Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र १०

षड्यंत्र १०
षड्यंत्र १०

 



   " बघ बाई ! मला तर बाई या मध्ये सुंदर चे नवीन
काहीतरी डाव दिसतोय. कारण तो माणूस दिसतो तसा
नाहीये. कपटी तर आहेच. पण त्या पेक्षा भयंकर दृष्ट
माणूस आहे."

आता इथून पुढे

" नाही गं आई, तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. नाही. मला मान्य आहे, सुरुवातीला सासरेबुवा फार वैऱ्या सारखे वागले आमच्याशी ! पण आता त्यांच्या मध्ये खूप म्हणजे खूपच परिवर्तन आले आहे, किती चांगले वागतात ते आता माझ्याशी ! तुला सांगून खरे वाटणार नाहीये."
    "  तू काहीही म्हण. पण मला नाही पटणार ते. कारण
तो जसा माझ्याशी वागला आहे, तसा एखादा वैरी सुद्धा
तसा वागला नसता."
   " म्हणजे काय केलं त्यांनी तुझ्या सोबत "
   " जे करायला नको ते त्यांनी केलं आहे माझ्याशी !"
   " मॉम, आता तू नीट सांगणार आहेस का मला ?"
   राधाबाई आपल्या लेकीला आपला भूतकाळ सांगणारच
असतात. तेवढ्यात तेथे मोहनराव आले त्यांनी त्या माय
लेकीचं बोलणे ऐकले. म्हणून त्यांनी मध्येच खो घातला.
नि आपल्या लेकीला म्हणाले," अगं लिला काय ऐकतेस त्या तिचं. मी काय सांगतोय ते ऐक." असे बोलून ते विषयांतर करतात. कारण आपल्या पत्नी सोबत काय
घडलंय  हे आपल्या लेकीला सांगू इच्छित नसतात. म्हणून ते आपल्या नजरेने आपल्या पत्नीला सांगतात की नको सांगूस. त्यावर त्या गप्प राहतात. परंतु दोघांच्या नजरेची
भाषा लिला समजली की काहीतरी गुपित आहे, परंतु
आपले आई-वडील ते सांगू इच्छित नाहीत. कदाचित असं ही असेल आपल्या मुलांना आपल्या जीवनातील काही कडू आठवणी कळू नये , असे त्यांना वाटत असावे. किंवा आपल्या आई-वडिलांची नि सासऱ्याची दुश्मनी होण्या
मागचे काहीतरी निश्चितच कारण असावे. ते आपल्याला
माहीत नाहीये. पण काहीतरी अतीत मध्ये घडलंय हे खरंय. पण काय ? ते कसं कळणार ? असा तिच्या मनात विचार सुरू असतानाच मोहन रावांचे लक्ष आपल्या लेकी गेले तसे ते समजले की , आपल्या लेकीला नक्कीच संशय आला असावा. आता जर हिचा संशय दूर केला नाही तर तिच्या मनात भलतेच विचार येऊ लागतील. त्या पेक्षा आपणच अर्धसत्य बोलून हा विषय इथंच संपवून टाकावा. असा मनात विचार करून ते म्हणाले, "  अगं लिला तू कोणत्या विचारात पडली आहेस ?" तेव्हा लिला ने देखील  मनात विचार केला की आत्ता काय करू , सांगून टाकू का ? माझ्या मनात काय चाललं आहे ते. हो सांगूनच टाकते. उगाच मनात घोर कशाला असा विचार करून ती
म्हणाली," पप्पा तुम्ही आणि मॉम .....दोघेही माझ्यापासून
काहीतरी लपवत आहात असं मला वाटतं." तसे मोहनराव
हसून म्हणाले," मला वाटलंच होतं की तुझ्या मनात असाच संशय आला असेल. ठीक आहे, तुला ऐकायचं असेल तर ऐक." तशी राधाबाई आपल्या डोळ्यांनी त्यांना दटावतात. जणू त्या आपल्या नजरेनं हे सांगण्याचा प्रयत्न करतात की मला सांगायला आपण मनाई केली नि आता
स्वतःच  सांगायला निघालेत. दोघे आपल्या नेत्र कटाक्षाने
एकमेकांना जे सांगून इच्छित त्या कडे लिला चा भारी लक्ष असतो बरोबर दोघांवर , त्यामुळे तिच्या ध्यानात यायला
यत्किंचितही विलंब लागत नाही की आपले आई-वडील
आपल्या अतीत विषयी काहीतरी लपवत आहेत. पण
काय ? पण त्याच वेळी मोहन रावांच्या ही ध्यानात येते की
आपल्या प्रत्येक कृतीवर आपल्या लेकीचं लक्ष आहे, म्हणून तिचे लक्ष दुसरीकडे वळविणे गरजेचे आहे , असा
विचार करून तिच्या कडे न पाहिल्या सारखे करून  ते पुढे म्हणाले," अगं राधा आपण जर हिला जर काही
सांगितलं नाही तर तुझी ही लेक तोच विचार करत बसेल की आपले मॉम -पप्पा आपल्या पासून काय लपवत आहेत ? म्हणून तिला खरं आहे सांगून टाकतोय. असं म्हणताच राधाबाईंच्या अंगावर काटा उभा राहिला. मघाशी स्वतः सांगायला तयार झाल्या होत्या तर ते चालत होतं आता मोहनराव सांगायला तयार आहेत  तर त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. काय कारण असावे बरं ? बहुधा तिला वाटत असावे की हे खरे खरे सांगून
टाकतील की माझ्यावर कसा त्या हारामखोराने बलात्कार
केला होता ते. छे छे छे ! लेकी समोर हे  सांगायला कसंतरीच वाटतंय  ? पण आता ह्यांना विरोध पण करू शकत नाही. मग माझं अतीत सांगायला कसं रोखू ह्यांना ? किंचित विचारमग्न झाल्या. पण उपाय सुचत नव्हता. त्यांची ही दशा मोहनरावांच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. म्हणून ते किंचित हसून म्हणाले ," चिंता करू  नकोस  राधा , कॉलेज मध्ये असताना अश्या घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यात काय  ? तसं पण कॉलेज मध्ये जे अफेर होतं तेच पुढे एकमेकांचे जीवनसाथी बनलात असं नाहीये. म्हणजे आई-वडिलांना मान्य नसेल तर लग्न
दुसऱ्या कुण्या व्यक्ती बरोबर पण होऊ शकतं ना ?"
राधा बुचकळात पडली. तिला कळत नाही की मोहनराव
काय सांगू इच्छित आहे. म्हणजे असे का उलट सुलट सांगत आहेत ?"
    त्यावर लिला म्हणाली, " तुम्ही दोघेही माझ्यापासून
काहीतरी लपवू पाहताय पण काय लपवू पाहताय ते मला कळेनासे झालं आहे."
     " अगं काही लपवत नाही तुझ्यापासून. ऐक. तुझ्या
आईचं नि माझं लव्ह मॅरेज आहे, हे तर तुला माहीतच आहे."
   " हो, माहीत आहे."
   " पण तुला हे नाही ना, माहीत ? की तुझ्या आईचा अजून एक आंशिक होता."
   " काय सांगता काय पप्पा ?"
   " हां तेच लपवत होतो आम्ही ? " असे म्हणून ते आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले," हो की नाही  गं ?"
तश्या राधाबाई आपले डोळे वटाळून सांगण्याचा प्रयत्न
करत म्हणाल्या, " बस ना आता ? म्हणजे पुढे काय घडलं ते सांगू नका. " पण मोहनराव कसले ऐकतात ते पुढे म्हणाले, " आणि तो आंशिक कोण होता हे माहीत आहे
का तुला लिला ?" तश्या त्या मध्येच म्हणाल्या," बस ना आता ? पोरी समोर माझी इज्जत काढलाय की काय ?"
त्यावर मोहनराव म्हणाले," तुझी इज्जत तीच माझीही
इज्जत नाहीये का ? मी असं कसं करेन बरं ?"
   " मग आपल्या पोरीला काय सांगताय माझ्या बद्दल ?"
    " फक्त तुझ्या बद्दलच नाही ग माझ्या बद्दल ही सांगतो
मग तर झालं."  तशी लिला उत्सुकते ने म्हणाली," हां पप्पा सगळं सांगून टाका. मॉम चं काही ऐकू नका."
असे म्हणून ती मूळ मुद्द्यावर येत म्हणाली," हां पप्पा सांगा मला कोण होता मॉम चा आंशिक तो ?"
   " आणखीन कोण ..... तुझा सासरा !" असे म्हणताच लिलाएकदम शॉक झाली. आणि विश्वास न होऊन तिने
विचारले की , " काय सांगता काय पप्पा ?"
   " अगं खरं तेच सांगतोय मी ! "
    " माझे सासरे मॉम चे आंशिक वाव!'
    "  काय वाव ! तुझे पप्पा काय पण सांगतात. काहीही
ऐकू नकोस त्यांचं."
    " पप्पा तुम्ही पुढे सांगा. मॉम चं काहीही ऐकू नका."
    " मॉम चं काही ऐकू नका काय ? थांब. बघतेच मी बाप
लेकीला." असे बोलून त्या तिला मारण्यासाठी केरसुणी
उचलतात. तशी लिला त्यांना रिक्वेस्ट करत म्हणाली,
    "  मॉम , थांब ना जरा , ऐकू दे ना मला किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सांगा हो पप्पा !"
    " एकदम झडप घालून मी शिकार पळवून नेली आणि तुझा सासरा बसला हात चोळीत. "
     " म्हणजे तुम्ही दोघांनी पण पळून जाऊन लग्न केलात आमच्या सारखे "
     " नाही गं , ह्यांचं काय ऐकतेस. हे काय पण सांगतात."
     " मग तू सांग ना ."
      " अगं तुझ्या पप्पांचं नि माझं खरं प्रेम होतं आणि
तुझ्या सासऱ्याचं एकतर्फी प्रेम होतं. आता तूच सांग.
एकतर्फी प्रेमाला काही अर्थ आहे का ?"
     " नाही खरं आहे तुझं. प्रेम हे दोन्ही कडून सारखेच
असावे लागते. बरं पुढं काय झालं ते सांग."
    " तुझ्या सासऱ्याला एक  मीरा नावाची बहीण होती."
    " बरं मग ?"
     " तिचं तुझ्या बापावर निस्सीम प्रेम होतं.'
      " काय पण सांगू नकोस. मी नव्हतो करत तिच्यावर
प्रेम."
    " तुम्ही नव्हता करत , पण ती तर करत होती ना ?"
    " वाव ! इंटरेस्टिंग ! म्हणजे पप्पांची पण आंशिक होती
तर !"
     " अग नुसती आंशिक नाही. ह्यांच्यावरच्या प्रेमा पाई तिने आत्महत्या केली."
    " म्हणजे पप्पानी तिचे प्रेम नाकारलं ?"
    " नाकारणारच ना, ह्यांचे माझ्यावर प्रेम. मग तिने केली
आत्महत्या आणि त्यामुळेच तुझा सासरा आमचा वैरी
बनला."
    " पण तिने आत्महत्या केली त्यात पप्पांचा काय दोष ?"
    " तुझ्या पप्पांचा दोष या साठी की तुझ्या सासऱ्या ने
ह्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला होता तो ह्यांनी नाकारला."
   " काय प्रस्ताव होता माझ्या सासऱ्यांचा ?"
     " तुझ्या सासऱ्याचा प्रस्ताव असा की त्यांच्या
बहिणी सोबत ह्यांनी लग्न करावं नि तुझ्या सासऱ्या सोबत
मी लग्न करावे. परंतु आम्हां दोघांनाही ते मान्य नव्हते.
म्हणून आम्ही गोष्टीस नकार दिला. म्हणून मीरा ने नदीत
उडी मारून जीव दिला. म्हणून तुझा सासरा आमचा वैरी बनला."
    " असं आहे काय ? तरी मी विचार करते की कॉलेज
जीवनात तुम्ही एकमेकांचे मित्र होता तर वैरी कसे बनला ?"
    " आता खरं काय ते समजलं ना ?"
     " हो ; पण आता माझा सासरा सुधारला आहे. म्हणजे
पूर्वीचा राग आता राहिला नाही. असं मला त्यांच्या वागण्या वरून वाटते. आणि सुधारण्याची संधि प्रत्येकाला
मिळायला हवी असं मला वाटतं. शिवाय  त्यांनी जे काय केलं ते आपल्या एकुलत्या एक बहिणीवरच्या प्रेमापोटी
केले, म्हणून मनात तोच राग ठेवणे कितपत योग्य आहे ?
याचा तुम्हीच विचार केलेला बरा." आपल्या लेकीच्या
तोंडून सासऱ्याची प्रशंसा ऐकून राधाबाई वाटलं की आपल्या लेकीला सत्य सांगून टाकावे. म्हणून त्या आपल्या मनात म्हणाल्या," अगं लेकी इतकंच
कारण नाहीये. तुला माहीत नाहीये. दोन मित्रांमध्ये दुश्मनी
होण्याचे खरं कारण वेगळं आहे, तुझ्या सासऱ्या ने माझ्यावर बलात्कार केला होता. पण तरी देखील तुम्हां
मुलांच्या खुशीसाठी आपला सारा अपमान विसरून त्याच्या घरी गेलो होतो, तुझं नि प्रेम चं लग्न जुळवायला. पण त्या नीच माणसाने आम्हांला बेइज्जत करून घरी पाठविले. मुलांना नसते माहीत की त्यांचे आई-वडील आपल्या मुलांच्या खुशी साठी आपला अपमान पण विसरून नको त्या माणसाच्या पाया पडतात ते . आम्ही ही तेच केलं. पण त्या नीच माणसाने आमची कदर नाही केली. म्हणूनच मला वाटतंय की तुझा सासरा अजून सुधारलेला नाहीये. तुम्हां दोघांना एकमेकांना दूर करण्याचे हे त्याचे नवीन प्लॅन असावे. पण हे तुला कसे समजावू ते कळत नाहीये मला. असा विचार सुरू असतांनाच लिला ने विचारले ," मॉम, तू माझ्या प्रश्नांचे उत्तर  दिले नाहीस. असं तर नाहीये ना , की तुम्ही दोघेही माझ्यापासून अजूनही काहीतरी लपवत आहात ?" तसे मोहनराव म्हणाले," नाही गं बाई , तुझ्या पासून काही लपवत नाहीये. जे सांगितले तेच खरे आहे."
    " मग मॉम बघा ना, कशी विचार करत बसली आहे ती."
   " अगं लिला, तुझी मॉम ह्याचा विचार करतेय की आपल्या लेकीला खरं का वाटत नाहीये आपले सांगणे ?"
असे म्हणून ते आपल्या पत्नी कडे पाहत म्हणाले की,
हाच विचार करतेस ना तू ?" तशा त्या एकदम भानावर
येत म्हणाल्या ," अं ss हो हो हाच विचार करते मी ! जर
तुला आपल्या आई- वडिलांवर विश्वास नसेल तर आपल्या
सासऱ्याना विचार , मग तेच  खरं काय आहे ते सांगतील"
    " त्याची गरज नाही मॉम , माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्हां दोघांवर तसाच विश्वास माझा माझ्या प्रेम वर आहे.
तो मला कधीच अंतर देणार नाही. अश्या किती माधवी
त्याच्या जीवनात आल्या तरी !"
   " तुझा जर आपल्या प्रेमावर द्वढ विश्वास आहे तर आम्ही काय बोलणार म्हणा. माझं फक्त इतकंच म्हणणं
आहे की आपल्या सासऱ्यावर आंधळा विश्वास ठेवू नकोस
बस मला अजून काहीच बोलायचं नाहीये."
    " मॉम-पप्पा तुम्ही अजिबात चिंता करू नका. असं
काहीही होणार नाहीये." तेवढ्यात बाहेरून लिलाचा भाऊ
आणि वहिनी आले कुठंतरी फिरायला गेले होते ते आले
सुमित  पळतच आला नि आत्या आत्या म्हणत लीला ला
बिलगला आणि विचारू लागला की , आत्या कधी आलीस तू ?" लिला म्हणाली," आत्ताच थोड्या वेळापूर्वी
पण तुम्ही लोकं कुठं गेला होता ?" सुमित उद्गारला, आम्ही
ना पिक्चर पाहायला गेलो होतो मॉल मध्ये."
   " हो का ? कोणता पिक्चर पाहिला तुम्ही लोकांनी?"
    " अल्लू अर्जुन चा पुष्पां पिक्चर पाहिला आम्ही !"
     " कसा आहे पिक्चर ?"
     " एकदम मस्त."
     " मग तर मला पण पाहायला पाहिजे."
     " मग मला घेऊन जाशील ना आत्ये ?"
     " तू पाहिलास ना रे आता ?"
     " मला परत बघायचा आहे."
     " असं काय मग नेईन हं मी तुला."
     " अहो, वन्स त्याचं काय ऐकताय ? त्यानं किती वेळ
पाहिलं तरी त्याचे समाधान होणार नाहीये."
    " अगं वहिनी चालायचंच लहानपणी आम्ही नाही का ?
घरात सीडी वर पाहिलं तरी टॉकीज ला जायचं बघायला."
     " त्या वेळची गोष्ट वेगळी होती. आणि आत्ताची गोष्ट
वेगळी आहे, तेव्हा तिकीट किती कमी होतं आणि आता
किती जास्त आहे."
    " हो बरोबरच आहे ना, आजोबांच्या काळात फक्त सहा रुपये होते. पण तेवढंच तिकीट नंतर राहिलं का ?
नाही ना ? मग तुमच्या काळातील तिकीट आता कसे मिळेल ? "
    " हो, खरंय. काळानुसार सर्वकाही बदलतं बदलत नाही ती फक्त लोकांची हौस ? ती कायम तशीच राहते. तरुण पणातही आणि म्हातारपणातही !"
   " चला आता हा विषय इथंच संपवा " राज उद्गारला.
तेवढ्यातच ट्युशन ला गेलेला समीर ही आला आपल्या
आत्येला पाहून फार खुश झाला.

   क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..