Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

![]() |
षड्यंत्र २ |
" ठीक आहे, मग मी तुम्हांला आईच म्हणेन. पण तुम्ही
सुद्धा मला सुनबाई न म्हणता लीला म्हणा. कसं आहे
सुनबाई या शब्दात परकेपणा जाणवतो. लीला म्हटलात
तर मला असं वाटेल की मी माझ्या आईच्या घरी आहे
नि मी माझ्या आई सोबतच बोलत आहे." त्यावर त्या
इतक्या खुश झाल्या की तिच्या कांनशीलावर आपल्या
हाताची बोटे मोडून उद्गारल्या," इदा पीडा अमंगल टळो नि सदैव तुझे मंगल होवो ! गुणांची गं पोर माझी तू ! मला मुलगी नव्हती ती आज तुझ्या रूपाने इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर दोघींनी मिळून पटपट नाष्टा तयार केला नि डायनींग हॉल मध्ये डिश घेऊन आल्या. आज नोकरांच्या हाताच्या ऐवजी घराच्या स्त्री ने बनविलेले पदार्थ खाऊन तृप्त मनाने सर्वजण आपापल्या कामावर निघून गेले.
आता या पुढे
सुंदर राव आपल्या बेडरूम मध्ये आले नि विचार करू
लागले की कसंही करून लीला ला आपल्या मुलाच्या
जीवनातून दूर करायचं आहे, म्हणजे ती स्वतःच त्याच्या
जीवनातून दुर जायला हवी. कारण आपण आपल्या मित्राला तसं वचन दिले आहे. त्याची मुलगी माधवी आपल्या प्रेम वर जीवापाड प्रेम करतेय पण आपला प्रेम
आपल्याच वैऱ्याच्या मुलीला दिल देऊन बसला. त्या दोघांना दूर करण्याच्या नादामध्ये मी माझ्या मोठ्या मुलाला म्हणजेच सुधीर ला गमावून बसलो. इतकं च नाही तर त्यांच्या पत्नीने आपल्या घराशी असलेले तिचे नाते तोडून ती कायमची माहेरी निघून गेली. नुसती माहेरी गेली असती तर तिची समजूत काढून तिला घरी आणली असती ; परंतु तिने मोठ्या उधोगपती मुलाशी लग्न करून नवा संसार थाटला. आता राहिला फक्त प्रेम एकुलता एक पुत्र ह्याला गमावून चालणार नाही. परंतु त्या साठी आपल्याला फार मोठं षड्यंत्र रचावे लागणार आहे. आजचा दिवस चांगला आहे, कामाला शुभारंभ करू या काय ? असे बोलून ते त्या नोकरांनी ची वाट पाहू लागले तेवढ्यात शारदाबाई तेथे आल्या. त्यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आली. बेडरूम ची साफ सफाई करण्यासाठी त्या तेथे आल्या होत्या. तिला पाहताच सूंदर राव म्हणाले, " शारदाबाई तुला माझं एक काम करायचं आहे , करणार ना ?"
" करावे तर लागणारच आहे , कारण मी तुमच्या
उपकाराच्या ओझ्याखाली दबली जी आहे." असे मनात
बोलून पुढे उघडपणे त्या म्हणाल्या," बोला काय करायचं आहे काम ? "
" मला आधी हे सांग, सुनबाई ला रात्री दुध कोण नेऊन देतं ?"
" मीच देते. का हो ?"
" नाही. सहजच आपलं विचारलं."
" सहजच ना मग हरकत नाही."
" म्हणजे ? तुला काय म्हणायचं आहे ?"
" मी काय म्हणणार ? तुम्ही आजवर जे करत आलात
ते पाहता विचारलं , नवीन काही कारस्थान रचत नाही ना
तुम्ही ?"
" अरे वा, तू बरोबर ओळखलेस." तशी ती मनात म्हणाली," त्याचं काय आहे, पापी लोकांच्या संगतीत राहून आम्ही पण थोड्या फार शिकलो त्यांचे चेहरे कसे
ओळखायचे ते.तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव पाहून
त्यांनी बरोबर ओळखले हिच्या मनात काय सुरू आहे ते
पण तरी देखील मुद्दाम विचारले," तू एवढी का विचारात
पडलीस ? मी काही फार मोठे काम करायला सांगणार
नाहीये तुला तू छोटंसं काम करायचं आहे तुला."
" काय करायचं ते पटकन सांगा.मालकीणबाई आल्या
तर फार चिडतील त्या माझ्यावर."
" तुला एकदम छोटंसं काम करायचं आहे.तू जे दूध
सुनबाई ला नेऊन देतेस ना त्या दुधामध्ये मी देईन त्या टॅब्लेट टाकायच्या आहेत बस्स ! जमेल ना हे काम ?"
" पण त्या कसल्या गोळ्या आहेत ?"
" त्याच्याशी तुला काय करायचंय ? सांगितले तेवढं काम
करायचं बस्स !"
" ते ठीक आहे हो, पण त्याना काय झालं म्हणजे माझ्यावर येईल ना ?"
" त्या मध्ये काही विष नाहीये. तुझ्यावर यायला. काही होणार नाही तिला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या दोघांमध्ये जे बोलणे झाले ते दोघांमध्येच राहिले
पाहिजे. तिसऱ्या कोणाला जर कळलं तर याद राख तुझी
गाठ माझ्याशी आहे. हे कदापि विसरू नकोस." तिने
मुकाट्याने आपली मान डोलावली परंतु समजली की छोट्या मालकीनी सोबत काहीतरी वंगाळ करू इच्छित
आहेत. परंतु आपण त्याना नाही सुध्दा म्हणू शकत नाही.
हा फार कारस्थानी माणूस आहे काय करील आपल्या
सोबत ते पण सांगता येणार नाहीये. इकडे आड तिकडे
विहीर काय करावं ते कळत नाही. तिने पटापट सर्व कामे
उरकली नि त्यांच्या बेडरूम मधून बाहेर पडली. तेव्हा
सुंदर राव एकदम खुश दिसत होते. जणू काही त्यांचे
योजलेले काम फत्ये झालेच म्हणा. माधवी एकदा माझ्या
घरची सून झाली तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यास
कोणीच रोखू शकत नाही.
माधवी देशमुख ही प्रेम ची बालपणीची मैत्रीण ! दोघेही
एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होते. मैत्री चे
रूपांतर प्रेमात कधी झाले हे माधवी ला समजलेच नाही. परंतु तिने कधी आपले मन प्रेम समोर व्यक्त नाही केले. त्यामुळे प्रेम फक्त तिला आपली चांगली मैत्रीण समजत होता. त्याच्या मध्ये दुसऱ्या कसल्याही फिलिंग नव्हत्या. परंतु माधवी मात्र जिवापाड त्याच्यावर प्रेम करू लागली होती. प्रेम पुढील शिक्षणासाठी शहरात गेला नि तिथे कॉलेज मध्ये त्याची भेट लीला शी झाली नि तो तिच्यावरच प्रेम करू लागला. हे जेव्हा माधवी ला समजले तेव्हा ती खूप रडली नि स्वतःला दोष देऊ लागली की मी त्याला प्रपोच का नाही केलं ? तो स्वतःहून मला प्रपोच कधी करतोय याची उगाच मी वाट पाहत बसले. त्यामुळे हा सर्व घोटाळा झाला. माझं प्रेम एकतर्फी ठरले. पण हरकत नाही. सगळ्यानाच प्रेम प्राप्त होतेच असे नाहीये. माझ्या सारख्या असे कित्येक प्रेमवीर असतील की त्यांचे प्रेम अधुरे राहते. बहुधा तेच माझ्या भाळी लिहिले असावे. असा विचार करून तिने स्वतःच्या मनाची समजूत तर घातली. पण आपल्या आई-वडिलांना काय सांगणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. कारण त्यांना वाटत होते की माझ्या प्रमाणे प्रेम ही माझ्यावर प्रेम करतोय. पण जेव्हा त्याने लीला शी पळून लग्न केलं. ही खबर जशी बाबांना समजली तसे ते भयंकर चिडले त्यांनी लगेच सुंदर रावांना फोन केला नि म्हणाले," सुंदर राव काय ऐकतोय मी हे ?"
" काय ऐकलात तुम्ही ते मला कसं कळणार ?"
" वेड पांघरून पेंड गावाला जाऊ नकोस. तुला चांगलं माहीत आहे की माझी मुलगी तुझ्या मुलावर प्रेम करते.
मग तुझ्या मुलाने असं का केलं ?"
" चिंता करू नका. माझ्या घरची सून तुमची मुलगीच
होणार, पळून पळून पळणार कुठं ते दोघे ? पाताळात जरी लपून बसले ना , तर तेथून ही मी त्यांना हुडकून काढीन. कारण माझ्या वैऱ्याची मुलगी माझ्या घरची सून बनू शकत नाहीये."
" जे काय आहे ते तुमचं तुम्ही बघा पण माझ्या मुलीच्या
डोळ्यात एक अश्रू जरी आले ना, तुमच्या साऱ्या राजकीय
वाटचालीला कायमचा फुलस्टॉप लागेल. तेव्हा विचार करा
तुम्हांला काय मान्य आहे ते." असे बोलून त्यांनी फोन कट
केला. त्यानंतर सुंदर रावांनी बाबुराव आणि सुधीर ला त्या
दोघांच्या पाठीमागे लावले. शेवटी त्यांनी शोधून काढले
म्हणा. पण त्यात त्यांच्या मुलाचा जीव गेला नि प्रेम चा
स्मृतिभ्रंश झाला. म्हणून सुंदर रावांनी माधवरावांची कशी
तरी समजूत काढली की माझ्या मुलाची अगोदर गेलेली
स्मृती वापस येऊ दे मग करतो काहीतरी ! असे वचन देऊन चुकले होते. आता त्याची स्मृती तर वापस आली
परंतु ह्या घोरपडीला ( लीला ला ) त्याच्यापासून दूर कसे करावे ? तेच कळत नाही.घोरपडी सारखी त्याला चिकटून
बसली आहे. त्याला सोडायलाच तयार नाहीये. जबरदस्ती
पण करू शकत नाही. एकदा केली होती जबरदस्ती त्याचा
परिणाम ही डोळ्यासमोर आहे. पाणी किती खोल आहे
हे माहीत असूनही त्यात उडी मारली तर दुसरे काय होणार
बुडणार ना ? म्हणून असा मूर्खपणा मला अजिबात करायचा नाहीये. आणि आता जे आपण षड्यंत्र तयार केले आहे ते लाजवाब आहे, थोडा वेळ लागेल खरा ! पण
कार्य सिद्धीस जाईल हे नक्की ! असे बोलून स्वतःच्या
शातिर दिमाग ची स्वतःच तारीफ करतात. त्यानंतर बाहेर
जाण्याच्या निमित्ताने कपडे परिधान करतात आन आपल्या पत्नीला सांगतात की मी एका महत्त्वाच्या
कामा निमित्ताने बाहेर चाललोय असे सांगून घरातून
बाहेर पडले. तश्या मधुरा बाई म्हणाल्या," ऐकलंस लीला
तुझा सासरा आता फार सुधारला बरं का ? तुला माहीत
आहे त्यांनी फार वाईट स्वप्न पाहिले तसे ते दचकून उठले
नि मला म्हणाले," चल अगोदर सुनबाई आणि प्रेम क्षेमखुशल आहेत का नाहीत ते पाहू ! तेव्हा मी त्यांना
म्हटलं की , अहो, स्वप्न आहे ते. स्वप्नात पाहिलेलं खरं
थोडी असतं. पण ते ऐकायलाच तयार नाहीत. मला म्हणाले मी जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाही."
" असं काय पाहिलं स्वप्नात मामजींनी ?"
" कपडे इस्त्री करत असताना तुला शॉक लागता नि
त्यात तुझा मृत्यू झाला." असे म्हणताच लीला च्या अंगावर
भीती ने काटा उभा राहिला आणि नकळत तिच्या तोंडून
किंकाळी बाहेर पडली..... आई गं इतकं भयानक स्वप्न
पाहिलं त्यांनी " त्यावर मधुरा बाई म्हणाल्या," अगं स्वप्न होतं ते खरं थोडीच होतं ?" लीला चा अंगाला घाम फुटला. ती कशीबशी म्हणाली," तरी पण फार भीती वाटली मला."
" म्हणूनच सांगते आजपासून तू इस्त्री ला अजिबात
हात लावायचा नाही. कळलं का ?"
" मग त्यांचे कपडे कोण प्रेश करणार ?"
" त्यासाठी इतके सारे नोकर आहेत घरात ते कशासाठी ?" लीला आपली मान डोलावली नि आपल्या बेडरूम मध्ये गेली होती ; परंतु अजूनही तिच्या मनातून भीती काही गेली नव्हती.
इकडे माधवी प्रेम सोबत स्वप्न पाहण्यात दंग झाली होती. मांडव सजला आहे नवर देव केव्हाचा येऊन जानवसा ला बसला आहे आणि थोड्याच वेळात वऱ्हाड मंडळी लग्न ठरविलेल्या हॉल मध्ये आली. म्हणजे घरासमोरच मोठे मंडप उभारले होते. त्यालाच हॉल सारखे स्वरूप आणले होते. लग्न लावणारा भटजी पण उपस्थित होता. अगोदर पुण्यवंचण झाले. त्यानंतर नवरा उभा राहिला पाटावर नि त्याच्या समोर अंतरपाट धरला गेला. तीन मंगळ अष्टका म्हटल्यांनंतर माधवी नवरीच्या वेशामध्ये सजून मंडपात आली नि त्यानंतर दोघांचे लग्न लागले नि वरात वाजतगाजत नवऱ्याच्या घरी म्हणजेच प्रेम च्या घरी निघाली आहे आणि थोड्याच वेळात वरात घरी पोहोचले देखील. त्यानंतर इतर कार्यक्रम पार पडले नि रात्री मधुचंद्राच्या वेळी मात्र प्रेम तिच्या डोक्यावरील पदर काढत असतांना तिच्या कानावर तिच्या आईचे स्वर
पडले.आई म्हणाली," माधवी अग काय हे ,कोणत्या
विचारात गर्क आहेस एवढी ?" तशी ती भानावर येत
म्हणाली," कोण मी ? "
" हां तूच."
" नाही ग कसल्या नाही."
" मग ठीक आहे. लवकर खाली ये. तुझी वाट पाहताहेत."
" माझी कोण वाट पाहतेय ?"
" तुझे वडील.अजून कोण वाट पाहणार ?"
" आप्पा वाट पाहताहेत.येते म्हणून सांग." माधवी ची
आई तेथून निघून गेल्या. तशी माधवी स्वतःशीच म्हणाली,
" किती चांगलं स्वप्न पाहत होती.पण मध्ये आई ने येऊन
घाण केली." असे म्हणून लगेच देवाला उद्देशून म्हणाली,
" अरे देवा , हे माझं स्वप्नच राहणार आहे का कायम ? का कधी पूर्ण पण करणार आहेस ? कुणास ठाऊक तुझ्या
मनात काय आहे ते.पण माझ्या मनातले म्हणशील तर मला प्रेम शीच लग्न करायचं आहे, आणि प्रेम जर मला
नाही मिळाला तर मी भीष्म पितामह सारखी आजीवन
ब्रम्हचारी राहीन. अशी माझी प्रतिज्ञा आहे. पण देवा मला
खरंच ब्रम्हचारी राहायचं नाहीये. म्हणजे लग्न करायचं आहे पण प्रेम सोबतच मग त्यासाठी साम दाम, दंड यांपैकी कोणतीही नीती वापरायची तयारी आहे माझी !
असं तर नाहीये ना, म्हणजे आपण त्या दोघांच्या
प्रेमाच्या आड येतोय ? छे छे छे ती लीला तर आता काही
वर्षापूर्वी त्याच्या जीवनात आली. मी तर अगदी बालपणापासून त्याच्यावर प्रेम करतेय. हां एक चूक घडली माझ्या हातून ती चूक म्हणजे मी माझं प्रेम
त्यांच्या पुढे व्यक्त नाही केलं मला वाटलं की तो ही
माझ्यावर तितकेच प्रेम करत असेल तेव्हा त्यानेच मला
प्रपोच केलेलं बरं पण झाले उलटेच मी बसली त्याची वाट
पाहत त्याच्यावर हक्क गाजवणारी दुसरीच आली त्याच्या
जीवनात आणि मी फक्त वाट पाहतच राहिले. खरं तर माझं प्रेम आहे प्रेमवर. पण त्याचं प्रेम होतं का माझ्यावर ? याचा आपण कधी विचारच केलांच नाही. पण आता करावा लागणार त्याला एकदा भेटून स्पष्टपणे विचारू की
त्याचे पण प्रेम होतं की नाही ? असा विचार करून तिने
प्रेम ला फोन केला. प्रेम ने फोन रिसिव्ह करत विचारले की, कोण म्हणून ?" त्यावर ती त्याच्यावर रागवत म्हणाली,
" इतक्यात विसरलास आपल्या बाल मैत्रिणीला ? इतकं
वय झालं नाही तुझं अजून." असे म्हणताच प्रेम हसून
म्हणाला," ओह ! माधवी का ?"
" नशीब माझं ! माझं नाव तरी तुझ्या द्यानात आहे ते."
" म्हणजे काय तुला थोडंच विसरणार होतो मी ?"
" तुझ्या कडे संध्याकाळी वेळ आहे का थोडा ?"
" आहे. का गं ?"
" नाही म्हटलं. वेळ असेल तुझ्याकडे तर भेटू आपण
संध्याकाळी तिथंच. जिथं आपण नेहमी भेटत असू !"
" अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती नि आपण दोघेही
लहान होतो परंतु आपण दोघेही मोठे झालो आहोत
शिवाय माझं लग्न ही झालं आहे, आता असं एकांतात
भेटणे योग्य ठरणार नाहीये. लोकं काय म्हणतील ?"
" लोकांचा विचार कधीपासून करु लागला आहेस तू ?"
" अगं लोकांचा नाही , परंतु स्वतःच्या मनाला तरी पटलं पाहिजे ना ? एक म्हण आहे ना जणांची नाहीतर
मनाची तरी लाज पाहिजे माणसाला.अगदी तसंच आहे
बघ.आपण जे करतोय ते योग्य आहे का याचा विचार
करायला हवा ना ?"
" यायचं नसेल तर सरळ सांगून टाक ना, नाही जमणार म्हणून. कारणे कशाला सांगतो आहेस ?"
" त्या पेक्षा तू असं का करत नाहीस ? सरळ आमच्या
घरी निघून ये मग तुझी आणि लिलाची ओळख करून देतो." प्रेम उद्गारला. खरं तर माधवी ला त्याचा फार राग
आला. पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी तीच्या मनात
विचार आला की बोलवतोच आहे तर जाऊन तर पाहू
कोणती एवढी मोठी अप्सरा लागून गेली की जिच्यासाठी
त्याने मला लाथाडले.
माधवी प्रेम ला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. प्रेम ने
तिला पाहताच तिचे स्वागत करत म्हटलं," ये माधवी तुला
पाहून जुन्या आठवणी पुन्हा ताजा झाल्या सारखे वाटले."
" खरं सांगतोस का ?" माधवी ने मुद्दाम विचारले.
" हो खरंच सांगतोय."
" तुला ते सगळं आठवतं का ? आपण दोघेही नदी किनारे बसत असू ?"
" हो आठवते ना ?"
" फक्त इतकंच आठवते का अजून काही ?"
" अजून काय आठवणार , आपण दोघेही मित्र मैत्रिणी
होतो बस्स !"
" बाकीचं काही आठवत नाही ?"
" बाकी ....बाकी काय ?"
" बरं ते जाऊ दे .बायकोची ओळख करून देणार होतास ना ? का तेही उद्यावर ढकलणार आहेस ?"
" छे छे छे ! उद्या कशाला आताच ओळख करून देतो
तुझी." असे बोलून त्याने मोठ्या ने लीला म्हणून हांक मारली तशी लीला यातूनच आले आले म्हणत बाहेर आली. बाहेर कुणी मुलगी आलेली पाहून तिने विचारले,
ह्या कोण म्हणायच्या ?" त्यावर प्रेम ओळख करून देत
म्हणाला," ही माधवी माझी बालपणीची एकमेव मैत्रीण !"
" हो का ? " असे बोलून हात जोडून नमस्कार करत
लीला म्हणाली," आपल्याला भेटून फार आनंद झाला."
" मलाही !" माधवी उद्गारली.
" बसा. काय घेणार चहा कॉफी ?"
" काहीही चालेल."
" अगं बैस तरी ! आम्ही किती चांगले फ्रेंड होतो माहीत
आहे का तुला ?"
" ते दिसतंच आहे, तुम्हां दोघांच्या चेहऱ्यावरून. " पण का कुणास ठाऊक ? लीलाला थोडंसं जलिस फिल झालं आणि ते माधवी च्या द्यानात आलं तशी माधवी म्हणाली,
" आपल्या नवऱ्याला सांभाळ हं लीलाताई ! नाहीतर......ती पुढे बोलण्या अगोदरच लीला ने विचारले की लीलाताई ?"
" का ? आवडलं नाही हे नाव ?" माधवी ने विचारले.
" नाही नाव छान आहे, मी तुला वन्स म्हणेन हं !" लीला मुद्दाम असं म्हणाली. तशी माधवी पटकन म्हणाली," वन्स
म्हणजे मी प्रेम ची बहीण अजिबात नको."
" का हो ? बहीण हे किती सूंदर नाते आहे, आणि तुम्ही
नको म्हणताय ?"
" त्याचं काय आहे, मी त्याची मैत्रीण आहे बहीण नाहीये. हां आता तुला दुसरे नाते सापडत नसेल तर मला तुझी बहीण म्हणालीस तर चालेल मला."
" आलं लक्षात माझी बहिण म्हणजे प्रेम ची मेहुनी
म्हणजे आधी घरवाली असेच ना ?" लीला म्हणाली.
तसा प्रेम म्हणाला," काय तुम्हां दोघीचें सुरू आहे, मला बोलू द्याल की नाही ?"त्यावर माधवी म्हणाली,
" दोन बहिणीच्या भांडणात तिसऱ्या ने पडायचं नाही.
काय माधवी बरोबर ना ?"
" अगदी बरोबर ताई !" प्रेमकडे पाहत ती मस्करी ने
म्हणाली," ऐकलं का जिजाजी ! आजपासून आपलं हे
नवीन नातं कळलं का प्रेम ? "
" तुम्ही दोघेही बोलत बसा. मी आलेच." असे म्हणून
लिला किचनमध्ये जायला निघाली तश्या मधुरा बाई
तिला म्हणाल्या," लीला ही तुझ्या सासऱ्याची पसंद आहे,
हिच्या पासून जरा सावध रहा." त्यावर लीला म्हणाली, " मी समजली आई , पण तुम्ही चिंता करू नका. प्रेम ला
माझ्या पासून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाहीये."
असे बोलून ती किचनमध्ये गेली नि दूध एका पातेल्या
मध्ये ओतून गरम केले नि दोन कपात ओतून त्यात नाईस
कॉफी पावडर टाकून चमच्याने ते ढवळून व्यवस्थित मिश्नण केले. त्यानंतर एका ट्रे मध्ये ते कप ठेवून बाजूला साखरेचा छोटा डबा ठेवून ती बाहेर हॉल मध्ये आली टीपॉय वर ट्रे ठेवून माधवी विचारले," किती चमचा साखर. ?" त्यावर माधवी म्हणाली," साखर एकदम थोडीशी कारण फार गोड आवडत नाही मला."
" हो खरंय जास्त गोड खाल्याने मधुमेह होण्याचा संभव
असतो म्हणून अगोदरच काळजी घेतलेली बरी नाही का ?
प्रेम च्या चेहऱ्यावर एक वेगळंच इम्प्रेशन पडलेले पाहून
लीला म्हणाली," मी देखील कमीच गोड खाते." परंतु माधवी समजली लीला ला नेमके काय म्हणायचं ते. पण
ती स्पष्टपणे काही बोलली नाही. कॉफी पिऊन होताच
तिने त्या दोघांचा निरोप घेतला. तसा प्रेम लीला कडे पाहत
म्हणाला," तुझ्या मनात काही संशय आहे का ?"
" कशाबद्दल ?"
" हेच की आम्ही दोघेही मित्र मैत्रिणी होतो अर्थात आमच्यात काही वेगळं नातं असेल असं काही वाटलं तर
नाही ना तुला ? कारण कोणत्याही स्त्री ला आपल्या नवऱ्याची कोणी मैत्रीण आहे हे अजिबात आवडत नाही."
" तसं नाही काही मला तुमच्या मैत्री पणाचा काहीच
प्रॉब्लेम नाहीये. परंतु तुमची केवळ मैत्रीणच नाहीये. म्हणजे तिच्या दृष्टीने."
" म्हणजे ? मी समजलो नाही तुला काय म्हणायचे आहे
ते."
" तुम्ही तिच्या कडे फक्त एक मैत्रीण म्हणून पाहता परंतु
माधवी तुम्हाला आपला जीवनसाथीच्या रुपात पाहते. म्हणजे ती तुमच्यावर प्रेम करतेय."
" परंतु मी तिच्याकडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही."
" तुम्ही नाही पाहिलं हो , पण ती पाहते ना तुम्हाला त्या
रुपात."
" असे असेल तर मी उद्या तिला स्पष्टपणे सांगून टाकेन
की उगाच खोटी स्वप्ने पाहू नकोस."
" अहो, स्वप्न पाहायला आपण कुणाला मनाई थोडी करू शकतो ? पाहू दे तिला स्वप्न ! आपला एकमेकांवर
विश्वास आहे ना ?"
" हे काय विचारणं झालं ?"
" मग झालं तर ! कुणाला काय पाहायचं ते पाहू दे."
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा