महाभारत १३० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १३० |
महाभारत १३०
हीडींबा आपल्या नातूला अर्थात बर्बरीकाला सांगते की तुला आपल्या आजोबा सारखे धनुर्धर व्हायचे आहे, त्यासाठी तुला त्यांच्या सारखीच एकाग्रता ठेवायला हवी आहे, आपली नजर केवळ लक्षा वरच केंद्रित असायला हवी
आहे, असे म्हणून त्याला एका झाडाची फांदी दाखवून त्या
फांदीवर नेम धरून बाण सोडायला लाविला. बर्बरीकाच्या बाणाने अचूक लक्षभेद केला. ते पाहून खुश होत हिडींबा
म्हणाली ," आता माझी खात्री झाली की तू नक्कीच आपल्या
अर्जुन आजोबा प्रमाणे धनुर्धर बनशील." तेवढ्यातच महर्षी
व्यासांचे तेथे आगमन झाले. महर्षी व्यासांना पाहून हिडींबा ने आदरपूर्वक त्याना प्रणाम केला. तेव्हा महर्षी व्यास यांनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर हिडींबा आपल्या नातूकडे पाहत त्याला म्हणाली ," बाळ
महर्षी ना प्रणाम कर." असे म्हणताच बर्बरीकाने महर्षी व्यास
यांना प्रणाम केला. महर्षी व्यासांनी बर्बरीकाला आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर हिडींबा ने महर्षी व्यासांकडे पांडवांच्या खुशलतेची चौकशी केली. तेव्हा व्यास म्हणाले,
" पांडवांची स्थिती फार बिकट आहे, कारण कौरव काही
ना काही त्यांच्या विरुद्ध संकट उभे करतच असतात. महाराज धृतराष्ट्र तर जन्माधंळा त्यामुळे त्याची उच्चकांक्षा
फार मोठी ! आणि दुर्योधन त्या वृक्षावरचे विषारी फळ आहे.
तो ईर्ष्या ने एवढा पेटला आहे की त्याला योग्य काय नि अयोग्य काय याचे भानच राहिलेले नाहीये. परंतु ह्या ईर्ष्याच्या
अग्नित तो एक दिवस स्वतःच जळून भष्म होणार आहे. जैसे
कर्म वैसे फळ हे ठरलेलेच आहे, ते जाऊ दे तुझ्या नातवा विषयी बोलतोय , हा मोठा परमवीर होणार आहे. कारण
त्याचा जन्म अश्या ग्रह नक्षत्रा मध्ये झाला आहे की त्याचा उत्तम भविष्यकाळ आहे." तशी हिडींबा खुश होऊन म्हणाली ," महर्षी ह्याच्या भविष्या विषयी सांगा जरा ! कारण माझी इच्छा की हा मोठा महावीर बनावा." त्यावर महर्षी व्यास म्हणाले," तो तर बनेलच त्यात यत्किंचितही शंका नाही. ह्याची किशोरावस्था तुम्हां साऱ्यासाठी सुखदायी ठरेल." एवढं बोलून महर्षी व्यास गप्प झाले. तशी हिडींबा उत्सुकतेने विचारले ," आणि ह्याची युवावस्था ...?" परंतु महर्षी व्यासांनी तिच्या ह्या प्रश्नाचे उत्तर न देता मौन झाले. तशी तिला चिंता जास्त सतावू लागली, तिने चिंतामय स्वरात विचारले ," ह्याच्या युवावस्था मध्ये काही बाधा आहे का ? सांगा ना महर्षी आपण गप्प का झाले ?"
" संकट विना जीवन निरर्थक आहे, जीवनात संकटे यावीच
लागतात. तरच जीवन सुखकर होते. कधी कधी भविष्य
जाणून घेणे हानी कारक ठरते. म्हणून आपले भविष्य आपल्याला माहीत नसते ते अधिक चांगले. त्यामुळे माणूस
आधीच दुःखी होत नाही." त्यावर हिडींबा ने आपल्या मनातील शंका जाहीर केली. तिने विचारले ," महर्षी माझा
नातू युवावस्था मध्ये असे काही कृत्य करणार तर नाही ना ? ज्याने माझ्या वंशजांचे नाव कलंकित होईल." त्यावर महर्षी
व्यास म्हणाले ," छे छे छे ! उलट त्याच्या युवावस्था मध्ये
त्याच्याशी अशी काही घटना घडेल की त्या घटनेमुळे तो
पूजनीय ठरेल." तेंव्हा तिचा जीव भांड्यांत पडला. ती उद्गारली ," कुलाचे नाव उज्ज्वल करील ना मग हरकत नाही.
मी उगाचच घाबरली होती. म्हटलं माझा नातू भरतवंशीच्या
नावाला बट्टा लावतो की काय ?" त्यावर महर्षी व्यास म्हणाले ," अशी तू मनात शंका ही आणू नकोस. तुझा पुत्र ही भरतवंशी चे नाव उज्ज्वल करील." त्यावर हिडींबा उद्गारली," बस्स हेच हवंय मला. भरतवंशीच्या कुलवधू मध्ये माझे ही नाव आदर सहित घेतले जावे. बस्स मला दुसरे काहीही नकोय."
कुंती आपल्या कक्षेत चिंतामय अवस्थेत बसल्या होत्या.
तेवढ्यात तेथे महर्षी व्यासांचे आगमन झाले. महर्षी व्यासांना
पाहून कुंती लगबगीने उठल्या नि महर्षींना प्रणाम करत म्हणाली ," या आज आपले स्वागत करायला फक्त मी एकटी
राहिली आहे, कारण माझ्या पुत्रासाठी द्युतक्रीडेचा अंत वनवास गमन सिध्द झाला." तेव्हा महर्षी व्यास म्हणाले, " माहिती आहे मला ,परंतु तू दुःखी होऊ नकोस. वनवास ऐकायला दुःखदायी अवश्य आहे. परंतु हाच वनवास त्याना जीवन आणि जीवनाची यातना, त्यातून अवश्य नवीन दिशा अवश्य मिळणार आहे, सूर्यास्त झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतोच ना अगदी तसेच माणसाचे जीवन आहे, जसे दुःख जीवनात येते तसे ते जाते ही आणि सुखाचे आगमन होते. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी असित्वात असत नाही आणि असणार नाहीये. एक आली तर पहिलीला जाणे भागच आहे."
" खरे आहे, महर्षी आपले म्हणणे जीवन हे अनेक रंगानी
रंगले आहे, कोणती वेळ कशी येईल हे सांगणे कठीण ? फक्त
दुःख एकाच गोष्टीचे वाटते आणि ते म्हणजे भीम आपल्या
नातवाला पण पाहू शकला नाहीये. माहीत नाही मी त्याला
पाहू शकेन की नाही?"
" अवश्य पाहशील तू."
" परंतु केव्हा ?"
" योग्य वेळ येईल तेव्हा !"
" पण हा योग्य वेळ येईल केव्हा ?"
" प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते. ती योग्य वेळ
आल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपोआपच घडत नाहीये."
" बरं ते जाऊ दे, आपण आता आलेत कोठून ते सांगा."
" कुलवधू हिडींबा कडून."
" मग तर आपण माझ्या पणतू ला अवश्य पाहिलं असणार!"
" हो पाहिलं ना ? परंतु पाहिलं हा शब्द त्याच्यासाठी तुच्छ आहे, मी त्याचे दर्शन केले."
" अच्छा कसा आहे तो ?"
" एकदम सुंदर. एवढं शब्द पर्याप्त नाहीत त्याच्या साठी !
चंद्राची शीतलता आणि सूर्याचे तेच घेऊन जर मनुष्य जन्मला
आला तर तो एकदम बर्बरीक सारखा असेल."
" आपण त्याची भाग्यरेखा पण वाचली असेल ना, आता मला सांगा मोठा होईल तेव्हा तो काय बनेल ? म्हणजे मला म्हणायचंय की माझा पणतू माझ्या पुत्रांसारखा तर होईल ना ?"
" त्यांच्या पेक्षा ही अधिक शक्तिशाली परमवीर होईल तो."
" अरे वा ! मग मला त्याच्या भविष्या विषयी सर्वकाही सांगा."
" भविष्या विषयी अधिक जाणून घेणे योग्य नाही ."
" का महर्षी ?"
" जर कुणाला कळले की त्याच्या जीवनात सुखच सुख
आहे तर तो आपले कर्म करायचे सोडून देईल नि आळशी
बनेल. तसेच जर कुणाला कळले की आपल्या जीवनात
दुःखच दुःख आहे , तर तो हताश होऊन आपले कर्म करायचे
सोडून देईल. म्हणून माणसाने चांगल्या वाईट फळांचा किंवा परिणामाचा विचार न करता फक्त आपले कर्म करत राहायचे. "
" महर्षी आपण माझ्या पासून काही लपवीत तर नाही ना ?"
" असं का वाटलं तुला ?"
" आपण त्याच्या भविष्या बद्दल अजून का सांगत नाहीये ?
त्याच्या वर काही संकट तर येणार नाही ना ?"
" बर्बरीक सुर्या सारखा तेजस्वी असणार आहे, त्याच्यावर
कोणतीच काळी सावली पडू शकत नाही आणि पडलीच तर ती स्वतःच जळून भष्म होईल. वीरता त्याचे चरणस्पर्श करील. शत्रू त्याच्या पुढे नतमस्तक होईल."
मोर्वी आपल्या झोपडीत चूल फुकत होती. कदाचित
स्वयंपाक बनवत असावी. तेवढ्यात तेथे घटोत्कच आला
नि त्याने विचारले ," मोर्वी बर्बरीक कुठं आहे ?"
" आणखीन कुठं असणार आपल्या आजी सोबत असेल
माताश्री फार लाडका नातू आहे ना तो."
" हां मातोश्रीचे एकटे पण दूर केले त्याने. मी सुध्दा मातोश्रीला प्रेम देवू शकलो नाही. मात्र आपल्या चिरंजीवानी तर मातोश्री मन एकदम मोहून टाकले."
" मातोश्री त्याला शस्त्र संधान करायला शिकवत आहेत. स्वत: मातोश्री त्याची गुरू बनली आहे आणि माझी खात्री आहे, आपला पुत्र शूरवीर होईल."
" ते तर त्याला व्हायचेच आहे, तुझी बुद्धी नि माझी बुद्धी
तुझें बळ आणि माझे बळ मिळून त्याला शक्तिशाली बनविले आहे. परंतु हे सर्व तुला पराजित केल्यामुळे साध्य झाले."
" मला चिडविताय काय ?"
" चिडवीत नाही. परंतु तुला एक विचारू मोर्वी ? राग नाही येणार ना ?"
" राग ....राग मी केव्हाच गंगेत सोडून दिलाय. विचारा काय विचारायचे ते."
" तुला हरल्या बद्दल दुःख तर झालेच असेल ना ?"
" हूं sss सुरुवातीला थोडं झालं खरं ! पण क्षणभरच.
लगेच दुसऱ्या क्षणी हरल्या बद्दल चा जो आनंद झाला त्याची
तुलना कशामध्येही होऊ शकत नाही. कारण आईचं प्रेम काय
असतं ते इथं आल्यानंतर कळलं. पतीचे प्रेम हे सर्व मला मी
हरल्यामुळेच प्राप्त झालं. माझा अहंकार तेव्हाच कळून पडला."
" बरं मला हे सांग राज महाल सोडून तू आमच्या सोबत
वनात राहात आहेस याचा त्रास तर होत असेल ना ?"
" नाही हो , कशाचा त्रास ? उलट राजभवनात जे सुख मला मिळाले नाही ते सुख मला इथं मला झोपडी मध्ये
मिळाले. राजभवनात तर फक्त दगडांच्या भिंती बाकी तिथं
प्रेम नाही, माया नाही , ममता नाही. परंतु इथं आई सारखी
माया करणारी सासू मला मिळाली. पतीचे प्रेम काय असते
ते मी पहिल्यांदाच अनुभवले. ज्या सुखासाठी मी तरसली ते सुख मला इथं मिळाले. या झोपडीत जे सुख आहे ते त्या राज भवन मध्ये नव्हते आणि दुःख तेव्हाच होते आपले काही हरवले. परंतु मला इथं तर सर्वकाही मिळाले. ज्या सुखाला मी शोधत होते. आपण मिळाल्या नंतर मला प्रथमच जाणवले की मी कुणावर प्रेमही करू शकते नि कुणाला आपले प्रेम देवू ही शकते."
" मग तर तू हरलीस ते फार छानच झालं."
" हो खूपच छान झाले. जेव्हा बर्बरीक माझ्या उदरात प्रवेश केला तेव्हा तर मला वाटू लागले की या पूर्वी मी
आपल्याकडून हरली का नाहीये, आपण माझ्या जीवनात आलात नि माझं संपूर्ण जीवन बदललं. एका स्त्रीला मातृत्व
प्राप्त झाल्या शिवाय संपूर्ण स्त्रीत्व प्राप्त होत नाही. प्रथम
आपण मला भेटलेत तेव्हा मला वाटलं की मी केशव ची फार
आभारी आहे, नंतर बर्बरीक मिळाला. त्याने तर माझं अर्थहीन जीवनाला एक नवीन उद्देश मिळाला."
" परमेश्वराने स्त्री ला बनविलेच यासाठी तिला एकाच
स्थानावर राहायला लागू नये. परंतु ही गोष्ट सुद्धा सत्य आहे
की तुझी नि माझी भेट काकाश्रीनी घडवून आणली. आणि
बर्बरीक आपल्याला काकाश्री कडून मिळालेली अमूल्य भेट आहे . म्हणून आपल्या पेक्षा बर्बरीकावर काकाश्रीचा अधिकार आहे."
" म्हणूनच तर बर्बरीक विषयी निश्चित झाली की माझा
बर्बरीक काकाश्रीच्या कृपाछत्राखाली लहानाचा मोठा होईल."
बर्बरीकाला महावीर बनविण्यासाठी हिडींबा ने फार
मेहनत घेतली. आणि बर्बरीक आपल्या आजोबा सारखा
अर्थात अर्जुन प्रमाणे झटपट शिकत होता. हा हा म्हणता
तो युवक झाला. सारी अस्त्रविद्या शिकवून होताच त्याची परीक्षा घेण्यात आली. तो परीक्षेत पण उत्तीर्ण झाला. तेव्हा
त्याला आशीर्वाद देत हिडींबा म्हणाली ," पुत्र तू शस्त्रविद्या मध्ये निपुण झालास. तू युध्द भूमीवर उतरल्या नंतर शत्रूना
पळताभुई होईल." तेव्हा बर्बरीक म्हणाला ," आजी मी या पुढे पण जाऊ इच्छितो. मी संसार मध्ये अजेय आणि अपरजिताचे स्थान मिळवू इच्छित आहे." तेव्हा हिडींबा
म्हणाली," माझ्या कडे जे काही होते ते सर्व तुला मी शिकविले. तुला जर या ही पुढे जायचे असेल तर कुण्या
गुरुकडे जावे लागेल."
" मग मला गुरुचे नाव सांग."
" असा गुरू साऱ्या संसार मध्ये एकच आहे."
" त्याचे नाव सांग."
" केशव तुझे आजोबा त्याना लोक वासुदेव कृष्ण म्हणून
ओळखतात."
" मग तर फारच छान झालं. मला आजोबा कडे घेऊन चल."
" तुला तर माहीत आहे ना की आपण त्यांच्याकडे जाऊ
शकत नाहीये."
" मग मातोश्री तू घेऊन चल."
" अरे बाळा जरा थारा धर ना ?"
" नाही. मला आताच्या आता घेऊन चल. ते माझे आजोबा आहेत ना, मग माझा त्यांच्यावर अधिकार आहे किंवा नाही ?"
" बरं बरं जाऊ आपण , जरा धीर धर ना ?"
" माझ्या जवळ वेळच तर नाहीये. जर आपण लोक मला
घेऊन गेला नाहीतर मी स्वतःच जाईन त्यांच्याकडे. इतके
म्हणे पर्यंत प्रत्यक्ष वासुदेव कृष्ण स्वतःहून हजर झाले. आणि
आपल्या रथातून खाली उतरून त्यांच्या जवळ येत म्हणाले,
" वत्स तू मला हांक मारलीस मी लगेच हजर झालो बघ."
" हां केशव जेव्हा कोणी भक्त आपले स्मरण करतो त्या
क्षणी आपण भक्तांच्या हाकेला धावून येता."
" हां वहिनी जेव्हा कुणी भक्त श्रध्देने मला आवाज देतो तेव्हा मला त्याच्या हाकेला धावून यावेच लागते. बोल वत्स
का आठवण काढलीस माझी ? काय समस्या आहे ?"
" काकाश्री ह्याने मघाच पासून एकच हट्ट धरला की मला
आजोबा कडे जायचे आहे."
" बोल वत्स काय इच्छा आहे तुझी ?" बर्बरीकाला प्रश्न केला. तेव्हा बर्बरीक ने त्यांचे चरणस्पर्श करत म्हंटले , आजोबा मी आपला शिष्य बनू इच्छित आहे."
" अरे संसार मध्ये भरपूर सारे गुरू आहेत. मग मलाच
का गुरू करत आहेस ?"
" आजी चे म्हणणे आहे, की आपल्याकडे ज्ञानाचे भरपूर
सारे भांडार आहे, म्हणून मी आपल्या कडून ज्ञान शिकू इच्छितोय. शिवाय आपण माझे आजोबा आहेत आणि मी
आपला नातू या नात्याने माझा आपल्यावर अधिकार आहे
की नाही ?"
" अवश्य आहे , परंतु परिवार आणि अधिकार ह्या गोष्टी नातेसंबंधी झाल्या आणि कुणाला गुरू करणे ही गोष्ट वेगळी आहे. तेव्हा मला गुरू करण्याची इच्छा आहे तर मला सुद्धा
पाहावे लागेल ना , ज्याला मी शिष्य बनवतोय तो माझा
शिष्य बनण्याचा लायक आहे किंवा नाही ?"
" अवश्य पहा , मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे."
" ठीक आहे, मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची
उत्तरे तू दिलीस तर तुला मी आपला शिष्य करून मार्गदर्शन
करीन."
" आपण फक्त प्रश्न विचारा मी त्या प्रश्नांची उत्तरे ताबडतोब देईन."
" ठीक आहे, मग मला हे सांग गुरू आणि ईश्वर या मध्ये
सर्वात श्रेष्ठ कोण असतो."
" गुरू !"
" ते का ?"
" कारण गुरूच ईश्वर कडे पोहोचण्याचा मार्ग दाखवितो.
ईश्वर कुठे आहे ? त्याला भेटायचे कसे ? ओळखायचे कसे
वगैरे ....?
" ठीक उत्तर दिलेस.आता दुसरा प्रश्न
" संसार मध्ये सर्वांत तीव्र गती कोणाची असते ?"
" मनातील विचारांची ! कारण क्षणभरात ती कुठच्या
कुठं जाऊन पोहोचते."
" धन्य हो वत्स ! आता मला एक सांग अशी कोणती वस्तू आहे ,की जी एकवेळ गेली तर परत येत नाही आणि
अशी कोणती वस्तू आहे की जी एक वेळ आपल्या कडे आली की ती परत कधीच जात नाहीये."
" ती युवावस्था जी एकदा गेल्यावर परत येत नाही आणि
वृध्दावस्ता जी एकदा आली की परत जात नाही."
तेव्हा वासुदेव एकदम खुश होत म्हणाले ," मी तुझ्यावर
फार खुश झालो. " असे म्हणून हिडीबा कडे पाहत वासुदेव
कृष्ण म्हणाले ," आपला हा पुत्र फार बुद्धिमान आहे
निश्चितच तो आपल्या आजी वर गेलाय."
" मग बनविणार ना आजोबा आपण मला आपला शिष्य ?"
" परंतु तुला काय बनायचे आहे , हे तू नाही सांगितलंस ?"
" मला आजोबा भीमसेन सारखे महावीर आणि पिताश्री
घटोत्कच सारखे महाबली बनायचे आहे. संसार ची कोणतीही
सैन्या मला परास्त करू शकणार नाही असे बनायचे आहे."
" शारीरिक बळ हे अनिवार्य आहे , परंतु त्याने मनुष्य
संपूर्ण होत नाहीये. मनुष्य संपूर्ण तेव्हा होतो जेव्हा मनुष्या
जवळ शारीरिक बळासोबत मनोबल सुद्धा असते. कारण
शारीरिक बळ आपल्या सारख्या व्यक्तीशी लढण्याची क्षमता
असते. परंतु मनोबल परिस्थितीशी सामना करण्याची नि त्यावर मात करण्याची शक्ती मनोबल देते."
" हां परंतु आपल्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे,
आपण कुणाला काही देऊ शकता. म्हणून मी आपल्या कडे
माझे मस्तक आपल्या चरणी ठेवू इच्छितोय."
" तुझ्या सारखा बुद्धिमान शिष्य मिळाल्याने मी पण खुश
झालो असतो. परंतु तुझा वंशज सध्या पीडित आहे देश विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा आहे, दुर्योधन आपल्या बंधूंना काहीच देऊ इच्छित नाहीये."
" आम्ही सर्वजण मिळून एकत्र का राहू शकत नाही आजोबा ?"
" एकदम चांगला प्रश्न विचारलास. प्रत्येक युगात हा प्रश्न
प्रत्येक पिढी आपल्या पूर्वजांना विचारणार की सगळे एकजूट
मिळून का राहात नाहीये,परंतु प्रत्येक युगात एक ना एक
दुर्योधन अवश्य असणार आहे, नाव वेगळे असेल कदाचित पण कार्य तेच असणार आहे."
" परंतु अंतिम विजय तर धर्माचीच होते. हे त्याना माहीत
नाहीये का ?"
" माहीत सर्वानाच असते. परंतु ते मान्य करायला जरा जड जातं इतकेच. जसे की कळते पण वळत नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा