षड्यंत्र ११
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र ११ |
" हो, खरंय. काळानुसार सर्वकाही बदलतं बदलत नाही ती फक्त लोकांची हौस ? ती कायम तशीच राहते. तरुण पणातही आणि म्हातारपणातही !"
" चला आता हा विषय इथंच संपवा " राज उद्गारला.
तेवढ्यातच ट्युशन ला गेलेला समीर ही आला आपल्या
आत्येला पाहून फार खुश झाला.
आता इथून पुढे
आणि त्याने विचारले, " आत्या तू कधी आलीस ?"
" मी मघाशीच आली. खूप वेळ झाला मला येऊन. पण तू कसा आहेस आणि तुझा अभ्यास कसा चालला आहे, ते सांग."
" एकदम झक्कास !"
" छान !" लिला उद्गारली.
लिला ला सर्वांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला की
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची काही गरज नाहीये. कारण त्या मध्ये
सुंदर राव आणि माधवराव यांची काहीतरी चाल असू शकते. पण लिला चे म्हणणे होते की जोपर्यंत प्रेम माझ्या
सोबत आहे तोपर्यंत मला कशाचीच चिंता करण्याची
गरज नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची चाल जरी
असली तरी आम्हां दोघांचा घटस्फोट झालेला नाहीये.
त्यामुळे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला काही अर्थ नाहीये."
त्यावर मोहनराव म्हणाले," आम्हाला जे वाटलं ते आम्ही
तुला सांगितले बाकी काय करायचे ते तुझं तू ठरव."
" पप्पा, मला माहितेय, आपण सर्वजण माझ्या हिताचेच बोलत आहात, पण त्याला पर्याय काय दुसरा ?
मला सांगा ना, मी त्यांना वारस देऊ शकत नाहीये. मग
त्यांच्या पुढे दुसरा कोणता पर्याय उरतो ? नाही म्हणजे
कोणावर विश्वास ठेवायचा ? सरोगसी करायचं म्हटलं तरी
आजकाल कुणावर विश्वास ठेवता येतो का ?" कोणीच
काही बोललं नाही.
राज आपल्या बेडरूममध्ये आला तेव्हा त्याच्या सोबत
अनया पण आली ती म्हणाली," राज मला काय वाटतं की
वन्स माधवी वर विश्वास ठेवून फार मोठी घोडचूक करत
आहेत." त्यावर राज म्हणाला," हो गं मला ही तेच वाटतंय ; पण लिला असं वाटतंय की तिच्या प्रमाणे सर्वचजण सज्जन आहेत, पण तसं व्यक्तिशः नाहीये हे
कोण तिला समजवणार ?" त्यावर अनया म्हणाली," तसं
वन्स म्हणतात ते पण बरोबरच आहे म्हणा. सरोगसी महिला वर तरी विश्वास कसा ठेवणार ? त्या पण तर शेवटी
विश्वासघात करतात."पण तेवढ्यात राज च्या मनात एक विचार आला नि त्याने तो लगेच तो बोलून दाखविला. राज
आपल्या पत्नीला म्हणाला," माझ्या मनात एक विचार
आला बघ." तेव्हा अनया ने उत्सुकपणे विचारले ," कोणता ?" राज उद्गारला," हे शुभ काम आपणच केलं
तर !" अनया न समजून विचारले," कोणतं शुभ काम ?"
" सरोगेट मदर वाले ?"
" म्हणजे ? काय म्हणायचंय तुला ?"
" लिलाच्या बाळाची तू सरोगसी बनलिश तर ?"
" छे छे छे मला मुळीच जमणार नाही ते."
" का ? काय प्रॉब्लेम आहे ? नाही म्हणजे आपण
आपल्या माणसासाठी काही करू शकत नसू तर केवळ
उपदेश देण्यात काहीही अर्थ नाही."
" मी बनली असती वन्स च्या बाळाची सरोगसी परंतु..? " बोलता बोलता मध्येच थांबली.
" परंतु काय ?"
" मला स्वतःला अजून एक बाळ हवंय ?"
" अजून कशाला ? दोन आहेत ते पुरेसे नाहीत का ?"
" ते दोघेही मुलगे आहेत.मला मुलगी हवीय म्हणून
परत एकदा चान्स घ्यायचा आहे."
" आणि पुन्हा मुलगाच झाला तर !"
" झाला तर झाला आपलाच असणार ना तो, जगाचा
थोडीच आहे, घाबरायला ?"
" अगं पण कशाला नको हट्टहास ?"
" फक्त एकदा चान्स घेऊ ना ?"
" मागे पण असंच म्हणाली होतीस शेवटी काय झालं ?"
" फक्त एकदा माझ्यासाठी प्लिज !" असं म्हणताच
राज विरघळला. तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला,
" खरं सांगू एकतरी मुलगी असावीच मुलगी शिवाय
शोभा नाही घराला."
" आता कसं माझ्या मनातलं बोललास." असे स्पष्ट
बोलून पुढे मनात म्हणाली,"खरे कारण हे नाहीये राज.
खरे कारण हे आहे की , नऊ महिने मी त्रास काढणार
नि फुकटचं बाळ देऊ तुझ्या बहिणीला. कोणतीही आई
आपलं बाळ दुसऱ्या ला देणार नाहीये. मग तिला कितीही
मुलं असली तरीही ! मग मी कशी देईन बरं ! परंतु हे तुला
व्यक्तिशः सांगू शकत नाहीये. म्हणून हे कारण पुढं केलं."
लिला आपल्या सासरी परतली. त्यानंतर थोड्याच
दिवसांनी माधवी आणि प्रेम चं लग्न मोठ्या थाटामाटात
पार पडलं. सगळे कार्यक्रम अगदी खऱ्या लग्नासारखेच
करून घेतले. असं म्हणण्या पेक्षा प्रेम चं माधवी चे खरोखर चे लग्न झाले म्हणा. फक्त लिला कडून घटस्फोट
मिळवायचा तेवढा बाकी होता. तिची पाठवणी करताना
तिची आई तिच्या कानात म्हणाली," सर्वकाही तुझ्या
मनासारखे घडवून आणले आहे, आता उरलेले काम तू
करावयाचे आहेस, परंतु कोणालाही त्या बाबत कळता
कामा नये. लिला तर अजिबात कळता कामा नये. तिची
सहानुभूती तुला मिळणे आवश्यक आहे, तरच तू आपल्या
कामात यशस्वी होशील. " तिने आपल्या आईने सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवली होती. त्यामुळे लिला सोबत ती इतकी गोड राहायची की कुणाला तरी वाटेल
की ह्या दोघी सख्ख्या बहिणीच आहेत. लग्नाच्या पहिल्या
रात्री तर ती आपल्या बेडरूममध्ये तळमळत होती. तिला
झोप अशी लागत नव्हती. तिला वाटत होते की प्रेम ने
आपल्या बेडरूम मध्ये यावे नि आपल्या मिठीत घ्यावे.
परंतु तसे काही घडणार नव्हतं हेही तिला माहीत होते.
पण तरी ती स्वप्न पाहत होती. आणि स्वप्न पाहणं काही
अपराध नाही. ती स्वप्न पाहण्यात दंग झाली आणि तिचा
डोळा लागला. थोड्या वेळाने दरवाजा वर थाप पडली.
नि माधवी दचकून उठली पाहते तर काय बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोठावत आहे, तिने विचार केला
की इतक्या रात्री कोण आलं असावं ? " असा विचार
करून ती पलंगावरून खाली उतरली नि चालत दरवाजा
जवळ गेली नि हळू आवाजात विचारले ," कोण आहे बाहेर ?" तसा बाहेरून ही तसाच हळू आवाज आला की
मी आहे प्रेम दरवाजा उघड ?" प्रेम चा आवाज ऐकताच
तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने झटकन
दरवाजा उघडला तसा प्रेम आंत आला. प्रेम ला पाहताच
तिला त्याला एकदम बिलगली. प्रेम ने तिला आपल्या मिठीत घेतले नि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून एक
दीर्घ किस घेतले. आणि मग तिला उचलून पलंगावर
ठेवले. त्यानंतर दरवाजा बंद केला. आणि चालत तिच्या
जवळ आला नि म्हणाला," तू अजून श्रुंगार उतरला नाहीस ?" त्यावर माधवी म्हणाली," कसा उतरणार तू
आल्याशिवाय ?"
" म्हणजे मी येणार ते तुला माहीत होतं ?"
" आफकोर्स ! माहीत नसायला काय झालं ? आपलं
आजच लग्न झालं ? मग आज आपली मधुचंद्राची रात्र
नाही का ?"
" हूं खरंय." असे म्हणून तिच्या अंगावरील एक एक
दागिने उतरवून बाजूला ठेवतो आणि मग तिचे वस्त्र सुध्दा
उतरवतो नि मग मनसोक्त प्रणयक्रिडा करतात. पण
तेवढ्यात कसला तरी आवाज होतो नि तिचे डोळे
उघडतात आणि ती आपल्या बाजूला पाहते तर बाजूची
जागा एकदम रिकामी असते. तिच्या अंगावरील शृंगार
देखील जशाच तसा अंगावर असतो. म्हणजे प्रेम आपल्या
बेडरूम मध्ये आलेला नाहीये. मघापासून जे आपण
अनुभवत होतो ते केवळ एक स्वप्न होतं. हे जसे जाणवते
तसे तिला अत्यन्त दुःख होतं. हे सुख तिच्या नशिबात
कधीच येणार नाही का ? छे छे छे असं कसं येणार मी त्याला यायला भाग पाडीन. पण तोपर्यंत काय ? लगेच
दुसरे मन तोपर्यंत ह्यातच सुख मान की प्रेम चा अंश तुझ्या
पोटात वाढत आहे. याहून भाग्य ते कोणते असावे ? खरंय
एका गोष्टीचे समाधान मानायलाच हवं की जे सौभाग्य लिला ला प्राप्त झाले होते ते सौभाग्य तिला प्राप्त तिला प्राप्त झाले आहे. आणि ते म्हणजे प्रेम च्या बाळाची आई होणार होती ती. पण तरी देखील तिचं मन उदास होतं की प्रेम शी आपण लग्न करून ही प्रेम आपल्या सवती कडे झोपला आहे. काय करावं कसं करावं त्याला आपल्या सवती पासून काहीच कळत नव्हतं. पण तिला खात्री होती की एक ना एक दिवस प्रेम ला हस्तगत करणार त्यासाठी
लिला चा जीव घ्यावा लागला तरी चालेल. छे छे छे जीव
घेऊन चालणार नाही. प्रेम मागच्या सारखाच वेडा झाला
तर ! छे छे छे ! अशी रिक्स घेऊन अजिबात चालणार
नाही त्या पेक्षा अशी काहीतरी चाल खेळू की प्रेम स्वतःच
तिचा तिरस्कार करायला लागला पाहिजे. पण असं काय
करू ? असा विचार करत असतानाच तिच्या पोटात
काहीतरी हलले तसे तिचे ध्यान आपल्या पोटाकडे
गेले तशी तिच्या डोक्यात लख्ख ट्यूब पेटली. ती आपल्या
पोटातील बाळाला म्हणाली," थँक्स बाळा, तू मला आयडिया दिल्या बद्दल. तुला सुद्धा वाटत असेल ना , की
मॉम वर अन्याय होतोय म्हणून. छान आयडिया दिलीस हं ! आता मी ह्याच आयडिया चा वापर करून तुझ्या
पप्पाला मी माझा दिवाना करेन. थँक्स हं बाळा !"
आपल्या घरात लवकरच छोटा पाहुणा येणार आहे
म्हणून सर्वच खुश असतात. स्पेशली लिला खूप खुश
असते की लवकरच आपण बाळाची आई होणार म्हणून.
प्रत्येक जण तिची काळजी घ्यायला लागतो. कारण
माधवी ला आता तिसरा महिना लागला होता. शारदा बाई
प्रेमाणिक पणे आपले काम चोख बजावत असतात.
एके दिवशी काय झाले शारदा बाईंनी नेहमी प्रमाणे
दूध घेऊन आली तेव्हा लिला छोट्या बाळासाठी कानटोपी
उलन ची बनवत होती. म्हणून ती म्हणाली की, ग्लास ठेव तिथे मी घेईन नंतर . शारदा बाईंनी आपल्या हातातील ग्लास मेजवर ठेवले नि त्या निघून गेल्या. थोड्या वेळाने
लिला ने आपल्या हातातील काम बाजूला ठेवले नि दुधाचे
ग्लास उचलले तेवढ्यात तिच्या ध्यानात आले की दुधाची
जास्त गरज माधवी आहे, म्हणून ते ग्लास घेऊन ती
माधवी च्या बेडरूम मध्ये गेली. लिला पाहून माधवी
म्हणाली," ताई, तू का आलीस ? मला हांक मारायचीस
ना, मी आलं असते पळत" त्यावर लिला म्हणाली," आता
अजिबात पळायचं नाही. आता फक्त आराम करायचा नि
आदेश सोडायचा मग तुझी ताई तुझ्या सेवेला हजर म्हणून
समज." त्यावर माधवी म्हणाली," हो, तर तुला माझी
करायलाच लावणार आहे. कारण प्रेम ची खरी बायको
मीच होणार आहे, तू फक्त आमची दासी असणार आहेस,
असे मनात बोलून पुढे उघडपणे म्हणाली," ताई, खरं
सांगू मला ना, तुझ्या कडून सेवा करून घ्यायला आवडत
नाही. परंतु तू आता इतकं प्रेमाने दूध आणले आहेस तर
मी घेते." असे म्हणून तोंडाला ग्लास लावून दूध घटाघट
पिऊन टाकले. लिला ने स्मित हास्य केले नि ते रिकामी
ग्लास घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी अचानक पणे माधवी च्या पोटात दुखायला लागले. तिला रुग्णालयात घेऊन
गेले. परंतु तिचा गर्भपात झाला. डॉक्टर ने विचारले की
काही रस वगैरे प्याली होती का ?" तर माधवी म्हणाली,
" नाही. फक्त दूध प्यायली होती."
" हां मग दुधातून गर्भपाताचे औषध दिले गेले. पण
चिंता करण्याचे कारण नाही. बाळाला काही झालं नाही."
तेव्हा ती डॉक्टराना म्हणाली," बाळाला मारून टाका."
" पण का ?"
" ते नंतर सांगते. तुम्ही फक्त मी सांगितलेले काम करा." डॉक्टर ने तिचा गर्भपात करविला आणि रिपोर्ट
दिला की दुधातून गर्भपात चे औषधं पोटात गेल्याने तिचा
गर्भपात झाला. तेव्हा तिला विचारण्यात आले की तुला
दूध कोणी आणून दिले तर माधवी ने लिला चे नाव सांगितले. तेव्हा तिला विचारण्यात आले की तू असं का
केलेस ?" त्यावर लिला म्हणाली," मी खरंच असं काहीही
केलेलं नाहीये. ते दूध मला शारदा बाईंनी आणून दिलं होतं.
मग सगळ्यांचा संशय शारदा बाईवर गेला तसे सुंदर राव
आपले भांड फुटेल म्हणून चटकन म्हणाले," शारदा बाई
असं मुळीच करणार नाही. मला वाटतं तुझ्या मनात जलीश भावना निर्माण झाली असावी. होतं असं कधी कधी ! आपल्या वाट्याचे सुख जेव्हा दुसऱ्या मिळते
तेव्हा अशी जलीश भावना निर्माण होते. तेव्हा सुनबाई
आम्ही तुला दोष देत नाही आहोत. पण या पुढे तू माधवी
पासून दूर रहा. बस एवढीच अपेक्षा ! लिला स्वतः निर्दोष
असल्याचे सांगते. पण कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास
करत नाही.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा