पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र १५

इमेज
षड्यंत्र १५        आता तिचा पुढचं प्लॅन हे असेल की तुला प्रेम च्या जीवनातून कायमची हद्दपार करणार नि ती जावई बापूंची ची परमनंट ली पत्नी होणार. बघच तू. मी सांगतेय ते खरं होतंय की नाही ते." पुढे    " तसं नाही होणार ."    " कशावरून सांगतेस ? तसं होणार नाही."   " कारण मी तसं होऊ देणार नाहीस."    " तू इथं आणि ती तिथं कसं अडविणार आहेस तिला ?"     " त्यांनी तसं मला वचन दिले आहे."     " अगं त्यांच्या वचनाला मार गोळी ! तू तिथं असतानाही जे घडू नये ते घडलं तर तू नसतांना तर त्या दोघांना मोकळं मैदानच मिळालं समज."     " म्हणजे तुला आई तुला असं म्हणायचंय की प्रेम मला दिलेले वचन पाळणार नाहीत."     " अगं हे काय रामाचं त्रेतायुग नाहीये. दिलेले वचन पाळायला. इथं क्षणापूर्वी दिलेले वचन विसरतात. मग ह्या वचनाचं काय घेऊन बसली आहेस."    " मग काय करू म्हणतेस ?"    " जावई बापू तुला न्यायला आलेतच आहेत ना, मग जा ना त्यांच्या बरोबर."     " पण आई , मी माघार घेतली तर मी हार मानल्या सारखं नाही

षड्यंत्र १४

इमेज
षड्यंत्र १४         तेव्हा लिला म्हणाली," नकळत जी गोष्ट घडते तिला चूक झाली असे म्हणतात. पण जी गोष्ट जाणूनबुजून केली जाते तिला चूक नाही अपराध म्हणतात आणि तुम्ही फार मोठा अपराध केला आहे. माझा विश्वास तुम्ही तोडला आहे, तेव्हा त्या अपराधाची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. तेव्हा आता शांत झोपा सकाळी त्याचा निर्णय होईल. नाईलाजाने प्रेम पलंगावर जाऊन झोपला. सकाळ होताच लिला कुणाला काही न सांगता आपल्या माहेरी निघून गेली. प्रेम ने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती नाही ऐकली. सरळ निघून गेली माहेरी ! पुढे           लिला ने जसे सासरी कोणाला सांगितले नाही तसे माहेरच्या माणसांना देखील काही सांगितले नाही. त्यामुळे झाले काय ? लिला माहेरी का आली आहे हे काही कळलं नाही. त्यांना वाटलं की असेच ती हवा पालटायला आली असेल म्हणून कुणी काही तिला बोलले नाही. हां विचारण्याची पद्दत म्हणा की औपचारिकता म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या माणसांची चौकशी केली नि पुढे काय करायचं ठरविले आहेस असं तिच्या आईने तिला विचारले. तेव्हा तिने न समजून उलट आपल्या आईलाच विचारले की , कशा संबधी बोलते आहेस तू ?"

षड्यंत्र १३

इमेज
षड्यंत्र १३           तशी माधवी मनात म्हणाली ," खरंय , लिला असं करु शकत नाहीये, पण मी तर करू शकते ना ? हे तुला कुठं माहीत आहे, तुझा असाच विश्वास राहू दे माझ्यावर. तेव्हाच मी तुझ्या ह्या विश्वासाचा गैर फायदा घेऊ शकते. पण त्यासाठी मला काहीतरी मोठे प्लॅन करावे लागणार, हरकत नाही. करेन तेही करेन म्हणा. पण सध्या माझं नाव गुप्तच राहायला पाहिजे की मी इथं कशासाठी आली आहे ?" लिला देखील विचारमग्न झाली की कोणतं खरं मानावं ? शारदा बाई सांगत होते ते खरं मानावं का ? का माधवी जे सांगत आहे ते खरं मानावे ? काहीच कळत नाहीये. पुढे       प्रेम म्हणाला," पाहिलंस लिला माधवी काय म्हणाली ती तिने आपली चूक कबूल केली. स्वतःची चूक कबूल करायला पण मोठे मन लागते. आणि ते तिच्यापाशी आहे, हे तिने सिध्द केलं. तेव्हा तिच्या विषयी तुझ्या मनात काही गैरसमज असेल तर तो दूर कर. कारण तू समजत आहेस तशी ती नाहीये आणि खरं सांगायचं तर तिचं माझ्यावर असलेले प्रेम तिला हे करायला भाग पाडत आहे. नाहीतर कोणतीही कुमारिका सरोगेसी बनायला तयार होणार नाहीये."     " जाऊ दे रे , एवढं काय तिला ऐकवतो आहेस, ति

छत्रपती शिवाजी महाराज ४

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४        " त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना ?" तसे लखुजी जाधव ना रंगपंचमी दिवशी स्वतःच केलेले वक्तव्य आठवले.ते म्हणाले होते की वजीर आलम ने आमंत्रण दिले हे नुसते आमंत्रण नसते हुकूम असतो हुकूम !" तश्या त्या पुढे म्हणाल्या," उमा बाईंचा पुत्र शहाजी राजे आहेत ते, म्हणजे उमदे आणि देखणे तर नक्कीच असणार, आणि तुम्ही तर पाहिले देखील आहे, मग जरा विचार करा. वजीरे आलमला पण हेच वाटत असणार मग आपल्याला विचार करायला काय हरकत आहे, म्हणून जरा शांत डोक्याने विचार करा म्हणजे उत्तर सापडेल." असे म्हणून ते मुजरा करतात नि निघून जातात. लखुजी जाधव किंचित विचारमग्न होतात. पुढे     म्हाळसा बाई ही गोड आनंदाची बातमी आपल्या दोन्ही सवती ना ही सांगतात. त्यावर त्या दोघीही खुश होतात. आणि त्यांना देखील ही सोयरिक पसंद असल्याची त्या कबूल करतात. त्याचवेळी धाकटी मात्र आपली शंका बोलून दाखवितात. म्हणजे त्यांनी जे दौलताबादला घडलेली वार्ता त्या दोघींना ऐकवितात. त्यावेळी त्या दोघीही चिंताग्रस्त होतात. त्याच वेळी वेरुळ ला मालोजी राजेंच्या गढीवर मलिक अंबर ने पाठविलेली मिठाई घ

छत्रपती शिवाजी महाराज ३

इमेज
  छत्रपती शिवाजी महाराज ३    " असे का वाटते आपल्याला ? तुमचा बहादुर दादा तुमच्या साठी कायम दादासाहेबच असणार आहे, त्याच्याशी तुमचे असलेले नाते बदलणार आहे का ? त्याच्या नावापुढे फक्त तुमच्या आबासाहेबांच्या नावाच्या ऐवजी जगदेव रावांचे नाव लागणार आहे बस !" हे बोलत असताना त्यांच्या आवाजा मध्ये जो कातर पणा दिसला. तो काही जिजाऊंच्या नजरेतून सुटला नाही म्हणूनच की काय त्यांनी म्हाळसा बाईंना अचुक प्रश्न केला  की, आऊ साहेब आपण कोणाची समजून काढताय माझी का स्वतःची ?" पुढे    म्हाळसा बाईंना राग आलेला असतो. म्हणून त्या त्रागाने उद्गारल्या की, " म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला ?" त्यावर जिजाऊ उद्गारल्या की,  " आम्हाला म्हणायचंय की आपल्याला ही हे पटत नाहीये मग हा अट्टहास का ? आणि कशासाठी ?" त्यावर म्हाळसा  बाई उद्गारल्या मी,    " हे आम्ही का करत आहोत हे तुम्हाला आता नाही कळणार , कारण ते समजून घेण्या एवढं तुमचं वय नाहीये.तुम्ही जेव्हा मोठ्या व्हाल ना तेव्हा कळेल की आम्ही असं का केलं ते. कधी कधी आपल्या हृदयावर दगड ठेवून असे नाईलाजाने निर्णय घ्यावे लागतात

षड्यंत्र १२

इमेज
षड्यंत्र १२           आपले भांड फुटेल म्हणून चटकन सुंदर राव म्हणाले,     "  शारदा बाई असं मुळीच करणार नाही. मला वाटतं तुझ्या मनात जलीश भावना निर्माण झाली असावी. होतं असं कधी कधी ! आपल्या वाट्याचे सुख जेव्हा दुसऱ्या मिळते तेव्हा अशी जलीश भावना निर्माण होते. तेव्हा सुनबाई आम्ही तुला दोष देत नाही आहोत. पण या पुढे तू माधवी पासून दूर रहा. बस एवढीच अपेक्षा ! लिला स्वतः निर्दोष असल्याचे सांगते. पण कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास करत नाही. पुढे     लिला आपल्या बेडरूम मध्ये बसली नि झाल्या गोष्टी बद्दल विचार करू लागली की, मी तर दुधा मध्ये काहीच टाकले नव्हते मग असं झालं कसं ? शारदा बाईचे तर हे काम नसेल ना ? पण त्या असं का करतील ? कारण त्यात त्यांचा काय फायदा होणार आहे ? आणि असं पण तिनं हे दूध आपल्यासाठी बनविले होते. तिला हे थोडेच माहीत होते की हे दूध आपण माधवी ला देणार आहोत ते. ? काय कारण असावं ? असं तर नाही ना की हे दूध आपल्याला मूल होऊ नये म्हणून दिलं जातं. बहुतेक असंच कारण असावे ? पण असं का करेल ती ? तिच्या कडून कोणी हे काम करवून तर घेत नसेल ना ? खरं आहे ते आता तिच्या कडूनच क

षड्यंत्र ११

इमेज
षड्यंत्र ११   " हो, खरंय. काळानुसार सर्वकाही बदलतं बदलत नाही ती फक्त लोकांची हौस ? ती कायम तशीच राहते. तरुण पणातही आणि म्हातारपणातही !"    " चला आता हा विषय इथंच संपवा " राज उद्गारला. तेवढ्यातच ट्युशन ला गेलेला समीर ही आला आपल्या आत्येला पाहून फार खुश झाला. आता इथून पुढे        आणि त्याने विचारले, " आत्या तू कधी आलीस ?"      " मी मघाशीच आली. खूप वेळ झाला मला येऊन. पण तू कसा आहेस आणि  तुझा अभ्यास कसा चालला आहे, ते सांग."    "  एकदम झक्कास !"    " छान !" लिला उद्गारली.    लिला ला सर्वांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची काही गरज नाहीये. कारण त्या मध्ये सुंदर राव आणि माधवराव यांची काहीतरी चाल असू शकते. पण लिला चे म्हणणे होते की जोपर्यंत प्रेम माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कशाचीच चिंता करण्याची गरज नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची चाल जरी असली तरी आम्हां दोघांचा घटस्फोट झालेला नाहीये. त्यामुळे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला काही अर्थ नाहीये." त्यावर मोहनराव म्हणाले," आम्हाला जे वाट

षड्यंत्र १०

इमेज
षड्यंत्र १०      " बघ बाई ! मला तर बाई या मध्ये सुंदर चे नवीन काहीतरी डाव दिसतोय. कारण तो माणूस दिसतो तसा नाहीये. कपटी तर आहेच. पण त्या पेक्षा भयंकर दृष्ट माणूस आहे." आता इथून पुढे " नाही गं आई, तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. नाही. मला मान्य आहे, सुरुवातीला सासरेबुवा फार वैऱ्या सारखे वागले आमच्याशी ! पण आता त्यांच्या मध्ये खूप म्हणजे खूपच परिवर्तन आले आहे, किती चांगले वागतात ते आता माझ्याशी ! तुला सांगून खरे वाटणार नाहीये."     "  तू काहीही म्हण. पण मला नाही पटणार ते. कारण तो जसा माझ्याशी वागला आहे, तसा एखादा वैरी सुद्धा तसा वागला नसता."    " म्हणजे काय केलं त्यांनी तुझ्या सोबत "    " जे करायला नको ते त्यांनी केलं आहे माझ्याशी !"    " मॉम, आता तू नीट सांगणार आहेस का मला ?"    राधाबाई आपल्या लेकीला आपला भूतकाळ सांगणारच असतात. तेवढ्यात तेथे मोहनराव आले त्यांनी त्या माय लेकीचं बोलणे ऐकले. म्हणून त्यांनी मध्येच खो घातला. नि आपल्या लेकीला म्हणाले," अगं लिला काय ऐकतेस त्या तिचं. मी काय सांगतोय ते ऐक." असे बोलून