महाभारत १२४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १२४ |
महाभारत १२४
महाभारतील अनेक पात्रे आहेत त्यांचा मधेच एक पात्र आहे त्याचा उल्लेख केलेला नाहीये. हे पात्र युध्दाच्या आरंभा पासून उपस्थितत होते ते युध्द समाप्त होईपर्यंत. ते पात्र आहे घटोत्कच चा पुत्र बर्बरीक जो युध्द सुरू होण्याच्या काही दिवसा पूर्वीच प्रवेश झाला होता. परंतु त्याला युद्धात
भाग घेता आला नाहीये.का ते पहा.
घटोत्कचा पुत्र बर्बरीक गुरू विजयसिद्धीसेंन कडून
अस्त्रविद्या संपादन करून परतला होता. तो इतका खुश होता की आपल्या आजीच्या नावाचा जप करतच जणू घरी पोहोचला. त्याचा आवाज ऐकून त्याची आजी हिडींबा धावतच बाहेर आली आणि आपल्या नातवाला कडकडून भेटली. आणि त्याची चौकशी करत म्हणाली ," तुला पाहण्यासाठी माझी डोळे किती तरसले होते कुठून आलास ?" त्यावर बर्बरीक म्हणाला ," गुरुदेव कडून निघालो
तो सरळ इथं आलो. परंतु हस्तिनापूरला जाण्यासाठी !"
" हस्तिनापूरला कशासाठी जायचंय तुला ?"
" माझ्या कानावर आलंय की तिथं महायुद्धाची तयारी
सुरू आहे." त्यावर हिडींबा म्हणाली," माहीत नाही की ती
महायुद्धाची तयारी आहे का महाविनाश की !"
" असं का म्हणतेस आजी ?"
" युद्धात दोन्ही नेहमी अनोळखी योध्ये असतात. त्यांचे
आपसात शत्रू व्यतिरिक्त अन्य काहीही नाते नसते. परंतु इथं एकाच परिवारातील सदस्य आहेत. जेव्हा आपसात
युध्द युध्द सुरू होते. तेव्हा त्या युद्धाला महाविनाशच म्हटलं पाहिजे." त्यावर बर्बरीक म्हणाला," ते काही जरी असले तरी
एका बाजूला माझा परिवार आहे, अर्थात मला तेथे जायलाच
हवं." त्यावर हिडींबा म्हणाली ," शाब्बास पुत्रा ! जेव्हा
परिवारावर संकट येते तेव्हा परिवारातील सर्व सदस्यांनी
एकत्रित असायलाच पाहिजे."
" आजी तू पण तर त्या परिवारातील सदस्य होतीस ना ?
मग तू का नाही परिरावरा सोबत आहेस ?"
" ते यासाठी पुत्रा मी तुझ्या आजोबांना वचन दिले होते
की मी हस्तिनापूरच्या भवन मध्ये कदापि पाऊल ठेवणार
नाहीये."
" वचन नात्या पेक्षाही मोठे असते का ?"
" हां पुत्र हां वचन प्राणा पेक्षाही अनमोल आहे."
" मग मला आशीर्वाद दे की मी माझ्या वचनाचे पालन
करीन."
" आयुष्यमान भव पुत्र !"
" आजी आजोबांना काही संदेश द्यायचा असेल तर मी
गुपचूप आजोबांना देईन दुसऱ्या कोणालाही कळणार नाही."
" आपल्या आजीची मस्करी करतोस. परंतु त्याना काहीही संदेश देण्याची आवश्यकता नाहीये."
" मग ठीक आहे, मला जसा सांगता येईल तसा मी आजोबांना तुझा संदेश देईन."
" जा लवकर हस्तिनापूरला पोहोचेपर्यंत तुला संध्याकाळ
होईल."
" हा काय निघालोच !"
पांडव आपल्या शिबिर मध्ये बसून युध्दा विषयी आपसात चर्चा करत आहेत. तेव्हा जमिनीवर काढलेला
युध्द भूमीवरचा नकाशा दाखवत म्हणाला ," मोठ्या दादा हे
कुरुक्षेत्राचे मैदान आहे इथं एका टोकाला आपली सैन्या असेल नि दुसऱ्या टोकाला कुरुसेना असेल." इतक्यात तेथे सहदेव आला नि म्हणाला ," प्रणाम भ्राताश्री !"
" ये सहदेव काय आणलीस खबर ?"
" खबर ही आहे की गजसेना अश्वसैन्या भरपूर अभ्यास करत आहेत. दुर्योधन आणि दु:शासन जणू युद्धासाठी
उतावीळ झाले आहेत."
" सहदेव शक्ती शस्त्रा मध्ये असत नाही तर ते शस्त्र चालविण्याऱ्याच्या बाहू मध्ये असते."
" नारायणी सेन्या मिळाल्यामुळे त्यांची सैन्यासंख्या खूप वाढली आहे भ्राताश्री !" नकुल उद्गारला.
" नकुल युद्धाचा निर्णय सैन्यासंख्या करत नाही तर साहस करते आणि साहसाचा जन्मदाता सत्य आहे आणि सत्य आमच्या पाशी आहे. त्यांच्या कडे भले नारायणी सैन्या आहे, परंतु आमच्या जवळ वासुदेव कृष्ण आहे."
" ते सर्व ठीक आहे,अर्जुन परंतु वैऱ्याला कमी समजने
मुर्खता आहे, त्यांची संख्या भरपूर आहे. शिवाय त्यांच्या कडे
पितामहा आहेत, गुरू द्रोण , कृपाचार्य, कर्ण , अश्वत्थामा
सारखे महावीर आहेत आणि ते सर्वच्या सर्व अजेय आहेत."
" समोर कोण आहे याचा विचार करू नकोस दादा ! हे युद्ध
आम्ही करू इच्छित नव्हतो. त्यांनीच आमच्यावर हे युद्ध
लादले आहे." तेवढ्यात द्वारपाल ने येऊन सूचना दिली की
वीर घटोत्कचा पुत्र बर्बरीक आले आहेत." तसा भीम खुश
होऊन म्हणाला ," बर्बरीक आलाय माझा नातू !" असे म्हणून
त्याचे स्वागत करायला पुढे धावला. बर्बरीक जिथे वाट पाहत
होता तेथे भीम जसा आला तसे बर्बरीक ने त्यांचे चरणस्पर्श
केले. तसा भीमाने त्याला आयुष्यमानचा आशीर्वाद दिला.
नि म्हटलं ," बरे झाले तू आलास ते मी किती दिवसापासून
तुझी वाट पाहतोय." त्यानंतर भीम ने त्याच्या मातोश्री बद्दल
चौकशी केली तेव्हा तो म्हणाला," सर्वकाही क्षेमकुशल आहे
फक्त आजी बद्दल जरा चिंता वाटते."
" हिडींबा तिला काय झाले ?"
" काही नाही फक्त आपली चिंता करत असते."
" माझी चिंता ती कशासाठी ?"
" आपल्याला भोजन बरोबर मिळते की नाही ?" तेव्हा
भीमाच्या लक्षात आले की आपला नातू आपली मस्करी
करत आहे. तसा हसून भीम म्हणाला ," आपल्या आजोबांची
पण मस्करी करतोस काय ? चल तुझी सर्वजण वाट पाहत
आहेत." असे म्हणून भीम त्याला आपल्या सोबत घेऊन येतो
जिथे बाकीचे भाऊ बसले होते. सर्वात प्रथम त्याने युधिष्ठीराचे
चरणस्पर्श केले. युधिष्ठीर ने त्याला आयुष्यमानचा आशीर्वाद
दिला. त्यानंतर अर्जुन चे त्याने चरणस्पर्श केले. तेव्हा अर्जुनने
त्याला आशीर्वाद दिला नि त्यावर धनुष्य आपल्या हातात घेऊन निरखून पाहिले.त्या धनुष्याची प्रत्यंता खेचून पहिली नि त्याच्या धनुष्याची पण प्रशंसा करत म्हटले ," तुझे धनुष्य तर फार सूंदर आहे." तेव्हा बर्बरीक म्हणाला ," आजोबा मी आपला नातू आहे तर आपल्या सारखे गांडीव धनुष्य असणार ना माझ्याकडे." असे म्हणून त्याने नकुल आणि सहदेव यांचे ही चरणस्पर्श केले. तेव्हा दोघांनी सुध्दा त्याला आयुष्यमनाचा आशीर्वाद दिला. तेवढ्यात वासुदेव कृष्ण आले नि तिकडील हर्षभरीत वातावरण पाहून म्हणाले," संकट्याच्या वेळी हसणे म्हणजे काही खास गोष्ट आहे तर ! आज काही समारंभ आहे का ?"
" हो समारंभ तर आहे, माझा नातू बर्बरीक आला आहे."
वासुदेव कृष्णाचे चरणस्पर्श केले. तसा वासुदेव कृष्णाने
आशीर्वाद देत म्हटलं ," गुरू विजयसिद्धीसेंन तुला लवकर सोडले."
" माझी अस्त्राविद्या पूर्ण झाली." त्यावर वासुदेव कृष्ण
हसून म्हणाले ," ज्ञान , विद्या आकाशा सारखी आहे, जस जसा वर जावे तस तसे आकाश वरती जाते तसेच विद्या,
आणि ज्ञान त्याची पूर्ण होते ज्याला वाटते की मी किती
शिकलो नि किती शिकणे बाकी आहे."
" माझ्या म्हणण्याचे तात्पर्य असं नव्हतं आजोबा !"
" मग तुझ्या म्हणण्याचा तात्पर्य काय होता ?"
" मी ज्या उद्देशाने गुरू कडे गेलो होतो तो उद्देश माझा
पूर्ण झाला."
" आणि उद्देश काय होता ?"
" धनुर्विद्या आणि सिद्धी मंत्र प्राप्त करण्यासाठी मी गुरू
कडे गेलो नि मला दोन दिवसातच तीन सिद्धी मंत्र देऊन
धनुर्विद्या मध्ये निपुण आणि अजेय बनविले. आता मला कोणीही युद्धभूमीवर परास्त करू शकत नाही."
" गुरूंची संगत तर विशाल सागर सारखी असते. विशाल
सागराच्या जेवढे खोलवर जावे तेवढा अजून पुढे जायला हवे असे वाटते. म्हणून तुला अजून काही दिवस आपल्या गुरुकडे थांबून अध्ययन करायला हवं होतं वत्स !"
" माझाही विचार तर तोच होता. परंतु मला जसं कळलं की इथं युद्धाची तयारी सुरू झाली आहे. मी स्वतःला रोखू शकलो नाही. सरळ निघून आलो." बर्बरीक बोलला.
" युद्धात भाग घेण्यासाठी !" वासुदेव उद्गारले.
" हां ! आपल्या सिध्दी मंत्राच्या बाणांचा चमत्कार दाखविण्याची संधी आणखीन कुठं मिळणार आहे आजोबा !"
" परंतु इथं दोन्ही बाजूनी तुझे सारे नातलग आणि सगेसबंधी आहेत. म्हणून युध्द कोणत्या पक्षातून करशील ?"
" हे खरे आहे की मला कौरव सुद्धा तितकेच प्रिय आहेत. परंतु पांडव माझा परिवार आहे. अर्थात मी पांडवांच्या बाजूने
युध्द करीन."
" अच्छा म्हणजे तू आमच्या पक्षातून युध्द करणार तर !"
" हां परंतु तोपर्यंत युध्द करत राहीन जोपर्यंत माझ्या गुरूच्या आदेश नि मी दिलेल्या वचनाचे उल्लंघन होत नाही."
" कसला आदेश नि कसले वचन ?"
" माझ्या गुरूने सांगितले आहे की शक्तिशाली पक्षा समोर
दुर्बल पक्षाची मदत कर आणि मी तसेच करीन."
" भले शक्तिशाली सत्य स्थानी आहे नि दुर्बल असत्याच्या
मार्गावर असला तरीही !"
" सत्य आणि असत्याचे ज्ञान मला नाहीये आजोबा. आणि
नाही माझ्या गुरू ने त्या संदर्भात काही मार्गदर्शन केले आहे."
" याचा अर्थ असा तर झाला की शत्रू पक्ष निर्बल झाल्या तर त्यांच्या पक्षात तू जाशील ?"
" हो, शक्य आहे, कारण मी माझ्या गुरुला तसे वचन दिलं
आहे की जो पक्ष निर्बल असेल त्या पक्षातून मी लढणार. मग
कौरव असो वा पांडव !" तसा भीम रागाने म्हणाला, " बर्बरीक तू काय बोलतो आहेस ते कळतंय का तुला ? तू
आमच्या शत्रूंची मदत करणार."
" जर ते दुर्बल पडू लागले तर !"
" हे तर युध्द नीती विरुद्ध आहे." नकुल म्हणाला.
" गुरूचा आदेश नि माझे वचनाची रक्षा करणे माझे परम
कर्तव्य आहे." बर्बरीक उत्तरला.
" हे तू काय बोलत आहेस ? त्या पेक्षा तू युद्धात भागच
घेऊ नकोस." अर्जुन बोलला.
" हे कसे शक्य आहे ? माझा परिवार संकटात असताना
मी युद्धात भाग घेणार नाही हे शक्यच नाही.?" बर्बरीक बोलला.
" परंतु तू मध्येच आम्हाला सोडून कौरवांना जाऊन
मिळलास तर आमचं काय होईल ?" सहदेव बोलला.
" ह्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीयेत." बर्बरीक उत्तरला.
तसा भीम चिडून म्हणाला ," गुरूचा आदेश वचन हे तुझ्या
साठी अनमोल आहे, त्यासाठी आपल्या परिवाराचा विनाश
झाला तरी चालेल."
" अनुज भीम ! हे कदापि विसरू नकोस गुरूचा आदेश
सर्वता महत्वपूर्ण आहे, आपली आणि द्रुपद ची काही शत्रूता
होती काय ? नाही ना ? केवळ गुरुंच्या आदेशाचे पालन
करण्या हेतू आम्ही त्याना बंदी बनवुन गुरुंच्या समोर उभे
केले. तेव्हा बर्बरीक ला आपल्या गुरुंच्या आदेशाचे पालन
करण्याची पूर्ण मुभा आहे."
कौरवांच्या शिबिरात मात्र दुर्योधन बेचैन झाला आहे, तो
आपल्या मित्राला म्हणाला ," हे युद्ध आरंभ का होत नाहीये.
मला आता अजिबात धीर धरवत नाहीये."
" ही तुफान येण्या अगोदरची शांती आहे तुफान येणारच
आहे जरा धीर धर मित्रा !" तेवढ्यात दु:शासन तेथे आला.
त्याला पाहून दुर्योधनाने विचारले ," काय खबर घेऊन आलास अनुज ?" त्यावर दु:शासन म्हणाला ," भ्राताश्री खबर मिळाली आहे की भीमाचा नातू अर्थात घटोत्कच आणि मोर्वीचा पुत्र बर्बरीक युद्धात भाग घेण्यासाठी साठी आला आहे." त्यावर दुर्योधन म्हणाला, " ऐकलेस मित्रा पांडव आपले सैन्यबळ वाढविण्यासाठी छोट्या छोट्या बालकांना सुध्दा आपल्या सैन्या मध्ये भरती करत आहेत ? त्यांची बुध्दी तर भ्रष्ट झाली नाही ना ? ज्या बालकांचे सध्या खेळण्या बागडण्याचे वय आहे . त्या वयात त्यांच्या हातात धनुष्य बाण देणार, महाबळीची शपथ दुर्योधनाची लढाई पांडवांशी आहे , त्यांच्या परिवाराशी अथवा पुत्र, नातवांशी नाहीये."
" मित्र दुर्योधन युध्द दोन पक्षा मध्ये होते. एक आपला पक्ष दुसरा शत्रूचा पक्ष जेव्हा दोन सैन्याये समोरासमोर उभी
राहतात . तेव्हा कोणी छोटा वा मोठा कुणी युवक वा बालक असा फरक केला जात नाही. तर युध्द दोन योध्दा मध्ये होते."
" तू बरोबर बोलतो आहेस मित्रा परंतु आज जरी पांडवांचा कोणी सदस्य नम्रपणे माझ्या कडे आला तर त्याला
माझ्या गळ्याला लावीन. परंतु शत्रू बनून माझ्या समोर आला
तर त्याचे मस्तक धडा पासून वेगळे करायला मी अजिबात
संकोच करणार नाहीये ,मग तो नवजात शिशु असला तरीही ! दु:शासन बर्बरीक माझाही नातू आहे, परंतु तो जर कौरवांशी युध्द करायला आला तर त्याची दशा तीच होईल जी दुसऱ्या शत्रूची होते."
" परंतु भ्राताश्री तो भीमाच्या पुत्र घटोत्कच नि मोर्वीचा पुत्र आहे फार शक्तिशाली सुद्धा आहे."
" कितीही शक्तिशाली असू दे, तो माझ्या समोर फार काळ
ठिकाव धरु शकणार नाहीये."
धर्मराज युधिष्ठीर एकटाच आपल्या शिबिरात येरझाऱ्या
घालत होता. तेवढ्यात तेथे भीम आणि अर्जुन येतात.
" प्रणाम मोठ्या दादा !" अर्जुन उद्गारला
" प्रणाम दादा ! " भीम बोलला.
" प्रणाम अनुज ! "युधिष्ठीर उद्गारला.
" दादा आपल्या शांती भंग करण्या बद्दल आम्हाला क्षमा
असावी. आणि मला आपल्या चिंतेचे कारण माहितेय. बर्बरीक आल्यामुळे आपल्या समोर संकट उभे राहिलेय. परंतु चिंता करण्याचे काही कारण नाही. बर्बरीक माझा नातू असला तरीही इथं नात्याला कोणतेही स्थान नाहीये. फक्त युध्द हेच आपलं ध्येय ! आजपासून जो निर्णय घेतला जाईल तो युद्धाच्या संदर्भात असेल वंशच्या संदर्भात नसेल."
" अनुज बर्बरीकाच्या बाबतीत जो माझा निर्णयाचा आधार
वंश म्हणून नाहीये. धर्म आहे, जीवनाचे काही आदर्श असतात तर काही नियम असतात नि आधारशीला सुध्दा !
ते जर पाळले नाही तर जीवनाचे संतुलन बिघडून जाते.
सृष्टीचा सर्वात प्रिय शक्ती धर्म आहे. आणि धर्माचे पालन
करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. आणि त्याला त्याच्या
धर्माच्या पालन करणाऱ्याला विरोध करणे सर्वात मोठा
अधर्म आहे. मग तो शत्रू असला तरीही ! आता हेच पहा ना ?
पितामहांनी हस्तिनापूरच्या प्रति वचन बद्ध आहेत. ते जर
वचन बद्ध नसते तर हे युध्द झालं नसतं आणि आपल्यावर
एवढा मोठा अन्याय ही झाला नसता. परंतु त्यांनी आपल्या
वचनाचे पालन केलं ? वचनाचे पालन करणेच तर धर्म आहे, बर्बरीक तर आपला आहे, जर तो वचन बद्ध आहे तर त्याला आपण रोखू शकत नाहीये."
" परंतु दादा हे युद्धाने आमची विचारधारा अस्तवस्त
करून टाकली आहे, आम्हाला हे युध्द करायचे नव्हते
आमच्यावर जबरदस्तीने लादले गेले आहे, ह्या युध्दात
आमच्या विरोधात आमचेच बंधू आहेत नातेसबंधी आहेत.
गुरू द्रोण आहेत, ज्यांच्या कडून मी अस्त्रविद्या संपादन केली.
त्यांच्याशी युध्द करायचे म्हणजे ? किती मुश्किल गोष्ट आहे
माझ्यासाठी ! म्हणून रात्रभर प्रार्थना करत असतो की हे युद्ध होऊ नये. आणि युध्द झालेच तर त्या युध्दात पितामहा सामील असु नये. पितामहा माझे आदर्श आहेत. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून मी लहानाचा मोठा झालोय. त्यांच्याशी युध्द करायचे म्हणजे माझ्यासाठी फार मुश्किल गोष्ट आहे,
जे हात सदैव त्यांच्या चरणस्पर्श करण्यासाठी उठले आहेत.
तेच हात गांडीव धनुष्य कसे उचलतील. शिवाय माझ्या
बाणांनी त्यांच्या शरीरावर घाव होतील ते बाण अगोदर माझे
हृदय चिरतील. म्हणून मला असं वाटतं की हे युद्ध होऊ नये.
परंतु माझी ही प्रार्थना ऐकली जाणार नाहीये , हेही मला माहित आहे. होणार तर तेच जे आमच्या भाग्याने आपल्या क्रूर लेखणीने लिहिले आहे." अर्जुन उत्तरला. तेव्हा भीम अर्जुनच्या व्यक्तव्याचे समर्थन करत म्हणाला," हां मोठ्या
दादा ! मी अर्जुनाच्या मताशी सहमत आहे, हे युद्ध आमच्या
कडून असे कार्य घडविणार आहे की आम्ही कदापि विसरू
शकणार नाहीये. म्हणून आम्हाला या युध्दा विषयी काही ना
काही निर्णय घ्यायलाच लागेल."
" हां अनुज आम्हाला काही ना काही निर्णय घ्यावाच
लागेल. परंतु हे कुरुक्षेत्र नाही तर धर्मक्षेत्र आहे नि धर्मक्षेत्राचा
एकच निर्णय आहे की आपण आपल्या धर्माचे पालन करायचे आहे."
महामंत्री विदुर देवीला पुष्पहार वाहून हात जोडून म्हणाले,
" देवी माता मला कळत नाहीये की मी कोणाच्या विजयासाठी नि कोणाच्या पराजय साठी तुझ्याकडे प्रार्थना करू ? हे माझे मन म्हणते की कौरवांच्या विजयाची याचना
करू ,कारण मी त्यांचा महामंत्री आहे, परंतु माझा धर्म
म्हणतोय की पांडवांच्या विजयाची कामना करू , कारण ते
धर्माच्या पक्षात आहेत अर्थात विजय त्यांचाच व्हायला पाहिजे. आता तूच सांग मी काय करू ? म्हणून माझी आपल्याला पार्थना आहे की विजय कोणाची पण होऊ दे परंतु रक्षा दोन्ही पक्षाची कर, कारण विजय कोणाचा झाला तरी पराजय माझाच होईल." असे म्हणून आपले मस्तक देवीच्या चरणावर ठेवतात. तेव्हा तेथे विजयसिद्धीसेंन येतात. कदाचित त्यांनी महामंत्री विदूरची देवीला केलेली प्रार्थना ऐकली असावी म्हणून ते विदुर जवळ येऊन म्हणाले ," प्रथम तू आपल्या मनातील भ्रम दूर कर नि मग देवीची प्रार्थना कर. तू अशी प्रार्थना करतो आहेस की देवीला पण भ्रमात टाकतो आहेस."
तेव्हा विदुर ने मान वर करून त्या व्यक्ती कडे पाहत
विचारले ," आपण कोण ?" तेव्हा ती व्यक्ती उत्तरली की,
मी विजयसिद्धीसेन ह्या देवीचा परम भक्त आहे."
" विजयसिद्धीसेंन अहो भाग्य आमचे ! की आपले दर्शन
झाले."
" परंतु तू कोण आहेस ?"
" मी विदुर..!"
" विदुर.....म्हणजे कौरवांचे महाज्ञानी महामंत्री विदुर !"
" हां ! परंतु हे महामंत्री पद माझ्यासाठी दुःखाचे कारण
बनले आहे स्वामी ! कारण पांडव आणि कौरव हे दोन्ही
माझ्यासाठी दोन डोळ्या प्रमाणे आहेत. त्यामुळे कोणाचाही
विनाश पाहू इच्छित नाहीये. माझ्या सहनशक्तीचा बाहेर आहे
ते. त्यामुळे मला कळत नाहींये की काय करू मी ?"
" मानव जर प्रत्येक गोष्ट समजू लागला नि त्याप्रमाणे
वागू लागला तर त्याला मानव कोण म्हणेल ? संसार त्याला परबम्ह म्हणेल. जे तुला समजतंय तेच देवीला सांग आणि जे तुला कळत नाहीये ते देवीवर सोड. कारण देवीला सर्वकाही माहीत आहे."
" मला माहित आहे की सर्वकाही विनाश होणार आहे ,
काहीच वाचणार नाहीये. छोटे छोटे बाळ सुध्दा वाचणार नाहीत, कारण युद्धात आता छोटे बाळ सुध्दा भाग घेत आहेत."
" तुझा संकेत कुणा संबंधी आहे ?"
" आपला शिष्य बर्बरीक सुध्दा आता पांडवांच्या सैन्येत सामील होत आहे."
" बर्बरीक मग तर आपल्या प्रति सहानुभूती आणि कौरवा
प्रति शोक प्रगट करायला पाहिजे.
" ते का स्वामी ?"
" तो छोटा बालक नाही तर महान शक्ती आहे. त्याच्या
जवळ कामक्या देवीच्या अश्या सिध्या आहेत की वावटळ
आल्यानंतर सुख्या पानांची जी अवस्था होते अगदी तशीच
अवस्था कुरुसैन्याची होईल. त्याच्या जवळ तीन प्रलयंकारी बाण आहेत. एक लक्षाचा छेद करतो तर दुसरा लक्षाला भेदून टाकतो. लक्ष एक असो वा अनेक.... युद्धात बर्बरीक उतरत आहे तर युध्द आरंभ होण्यापूर्वीच युद्धाचा परिणाम ऐका. कौरव सैन्याचा एक पण योध्दा वाचणार नाही. हा हा म्हणता प्रेतांचा सडा पडेल. बर्बरीकाची शक्ती कोणाच्या रोखण्याने थांबणार नाहीत. तो अजेय आहे, अपराजीक आहे,त्याला कोणीही परास्त करू शकत नाहीये." हे ऐकून विदुर एकदम सुन्न झाला. आणि निमूटपणे हस्तिनापूरला निघून आला. तो थेट महाराज धृतराष्ट्रांच्या कक्षेत गेला. तेव्हा महाराजांनी विचारले ," कोण ? विदुर रणभूमीवरून काय नवीन बातमी आणलीस काय ? "
" रणभूमीवरुन बातमी युध्दाशिवाय दुसरी बातमी काय असणार ? शिवाय युद्धाच्या बातम्या तर अशुभच असतात."
" तुझ्या बोलण्यावरून तर वाटतं की तू बातमी शुभ
आणली नाहीयेस. युध्दा काही अडचण आली आहे का ?"
" अडचण आली तर तो शुभ बातमी असते. कारण अडचण आल्यानंतर युध्द होण्याचे थांबते. परंतु मी जी बातमी आणली आहे ती फार मोठे संकट येणार आहे त्या बद्दलची आहे." असे म्हणताच महाराज उठून उभे राहात म्हणाले, " अशी काय बातमी आणली आहेस ?"
" पांडवांच्या सैन्याची वृद्धी झाली आहे."
" वृद्धी झाली म्हणजे त्याना अजून सैन्याची तुकडी मिळाली का आपल्या सैन्यातील एक तुकडी त्याना जाऊन मिळाली.?
" असं काहीही झालेलं नाहीये."
" मग ?"
" बर्बरीक हा भिमाचा नातू अर्थात घटोत्कच आणि मोर्वीचा पुत्र आपल्या गुरू कडून अस्त्रविद्या प्राप्त करून
घरी परतला आहे."
" अरे तू तर मला घाबरवून टाकलं होतेस. आला तर येऊ
दे , तो तर एक छोटा बालक आहे."
" बालक आहे , परंतु आपल्या गुरू कडून अश्या काही
सिद्धींया आणल्या आहेत, की त्याचं उत्तर कुणापाशी नाहीये."
" मग त्यात काय झालं ? आहे तर एक व्यक्तीच ना ?
कुणी सैन्या तर नाही ना ?"
" त्याने कामक्या देवी कडून अश्या काही शक्ती प्राप्त
केल्या आहेत की तो एकटाच पुऱ्या कुरुसैन्याला भारी पडेल. आपली सैन्या सुक्या पानासारखी उडून जाईल."
" तू मला फक्त घाबरवतच राहशील की काही उपाय
पण सुचवशील ?"
" यावर एकच उपाय आहे."
" कोणता उपाय सांग लवकर ."
" युध्द न करण्याचा !"
" ते आता कसं शक्य आहे ?"
" का शक्य नाहीये ?"
" या बद्दल मला विचार करायला लागेल."
" आता विचार कशाचा करताय ? जाणूनबुजून अग्नीत
उडी मारायचीय का ?"
" मला युद्धाचा संदर्भात थोडा विचार करायला लागेल.
कारण युध्दाच्या बाबतीतले सारे अधिकार मी पुत्र दुर्योधनाला
दिले आहेत."
" आपण दिले नाही तर त्याने घेतले. आणि आपल्याला
ही अधिकार कोणी दिला ? जनहिताचा अजिबात विचार न
करता पुत्र मोहा मध्ये सर्व अधिकार त्याला देऊन टाकले.
मी अजूनही सांगतोय त्याला सांगा. जोपर्यंत बर्बरीक सारख्या महाविनाशक शक्तीला रोखण्याचा उपाय मिळत नाही तोपर्यंत युध्द थांबव."
" ठीक आहे , तू जर एवढा सांगतो आहेस तर बघ तो
प्रयत्न करून पण मला नाही वाटत दुर्योधन ऐकेल असं !"
" आपण त्याला समजावून सांगा ना ?"
" जा त्याला मी ताबडतोब बोलविले म्हणून सांग."
" ठीक आहे भ्राताश्री !" असे म्हणून महामंत्री विदुर तिकडून निघून गेले. नि महाराज धृतराष्ट्र चिंतामय होऊन
बसले. तर दुसरीकडे दुर्योधन कसला तरी विचार करत इकडे
तिकडे येरझाऱ्या घालत असतानाच तेथे अंगराज कर्ण आला
त्याला पाहून दुर्योधन म्हणाला," ये मित्रा मी तुझीच वाट पाहत होतो. यायला फार उशीर केलास कुठं राहिला होतास
इतक्या वेळ ?"
" युध्द होण्याचे ठरलेच आहे तर मी युध्दाच्या साऱ्या
तयारीचे निरीक्षण करत होतो."
" मग काही कमी तर नाही ना राहीले ?"
" नाही. आमच्या कडे साहसचे आणि साधन याची काही कमी नाहीये. आणि आमची गजसैन्या नि अश्वसैन्या अग्नि आणि समुद्रात उडी मारण्यास एकदम तयार आहे आणि
पितामहांनी तर घोषणा केलीच आहे की युध्द एक महिन्यानंतर सुरू होईल."
" एक महिन्यानंतर का ? एक सप्ताह का नाही ? एक
दिवस का नाही ?"
" एक दिवसाच्या युद्धाचा काय आनंद मिळेल मित्र ?"
" तुला नाही माहीत ? इंद्रप्रस्थ मध्ये पांचाली माझ्याकडे
पाहून हसली नि मला म्हणाली ,"आंधळ्याचा पुत्र आंधळा " तेव्हापासून माझ्या अंगाची लाहीलाही झाली आहे,असं वाटतं की मी स्वतःचे तरी तुकडे तुकडे करून फेकून द्यावे किंवा माझ्या अपमान करणाऱ्या त्या अभिमानी अहंकारी स्त्रीचे मस्तक माझ्या चरणावर असावे नि माझ्याकडे तिने दयाची भीक मागावी. जसे विषारी नागणीचे फण पायाने ठेचले जाते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा