महाभारत १२७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १२७ |
महाभारत १२७
सत्यभामा आपल्या रथातून खाली उतरली नि आपली
तलवार घेऊन विद्युत तारांपाशी आली नि आपल्या तलवारीने
विद्युत तारांचे मायाजाळ तोडले. अग्निचा भडका उडाला परंतु सत्यभामेला मात्र काहीच अपाय झाला नाही आणि
विद्युत तारांचा प्रतिकार मात्र संपला. ही वार्ता जशी नरकासुर ला पोहोचली. तसा तो चिडून म्हणाला ," हाच केला होता का
बंदोबस्त ?" त्यावर मुर म्हणाला ," तुझा मृत्यू तुला इथं घेऊन
आला आहे , तू इथं आलास खरा .परंतु इथून वापस मात्र
जाऊ शकणार नाहीस." त्याच वेळी युध्द भूमीवर मात्र सत्यभामा वासुदेव कृष्णा जवळ जाऊन म्हणाली ," वासुदेव
सर्व बाधा आता समाप्त झाल्या आहेत." त्यावर वासुदेव कृष्ण सेनापतीला म्हणाले," सैन्याला सावधान करा."
सेनापतीने लगेच त्यांच्या आदेशाचे पालन केले. त्यानंतर
वासुदेव कृष्णाने युध्द आरंभ होण्यापूर्वीचा शंक फुंकला.
तसे तिकडून नरकासुर , मुर, आणि मोर्वी आपल्या सैन्यासह
हजर होतात. तेव्हा वासुदेव त्याला अजून एक संधी देण्याचा
विचार करून म्हणाले ," अहंकार पेक्षा नम्रता आणि युध्दा पेक्षा शांती सर्वात उत्तम मार्ग आहे, अहंकारामुळे केवळ एक
माणसाचा विनाश होतो आणि युध्दा पासून सामोहीक लोकांच्या विनाशाला निमंत्रण देतो. माता अदिती चे कुंडल
आणि वरुण देवाचे छत्र चोरी करून अपराध केला आहेस,
जर तू माता अदिती चे कुंडल आणि वरुण देवाचे छत्र परत
देत असशील आणि पृथ्वीवरच्या अपहरण करून आणलेल्या नारीना मुक्त करत असशील तर तुला मी क्षमा
करेन." त्यावर तो हसून म्हणाला ," मी जरासंध नाहीये वासुदेव मी नरकासुर आहे मी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण केल्या शिवार राहणार नाहीये. म्हणून मी माता अदिती चे कुंडल ठेवून वरुण देवाचे छत्र लावून कुमारीका कन्यांचा भोग घेतल्या शिवाय राहणार नाहीये."
" पापी लोकांची प्रतिज्ञा विंचू सारखीच असते. तो दुसऱ्यांना आपली नागी मारतो , परंतु त्याला हे माहीत नाही
की त्याचा शेवट सुध्दा स्वतःच्या नागी मुळेच होतो."
" आम्हाला आपल्या गोड वाणी भुलवू नकोस. आक्रमण
करा."
" आक्रमण तर होईलच तुला आता शासन केल्याशिवाय
राहणार नाहीये." असे म्हणून वासुदेव ने आपले धनुष्य उचलले नि युध्दाला सुरुवात झाली. वासुदेव कृष्ण आणि
नरकासुर , सेनापतीचे सेनापती बरोबर तर मोर्वी चे सत्यभामेशी युध्द झुंपले. तेव्हा मोर्वी ,सत्यभामेला म्हणाली,
" तुला काय वाटलं की माझी एक शक्ती तोडलीस म्हणजे
युध्द जिंकलेस ? आता माझी शक्ती पहा." घमासान युध्द झाले शेवटी नरकासुरचा वासुदेव ने वध केला. तर दुसरीकडे
सेनापती मुर ने सेनापतीचा वध केला. तेवढ्यात वासुदेव
कृष्णाची नजर सेनापती मुर पडली. तसा सेनापती मुर
पळतच आपल्या रथावर चढला. नि धनुष्य उचलले. पण तेवढ्यात श्रीकृष्णाचा बाण सरळ त्याच्या छातीत शिरला.
आणि मुर गतप्राण झाला. आपल्या पित्याचा वध झालेला
पाहून मोर्वी आपल्या पित्या जवळ आली. नि रागाने म्हणाली, " माझ्या पित्याचा वध केलास आता मी तुला जिवंत सोडणार नाही." असे म्हणून आपले डोळे मिटले नि
कामाख्या देवीचे स्मरण केले. तसे तिच्या हातात देवी ने वरदान रुपात दिलेले खड्ग आले. ती ते खड्ग घेऊन वासुदेव कृष्णाचा वध करायला निघाली. वासुदेव कृष्ण
आपल्या रथातून खाली उतरले नि सरळ उभे राहिले. मोर्वी
त्यांच्या जवळ येताच कामाख्या देवी प्रगट झाली नि म्हणाली,
" थांब. काय करायला निघालीस ?"
" मी आता ह्यांचा वध करणार ?"
" कुणाचा ? वासुदेवांचा ....अरे मूर्ख ज्यांच्या दर्शनाने मोक्षाचे द्वार उघडतात. ह्यांच्या चरणामृताने दुःखी माणसाचे
दुःख निवारण होते. जे पापी लोकांचे संहारक , दुर्बलाचे साहयक, दुखीयांचे दुःख निवारक आहेत , ह्यांच्या हातून
ज्यांचा वध झाला ते जीवन मरणच्या फेऱ्यातून मुक्त झाले.
अर्थात नरकासुर आणि मुर भाग्यवान होते. जे जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झाले. आण ते खड्ग ?"
" तू देवी असून आपले वरदान परत घेतेस ?"
" हां ह्याच्या मध्ये तुझा नि माझा दोघांचाही सन्मान आहे,
कारण हे खड्ग श्रीकृष्णासाठी एक मुलांच्या खेळातील एक खेळणं सिद्ध होईल , कारण ह्या खडग्याचा ह्यांच्यावर कोणताही प्रभाव पडणार नाहीये. म्हणून मी हे शस्त्र तुला वापरायला परवानगी देत नाहीये."
" पण का ?"
" कारण हे खड्ग लक्ष्मी देवीने मला दिलं होतं. आणि लक्ष्मी देवी विष्णू देवांची पत्नी आहे, आणि श्रीकृष्ण विष्णू
देवांचे अवतार आहेत , मग मला सांग, पत्नीचे शस्त्र तिच्या
पतीवर प्रभाव टाकू शकणार आहे का ?"
" तुम्ही सुद्धा देवी आहात म्हणून श्रीकृष्णाचा पक्ष घेत
आहात."
" नाही. तू पुत्री आहेस , म्हणून मी तुझा पक्ष घेत आहे, तुला माहीत नाहीये. ह्यांच्या गुणा विषयी! म्हणून तू ह्यांचे चरणस्पर्श कर, तुझे कल्याण ह्यांच्या चरणस्पर्श केल्यानेच होईल. तू एक स्वत:साठी पती शोधत होतीस ना ?"
" हां !"
" मग जा ह्यांचे चरणस्पर्श कर , तुझी मनोकामना श्रीकृष्ण
पूर्ण करतील." असे कामाख्या देवी ने सांगितल्या नंतर मोर्वी ने ते खड्ग देवीला देऊन टाकले. तशी देवी गुप्त झाली. त्यानंतर मोर्वी ने खाली वाकून श्रीकृष्णाचे चरण पकडले.
तेव्हा श्रीकृष्णाने तिला सौभाग्यवती भव ! चा आशीर्वाद दिला. तेव्हा ती म्हणाली ," जर मला आपल्या सारखा पती
मिळाला तर माझे जीवन धन्य होईल." तेव्हा श्रीकृष्ण उद्गारले, " नर आणि नारी चा एकच संबंध असत नाही मोर्वी
जसे की प्रत्येक फुल झाडांना वेगवेगळ्या रंगांची फुले नि
त्यांचा वेगवेगळा सुगंध असतो. तसेच नर आणि नारी साठी सुध्दा त्यांच्या स्वभावा नुसार वर आणि वधू सुध्दा ठरलेला असतो. तू पुत्री आहेस, अर्थात पिता या नात्याने तुझ्यासाठी
वर शोधायचे आता माझे कर्तव्य आहे. आणि ते निश्चितच
पार पाडीन. आता मला सांग अपहरण केलेल्या कन्या कुठे
आहेत ?" त्यावर मोर्वी म्हणाली ," चला तुम्हांला दाखवते."
असे म्हणून ती श्रीकृष्णाला स्वतः सोबत घेऊन गेली.
राजदरबारात आल्यानंतर वासुदेव कृष्णाला आसनावर बसायला सांगितले. नि लगेच द्वारपाल ला आदेश दिला की
कारागृहात जाऊन कन्याना घेऊन ये जा." द्वारपाल गेला नि
कारागृहातून सर्व कन्याना घेऊन आला. तेव्हा वासुदेव म्हणाले," आपण आता सर्वजणी मुक्त आहात,कारण नरकासुराचा वध झाला आहे."
" आम्ही आपले आभारी आहोत वासुदेव. परंतु आता
आम्ही जाणार कुठे ?"
" कुठे म्हणजे आपल्या घरी ! आपल्या परिजनाकडे."
" तिथं आम्हाला कुणी स्वीकारणार नाही."
" का ?" मोर्वी ने न समजून विचारले.
" आमचं अपहरण केलं गेलंय. आता आमचा समाज आम्हाला स्वीकारणार नाही." एकजण म्हणाली.
" त्याना माहीत नाहीये का ? की अपहरण बळजबरीने केले आहे ते. " मोर्वी ने विचारले.
" ते जरी खरे असले तरी समाज ते मान्य करत नाहीये."
" नरकासुराच्या पापी हाताचा स्पर्श होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने आपल्या लोकांची मुक्तता केली आहे.
" सत्यभामा आपल्याला तर माहीतच आपला समाज
कधी विश्वास करत नाही. देवी सीता मातेचा कुणी विश्वास
केला नाही तिथं आमच्या सारख्या सामान्य कन्याचा कोण
विश्वास करणार ? आता आम्हाला एकतर वेश्यालयात जावे
लागेल किंवा आत्महत्या करावी लागेल."
" नाही. असे कदापि होणार नाहीये. वेश्यालये मानवाने
आपल्यासाठी बनविलेले नरकाचे द्वार आहे आणि आत्महत्या भ्याडपणाचे लक्षण आहे." श्रीकृष्ण उद्गारले.
" तर मग आपणच आम्हाला आपल्या दासी बनवा."
" नाही. स्त्री दासी बनण्यासाठी जन्म घेत नाहीत. स्त्री चे
केवळ तीन रूप असतात. कन्या, माता आणि पत्नी !"
" माता आम्ही बनू शकत नाही कारण आम्ही कुमारिका
आहोत. कन्या बनून आमच्या समस्या चे निवारण होणार नाहीये आणि पत्नी आम्हाला बनविणार कोण ?"
" आम्ही आपल्या सर्वांचा आपल्या राणी म्हणून घोषित
करतो." त्यावर त्या साऱ्या जणी श्रीकृष्णाचा विजय असो.
अशी घोषणा करतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ," पण एक गोष्ट द्यानात ठेवा. हा सन्मान आम्ही तुम्हांला यासाठी देत
आहोत की तुमच्या कडे कुणी हीन दृष्टीने पाहू नये. तुम्हां
लोकांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी देत आहोत. उद्याचा इतिहास तुम्हां साऱ्यांना आमच्या राणी म्हणून ओळखतील. या व्यतिरिक्त तुमच्यात नि माझ्यात
कोणताही संबंध असणार नाहीये." तश्या त्या खुश होऊन
श्रीकृष्णाचा जयजयकार करत निघून गेल्या. तश्या मोर्वी
आणि सत्यभामा पुढे येतात. मोर्वी दोन्ही हात जोडून म्हणाली," मला आता समजलं की सारा संसार आपल्याला
ईश्वर का संबोधतोय. "
" मोर्वी आता आम्हाला माता अदिती चे कुंडल आणि
वरुण देवाचे छत्र प्राप्त करायचे आहे. " तेवढ्यात सक सेवक
माता अदिती चे कुंडल आणि वरुण देवाचे छत्र घेऊन आला.
तशी मोर्वी म्हणाली ," घ्या प्रभू आपण स्वीकार करा."
तेवढ्यात तेथे देवराज इंद्र प्रगट होतात. आणि वासुदेव कृष्णाला प्रणाम करतात. तसे वासुदेव ही प्रत्युत्तर म्हणून
इंद्र देवाला प्रणाम करतात. आणि उद्गारले ," वासुदेव आपल्या
विजयाची वार्ता देव लोकांत पोहोचली. आपण नरकासुर चा
वध करून देव लोकांवर फार उपकार केले आहेत. म्हणून
देवलोक वाशियानी आपल्याला मुरारी ही नवीन पदवी बहाल
केली आहे, आजपासून आपल्याला मुरारी या नावा ने सुद्धा
ओळखले जाईल." तेव्हा वासुदेव म्हणाले ," इंद्रदेव हे घ्या
माता अदिती चे कुंडल, आणि वरुण देवचे छत्र." इंद्रदेवाने त्या
दोन्ही वस्तू स्वीकारल्या नि तेथून प्रस्थान केले. त्यानंतर श्रीकृष्ण , सत्यभामा आणि मोर्वी राजवाड्याच्या बाहेर आले.
तेव्हा श्रीकृष्ण ,मोर्वी ला म्हणाले ," आजपासून हे प्रागज्योतिषपूर तुझ्या स्वाधीन करत आहोत."
" मला राज सिंहासन अजिबात लालसा नाहीये."
" ठाऊक आहे ते मला. आम्ही इथं राहू शकत नाही. अर्थात आता ते तुलाच सांभाळायचे आहे. आम्हाला इथून
जावे लागणार आहे, परंतु असं समजू नकोस की आम्ही
तुला दिलेले वचन विसरलो आहोत, तुला एकदा आपली पुत्री
मानल्या नंतर तुझ्यासाठी योग्य वर शोधण्याची आता पूर्ण
जबाबदारी आता माझ्या वर राहील.योग्य वर मिळताच मी
त्याला तुझ्याकडे पाठवून देईन."
" मला दुःख तर या गोष्टीचे वाटते की आपल्याला चार आठ दिवस आपल्या कडे ठेवून आदर सत्कार करू शकले
नाही."
" नाही आम्हाला आता जाणे आवश्यक आहे." तसा तिने
त्याना प्रणाम केला.वासुदेव ने तिला आशीर्वाद दिला.त्यानंतर
ते दोघे तेथून निघाले. आपल्या रथावर आरूढ होताच आपल्या सैनिकांना चलण्याचा आदेश दिला. ते आपल्या
सैनिकांसह निघाले तशी मोर्वी त्यांच्या पाठमोरी आकृती कडे
पाहतच राहिली.जोपर्यंत ते लोक दृष्टीआड होत नाहीत तोपर्यंत."
एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या सारथी सोबत हिडींबा च्या
झोपडी समोर त्यांचा रथ आला तरी हिडींबा चा त्यांच्या कडे लक्षच नसतो.ती कुठंतरी सुन्यात पाहत असल्या सारखे जाणवले. तिच्या समोर जाऊन उभे राहिले नि मग म्हणाले,
" वहिनी !" असे म्हणता च भानावर येत म्हणाली ," वासुदेव
प्रणाम वासुदेव " असे म्हणून उठून उभी राहिली.वसुदेव
कृष्णाने आशीर्वाद देत म्हटलं ," कल्यांणावस्तू !"
आपण मला दर्शन दिले हे माझे भाग्यच मी समजते आणि आपल्या या पवित्र पद स्पर्शाने आमची झोपडी पावन झाली ." त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले," वहिनी मी आज आपल्याकडे काहीतरी मागायला आलोय."
" जे साऱ्या संसार ला देतात त्याना मी काय देवू शकते बरे ?"
" वहिनी आपण स्त्री आहात , ईश्वर नंतर एक स्त्री च आहे
की जिने प्रेम , माया, ममता दिली आहे.मानवच नाहीतर देवता सुद्धा स्त्री चे आभारी आहेत, कारण ते सुद्धा एका स्त्रीच्या च पोटी जन्म घेतात. म्हणून नारी सदैव आदरणीय आहे." त्यावर हिडींबा उद्गारली ," माझे प्राण जरी आपल्या
कामी आले तर ते मी आपले भाग्य समजेन.मागा वासुदेव !
माझयाकडे जे काही आहे ,ते आपणच तर दिले आहात ना ?" तेव्हा वासुदेव म्हणाले ," मला आपला पुत्र पाहिजे
घटोत्कच !" त्यावर हिडींबा उद्गारली ," माझा पुत्र घटोत्कच !"
" हां वहिनी !"
" कशासाठी ...रक्तपात करण्यासाठी !"
" नाही. रक्तपात रोखण्यासाठी !"
" मी समजले नाही केशव !"
" दानव मुरची पुत्री मोर्वी वर शोधण्याच्या निमित्ताने कित्येक नवयुवकांचा वध केलाय तिनं. तिने एक पण केलाय
जो कुणी तिला बळ आणि बुद्धी मध्ये परास्त करील त्याच्याशीच ती विवाह करील. मला माहितेय हा तिचा अभिमान आहे आणि तिचा हा अभिमान फक्त घटोत्कच दूर
करू शकतो. म्हणून मला आपली परवानगी पाहिजे."
" अवश्य घेऊन जा पंरतु माझी एक विनंती आहे आपल्याला. "
" तो कोणती ?"
" घटोत्कचाला मोर्वी कडे घेऊन जाण्याच्या अगोदर माझे
पतीदेव पांडू पुत्र भीम यांची परवानगी घेणे आवश्यक आहे,
नाहीतर ते समजतील की मी त्यांच्या पासून दूर राहते म्हणून
स्वतंत्र निर्णय घेऊ लागली आहे."
" मी आपल्या पतिव्रता धर्माचा आदर करतो. मी अवश्य
मजले दादाची परवानगी घेईन." घटोत्कच सरपणसाठी लाकडे गोळा करायला गेला होता तो तेवढ्यातच लाकडे घेऊन आला. त्याला पाहून हिडीबा उद्गारली ," पुत्र घटोत्कच !" त्याने लगेच उत्तर दिलं - हां मातोश्री !" त्याची
नजर वासुदेव वर पडताच त्याने लगेच त्यांचे चरणस्पर्श केले.
तसा वासुदेव ने " आयुष्यमान भव !" असा आशीर्वाद दिला.
" पुत्र घटोत्कच !"
" जी मातोश्री !"
" तू वासुदेव सोबत जा आणि ते जे काय करायला सांगतील ते निमूटपणे कर."
" जी मातोश्री !"
" वहिनी आता मला जाण्याची परवानगी द्या." असे म्हणून
घटोत्कचाला घेऊन तेथून निघाले.
धर्मराज युधिष्ठीर अर्जुन आणि भीम सोबत कोणत्यातरी
विषयावर वार्तालाप करत होते. तेवढ्यात तेथे नकुल आणि
सहदेव आले नि म्हणाले ," प्रणाम मोठ्या दादा ! "
" प्रणाम बोल काय खबर आणलीस ?"
" ऐकण्यात आलंय की प्रागज्योतिषपूर नरेश नरकासुर ने
माता अदीती चे कुंडल आणि वरुण देवाचे छत्र घेऊन गेला
होता. देवकीनंदन वासुदेव ने त्याचा वध केला.इतकेच नाहीतर
नरकसुराने सोळा हजार एकशे कन्यांचे अपहरण केले होते
त्याना ही वासुदेव ने मुक्त केले." नकुल उद्गारला
" नरकासुराच्या भाग्यात केशवच्या वध हातून मृत्यू लिहिला होता. " अर्जुन बोलला.
" आणि त्याचा तो सेनापती मुर मोठा पराक्रमी होता. त्याचे
काय झाले ?" युधिष्ठीर ने विचारले.
" तो सुध्दा वासुदेव च्या मारला गेला." सहदेव उद्गारला.
" आणि त्याची पुत्री मोर्वी कामाख्या देवीचे वरदान प्राप्त
आहे तिला. तिचं काय झालं ?" भीमाने विचारले.
" दुसरं काय होणार तिचे ते वरदान वासुदेव पुढे निष्पळ
ठरलं.परंतु वासुदेव तिला अभयदान दिलं."
तेवढ्यात वासुदेव कृष्ण आणि घटोत्कच तेथे येतात. त्याना पाहून सारे पांडव आदरपूर्वक त्याना वंदन करत म्हणाले ," प्रणाम वासुदेव !" त्यानंतर घटोत्कच ने एक एक
करून सगळ्यांचे चरणस्पर्श केले. युधिष्ठीर उद्गारला," आज
पुत्र घटोत्कचाला सोबत आणून फार उपकार केलेस आमच्यावर वासुदेव !" तेव्हा भीम म्हणाला, " पुत्र तुझी आई तर तुला क्षणभर सुद्धा स्वतः पासून दूर करत नाही आज कसं पाठविले तुला ?"
" आज त्याला वहिनी ने नाही तर मी सोबत घेऊन आलोय
आपली परवानगी घेण्यासाठी !"
" कशासाठी ?"
" त्याला मोर्वी कडे पाठवायचे आहे."
" दानव राज मुर ची पुत्री मोर्वी जवळ."
" हां मजले दादा, मोर्वी ला आजपर्यंत बळ आणि बुद्धी
मध्ये कोणीही परास्त करू शकले नाही.परंतु आपला पुत्र
घटोत्कच तिला अवश्य परास्त करेल. त्याला आपले बळ जे
मिळालय." वासुदेव उद्गारला.
" मजले दादांचे बळ मिळालंय हे ठीक आहे, परंतु बुध्दी
मजल्या दादाची मिळाली तर फार घोटाळा होईल." अर्जुनच्या
या व्यक्तव्यावर सर्वजण खळखळून हसले.त्यावर वासुदेव
म्हणाला ," घटोत्कच केवळ मजले दादाचाच पुत्र नाही तर
वहिनी हिडींबा चा पुत्र सुद्धा आहे, म्हणून त्या दानावी पुत्री
मोर्वीला बळ आणि बुद्धी मध्ये पुत्र घटोत्कच अवश्य
परास्त करेल. वहिनी ने आपली संमती दिली आहे फक्त
मजले दादाची संमती मिळणे बाकी आहे."
भीम म्हणाला ," हे लोक अशीच माझी थट्टा करत राहतील. तू जा पुत्र आणि त्या दानावी पुत्री मोर्वीला असा काही करारा जवाब दे की बस्स ! सर्वांच्या तोंडचे पाणी पळायला पाहिजे."
" जर आपला आशीर्वाद असेल तर असेल होईल पिताश्री !" घटोत्कच मोठ्या नम्रता पूर्ण स्वरात उद्गारला.
" हां आम्हां सर्वांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे."
" आम्हां सर्वांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच परंतु मुळात जे कार्य वासुदेवाच्या संमती ने होत असेल तर ते कदापि अपयशी होणार नाहीये. विजयी भव पुत्र !" अर्जुन उद्गारला. एका पाठोपाठ सर्वांनीच विजयी श्रीचा आशीर्वाद दिला. त्यानंतर घटोत्कच तेथून निघाला.
मोर्वी एका राजकुमारची परीक्षा घेत असता त्यात तो
राजकुमार असफल झाला. कारण तिने विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे तो देवू शकला नाही. तेव्हा तो भयभीत झाला.तेव्हा
मोर्वी त्याला म्हणाली ," तुझ्या डोळ्यात जे मला आता भय
दिसते ते त्यावेळी का नव्हते. जेव्हा तू माझ्याशी विवाह
करण्यास उत्सुक होतास ! तुला हेही माहीत होते की बळ
आणि बुद्धी हरणाऱ्याची काय दशा मी काय करते तरी देखील माझ्याशी विवाह करण्याची इच्छा मनात घेऊन आलास.भयभीत आणि भ्याड पुरुष माझा पती कदापि
होऊ शकणार नाही. म्हणून मरण्यास तयार हो जा! " असे
म्हणून तिने आपल्या तलवारीने त्याचा शिरच्छेद केला नि
तेथून निघून आपल्या कक्षेत आली आणि आपल्या आसनावर विराजमान झाली. तेवढ्यात एक दासी आली
नि म्हणाली ," राजकुमारी साहेबा एक नवयुवक आला आहे
आपल्याशी विवाह करण्याच्या इच्छेने. आणि तो आपले
नाव घटोत्कच सांगत आहे, आणि तो आपल्याशी ताबडतोब
भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहे."
" माझ्या शी विवाह करू इच्छिणाऱ्यानी माझ्या आज्ञाचे
पालन करायला हवे आहे. जा त्या मृत्यू सेवकाला अतिथी गृहात घेऊन जा. मी उद्या भेट घेईन त्याची !" दासी निघून
गेली. दुसऱ्या दिवशी राजकुमारी ला भेटण्यासाठी घटोत्कच
तिच्या समोर उपस्थित झाला. तेव्हा त्याला पाहून राजकुमारी
मोर्वी म्हणाली ," ये घटोत्कच तू आपल्या जीवनांवर भरपूर नाराज दिसतोयस कालच संध्याकाळी आलास नि लगेच सकाळी मला ललकारला आलास. चार दिवस आमच्या ह्या प्रागज्योतिषपूरचा अतिथी सत्कार तरी उपभोगायचा होता. कामदेव बनविलेली ही सूंदर नगरी अतिथी सत्कार करण्या मध्ये फार प्रसिध्द आहे, दोन चार दिवस तरी आमच्या नगरीत फिरून आनंद उपभोगायचा होता. बसून घे अगोदर." तसा घटोत्कच आसनावर बसत म्हणाला ," अच्छा म्हणजे या प्रागज्योतिषपूर नगरीला कामदेव ने वसविले आहे तर !
हरकत नाही परंतु माझी अशी इच्छा आहे, की कामदेव
बनविलेल्या या नगरीत एकट्याने फिरण्यात काय आनंद आहे, हां तुझ्या सारखी सूंदर प्रेमिका अथवा पत्नी सोबत असेल तर फिरण्यास खरा प्राप्त होईल. राहिला प्रश्न अतिथी सत्कार चा तर मला वाटतं की प्रागज्योतिषपूर नगर वाशियानी मला अतिथी म्हणून स्वीकार न करता जवाई म्हणून माझा स्वीकार करावा." तशी ती चिडून म्हणाली ," घटोत्कच ! तुम्ही आर्य लोक काय घमंड आणि गौरव आपल्या मातेच्या उदरातून शिकून जन्मला येतात की काय ?" त्यावर घटोत्कच उत्तरला , " हां अगदी बरोबर बोललीस तू परंतु माझी गोष्ट थोडी वेगळी आहे."
" ती का ?"
" मी केवळ आर्य महावीर पांडुपुत्र भिमाचाच पुत्र नाहीतर महापराक्रमी माता हीडींबा चा पुत्र सुद्धा आहे.पण ते जाऊ
दे, व्यर्थ वार्तालाप करून वेळ वाया घालविण्यात काही अर्थ
नाहीये.म्हणून अगोदर माझ्या बुद्धीची परीक्षा घेऊ पाहतेस
का बळाची ?"
" अगोदर बुद्धीचीच कारण बळाची परिक्षा घेण्याची गरजच भासणार नाही, कारण मृत शरीर काही बोलत तर
नाही ना ? म्हणून तू मला कोणताही प्रश्न विचार मी त्या
प्रश्नाचे उत्तर देवू शकली नाही तर मी माझी हार स्वीकार
करीन. विचार काय विचारायचे ते."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा