Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र ५

 

षड्यंत्र ५
षड्यंत्र ५



   " एकदम बरोबर बोललीस तू राधा आपण आधी असं
करू की अगोदर आपण आपल्या घरी जाऊ नि आई-बाबा ह्यांच्या समोर हे प्रपोजल ठेवू त्याला जर मान्य झालं तर पुढचा विचार करता येईल. कसं ?" प्रेमचा  युक्तिवाद सर्वांना पसंद पडला.

आता इथून पुढे

    सुंदर रावांना माहीत होतं रिपोर्ट मध्ये काय येणार आहे
ते. कारण त्यांचे तर ते प्लॅन होते. त्यांचे प्लॅन यशस्वी झालं
होतं त्यांनी जे सांगितलं होतं तेच डॉक्टर ने केले होते. म्हणून डॉक्टर ने फोन करून कल्पना दिली होती की आपण सांगितले होतं त्या नुसार केलं आहे, आणि त्या
दोघांचा विश्वास देखील बसला आहे. आता पुढे जे काय
करायचं आहे, ते तुमचं तुम्ही बघा." त्यावर सुंदर रावांनी
त्याना आश्वासन देत म्हटलं की, तुम्ही चिंता करू नका.
पुढचं काम आहे ते मी एकदम व्यवस्थित पार पाडीन."
असे सांगून ते एकदम निश्चिंत मनाने सुस्कारा सोडतात.
ते स्वतःवर इतके खुश पहिले कधीच दिसले नव्हते. परंतु
आपली ही खुशी कुणासमोर जाहीर करू शकत नव्हते.
कारण एकच तर होता त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून
चालणारा आणि तो म्हणजे सुधीर ...आज सुधीर या जगात नाहीये. परंतु त्याला दुसऱ्या जगात पोहोचविणारा
मात्र जिवंत आहे आणि माझी मजबुरी ही आहे की तो
माझ्या डोळ्यासमोर असूनही त्याला मारू शकत नाही.
कारण त्याला मारायला गेलो तर प्रेम आपल्या पासून
दुरावेल आणि मुख्यता तेच मला नकोय. परंतु जिच्यामुळे
हे सारे घडले तिला मी सुखाने जगू देणार नाही. ती जिवंत
तर राहील परंतु जीवनभर मातृत्व या सुखा पासून वचिंत
राहील ती हीच तिच्यासाठी मी ठरविलेली शिक्षा आहे. असा विचार ते आपल्या मनात करतच इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असतात. इतक्यात तेथे मधुरा बाई आल्या नि आपल्या पतीला असं इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असलेले पाहून त्यांनी सुंदर रावांना विचारले की,  
  " का हो ? काय झालं ? एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय " त्यावर सूंदर राव म्हणाले," अगं काय सांगू तुला प्रेम आणि सुनबाई ज्या डॉक्टर कडे होते ना, त्या डॉक्टरांचा मला आता फोन आला होता."
   " बरं, काय म्हणाले डॉक्टर ?"
   " बातमी अशुभ आहे."
   " अशुभ म्हणजे  ? काय ...डॉक्टर काय सांगितलं ?"
   " डॉक्टर , काय सांगितलं हे जर तू ऐकशील तर तुझी
ही तीच अवस्था होईल. जशी माझी झाली आहे."
    " असं काय सांगितले डॉक्टर ने ? ते सांगा ना ?"
    " आपली सुनबाई कधीच आई होऊ शकणार नाही."
    " असं कसं होईल बरं एकवेळ आई झाली सुध्दा आहे ती. मग पुन्हा का नाही होणार ?"
    "  डॉक्टरांचे म्हणणे आहे की पहिल्या बाळंतपणाच्या वेळी डॉक्टरांकडून काहीतरी गफलत होऊन तिच्या गर्भ
शयाला इजा झाली आहे, त्यामुळे ती आता कधीच आई
होऊ शकणार नाही."
   " त्यावर उपाय नाहीये का काही ?"
    " उपाय आहे ना, पण केला तर !"
    " म्हणजे ?"
    " म्हणजे , प्रेम चं दुसरे लग्न करणं हा एकच उपाय आहे आपल्या कडे."
   " छे छे छे ! प्रेम कधीच लग्न करायला तयार होणार नाहीये. किती प्रेम आहे त्याचं लिला वर हे माहीत आहे
ना तुम्हांला ?"
    " ते मला  माहीत नाहीत का ? पण करणार काय
दुसरा उपायच नाही तर !"
   " उपाय कसा नाहीये ,  काहीतरी उपाय असेल की !"
   " म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी या संबंधी कुठं चौकशी केली नाही, असंच ना ?"
   " असं मला नाही म्हणायचंय. माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाहीये."
   " मग कसा आहे, तो तूच सांग बरं ."
   "  मला इतकंच म्हणायचंय की प्रेम दीर्घ काळानंतर आता तर कुठं तो माणसात आलाय नि आता परत त्याच्या डोक्यावर ताण पडेल असे कोणतेही कार्य करू
नका. त्या शिवाय प्रेम चं आपल्या सुनबाई वर किती प्रेम आहे ते. हे देखील तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, जिच्यासाठी इतका वेडा झाला होता. तो तिला सोडून  दुसऱ्या कुणा मुली सोबत  लग्न करील असं मला तरी
वाटत नाहीये."
   " हे मला देखील माहीत आहे,  पण दुसरा काही उपाय आहे का ? मला सांग आपल्या घराण्याला वारीस हवाय का नको ? आपल्या मागे आपलं नाव सांगणारा कुणी हवाय का नको ? "
    " ते सर्व मला मान्य आहे, परंतु लगेच त्यांच्या डोक्याला
ताण पडेल असे काही करू नका. हेच मला सुचवायचं आहे यातून. दुसरे काही नाही."
   " ठीक आहे, त्याचं मूड पाहून हा विषय काढीन त्याचा
पुढे."
    " मी काय म्हणतेय ते जरा ऐकाल का ?"
    " हां बोल बोल. काय सांगायचं  आहे तुला ?"
    " त्या दोघांना देखील ही गोष्ट सांगितली असेल ना डॉक्टर ने ?"
    " हो नक्कीच ! "
    " मग त्यांनाच काय तो निर्णय घेऊ दे ना ?" मधुरा बाई
उद्गारल्या. आपलं प्लॅन आपलीच पत्नी फेल करते की काय हे जाणवताच सुंदर राव म्हणाले," अगं त्यांच्यावरच
सर्व निर्णय सोपवून कसं चालेल ? आपल्या घराला प्रॉपर्टी
ला वारीस तर हवाय ना ?"
   " हवाय. पण त्यासाठी मी माझ्या दोन्ही मुलांना दुःखी
करू इच्छित नाही." मधुराबाई चट्कन बोलून गेल्या. परंतु
सूंदर राव मात्र गोंधळात पडले की दोन मुलं कोण एक तर
अगोदरच गमावून बसलोय आपण. हे देखील तू विसरलीस की काय  ?"
  " मी काहीच विसरली नाहीये. दोन मुलं म्हणजे प्रेम आणि लिला संबधी बोलतेय मी !"
    " असं होय मला वाटलं की तू सुधीर संबधी बोलतेस
की काय ?"
    " माझा सुधीर जिवंत नाही याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहेत."
    " मी कसा काय ?"
    " आता गाडले ले मुडदे पुन्हा उकरून काढायचा विचार
आहे का तुमचा ?" मधुराबाई त्रासिक पण उद्गारल्या. तसे
सुंदर राव समजून गेले की विषयाला कलाटणी मिळतेय
की काय म्हणून ते तो विषय कट म्हणाले," तसं नाही ग
तुझा काहीतरी गैरसमज होतोय."
    " काहीही गैरसमज होत नाही माझा. एक गोष्ट लक्षात
तुमच्या हेकेखोर पणामुळे मी एका मुलाला गमावून बसली
आहे, दुसऱ्या ला गमवू इच्छित नाही. म्हणून ह्या दोन्ही
मुलांना मी माझी मुलंच समजते. म्हणूनच दोन्ही मुलं दुःखी होतील असे कोणतेही कार्य मला करावयाचे नाहीये."
    " अगं हो मान्य आहे मला पण आपला वंश पुढे चालावा यासाठी वंशाला कुणी पाहिजे की नको ?"
    " आपल्या वंशाला तर आहे ना आपला पोरगा ?"
    " पण त्यांच्या वंशाला नको का कुणी ?"
    " त्यांच्या वंशाला पाहिजे तर ते दोघेही मिळून निर्णय
घेतील तो आपण मान्य करायचा बस्स इतकंच राहिलंय आता आपल्या हातात." तसे सुंदरराव आपल्या मनात म्हणाले की, हिच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. जेव्हा जे काय करायचं आहे, ते आपल्यालाच करावयाचे आहे. असा विचार करून ते पुढे म्हणाले ," ठीक आहे, तू म्हणतेस तसंच होईल बरं का ?" त्यावर त्या खुश झाल्या.
आपल्या निर्णयात आपला पती पण सामील आहे, असं
समजून त्या बेडरूम मधून बाहेर पडून स्वयंपाक घराच्या
दिशेने निघून गेल्या. सुंदर राव विचार करू लागले की ही
मधुरा काही आपल्याला साथ देणार नाही. मित्राशी या
संबधी बोलून पाहू का ? छे छे छे ! इतक्यात बोलून काहीच उपयोग नाही त्याचा. प्रेम ला आपलं म्हणणं कसं
पटवून द्यावं खरंच काही कळत नाहीये. शेवटी त्यांनी
विचार केला की आधी प्रेम ला घरी तर येऊ दे . मग पाहू त्याला कसे राजी करायचं ते. असा विचार करून तात्पुरता
का होईना तो विषय तिथंच संपला. असं म्हणायला हरकत
नाही. कारण प्रेम आणि लिला दोघेही घरी आले ; परंतु
डॉक्टरांनी काय सांगितले या बद्दल काहीच घरात काहीच
सांगितले नाही. याचे त्याना मोठे आश्चर्य वाटलं. परंतु त्या
दोघांनी काय निर्णय घेतला हे जाणून घेण्यास ते उत्सुक असल्यामुळे शेवटी त्यांनी स्वतःच तो विषय काढला. सर्वजण डिनर करण्यासाठी डायनींग टेबला जवळ जमले होते. तेव्हा त्या दोघांना डॉक्टरांनी काय सांगितले हे जाणून घेण्याच्या निमित्ताने सुंदर रावांनी मुद्दामच  प्रेम ला एकदम सहजपणे विचारले," प्रेम , अरे तुम्ही दोघेही डॉक्टर कडे गेले होते ना ? तपासणी करायला होते ना ?"
   " हो गेलो होतो." प्रेम उद्गारला.
   " मग काय सांगितले डॉक्टर ने ?"
   " काही नाही सर्व नॉर्मल रिपोर्ट आहे ,  असं डॉक्टर ने
सांगितले." प्रेम ने खोटं सागितलं. तशी लिला त्याच्या कडे
आश्चर्याने पाहू लागली नि मनात विचार करू लागली की
प्रेम खोटं का सांगत आहे ?" तेव्हा सुंदर राव स्वतःहून
आश्चर्य व्यक्त करत म्हटले," काय ? डॉक्टर ने तुला असं सांगितलं  ?"
    " हां का हो ?"
    "  मला तर फार  वेगळंच सागितलं डॉक्टर ने."
     " म्हणजे तुमचं ही बोलणं झालं आहे तर डॉक्टरशी ?
त्याने स्वतःहून  फोन केला होता का तुम्हाला ?"
    " हो.  नाही म्हणजे मीच फोन करून विचारलं त्याना की मुलगा आणि सुनबाई आपल्या नर्सिंग होम आले होते, त्यांची ट्रिटमेंट झाली की नाही. तर ते म्हणाले," हो झाली.
मग विचारले," रिपोर्ट काय आहे ? तर ते मला म्हणाले,
तुमची सुनबाई कधीच आई होऊ शकणार नाही. मला
एकदम शॉक बसला मी त्याना म्हटलं की, असं कसं म्हणता तुम्ही डॉक्टर ? तिला तर एक बाळ झालं सुद्धा
होतं. दुर्दैवाने ते बाळ आता या जगात नाहीये.  तेव्हा
डॉक्टर म्हणाले, असं होतं कधी कधी ! त्याला इलाज
नाही कुणाचा. असं त्यांनीच मला सांगितलं आणि तू
म्हणतोस नॉर्मल सांगितले डॉक्टर ने. मग यात कोणतं खरं मानावे ? डॉक्टर आपल्या दोघांशी पण खोटं बोलला का ? काहीच कळत नाहीये." सुंदर राव म्हणाले. तेव्हा त्यांनी तिरफा कटाक्ष प्रेम आणि लिला कडे टाकला. त्यांच्या
चेहऱ्यावर उमटणारे भावांचे निरीक्षण करण्यासाठी ते तसे
मुद्दामच म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव लिलावर पडलाच वाटलं की प्रेम आपल्या घरातील  लोकांशी खोटे
बोलून चांगले करत नाहीये. कारण खोटे ते खोटेच असतं
आणि त्याचे आयुष्य फार दिवसांचे नसतं कधी ना कधी
सत्य येतच ते सामोरी नंतर दुसऱ्या कुणाकडून कळण्या पेक्षा आपणच खरं  काय  आहे ते सांगून टाकावं. म्हणजे मन तर हलकं होईल. शिवाय खोटं बोलल्याचे पाप देखील
लागणार नाही आपल्याला . असा विचार करून ती म्हणाली," नाही बाबा डॉक्टर ने आपल्याला जे सागितलं तेच आम्हाला सांगितले. हेच तुमच्याशी खोटे बोलले." त्यावर सुंदर राव नाराज होण्याचे नाटक करत म्हणाले,
    " अच्छा म्हणजे आता आमचे सुपुत्र पण आमच्याशी
खोटे बोलू लागले तर ! पण मला एक कळत नाही की आमच्या मुलाला आमच्याशी खोटे बोलण्याची काय गरज पडली असावी बरं ?" त्यावर प्रेम म्हणाला," तुम्ही नाराज व्हाल म्हणून मी खोटे बोललो तुमच्याशी  !"
   " नाराज तर आहोतच आम्ही तुझ्यावर . पण तू आमच्याशी खोटं बोललास म्हणून नव्हे !"
    " मग ?"
    " तू आमच्यावर अविश्वास दाखविल्या बद्दल आम्ही
तुझ्यावर नाराज आहोत."
      " आम्ही काय अविश्वास दाखविला आपल्यावर सांगा
बरं."
   " ज्या मुलाला आपल्या बापा समोर खोटे बोलण्याची
पाळी यावी हा अविश्वास नाहीतर दुसरे काय आहे ?"
   " तसं नाही काही बाबा ! खरं कारण हे आहे की, आम्ही आपल्याला आजोबा बनविण्यास असमर्थ ठरलो आहोत
म्हणून आम्हांला लाज वाटली म्हणून आम्ही आपणाशी
खोटे बोललो. बस्स इतकंच."
     " बरं ते जाऊ दे. झालं ते झालं. आता पुढं काय
करायचं ठरविले आहेस ते सांग."
    " आम्ही सरोगेट मदर च्या मदतीने आई-बाप होण्याचा
विचार करतोय."
   " उपाय चांगला आहे, परंतु यशस्वी झाला तर !"
   " म्हणजे ?"
   " म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं जी बाई सरोगेट बनायला तयार झालेली असते. तीच नंतर बाळ देण्यास
नकार देते. म्हणून म्हटलं हा प्रयोग यशस्वी होईलच याची
साश्वाती नाहीये."
     " आपण ऍग्रिमेंट बनवून घ्यायची तशी !"
     " हो पण ती बाईच पळून गेल्यावर काय करायचं त्या
ऍग्रिमेंट चं ?" त्यावर सर्वजनच विचारमग झालं. तसे हळूच
सूंदर राव म्हणाले," मला वाटतं, त्या पेक्षा तू लग्न करावेसे.
म्हणजे कसलाच प्रॉब्लेम होणार नाहीये."
    " परंतु हा प्रस्ताव  मला मंजूर नाहीये."
    " अरे पण का ?"
    " दुसरे लग्न करायचं सरळ अर्थ आहे की लिला ला घटस्फोट देणे आणि ते मला कदापि मान्य नाहीये."
    " दुसरं लग्न म्हणजे पहिल्या बायकोला घरातून हाकलून दे असं म्हणत नाहीये मी !"
    " दुसरे लग्न केल्यावर ती घरात राहिली काय किंवा न
राहिली काय ? अर्थ एकच ना शेवटी !"
    " एकच कसा अर्थ असेल."
    " मला मान्य नाही. तुम्हाला नातू हवाच असेल तर सरोगेट मार्फत मिळेल. अन्यता मला त्याची आवश्यकता
नाहीयेत. दँट शीट !" असे बोलून तडक आपल्या बेडरूम
मध्ये निघून गेला. तशी लिला सुध्दा त्याच्या पाठोपाठ
निघून गेली. तेव्हा मधुराबाई आपल्या पतीवर रागवत
म्हणाली," आताच सर्वकाही बोलायची गरज होती का ?"
    " अगं आता नाही बोलणार तर मग कधी बोलणार ?
कधीतरी बोलायलच लागणार आहे ना ते."
     " मग सावसीताने नसतं का बोलता आलं ? लगेच
आगीत तेल ओतण्याचे गरज होती का ?" असं बोलून
त्या पण प्रेम आणि लिला च्या बेडरूम च्या दिशेने निघाल्या. तेव्हा सुंदर राव स्वतःशीच उद्गारले," हीच तर योग्य वेळ होती. लोहा गरम है, तो मार दो हातोड़ा हाच सृष्टिचा नियम आहे !" असे बोलून विकट हास्य केलं.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..