्स मला अजून काही नकोय तुम्हां दोघांकडून. आणि लीला भोळ्या स्वभावाची असल्याने पटकन विश्वास करत होती तिच्या बोलण्यावर. त्याचं कारण काय माहितेय सज्जन माणसं स्वतः प्रमाणे साऱ्या जगालाही सज्जन समजत असतात. त्यामुळेच ते नेहमी फसतात. ही दुनिया श्री ४२० आहे , हे त्यांच्या ध्यानातच येत नाही. असो.
लिला च्या आई-वडिलांना जेव्हा प्रेम दुसरे लग्न करतोय नि त्यासाठी स्वतः लिला ने संमत्ती दिल्याची समजताच त्यांच्या पाया खालची जमीनच सरकल्याचा त्याना भास होतो. म्हणून राधाबाई आपल्या मुलीला फोन करून आपल्या घरी बोलवून घेतात नि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु लिला त्याना हे सांगून गप्प करते की हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे , आणि ते सुध्दा फक्त एक वर्षांसाठी ! त्यानंतर तिचा नि माझ्या नवऱ्याचा काही संबध नाहीये." त्यावर तिची आई राधा तिला म्हणाली," पण तू तर म्हणाली होती की माधवी स्वतःहून तुझ्या बाळाची सरोगसी करायला तयार झाली होती मग आता ही लग्नाची काय भानगड आहे ?" त्यावर लिला आपल्या आईला समजावत म्हणाली की, हां आई, तू म्हणतेस तसेच आहे, परंतु तिच्या आईची इच्छा आहे की माझ्या मुलीचे लग्न झाल्याचे मला पाहायचं आहे, शिवाय समाजापासून त्यांना आपली इज्जत वाचवायची आहे, त्यासाठी हे फक्त लग्नाचे नाटक आहे. "
" हे बघ मला तर या मध्ये काहीतरी कुटील कारस्थान
वाटत आहे . असं कुणी लग्न करण्याची अट ठेवत नाही.
मला तर तेव्हाच संशय आला होता जेव्हा माधवी स्वतःहून
सरोगसी व्हायला तयार झाली होती."
" असं वाटणं स्वाभाविक आहे, परंतु तू समजतेस तसं
नाहीये. माधवी सुध्दा या लग्नास तयार नाहीये. परंतु तिच्या आईच्या इच्छेखातर ती तयार झाली आहे इतकंच."
" बघ बाई ! मला तर बाई या मध्ये सुंदर चे नवीन
काहीतरी डाव दिसतोय. कारण तो माणूस दिसतो तसा
नाहीये. कपटी तर आहेच. पण त्या पेक्षा भयंकर दृष्ट
माणूस आहे."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा