षड्यंत्र १५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र १५ |
आता तिचा पुढचं प्लॅन हे असेल की तुला प्रेम च्या जीवनातून कायमची हद्दपार करणार नि ती जावई बापूंची ची परमनंट ली पत्नी होणार. बघच तू. मी सांगतेय ते खरं होतंय की नाही ते."
पुढे
" तसं नाही होणार ."
" कशावरून सांगतेस ? तसं होणार नाही."
" कारण मी तसं होऊ देणार नाहीस."
" तू इथं आणि ती तिथं कसं अडविणार आहेस तिला ?"
" त्यांनी तसं मला वचन दिले आहे."
" अगं त्यांच्या वचनाला मार गोळी ! तू तिथं असतानाही जे घडू नये ते घडलं तर तू नसतांना तर त्या
दोघांना मोकळं मैदानच मिळालं समज."
" म्हणजे तुला आई तुला असं म्हणायचंय की प्रेम
मला दिलेले वचन पाळणार नाहीत."
" अगं हे काय रामाचं त्रेतायुग नाहीये. दिलेले वचन
पाळायला. इथं क्षणापूर्वी दिलेले वचन विसरतात. मग
ह्या वचनाचं काय घेऊन बसली आहेस."
" मग काय करू म्हणतेस ?"
" जावई बापू तुला न्यायला आलेतच आहेत ना, मग
जा ना त्यांच्या बरोबर."
" पण आई , मी माघार घेतली तर मी हार मानल्या सारखं नाही का होणार ?"
" अगं नवऱ्यापुढे हार काय नि जित काय दोन्ही
सारखेच ते. नवरा आपला आहे तर त्याच्या पुढे शरणागती पत्करला लाज नाही वाटली पाहिजे."
" अगं पण ते आता गेले असतील ना ?"
" नाही गेलेत. बाहेर वाट पाहताहेत तुझी !"
" काय सांगतेस ?"
" जाऊन बघ बाहेर." असं तिच्या आई ने म्हटलं.
तेव्हा मोहन राव म्हणाले," हां, पोरी ! जावई बापू वाट
पाहताहेत तुझी !" मग नाईलाजाने तिला प्रेम सोबत
जाण्याची तयारी करावीच लागली. तयारी झाल्यानंतर
ती आपल्या भावाला म्हणाली," दादा, येते रे मी !"
" हां पोहोचलीस की एक कॉल कर." त्यानंतर ती
अनया ला म्हणाली,' वहिनी येते गं !" अनया हसून
म्हणाली," हो, या आनंदाने !" त्यानंतर तिने दोन्ही भाच्या ना जवळ घेत म्हटलं," मी येते हं बाळा नो ! मला तुम्ही दोघांनी पा द्यायचा बरं." तसे त्या दोघांनी तिच्या गालावर किस केलं. त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांचे चरणस्पर्श केले. त्या दोघांनी तिला आयुष्यमन भव चा
आशीर्वाद दिला. त्यानंतर ती आपली बॅग घेऊन भरल्या
डोळ्यांनी बाहेर निघाली. माहेरी आलेल्या मुलीचे आपल्या
सासरी जाताना अश्रूंनी डोळे भरून येतातच. आपल्या
आई-वडीला पासून दूर जाताना वाईट हे वाटतेच. तिने सर्वांचा निरोप घेतला नि प्रेम च्या मोटारीत येऊन बसली. तेव्हा तिला बाय बाय करायला तिचा भाऊ राज ,भावजय अनया, दोन्ही भाचे, आणि आई- वडील सर्वजण उभे राहून हात हलवून बाय करत होते. मोटार निघाली. लिला
पुढच्या सीट वर बसली होती. परंतु दोघेही एकमेकांशी
बोलत नव्हते. शेवटी प्रेम नेच कोंडी फोडत म्हटलं की,
" आता असाच अबोला धरून राहणार आहेस का ?"
" हो."
" का बरं ?"
" का ते तुम्हाला माहित नाही ?"
" नाही बुवा ! म्हणून तर विचारतोय."
" वेड पांघरूण पेंड गावाला जाऊ नका. मला चांगलं
माहीत, तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना ?"
" कशाचा आनंद ?"
" हाच की मी नाही म्हणाले होते पण शेवटी यावे लागले
म्हणून."
" अग नवऱ्या बायकोच्या भांडणाला कुणी भांडण
म्हणतं का ?"
" भांडण नाही तर दुसरे काय म्हणतात ?"
" लूटूपूटू ची लढाई म्हणजे खोटीखोटी !"
" पण आता मी खरंच लढाई करणार आहे तुमच्याशी !"
" आवश्य कर. बंदा हाजीर है मॅडमजी की दांट खाने के लिए !"
" आणखीन एक गोष्ट , जर पुन्हा कधी माझ्या सवती च्या बेडरूम मध्ये जाताना तुम्ही दिसले तर याद राखा.
ह्या वेळी माफ केले आहे तुम्हांला. पण पुढच्या वेळी
पुन्हा संधि दिली जाणार नाही. कारण संधि एकदाच दरवाजा ठोठावते. पुन्हा पुन्हा नाही."
" कल्पना आहे मला त्याची !" प्रेम उद्गारला.
आणि थोड्याच वेळात त्यांची मोटार त्यांच्या बंगल्यावर
पोहोचली. गाडीचा आवाज ऐकून माधवी लगबगीने बाहेर
आली तिची खात्री झाली होती की काय झालं तरी लिला
पुन्हा सासरी येणार नाही. आता सर्वकाही आपलंच. असा
विचार करून बाहेर आली. परंतु प्रेम सोबत लिला पाहून
तिचे स्वप्न दुभंग पावले. तिच्या पाया खालची जमीन
सरकल्याचा तिला भास झाला तर नवल नाहीये. परंतु
तसे न दाखविता चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणत माधवी
म्हणाली," पाहिलं स प्रेम मी म्हणाली नव्हती तुला ? तू
जर स्वतः आणायला गेलास तर लिला ताई नक्की येईल
बघ माझं खरं झालं की नाही ?" तसा प्रेम तिच्या व्यक्तव्याला दुजोरा देत म्हणाला, " हो गं बाई पटलं मला." लिला काही न बोलता सरळ आपल्या बेडरूम
मध्ये आपली बॅग घेऊन गेली. लिला वापस आली म्हणून
मधुरा बाईंना अत्यानंद झाला. मात्र सूंदर रावांच्या कपाळावर आट्या पडल्या. पण आपल्या पत्नी समोर
मात्र कृत्रिम हास्य प्रकट केलं. लिला आपल्या बेडरूम
मध्ये आली आणि प्रथम बाथरूम मध्ये शिरली. प्रेश होऊन
बाहेर आली पाहते तर काय तिच्या पाठोपाठ प्रेम देखील
बेडरूम आला होता. प्रेम ला पाहून नाराजी व्यक्त करत
लिला म्हणाली ," म्हणजे , तुम्ही स्वतःच्या मनाने मला
न्यायला आले नाहीत तर !"
" असं कोण म्हणतं ?"
" कोण काय मघाशी तुमची ती.... बोलायची थांबली.
" तुमची ती काय ? बोल ना पुढे , थांबलीस का ?"
" थांबली यासाठी नेमकं काय नाव द्यावं तुमच्या नात्याला याचा विचार करत होतं."
" असं काय... एक नाव तर देऊन झाली आहेस, बघ
बघ दुसरे नाव काय सुचतंय का ते ."
" सुचलं ना ?"
" हो का ? मग सांग बरं."
" सांगू ..., रागावणार तर नाही ना ?" लिला मुद्दाम
चिडविण्याच्या हेतूने म्हणाली.
" अजिबात नाही रागावणार ?"
" बघा हां !"
" एकदा नाही म्हटलं ना ?"
" मग ऐका तर , नवीन नाव ठेवलं आहे, साजन की
सहेली !"
" काय ? साजन की सहेली छान नाव आहे हे."
" तुम्हांला आवडलं ना ?"
" आता तू ठेवले आहेस म्हटल्यावर आवडायलाच
हवे. नाही का ?"
" याचा अर्थ तुम्ही नाखूश आहात. हो की नाही ?"
" छे छे छे ! असं कोण म्हणाले ?"
" नाही. मला आपलं वाटलं." लिला म्हणाली.
दोघांची थट्टा मस्करी पाहीन मधुरा बाई दरवाजातच थांबल्या होत्या. दोघांचा ही लक्ष त्यांच्या कडे गेला नाही.
दोघांच्या आनंदात विरजण पडायला नको म्हणून त्या
माघारी वळल्या. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधाना चे
चिन्ह स्पष्ट जाणवत होते. त्या किचनमध्ये जाण्यास वळल्या. त्याच वेळी बाजूच्या बेडरूम मध्ये माधवी आणि
सुंदर राव बोलत होते. सुंदर राव तिच्यावर रागवत म्हणाले,
" लिला च्या माहेरी जाऊन तिला घेऊन यायचे सजेशन
तू दिलेस का प्रेम ला ?"
" हो मीच दिलं प्रेम ला ."
" लाज नाही वाटत हो म्हणायला. किती मुश्किलीने
हे घर सोडायला भाग पाडलं होते मी लिला पण तू
सर्वांची माती केलीस त्याची !"
" मला काय माहित ती खरोखरच येईल ती प्रेम सोबत ?"
" एक गोष्ट लक्षात ठेव. नवऱ्यावर रागावून माहेरी
गेलेली बायको फार दिवस माहेरी राहात नाही. नवरा
स्वतः आणायला गेला तर ती त्याच्या सोबत येतेच.
कारण नवऱ्याने आपल्याला न्यायला यावे अशीच तिची
इच्छा असते."
" हो माहितेय मला. पण इतकं सारं रामायण घडल्या
वरही ती आपल्या नवऱ्याचे अपराध माफ करेल असं
मुळीच वाटलं नव्हतं मला."
" इथंच तू चूक केलीस तू नवऱ्याने कितीही मोठा
अपराध केला तरी स्त्री त्याला माफ करतेच. फक्त तिची
माफक एकच इच्छा असते की नवऱ्याने तिची माफी
मागावी बस्स ! आणि नवऱ्याना देखील हे माहीत असतेच
म्हणून ते सरळ माफी मागून मोकळे होतात."
" मग आता पुढे काय करायचं ?"
" आता लगेचच काही करायचं नाही.थोडे दिवस जाऊ दे. मग बघ येईल तो परत तुझ्याकडेच."
" खरंच असं होईल ?"
" अगं होईल म्हणून काय विचारतेस , एकदम असंच
होणार, कारण एकदा का बाहेरची चटक लागली ना, मग
घराची कोंबडी सुध्दा डाळ भाता सारखीच लागते. म्हणून
तर म्हटलं आहे ना, घर की मुर्गी दाल के बराबर ते काय
उगाच."
" मग तुम्ही अजिबात चिंता करू नका. यावेळी लिला
माहेरी जाईल ती परत कधीच येणार नाही याची ग्याही मी
देते."
" शाब्बास हीच अपेक्षा होती तुझ्याकडून." असे
म्हणून ते तिच्या बेडरूम मधून बाहेर पडले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा