षड्यंत्र १३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र १३ |
तशी माधवी मनात म्हणाली ," खरंय , लिला
असं करु शकत नाहीये, पण मी तर करू शकते ना ? हे
तुला कुठं माहीत आहे, तुझा असाच विश्वास राहू दे
माझ्यावर. तेव्हाच मी तुझ्या ह्या विश्वासाचा गैर फायदा
घेऊ शकते. पण त्यासाठी मला काहीतरी मोठे प्लॅन
करावे लागणार, हरकत नाही. करेन तेही करेन म्हणा.
पण सध्या माझं नाव गुप्तच राहायला पाहिजे की मी इथं
कशासाठी आली आहे ?" लिला देखील विचारमग्न झाली
की कोणतं खरं मानावं ? शारदा बाई सांगत होते ते खरं
मानावं का ? का माधवी जे सांगत आहे ते खरं मानावे ?
काहीच कळत नाहीये.
पुढे
प्रेम म्हणाला," पाहिलंस लिला माधवी काय म्हणाली ती
तिने आपली चूक कबूल केली. स्वतःची चूक कबूल करायला पण मोठे मन लागते. आणि ते तिच्यापाशी आहे,
हे तिने सिध्द केलं. तेव्हा तिच्या विषयी तुझ्या मनात काही गैरसमज असेल तर तो दूर कर. कारण तू समजत आहेस तशी ती नाहीये आणि खरं सांगायचं तर तिचं माझ्यावर असलेले प्रेम तिला हे करायला भाग पाडत आहे. नाहीतर कोणतीही कुमारिका सरोगेसी बनायला तयार होणार नाहीये."
" जाऊ दे रे , एवढं काय तिला ऐकवतो आहेस, तिच्या
जागी जरी मी असती तर मी देखील तिच्या प्रमाणेच वागले असते. कारण प्रत्येक स्त्री मध्ये दुसऱ्या स्त्री विषयी
असेच भाव असतात रे, त्यामुळे उगाचच तिला दोष देऊ
नकोस."
" बघितलेस ना, तुझी बाजू घेऊन माझ्याशी कशी भांडत आहे ती , आणि तू तिच्या विषयी फार वाईट विचार करते आहेस. परंतु ती खरंच माझी चांगली मैत्रीण आहे." लिला ला प्रश्न पडला की खरंच ही चांगली आहे का ? का फक्त चांगल्या पणाचे नाटक करत आहे. खरं काय आहे, हेच कळत नाहीये. परंतु या क्षणी तरी तिची माफी मागायला हवी नाहीतर प्रेम ला फार वाईट वाटायचे. असा विचार करून तिने माधवी ची माफी मागितली. तेव्हा माधवी देखील प्रेम समोर असं काही जाहीर करते की आपण लिला च्या वक्तव्याचे अजिबात वाईट वाटून घेतले नाहीये. हे जाहीर करताना ती इतकंच म्हणाली," इट्स ओके रे ! माफी मागायची काही गरज नाहीये. मैत्री मध्ये या सर्व गोष्टी होतच असतात. तेव्हा मला अजिबात वाईट वाटलेले नाहीये." असे बोलून आपले काम फत्ये झाले. असा अभिर्वाव करत उद्गारली," बरं येते मी !" असे म्हणून
त्यांच्या बेडरूम मधून बाहेर पडली आणि,
माधवी आपल्या बेडरूम मध्ये आली नि लिला वर आपला राग व्यक्त करत म्हणाली," माझं सारं प्लॅन या
लिला ने उध्वस्त केलं. आता काय करू ? ज्या हेतूने मी
हे सारे केलं ते तर आता साध्य करता येणार नाही. कारण
माझ्या मनात काय आहे, हे अगोदरच लिला ने प्रेम समोर
जाहीर केलं. आता जर आपल्या प्लॅन प्रमाने प्रेम च्या
जवळ जर आपण जाऊ लागलो तर प्रेम ची नक्कीच खात्री होईल की हा सारा डाव स्वतः मीच घडवून आणला. मग तो माझ्या जवळ येण्या ऐवजी माझ्या पासून दूर जाईल आणि हे मला अजिबात चालणार नाहीये. म्हणून थोडे दिवस का होईना आपलं हे प्लॅन स्थगित
करायलाच हवे आहे , आणि खरे सांगायचं झालं तर यातच आपलं सर्वांचे हित आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. ती ही की माझ्या मनात काय प्लॅन शिजलंय हे
लिला ला कसं कळलं ? नाही म्हणजे , मी तिला घटस्फोट
घ्यायला भाग पाडणार हे फक्त माझ्या मनात होतं. तिला
कसं समजलं ? ती मनकवडी तर नाही ना ? छे छे छे ! लिला मन कवडी तर अजिबात नसेल, कारण असं असतं तर तिने अगोदरच ओळखले असते की आपण तिच्या बाळाची सरोगेसी बनायला का तयार झाली आहे ते. मग तर अगोदरच तिने नकार देऊन टाकला असता. ती मन कवडी तर अजिबात नाहीये हे तर सिध्द झालंच आहे, परंतु तरीही एक प्रश्न पडतोच मनाला की असं नाहीये तर मग तिला समजलं कसं , माझ्या मनात काय आहे नि मी इथं म्हणजे ह्या घरात कशासाठी आली आहे ते ? काही असो पण या पुढे आपल्याला पुढची पाऊले फार जपून टाकायला पाहिजे. नाहीतर आपल्याला ह्या घरातून कायमचे जावे लागेल. पण असं काय करू ? म्हणजे माझा हेतू साध्य होईल ? असा विचार करत असतांनाच तिच्या दरवाजावर कोणीतरी नाँक केलं. तशी ती दचकली नि पट्कन मागे वळून तिने पाहिले. परंतु समोर सुंदर राव ना पाहून तिच्या मनातील भीती थोडी कमी झाली नि चेहऱ्यावर स्मित हास्य जाहीर करत म्हणाली, " या काका आत या !" सुंदरराव आंत येत म्हणाले, " मी तुझा काका नाही पोरी , मला बाबा म्हण !"
" हो ; पण कुणी ऐकलं तर !"
" इथं कोण येतंय ऐकायला."
" भिंती ला पण कान असतात बाबा. म्हणून मी जोपर्यंत
मी ह्या घरातून लिला ला बाहेर काढत नाही आणि तुमची
पर्मनंटली सून होत नाही, तोपर्यंत मी सर्वांसमोर तुम्हांला
काका च म्हणेन."
" हो; पण इथं आपण दोघेच आहोत ना , हे कसं विसरतेस तू ?"
" मी नाही विसरले काहीही ! परंतु आपली चाल जरा
उलटी पडली."
" म्हणजे ?"
" प्रेम चा लिला वर फार गाढ विश्वास आहे, तो इतक्या सहजी तुटणार नाहीये. म्हणून थोडा धीर धरायला हवा.
नाहीतर सर्व प्लॅन फेल होईल. "
" तू काही काळजी करू नकोस मी सर्वकाही ठीक
करीन. तू फक्त हो म्हण. म्हणजे पुन्हा सरोगेसी करण्याचा
विचारणा केली जाईल तेव्हा मी कसं ही करून प्रेम ला
राजी करीन. तू अजिबात चिंता करू नकोस त्याची !"
असे म्हणून ते आपलं पुढचं प्लॅन सांगतात . त्यावर ती एकदम खुश होऊन म्हणाली," बाबा, आपण तर माझ्या मनातलं बोललात. खरंच असं झालं तर सोन्याहून पिवळे होईल."
" अगदी तसेच होणार , तू फक्त आपली तयारी ठेव."
" अहो,बाबा त्या साठी तर मी कधीही तयार आहे. परंतु
जसा आपण विचार करत आहोत तसं होईल ना ?"
" निश्चितच होईल. तुझ्या ह्या सासऱ्यावर विश्वास ठेव.
बस्स !"
" विश्वास ! अहो, बाबा जेवढा माझा स्वतःवर विश्वास
नाही तेवढा विश्वास तुमच्यावर आहे." माधवी उद्गारली.
" बस्स तर मग , पुढचं माझ्यावर सोड. येतो मी."
असे म्हणून सूंदर राव तेथून बाहेर पडले. माधवी मात्र
भावी जीवनाचे स्वप्न पाहण्यात दंग झाली.
प्रेम ने जेव्हा तिला विचारले की, मग पुन्हा सरोगेसी
करायला तयार आहेस ना तू ? " त्यावर माधवी ने क्षणाचा
ही विलंब न करता म्हणाली," मी तयार आहे त्यासाठी !
पण माझ्या एक विचार आला जर तुझी परवानगी असेल
तर सांगते." त्यावर प्रेम हसून म्हणाला," अग त्यात परवानगी कसली मागतेस, तुझ्या मनात जे आहे ते पट्कन सांगून टाक बरं. म्हणजे काय पुढचा निर्णय घेण्यास फार सोपे जाईल. म्हणून सांगून टाक तुला जे
सांगायचं आहे ते." त्यावर माधवी म्हणाली ," मी काय म्हणते ते अगोदर समजून घे , आणि जर पटलं तरच त्या गोष्टीला होकार दे . माझी काही जबरदस्ती नाही तू हे करच असं."
" बरं. काय सांगायचं तुला ते सांग बरं. म्हणजे मला
देखील त्यावर विचार करता येईल नि पटलं तरच मी हो
म्हणेन."
" ओके !" प्रेम उद्गारला. त्यानंतर माधवी ने त्याला
सांगितले की डॉक्टर द्वारा सरोगेसी करण्यापेक्षा आपण
दोघांनी पती-पत्नी सारखे शारीरिक संबंध केले तर त्यात
वावगं काय आहे ? म्हणजे असं पण मला तुझ्या बाळाची
आई व्हायचेच आहे आणि तसे पण आपण दोघेही पती
पत्नी आहोतच त्यामुळे ते अनैतिक आहे, असं ही म्हणता
येणार नाहीये. म्हणजे असं कुणीही म्हणू शकणार नाही.
भले आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, आणि एक वर्षासाठीच आहे. एकदा आपल्याला बाळ झालं की मी
तुम्हां दोघांच्या जीवनातून कायमची निघून जाईन. आणि
खास करून मला तुझ्याशी शारीरिक संबंध करण्यास
काहीच आपत्ती नसेल तर तुला ती असण्याची गरज आहे
असे मला वाटत नाही. आता तुझं मत सांग. म्हणजे जर
तुला माझं म्हणणं पटत नसेल तर आपण दुसरा उपाय
पण करू शकतो सरोगेसी वाला ? बघ तुला काय पटतंय
ते." माधवी मुद्दाम असं म्हणाली. तिला माहीत होतं की
प्रेम या गोष्टीस नकार देणार नाही. कारण कोणताही पुरुष
आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसरी कोणतीही स्त्री उपभोगायला मिळत असेल तर तो थोडाच नाही म्हणणार
आहे , कारण ती त्याच्यासाठी सुवर्णसंधी असेल. नाही का ? आणि झालं ही तसंच प्रेम लगेच तयार
झाला. म्हणजे त्याला वाटलं की काय हरकत आहे, डॉक्टर तर्फे आपलं बीज तिच्या गर्भात सोडण्या पेक्षा
डायरेकली शारीरिक संबंध केलेले काय वाईट आहे. तसा
पण एक वर्षाचा तर प्रश्न आहे ? मग ती जाईल आपल्या
मार्गाने आणि मी जाईन आपल्या मार्गाने. म्हणजे आपल्या
लिला पाशी लिला ला एकदा मातृत्व लाभलं की आपलं
कर्तव्य संपलेच समजा. परंतु लिला रागावणार तर नाही ना ? नाही मग असं करतो तिच्याशी एकवेळ बोलून पाहतो. मला कल्पना आहे, लिला ह्या गोष्टीस अजिबात
आपली संमत्ती देणार नाही. लिला सांगावे की नाही सांगावे ? काहीच कळत नाहीये. नको. त्या पेक्षा आधी
केले नि मग सांगितलं. फार तर तिची माफी सांगायची. दुसरे काय ? आणि बायका आपल्या नवऱ्याला नेहमी माफ करतच असतात. मग तो कितीही वाईट असला तरीही ! असा विचार करून शेवटी प्रेम माधवी च्या म्हणण्या प्रमाणे करण्यास तयार झाला. आणि दोघेही एक झाले. माधवी ला जे हवं होतं ते प्राप्त झालं. मग ती त्याला
म्हणाली ," जोपर्यंत माझी मासिक पाळी चुकत नाही
तोपर्यंत आपला हा प्रयत्न सुरूच ठेवायला लागेल. बरं
का ?" त्यावर त्याने न समजून विचारले की, ते का बरं ?"
ती म्हणाली," पहिल्याच प्रयत्नात मी प्रेग्नंट राहीन असं
नाहीये ना ?"
" मग हे तू अगोदर नाही का सांगायचं मग आपण
सरोगेसीच केली असती ना ?" प्रेम म्हणाला. माधवी
म्हणाली," काय फरक पडतो म्हणते मी एकदा केलेली
गोष्ट पुन्हा पुन्हा केली तर ! नाही म्हणजे त्यात दोघानाही
आनंदच प्राप्त होणार आहे ना त्याने ? आणि त्यात तुझं
काहीच नुकसान नाहीये. झालंच तर माझंच नुकसान आहे.
कारण शील माझं भ्रष्ट होणार आहे. तुझं काही जाणार
आहे का त्यात ? म्हणून पाप पुण्यांचा तू विचार करू नकोस. जे सुरू आहे तसेच पुढे सुरू आहे." प्रेम ला ही
तिचं म्हणणे पटले. मग काय एकदाच नाही तर अनेकदा त्या दोघांनी शारीरिक संबंध केले. पण म्हणतात पाप
जास्त दिवस लपत नाही. एक ना एक दिवस ते येतेच
सर्वांसमोर. त्यांचं ही तसेच झाले. म्हणजे झालं असं
की लिला ला मध्येच जाग आली तिने आपल्या बाजूला
चाचपून पाहिलं तर बाजूला प्रेम नाही. इतक्या रात्री
प्रेम गेला कुठं ? असा विचार करत असतानाच प्रेम
दरवाजा उघडून आंत आला तेव्हा त्याला पाहून तिने
विचारले की, प्रेम कुठं गेला होता तुम्ही ?" लिला च्या
या प्रश्नाने प्रेम गडबडलाच पण लगेच स्वतःला सावरत
म्हणाला" नाही कुठं ? झोप येत नव्हती म्हणून जरा
चांदण्यात फिरत होतो."
" मग मला उठवायचं नाही का ? मी पण आले असते
ना सोबत ?"
" मी म्हटलं की, तुला शांत झोप लागली आहे तर
कशाला उगाच त्रास द्यायचा म्हणून नाही उठविले तुला ."
" त्यात कसला आला आहे त्रास ? उलट दोघांनाही
चांदण्यात फिरताना मजाच आली असती."
" हो का ? मग पुढच्या वेळी उठविन हं तुला ? झोप
आता ."
" हो तुम्ही ही झोपा." तसे त्याने तिला आपल्या मिठीत
घेतले. ती वेळ तर निघून गेली. पण म्हणताना एकदा ज्या
ज्या गोष्टीची सवय झाली की ती सहसा सुटत नाही. तसेच
प्रेम च्या बाबतीत ही प्रेम रोज रात्री उठून जात होता. ते
पण लिला ला न सांगता चोर पावलांनी तिच्या बेडरूम
मधून बाहेर पडायचा. मग लिला ला ही संशय आला नि
तिने त्याच्यावर पाळत ठेवली. झोपेचे नुसते सोंग करून
राहिली. प्रेम ने एक दोन वेळा हांक मारून पाहिलं पण
तिने काही आवाज दिला नाही.किंवा जागी देखील झाली
नाही. म्हणून मग त्याची खात्री झाली लिला गाढ झोपेत
आहे म्हणून मग तो हळूच पंलगावरून खाली उतरला
नि चोर पावलांनी बाहेर गेला. तो जसा बाहेर गेला तशी
लिला उठली नि प्रेम कुठं जातोय ते पाहू लागली. प्रेम
सरळ माधवी च्या बेडरूम जवळ गेला नि एकवेळ त्याने
आपल्या आजूबाजूला वळून खात्री करून घेतली की
आपल्याला कुणी पाहत नाही. आणि मगच तो तिच्या
बेडरूम मध्ये शिरला. माधवी त्याची वाटच पाहत होती.
आंत शिरताच त्याने दरवाजा बंद करून घेतला. तसा
बाहेरून लिला ने दरवाजा ला कडी घातली आणि आपल्या बेडरूममध्ये येऊन झोपली. ह्या दोघांचा कार्यभाग आटोपल्यावर प्रेम दरवाजा उघडू पाहतो तर
दरवाजा बाहेरून बंद. हे जाणवताच त्याची पाचर धारण
बसली. दरवाजा कुणी बंद केला ? लिला ला तर कळलं
नाही ना ? असा विचार मनात येताच त्याच्या पाया खालची जमीन सरकल्याचा भास झाला त्याला. तेव्हा
माधवी ने विचारले," काय झालं प्रेम ?"
" अगं दरवाजा कोणीतरी बंद केला बाहेरून." हे ऐकून
तर माधवी ला फार अत्यानंद झाला. परमनंट ली आपल्याला जसं हवं होतं तसंच घडलं. पण तसे न दाखविता ती म्हणाली," काय सांगतोय काय ? खरंच की
काय ?"
" अगं खरंच सांगतोय मी !"
" अरे देवा ! आता काय करायचं ?"
" अगं मला काही सुचेनासे झालंय."
" काही काळजी करू नका. आपण काही उपाय काढू ?" इतक्यात बाहेरून कोणतरी दरवाजा उघडल्याचा
आवाज झाला. तसे प्रेम ने लपण्याचा प्रयत्न केला. पण
लपणार कोठे ? म्हणून शेवटी दरवाजा मागे लपला. तशी
लिला आंत येत म्हणाली," कोठे आहेत ते ?"
" तू कोणा बद्दल विचारते आहेस ?"
" तुला माहीत नाही मी कोणाबद्दल विचारते ते." त्या
दोघी बोलत आहेत आपल्या कडे कुणाचा लक्ष नाही असा
विचार करून प्रेम हळूच पळण्याचा प्रयत्न करत असतो.
एवढ्यात त्याच्या कानावर लिला चे स्वर पडले तसे त्याच्या पायांना ब्रेक लागला. लिला म्हणाली," प्रेम
पळण्याचा व्यर्थ प्रयत्न करु नका. कारण ह्या बेडरूम
मध्ये तुम्हाला येताना प्रत्यक्ष पाहिले होते म्हणूनच बाहेरून
कडी लावून घेतली जेणेकरून तुम्हां दोघांचे पाप माझ्या
व्यतिरिक्त अन्य कोणी पाहू नये हाच त्या मागचा हेतू होता.
तेव्हा पळू नका समोर या असे." प्रेम एकदम खजील झाला होता. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. लाजेने
त्याने आपली मान खाली घातली होती. तशी लिला
म्हणाली," आता मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये.
सकाळी बोलू या संबंधी. चला माझ्या सोबत." असे बोलून
लिला माधवी ला काही न बोलता तेथून निघाली. तसा प्रेम
देखील निमूटपणे तिच्या मागोमाग निघाला. आपल्या
बेडरूम आल्यानंतर लिला ने एक उशी उचलली नि एक
चटई नि जमिनीवर अंथरली नि त्यावर झोपली. प्रेम समजून चुकला की लिला आपल्यावर फार रागावली आहे. परंतु तो तिची समजूत काढू शकला नाही. त्याने
आपली चूक कबूल केली. तेव्हा लिला म्हणाली," नकळत
जी गोष्ट घडते तिला चूक झाली असे म्हणतात. पण जी
गोष्ट जाणूनबुजून केली जाते तिला चूक नाही अपराध
म्हणतात. आणि तुम्ही फार मोठा अपराध केला आहे.
माझा विश्वास तुम्ही तोडला आहे, तेव्हा त्या अपराधाची
शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. तेव्हा आता शांत झोपा
सकाळी त्याचा निर्णय होईल. नाईलाजाने प्रेम पलंगावर
जाऊन झोपला. सकाळ होताच लिला कुणाला काही न
सांगता आपल्या माहेरी निघून गेली. प्रेम ने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती नाही ऐकली. सरळ निघून गेली माहेरी !
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा