षड्यंत्र ३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र ३ |
" तुम्ही तिच्या कडे फक्त एक मैत्रीण म्हणून पाहता परंतु
माधवी तुम्हाला आपला जीवनसाथीच्या रुपात पाहते. म्हणजे ती तुमच्यावर प्रेम करतेय."
" परंतु मी तिच्याकडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही."
" तुम्ही नाही पाहिलं हो , पण ती पाहते ना तुम्हाला त्या
रुपात."
" असे असेल तर मी उद्या तिला स्पष्टपणे सांगून टाकेन
की उगाच खोटी स्वप्ने पाहू नकोस."
" अहो, स्वप्न पाहायला आपण कुणाला मनाई थोडी करू शकतो ? पाहू दे तिला स्वप्न ! आपला एकमेकांवर
विश्वास आहे ना ?"
" हे काय विचारणं झालं ?"
" मग झालं तर ! कुणाला काय पाहायचं ते पाहू दे."
आत्ता या पुढे
शारदा बाईंनी आपलं काम चोख पार पाडले. ती दररोज
लीला का दुधातुन गर्भ निरोधक देत होती. त्यामुळे प्रत्येक
महिन्याला लीला ची निराशा होत होती की तिला वाटे की
ह्या महिन्यात आपल्याला नक्कीच दिवस जातील. पण तसं होतं नव्हतं. मासिक पाळी चुकत नव्हती. ती नियमित सुरु होती. त्या दोघांना भले आई-बाप बनण्याची घाई नव्हती. परंतु घरातील वडीलधारी म्हणजे प्रेम च्या आई-वडिलांना खास करून सूंदर रावांना घाई होती, कारण त्यांना लवकरात लवकर हे सिध्द करायचे होते की सुनबाई , ह्या घराला वंशज देण्यास असमर्थ आहेत. परंतु दिखावा असा करत होते की नात किंवा नातू अंगावर खेळविण्याची खूप इच्छा आहे नि पूर्ण होण्यास दिरंगाई होत आहे , आणि ते एके दिवशी म्हणाले देखील," मला वाटतं , तुम्ही दोघांनी पण एकवेळ वैधकीय तपासणी करून घ्यावी. म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे ते कळेल ना आणि एकदा प्रॉब्लेम समजला तर त्यावर लगेच उपचार ही करता येतील ना ? "आपल्या पत्नी कडे पाहत ते पुढे म्हणाले," मधु तुला काय वाटते या बाबतीत ?"
" मला काय वाटणार ? नात किंवा नातू काही पण होऊ
दे. पण तो झाला पाहिजे नाहीतर लोक नांव ठेवतात. तसं
तुम्हां दोघांना नाव नाही ठेवू शकत लोकं म्हणा. कारण की... त्या पुढे बोलण्या अगोदरच त्यांचे वक्तव्य मध्येच खंडित करत सुंदर राव म्हणाले," थांब. मी सांगतो तुला म्हणायचं आहे ते. तुला हेच म्हणावयाचे आहे ना की ह्या
दोघांना अगोदर एक मूल झालं आहे, अर्थात आपली
सुनबाई वांझोटी नाहीये. हे सिध्द होतंय त्यावरून. असेच सुचवायचे होते ना तुला मधु ?"
" अगदी बरोबर हेच सुचवायचं होतं मला."
" तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे ; पण प्रॉब्लेम काय
आहे तो माहिती आहे का तुला ? " असे बोलून त्यांनी
तिच्या कडे पाहिलं परंतु विषय लक्षात न आल्याने त्यांनी
नकारात्मक मान डोलावली. त्याचाच फायदा उचलत
ते पुढे म्हणाले," ह्या दोघांना अगोदर एक बाळ झालं
आहे ते फक्त आपल्याला माहीत आहे. लोकांना माहीत आहे काय ? नाही ना ? लोकांना तर असंच वाटणार ना
लग्न होऊन इतकीवर्षे झाली तरी त्या दोघांना मुलबाळ
झालं नाही. याचा अर्थ एकच आहे दोघांपैकी कोणीतरी
नपुसक आहे. म्हणून म्हणतोय एक वेळ वैधकीय तपासणी करून घ्या. म्हणजे मनातील शंका दूर होईल.
आणि समजा प्रेग्नशी मध्ये काही प्रॉब्लेम असलाच तर
औषधाने तो दोष दूर पण करता येतो. तेव्हा घाबरायचे काही कारण नाहीये. माझा एक मित्र आहे त्याचे स्वतःचे एक नर्सिंग होम आहे. हवी तर मी त्याची अपॉईंटमेंट घेऊन
देतो." त्यावर मधुरा बाई म्हणाल्या," घेऊ का म्हणून काय
विचारताय घ्या ना ? जेवढ्या लवकर हे काम होईल तेवढं
चांगलंच आहे. नाही का ?" त्यावर प्रेम आणि लीला यांनी
देखील समत्ती मानेने हलवून दर्शविली. सुंदर रावांनी लगेच
आपला मोबाईल हातात घेतला नि नंबर डायल केला.
आपलं डॉक्टरांशी काय बोलणे झाले हे अन्य कुणाला
कळू नये म्हणून उच्चार नीट ऐकू येत नाहीत असे दर्शवून ते एका कोपऱ्यात गेले नि त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला
आणि त्या डॉक्टराला सांगितले की माझी सुनबाई आणि
मुलगा येणार आहेत आपल्या नर्सिंग होम मध्ये वैधकीय
तपासणी करायला. त्या दोघांना वैधकीय तपासणी चे
नाटक करून रिपोर्ट काय द्यावयाचा आहे. त्या संदर्भा
विषयी सांगितले. बोलणं संपताच बोलत बोलत त्या दोघां जवळ आले नि मोठ्या ने म्हणाले की, बरं बरं आजच पाठवतो मी त्यांना." असे म्हणून फोन कट करून म्हणाले," प्रेम आणि सुनबाई तुम्ही दोघेही आजच जा मी आजची अपॉईंटमेंट घेतली आणि तेथून तुझी सासुरवाडी पण जवळ आहे, जाऊन या तेथून ही !" असे म्हणताच लीला एकदम खुश झाली कारण तिला आपल्या आई-वडिलांकडे जायला मिळणार होते. दोघेही तयार झाले नि लगेच निघाले देखील. मोटारीत बसल्या नंतर लीला च्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्सुकता उमटलेली दिसत होती. सासरीहून माहेरी जाणाऱ्या माहेरवशींनच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते. कधी एकदा आपल्या प्रिय व्यक्तींना भेटते असं झालेले असते. त्यात आणखीन मेडिकल टेस्टमध्ये खरा प्रॉब्लेम समजला की खुशी द्विगुणित हे निश्चितच होते. मोटार ड्रायव्हिंग करता मध्येच प्रेम तिच्या कडे पाहत म्हणाल्या ," क्या बात है जानेमन तुम आज बहुत खुश नजर आ रही हों ."
" खुश का नाही असणार , आज स्वतःच आप्पानी
आपल्याला परवानगी दिली."
" का नाही देणार, आख़िर पापा किसके हैं ?"
" पापा तो आपकेही हैं, सिर्फ ससुर मेरे हैं ।"
दोघेही हसतात आणि थोड्याच वेळात पटेल नर्सिंग
होम मध्ये पोहोचले. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताच
डॉक्टरांनी त्यांचे स्वागत करत म्हटलं," या मी तुमचीच
वाट पाहत होतो. बसा." तसे दोघेही त्यांच्या समोरच्या चेअर वर बसले. डॉक्टरांनी काही जुजबी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे लीला ने एकदम करेक्ट दिली. त्यावर डॉक्टर म्हणाले,
" ठीक आहे, मी तपासून नंतर काय ते सांगतो. पण रिपोर्ट उद्या मिळतील."
" डॉक्टर आजच मिळाले असते तर बरं झालं असतं."
" आजच मिळणे शक्य नाहीये. पण बघतो प्रयत्न करून
अगोदर टेस्ट तर करून घेऊ." असे बोलून लीला ला घेऊन
डॉक्टर आतमध्ये गेले आणि थोड्या वेळाने बाहेर ही आले. बसा थोड्या वेळ आणि रिपोर्ट घेऊन जा." असे
बोलून दुसऱ्या पेशंटला तपासायला डॉक्टर आंत मध्ये
निघून गेले. प्रेम आणि लीला केबिन च्या बाहेर बाकावर
बसून रिपोर्ट ची वाट पाहत राहिले. अर्धा तास निघून गेला तरी रिपोर्ट चा काहीच पत्ता नाही. लिला वाट पाहून फार कंटाळली. ती प्रेम ला म्हणाली, " रिपोर्ट साठी आपण उद्याच आलो असतो तर किती बरं झालं असतं, म्हणजे बघा ना अर्धा तास होऊन गेला अजून किती वाट पहायची?" त्यावर प्रेम तिला समजावत म्हणाला," अगं
आपण एकटेच लाडके आहोत , असं नाहीये ना ? तेव्हा
वेळ लागणारच. अजून थोड्या वेळ वाट पाहू नाहीतर मग
निघू !" असे म्हणे स्तोवर आंतून डॉक्टरांचा निरोप आला
की त्या दोघांना आंत बोलविले आहे." तसे दोघेही उठून
डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरतात. डॉक्टर त्याना बसून
घेण्याची विनंती करतात. तसे ते दोघेही त्यांच्या समोरच्या
चेअरवर बसतात. तसे डॉक्टर अविनाश म्हणाले, " हे बघा
मी तुमच्या पासून काहीच लपवून ठेवू इच्छित नाही म्हणून
सांगतोय की लीला मॅडम कधीच आई बनू शकणार नाहीत." असे ऐकता क्षणी दोघांच्या ही काळजाचा ठोका
चुकला. दोघांनाही वाटले की धरती दुभंगून त्यात आपण
गाडले जात आहोत की काय ? पण लगेच मनात एक
प्रश्न उभा राहिला की असं कसं होऊ शकते ? एक वेळ
मातृत्व लाभलंय तिला. हे जेव्हा डॉक्टराना सांगितले
तेव्हा डॉक्टर अविनाश म्हणाले ," त्यावेळीच त्या डॉक्टर
कडून थोडीशी चूक झाली होती. ती तुम्हाला त्यांनी सांगितली नाही. तुमच्या गर्भशयाला थोडीशी जख्म
झाली होती त्यावेळी जर त्या जखमेवर इलाज झाला
असता तर ही वेळ आली नसती तुमच्यावर."
" म्हणजे आता काहीच होऊ शकणार नाही का डॉक्टर ."
" हां ती जखम आता फार मोठी झाली आहे. त्यामुळे
गर्भधारणा होऊ शकणार नाही."
" पण डॉक्टर ती जखम बरी होऊ शकणार नाही का ?"
" होईल ना, पण त्या जखमेला बरी व्हायला किती
अवधी लागेल ते काही सांगता येणार नाही. मी त्यावरच्या टॅबलेट लिहून देतो त्या फक्त नित्य नियमाने घेत रहा."
असे म्हणून त्यांनी एका पेपर वर टॅब्लेट चे नाव लिहून
दिले आणि सांगितले की टॅब्लेट सकाळी , दुपारी आणि
रात्री झोपतांना एक एक टॅब्लेट घेत राहा आणि महिन्यातून एकदा चेकप ला या म्हणजे कळेल टॅब्लेट चा काही फायदा होतोय की नाही ?"
" ठीक आहे." असे म्हणून दोघेही केबिन मधून बाहेर पडले आणि काऊंटवर बिल फेड केलं आणि तेथून निघाले. पार्कींग मध्ये मोटार उभी होती. त्यात बसले नि
मोटार स्टार्ट केली. लिला च्या डोक्यात विचारांचे काहूर मांजले होते की , आता आईला काय सांगावे ? आणि
कसं सांगावे ? आपण कधीच आई होऊ शकत नाही हे
जर आईला कळलं तर आईला किती वाईट वाटेल. काय
करू मग ? आईपासून ही गोष्ट लपवून पण तर चालणार
नाही. कारण लपवून लपवून किती दिवस लपविणार एक ना एक दिवस कळेलच की सर्वांना त्या पेक्षा आपणच सांगितले तर चांगले नाही का होणार ? जरा अवघड आहे म्हणा. पण प्रयत्न तर करायलाच हवाच आहे." असा विचार करून प्रेम कडे पाहते. तसे प्रेम ने विचारले," काय गं कसला विचार करते आहेस मघापासून ?" तेव्हा लिला
काही न बोलता आश्चर्यकारक नजरेने त्याच्या कडे पाहू
लागली. तसा तो पुढे म्हणाला," हाच विचार करते आहेस
ना की, ही गोष्ट आईला कशी सांगू ? बरोबर ना ?"
" हां , पण तुम्ही कसं ओळखले ?"
" तुझ्या चेहऱ्यावरून."
" माझ्या चेहऱ्यावर काही लिहिलं आहे ?"
" हो...तुला नाही माहीत."त्यावर ती किंचित विचारमग्न
झाली. पण लगेच दुसऱ्या क्षणी म्हणाली," नाही. "
" मग राहू दे."
" अहो, राहू दे काय ? सांगा ना, कसं ओळखलंत ते ?"
" अगं तुझ्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत आहेत त्यावरून मी ओळखले. बस्स ! सिप्पल."
" अहो, मला फार टेंशन आलंय."
" त्यात टेन्शन करण्यासारखे काय आहे ?"
" म्हणजे ?"
" अगं जे खरं आहे , ते सांगून टाकायचे. त्यात घाबरायचं
काय कारण आहे ?"
" तुम्ही सांगू शकाल ?"
" हो. सांगेन ना त्यात काय एवढं विशेष आहे ?"
" मग ठीक आहे, मी सुटली."
ते दोघेही एका तासा भरात आपल्या आईच्या घरी पोचले. लेकीला नि जावयाला आपल्या घरी आलेले पाहून राधाबाई फार खुश झाल्या. त्यांनी त्या दोघांचे स्वागत केले. आदराने आंत बोलवून हॉल मध्ये सोफ्यावर बसून
घेण्याची विनंती केली. लिला तर आपल्या आईला बिलगली आणि तिच्या संयमाचा बांध फुटला. राधाबाईंनी
तिला गोंधळून विचारले," काय झालं बाळ , तुझ्या डोळ्यात अश्रू ? काही विशेष घडलंय का?" पण ती काहीच बोलायला तयार नाही. तेव्हा मग त्यांनी प्रेम कडे
पाहत विचारले," काय झालंय जावई बापू ? मला कुणी
नीट सांगेल का ?" तेव्हा विषयाला कलाटणी देण्यासाठी
प्रेम म्हणाला," काही नाही खूप दिवसांनी भेट झाली ना
तुमची म्हणून ती आपला आनंद अश्रू रूपाने जाहीर केला.
विचारा तिला असेच आहे की नाही ते." त्यावर राधाबाई
स्मित हास्य करत म्हणाल्या," असं आहे होय, मला आपलं
वेगळे काही वाटलं."
" वेगळं काही नाही."
" मग बसा तर तुम्ही दोघे मी पाणी घेऊन आली."
" नको आई, मी आणते तू बैस." असे म्हणून आपले
पाणावलेले डोळे पुसून लिला आंत गेली आणि पाणी
घेऊन आली. प्रेम ने थोडे पाणी पिऊन घेतले. त्यानंतर
राधाबाईंनी त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसून त्यांच्या घरातील सर्व माणसांची विचारपूस केली. कसं येणं केलंत वगैरे ? तेव्हा लिला ने सांकेतिक नजरेने प्रेम कडे पाहिले. तिच्या नजेरतील भाषा प्रेम समजला नि राधाबाई ना उद्देशून म्हणाला," त्याचं काय आई, आम्ही डॉक्टर कडे आलो होतो ?" इतकं बोलताच त्यांनी चिंता व्यक्त करत विचारले," काय डॉक्टर कडे ? तब्बेत खराब आहे तुम्हांपैकी एकाची ?"
" नाही नाही तसं नाही आई !" प्रेम उद्गारला.
" मग ?" राधाबाईंनी प्रश्न केला. प्रेम ने सांगण्यासाठी
तोंड उघडलेच होते ; परंतु लिला ने बोटांचा इशारा करून
त्याला थांबायला सांगितले नि मग स्वतःच डॉक्टर कडे
कशासाठी आलो नि डॉक्टर ने त्याना काय सांगितले ते
सर्वकाही कथन केले. ते ऐकल्यानंतर त्या देवाला उद्देशून
म्हणाल्या," अरे,परमेश्वरा, हे आणखीन काय माझ्या पोरीच्या नशिबात मांडून ठेवलेस. तिला कधीच सुख
मिळणार नाही का ?"
" अगं आई, देवाला कशाला दोष देतेस ?"
" मग कुणाला देऊ ? देवच करतोय ना हे सर्व ?"
" हो ; बरोबर आहे, देवच करतोय सर्व. पण प्रयत्न तर
अपणालाच करायला हवेत ना ?"
" आता काय करणार तू प्रयत्न ?"
" अगं आई , डॉक्टरांनी दिली आहेत ना औषधं त्यावर."
" पण ग्यारंटी तर नाही दिली आहे ना ?"
" अगं आई ग्यारंटी तर कुणीच देऊ शकत नाही. पण
तरी देखील प्रयत्न केला जातोच ना ?"
" बघ बाई काय ते, मी काय सांगू ....?"
" आई तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी आहे ना,
सारं सांभाळून घेईन."
" मला तर बाई काही सुचतच नाहीये."
" आई, तुम्ही काही चिंता करू नका. आम्हांला नाही बाळ
झालं तर आम्ही अनाथालय मधून एक दत्तक पुत्र अथवा
पुत्री घेऊ, त्यात काय ?" प्रेम उद्गारला. प्रेम च्या ह्या विधानावर लिला आणि राधा एकदम चमकून पाहू लागल्या. पण त्यांना ठाऊक होतं की सुंदर राव या गोष्टीस
कधीच मान्यता देणार नाहीत. म्हणून की काय त्यानी प्रश्न
केला," पण जावई बापू तुमचे वडील या गोष्टीस तयार
होतील का ?" त्यावर प्रेम म्हणाला," आई-वडील आम्हां
दोघांना बनायचे आहे, त्यांना थोडेच बनायचे आहे?"
" पण तरी देखील ते विरोध दर्शवितीलच."
" ते नंतर पाहता येईल. तुम्ही नका चिंता करू त्याची ?"
" तुम्ही खंबीर असलात तर मला कशाची चिंता ? मला
फक्त माझी लेक सुखी दिसली पाहिजे बस्स ! अजून काय
हवं असतं एका मुलीच्या आईला ?"
" मग असं समजा की आता तुमच्या मुलीचे सुख आणि
दुःख माझ्या जीवनाशी जोडले आहे, मी सुखी तर तुमची
लेक सुखी आणि मी दुःखी तर तुमची लेक दुःखी असेल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या जीवनात दुसरी
कदापि येणार नाही. मग मला मूल होवो अथवा न होवो !"
त्यावर राधाबाई एकदम खुश होत म्हणाला," इतकं जर
तुमचं माझ्या मुलीवर प्रेम आहे तर मला दुसरे काहीच
नकोय. असेच आनंदित रहा सुखी रहा." असा त्यांनी
आशीर्वाद दिला.
क्रमशः
प्रेम वचन देऊन चुकला पण त्याला काय ठाऊक नियती ने
त्याच्यासाठी पुढे काय वाढून ठेवले ते. पुढच्या भागात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा