Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र १४

षड्यंत्र १४
षड्यंत्र १४

 


      तेव्हा लिला म्हणाली," नकळत जी गोष्ट घडते तिला चूक झाली असे म्हणतात. पण जी गोष्ट जाणूनबुजून केली जाते तिला चूक नाही अपराध म्हणतात आणि तुम्ही फार मोठा अपराध केला आहे. माझा विश्वास तुम्ही तोडला आहे, तेव्हा त्या अपराधाची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. तेव्हा आता शांत झोपा सकाळी त्याचा निर्णय होईल. नाईलाजाने प्रेम पलंगावर जाऊन झोपला. सकाळ होताच लिला कुणाला काही न सांगता आपल्या माहेरी निघून गेली. प्रेम ने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती नाही ऐकली. सरळ निघून गेली माहेरी !

पुढे
  
       लिला ने जसे सासरी कोणाला सांगितले नाही तसे
माहेरच्या माणसांना देखील काही सांगितले नाही. त्यामुळे
झाले काय ? लिला माहेरी का आली आहे हे काही कळलं
नाही. त्यांना वाटलं की असेच ती हवा पालटायला आली
असेल म्हणून कुणी काही तिला बोलले नाही. हां विचारण्याची पद्दत म्हणा की औपचारिकता म्हणून तिच्या
घरच्यांनी तिच्या सासरच्या माणसांची चौकशी केली नि
पुढे काय करायचं ठरविले आहेस असं तिच्या आईने तिला
विचारले. तेव्हा तिने न समजून उलट आपल्या आईलाच
विचारले की , कशा संबधी बोलते आहेस तू ?" त्यावर
राधाबाई म्हणाल्या," माधवीचा गर्भपात झाला त्या विषयी
बोलते मी !" त्यावर लिला च्या  एकदा आलं होतं की
आपल्या आईला सांगून टाकावं की आपला विश्वासघात
झाला आहे. परंतु हे कोणत्या तोंडाने आपण सांगायचं
आईला , म्हणजे आई ने अगोदरच ह्या गोष्टी ला विरोध
दर्शविला होता. परंतु आपणच तिचं सांगणं ऐकलं नाही.
कारण आपला आपल्या नवऱ्यावर आंधळा विश्वास होता
ना ? त्याचंच हे प्रायश्चित्त मिळालं आपल्याला. आता कोणत्या तोंडाने आपण आपल्या आई समोर कबूल
करायचं म्हणून ती गप्प राहिली. कोणालाच काही बोलली
नाही. पण आठ दिवसांनी जेव्हा लिला घरी परतली नाही
तेव्हा प्रेम ची खात्री झाली की , जाताना जरी ती आपल्याला काही बोलली नाही तरी ही ती आपल्यावर फार नाराज आहे, तेव्हा तिची नाराजगीं दूर करण्यासाठी
आपल्यालाच जावे लागेल. आपला विचार जेव्हा त्याने
माधवी जवळ बोलून दाखवला तेव्हा खरं माधवी ला
वाटत असते की प्रेम ला लिला पाशी जाण्यास मनाई
करावी. परंतु मनात असूनही तसं ती करू शकली नाही.
कारण तसं केल्याने आपल्या बद्दल प्रेम च्या मनात संशय
येईल नि मग आपले पुढचे सारे प्लॅन फेल होईल. म्हणून
चांगुलपणाचा आव आणत म्हणाली," चांगला विचार
केला आहेस तू ,मी देखील तुला हेच सांगणार होते. कारण
मी सुध्दा एक स्त्री च आहे , आणि प्रत्येक स्त्री च्या मनात
काय असतं हे माझ्या पेक्षा चांगलं दुसरे कोण सांगू शकेल ?" तेव्हा प्रेम ने न समजून विचारले ," म्हणजे ?"
   " म्हणजे असं की प्रत्येक स्त्री ला असंच वाटत असते की आपण आपल्या नवऱ्यावर नाराज होऊन माहेरी
गेल्यावर आपल्या नवऱ्याने आपली समजूत काढण्यासाठी आपल्या माहेरी यावे नि आपली समजूत
काढून आपल्याला परत आपल्या घरी घेऊन यावे. तेव्हा
तुला लिला ताई च्या माहेरी जायलाच हवं आहे, मी देखील
आली असते, पण मला पाहून तिचा अजूनच गैरसमज
व्हायचा आणि माझ्यामुळे तुम्हां दोघांमध्ये कलह झालेला
मला अजिबात आवडणार नाहीये. वाटल्यास ती इथं
आल्यावर मी तिची माफी जरूर मागेन." तेव्हा प्रेम तिच्या
व्यक्तव्याने इतका भारावून गेला की तो म्हणाला की, तू
आम्हां दोघा बद्दल किती चांगला विचार करतेस आणि लिला तुझ्या बद्दल वाईट विचार करते."
   " अरे , चालायचंच एक स्त्री दुसऱ्या स्त्री बद्दल कधीही
चांगला विचार करू शकत नाही. कारण प्रत्येक स्त्री मध्ये
सवती मत्सर हा असतोच. तेव्हा तू त्या बद्दल काही विचार
करू नकोस. जा आणि लिला ताईला घेऊन ये इथं."
तेवढ्यात तेथे मधुरा बाई येतात. बहुधा त्यांनी ह्या दोघांचे
बोलणे ऐकले असावे. त्या पुढे येत म्हणाल्या," प्रेम काय
ऐकतोय मी हे, तुझी बायको म्हणजे लिला तुझ्यावर रागावून आपल्या माहेरी गेली आहे, नि तू आम्हाला काही देखील सांगितलं नाहीस. मी जर इथं आता आले नसते
तर सत्य काय आहे हे मला कळलंच नसतं ? असं काय
घडलं तुम्हा दोघांत ते मला सांगशील ?"
   " काही नाही गं तिचा आमच्या विषयी गैरसमज झाला
आहे बस्स !" असे म्हणताच माधवी मनातून फार घाबरली
की आता प्रेम आपल्या नि त्याच्या नात्या बद्दल खरेखुरे
सांगून टाकतोय की काय ? असं झालं तर फार घोटाळा
होईल. परंतु त्यांना रोखू पण शकत नाही. आता मी काय
करू बरं ? असा विचार सुरू असतानाच सासूबाई ने विचारले की, तुमच्या विषयी म्हणजे कोणा विषयी ?"
आता जर मी बोलली नाही तर फार घोटाळा होईल. असा
विचार करून माधवी पटकन मध्येच म्हणाली," त्याचं काय आहे सासूबाई ?..... ती पुढे काही बोलण्या अगोदरच
मधुरा बाई तिला मध्येच रोखत म्हणाल्या की तू मला
अजिबात सासूबाई म्हणायचं नाहीये. कारण मी तुझी सासू
नाही आणि तू माझी सून नाहीयेस. माझी सून फक्त लिलाच आहे, परंतु मी तिला सून न समजता माझी मुलगी
समजते. अर्थात मी फक्त लिला ची सासूबाई नाहीतर मी तिची  आई सुध्दा आहे." त्यावर माधवी कुत्सित पणे मनात म्हणाली," तुम्ही खुशाल तिच्या आई बनून रहा.  कारण मी माझ्या आईचे स्थान तुम्हांला कदापि देणार नाही. आता राहिला प्रश्न तुम्ही माझ्या सासूबाई आहात
की नाही ? ते सुध्दा लवकरच कळेल तुम्हांला. कारण
एकदा प्रेम ने मला आपली पत्नी स्विकारल्या नंतर तुम्ही
आज नाही म्हटलात तरी  उद्या तुम्हांला माझ्या सासूबाई
म्हणून मान्य करायचेच आहे." मधुरा बाई प्रेम ला म्हणाल्या, तू सांग काय घडलं ते." तेव्हा प्रेम म्हणाला,
     "  तिला असं वाटतंय की मी तिच्या पासून दूर चाललोय म्हणून. पण तसं नाहीये. कामाच्या व्यापापाई मला तिच्यासाठी वेळ काढता येत नाही इतकंच. तिला असं वाटतं की माझं तिच्यावर प्रेमच नाही."
    " अरे , बायकांचे तसेच असते. प्रत्येक स्त्री ला वाटत
असतं की आपला नवरा फक्त आपलाच असावा. त्याच्या
वर दुसऱ्या कोणत्याही  स्त्री ने स्वतःचा हक्क सांगू नये. तुम्हां दोघांना एकाच घरात राहात असताना पाहून तिच्या मनात असे विचार येणे सहज शक्य आहे, म्हणून तू आजच आपल्या सासुरवाडीला जा नि तिची समजूत काढून तिला आपल्या घरी घेऊन ये. बरं का ?"
   " हो तेच तर करणार आहे " असे म्हणून प्रेम जसा माधवी च्या खोलीतून बाहेर पडला तश्या मधुरा बाई पण तिच्या पाठोपाठ बाहेर पडला. मायलेक जसे बाहेर पडले तसे सुंदरराव माधवी च्या बेडरूम मध्ये शिरले आणि माधवी ला उद्देशून म्हणाले," माधवी मी जे ऐकलं ते खरं आहे का ?"
   "  काय ऐकलं तुम्ही ?"
   " हेच की लिला घर सोडून माहेरी गेली आहे "
   " हो खरंय."
   " मग तर फारच चांगली कामगिरी केली आहेस तू."
   "हो ; पण आता प्रेम चाललाय तिला आणायला."
   " काहीही उपयोग नाही त्याचा."
    " तो कसा ?"
    " लिला फार स्वाभिमानी मुलगी आहे, ती कदापि
येणार नाही इथं."
    " माझं ही तसेच मत आहे. पण भीती याची वाटते की
तसं नाही घडलं तर ? म्हणजे प्रेम तिला घेऊन आलाच तर ?"
     " आणि आलीच तरी आता काही फरक पडत नाही."
     " तो कसा ?"
      " बाई, आणि बाटली ह्या दोन गोष्टीचा ज्या पुरुषाला
एकदा का नाद लागला की सुटता सुटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रेम लोहचुंबक सारखा तुझ्याकडेच खेचला जाईल बघ. तू फक्त त्याला जास्तीत जास्त त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आगीत तेल ओतण्याचे काम तू करत रहा बस्स ! बाकी लिलाच्या
बाबतीत म्हणशील तर तिच्या मानगुटीवर संशयाचे भूत
बसले आहे ते काही आता आपले स्थान सोडणार नाही.
तेव्हा चिंता करण्याचे काही कारण नाहीये. तुझे प्रयत्न
तू चालू ठेव. बस्स !" असे म्हणून ते तिच्या बेडरूम मधून
बाहेर पडले.

   ठरल्या प्रमाणे प्रेम आपल्या सासरी गेला. प्रेम ला पाहून
लिला च्या आई-वडिलांना फार आनंद झाला. त्यानी त्याचे
चांगल्या प्रकारे स्वागत केले नि त्यानी प्रेम च्या घरच्यांची
चौकशी केली. त्यावरून त्याच्या द्यानात आले की लिला ने आपल्या बद्दल आपल्या आई-वडिलांना काहीच
सांगितले नाहीये. मग त्याने देखील त्या बद्दल काही न
बोलता लिला कोठे आहे ते विचारले. तेव्हा राधाबाईंनी
लिला ला हाक मारली. लिला बाहेर आली. प्रेम ला पाहून
तिला आनंद तर झाला नाही. परंतु आपल्या आई- वडिलांना आपल्या दोघांमध्ये झालेल्या भांडण विषयी
काही कळू नये म्हणून लिला ने प्रेम चे वरकरणी हसून
स्वागत केले. नि आपल्या सासू-सासऱ्यांची चौकशी केली.
प्रेम ने पण आडेवेडे न घेता सरळ सांगून टाकले की सर्वजण मजेत आहेत, फक्त त्यांना तुझी उणीव भासत
आहे, तेव्हा मी तुला न्यायला आलोय." ती सर्वांसमोर
नाही म्हणू शकत नाही म्हणून ती काही बोलता आपल्या
बेडरूम मध्ये निघून गेली. तिथं उपस्थित असलेल्याना
वाटले की ती तयारी करण्यासाठी गेलीय. म्हणून त्याला
म्हणाल्या," आता जेवूनच निघा." त्यावर प्रेम काही
बोलला नाही. पण तो लिला च्या खोलीत निघून गेला.
प्रेम जसा तिच्या बेडरूम मध्ये शिरला तशी लिला त्यांच्या
कडे वळून म्हणाली," तुम्ही इथं कशासाठी आलात ?"
   " तुला न्यायला आलोय."
   " मी तिथं येणार नाही हे माहीत नाहीये का तुम्हांला ?"
   " मी चुकलो म्हणालो होतो ना तुला ?"
   " नुसत्या बोलण्याने काय होतंय ?"
   " मग काय करू म्हणतेस ?"
   " तिला घरातून बाहेर काढा."
   " कुणाला ?"
   " माझ्या सवती ला."
   " पण तिला तू सवत का समजते आहेस ते मला कळत नाहीये."
   " ते तुम्हाला नाही कळणार त्यासाठी स्त्री जन्म घ्यावा
लागतो."
   " हो का ? मग आपण पुढच्या जन्माला ट्राय करू तू
पुरुषाचा जन्म आणि मी स्त्री चा जन्म घेतो."
   " पुढच्या जन्माचे नंतर पाहू आधी जन्माचं ठरवा काय
करायचं ते."
    " ह्या जन्मात काय ठरवायचं आहे. ऑल रेडी आपण
आहोतच की पती-पत्नी !"
   " नक्की ?"
   "  मग शंका आहे की काय ?"
   " नुसती शंकाच नाही तर माझी खात्री सुद्धा झाली आहे."
  " कशाची खात्री ?"
   " आपल्या दोघांत तिसऱ्या व्यक्ती ने प्रवेश केला."
   " तिसरी व्यक्ती .....आणि ती कोण बरं ?"
   " माधवी तुमची मैत्रीण आणि माझी सवत."
   " पण तू तिला सवत का समजतेस ?"
   " कारण ती सवत च आहे माझी ! सवत जर नसती
तर तिने जे केले ते केले नसते."
    " तू समजतेस तसं काही नाहीये."
    " काही नाही कसं ? ती जर सरोगेसी बनायला आली
होती तर पुन्हा सरोगेसीच बनायचं होतं ना ? तुमच्याशी
तिला शारीरिक संबंध करायची काय गरज होती. मला
तर आता असं वाटू लागलंय की , तिचा गर्भपात होण्यामागे कशावरून तिचा हात नसेल ?"
    " छे छे छे ! असं का करेल ती ?"
    " तुम्हाला प्राप्त करणे हाच तिचा एकमेव उद्देश आहे."
    " मला प्राप्त करणे एवढं सोपं नाहीये."
    " सोपं नाहीये काय तिला जे हवं ते तिनं करून दाखविले. अगोदर ती तुमच्या बाळाची सतोगेट मदर
बनायला तयार झाली. त्यानंतर तुमच्याशी तिने कॉन्ट्रॅक्ट
मॅरेज करून घेतले नि कायदेशीर तुमच्या बरोबर तिने
हनिमून पण साजरे केले. अजून  काय हवाय पुरावा ?"
    " ते जरी खरे असेल तरी मला नाही वाटत त्या मध्ये
तिचे काही कारस्थान असेल."
    " नाहीच वाटणार, कारण तुम्हालाही मजा आलीच
असेलच ना, तिच्या शरीराशी खेळायला."
    " लिला काही पण बोलत जाऊ नकोस तू ?"
    " मी काही पण बोलते असं तुम्हांला वाटतंय ना, मग
एक काम करा मी तुमच्या बरोबर यायला एका पायावर
उभी आहे."
     " तिला आपल्या घरातून बाहेर काढा. मी ताबडतोब
येते तेथे."
     " तिला नाही काढू शकत मी घरातून."
     " का ?"
   " तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर बनविले आहेत ना, करार
नुसार आपण तिला एक वर्ष पूर्ण होईपर्यंत घरातून काढू
शकत नाही."
   " ठीक आहे, तिला काढता येत नसेल तर ती जोपर्यंत
घरात आहे, तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही."
    " अगं काय हा वेडा हट्ट करते आहेस ? मी तिच्याकडे
पुन्हा कधी जाणार नाही, असं वचन देतो मी तुला. मग तर
झालं ना ."
    " तुमच्या वचनावर विश्वास कसा ठेवावा आम्ही ?"
    " आता तुझा माझ्यावर विश्वासच नाहीतर मी काय
बोलू शकतो."
   " म्हणून सांगतोय की जोपर्यंत ती त्या घरात आहे तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. तेव्हा तुम्ही आल्या पावली वापस निघून जा. कारण इथं कुणालाही माहीत नाहीये की मी इथं का आली आहे ते. तेव्हा तुम्ही ही त्याना काहीही बोलू नका."
   " पण तू माझ्या बरोबर आली नाहीस तर त्यांना कळणार नाही का ?"
   " ते मी पाहीन काय सांगायचं ते. पण तुम्ही इथं थांबू नका."
    " म्हणजे तू मला माफ नाही करणार तर !"
    " माफ करण्यासारखा तुम्ही अपराध केला असता तर
नक्कीच मी माफ केले असते तुम्हांला. परंतु तुम्ही माझा
विश्वासघात केला आहे आणि विश्वासघात ची एकच शिक्षा आहे, आणि ती म्हणजे आपण दोघांनी एक छप्पर
खाली राहू नये. अर्थात तुम्ही आपल्या घरी नि मी आपल्या
घरी ! आणि खरं सांगायचं तर ही शिक्षा नाही तर आपण
दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचे घेतलेले हे प्रायश्चित्त आहे ! जुदाई का गम दोनों को भी सहना पड़ेगा ।"
    " ठीक आहे, जशी तुझी मर्जी परंतु माझी एक विनंती
मान्य करशील."
    " बोला. शक्य असेल तर जरूर करीन."
    " आजची रात्र मी इथंच तुझ्या सोबत घालवू इच्छितोय
जेणेकरून आपल्या दोघांत काय विवाद सुरू आहे हे
कोणालाही कळू नये."
    " ठीक आहे." त्यानंतर प्रेम तिच्या बेडरूम मधून बाहेर
आला नि सर्वा सोबत गप्पा मारत बसला. राज बाजारात
गेला नि मटण घेऊन आला. सोबत ड्रिंक करण्यासाठी
मदिरा पण घेऊन आला. रात्री मस्तपैकी रंगत जमली.
त्या लोकांनी स्वतः तर ड्रिंक केलीच पण आपल्या बायकांना पण ड्रिंक कारायला लावली. फक्त राधाबाईंनी
ड्रिंक नाही केली. लिला सुध्दा ड्रिंक करायला तयार नव्हती
पण प्रेम ने जास्त आग्रह केल्यामुळे तिचा नाईलाज झाला.
   " थोडी घे गं काही होत नाही. ही आजकालच्या युवा
पिढीची फँशन आहे. आणि रोज थोडीच घ्यायची आहे,
सणासुदीला एकाद्या दिवस एन्जॉय म्हणून घ्यायची बस्स !" त्यावर मोहनराव देखील म्हणाले," जावई बापू
म्हणतात तर घे. लाजायचं काही कारण नाहीये. शेवटी
नाईलाजाने एक घोट घेतला मात्र जो जोरदार ठसका
लागला नि कडवटसा लागला पण त्यानंतर मात्र तिला
असें वाटू लागले की आपण आकाशात विहार करत
आहोत की काय ? पेग वर पेग मारले नि मग झाली
नशा जेवण आटोपून नंतर झोपायला आपापल्या बेडरूम
मध्ये निघून गेले. प्रेम आणि लिला दोघेही नशेमध्ये
असल्याने दोघानाही कळलंच नाही की आपण काय
करत आहोत. भांडण विसरून दोघांनाही एकदम मस्तपैकी रात्र एन्जॉय केली नि तृप्त होऊन एकमेकांच्या
मिठीत विसावले. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा दोघांनाही आश्चर्य वाटले. तिच्या अंगावर अंतर्वस्त्र नसल्याने तिच्या द्यानात आले की आपण रात्री काय केलं
ते. पण त्याला आता इलाज काय ? ती बाथरूम मध्ये
गेली नि प्रेश होऊन बाहेर आली नि तिने प्रेम ला ही
उठविले नि विचारले," काय केलं तुम्ही माझ्या सोबत ?"
   " मी ...मी कुठं काय केलं ?"
   " लगेच विसरले देखील. तुम्हाला आठवत नाही तुम्ही
काय केलं रात्री ते."
    " तुम्ही माझा उपभोग घेतलात. तो पण मला मदिरा
पाजून. हे तुम्ही चांगलं नाही केलं."
    " त्यात वाईट काय आहे ? आपण दोघेही पती-पत्नी
आहोत. आपला दोघांचा अधिकार आहे तो."
    " अधिकार होता. पण आता नाही आहे तो. कारण
तुम्ही माझा विश्वासघात केला. म्हणून तो तुम्हाला अधिकार राहिला नाहीये. मी नशेत आहे, याचा फायदा
घेऊन तुम्ही समाज मान्य बलात्कार केला माझ्यावर. मी
तुम्हाला कधीच माफ करणार नाही."
    " माफी मागितली तरीही ?"
    " हो ; माफी मागीतलात तरीही !"
    " म्हणजे तू आज येणार नाहीस तर !"
     " एकदा सांगितलं ना, जोपर्यंत ती माधवी त्या
घरात आहे, तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाहीये."
    " ठीक आहे, तू नको येऊस माझ्या सोबत पण मी तर
येऊ शकतो ना तुझ्या घरी ?"
    " नाही. आजपासून तुम्ही सुध्दा इथं यायचे नाहीये."
    " मग मी जाऊ कुठं ?"
     " आपल्या नवीन बायको कडे."
     " एकदा सांगितले ना, ती माझी बायको नाही आहे
म्हणून."
    " मग मी पाहिलं ते काय होतं ?"
    " तू पाहिलं ते देखील खरंच होतं. परंतु आता यापुढे
तसं होणार नाही."
    " याची शाश्वती काय ?"
    " विश्वास करावा लागेल. हीच शाश्वती !"
     " ठीक आहे, आतापासून तिच्यापासून दूर राहिलात
तरच मी मान्य करेन आणि मगच मी तुम्हाला माफ करेन."
    " पाहू तर खरं ! किती कसोटीला उतरता ते."
प्रेम ने चॅलेंज केलं की मी कसोटी ला पक्का उतरेन म्हणून." त्यानंतर प्रेम जसा घरी जायला निघाला. तेव्हा
त्याला विचारणा केली की लिला ला आपल्या सोबत
घेऊन का जात नाहीयेस ?" त्यावर प्रेम म्हणाला," तिची
अजून सासरी  येण्याची इच्छा नाहीये. राहू दे तिला काही
दिवस इथेच. कारण दुसरे कारण नव्हते त्याच्यापाशी!
परंतु राधाबाई ने दरवाजा आडून चोरून सारेकाही ऐकलं.
म्हणून त्या जावयाला म्हणाल्या," थांबा. जाऊ नका तुम्ही
विचारते तिला."
   " काही विचारू नका. जेव्हा तिची इच्छा होईल तेव्हा
येऊ दे तिला मी निघतो." असे म्हणून ते जायला बाहेर
पडले. परंतु बाहेर मोटारीत बसून तिची वाट पाहू लागले
कारण त्यांना कल्पना होती की आपल्या सासूबाई लिला ला नक्कीच राजी करणार.

    लिला ची आई राधा बाई मात्र तिच्यावर रागवल्या.
त्या म्हणाल्या की , असं कधीही तडकाफडकी निर्णय
घेऊन घर सोडायचं नसतं. " तेव्हा मोहन राव म्हणाले,
   " राधा काय बोलतेस तू हे ? तिच्या नवऱ्याने चक्क
तिचा विश्वासघात केला तरी ही तिने तिथंच राहायचं.?
मला नाही पटत नाहीये." त्यावर राधाबाई म्हणाल्या,
   "  अहो, पण तिला घरात घुसू कोणी दिलं ......हिनेच ना ? मग आता तिच्या नावाचा शंखनाद करून काय उपयोग आहे ?"
    " अगं पण आई, मी फक्त त्यांना सरोगसी करायची
संमत्ती दिली होती. तिच्या सोबत अनैतिक संबंध करायला
दिली नव्हती."
    " अगं जी पोरगी लग्न झालेले नसतांना देखील सरोगसी बनायला तयार होते, त्या मागे काहीतरी कारण
असेलच ना ? उगाच का तयार झाली ती ? मुळात कसं
असतं ते माहितेय का तुला ? भटाला वसरी दिली ना,
की तो आपले हात पाय पसरायला सुरुवात करतो. तसेच झालंय तुझं. अगोदर तू तिला आपल्या बाळाची सरोगेसी
बनायला परवानगी दिलीस. ती परवानगी मिळाल्यानंतर
तिने काय केलं ? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची तुझ्या पुढे ठेवली.
मी नको म्हणत असतांनाही तू ती मान्य केलीस ही तिची
दुसरी जित आणि तिसरी जित म्हणजे ? तुला तिने
घरातून बाहेर काढलं. म्हणजेच तूच कुणाला काही
न सांगता घर सोडून आलीस. आता तिचा पुढचं प्लॅन
हे असेल की तुला प्रेम च्या जीवनातून कायमची हद्दपार
करणार नि ती जावई बापूंची ची परमनंट ली पत्नी होणार.
बघच तू. मी सांगतेय ते खरं होतंय की नाही ते."

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..