पुत्र असावा ऐसा (भाग एक )
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुत्र असावा ऐसा (भाग एक ) |
कुटूंब प्रमुख म्हणजेच माळी ! अर्थात प्रत्येक घरात एक कुटूंब प्रमुख म्हणून असतोच असतो : जसा की बाग फुलविणारा माळी ! अर्थात बाग फुलविताना माळ्याला जसे फार क्षम करावे लागतात . अगदी तसेच प्रत्येक कुटूंब प्रमुखाला आपल्या कुटूंबासाठी फार क्षम करावे लागतात. अर्थात त्यांचे कर्तव्यच आहे म्हणा ते . पण असे किती कुटूंब प्रमुख आपलं कर्तव्य पार पाडत . असतील हे सांगणं जरा कठिणच आहे . कारण कित्येक कुटूंबामध्ये त्याचे कुटूंब प्रमुख मद्यपान करणारे असतात. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला अतोनात हाल सोसावे लागतात असो .
गणपतरावाचं कुटूंब म्हणजे सुखी कुटूंब असं म्हणायला काही हरकत नाही . म्हणजे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षीत केले. त्यामुळे त्यांना चांगल्या नामकीन कंपनी मध्ये नोकऱ्या सुद्धा मिळाल्या आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे गणपतरावांनी प्रत्येक मुलासाठी एक वेगळं घर घेऊन ठेवलं जस जशी त्याची लग्न झाली तस तसे त्यांना त्याचे वेगळे संसार ही थाडून दिले आणि त्या मगचा त्यांच्या उददेश एकच होता की, एकाच घरात राहून भांडण तंटा करून घरातून बाहेर पडावे आणि वेगळा संसार थाटावा . त्यापेक्षा अगोदरच वेगळा संसार थाटलेला का वाईट आहे ? असं गणपत रावांचे म्हणजे !
ESNINO Boy's Cotton Round Neck Sweatshirt
आणि एका अर्थाने त्यांचे म्हणजे योग्य सुद्धा आहे. म्हणजे कस आहे, एकत्र कुटूंब फार काळ टिकत नाही. कारण प्रत्येकाचे आचार विचार फार वेगवेगळे असतात. कुणाला काय आवडत तर कुणाला काय आवडत नाही. त्यामुळे होत काय घरात वाद विवाद सुरू होतात. नि मग भांडण करूनच घरातून बाहेर पडावं लागत . त्यामुळे घरामदये किंवा भावंडांमध्ये पूर्वी सारख्या गोडवा राहत नाही. एकाचे तोड पूवेकडे तर दुसऱ्याचे पश्चिमेकडे याला काय अर्थ आहे . त्या पेक्षा अगोदरच एकदम समजूत दार पणाने वेगळे झालेले काय वाईट ? म्हणजे एकमेका बददल गोडवाही राहतो नि आदर ही राहतो. असे गणपतरावांचे म्हणजे ! म्हणूनच की काय त्यांनी आपल्या तिन्ही मुलासाठी तीन फ्लॅट घेऊन ठेवले. एका फ्लॅट मध्ये ते स्वतः राहत होते. आणि दोन फ्लॅट मध्ये त्यांनी दोन मोठी मुलं राहत होती.
मोठा मुलगा जयंत याला त्यांनी त्याचे जसे लग्न होताच त्याला एका फ्लॅटची किल्ली दिली. आणि त्याला तिथे जाऊन राहायला सांगितलं . त्यानंतर दुसरा मुलगा विनय त्याला सुद्धा त्याचे लग्न होताच त्याच्या नावानि घेतलेल्या फ्लॅटमध्ये जाऊन राहायला सांगितले. आता राहिला धाकटा मुलगा म्हणजे शेंडेफळ अर्थात शेंडफळावर आई - वडिलांचा जास्त माया असते - असं म्हणतात आणि असेलही !
त्यांच नाव होतं विशाल . अर्थात त्याच्या नावाप्रमाणे त्याचे हृदय देखील विशाल होत असं म्हणायला हरकत नाही. आणि तो खरोखरच चांगला मुलगा होता. तो आपल्या आई-वडिलांचा फार आदर करी ! तो आपल्या मित्र - मैत्रिणींना मोट्या अभिमानाने सांगे की, माझ्या आई-वडीलासारखे चांगले आई-वडील दुसऱ्या कुणाचेच नाहीत. तेव्हा त्याचे मित्र त्याच्यावर चिडत. आणि म्हणत असत की, तुला काय म्हणायचय की, आमचे आई-वडील चांगले नाहीत? त्यावर तो म्हणायचा की, तस नाही रे, मला इतकच म्हणायचय की, माझ्या वडिलांनी जसा समजूत दारपणा दाखविला. तसाच समजूतदार पणा प्रत्येक मुलाचे आई -वडील दाखवतील तर भावा- भावांमध्ये भांडनच होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये दुरावा पण राहणार नाही. कायम त्याच्यामध्ये प्रेम आणि आपुलकी राहील त्यावर त्याच्या एक मित्र म्हणाला, तुझ्या भावंच ठीक आहे. त्यांना प्रत्येकाला एक स्वतःचा म्हणून फ्लॅट मिळाला. पण तुझं काय ? तुझ्यासाठी कुठे फ्लॅट घेतलाय तुझ्या वडिलांनी ?"
तेव्हा विशाल हसून म्हणाला," माझ्यासाठी वेगळा फ्लॅट कशाला पाहिजे?"
"म्हणजे? तू रस्त्यावर राहणार आहेस ?"
"रस्त्यावर का राहीत ? माझे आई-वडील सघ्या ज्या फ्लॅट मध्ये राहतात. त्याच फ्लॅट मध्ये मी सुद्धा राहीन."
"अरे,पण वेड्या , उड्या तुझं लग्न झाल्यानंतर काय करशील? कुठ जाशील? तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी वेगळा फ्लॅटच घेतला नाही. त्यामुळे तुझ्यावर त्यांनी अन्याय केला असं नाही वाटत तुला ?"
"मुळीच नाही. कारण भी माझ्या आई-वडीलापासून दूर राहू शकत नाही. हे त्यांना सुद्धा चांगलं माहीत आहे. म्हणून त्यांनी मझ्यासाठी वेगळा फ्लॅट घेतला नाही . कारण मी त्यांच्या सोबतच कायम राहणार."
"ते ठीक आहे रे; पण उद्या तुझं लग्न झाल्यावर तुझ्या बायकोला त्याच्या सोबत रहायच नसेल तर तू काय करशील ? सांग बरं."
"मी काहीच करणार नाही." विशाल उत्तरला .
" म्हणजे? " त्याच्या मित्राने न समजून विचारले.
" म्हणजे असं मी तिला सरळ सांगेन की, मी माझ्या आई-वडिलांना सोडून दुसरीकडे राहायला अजिबात येणार नाही. तुला माझ्यासोबत म्हणजेच माझ्या आई- वडीला सोबत रहायच नसेल तर तू आपल्या आई-वडिलांच्या घरी जाऊन राहू शकतेस."
"आणि तुला काय वाटतं? तुझे आई-वडील तुला करू देतील असं ?"
" ते असं करू देणार नाहीत . हे मला सुद्धा चांगलं माहीत आहे. म्हणून मी अगोदर माझ्या होणाऱ्या बायकोला सांगून ठेवलय की, माझ्या आई-वडिलांना मी माझ्यापासून दूर करणार नाही. तेव्हा तुला सुद्धा त्यांच्यासोबतच राहावं लागेल आणि हे जर तुला मान्य असेल तरच तू माझ्याशी लग्न कर."
"आणि ती तयार सुद्धा झाली.?"
"अर्थात."
"कोण बुवा आहे ही मुलगी? नाव सांग बरं तिचं ."
"तुला माहीत नाही का? ती कोण आहे ती?"
"म्हणजे तू प्राजक्ता बरोबर लग्न करणार?"
"अरे, जिच्याशी प्रेम केलय तिच्याशीच लग्न करणार ना ?"
"मला वाटलं माझ्यासारखे तू पण आपल्या गर्लफ्रिइंड बरोबर टाईमपास करतोयस."
"मुळीच नाही. आमच खरं प्रेम आहे एकमेकावर ."
"ते ठीक आहे रे ; पण काय रे, प्राजक्ताला हे सर्व मान्य आहे ?"
"म्हणजे काशासबंधी बोलतोयस तू ?"
"अरं म्हणजे. लग्न झाल्यानंतर तू आपल्या आई-वडीला सोबतच राहणार ते."
"माहितेय तिला."
"आणि ती तयार पण झाली ह्या गोष्टीला ?" आनीतने आश्चर्य प्रकट करत विचारले.
"अर्थात. मी अगोदरच सांगितलं होतं तिला. जेव्हा मी तिला प्रपोज केलं तेव्हाच सांगून टाकलं होतं मी तिला."
"तू म्हणजे एक्दम ग्रेटच आहेस हा."
"ग्रेट तर मी आहेच ! पण ती सुद्धा काही कमी ग्रेट नाहीये. मी जेव्हा तिला तसं म्हणालो तेव्हा तीच मला म्हणाली, विशाल खरंच मला जसा जोडीदार हवा होतास तसा तू मिळालास. म्हणजे खरं म्हटलं तर माझी इच्छाच तशी होती की, मला सासू-सासरे दीर-नणंद हवेत म्हणून . त्या शिवाय पूर्ण भरलेल्या परिवार वाटत नाही. तेव्हा मी तिला म्हणालो, मला कुणी बहीण नाही. दोन मोठे भाऊ आहेत. पण ते वेगळे राहतात. म्हणजे माझ्या वडिलांनीच त्यांना वेगळे घर घेऊन दिले." त्यावर तिनं विचारले, " असं का केलं तुझ्या वडिलांनी?"
तेव्हा मी तिला म्हणालो, " अण घरात भांडण नको व्हायला आणि आपसात प्रेम कायम राहावं . हा त्या मागचा उददत हेतू !" त्यावर ती एकदम खूष होत म्हणाली, " वा ! फार ग्रेट आहेत हं तुझे वडील." तेव्हा मी म्हणालो,
" ग्रेट तर आहेतच माझे वडील. पण एक सांगून ठेवतो मी तुला यापुढे तू त्यांना तुझे वडील नाही म्हणायचं ना आपले वडील म्हणायचे असं ?
" हो रे; पण ते तुझ्याबरोबर लग्न झाल्यानंतर ना ?"
" म्हणजे काय ? दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करण्याचा विचार तर नाही ना तुझा ?"
" छे रे, तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणामुलाबरोबर लग्न करणार मी ? मला तूच नवरा हवा आहेस ."
" होना , मग लवकरच तुझ्या आई-वडिलांना सांगून टाक मला विशालच नवरा पाहिजेच म्हणून ."
" ते मी सांगेन रे, पण तू तुझ्या आई-वडिलांना कधी सांगणार हे ? नाहीतर ते तुझं लग्न दुसऱ्याच कुणा मुलीबरोबर लग्न ठरवून मोकळे होतील."
" तसे माझे वडील मुळीच करणार नाहीत . कारण ते अगोदर आमची पसंती विचारतात आणि मग लग्न फाईनल करतात."
" ग्रेट हं!
" बरं. तू तुझ्या आई-वडिलांना कधी सांगतेस !"
" आज येतोस माझ्याघरी ?
" कशाला ?"
" अरे, मला मागणी घालायला . एवढं पण कळत नाही का तुला ?"
" खरंच येऊ ?"
"मग काय खोटं -खोटं येणार आहेस?" ती त्याची थट्टा करत म्हणाली.
" तसं नाही. गं ?
" मग ?"
" अगोदर मी माझ्या आई -वडिलांना आपल्या प्रेमाविषयी सांगतो . नि त्यांना घेऊनच तुझ्या घरी येतो तुझा हात मागायला."
" हरकत नाही. तसं कर ." प्राजक्ता म्हणाली .
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा