पुत्र असावा ऐसा ( भाग दुसरा )
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुत्र असावा ऐसा ( भाग दुसरा ) |
ठरल्याप्रमाणे विशालने आपल्या आई - वडिलांना अगोदर विश्वासात घेतले नि मग आपल्या प्रेम प्रकरणा विषयी सविस्तर माहिती दिली . तेव्हा त्याचे वडील म्हणाले, " तू स्वतःच मुलगी पसंत केली आहेस तर फारच उत्तम . आमचा पण तेवढा वेळ वाचला." असे बोलून आपल्या पत्नीकडे पाहत ते बोलले, " काय गं, बरोबर बोलतोय " हो ना, फार चांगले काम केलेस तू. पण आता एक काम कर." तेव्हा विशालने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्या म्हणाल्या , "एक दिवस तिच्या आई-वडिलांना घेऊन ये आपल्या घरी म्हणजे तिला घेऊन यायला सांग ." असं म्हणत असतानाच त्याच्या ध्यानात . आलं की, वधूच्या घरी प्रथम मंडळींनी जायचं असत . हे ध्यानात येताच त्या मध्येच म्हणाल्या, " नाही नको . आपणच जाऊ त्यांच्या घरी !" त्या नवऱ्याकडे पाहत म्हणाल्या, " होयकी नाही हो ?" " हो हो बरोबर बोलली तू. आपण जाऊ या आधी . मग ते लोक येतील . पुढची बोलणी करायला झालं .
विशालचे आई-वडील तिच्या घरी गेले. तिच्या आई - वडिलांना देखील जावई म्हणून विशाल पसंत होताच पण आज त्याच्या आई-वडिलांना ही भेटून त्यांचे फार समाधान झाले. लवकरच पुढील सर्व बोलणी पार पडली नि लग्न सुद्धा फार मोठया थाटा-माठात पार वदले.
त्यानंतर एके दिवशी सर्व मुलांना म्हणजे त्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले . नि सर्वा समोर त्यांनी आपले विचार मांडले . ते म्हणाले, " आता नीट लक्ष धा . मी काय म्हणतो त्याच्याकडे." असे बोलून ते किंचित थांबले . नि सर्वांकडे त्यांनी आपली नजर फिरवली मग पूढे म्हणाले, " आता तुमच्या धाकट्या भावाचे देखील लग्न झाले आहे . तेव्हा नियमा प्रमाणे या घराची किल्ली आजपासून त्याच्या स्वाधीन आम्ही करणार आहोत ." असे बोलून त्यांनी विशालला आपल्याजवळ यायला सांगितले . आणि फ्लॅटची किल्ली त्याच्या स्वाधीन करत ते पुढे म्हणाले, " आता राहिला आम्हा दोधांचा प्रश्नः आम्ही कुठ राहायचं ------ बरोबर ना ?" अस म्हणताच सर्वजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागतात . तेवढ्यात विशाल बोलला , " तुम्ही यापुढं ही या घरातच राहायचे आमच्या सोबत." त्यावर विशालची पत्नी देखील त्याच्या विधानाला दुजोरा देत म्हणाली , "हो बाबा . तुम्ही आमच्या सोबतच राहायचे." तेवढयात गणपतराव म्हणाले, " विशाल बेटा , अगोदर माझं पूर्ण बोलून तर होऊ दे." असे म्हणून ते सर्वांकडे पाहत म्हणाले, "आम्हाला जो कोणी आपल्या घरी ठेवील . त्याला आमच्या कडून दरमहा तीन हजार रुपये आमच्या खाणावळीचे मिळतील ." असे म्हणताच विशाल आणि त्याची पत्नी प्राजक्ता सोडून बाकी त्या दोन मोट्या मुलांचे नि त्यांच्या पत्नीचे चेहरे मात्र खुलले कारण अगोदर त्यांना वाटले होते की, आता यांचा पण खर्च आपल्यालाच करावा लागणार की काय ? शिवाय आपल्या दोघांच्या सुखी संसारात ऱ्या म्हाताऱ्या सासू-सासऱ्याची लुडबुड कशाला ? असे जणू भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. पण सासऱ्यांना मिळणारी तीन हजार पेन्शन आपल्यालाच मिळेल हे ऐकून त्यांचे चेहरे खुलले आणि ही गोष्ट गणपत्ररावाच्या ध्यानात आल्यावाचूनही राहिली नाही. परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष केलं नि आपले पुढील संभाषण सुरूच ठेवले . ते पुढे म्हणाले, " चार -चार महिने आम्ही प्रत्येकाच्या घरी राहू . तेव्हा सर्वात अगोदर आम्हाला कोण ठेवतोय बोला."
तेव्हा सर्वात मोठा मुलगा म्हणाला, "आई-बाबा , अगोदर तुम्ही आमच्या घरी राहायला या . कारण सर्वात मोठा मी आहे ना, अर्थात सर्वात अगोदर माझाच अधिकार नाही की ?"झाले. प्रथम जयंताच्या घरी जाऊन रहायचं शिक्कामोर्तब झाले. गणपतराव आणि त्यांची पत्नी सुमती मोट्या मुलाच्या घरी राहायला गेले . दरमहा तीन हजार रुपये मिळताहेत म्हणून पती-पत्नी , दोघपन एकदम खूष होते. शिवाय सुमतीबाई ना नुसतं घरात बसून खायची सवय नसल्याने त्या घरातल्या कामांना सूनबाईला म्हणजेच जयंताला मदत करू लागल्या . म्हणून जयंताने काय केले. घरातल्या काम वाल्या बाईला कामावरून काडून टाकले. त्यामुळे तिला जो पगार धावा लागायचा तोही आता वाचला . तिने जेव्हा ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली . तेव्हा तो एकदम खूष होत म्हणाला, " जयंता फार ग्रेट आहेस हा तू." त्यावर ती खूष होऊन म्हणाली, ग्रेट तर मी अगोदर पासूनच आहे. पण मी काय म्हणते. म्हणजे माझ्या डोक्यात ना, एक चागली कल्पना आली आहे. तुम्हला पटते का ती बघा."
" बरं सांग . काय कल्पना आली आहे तुझ्या डोक्यात ?"
" आपण असं केलं तर !" मी काय म्हणते,
" असं म्हणजे कसं ?"
" आपल्याच घरी आई-बाबांना ठेवून घेतले तर . म्हणजे दरमहा तीन हजार रुपये पण मिळतील . शिवाय घरकाम करायला सासूबाई आहेतच म्हणजे कामवाली बाई सुद्धा ठेवायची गरज लागणार नाही."
तेव्हा जयंत म्हणाला, " तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. पण बाबा ऐकणार नाही. शिवाय ते दोघेजण गप्प बसतील का ?"
"तुम्ही एकवेळा त्याच्याशी बोलून तर बघा ."
" नाही. ते बोलतो मी . पण मला नाही वाटत . ते तयार होतील असे . आपल्याकडे राहायला ."
" पण बोलून बघायला काय हरकत आहे ?" जयंता नाराज होत म्हणाली .
" ठिक आहे . मी बोलतो त्याच्याशी ." जयंत वैतागुन म्हणाला.
" असं रागउ नका हो, मी आपल्या फायद्यासाठीच बोलते ना ?" जयंता म्हणाली.
" जयंतला पण तिचं म्हणणे पटले . तो तिला म्हणाला," मी उड्या बोलतो आई-बाबांशी !"
तशी ती एकदम खूष होते नि त्यांच्या एकदम बिलगते तसा तोही तिला आपल्या मिठीत घेतो. पण होत काय ती दोघं बोलत असताना त्यांची पाच वर्षांची मुलगी परी दोघांच संभाषण ऐकते . म्हणजे तेव्हा ती जागी असते. पण ऱ्या दोघाना काय वाटते ती एकदम गाढ झोपली आहे . म्हणून एकांतात त्यांच बोलणं सुरू असत . पण सकाळी उठल्यानंतर परी जेव्हा केस विकरून घ्यायला आजीकडे जाते तेव्हा ती आपल्या आजीला लाडेलाडे सर्व काही सांगून टाकते . ---आजी, तुला ना माझे पप्पा आमच्याकडे ठेवून घेणार आहेत. राहशील ना आमच्याकडे ? " हो राहीन ना ? पण मला पिंकीच्या घरी पण जायला हवं ना ? ती सुद्धा माझी वाट बघत असेल ना ?" सुमतीबाई आपल्या नातीला समजावत म्हणाल्या.
त्यावर परी म्हणाली, " मग आपण काकानाच बोलवू ना, आपल्या घरी राहायला . म्हणजे पिंकी सुद्धा येईल आपल्या पप्पा सोबत. मग फार मज्जा येईल ना आम्ही डोघोजनी खूप मजा करू. माझ्याबरोबर खेळायला कुणीच नाही ना गं इथे ? बाळ आहे पण अजून लहान आहे. तो त्यामुळे तो काय माझ्याबरोबर खेळू शकत नाही."
" बरोबर आहे तुझं . आपण सांगू हा तुझ्या पप्पाना ." सुमतीबाईंनी तिची समजूत घातली .
त्यानंतर ती चिमुरडी तिची मम्मी रात्री काय काय बोलत होती ते अजाणतेपणी पटकन बोलून गेली. आपली सूनबाई आपल्या बददल काय विचार करते हे ऐकून सुमतीबाईना फार वाईट वाटले . पण त्या काहीच बोलत नाही . मात्र ही गोष्ट त्यांनी आपल्या नवऱ्यापासूनही लपवून ठेवली . कारण त्यांना ही गोष्ट कळली तर ते जयंताची चांगली कान उघडणी करतील. म्हणून त्या गप्पच राहिल्या . दुसऱ्या दिवशी मात्र जयंतने हा विषय काढलाच . पण गणपतरावांनी चक्क नकार देत म्हटलं, " नाही.तस होणार नाही . अगोदर सर्वाचं मत घ्यावं लागेल . मगच काय तो निर्णय घेता येईल." असे बोलून गणपतरावांनी तो विषय तिथंच संपविला . त्यानंतर जयंत ने त्या दोन भवांशी बोलून पाहिलं, तेव्हा विनय म्हणाला, " हरकत नाही तुझ्याघरी आई-बाबा राहत. असतील तर !" तसा जयंत एकदम खूष झाला. आपले प्लॅन यशस्वी होतंय असं त्याला वाटलं. पण जेव्हा विशालला विचारले तेव्हा विशाल चक्क नाही म्हणाला . त्याच कारण असं की, त्याच म्हणणे होते की, आई -बाबाची सेवा करायची संधी आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे."
त्यावर जयंत पटकन म्हणाला, "मला माहितेय तू हे कशासाठी बोलतोयस ते . तुला आई-बाबाची सेवा करायची हे कारण नाहीये."
"मग काय कारण आहे ?" विशालने उलट प्रश्न केला.
" त्या तीन हजार रुपयांचासाठी करतोयस ना तू हे ?
" मला त्या तीन हजार रुपयांची गरज नाहीये. आणि मी ते घेणार पण नाहीये. मला फक्त माझे आई-बाबा माझ्याकडे पाहिजेत तेव्हा नियमाप्रमाणे ते चार महिने माझ्याकडेच राहतील."
तेव्हा रागाच्या भरात जयंता नको तेच बोलून गेली. ती म्हणाली, "आई -बाबांची सेवा करायची म्हणजे, बायकोला फुकटची घरात वावरणारी कामवाली मिळणार आहे ते नाही सांगत ."
तसा विशाल भडकला . तो तावातावाने म्हणाला, " काय? म्हणजे तू आईकडून काय करू घेतेस ? ताज नाही वाटत वरून सांगायला ?"
तेव्हा जयंत चिडून म्हणाला, " लाज कुणाची कादतोस ? आणि आम्ही काम सांगत नाही तिला. ती स्वतःच करते."
" आणि तू करायला देतोयस . होय ना ? अरे, दादा, मला तुला दादा म्हणायची पण आता लाज वाटते."
" आणि मला तुला भाऊ म्हणायची पण इच्छा नाही."
" मग म्हणू नकोस तू मला भाऊ . पण या पुढे आई तुझ्या घरी राहणार नाही."
" ते तू कोण ठरवणार ? कारण ती आई आमची सुद्धा आहे ." जयंत उद्गारला .
" मग आई सारखं वागावं ना तिला . मोलकरीनी सारखं काय वागवतोयस ?"
" ते आमचं आम्ही पाहुन घेऊ. तुझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा तुझा तिच्यावर अधीकार ." असं बोलून तो आपल्या पाठीमागच्या भावाकडे वळत म्हणाला, " विनू चल जाऊ आपण आपल्याघरी !"
ते दोघेजण निघून गेले. त्यानंतर विशाल ने ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर घातली. तेव्हा गणपतराव त्याला म्हणाले, " विशु बाळ जरा शांत रहा. मला जरा पाहू दे कुणाचे काय मन आहे ते. आणि कोण कसा वागतो आमच्याशी ते पण मला पहायचय आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही तिघांजवळ ही राहू. एकाकडेच कुणाजवळ राहणार नाही."
त्यानंतरचे चार महिने दुसऱ्या मुलाकडे ते दोघं राहायला गेले. तेथेपण काही फारसा फरक नाही. ती पण तीच अवस्था . विनयने सुद्धा प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये बैकेतून काढून घेतले. त्यानंतर ते धकट्याने म्हणजेच विशाल कडे राहायला झाले. विशालची पत्नी मन मिळाऊ होती आणि प्रेमळ होती ती आपल्या सासूला काहीच काम करू देत नव्हती . ती त्यांना म्हणायची , " आई , आजवर तुम्ही फार केलेत. आता या पुढे तुम्ही फक्त आराम करायचा."
" पण मला सवय नाही आहे गं , नुसतं बसून राहायची!" सुमतीबाई उदगारल्या .
" मग एक काम करा तुम्ही!" प्राजक्ता बोलली.
" कोणतं काम?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा