Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र ४

षड्यंत्र ४
षड्यंत्र ४

 


   " मग असं समजा की आता तुमच्या मुलीचे सुख आणि
दुःख माझ्या जीवनाशी जोडले आहे, मी सुखी तर तुमची
लेक सुखी आणि मी दुःखी तर तुमची लेक दुःखी असेल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या जीवनात दुसरी
कदापि येणार नाही. मग मला मूल होवो अथवा न होवो !"
त्यावर राधाबाई एकदम खुश होत म्हणाला," इतकं जर
तुमचं माझ्या मुलीवर प्रेम आहे तर मला दुसरे काहीच
नकोय. असेच आनंदित रहा सुखी रहा." असा त्यांनी
आशीर्वाद दिला.

आता इथून पुढे
   

  विषय बदलण्याच्या इच्छेने लिला ने विचारले," आई , बाबा कुठं आहेत गं ? दिसत नाहीत ते मघापासून."
   " अगं तुझे बाबा या वेळी घरी असतात का ?"
  " हो ; विसरलीच खरं ! " लिला एकदम ओशाळून म्हणाली," कधी येतील बाबा, ऑफिस मधून."
    " तसा यायचा टाईम झालाच आहे, पण तरी ही फोन
करून विचारते. मीटिंग वगैरे असली तर उशीर होतोय
त्याना यायला ?"
   " आणि दादा, नाही. सॉरी दादा तर ऑफिसमध्येच बाबा सोबतच असेल. नाही का ?"
   " नाही. ते शॉपिंग करायला गेलेत उद्यासाठी !"
   " उद्या काय आहे ?" लिला ने विचारले.
   " उद्या मकरसंक्रांत नाही का ?"
   " अरे हो विसरलेच मी ! आज भोगी आहे, मग आम्हांला
आजच घरी जायला हवं."
    " थांब. मी फोन करून विचारते त्याना कुठं आहे ते."
असे म्हणून त्यांनी लगेच मोहन रावांना फोन केला. मोहन
रावांनी कॉल रिसिव्ह केला आणि विचारले," हां , बोल राधा काही आणावयाचे आहे का येताना  ?"
   " आणायचे काही नाहीये. जावई आणि तुमची लेक आली आहे . तेव्हा लवकर घरी या. वाट पाहताहेत ते दोघेही "
    " बसवून ठेव त्याना आलोच मी !" असे बोलून मोहन रावांनी फोन कट करून आपल्या हातातील रिसिव्हर खाली ठेवला नि टेबलावरील  बेल चे त्यांनी बटन दाबलं. तसा थोड्याच वेळात तेथे प्युन  आला नि त्याने विचारले,
  " मे आय कम इन सर !"
  " येस. पाया जवळ ठेवलेली ब्रिफकेश उचलून त्याच्या
हातात देत ते पुढे म्हणाले ," ही माझी ब्रिफकेश गाडीत नेऊन ठेव. मी घरी चाललोय तेव्हा  मी गेल्यावर माझी केबिन बंद कर ." असे म्हणून त्यांनी मेज चा खण उघडला नि त्यातून मोटार ची किल्ली घेतली नि घाईघाईने केबिन
मधून बाहेर पडले. ड्रायव्हर ने त्याना पाहताच मागील
डोअर ओपन केला. मोहन राव मोटार मध्ये बसताच त्याने
डोअर बंद केला....दुसऱ्या बाजूला जाऊन पुढील डोअर
ओपन करून ड्रायव्हर सीट वर बसून सेफ्टी बेल्ट लावला
नि मोटार स्टार्ट केली.

     राज आणि अनया शॉपिंग करून मॉल मधून बाहेर पडले. हातात शॉपिंग केलेल्या वस्तूंच्या थैल्या होत्या.
मोटार पार्किंग केलेल्या जागी आले. राज ने मोटार चा
मागील डोअर ओपन केला नि शॉपिंग च्या थैल्या मागे
ठेवल्या. त्यानंतर डोअर बंद करून पुढील डोअर उघडला.
अनया आंत बसली. तसा त्याने दरवाजा बंद करून घेतला
नि पुढून दुसऱ्या बाजूला जाऊन ड्रायव्हर साईडचा डोअर
ओपन करून आंत बसला. सेफ्टी बेल्ट लावला नि गाडी
स्टार्ट केली. मोटार पार्कींग मधून बाहेर काढून मुख्य द्वार
जवळ आली. सिक्युरिटी ने गेट पास पाहून माल चेक
केलं आणि मोटार ला बाहेर जाऊ दिले. गाडी हायवे रोड
आली मात्र नि मोबाईल ची बेल वाजली. राज चे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर जाताच मॉम नाव दिसले त्याने
लगेच फोन रिसिव्ह केला. बोल मॉम का फोन केला ?"
   " कुठं आहेस तू ?"
   " आम्ही गाडी मध्ये आहोत नि गाडी रस्त्यामध्ये आहे."
   " किती वेळ लागेल यायला."
   " पाच मिनिटं लागतील. का गं ?"
   " अरे, तुझी बहीण आली आहे , तुझ्या भाऊजी संग ."
   " मग चांगलं झालं, बसवून ठेव त्याना. आम्ही पोहोचतोच थोड्या वेळात."
   " काय हो कोण आलंय आपल्या घरी ?"
   " लिला आली आहे , भाऊजी सोबत."
   " मग काय ते लगेच जाणार आहेत ?"
   " बहुतेक म्हणून तर मॉम ने फोन केला ना ?"
   " हूं !" अनया उद्गारली आणि थोड्याच वेळात त्यांची
मोटार त्यांच्या बंगल्या समोर पोहोचली. सुमित  राज चा
छोटा मुलगा वय तीन वर्षे ! मुला सोबत बाहेर खेळत होता. आपल्या आई-वडिलांना पाहून पळत त्यांच्या जवळ आला नि विचारू लागला की मॉम डॅड काय आणलेत माझ्या साठी ?"
   " ते नंतर सांगतो, तू इथं काय करतो ?"
   " खेळत होतो दोस्ता सोबत."
   " तुझी आत्या आली आहे ना ?" तसा तो खुश होत
म्हणाला," आत्या आली आहे...असे बोलून तो आपल्या आजूबाजूला पाहून नंतर मोटार मध्ये वाकू पाहत म्हणाला," कुठं आहे."
   " अरे इथं गाडीत नाहीये."
   " मग ?"
   " घरांमध्ये आहे." असं म्हणताच तो धावत सुटला...
राज म्हणाला ," अरे धावू नकोस पडशील " पण तो कसला ऐकतोय गेला पळत. तसा राज त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहत स्मित हास्य केलं. मागच्या सीट वर ठेवलेल्या
थैल्या घेतल्या नि डोअर बंद करून रिमोट ने मोटार लॉक केली आणि निघाले. सुमित पळतच गेला नि आत्या ला
बिलगला. तसे लिला ने त्याला आपल्या हृदयाशी धरत
म्हटलं ," अरे, सोन्या कुठं होता तू ?" तसा तो तोताऱ्या
आवाजात म्हणाला," मी ना बाहेर खेळत होतो."
   " हो का ? आणि तुझा दादा कुठं आहे ?"
  " कोण समीर दादा ?"
  " हां !"
  " तो ट्युशन ला गेलाय." पाठीमागून अनया चा आवाज
आला. तसं लिला ने आपली मान वळवून त्या दोघांकडे
पाहिले. राज आणि अनया समोरून येत होते. त्या दोघांना
पाहून लिला म्हणाली," मकरसंक्रांत ची शॉपिंग झाली वाटतं." अनया उद्गारली," हो !" असे म्हणत च हातातील
थैल्या समोर टेबलवर ठेवल्या आणि लिला कडे पाहत
म्हणाली," वन्स बसा तुम्ही मी आलेच फ्रेश होऊन."
राज लिला आणि प्रेम च्या समोर बसत म्हणाला," भाऊजी
कसे आहात तुम्ही ?"
   " एकदम फाईन ! " प्रेम उद्गारला.
   " परंतु आमच्या बहिणीचा चेहरा आम्हाला उदास दिसतोय का बरं ?"
    " ते आता तुम्हीच विचार, तुमची बहीण आहे ना ती."
    " माझी बहिण जरूर आहे , पण राणी तर तुमची आहे
ती , राजाला माहीत असायला की आपल्या राणी ला दुःख
आहे ते."
    " दुःख तर माहीत आहे, परंतु त्यावर चा उपाय सापडत
नाहीये अजून."
    " असा कोणता आजार आहे की ज्याचा उपाय नाहीये."
    " नाही. उपाय आहे ;परंतु कोणता उपाय करायचा यावर
अजून एक मत होत नाहीये. म्हणून आम्ही दोघांनीही
ठरविले आहे की इतरांचा ही सल्ला घेऊ."
   " असं असेल तर आम्हांला तुमची समस्या सांगा आम्ही
देखील उपाय शोधण्यास तुमची मदत करू."
    " म्हणूनच आम्ही आलोय तुमच्याकडे."
   " असं असेल झटपट समस्या सांगा आम्ही त्यावर उपाय
शोधण्याचा प्रयत्न अवश्य करू." त्यानंतर प्रेम ने सविस्तर
हकीकत सांगून टाकली. त्यावर राज असं कसं होऊ शकतं
आमच्या लिला ची तर पहिली डीलव्हरी झाली आहे. तिला
एक बाळ देखील झालं होतं. दुर्दैवाने ते बाळ आज जिवंत
नाहीये. परंतु परत बाळ होणारच नाही हे कसं होऊ शकतं.? तुम्ही डॉक्टराकडून तपासणी करून घेतली काय ? "
    " आता तिकडूनच  तर आलोय." प्रेम उद्गारला
    " घरच्यांना माहीत आहे का हे सर्व ?"
    " अजून नाही. फक्त आम्हां दोघांनाच माहीत आहे."
    " मग हरकत नाही. आपण काढू काहीतरी उपाय यावर." राज उद्गारला.
     तेवढ्यात मनोहर राव पण आले. त्याना पाहून प्रेम
लिला उठून उभे राहिले. तसे मनोहर राव म्हणाले,
   " तुम्ही दोघेही का उठले ?" तसे ते दोघेही पुढे सरकले
नि त्यांनी मनोहर रावांचे चरणस्पर्श केले. मनोहर रावांनी
सुध्दा त्या दोघांना आशीर्वाद देत म्हणाले," आयुष्यमान व्हा !" तशी राधाबाई म्हणाल्या ," पुत्रवती भव ! तरी
आशीर्वाद द्यायचा होता, पोरीला."
   " पुत्र काय माझ्या आशीर्वाद शिवाय ही होईल." असे
म्हणताच लिला चे डोळे अश्रू नि भरुनी आले. तिच्या
डोळ्यातील अश्रू पाहून मनोहर रावांच्या मनात शंकेची
पाल चुकचुकली. ते समजून गेले की काहीतरी प्रॉब्लेम आहे , परंतु न समजून त्यांनी विचारले," तुझ्या डोळ्यात अश्रू ! तुझ्या सर्व मंडळी क्षेमखुशल तर आहेत ना ?"
   " हो सर्व मंडळी एकदम क्षेमकुशल आहेत."
   " मग तुझ्या डोळ्यात अश्रु का ?"
   " नाही असंच ते."
   " असेच कसे ? माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस
ना ?"
    " थांबा. मी सांगते."
    " ओह ! म्हणजे तुला देखील माहीत आहे तर !"
    " म्हणजे काय  मला माहित असणारच ना , मी आई आहे तिची ! कोणतंही मूल आपलं दुःख प्रथम आपल्या आईलाच सांगते. बापाला नाही."
    "  हो का ? मग  सांग बरं ! "
    " सांगते ऐका." असे बोलून त्यांनी लिला सांगितलेले जसे च्या तसे मोहन रावांना ऐकवले. ते ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर उदासी पसरली. ते उदासपूर्ण स्वरात म्हणाले,
   "  म्हणजे आमच्या लेकीच्या आयुष्यातील दुःख अजून
संपलेले नाही तर , असेच ना . अरे परमेश्वरा , माझ्या लेकीच्या आयुष्यात कधी सुख येणारच नाहीये का ?
तिनं जगायचं तरी कसं ? आणि कोणाकडे पाहत जगायचं ? एवढा निष्ठुर कसा रे झालास तू  तिच्या बाबतीत ? "
     त्यावर प्रेम म्हणाला," बाबा, तुम्ही चिंता करू नका.
आम्ही त्यावर एक उपाय शोधून काढला आहे."
    "  काय उपाय शोधून काढला आहे ?"
    " अनाथालय मधून एक दत्तक मूल घ्यायचे नि आपल्या
मुला प्रमाणे त्यांचं लालनपालन करायचं."
     " त्या पेक्षा सरोगेट का नाही शोधत."
     " पण तिचा तरी काय  भरवसा द्यावा. मूल जन्माला
आल्यावर त्या द्यायला तयार होत नाहीत मूल द्यायला. न सांगता गुपचूप पळून जातात कुठंतरी !"
       " असं कोणाला पण सरोगेट बनवायचं नाही काही ! काहीं महिला सरोगेट मदर चा  पेशा करतात. अशीच एकादी शोधायची बाई ! त्यांचं कामच आहे, त्या पळून
जात नाहीत कुठंही !"
    " पण अशी महिला शोधायची कुठं ?"
    " शोधायला कशाला पाहिजे वृत्तपत्रात जाहिरात द्यायची बस्स !"
   " वाहवा ! म्हणजे जाहिरात द्यायची ! अश्या गोष्टीची
कुणी जाहिरात करतात का ?" राधा बाई उद्गारल्या.
    " मग एकादी गरीब मुलगी बघायची नाहीतर मग एखादी वेश्या !"
   " काहीतरीच काय बोलता ?" राधाबाई उद्गारल्या
   " नाहीतर मग कुणी नातेवाईक किंवा एखादी घरातीलच
स्त्री हे काम करायला तयार असेल तर !"
   " तुम्ही ना, काहीच बोलू नका. कारण तुम्ही काही पण
बोलत असता."
   " बरं राहिलं आम्हांला काय त्याचं."
   " का ? लिला तुमची लेक नाही ?"
   " लेक आहे, म्हणूनच तर अनेक उपाय सुचवले पण
तुम्हा लोकांना त्यातला एक पण उपाय मान्य नाही तर
मी काय करू शकतो ? ते तूच सांग बरं."
    वाद घालायला लागलेले पाहून लिला मध्येच म्हणाली, " तुम्ही आधी दोघे पण शांत रहा पाहू ! उगाच
वाद घालू नका. कारण आम्ही घेत असलेला निर्णय आमच्या घरच्यांना पण तर मान्य झाला पाहिजे. ना ?"
   " एकदम बरोबर बोललीस तू राधा आपण आधी असं
करू की अगोदर आपण आपल्या घरी जाऊ नि आई-बाबा ह्यांच्या समोर हे प्रपोजल ठेवू त्याला जर मान्य झालं तर पुढचा विचार करता येईल. कसं ?" प्रेमचा  युक्तिवाद सर्वांना पसंद पडला.

     क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..