Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र ७

षड्यंत्र ७
षड्यंत्र ७

 



   " मी गॅरंटी देतो तुला. की मी म्हणतो तसेच होईल आणि
तसं नाही झालं तर मी तसं करण्यास भाग पाडीन. पण
यावेळी तू माझ्यावर विश्वास ठेव." सुंदर राव दृढ निश्चयाने
म्हणाले. नाही होय करता करता शेवटी माधवरावाणी
शेवटी आपली संमती दर्शविली.

आता इथून पुढे

      सरोगसी व्हायला काही प्रोफेशनल महिला  आल्या होत्या. त्यात माधवी सुध्दा होती. माधवी ला पाहून आश्चर्य चकित झालेला प्रेम अगोदर तिलाच बोलावतो नि तिला विचारतो की तू इथं कशासाठी आली आहेस ?" तेव्हा ती म्हणाली," सरोगसी व्हायला आली आहे मी !" माधवी सरोगसी बनायला स्वतःहून तयार आहे, हे ऐकून प्रेम ला फार मोठे आश्चर्य वाटलं. तेव्हा प्रेम ने विचारले की, तू काही गरीब नाहीस आणि तुला कोणत्या गोष्टीची
कमतरता आहे , असं ही मला वाटत नाही मग तू सरोगसी
होण्यास का  तयार झालीस , या मागचे कारण  मला अजून कळले नाहीये." त्यावर माधवी म्हणाली," अरे, प्रत्येक गोष्टीस कारणच असायला हवं असं काही नाहीये. पण तरी देखील तू कारण विचारले आहेसच तर ऐक. कारण हे आहे की मी तुझी बाल मैत्रीण तर आहेच. शिवाय मी तुझ्यावर फार प्रेम करत आहे आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणा पर्यंत तुझ्यावर प्रेम मी करतच राहणार ?" तिचं बोलणं ऐकून प्रेम आणि लिला एकदम आवाक झाली. परंतु प्रेम ला राहवले नाही त्याने विचारले," अगं माधवी काय बोलतेस तू हे ?"
    " खरं तेच बोलते आहे मी प्रेम. माझं खरंच तुझ्यावर
प्रेम आहे, परंतु मी माझं प्रेम कधीच तुझ्या समोर व्यक्त
केलं नाही आणि जेव्हा करायचं ठरलं तेव्हा कळलं की
तुझं प्रेम लिला वर आहे, मग मी स्वतःहून तुझ्या मार्गातून
दूर झाली नि तेव्हाच निश्चय ही केला की तुझ्या जीवनात
मी कधीच डोकावून पाहणार नाहीये. परंतु मला जेव्हा
कळलं की लिला आई बनू शकत नाही आणि तुला सरोगेट
मदर ची गरज आहे, तेव्हा मी विचार केला जर मी तुम्हां
दोघांच्या कामी आली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन
की मी माझ्या सर्वात जास्त प्रिय असलेल्या मित्राच्या
कामी आली म्हणून. या व्यतिरिक्त मला तुझ्या कडून दुसरं
काही नकोय. मग करशील ना माझी एवढी इच्छा पुरी ?"
त्यावर प्रेम इतका भावुक झाला की त्याला काय बोलावे
ते सुचत नव्हते. तो काहीच बोलत नाही हे पाहून माधवी
पुढे म्हणाली," बघ नाही म्हणू नकोस. मी तुम्हां दोघांची
मदत करू इच्छिते बस्स !"
    " तू माझी मैत्रीण आहेस, हे तर मला माहित होतं. परंतु
तू माझ्यावर प्रेम आहे, हे नव्हते मला माहित."
    " त्यात तुझा काहीच दोष नाही रे, कारण मी माझं
मन तुझ्या समोर व्यक्त नाही केलं. मला वाटलं तुही माझ्या
वर तितके प्रेम करतो आहेस. पण माझ्या प्रेमाने तुही
आपले प्रेम व्यक्त करत नाहीये. पण आज ना उद्या तू ते
करशील असं मला वाटलं होतं म्हणून मी ही गप्प राहिले.
पण हरकत नाही. तू माझ्या नशिबात नव्हतासच तर तू
मला मिळणार कोठून ? जिच्या नशिबात होतास तिला
तू मिळालास. आता फक्त माझी एकच इच्छा आहे, की
तुम्हां दोघांची मदत करून आपल्या जीवनाचे सार्थक
करावे. आणि हा अधिकार तू माझ्या कडून हिरावून घेऊ
नकोस." माधवी विनंतीच्या स्वरात बोलली. त्यावर प्रेम
म्हणाला," पण माधवी तू जर कुवारी आई बनलीस तर
उद्या तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही."
    " तुला कोणी सांगितले की मी लग्न करणार आहे म्हणून. मघाशी ऐकले नाहीस मी काय म्हणाली ती." तेव्हा
त्याने आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला तिचं व्यक्तव्य आठवलं. ती म्हणाली होती की  मी तुझी बाल मैत्रीण तर आहेच. शिवाय माझं तुझ्यावर फार प्रेम  आहे. आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणा पर्यंत ते मी करतच राहणार ? हे जसे त्याला आठवलं , तसा तो पुढे म्हणाला,
याचा अर्थ तू लग्न करणारच नाहीस ?"
    " हां !"
    " पण तू असं केलं तर मी स्वतःला तुझा गुन्हेगार समजेन की मी तुझं जीवन बरबाद केलं म्हणून."
    "  तसं नाही आहे रे , प्रत्येक व्यक्तीला जीवनात सर्वकाही मिळतेच असं नाही आहे रे, कित्येक लोक
माझ्या सारखे अभागी असतात. त्याना जीवनात काहीच
प्राप्त होत नाही. परंतु त्यातल्या त्यात मी भाग्यवान आहे
की मला तुझी पत्नी बनण्याचे भाग्य प्राप्त नाही झालं. परंतु तुझ्या बाळाची आई होण्याचे भाग्य प्राप्त होत आहे, हे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे."
   " पण मी तुझ्या सोबत असं करू शकत नाही." प्रेम
उद्गारला.
    " तुझा  विश्वास नाही का माझ्यावर ? तुला असं तर वाटत नाही ना की  , तुझ्या बाळाची मी आई बनून तुम्हां दोघांच्या जीवनात प्रवेश करत आहे.? आणि पुढे तुम्हा
दोघांच्या वैवाहिक जीवजात अडसर बनेन म्हणून ?"
    " नाही त्या बद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही."
    " मग अजून काय प्रॉब्लेम आहे ?"
    " तुझे आई-वडील तयार होतील का या गोष्टीस ?"
    " हो ; कारण मी तसं अगोदरच सांगितले आहे."
    " आणि ते राजी पण झाले या गोष्टीस ?"
    " हां. कारण माझ्या जिद्दी पुढे त्याना माघार घेणे भाग
पडले." प्रेम लीला कडे पाहत म्हणाला ," लिला तुझं काय
मत आहे ? म्हणजे मला म्हणायचंय की माधवी ला आपल्या बाळाची आई बनू द्यायचे का ?" त्यावर लिला
म्हणाली," माझी काहीच हरकत नाही. कारण मोहन मीरा चा पण होता नि राधाचा पण त्या दोघींना मोहन शी लग्न
करता नाही आलं पण प्रेमिका तर बनल्याच ना ?  मला
तुमची पत्नी बनण्याचे भाग्य लाभलं तर माधवी ला तुमची
प्रेमिका बनण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे आम्ही दोघी
एका बाळाच्या आई बनण्यास तयार आहोत." प्रेम ला
पण बरे वाटले की आता आपण बाप होण्यास काहीच
अडचण नाहीये." त्याने माधवी ची सरोगेट मदर म्हणून
निवड केली नि बाकीच्या ना माघारी पाठवून दिले. प्रेम च्या
या निर्णयावर सगळेच खुश झाले. खास करून सुंदर राव
आपलं प्लॅन यशस्वी झाले म्हणून. तिकडे माधवराव देखील खुश होता की माधवीचे लग्न आज ना उद्या प्रेम शी
होईल म्हणून. पण कुणालाच माहीत नाही की नियती ने
त्यांच्या पुढे काय वाढून ठेवले आहे ते.

      दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे माधवी इस्पितळात हजर झाली. बाहेरच्या चेअर वर बसली होती. थोड्या
वेळा ने तिला आंत बोलविण्यात आहे, तेथे मशीन्स आणि
इतर काही मेडिकल साहित्य होतं. तिला बेडवर झोपण्यास सांगण्यास आले. त्यानंतर तिचा स्कर्ट वर
करण्यात आला तेव्हा तिला भयंकर लाज वाटली. परंतु
करणार काय डॉक्टरा जवळ लाज बाळगून चालत नाही.
हेच खरे !  त्यानंतर डॉक्टर आपसात काहीतरी बोलत होते. पण तिला त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. इतकंच
त्यांच्या कडे पाहण्याची तिला हिंम्मत देखील झाली
नाही. तिने आपले डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने डॉक्टर म्हणाले,"  ओके उघडा आता डोळे ! आता पुढच्या
महिन्याला मासिक पाळी चुकल्यावर आम्हाला येऊन सांगायचे. बरं का ? " त्यावर माधवी हो म्हणाली.

     सुंदर रावांचे म्हणणे होते की तिने आपल्या घरी येऊन राहावे. परंतु माधव रावांना ते मान्य नव्हते. त्यांचे म्हणणे होते की आमची मुलगी आमच्या सोबतच राहील. परंतु सूंदर रावांचे म्हणणे होते की जर तिला स्वतासाठी  प्रेम च्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर तिने आमच्या घरी येऊन राहावे लागेल. परंतु ते माधव रावांना अजिबात
मान्य नव्हते. त्यांचे म्हणणे होते की माझी मुलगी इथं तुमच्या घरी येऊन राहणारी नाही तर खंडाळ्याला आमचा एक फार्म हाऊस आहे तेथे जाऊन राहील. तिच्या सोबत तिची आई राहील. हवं तर त्या दोघींच्या सोबत प्रेम-लिला ला पाठवू शकता. "
   " प्रेम - लिला ला सोबत पाठविले तर आपलं प्लॅन
यशस्वी कसं होणार ?"  कारण त्याना भीती असते की जर लिला प्रेम सोबत खंडाळ्याला राहायला गेली तर तिला दुधातून रोज गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. त्या
बंद होतील. शिवाय ती प्रेम ला माधवी जवळपास देखील
जाऊ देणार नाही. मग त्या दोघांमध्ये प्रेम कसे निर्माण
होणार ? आणि गोळ्या देणे बंद झालं तर ती स्वतः प्रेग्नेंट
राहण्याची पण शक्यता आहे. मग आपले सारे प्लॅन फेल होईल. परंतु ही गोष्ट ते आपल्या मित्राला सांगू शकत नव्हते. म्हणून ते विरोध करत होते. परंतु माधवी ने ठामपणे सांगितले की मी कुठं ही जाणार नाही मी इथं राहीन ,  तुम्हा सर्वां सोबत." तेव्हा माधवराव चिडून म्हणाले," तुला काय इथं राहून आमची प्रतिष्ठा मातीमोल करायची आहे का ? एक तर मला मान्य नसलेली गोष्ट
करावी लागत आहे. उद्या जर सर्वांना समजले की माझी मुलगी लग्न न करता आई होणार आहे, तर समाजात काय इज्जत राहील आमची !"
    " म्हणजे पप्पा , तुम्हांला आपल्या मुली पेक्षा आपली
प्रतिष्ठा फार महत्वाची आहे. असेच ना ?"
   " होय. कारण इतके वर्षे मिळविलेली प्रतिष्ठा अशी
एका झटक्यात आम्ही तुला  मातीमोल करू देणार नाही. तू जर खंडाळ्याला जायला तयार असशील तर तुला आम्ही सरोगसी करायला परवानगी देऊ , अन्यता हे काँट्रॅक्ट कॅन्सल म्हणून समज." तेव्हा सुंदर राव म्हणाले,
    " परंतु पहिलं तर असं आपलं काहीच ठरलं नव्हतं."
   " हो अगोदर ठरलं नव्हतं. परंतु नंतर मला जाणवलं की
असं होणं फार जरुरीचे आहे. कारण तू म्हणतोस तसे नाही घडले तर माझ्या मुलीचं काय ? मग कोण करील
तिच्याशी लग्न ?"
   " म्हणजे आपल्या दोघांमध्ये कोणती तरी ड्रिल झाली आहे का ? माझ्या विषयी ?" माधवी ने समजून विचारले.
    "  तसं काहीही नाहीये." सुंदर राव खोटं बोलले.
    " नाही काय ?  ड्रिल झाली आहे आपल्या दोघांमध्ये.
खोटं का बोलतो आहेस ?"
    " मला कुणी सांगेल का ? तुम्हां दोघांत काय ड्रिल
झाली आहे ती."
   " माधवी तू ह्याचं मुळीच  ऐकू नको. आम्हां दोघांत
अशी कोणतीच ड्रिल झालेली नाहीये." सुंदर राव माधवी
पासून सत्य लपवू पाहत होते . परंतु माधवराव गप्प बसत
नाही. सुंदर राव नि आपल्यात काय काँट्रॅक्ट झालं आहे. त्या विषयी ते आपल्या लेकीला माहिती देतात. ते ऐकून माधवी म्हणाली," मी फक्त प्रेम ची एक चांगली मैत्रीण आहे या नात्याने त्याची मदत करू इच्छित होती. परंतु आपण दोघांनी कुशल बिजनेसमन सारखी त्याची ड्रिल
करून टाकली. मला हे अजिबात मान्य नाहीये. तेव्हा तुम्ही म्हणताय तसे काहीही होणार नाहीये. हा माझा निर्णय आहे."
    " तुला जर आपल्या मित्राची मदतच करायची असेल तर तुला माझं  म्हणणं ऐकावेच लागेल." माधवराव बोलले.
   " ठीक आहे, मी खंडाळ्याला जायला तयार आहे."

     मग काय सूंदर रावांचा नाईलाज झाला. पण त्यांनी
त्यावर लगेच दुसरा उपाय शोधला. त्यांनी विचार केला की प्रेम सोबत लिला  जर गेली  तर त्या दोघांना तेथे एका नोकरणीची गरज लागणारच आहे . आपण शारदाबाई लाच त्यांच्या सोबत पाठवून देऊ. पण त्यासाठी शारदा
बाईला राजी करावे लागेल. तरच आपले  काम फत्त
होईल. त्यानंतर त्यांनी शारदा बाईशी या संबंधी चर्चा केली
तर  शारदा बाई  त्या चोघा सोबत खंडाळ्याला जायला अजिबात तयार नव्हती. जसे त्यांनी जास्त पैशांचे लालच दाखविले तेव्हा कुठं ती खंडाळ्याला जायला तयार झाली.

       एक महिन्यानंतर पाळी चुकली तेव्हा ती डॉक्टराना जाऊन भेटली. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले
की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. तपासणीसाठी मात्र प्रत्येक
महिन्याला इस्पितळात यावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर खंडाळ्याला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. प्रेम लिला, माधवी आणि त्यांच्या सेवेसाठी
शारदा बाईंना खंडाळ्याला जावे लागणार होते.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..