षड्यंत्र १२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र १२ |
आपले भांड फुटेल म्हणून चटकन सुंदर राव म्हणाले,
" शारदा बाई असं मुळीच करणार नाही. मला वाटतं तुझ्या मनात जलीश भावना निर्माण झाली असावी. होतं असं कधी कधी ! आपल्या वाट्याचे सुख जेव्हा दुसऱ्या मिळते तेव्हा अशी जलीश भावना निर्माण होते. तेव्हा सुनबाई आम्ही तुला दोष देत नाही आहोत. पण या पुढे तू माधवी पासून दूर रहा. बस एवढीच अपेक्षा ! लिला स्वतः निर्दोष असल्याचे सांगते. पण कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास करत नाही.
पुढे
लिला आपल्या बेडरूम मध्ये बसली नि झाल्या गोष्टी
बद्दल विचार करू लागली की, मी तर दुधा मध्ये काहीच
टाकले नव्हते मग असं झालं कसं ? शारदा बाईचे तर हे
काम नसेल ना ? पण त्या असं का करतील ? कारण त्यात
त्यांचा काय फायदा होणार आहे ? आणि असं पण तिनं
हे दूध आपल्यासाठी बनविले होते. तिला हे थोडेच माहीत
होते की हे दूध आपण माधवी ला देणार आहोत ते. ? काय
कारण असावं ? असं तर नाही ना की हे दूध आपल्याला
मूल होऊ नये म्हणून दिलं जातं. बहुतेक असंच कारण
असावे ? पण असं का करेल ती ? तिच्या कडून कोणी
हे काम करवून तर घेत नसेल ना ? खरं आहे ते आता तिच्या कडूनच कळेल. असा विचार करून तिने एका नोकराला सांगितले की शारदा बाईंना मी बोलविले
म्हणून सांग. गणू गेला नि शारदा बाईंना सांगितले की
तुम्हाला लिला ताई बोलवत आहेत." तशी शारदा बाई
फार घाबरल्या त्या समजून चुकल्या की आता आपलं
काही खरं नाही. नोकरी पण जाईल नि छोटे मालक प्रेम
बाबू ना कळलं की हे सारे आपण केलं तर ते आपल्याला काय शिक्षा करतील ती कोण जाणे ? काय करू ?
मोठ्या मालकांचे नाव सांगू का ? पण छे मोठ्या मालकांचे
नाव सांगून चालणार नाही. नोकरी तर जाईलच उलट ते
आपल्यावर कोणता आरोप करतील ते कोण जाणे ? त्या
पेक्षा आपण एक काम करू , माधवी लाच यात गुंतवून
टाकू असा विचार करून त्या लिला च्या बेडरूम मध्ये आली नि विचारले ," बोला, लिलाताई काय हवंय तुम्हांला ?"
" मला काही नकोय फक्त मला तुझ्या कडून फक्त
माझ्या प्रश्नाची उत्तरे हवी आहेत ?"
" कोणत्या उत्तर ...मी काही समजली नाही ?"
" मी विचारेंन त्या प्रश्नांची असे समज की आज तुझी परीक्षाच आहे आणि त्या परीक्षेत तुला उत्तीर्ण व्हायचंय.
हां पण त्यासाठी एकदम खरं बोलायचे आहे, खोटी बोललिस तर यातून तुझी सुटका होणार नाहीये. तेव्हा
खरं काय आहे, ते बोलायचं."
" तुम्ही काय म्हणताय ते खरंच मला काही कळले नाहीये."
" कळलं नाहीये का न कळल्याचा नुसत्या बहाणा
करते आहेस."
" पण असं काय घडलंय माझ्या हातून ? नाही म्हणजे
आरोपी पिंजऱ्यात उभं केल्यावाणी विचारताय म्हणून म्हणते." शारदा बाई मनातून फार घाबरलेल्या असतात.
परंतु वरकरणी हिम्मत दाखवत त्या म्हणाल्या.
" तुला माहीत नाही तू काय केलेस ते ?"
" कशा संबधी बोलताय तुम्ही ?"
" तुला चांगलं माहीत आहे, मी कशा संबधी बोलत आहे
ते. पण तरी देखील तुझ्या धीट पणाची दाद द्यायला हवी.
पण विचारलेस म्हणून सांगते. मला जे दूध आणून दिलं
होते त्यात काय घालून दिलं होतेस ?"
" काय बोलताय तुम्ही ताई साहेब मी असं का करीन
बरं ?"
" कोणाच्या सांगण्यावरून केलेस तू हे ?"
" खरंच मी असं काहीही केलेले नाहीये."
" मग डॉक्टर काय खोटं बोलतात ?"
" ते मला माहित नाही ताई साहेब , पण मी असं काहीच
केलेले नाहीये."
" मी तुझ्यावर विश्वास कसा करू ते सांग."
" ताई , खरं सांगू ?"
" हां अगदी खरं सांग."
" माधवी खोटी बोलते. तिचा गर्भपात दुधामुळे झालेला
नाहीये."
" मग कशामुळे झाला ?"
" मला वाटतं, तिने असं काहीतरी खाल्लं तरी असेल
किंवा पिलं तरी आहे की ज्यामुळे तिचा गर्भपात झाला."
" हे तू कशावरून सांगते आहेस ?"
" मी सुध्दा दोन मुलांची आई आहे म्हटलं. तेव्हा गरोदर स्त्री ला काही गोष्टीचे सेवन करणे वर्ज असतं. जसं
की पपई ज्युस पिल्याने सुद्धा गर्भपात होऊ शकतो , आणि डॉक्टर असं काही म्हणाले नाहीत की गर्भपात दूध पिल्यानेच झाला म्हणून. ते फक्त इतकंच म्हणाले की तिने काही पिलं होतं का ?"
" हां मग तिने तू दिलेले दूधच प्यायली होती ना ? मग तिला असं झालं ?"
" नाही ताई साहेब , जे दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसते ते काही खोटं नाहीये." शारदा बाईंनी लिला च्या संशयाचं बीज रोपण केलं. आता फक्त त्याला अंकुर फुटण्याचा बाकी आहे, तोपर्यंत त्याला पाणी देणे आवश्यक आहे , असा विचार करून त्या पुढे म्हणाल्या,
" माझ्या इतक्या वर्षाचा अनुभव सांगतोय की माधवी
जशी आपल्याला साधी नि संस्कारी मुलगी वाटते. तेवढी
ती संस्कारी नाहीये. फक्त ती तसा दिखावा करते आहे बस्स !"
" म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते सांग."
" मला काय वाटतंय माहितेय माधवी चा काहीतरी
उद्देश आहे या घरात येण्या मागचा."
" असं वाटण्याचे कारण ?" लिला न समजून म्हणाली.
" असं वाटण्याचे कारण म्हणजे कोणतीही अविवाहित
मुलगी सहजासहजी सरोगसी बनायला तयार होणार नाहीये. मग माधवी स्वतःहून कशी काय तुमच्या बाळाची
सरोगेट मदर बनायला तयार झाली. या मागचे काय कारण
असावे ?"
" कारण काय ती अगोदर म्हणजे बालपणापासून प्रेम
वर म्हणजेच माझ्या नवऱ्यावर प्रेम करते. म्हणून तिला वाटलं की आपल्या आवडत्या व्यक्तीची मदत करावी."
" अगदी बरोबर. छोट्या मालकांवर लहानपणा पासून ती प्रेम करतेय ही खरी गोष्ट आहे मग मला सांगा कोणीही
आपलं पहिलं प्रेम विसरतं का ? नाही ना ? मग ती कसे
विसरेल. " शारदा बाईंनी अचूक जागी बोट ठेवले. त्यामुळे
लिला देखील किंचित विचारमग्न झाली. शेवटी तिचं ही मन तिला सांगू लागले की शारदा बाई म्हणतात ते काही
अगदीच खोटे नाहीये. माधवी आपल्याला तिचे जे रूप
दाखविते ते खरं नाहीये. नक्कीच आमच्या बाळाची
सरोगसी बनण्यामध्ये जरूर काहीतरी उद्देश असावा.
नाहीतर कोणती कुवारी मुलगी सरोगसी बनायला तयार
होईल. नक्कीच तिचा ह्या मध्ये उद्देश असावा. लिला विचारमग्न झालेली पाहून शारदा बाईंच्या ध्यानात आलं
की आपण फेकलेला बाण अगदी मर्म स्थानी लागला आहे. आता त्यात अजून भर घालायला पाहिजे. म्हणजे
आपले काम फत्ये झालेच म्हणून समजा. असा विचार
करून त्या पुढे म्हणाल्या," आता तुम्हीच विचार करा ना,
जी मुलगी लग्न न करता सरोगसी बनायला तयार होते.
आणि जशी प्रेग्नंट होते तशी ती आपले खरे रूप दाखवायला सुरुवात करते. जसे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची अट घालने आणि त्यासाठी सर्वांन राजी पण करते.
आणि लग्न ही करून घेतले. या सर्व गोष्टींचा विचार केला नंतर एकच गोष्ट ध्यानात येते आणि तिला आता तुम्हां
मध्ये गैरसमज निर्माण करावया चा आहे, त्यासाठी तिने हे
नवीन रचलेले षड्यंत्र आहे. जेणे करून तिला छोट्या
मालकांची सहानुभूती मिळवायची आहे नि त्याच बरोबर छोट्या मालकांचे प्रेम मिळवायचे आहे, परंतु ते कधी
शक्य होईल. जेव्हा तुमच्या बद्दल छोट्या मालकांच्या
मनात गैरसमज निर्माण होईल तेव्हा ना ? म्हणून तर
तिने हा खेळलेला हा डाव आहे, वेळीच सावध व्हा !
नाहीतर पश्चात्ताप करण्याची पाळी येईल तुमच्यावर.
कारण एकदा का तुम्ही छोट्या मालकांच्या मनातून
उतरले की तुम्हाला त्यांच्या पासून दूर करण्याचे काम
तिला सोपे जाणार आहे. तुमच्या जागी तिला ह्या
घरची छोटी मालकीण बनायची आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. बघा मला जे वाटलं ते मी सांगितलं आता त्यावर अमल करायचा का नाही ते तुम्ही ठरवा.
आम्ही काय नोकर माणसं ! आम्हांला जो हुकूम मिळेल
त्या नुसार काम करायचंच आहे. "सुंदर रावांचे नाव घेता
असं काही बोलली की मी जे करतेय ते मोठ्या मालकांच्या
आदेशानुसार करत आहे. माझा काही त्यात दोष नाही.
जणू हेच सांगायचे होते त्यांना. परंतु हे सर्व मनात बोलते.
पुढे उघडपणे इतकंच त्या म्हणाल्या," बाकी तुमचं वाईट करून मला काय मिळणार आहे ते तुम्हीच सांगा बरं ?" शारदा बाईंनी मुद्दा इतक्या चांगल्या प्रकारे पटवून सांगितले की लिला ला देखील त्यांचे म्हणणे खरे वाटले आणि ते साहजिक पण आहे म्हणा. शारदा बाई मोलकरीण आहे, तिला काय मिळणार माझे वाईट करून ? म्हणजे जुने प्रेम पुन्हा उफाळून आलं तर !
प्रेम चे प्रेम मिळवण्यासाठीच तर हे सर्व करीत नसेल ना ?
नक्कीच त्यासाठीच करत असेल ? म्हणून ती एक एक
गड सर करत निघाली आहे. अगोदर सरोगसी नंतर
कॉन्ट्रॅक्ट लग्न ? आणि आता गर्भपात हे सर्व षड्यंत्र तर
नसेल ना ? नक्कीच षडयंत्र आहे, आपण वेळीच प्रेम ला
सावध केलं पाहिजे. नाहीतर आपण नक्कीच मोठ्या संकटात सापडू . असा विचार करून प्रेम येण्याची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने प्रेम आपल्या बेडरूममध्ये आला तेव्हा लिला ला तिथं पाहून प्रेम म्हणाला," लिला तुला एक विचारू ?" तेव्हा लिला समजली की प्रेम ला काय विचारायचे असेल ते. पण तरी देखील माहीत नसल्यागत करत म्हणाली," अवश्य विचारा , काय विचारायचं आहे तुम्हांला ?" प्रेम एकदम शांतपणे म्हणाले," बाहेर आता जे मी ऐकलं तर खरं आहे का ?"
" म्हणजे, तुम्हांला देखील असं वाटतं का ? की मी असं
करू शकते म्हणून."
" नाही मला असं वाटतही नाही आणि मी असं म्हणणार देखील नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
परंतु जे घडलंय ते देखील नजरे आड करता येत नाही.
म्हणून मी तुला विचारतो, खरंच तू असं केलं आहेस का ?"
" हे बघा ते दूध मला शारदा बाईंनी आणून दिलं होतं.
तेच दूध मी माधवी ला दिलं ते यासाठी की आपलं दोघांचे मूल एकदम हेल्दी होण्यासाठी ! माझ्या मनात काही दृष्ट भाव असते तर ते दूध मी स्वतः नेऊन का दिलं असतं ? दुसऱ्या कुणाच्या हातात दूध देऊन पाठविले असते ना ?"
" अगदी बरोबर बोलतेस तू ? " किंचित विचार करून
प्रेम म्हणाला," हे काम शारदा बाईंचे तर नसेल ना ?"
" पण ती का करेल असं ? नाही म्हणजे तिला असं
करून काय मिळणार ?"
" तू नाही आणि शारदा बाईपण नाही, मग कुणाचे
असेल हे काम ?"
" मला काय वाटतं माहितेय, आपण जसे समतोय
तसं काहीही झालेलं नाहीये."
" म्हणजे ?"
" म्हणजे असं की माधवी ने स्वतःच तर गर्भपात केला
नसेल कशावरून ?"
" काहीतरीच काय बोलतेस ? ती का करेल असं ?"
" त्या मागे दोन कारणे आहेत."
" कोणती ?"
" पाहिलं कारण म्हणजे तिचे तुमच्यावर प्रेम आहे, परंतु तुमचं प्रेम माझ्यावर असल्याने तिच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. आता तुम्हांला परत प्राप्त करायचं तर
कसं करणार म्हणून तिने हा डाव खेळला. अगोदर सरोगसी व्हायला तयार झाली. त्यानंतर तिने तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. हे झालं एक कारण आता दुसरे कारण हे आहे की तुमची पत्नी तर झाली ती, परंतु मला घटस्फोट तुम्ही दिल्या खेरीज ती तुमची कायदेशीर पत्नी बनू शकत नाही. म्हणून तिने हा डाव खेळला जेणे करून तुम्ही माझ्यावर रागवाल नि रागाच्या भरात मला घटस्फोट द्याल. हे तिचं मास्टर प्लॅन होतं." प्रेम आणि लिला वार्तालाप करत असतांना माधवी ने बाहेरून ऐकलं. कारण
ती प्रेमच्या पाठोपाठ ती तिथपर्यंत आली होती आणि
आंत न येता दरवाजा वरच थांबली आन दोघांमध्ये होणारे
संभाषण ऐकू लागली. खरं तर आपलं प्लॅन किती सक्सेफुल झालं आहे, हे पाहण्यासाठी ती तेथे आली होती. परंतु आतील दोघांचे संभाषण ऐकून तिचा भ्रमनिरास झाला. तिच्या द्यानात आले की लिला आपल्या प्लॅन फेल करून टाकलं आहे . मग आता त्यातून वाचण्याचा मार्ग काढायला हवा असा विचार करून ती आंतमध्ये प्रवेश करून तिला पश्चात्ताप झाल्याचे खोटे नाटक करत ती म्हणाली," प्रेम , लिला ताईची ह्यात
काहीच चूक नाहीये. तिच्यावर रागावू नकोस. खरं सांगायचं तर ह्यात चूक माझी आहे." तसा प्रेम तिच्याकडे वळत म्हणाली," तुझी चूक ती कशी काय ?"
" लिला ने दिलेल्या दुधात नव्हते काही खरं तर मी
विसरली सांगायला. काल ना मी पपई चे ज्युस प्यायली
होती. मला नव्हतं माहीत की पपई चे ज्युस प्रेग्नंट बाईंनी
प्यायचा नसतो तो . लिला ताई माफ कर मला माझ्या चुकीमुळे तुला फुकटच ऐकून घ्यावे लागले." त्यावर प्रेम
सुध्दा लिला ची माफी मागत म्हणाला," लिला मला ही
माफ कर मी तुझ्यावर नाहक संशय घेतला. खरं तर मला माहित असायला हवे की तू असं कधीच करू शकत नाहीये." तशी माधवी मनात म्हणाली ," खरंय , लिला
असं करु शकत नाही, पण मी तर करू शकते ना ? हे
तुला कुठं माहीत आहे, तुझा असाच विश्वास राहू दे
माझ्यावर. तेव्हाच मी तुझ्या ह्या विश्वासाचा गैर फायदा
घेऊ शकते. पण त्यासाठी मला काहीतरी मोठे प्लॅन
करावे लागणार, हरकत नाही. करेन तेही करेन म्हणा.
पण सध्या माझं नाव गुप्तच राहायला पाहिजे की मी इथं
कशासाठी आली आहे ?" लिला देखील विचारमग्न झाली
की कोणतं खरं मानावं ? शारदा बाई सांगत होते ते खरं
मानावं का ? का माधवी जे सांगत आहे ते खरं मानावे ?
काहीच कळत नाहीये.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा