Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १२८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १२८
महाभारत १२८

 



                            महाभारत १२८

     " अगदी बरोबर बोललीस तू मी आर्य लोक आपल्या
आईच्या पोटातून शिकूनच जन्माला येतोय. शिवाय मी इतर
आर्य लोकांपेक्षा थोडा वेगळा आहे."
    " तो कसा ?"
    " मी आर्य महावीर पांडुपुत्र भिमाचाच पुत्र नाही तर माझी
महापराक्रमी माता हिडींबाचा सुध्दा पुत्र आहे. पण ते सोड. व्यर्थ वार्तालाप करण्यात काय अर्थ आहे, आपण प्रथम मुद्याचे बोलू. अर्थात तू अगोदर माझ्या बुद्धीची परीक्षा घेऊ इच्छित आहेस का बळाची ?"
     " अगोदर बुद्धीचीच परीक्षा होईल. कदाचित शस्त्र बळाची
परिक्षा घेण्याची गरजच भासणार नाहीये. कारण मृत शरीर
परीक्षा तर देवू शकणार नाही ना ? म्हणून तू मला
कोणताही प्रश्न विचार त्या प्रश्नांचे जर मी उत्तर देवू शकली
नाही तर मी आपला पराजय स्वीकार करीन. विचार काय
विचारायचे आहे तुला ते." आता इथून पुढे-

    त्यावर घटोत्कच म्हणाला," मी तुला एक कथा ऐकवितो.
कथा ऐकल्यानंतर एक प्रश्न विचारीन त्या प्रश्नाचे फक्त तू
उत्तर द्यायचे."
    " हो चालेल." मोर्वी उद्गारली.
    एका नगरात एक कामुक व्यक्ती राहत होता. तो एका
वेश्येवर प्रेम करू लागला. ती वेश्या सुद्धा त्याच्यावर प्रेम करू लागली. दोघांनी विवाह तर केला नाही परंतु अनैतिक संबंध केले. त्याच्या पासून ती गर्भवती झाली. आणि त्या
वेश्याने  एका मुलीला जन्म दिला. परंतु पेशाने ती वेश्याच
होती. काही दिवसानंतर  तिच्या जीवनात एक दुसरा पुरुष
आला नि ती त्याच्या सोबत पळून गेली. त्यानंतर तिच्या मुलीचा सांभाळ त्या कामुक व्यक्ती ने केला .कालांतराने ती कन्या उपवर झाली. ती कन्या आपल्या आई पेक्षा ही सूंदर असते. तिचे सूंदर रूप पाहून तो कामुक व्यक्ती तिच्यावर भाळला. आणि मग तिला म्हणाला ," तू माझी मुलगी नाहीस.
एका शेजारी माणसाची मुलगी आहेस. तो स्वर्गवाशी झाल्या
मुळे मी तुला फक्त लहानाचे मोठे केले आहे, त्यामुळे आपल्या दोघां मध्ये पिता पुत्री चे नाते नाहीये. तू स्त्री नि मी
पुरुष फक्त हेच आपल्या दोघां मधले नाते आहे." त्या मुलीला
ते खरे वाटले. त्या मुलीने त्याच्याशी अनैतिक संबंध केले .ती सुध्दा गर्भवती झाली. नऊ महिने पूर्ण होताच ती एका कन्येला जन्म दिला. आता मला सांग त्या कामुक व्यक्तीचे त्या कन्येशी काय नाते आहे ? पुत्री का द्वहित ?"
    त्यावर  मोर्वी म्हणाली ,"  पुत्री !"
  "  अच्छा मग त्या कन्येच्या आईचे त्या कामुक व्यतिशी
काय नाते आहे ?" त्यावर मोर्वी म्हणाली , " पुत्री !"
    " दोन्ही पुत्री कश्या होऊ शकतील ?"
     " मग द्वहित !"
     " नाही."
    आता मात्र मोर्वी फार गोंधळली. तिला उत्तर काही सुचेना ! तेव्हा घटोत्कच उद्गारला ," मोर्वी तू पराजित झाली आहेस. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर ऐक. त्या दोन्ही सुध्दा त्याच्या पुत्री नाहीत."
    " कसे काय ?"
    "  शास्त्रांचा आधारानुसार त्या कामुक व्यक्ती ने दोघांपैकी
कोणत्याही  स्त्री ही विवाह केला नव्हता. अर्थात त्या दोघींशी
पुत्री अथवा द्वहित नाते बनण्याचा प्रश्नच उदभवत नाहीये." त्यानंतर दोघांमध्ये तलवारीचे द्वंद्वयुद्ध सुरू होते. घमासान युध्द होते. शेवटी मोर्वीच्या  हातातून तलवार खाली
पडली नि ती स्वतः पलंगावर जाऊन पडली. ती उठण्या आधीच घटोत्कच ने तिच्यावर  अशी तलवार फेकून मारली
की त्या एका तलवारी पासून अनेक तलवारी निर्माण झाल्या. नि तिच्या अंगाला यत्किंचितही स्पर्श न होता अश्या काही जाऊन रुतल्या. ती आपल्या जाग्यावरून यत्किंचितही हलु
शकत नव्हती. तेव्हा घटोत्कच म्हणाला," मोर्वी तू हरली आहेस बोल तुला पराजय स्वीकार आहे किंवा नाही ?" त्यावर मोर्वी म्हणाली," मी माझी हार स्वीकार करते "  तेव्हा घटोत्कच म्हणाला ," जर काकाश्री वासुदेव कृष्णाने तुझ्याशी
विवाह करण्याचा प्रस्ताव माझ्या समोर ठेवला नसता तर आज मी तुझा वध केला असता ,कारण तू आपल्या बुद्धी आणि बळ च्या घमंड मध्ये अनेक निर्दोष  युवकांचा बळी घेतलास. त्यामुळे मी जरी तुझा वध केला असता तरी मला त्याचे पाप लागले नसते." असे एक विशिष्ट खुण केली बस्स सर्व तलवारी गायब झाल्या. तशी मोर्वी उठून उभी राहिली नि दोन्ही हात जोडून त्याच्या पुढे खाली बसून म्हणाली ," आज पासून आपण माझे स्वामी आणि मी  आपली दासी ! माझ्याशी विवाह करून मला कृतार्थ करा."
    तेव्हा घटोत्कच म्हणाला ," जरूर . परंतु त्यासाठी मला
आपल्या घरी जावे लागेल कारण माझे संगेसबंधी आणि
परिवार आपल्या दोघांच्या विवाहाला उपस्थित असणे आवश्यक आहे. "
    " ठीक आहे, मी आपली वाट पाहीन." त्यानंतर घटोत्कच
तेथून निघाला तो थेट वासुदेव कृष्णापाशी आला नि म्हणाला,
काकाश्री मी आपल्या आज्ञा नुसार मोर्वीला बुद्धी आणि बळ
मध्ये पराजित करून तिचा अभिमान उतरवला आणि तिचे
मस्थक माझ्या चरणापाशीही झुकविले आणि आपल्या आज्ञाचे पालन ही केले."
     " अभिनंदन पुत्र अभिनंदन ! मला माहित होते की तू
मोर्वीचा अभिमान तोडण्यास पूर्ण यशस्वी होणार. अभिमान
हा मानव प्रवृत्तीचा विकार आहे, जसे सूर्याचा दोष त्याला लागणारे ग्रहण आहे. आणि मानवाचा दोष त्याचा अभिमान
आहे. म्हणून मोर्वीचा अभिमान तुटने आवश्यक होते. मोर्वीचा आता अभिमान  तुटला आता ती महान झाली." त्यावर घटोत्कच म्हणाला ," जर आपली आज्ञा असेल तर मी आपल्याला एक प्रश्न विचारू का काकाश्री ?"
    "  आज्ञा तर परकी माणसे मागतात  वत्स ! तू तर माझा आपला आहेस आणि आपल्या माणसाला आज्ञेची गरज पडत नाही. विचार काय प्रश्न आहे तुझ्या मनात ?"
    " संसार मध्ये मोठमोठे महावीर , बलवान नि बुद्धिमान सुद्धा अनेक युवक आहेत मग आपण माझीच निवड का केलीत ?"
    " का ? तुला मोर्वी आवडली नाही ?"
    " आवडली ना खूप आवडली ? परंतु माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाहीये."
    " परंतु तू हा प्रश्न का विचारू इच्छितोयस ?"
    " कारण आपल्या हातून कोणतेही कार्य अकारण होत नाही. आपल्या मुखातून निघालेला शब्द अर्थहीन असत नाही. तसेच आपल्या प्रत्येक आदेशा मध्ये सुष्टीचा काही ना
काही भेद अवश्य लपलेला असतो. म्हणून मला तो सृष्टीचा
भेद जाणून घ्यायचा आहे."
    " मग असं बोल ना ? तुला  भविष्यातल्या अंगणात वाकून
पहायचे आहे  असंच  ना ?"
    " हवं तर तसं समजा."
    " संसार मध्ये घडणाऱ्या घटना त्याच वेळी जन्म घेतात
जेव्हा दोन महान व्यक्तीचे मिलन होते. जसे की तुझा नि मोर्वीचा संबंध आणि विवाह साधारण नाहीये. तू महाबली भिम नि महापराक्रमी हिडींबा या दोघांचा पुत्र आहेस. तुझ्या नि मोर्वीच्या संबंधातून एक अशी घटना घडणार आहे की त्या
मुळे तुम्हां दोघांची ही महती अधिक वाढणार आहे." असे
म्हटल्यामुळे मंत्रमुग्ध होऊन फक्त वासुदेव कडे फक्त पाहतच
राहिला. तो काहीच बोलत नाही म्हणून वासुदेव ने विचारले,
काय झालं तू मोर्वीच्या सुंदरते वर संतुष्ट नाहीयेस का वत्स ?"
    " छे छे छे ! तसं नाही काही मी एकदम खुश आहे. आणि
खरे सांगायचे तर मी तर धन्य झालो."
    " मग चल इंद्रप्रस्थाला चलू या ना तुझा विवाह तेथेच संपन्न
होईल."
    " आज्ञा असेल तर मी माताश्री चे दर्शन करून येऊ ?"
    " मातोश्रीचा आशीर्वाद घेणे हा तुझा सर्वांत मोठा धर्म
आहे. जा मातोश्री दर्शन करून ये."
    " मी फक्त तिचे दर्शनच घेणार नाही तर माझ्या सोबत
तिला इंद्रप्रस्थाला नेणार आहे, माझा विवाह तिच्या उपस्थिती
शिवाय कसा संपन्न होईल."
     " मातोश्री दर्शन कोणत्याही बहाण्याने घेणे म्हणजे स्वर्गाचे द्वार खटखटविण्या सारखे आहे. कारण मातेच्या चरणा जवळच स्वर्ग असते. आता राहिला प्रश्न वहिनीला इंद्रप्रस्थाला घेऊन जाण्याचा तर  तू  प्रयत्न अवश्य कर."
  घटोत्कच ने वासुदेव कृष्णाचे चरणस्पर्श केले. तसा वासुदेव
ने आयुष्यमान भव चा आशीर्वाद दिला. त्यानंतर घटोत्कच
तेथून निघाला. घटोत्कच जसा घरी पोहोचला नि आपल्या
विवाह विषयी सारी माहिती देऊन तिला आपल्या सोबत
इंद्रप्रस्थाला चलण्याची विनंती करतो. तशी ती त्याला
म्हणाली ," काय बोलतोस तू हे मी कशी बरं इंद्रप्रस्थाला
येऊ शकते ?" त्यावर घटोत्कच म्हणाला ," मला माहित आहे
की तू पिताश्री ना वचन दिले होतेस की विवाह नंतर इंद्रप्रस्थ
किंवा राजभवन मध्ये राहायला येणार नाही. परंतु मी तिथे
तुला राहायला घेऊन जात नाहीये. फक्त माझ्या विवाहाला
तू उपस्थित पाहिजेस."
     " हट्ट करू नकोस मी कोणत्याही बहाणाने तेथे येणार
नाहीये."
    " मग हा विवाह सुद्धा होणार नाहीये."
    " का वेड्या सारखा हट्ट करतो आहेस तू ? तुझी इच्छा ही
आहे काय की मी आपले वचन तोडावे ?"
    " अगं  आई ,लोक काय म्हणतील की घटोत्कच असा एक
नालायक पुत्र होता की त्याने आपल्या विवाहाला आपल्या
मातेलाही बोलविले नाही."
   " आणि उद्या लोक हे  नाहीत का म्हणणार ? हिडींबा ने आपल्या पुत्राच्या मोहाला बळी पडून तिने आपले वचन मोडले. तुझी अशी इच्छाआहे का तशी की तुझ्या आईला
साऱ्या संसारने  नावे ठेवावीत ? भीष्म पितामहा च्या वंशाला
मी लायक नाही हे सिध्द कायचे आहे का तुला ? बोल पुत्रा तुझ्या आईला लोकांनी नावे ठेवलेली चालतील का तुला ?
तुझी इच्छा जर तशी असेल तर मी तुझा हा हट्ट पूर्ण करते नि
येते इंद्रप्रस्थाला "
     " नको आई ! माझ्या मुळे तुझी मान खाली झुकावी असे
कर्म कधीच होणार नाहीये माझ्या कडून.मला फक्त तुझा
आशीर्वाद पाहिजे बस्स !"
    " माझा आशीर्वाद तुम्हां दोघां च्या गटबंधन मध्ये असेल,
माझा आशीर्वाद त्या फुलांच्या माळा मध्ये ही असेल जी
पुष्प माळा आपल्या वधूच्या गळ्यात घालशील.परंतु एक
गोष्ट द्यानात ठेव तुझा विवाह वासुदेव कृष्णाच्या इच्छेनुसार
होत आहे, अर्थात त्यांच्या ह्या इच्छेत काहीतरी गूढ अवश्य
लपले आहे, परंतु त्याचा भेद जाणून घेणे प्रत्येक प्राणाच्या शक्तीच्या पलीकडे आहे.तेव्हा आता निघायचं बघ. इंद्रप्रस्थ ला तुझी सर्वजण वाट पाहत असतील. शुभ कार्याला विलंब
नको आहे, जा नि लवकर ये परत. मी इथं तुम्हां दोघांची
वाट पाहत आहे." तेव्हा घटोत्कच पुन्हा एकदा पाया पडला.
हिडीबा ने त्याला आशीर्वाद दिला. तसा तो निघाला.

    इंद्रप्रस्थाला विवाहाची सारी तयारी करून ठेवली होती
फक्त घटोत्कच येण्याची सर्वजण वाट पाहत होते. घटोत्कच
वासुदेव कृष्णा सोबत पोहोचले. लगेच विवाहाच्या विधीला
सुरुवात झाली.सर्व विधी संपन्न होताच प्रथम त्या उपायांनी
महर्षी व्यास यांचे चरणस्पर्श केले. तेव्हा महर्षी व्यासांनी
घटोत्कचाला आयुष्यमान भव चा तर मोर्वी ला अखंड सौभाग्यवती भव चा आशीर्वाद दिला. त्यानंतर वासुदेव कृष्णाचे चरणस्पर्श केले. वासुदेव कृष्णाने घटोत्कचाला
आयुष्यमान भव तर मोर्वी ला सौभाग्यवती भव चा आशीर्वाद दिला. तेव्हा मोर्वी म्हणाली ," जर आपण नसता तर माझी
मांग सुनीच राहिली असती. आज आपल्या मुळे मला सौभाग्य प्राप्त झाले. मी आज कृतार्थ झाले." त्यावर वासुदेव
कृष्ण म्हणाले ," मी काहीच केलं नाही. खरे सांगायचे तर
तुम्हां दोघांचा एकमेकांसाठीच जन्म झालेला आहे. कारण पती-पत्नीची जोडी स्वर्गातच बांधलेली असते. फक्त आपल्याला ते माहीत नसते इतकेच ! म्हणून त्या दोघांना
एकत्र आणण्यासाठी कुणी ना कुणी माध्यम बनतो बस्स !"
    त्यानंतर राजमाता कुंती चे चरणस्पर्श केले. तेव्हा कुंती ने
सुद्धा दोघांना आशीर्वाद दिला.त्यानंतर एक एक करून सर्व
पांडवांचा पाया पडले नि आशीर्वाद मिळविला. त्यानंतर
घटोत्कच म्हणाला ," आजी आता आम्हाला जाण्याची आज्ञा
द्या." तेव्हा कुंती म्हणाली ," एवढी घाई का आहे, थोडे दिवस
रहा इथं.आम्ही अजून आमच्या सुनेला नीट पाहिलं देखील
नाही." त्यावर घटोत्कच म्हणाला ," थांबलो असतो.परंतु तिकडे दूर वनात मातोश्री आमची वाट पाहत असेल."
    " हिडींबा तुमच्या सोबत इथं यायला हवं होतं. खूप
वर्षांनी
    " आपल्याला तर माहीतच आहे,की मातोश्री ने विवाहापूर्वी प्रतिज्ञा केली होती की आपल्या राज परिवारात
पाऊल ठेवणार नाहीये."
     " तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती नि आताची परिस्थिती फार वेगळी आहे."
     " हा पुत्र आताची परिस्थिती बदलली आहे."
      " परिस्थिती बदलली असली तरी प्रतिज्ञा ना बदलली जात नाही तोडली जात .ती एकदा घेतली ती घेतली. आणि
आपण तर मातोश्रीचा स्वभाव जाणता ती कधीच बदलणार
नाही." तेव्हा वासुदेव म्हणाले," आम्हां सर्वाना  वहिनीचा
स्वभाव माहीत आहे ती कदापि बदलणार नाही. ती ज्या कुलाची कुलवधू आहे की ज्या कुलात पितामहा भीष्म सारख्या महापुरुषानी जन्म घेतला. तो वंश कधीच आपली परंपरा सोडणार नाही. आमची वहिनी फार महान आहे.
आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व सुखावर
पाणी सोडले. जा पुत्र ! आम्ही तुम्हां दोघांच्या सुखी जीवनाची कामना करतो." पुन्हा एकदा वासुदेव कृष्णा चे चरणस्पर्श केले नि दोघेही निघाले. जेव्हा ते आपल्या घरी
पोहोचले. तेव्हा हिडींबा त्या दोघांची आतुरतेने वाट पाहत
होती. ते दोघेही येताच हिडींबा  त्या दोघांचे स्वागत करण्यासाठी दरवाजात आली.तेव्हा घटोत्कच म्हणाला ,
    " मातोश्री मी आपल्यासाठी सून आणली.मोर्वी मातोश्रीचे
चरणस्पर्श कर." असे म्हणताच मोर्वी पाया पडण्यासाठी
खाली वाकली परंतु हिडींबा तिला वरचेवर पकडत आपल्या
हृदयाशी लावली नि म्हणाली ," मला माहित होते की वासुदेव
तुझ्यासाठी कन्या पाहिली आहे तर ती स्वर्गातील अप्सराच
असणार आहे." तेव्हा मोर्वी म्हणाली ," मातोश्री मी आपली
सेविका आहे." तेव्हा हिडींबा म्हणाली ," नाही नाही सेविका
नाही सांगिनी म्हण. आजपर्यंत मी ह्या घरात एकटीच होती
परंतु आता तू आलीस आता मला एकटे एकटे वाटणार नाही." असे म्हणून आपल्या पुत्राकडे पाहत म्हणाली ," आणि ऐकून ठेव.माझ्या सुनेला तू अजिबात त्रास द्यायचा
नाहीयेस." त्यावर घटोत्कच मुद्दाम थट्टा करत म्हणाला ," वा !
नवीन सून घरी आलं तशी जुन्या पुत्राची गरज उरली नाही." हिडींबा उद्गारली ," नाही असं नाहीये. सून आल्याने आईचा
आशीर्वाद अर्धाच मिळणार कारण अर्धा सुनेचा असणार ना ?
कारण पत्नी अर्धागिनी असते.पतीच्या प्रत्येक सुखा-दुःखाची अर्धी भागीदारिणी असते.आपल्या पती चा वंश वाढविणारी
असते.मला फक्त एकच गोष्टीची चिंता आहे." तेव्हा मोर्वी ने विचारले ," मातोश्री कोणत्या गोष्टीची ?"
    " तू राजवाड्यात लहानाची मोठी झाली आहेस. तुला
ह्या वनात कष्ट तर होणार नाहीत ना ?"


   क्रमशः


 



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..