महाभारत १२५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १२५ |
महाभारत १२५
" तू आपल्या क्रोधाची अग्नि अशीच जळत ठेव. युध्दा
मध्ये कामी येईल ती. राहिला प्रश्न युद्धाचा तर युध्द सुरू करायचे आपल्या हातात आहे युद्धाचा अंत आपल्या हातात
नाहीये. पितामहांनी भविष्यवाणी केली आहे ना युध्द एक
महिन्यानंतर सुरू होईल. तर बस्स ! पितामहांच्या भविष्यवाणी वर विश्वास ठेव." तेवढ्यात एक द्वारपाल आला
नि म्हणाला ," युवराज की जय हो ! "
" बोला द्वारपाल काय खबर आणलीस ?"
" महाराजांनी आपल्याला आताच्या आता बोलविले आहे." त्यावर दुर्योधन कर्णाला उद्देशून म्हणाला ," मित्र मी
जाऊन येतो. पिताश्री ने एवढ्या तातडीने का बोलविले आहे
ते पाहून येतो जरा." असे म्हणून तेथून निघाला. जसा
महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत आला तसे त्याने प्रथम आपल्या
वडिलांना प्रणाम केला. त्यांनी त्याला विजयी भवचा आशीर्वाद दिला. त्यानंतर काकाश्री ना प्रणाम केला. तेव्हा
विदुर ने आयुष्यमानचा आशीर्वाद दिला." तेव्हा दुर्योधनाने
विचारले ," आपण मला बोलविलेत पिताश्री ?"
" हां कारण गोष्टच अशी आहे की तुला ताबडतोब बोलविने भाग पडले."
" असं काय घडलंय विशेष ?"
" अनुज विदूरचे परामर्श आहे की युद्धाची घोषणा आधी
करू नये."
" युद्धाची घोषणा करू नये ? ती तर केव्हाच झाली आहे." तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," मला वाटतं युध्द काही दिवस स्थगित करावे ?"
" हे आपण काय बोलताय पिताश्री ? युद्धाची सारी तयारी
झाली आहे, आणि आता युध्द स्थगित करायचं म्हणजे ? नाही नाही ते अजिबात जमणार नाहीये. काकाश्री तर सदैव
पांडवांचा पक्ष घेत आले आहेत. परंतु त्याना माहीत असायला हवं की ते आमचे महामंत्री आहेत, त्या पांडवांचे नाहीत."
" मी फक्त महामंत्रीच नाहीतर तुझ्या वडिलांचा भाऊ सुद्धा आहे वत्स ! आणि जे पद मला दिलं गेलं आहे ते पद मी मागितले नव्हते. आणि जो आदर मी मागत आहे तो जर मला मिळाला नाहीतर महामंत्री पदा मध्ये ही काही रुची नाहीये."
" तुम्ही लोक आपसात भांडायचं बंद करा अगोदर......
पुत्र दुर्योधन जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर, परिस्थिती नुसार निर्णय बदलायला पाहिजे आहे,हे कळत कसं नाहीये
तुला ?"
" पण असं काय घडलंय ते तर सांगा. पांडवांच्या हाती
अशी कोणती महाशक्ती सापडली आहे की जो आपल्याला
भयभीत केले आहे, आणि मला वाटतं हा परामर्श सुध्दा
काकाश्रीनीच दिला असेल,होय ना ?"
" मी कोणतीही गोष्ट बोलण्या अगोदर त्यात सत्यता किती आहे पडताळून पाहतो मगच मी ते बोलतो.? उगाच नाही
बोलत कधी !"
" पुत्र असं ऐकायला मिळाले आहे की भिमाचा नातू बर्बरीक परत आला आहे , नि पांडवांच्या पक्षातून तो युध्द
करणार आहे, आणि त्याने अश्या काही सिध्दी प्राप्त केल्या आहेत की त्याच्या पुढे आपली सैन्या पाल्या पाचोळ्या सारखी उडून जाईल नि आपला पराभव होईल."
" भिमाचा नातू म्हणजे घटोत्कच नि मोर्वीचा पुत्र बर्बरीक
नवजात शिशु ! तो आमचं काय बिघडविणार आहे ? काही
लोक अकारण माझं मनोबल तोडण्यासाठी खोटी अफवा
पसरवितात."
" वत्स मी सांगत असलेली माहिती खोटी नाहीये. बर्बरीक
नवजात शिशु समजण्याची चुकी करू नकोस. तो दिसायला
बालक असला तरी तो अफाट शक्तिशाली आहे. त्याच्या
कडे असे तीन शक्तिशाली बाण आहेत की त्याची तोड कोणापाशी नाहीये. जोपर्यंत त्याचा उपाय सापडत नाही तोपर्यंत युध्द स्थगित करावे एवढेच माझे म्हणणे आहे."
" आपण लगेच भयभीत होता काकाश्री ! बर्बरीक कितीही
शक्तिशाली असला तरी तो या दुर्योधनच्या शक्ती पुढे शून्य आहे. त्याला आमची सैन्या मुंगळी सारखी चिरडून टाकतील."
" पुत्र तू जर हट्ट केला नसतास आणि पांडवांना पाच
गाव देऊन टाकले असते तर हे युद्ध झालं नसतं ?"
" काय म्हणता पिताश्री मी पाच गाव पांडवांना दिले असते
तर ते संतुष्ट झाले असते हे युद्ध झालं नसतं ?"
" हां पुत्र हां ! युध्द झालं नसतं."
" मग त्यांच्या क्षत्रिय धर्माचे काय झालं असतं ?"
" क्षत्रिय धर्म...?
" हां क्षत्रिय धर्म ! मी त्यांच्या पत्नीचा भरसभेत अपमान केला होता. त्याचे काय झाले असते ? पाच गाव घेऊन ते गप्प बसले का ? आपला अपमान ते विसरले असते का आणि माझ्याशी युद्ध केलं नसतं. नाही पिताश्री नाही कदापि नाही. क्षत्रिय धर्म हे म्हणतोय त्यांनी माझ्याशी युध्द करावे. आणि मी तेरा वर्ष अभ्यास केला तो उगाच नाहीये. मला सिद्ध करायचे आहे की सर्व शक्तीमान सर्वश्रेष्ठ गदाधर पांडू पुत्र भीम नाहीये तर धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन आहे. माझ्या त्या युद्धाचे काय होईल ? म्हणून पिताश्री जसा धनुष्यातून सुटलेला बाण वापस घेता येत नाही तसं हे युद्धही टळणार नाहीये. हा माझा अंतिम निर्णय आहे."
" निर्णय घ्यायची एवढी घाई का आहे तुला ?" महाराज
धृतराष्ट्रांनी विचारले.
" म्हणजे आपण पण भयभीत झालात की काय ?"
" भयभीत नाही. परंतु चिंतेत मात्र जरूर आहे. कधी कधी
समोरच्याची ताकद पाहून निर्णय घ्यायचा असतो. वैऱ्याला
कधीही कमी जोकायचे नसते. पराजयला कारणीभूत ठरतो
तो निर्णय !" महाराज धृतराष्ट्र उद्गारले.
" पराजय त्यांचा होतो ज्यांना स्वतःवर कधी भरवसा नसतो. पिताश्री आपण व्यर्थ चिंता करताय."
" चिंता कधीही व्यर्थ नसते. कारण चिंताच चेतनाचे द्वार
खोलते. जरा बर्बरीकच्या शक्तीचे अनुमान लाव ना ?"
" बर्बरीक ,बर्बरीक , बर्बरीक काय लावलाय त्याचं सारखं
तुनतूनं असं काय आहे त्याच्या मध्ये ? तो पितामहा पेक्षा मोठा महावीर आहे का ? गुरू द्रोणांपेक्षाही महारवीर आहे का ? अश्वत्थामा पेक्षा ही महावीर आहे का ? आणि माझा मित्र कर्ण याच्या कडे त्याच्या कोणत्याही शस्त्राचे उत्तर सापडेल." दुर्योधन म्हणाला.
" आणि माझं म्हणणं आहे की या पैकी कोणाही ठिकणार नाही त्यांच्यापुढे. कारण त्याच्या कडे असे तीन शक्तीतशाली बाण आहेत की त्या बाणांचे उत्तर कोणापाशी नाहीये."
" ते काहीही असले तरी हे युद्ध होणार,कारण हस्तिनापूर
नरेश बनण्याचे भाग्य माझंच आहे आणि मीच बनणार हस्तिनापूर नरेश ! आता राहिला प्रश्न बर्बरीकाचा तर त्याची
चिंता आपण करू नका पिताश्री ! बर्बरीकाला मी पाहून घेईन." असे म्हणून तो तेथून चालता झाला. इकडे महाराज धृतराष्ट्र चिंते मध्ये तर दुसरीकडे भीमसेन चिंतेत बसला आहे तेवढ्यात तेथे अर्जुन आला नि म्हणाला ," मझले दादा आपण चिंतेत का आहेत ? मला माहितेय बर्बरीकाच्या सिध्दी शक्ती मुळे चिंतेत फडणे स्वाभाविक आहे ; परंतु केवळ चिंता करून काय होणार आहे ?"
" माझी चिंता बर्बरीकाच्या सिध्दी शक्ती बाणा बद्दल
नाहीये."
" मग आपण कशाची चिंता करताय ?"
" माझ्या चिंतेचा कारण हे आहे की माझ्याच नशिबात
असं का यावं ? की माझाच नातू माझ्या वंशाचा विनाश कण्याला कारणीभूत व्हावा !"
" जर आजोबा आणि नातू हे आपल्या चिंतेचे कारण आहे तर चिंता करायचे सोडा मझले दादा ! आपण उगाच व्यर्थ चिंता करताय ?"
" चिंता करायचं कसे सोडू ? मला सहनच नाहीये हे."
" सहन होत नाहीये म्हणूनच चिंता करायचे सोडा. सर्वच
गोष्टी आपल्या मना सारख्या होत नाहीत , म्हणून उदास व्हायचे नसते आणि हारही मानायची नसते."
" आपण आपल्या नातूला कुठून चोरून आणलं नाहीये.
नाही विकत आणलंय आपल्याला नातू स्वत: परमेश्वराने
दिला आहे, ने नातं आपण स्वतः निवडलं नाही. ही आपली
लाचारी होऊ शकते. आपण त्याचे आजोबा आहात नि तो आपला नातू म्हणून आपल्याला लज्जित होण्याचे अजिबात कारण नाहीये."
" ह्या सर्व गोष्टी मनाच्या समजूत काढण्या पुरत्या ठीक
आहेत. परंतु मनाला पटत नाहीत ह्या गोष्टी !"
" मनाला समजविण्याचा प्रयत्न करायला हवा. नक्की पटेल. परंतु माझ्या चिंतेचा विषय तो नाहीये."
" तुला सुध्दा चिंता आहे ?"
" हां !"
" कशाची ?"
" बर्बरीक ने जी समस्या उभी केली आहे त्याचे समाधान
माझे प्राण देऊन जरी झाले असते तरी ते मी केले असते. परंतु माझे प्राण देऊन ही ह्या समस्यांचे समाधान होऊ शकणार नाहीये.?"
" मग कशाने समाधान होईल हे ?"
" ह्या समस्यांचे एकच समाधान आहे आणि ते म्हणजे प्राण घेणे. परंतु बर्बरीक माझा सुद्धा तर नातू आहे,तो केवळ
आपल्याच वंश नाही तर माझा पण तर वंश आहे. परंतु प्रश्न
एक पिढीला वाचविण्यासाठी दुसऱ्या पिडीचा विनाश करू
शकतो का आपण नाही ना ?"
" भाग्याने आम्हाला कोठे आणून उभे केले आहे ? काय
करावे बरे आता ?" दोघेही बंधू एकदम चिंतामय अवस्थेत
बर्बरीक या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर दुसरीकडे दुर्योधन आपली गदा हवे मध्ये फिरवून आपल्या क्रोधावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तेथे गांधार नरेश शकुनी आले नि आपल्या भाच्या कडे पाहत म्हणाले," अरे , तू मूर्ख आहेस नि शेवटपर्यंत तू मुर्खच राहणार !" तसा दुर्योधन चिडून म्हणाला ," मामाश्री ! जर आपल्या जागी दुसरा कुणी असता तर त्याचं मस्तक धडा वेगळे झाले असते आतापर्यंत !"
" अरे मी उगाच नाही म्हणालो. तू नेहमी मूर्खासारख्याच गोष्टी करतोस."
" आता काय केलं मी ?"
" नुसती हवेत गदा फिरवून बर्बरीक हे संकट दूर होणार
नाहीये."
" मी बर्बरीकाच्या आजोबाशी सामना करणार आहे , मग
तो बर्बरीक काय ठिकणार आहे माझ्यासमोर !"
" हेच तर कळत नाहीये तुला , बर्बरीक सामान्य योध्या नाहीये. त्याच्या अश्या काही सिध्दी शक्ती आहेत की त्याचं कोणापाशी उत्तर दिले नाहीये."
" काय बोलताय तुम्ही मामाश्री ? माझ्या मित्राकडे सर्व
प्रकारच्या सिध्दी शक्तीचे उत्तर आहे."
" मोठ्या भ्रमात आहेस तू तुझा मित्र सुद्धा त्याच्या पुढे
शून्य आहे. म्हणून त्याला फक्त नीती ने मारले जाऊ शकतं."
" अर्थात आपल्या डोक्यात काहीतरी षड्यंत्र सुरू आहे."
" त्याला फक्त अचेत निःशस्त्र असताना मारले जाऊ शकतं. युद्धात त्याला कोणीही पराजित करू शकत नाहीये."
" मामाश्री आपल्या सांगण्या वरून अनेक वेळा छळ कपट
केलं. लाक्षाग्रहाचे कपट आठवलं की मी स्वतःच लज्जित
होतो."
" लज्जित होणे पराजित होण्यापेक्षा चांगले आहे. कारण
लज्जा ही थोड्या काळासाठी असते. परंतु पराजय कायमस्वरूपी मनाला यातना देणारा असतो. म्हणून भाच्या
युध्द जर तुला जिंकायचे असेल तर बर्बरीकाचा बंदोबस्त
करायलाच हवा आहे."
" पण तरी ही लपून वार नाही करू शकणार. कारण मी
एक क्षत्रिय आहे. क्षत्रियांनी समोरासमोर युध्द करायचं असतं."
" परत लागलास मूर्खांसारखं बोलायला. वीरता तेवढीच
चांगली वाटते जेवढी त्याची आवश्यकता आहे. जास्त वीरता
दाखविणे मूर्खपणाचे लक्षण आहे."
" मामाश्री दुर्योधन भ्याड नाहीये. पराजय आणि विजय
दोन्ही वीरताचे प्रतीक आहेत. पराजय झाला म्हणून त्याची
वीरता कमी होत नाहीये .दोघांनाही वीरच म्हटलं जातं. छळ
कपट करून जिंकण्यापेक्षा मेलेलं बरं."
" परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भाच्या इतिहास नेहमी हे
लक्षात ठेवतो की विजय कोणाचा झाला आणि पराजय
कोणाचा झाला होता. तो कदापि हे लक्षात ठेवत नाही की विजय छळ कपट केल्याने झाला होता आणि पराजय परंपराची कास पकडल्याने झाला होता. भाच्या तुला हस्तिनापूरचा सम्राट बनायचे आहे ना ? मग त्यासाठी तुला
युध्द जिंकणे आवश्यक आहे, आणि हे युद्ध जिंकण्यासाठी
तुला बर्बरीकाला समाप्त करणे आवश्यक आहे, नाहीतर तू हे युद्ध कदापि जिंकू शकणार नाहीयेस. म्हणून भाच्या बर्बरीक निःशस्त्र आणि अचेत मध्ये असताना त्याचा वध कर."
दुर्योधनाला क्षणभर आपल्या मामाश्री चे म्हणणे पटले.
तो आपल्या मामाश्री आणि अनुज दु:शासनाला सोबत घेऊन
जिथे बर्बरीक ध्यानस्थ बसला होता. तेथे आपली गदा घेऊन
गेला. परंतु त्यांचे मन भ्याडपणाचे काम करायला तयार होईना .पण क्षणभरच लगेच दुसऱ्या क्षणी त्याचे ते दुष्कर्म
करायला मन तयार झाले नि त्याने आपली गदा उचलली नि
वर जाताच एक सू सू करत बाण आला नि त्याच्या हातातील
गदा खाली पडली. तसा दुर्योधन ज्या दिशेने बाण आला त्या
दिशेकडे पाहू लागला. तेव्हा त्याची नजर अंगराज कर्णावर
पडली. तसा तो नाराज होत म्हणाला," तू !"
" हां मी !"
" परंतु तू मला का रोखलेस ?"
" कारण मीच तुला रोखू शकतो."
" पण का ?"
" कारण तू जे करायला निघाला होतास ते तुझ्या सारख्या वीराला शोभत नाहीये." तसा गांधार नरेश उद्गारला ," अरे अंगराज तू दुर्योधनाचा मित्र आहेस का वैरी नेहमी प्रमाणे मूर्खपणा केलास."
" मामाश्री तुम्ही मध्ये बोलू नका . मला माहित आहे की
हे षड्यंत्र सुद्धा आपणच रचले असणार."
" अंगराज कर्ण तुला माहीत नाही की हा कोण आहे नि
उद्या आपल्यासाठी हा कोणतं संकट उभा करेल."
" मला फक्त एवढं माहीत आहे की हा पूजे मध्ये लिन
निःशस्त्र व्यक्ती आहे, अश्या वेळी ह्याच्यावर वार करणे म्हणजे क्षत्रिय धर्माच्या नियमाला पायाखाली चिरडून टाकल्या समान आहे."
" युद्धात धर्म अधर्म पाहिला जात नाही मित्र आणि युद्ध जिंकण्यासाठी उचित अनुचितही पाहिलं जातं नाही. तुला काय वाटतं पांडवांना मी जर असा निःशस्त्र सापडलो तर ते मला सोडतील कदापि नाही मित्र !"
" पांडव काय करतील ते मला माहित नाही. परंतु माझे
आदर्श असं दृश्यकर्म करायला अजिबात तयार नाहीत. आणि तू पण ते करू नये. कारण तू हस्तिनापूरचा युवराज आहेस,नि उद्याचा होणारा भावी सम्राट आहेस. म्हणून तू असं कोणतेही छळ कपट करू नकोस की उद्याचा इतिहास लिहिणारा असे लिहिलं की दुर्योधनाने एका पूजे मध्ये लिन आणि निःशस्त्र असलेल्या व्यक्तीची हत्या केली नि त्याच्या शवावर आपल्या राज्याचा पाया घातला. म्हणजन मी हे नीच कार्य जर तुला करू दिले असते तर मी स्वतःला कधी क्षमा करू शकलो नसतो. मी एका मित्राचे कर्तव्य निभावले नाही म्हणून."
" तू ह्याच्या शक्ती बद्दल माहीत नाहीये अंगराज म्हणून
तू असं बोलतो आहेस. ह्याचा वध तेव्हाच केला जाऊ शकतो
जेव्हा हा अचेत आणि निःशस्त्र असेल." तेव्हा बर्बरीक आपल्या द्यानातून जागृत झाला नि म्हणाला ," हे खरे तेच बोलताहेत अंगराज कर्ण ! प्रणाम गांधार नरेश , प्रणाम आजोबा दुर्योधन, प्रणाम आजोबा दु:शासन , प्रणाम अंगराज कर्ण , आपल्या विषयी जे ऐकलं होतं त्याही पेक्षा पाहण्यास
मिळाले. आणि आजोबा आपल्या विषयी जे ऐकलं होतं त्याही पेक्षा जास्त अनुभवलंय. आपण फार महत्वकांक्षी आहात हे तर ऐकलं होतं . परंतु इतके भ्याड आहात हे नव्हतं ऐकलं. आपण कपटी आहात हे तर ऐकलं
होतं. परंतु माणुसकीला पण काळिमा फासाल हे नव्हतं ऐकलं. आपण आपला हेतू साध्य करायला कोणत्याही थराला जाल हे तर ऐकलं होतं. परंतु इतक्या खालच्या पातळीवर उतराल हे नव्हते माहीत."
" असभ्य बालक तोंड सांभाळ नाहीतर तुझी जीप छाटून
हातात देईन." दु:शासन गर्जला.
" मला खेद आहे आजोबा माझा वध करण्याची आपल्याला मिळालेली संधीही आपण घालविली. माझा वध
करणे तेव्हाच शक्य आहे,जेव्हा मी अचेत आणि निःशस्त्र असेन. आणि मी ना आता अचेत आहे नाही नि:शस्त्र ! आता मला मारणे अशक्य आहे."
" आदर पूर्वक बोल."
" आदर कुणाचा कपटी आणि भ्याड माणसाचा !"
" बस्स पुत्र बस्स ! आतापर्यंत मी तुझं ऐकून घेतलं ते यामुळे की माझ्या कडून क्षत्रिय मर्याद्याचे उल्लंघन झाले होते. म्हणून मी चुपचाप ऐकून घेतलं तुझे ! नाहीतर मला भ्याड म्हणणारा व्यक्ती दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहू शकला नसता. परंतु मला माझ्या अपराधाची जाणीव झाली म्हणून
मी तुला क्षमा करतोय. परंतु मी तुला वचन रणभूमी मध्ये
सर्वात प्रथम वीरगतीला प्राप्त होणारा तूच असणार आहेस."
" मग माझे म्हणणे ऐका आजोबा ! माझा पण धनुष्य
रणभूमीवर तुम्हांलाच शोधत असेल , तुमच्या छातीचे रक्त
प्यायला!" असे म्हणून तो तेथून चालता झाला.
दुर्योधनाने केलेल्या लज्जात्मक कार्याविषयी जेव्हा
पांडवांना ही वार्ता समजली तेव्हा युधिष्ठीर म्हणाले ," विश्वास
नाही बसत की दुर्योधन असे नीच कार्य सुद्धा करू शकतो."
" दुर्योधन आपल्या महत्वकांक्षेसाठी कोणत्याही थराला
जाऊ शकतो." अर्जुन उद्गारला. तेवढ्यात एक द्वारपाल येऊन
म्हणाला ," महाराज की जय हो !"
" बोला द्वारपाल काय खबर आणलीय ?"
" दुर्योधनाचा दूत आपल्याला भेटू इच्छितोय." ते एकता क्षणीच सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. युधिष्ठीर म्हणाला," दुर्योधनाचा दूत काय संदेश घेऊन आला असावा बरं ? असे म्हणून द्वारपालला आदेश दिला की जा पाठवून दे त्याला आंत. द्वारपाल गेला नि दुर्योधनाचा दूत तेथे आला नि
म्हणाला ," महाराज की जय हो !"
" बोल काय संदेश घेऊन आला आहेस ?"
" हस्तिनापूरचे युवराज दुर्योधन भीमसेन ना मध्यान्ह रात्री कुरुक्षेत्रावर एकटेच भेटू इच्छित आहेत."
" कशासाठी बोलविले आहे."
" सेवकाला तेवढं माहीत नाहीये."
" मला वाटतंय दुर्योधनचा काहीतरी बनाव असावा."अर्जुन
म्हणाला.
" हूं sss त्याच्या वर अजिबात विश्वास करण्या सारखा नाहीये. नक्कीच त्याच्या मनात काहीतरी काळंबेर असावे." युधिष्ठिर म्हणाला.
" सेवक आपल्या उत्तराची वाट पाहतोय." दूत उद्गारला.
" ठीक आहे ,जाऊन सांग , भीमसेन एकटाच येईल भेटायला." तसा दूत निघून गेला.
" मझले दादा त्याचा काहीही भरवसा नाहीये. तो काही घातपात पण करू शकतो."
" अनुज भीम मला माहित आहे की मी रोखले तरी तू जाणारच " युधिष्ठीर उद्गारला.
" परंतु हे निमंत्रण स्वीकारण्याची गरज काय होती मझले
दादा ?" अर्जुन ने चिंता व्यक्त केली.
" आपण चिंता नका करू मोठ्या दादा, दुर्योधना ने मला
राजदरबारात नाहीतर युध्द भूमीवर बोलविले आहे."
" त्याने काय फरक फडतोय ?"
" पडतोय ना ? राजदरबारात बोलविणारा राजा असतो.
आणि रणभूमीवर बोलविणारा योध्दा असतो. दुर्योधन घमंडी
जरूर आहे,परंतु योध्या होण्या मध्ये अजिबात शंका नाहीये.
आणि हे निमंत्रण एक योध्याने दुसऱ्या योध्याला दिले आहे,
म्हणून मी क्षत्रिय धर्माचा पालन करण्याच्या नात्याने मी अवश्य त्याला भेटायला जाईन." असे म्हणून रात्री ठीक बारा वाजता भीम एकटाच दुर्योधनाला भेटायला कुरुक्षेत्रावर गेला. तिकडून दुर्योधन सुद्धा आला नि आपली तलवार भीम
पुढे करत म्हणाला," भीम ही घे तलवार नि माझा वध कर."
" परंतु मला हे कळत नाहीये की आज एवढा नम्रतापूर्वक
कसा बोलत आहेस."
" युध्द होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर त्याला
दोनच पर्याय आहेत. एक मी तुम्हां पाची भावांचा वध करावा.
किंवा तुम्ही पाचीजन मिळून माझा वध करावा. परंतु मी एक
वेगळा पर्याय निडवला आहे. तू माझा वध करून टाक."
" माझा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नाहीये,की जो
दुर्योधन सदैव घमंड मध्ये असतो, व्यंगाचे बाण चालविण्यात
सराईत, ज्याच्या मुखातून नेहमी अंगारे निघतात असा अहंकारी नि अभिमानी दुर्योधन आज इतका नम्र कसा झाला ? ह्या परिवर्तना मागे काही षडयंत्र तर नाहीये."
" नाही भीमसेन हे परिवर्तन नाहीये. मी या पूर्वी केलेल्या कृत्याचा मला पश्चात्ताप नाहीये. परंतु आज माझ्या कडून एक फार मोठा अपराध घडला. त्याचा पश्चात्ताप जरूर आहे.
" केवळ एक अपराध ?" भीमसेन उपहासाने बोलला.
" हां भीमसेन केवळ एक अपराध !"
" असा काय अपराध केलास तू ?"
" तुझा नातू बर्बरीक.....?
" बर्बरीक काय केलेस तू त्याच्या सोबत."
" तो अचेत आणि निःशस्त्र असताना त्याचा वध करण्याचा
मी प्रयत्न केला. माझा स्वाभिमान तुझ्या नातवाची माफी मागण्याचा आड येऊ लागलाय म्हणून त्या बदल्यात त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू माझा वध कर."
" दुर्योधन तुला प्रश्चात्ताप झाला ना, यातच सर्व भरून आलं. म्हणून माझ्या नातवाला मारण्याचा जो तू प्रयत्न केलास त्या पापातून मी तुझी मुक्ताता करतो. कारण आज तो माझ्या समोर दुर्योधन आहे तो नम्र नि प्रश्चात्ताप अग्नित जळत आहे,अश्या दुर्योधनाचा मी वध केला तर ते मला पाप लागेल. मी अश्या दुर्योधनाला मारू इच्छितोय जो पापी आहे,अहंकारी आहे, आणि ते पण असे काळोख्या रात्रीत नाही त्याला रणभूमीत नि सर्वांच्या समोर मारणार आहे."
" भीमसेन मी तुझा आभारी आहे. तू मला या पापातून
मुक्त केलेस. पण एक सांगतो की जो दुर्योधन प्रश्चात्तापा ने
नम्र होऊन तुला आपला वध करायला सांगत होता. तोच
दुर्योधन रणभूमीवर आपल्या शत्रूचे मस्तक धडा पासून वेगळं
करायला अजिबात कचणार नाहीये."
" आता आपली भेट रणभूमीवरच !" असे म्हणून भीम
तेथून चालता झाला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा