Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १२१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १२१
महाभारत १२१

 


                 महाभारत १२१

     महाराणी द्रौपदी महारानी सुदेष्णा सोबत कौरवांच्या
शिबिरात आहेत. तेव्हा महाराणी द्रौपदी म्हणाली ," हे शिबिर
कोणाचे आहे माहीत आहे का ?" त्यावर महारानी सुदेष्णा
म्हणाली ," कौरवांचे !" तेव्हा महारानी द्रौपदी म्हणाली," नाही. हे शिबिर त्यांचे ज्यांनी माझा कुरुसभेत अपमान केला
होता.माझ्या केसांना पकडून फरफटवित राज्य सभेत आणले होते.ज्याचे हात माझ्या वस्त्रा पर्यंत पोहोचले होते
त्यांचे शिबिर आहे हे. मला असभ्य वाणी ने वेश्या ही म्हटले
गेले. हे अश्या लोकांचे शिबिर आहे की त्यांनी सर्व मर्यादा
पार केल्या होत्या. परंतु मला हे कळत नाहीये की मिळालेल्या
विजयाचा आनंद व्यक्त करू ? का दुःख व्यक्त करू ?"
     तेवढ्यात तेथे महाराणी गांधारी आल्या नि उद्गारल्या,
    " महारानी द्रौपदीचा विजय असो."
    " जेष्ठ माताश्री आपण....?  "
    " हां मी तुझी जेष्ठ माता ! परंतु ह्या शिबिरात रडू नकोस.
कारण हे एका तुटलेल्या अहंकाराचे शिबिर आहे, एका मृत
झालेल्या महत्वकांक्षाचे शिबिर आहे, मी पाहू तर शकत नाही. परंतु ऐकू शकते. ह्या सर्वाला जबाबदार तुझ्या जेष्ठ पिताश्रींची उच्चकांक्षा आणि तुझ्या दिराचा अहंकारच
कारणीभूत आहे." तेव्हा महारानी द्रौपदी ने त्यांचे चरणस्पर्श
केले. तेव्हा त्या म्हणाल्या ," या क्षणी माझा विवेक एकदम
शून्य आहे, म्हणून ना मी तुला आशीर्वाद देऊ शकत ना अभिशाप ! तिकडे माझा पुत्र जखमी अवस्था मध्ये
आपल्या मृत्यूची वाट पाहतोय. त्याला काय त्रास होत असेल
याची मी कल्पना पण करू शकत नाहीये. जर इथं कुंती असती तर मी तुझ्या कडे आली नसती. परंतु कुंती कर्णाचा
वध होताच हस्तिनापूरला निघून गेली. ती असती तर माझे
दुःख समजू शकली असती कारण आम्ही दोन्ही माता
एकमेकांचे दुःख समजत होतो. हे महारानी जर शक्य असेल
तर दुर्योधन आणि दु:शासनाच्या अपराधाला क्षमा कर, नि
आपल्या अपमानाच्या बदली माझे केस पकड आणि मला हस्तिनापूरला घेऊन चल. परंतु माझ्या पुत्रांच्या अपराधाला
क्षमा कर पुत्री ! " द्रौपदी च्या छातीवर डोके आर्त स्वरात
त्या बोलत होत्या.

      रणभूमीवर दुर्योधन एकट्याच पडला होता. तो आकाशातील चंद्राला उद्देशून म्हणाला ," हे चंद्रदेव तुझ्या
वंशात पांडव सारख्या भ्याड लोकांनी कसा जन्म घेतला.
आणि खरे सांगायचे तर हा तुझ्या माथी लागलेला कलंक आहे तो ना माझ्या रक्ताने धुतला जाणार ना पांडवांच्या रक्ताने !" तेवढ्यात तेथे अश्वत्थामा आला. त्याला पाहून दुर्योधन म्हणाला," अरे हा घाव आणि वाहणारे रक्त तर वीरांची संपत्ती आहे मित्र ! मित्र मला सुद्धा कपट नीतीचा वापर करून मारले गेले, जसे तुझ्या पिताश्री ना मारले गेले. परंतु तू माझे अभिनंदन कर. अर्जुन भले ही गुरुदेवांचा प्रिय शिष्य होता. परंतु त्यांच्या मृत्यूंचा उत्तराधिकारी मी ठरलो. म्हणून रडू नकोस. उलट माझे अभिनंदन कर मित्रा !"
    " युवराज , युद्धात विजय होवो अथवा पराजय  मी तुझ्या सोबत सदैव आहे, मी त्या पांडवांना कदापि माफ करणार
नाही. माझ्या पित्याच्या वधाचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाहीये. म्हणून मी काय करायचं तेवढं फक्त बोल. सैन्या नसली तरी  आम्ही अजूनही  तिघेजण आहोत. मी , मामाश्री, आणि कृतवर्मा ! काय करायचे ते फक्त सांग."
     " ते दोघे आहेत कुठं ?" तेव्हा ते दोघेही त्याच्या समोर
येतात. तेव्हा कुलगुरू कृपाचार्य उद्गारले ," युवराज !"
    " मी ज्या राज्याचा युवराज होतो ते राज्य आता राहीलं नाहीये." कुलगुरू कृपाचार्चांनी त्याचे मस्तक उचलून आपल्या मांडीवर घेतले.
     " मी जिवंत असेपर्यंत हे युद्ध संपलेले नाहीये. मी तुला
प्रधान सेनापती म्हणून नियुक्त करतो." अश्वत्थामा खाली
वाकला तसा दुर्योधनाने आपल्या रक्ताचा टिळा त्याच्या कपाळी लाविला नि म्हणाला त्या पाची पांडवांचे कापलेली मुंडके मला दाखवायला घेऊन जा. तोपर्यंत मी आपला प्राण सोडणार नाहीये." तसा अश्वत्थामा म्हणाला," मी आताच आक्रमण करतो पांडवावर." तेव्हा कुलगुरू कृपाचार्य म्हणाले," या क्षणी ! हे तर युध्द नियमाच्या विरुद्ध आहे."
     " त्यांनी कोणते नियम पाळलेत ते आपण पाळायचे
तसे पण नियमांचा भंग कधीच झालाय. म्हणून त्या विषयी
आता चर्चा नाही!" असे म्हणून तो निघाला ही! त्याच्या
पाठोपाठ कृतवर्मा, आणि कुलगुरू कृपाचार्य दुर्योधनाचे मस्तक खाली ठेवून निघाले. त्यानंतर थोड्याच वेळात
दुर्योधन आपला प्राण त्यागला.
    
   महाराज धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या मृत्यू ने एकदम विव्हल
करून टाकले होते. ते रडत म्हणाले ," हे संजय माझ्या पुत्राचे
शवं एकटेच पडले असेल ना रणभूमीवर ?"  त्यावर संजय
म्हणाला ," मला माहित नाही." तेव्हा महाराज धृतराष्ट्र चिडून
म्हणाले," मग पाहून सांग."  त्यावर संजय म्हणाला," हे राजन युवराजचे तेथे आपले डोळे मिटले नि इथं माझ्या
डोळ्यांची दिव्यदृष्टी निघून गेली. हे राजन यावरून हे सिध्द
होते की युध्द कोणत्याही समस्या चे समाधान नाहीये. युद्धाने
फक्त विनाश होतो. जसा आता झालाय. आपण हे युद्ध रोखू
शकत होता. परंतु तसे केले नाही."
     " हां मी हे युद्ध रोखू शकत होतो. परंतु माझी महत्वकाक्षा
नेहमी आड येत असे. आणि मला पुत्र मोहाने जकडलं होते. त्याचाच हा परिणाम ! हे संजय हे युद्ध जरी युध्द भूमीवर समाप्त झाले असले तरी माझ्या हृदयाच्या आंत अजूनही युध्द सुरू आहे, मीच तलवार आहे, नि मीच ढाल आहे,मीच मला जखमी करत आहे. ह्या युद्धात मी जरी विजयी ठरलो तरी माझ्या हातात पराजय ही येईल. हे पुत्र दुर्योधन मी तुझ्या
सोबत मोठा अन्याय केला. लोक आपल्या पुत्राना मध चाटवून लहानाचे मोठे करतात. परंतु मी तुला माझ्या महत्वकांक्षाचे विष चाटवून मोठे केले. हा त्याचाच परिणाम आहे. तुझे शवं तिकडे पडले आहे, आणि तुझ्या जवळ ही कोणी नाही याहून मोठे दुर्दैव तरी कोणते असेल बरे ?"
      रात्रीची वेळ होती. सर्वत्र सामसूम झाली होती. तसे हे
तिघेही पांडवांच्या शिबिराच्या दिशेने निघाले. तेव्हा अश्वत्थामा त्या दोघांना उद्देशून म्हणाला," हे युद्ध माझे आहे, म्हणून तुम्ही दोघांनी इथंच थांबा. परंतु मी आपल्या कडून एवढी आशा करतो की इथून कोणालाही आपण पळू देणार नाहीत. जर दुर्योधन नाही तर पांडव पण जिवंत राहणार नाहीत. बाकी शून्य शिल्लक राहिल." असे म्हणून लपत छपत आंत प्रवेश करतो. पांडव विजयी झाले होते म्हणून पाहेकरी पण थोडे गाफीलच होते. अश्वत्थामा प्रथम धृष्टद्युम्नाच्या शिबिराच्या जवळ गेला. परंतु दरवाजात पाहेकरी अडवतील म्हणून पडदा तलवारीने फाडला नि आंत शिरला. धृष्टद्युम्न एकदम शांत पणे झोपला होता. त्याला काय ठाऊक आजची रात्र त्याच्यासाठी काळरात्र बनून आली होती. धृष्टद्युम्नाला पाहताच त्याला आपल्या पित्याला धृष्टद्युम्न ने मारल्याचे  दृश्य  डोळ्यासमोर उभे राहिले. त्याचा राग अनावर झाला. त्याने आपली तलवार उचलली नि धृष्टद्युम्नाच्या पोटात घुसविली. धृष्टद्युम्न झोपेत असल्याने काय घडलं ते कळलेच नाही. तो जागच्या जागी ठार झाला. त्यानंतर त्याच्या शिबिरातून बाहेर पडला तेव्हा दोन सैनिक एका शिबिरातून बाहेर पडत असताना आपसात बोलत होते की आज विजयी श्री ची रात्र असल्यांने पाची भाऊ एकाच शिबिरात झोपले आहेत. ते त्यांच्या पाठीमागे लपलेल्या अश्वत्थामा ने ऐकले. त्याला वाटले की ते दोन सैनिक पांडवा विषयी बोलत असावेत. ते दोन सैनिक जसे पुढे निघून गेले. तसा अश्वत्थामा गुपचूप त्यांच्या शिबिरात शिरला नि एकत्र झोपलेल्या पाची बांधूना एक एक करून सर्वांना बाण मारून सर्वांचा झोपेतच वध केला नि खुश होऊन तो बाहेर आला नि आपल्या मामाश्री ना खूश खबर दिली. परंतु त्याच वेळी पांडवांच्या पाहेकरी सैनिकांनी त्या लोकांना पाहिले. ते सैनिक धावत आले असता त्या तिघांनी बाण मारून शिबिरालाच अग्नि लावून दिली. आणि ही खुश खबर द्यायला दुर्योधन जवळ गेला. परंतु दुर्योधन तोपर्यंत वीरगती ला प्राप्त झाला होता.
    तेव्हा दुर्योधनाला उद्देशून म्हणाला," मी येईपर्यंत पण
थांबला नाहीस. मी तुला खुश खबर द्यायला आलो होतो.
मी माझा बदला घेतला. पाची पांडवांना झोपेतच ठार केले.
मी मित्रत्वाच्या पोटी पांडवांचा निःशस्त्र आणि झोपेत असताना त्यांचा वध केला  असला तरी मी भ्याड पणाचे कार्य केले आहे. अर्थात मला प्रायश्चित घ्यावेच लागेल. परंतु मी तुला अश्या अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही." असे म्हणून त्याने चिता रचली नि दुर्योधन त्यावर ठेवून अग्नि दिला. त्यानंतर सरळ प्रायश्चित्त करण्यासाठी महर्षी व्यास यांच्या आश्रमाच्या दिशेने निघाला. इकडे पांडवांना समजले. ते सर्वजण तिथे आपल्या पाची पुत्रा जवळ उभे होते. तेव्हा
द्रौपदी आपल्या पुत्राच्या शरीरातील काढले बाण दाखवत
म्हणाली ," तुमच्या पैकी कुणी या बाणांना ओळखतो का ?"
तेव्हा अर्जुन ने ते बाण निरखून पाहिले नि लगेच ओळखत
म्हणाला ," हे बाण गुरुपुत्र अश्वत्थामाचे आहेत." तेव्हा द्रौपदी
म्हणाली ,"  मला त्या अश्वत्थामा चे शिरकमल आणून देईल
तेव्हाच मी माझ्या पाच पुत्रांचा दाहसंस्कार करीन." तेव्हा
वासुदेव कृष्ण म्हणाले ," अश्वत्थामा चा वध अशक्य आहे
कल्याणी कारण त्याला अमरत्वाचे  वरदान आहे." भीम म्हणाला ," पांचाली तू इथंच आमची वाट बघ. आम्ही त्याला
पकडून इथं आणतो मग तूच काय ती त्याला शिक्षा दे."
ते सर्वजण निघाले. जेव्हा अश्वत्थामा महर्षी व्यास कडे
पोचला नि आपण केलेले कृत्य त्यांच्या समोर कबूल केले.
नि म्हटलं ," मला त्यासाठी प्रायश्चित्त करायचे आहे."
   तेव्हा महर्षी व्यास म्हणाले ," तुला प्रायश्चित्त तर करायलाच
लागेल. परंतु पांडव जिवंत आहेत. तू ज्यांना पांडव समजून
मारलेस ते द्रौपदीचे पाच पुत्र होते. विधीचे विधान तू बदलू
शकत नाहीस. जिथं वासुदेव आहेत तिथं तुझं काहीही चालणार नाहीये." तेवढ्यात तेथे पांडव पोहोचले. पांडवांना
पाहून त्याने लगेच आश्रमाच्या छप्पर ची गवताची काडी
हातात घेतली नि ब्रम्हंस्त्राचा मंत्र जपला. ब्रम्हांस्त्र प्रगट केले नि म्हटलं ," हे ब्रंम्हस्त्र समस्त पांडवांचा विनाश कर." असे
म्हटलं नि पांडवांच्या दिशेने फेकले. वासुदेव कृष्ण म्हणाले,
पार्थ ब्रम्हांस्त्र प्रगट कर ." लगेच अर्जुनाने ब्रम्हस्त्र प्रगट केले
नि सोडले अश्वत्थामाच्या ब्रम्हस्त्रावर तेव्हा महर्षी व्यासांनी
पाहिले दोन्ही अस्त्रे एकमेकांवर टक्कर घेण्याच्या अगोदर
वर गेले नि त्या अस्त्रांना आपल्या तळ हातानी रोखिले.
आणि दोघांनाही उद्देशून म्हणाले ," तुम्हा गुरू द्रोणानी शिकविले नाही काय हे अस्त्र फक्त मानव कल्याणासाठी
वापरायचे असते. वासुदेव तुम्ही पण अर्जुनला रोखले नाही."
     तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ,"  अश्वत्थामा ने अस्त्र सोडले होते. मग त्याचे निवारण करण्यासाठी मला अर्जुनला
आदेश द्यावा लागला ऋषींवर !" तेव्हा महर्षी व्यास म्हणाले,
    " अर्जुन आपले शस्त्र मागे घे."
    " जशी आपली आज्ञा ! " असे म्हणून आपले अस्त्र मागे
घेतले." तेव्हा त्यांनी अश्वत्थामालाही तेच सांगितले. तेव्हा
अश्वत्थामा म्हणाला ," मला अस्त्र मागे घेण्याची कला येत
नाही." तेव्हा महर्षी व्यास चिडून म्हणाले," मागे घेता येत नाही तर मूर्ख अस्त्रा चालविले कशाला ? आता या अस्त्राची
दिशा बद्दल." तेव्हा अश्वत्थामा म्हणाले ," मी दिशा तर अवश्य
बदलीन .परंतु ते जाणार पांडवांच्या दिशेने ! मी पांडवांना मारू शकत नाही तर काय झालं परंतु त्यांच्या वंश बीज तर
मी नष्ट करूच शकतो. त्या प्रमाणे ते ब्राम्हस्त्र उत्तरेच्या गर्भावर गेले. तेव्हा वासुदेव कृष्ण अश्वत्थामाला म्हणाले ," तुला काय वाटले की तू पांडवांचा वंश खंडन करशील. मी वासुदेव कृष्ण त्या मुलाला जीवदान देईन. परंतु तू जन्मभर असाच भटकत राहशील तुला मुक्ती सुद्धा मिळणार नाहीये." असे म्हणून युधिष्ठिर कडे पाहत म्हणाले ," मोठे दादा ह्याच्या
डोक्यावरचा मणी काढून घ्या. तो मानव कल्याणासाठी आहे."
    तेव्हा अश्वत्थामा म्हणाला ," थांबा ! मी स्वतःच मणी काढून देतो." असे म्हणून एक सुरा घेतला नि आपल्या डोक्यावरचा मणी काढून दिला. आणि दोन्ही हात जोडून नम्र पणे म्हणाला," वासुदेव मी चुकलो,मला क्षमा करा नि आपला
शाप वापस घ्या." तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," हा शाप
नाही तर तू केलेल्या कर्माचा दंड आहे. तो तुला भोगावाच
लागेल." असे म्हणून तेथून निघाले.
     उत्तरा प्रसूत झाली परंतु मूल मृत निघाले. उत्तरा रडू लागली. तेवढ्यात तेथे पांडवा सहित वासुदेव कृष्ण आले.
तेव्हा उत्तरा मामाश्री माझा शेवटचा आधार होता तो सुध्दा
गेला." तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," असा कसा जाईल.
थांब आता मी त्याला जागे करतो." असे म्हणून खाली
बसले, नि एक हात त्या बाळाच्या डोक्यावर ठेवला.नि दुसरा
हात बाळाच्या छातीवर ठेवून म्हणाले ," बाळ जागा हो !"
आणि खरंच बाळ जसे झोपेतून जागे होते तसे जागे होऊन
पाहू लागले. तसे सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..