षडयंत्र ८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षडयंत्र ८ |
एक महिन्यानंतर पाळी चुकली तेव्हा ती डॉक्टराना जाऊन भेटली. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले
की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. तपासणीसाठी मात्र प्रत्येक
महिन्याला इस्पितळात यावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर खंडाळ्याला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. प्रेम लिला, माधवी आणि त्यांच्या सेवेसाठी
शारदा बाईंना खंडाळ्याला जावे लागणार होते.
आता इथून पुढे
पार्वतीबाई खूप विचार केल्यानंतर त्याना जाणवले की
आपण फार घोडचूक करत नाहीये ना , म्हणजे मुलीच्या
हट्टापायी तिला सरोगसी बनण्यास परवानगी तर दिली.
परंतु आपण जसा विचार केला तसे नाही घडले तर ! म्हणजे प्रेम ने माधवी सोबत लग्न करण्यास नकार दिला
तर ! कारण अगोदरच तो दुसरे लग्न करण्यास तयार नाहीये. ते काही नाही. मी माधवी ला प्रेम सोबत खंडाळ्याला पाठविणार नाही. माझी मुलगी माझ्या नजरे समोरच राहायला पाहिजे. " त्यावर माधवराव म्हणाले,"
" पारू , काय हट्ट आहे हा तुझा ? तुला माहितेय ना,
आपण तिला इथं ठेवू शकत नाहीये."
" हट्ट समजा नाहीतर जरूरत समजा. पण माधवी
आपल्या घरातच राहील."
" अगं पण हे कसं शक्य आहे ? लोक काय म्हणतील
आपल्याला ?"
" लोक काय म्हणतील हे आता सुचतंय तुम्हांला , ह्याचा
अगोदर विचार करायचा नको हवा होता तुम्ही ! मित्राच्या बोलण्यावर भाळलात तुम्ही ! तुमच्या ह्याच मित्राने मागच्या वेळी सुध्दा वचन दिले होते. पण शेवटी काय झालं ? त्यांच्या मुलाने त्याच्याच वैऱ्या च्या मुलीशी लग्न
केलं. अश्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास तरी कसा ठेवू शकता."
" अगं पण तुला माहीत आहे, तुझ्या पोरीच्या हट्टापायी
हे सर्व करत आहोत आपण."
" पोरीने आकाशातील चंद्र मागितला तर चंद्र आणून
देणार आहात का ? " पार्वतीबाई उद्गारली. त्यावर माधवराव काहीच बोलले नाहीत. परंतु त्यांना देखील वाटलं की आपण असं करून घोडचूक तर करत नाहीये.
आपण माधवी ला प्रेम सोबत पाठवतोय खरे ! पण माधवी
प्रेम ला हृदयात स्वतःची एक खास जागा नाही बनवू शकली तर पुढे काय ? छे छे छे ! ही ड्रिल कॅन्सल करावी
लागेल. नाही पेक्षा त्याने माधवी शी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तरी करावं. भले एक वर्षांसाठी का होईना. लोकांना सांगता तरी येईल. माझ्या मुलीचं लग्न झालं आहे म्हणून. ही योजना त्याना एकदम मस्त वाटली. त्यांनी लगेच ही योजना आपल्या पत्नी ला बोलवून दाखविली. तेव्हा
त्याना ही योजना पसंद पडली. मग त्यांनी आपल्या
मित्राला आपल्या घरी बोलवून घेतले नि आपली योजना
त्याला ऐकविली. सुंदर रावांना देखील ही योजना पसंद
पडली. त्यानी माधवरावाना आश्वासन दिलं की या संदर्भात
प्रेम शी चर्चा करीन. मगच मी तुम्हांला निर्णय देईन. असे सांगून सुंदर राव आपल्या घरी आले नि ही गोष्ट प्रथम आपल्या पत्नी शी शेअर केली तेव्हा मधुराबाई उद्गारल्या,
" तरी मला वाटलंच होतं की हे माधवराव ऐनवेळी असा काही डाव खेळणार म्हणून.....शेवटी त्यांनी तेच केलं. आता प्रेम ला कसं समजावून सांगायचे ." त्यावर सूंदर राव म्हणाले," त्याचं पण बरोबर आहे, लग्न करता मुलगी प्रेग्नेंट झाली तर बदनामी होणार नाही का त्यांची ?
म्हणून हा उपाय त्यांनी सुचवला. मला वाटतं हा उपाय
चुकीचा पण नाहीये.
" पण मी म्हणते आपली समाजामध्ये बदनामी होईल
हे अगोदर का ना सुचलं ? मला तर ह्या मध्ये काहीतरी
चाल असावी असं वाटतंय." मधुराबाईनी जो अंदाज लावला आहे, हा चुकीचा नाहीये. परंतु मधुरा समोर सुंदर
राव म्हणाले," चाल वगैरे काही नाही आहे ग त्याची तो फक्त आपल्या लेकीच्या जिद्दी पुढे मजबूर आहे बस्स "
" तुम्हांला लय भारी पुळका आहे त्यांचा ? तुम्ही त्यात
सामील तर नाही ना ?"
" काहीतरीच काय बोलतेस ?"
" तुमचा काही भरवसा देता येत नाही कधी काय कराल
ते."
" तूच जर असं म्हणाली तर दुसरा कुणी विश्वास ठेवेल का माझ्यावर ?"
" काय चुकीचं बोलले मी ते सांगा बरं ? "
" कोण चुकीचं वागलं ते नंतर ठरवू ? आज फक्त मी
इतकंच सांगू इच्छितोय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चा निर्णय संपूर्णतः
त्यांचा आहे, माझा त्यात अजिबात वाटा नाही. मला फक्त
इतकंच सांगायचं की त्यांच्या म्हणण्या प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साठी होकार दिल्याने आपलं त्यात काहीच नुकसान नाहीये. एक वर्षाचा तर प्रश्न आहे. एक वर्ष ते दोघे सोबत
पती-पत्नी सारखे राहिले तर त्यात गैर काय आहे. एक
वर्षा नंतर प्रेम संपूर्ण आपल्या सूनबाईचाच होईल ना ?
मग काय हरकत आहे ? "
" एक वर्षा नंतर लोकांना काय सांगणार ? "
" काय सांगायचं म्हणजे ? सरळ सांगायचं पटलं नाही
म्हणून घेतला दोघांनी घटस्फोट . असे अनेक लोकांशी घडतं. त्यात काय ? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ?
कोणाची बदनामी आधी होणार नाही आणि आम्हाला नातू
ही मिळेल. "
" परंतु हे प्रेम मान्य करील का ? मला तर असं वाटतं की
ह्या गोष्टीला अजिबात तयार होणार नाही. "
" त्याला कसं समजवायचे ते तुझ्यावर लागलं."
" मला त्यात अजिबात सामील करू नका."
" अगं असं काय करतेस ? तुला आज्जी व्हायची
अजिबात नाहीये का ?"
" इच्छा आहे परंतु मला नाही वाटत की तो माझं ऐकेल म्हणून ?"
" अगं प्रयत्न तर करून बघ. आणि मला काय वाटतं
माहितेय ह्या कामात जर तू सूनबाईची मदत घेतलीस तर
काम पक्के झालेच म्हणून समज. पण हां सूनबाईला कसं
राजी करायचं हे सर्वस्व तुझ्या हातात आहे."
" पण मला नाही वाटत सुनबाई ह्या गोष्टीस आपली
संमत्ती म्हणून."
" अगं तू सुनबाई ला समजावून सांग. मग सुनबाई चे काम आहे की तिने त्याला समजवायचे की ते फक्त एक वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. त्यात आपत्ती असण्याचे
कारणच नाही मुळी ! तू तिला समजावून सांगितले तर
ती नक्कीच समजेल."
" ठीक आहे, बघते प्रयत्न करून." मधुराबाई उद्गारल्या
आणि योग्य संधि मिळताच त्यांनी आपल्या सुनेला अर्थात
लिला ला सांगितले की माधवी ची आई पार्वतीबाईचे काय
म्हणणे आहे ते. प्रथम लिला वाटलं की ते लोग स्वतः
दिलेला शब्द पाळत नाहीयेत. पण त्या मागचे खरे कारण
काय आहे ते नीट समजावून सांगितल्या वर मात्र लिला ला
आपल्या सासूबाई चे म्हणणे पटले. लोकोअपवाद टाळण्यासाठी त्यांनी अट ठेवली आहे, आणि ही अट मान्य
करण्यास हरकत नाहीये. कारण पहिल्या पत्नी ला
घटस्फोट न देता दुसरे लग्न केले तर त्या लग्नास अवैध्द
लग्न म्हटलं जातं शिवाय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे सर्टिफिकेट
फक्त एक वर्षासाठी असेल. त्यानंतर त्या सर्टिफिकेट ला
किंमत शून्य ! आणि तसे पण आपल्याला माहीत आहेच
की प्रेम फक्त अपल्यावर प्रेम करतोय. त्यामुळे अश्या
किती पोरी त्याच्या जीवनात आल्या तरी त्याचं प्रेम
आपल्यावरच राहणार आहे. त्या शिवाय जोपर्यंत माझा
नि प्रेम चा घटस्फोट होत नाही तोपर्यंत कोणतीही स्त्री
प्रेम च्या जीवनात प्रवेश करू शकत नाही. असा विचार
करून तिने आपला होकार कळविला. तेव्हा मधुराबाई
म्हणाल्या," आता प्रेम ला समजवायचे काम तुझ्या हातात
आहे. " असं त्या म्हणाल्या. तेव्हा लिला ने त्याना आश्वासन तर दिले. परंतु नंतर तिच्या मनात विचार आला
की नकळत प्रेम च्या मनात प्रेम निर्माण झालं तर ! असा
विचार मनात येताच तिचे दुसरे मन म्हणाले," याचा अर्थ
तुझा तुझ्या प्रेमावरच विश्वास नाहीये. म्हणजे तुझा विश्वास
डगमगायला लागला आहे आता. पण क्षणभरच.
दुसऱ्या क्षणीच ती स्वतःशी म्हणाली," छे छे छे असं मुळीच होणार नाहीये आणि समजा झालंच तर त्याला
आपण काय करू शकतो ? तसं पण आपण त्यांना पुत्र
संतान देऊ शकत नाही. अर्थात आपण स्वतःहून त्याना
दुसरे लग्न करण्यासाठी ही परवानगी द्यायला पाहिजे
हवी होती. केवळ आपल्या वरील प्रेमामुळे प्रेम दुसरे
लग्न करण्यास नकार दिला. मग आपलं पण काही कर्तव्य
आहे किंवा नाही त्यांच्या प्रति असा विचार करून तिने
निर्णय घेतला की आपण प्रेम ला हे लग्न करण्यास राजी
करू ? आणि त्या प्रेमाने तिने गोष्ट प्रेमशी शेअर केली
तेव्हा प्रेम म्हणाला की , म्हणजे ते लोक आता आपला
शब्द पालटत आहेत तर !" तेव्हा लिला त्याला समजावून
सांगते की त्यांची मागणी अयोग्य नाहीये. कोणतीही मुलगी लग्न न करता जर ती कुणाच्या घरी राहू लागली
किंवा कुणाच्या मुलाची आई बनू इच्छित असेल तर
समाजाच्या नियमानुसार ते अयोग्यच आहे. म्हणून त्यांनी
हा उपाय सुचविला आणि मला असं वाटतं की आपल्याला
जर आपल्या प्रेमावर जर विश्वास असेल तर त्यांची ही अट
स्वीकारण्यास काहीच हरकत नाहीये." प्रेम ला अगोदर
ते मान्य नसते ; पण नंतर अनेक प्रकारे लिला ने त्याला
समजावून सांगितल्या नंतर त्याने ते मान्य केले. इकडून
जशी शुभवार्ता मिळाली तशी पार्वतीबाई खुश झाली नि
तिने आपल्या मुलीला अर्थात माधवी ला समजावून
सांगितले की असं करणं का गरजेचे आहे ते. माधवी ला
अगोदर ते पटले नाही. म्हणजे तिला वाटले की प्रेम या
गोष्टीस तयार होणार नाही. पण जेव्हा तिच्या आईने तिला
सांगितले की प्रेम ने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला आपली संमत्ती
दिली आहे, हे जसे ऐकले तसा तिचा आनंद गगनात
मावेनासा झाला. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का होईना पण प्रेम च्या
आपण पत्नी म्हणून ओळखले जाऊ दुसरे काय हवे
आपल्याला ? आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो त्याला दोन डोळे ! हा त्यातला प्रकार झाला. असे ती
स्वतःशीच उद्गारली. पण प्रेम बरोबर तिची भेट झाली
तेव्हा अगोदर तिला कसंतरीच वाटलं म्हणजे प्रेम आपल्या
विषयी काय विचार करत असेल वगैरे असा विचार तिच्या
मनात क्षणभर येऊन गेला. पण दुसऱ्या क्षणी प्रेम ने
स्वतःहून तिच्या तब्बेतीची चौकशी केली तेव्हा तिच्या
मनातील गैरसमज दूर झाला.
जश्या लग्नाच्या जोरदार तयार सुरू झाल्या ते प्रेम मानत संशय आला त्याने सरळ स्पष्ट शब्दात सांगून टाकले
की मी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला संमत्ती दिली आहे, तिच्या
बरोबर खरे लग्न करण्याची नव्हे ! " तेव्हा सुंदर राव म्हणाले," त्याना लोकांना दाखवून द्यायचं आहे की तुझ्याशी त्यांच्या मुलीचे परंपरे नुसार लग्न झालं म्हणून.
परंतु वास्तविक ते असेल फक्त नाटक जसे चित्रपटात
दाखविले जाते. अगदी तसेच. फक्त लोकांना तसे भासवण्यासाठी ! पण वास्तविक एक नाटक असेल. दुसरी
महत्वाची गोष्ट खरे लग्न जरी केले तरी त्याला मान्यता
तेव्हाच मिळते. जेव्हा पहीली पत्नी आपल्या पतीला
घटस्फोट देते. जर त्यांचा घटस्फोटच झाला नाही तर
लग्न झालं काय आणि नाही झालं काय त्याला अर्थ
काहीच नाही आणि घटस्फोट झाला तरी पहिली पत्नी
आपल्या नवऱ्या कडे का राहते असा कुणी प्रश्न कधी
विचारत नाही. कारण लोकांना माहीत. पहिल्या पत्नीला
कायदेशीर घटस्फोट दिल्याशिवाय दुसरा विवाह करता
येत नाही म्हणून घटस्फोट झाल्याचे दाखविले जाते. दोघांचे पटत जर नसते तर ती पतीचे घर सोडून गेली असती. पण तसं इथं आहे का ? तर नाही. मग कोण कशाला प्रश्न विचारील बरं ? सुंदर रावांनी त्याला पटवून
दिलं. त्यामुळे त्याचा मनातील संशय दूर झाला.
आता पुढच्या भागात पाहू की खरोखरच लग्न होते का
प्रेम समोर सत्य येते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा