Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

महाभारत १२० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.

महाभारत १२०
महाभारत १२०

 


                      महाभारत १२०

     सूर्योदय होताच पांडवसैन्या युध्द भूमीवर आली. परंतु
कुरुसैन्या आपल्या शिबिरातून बाहेर पडलीच नाही. तेव्हा
युधिष्ठीर मोठे आश्चर्य व्यक्त करत म्हटलं ,"अरे कुरुसैन्या
आज आपल्या शिबिरातून पडली नाही. काय कारण असेल ?" त्यावर भीमसेन म्हणाला," ते नाही आलेत तर
आपण जाऊ त्यांच्या शिबिरा जवळ." तेव्हा धृष्टद्युम्न म्हणाला," दुसरे कारण काय असणार ? दुर्योधन बसला असेल कुठंतरी तोंड लपवून ?"
    त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले," दुर्योधना मध्ये भले अनेक
दुर्गुण आहेत. परंतु तो तो डरपोक, कायर नाहीये धृष्टद्युम्न तो
महावीर आहे,एकतर तो जिंकून मैदान सोडेल किंवा वीरगतीला तरी  प्राप्त होईल. वीर शत्रूचा पण अपमान करायचा नसतो सेनापती धृष्टद्युम्न !"
     " आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण इथंच वाट पाहत बसू होय ना ?" त्यावर युधिष्ठीर म्हणाला, " मला
वाटतं की समेट करण्या बद्दल विचार करत असेल आणि
समेट झाला तर चांगलीच गोष्ट आहे जेष्ठ पिताश्री एकटे
राहणार नाहीत. ए सैनिक जा नि दुर्योधन विषयी माहिती
घेऊन ये." सैनिक ने प्रणाम केला नि तेथून निघून गेला.

  अश्वत्थामा म्हणाला ," कुणाला काही न सांगता हा दुर्योधन
गेला कुठं ? जर जायचं होतं तर कुणाला सेनापती बनवून
जायचं होते. विना सेनापती आपण रणभूमीवर कसे जाऊ
शकतो ?" त्यावर कृतवर्मा म्हणाला," आपण का होत नाही
सेनापती आचार्य ?"
     " मला तो अधिकार नाहीये.'
     " मग काय आपण इथंच वाट बघत बसू या पांडव सैन्या
कधी शिबिरात घुसते ती "
   " युधिष्ठीर असे करणार नाहीये."
    " पण आपण का बनवत नाहीये ?"
    " सेनापती स्वत:हून होता येत नाही. कोणीतरी करावे
लागते."
    " मग पांडवसैन्या आत घुसेपर्यंत वाट पहायची का ?"
    " एकदा सांगितले ना, युधिष्ठीर असं काहीही करणार नाहीये.तो धर्माचा प्रतीक आहे, एक तर रणभूमीवर त्याची वाट पाहिल किंवा जिथं  दुर्योधन आहे तिथं तो जाईल. " थोड्या वेळाने तो सैनिक एका आकेटक ला सोबत घेऊन आला नि म्हणाला, महाराज की जय हो !"
    " बोल काय खबर आणलीस ?"
    " महाराज या आकेटक ने दुर्योधनाला सरोवराच्या दिशने
जाताना पाहिले."
   " आत्महत्या तर नाही ना केली त्याने ?"
   " नाही नाही त्याना मी सरोवर मध्ये शिरताना पाहिले."
   " तो मायावी पण आहे, त्याला माहित त्याच्या कडे आता
सैन्या राहिली. फक्त ते आता चारजण राहिलेत आहेत. आपली सैना सोडली तरी तुम्ही पाच आहात म्हणून तो सरोवरात लपून विश्राम करत असेल."
    तसा युधिष्ठीर त्या आकेटकला म्हणाले," आम्हाला
त्या सरोवरा पर्यंत घेऊन चल."असे म्हणताच तो आकेटक
पुढे चालत होता नि त्या मागून  पांडव चालत होते.आणि त्या मागून त्यांची पांडवसैना. तो आकेटक त्या साऱ्यांना त्या सरोवरा जवळ घेऊन आला. सरोवरा पासून थोड्या दूरवर चांगल्या जागी सेन्या आणि  रथ थांबहुन सर्वजण रथातून खाली उतरले नि त्या सरोवरा पाशी चालत आले. सरोवराचे निरीक्षण करून युधिष्ठीर उद्गारला," कुणी विचार सुध्दा केला नसेल की ज्या सैन्यात पितामहा, गुरू द्रोण,  अश्वत्थामा , कुलगुरू कृपाचार्य , कृतवर्मा, जेष्ठ भ्राता अंगराज कर्ण सारखे महारथी होते. त्या सैन्येची  अशी अवस्था होईल. निरुत्साह होऊन दुर्योधन इथं विश्राम करील." वासुदेव कृष्ण म्हणाले," मोठे दादा एवढे भावनाशील होऊ नका. जोपर्यंत दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत आपण विजया पासून कोसो दूर आहात. तेव्हा दुर्योधनाचा वध होणे आवश्यक आहे." तेव्हा युधिष्ठीर उद्गारला ," आकेटकचे म्हणणे बरोबर आहे दुर्योधन ह्या सरोवराला आपल्या वश मध्ये करून ठेवले आहे, नि विश्राम करतोय.परंतु  महादेवा शपथ मी आज दुर्योधनाला सोडणार नाहीये मग त्याचा मदतीला इंद्र आला तरीही !"
     " अरे अरे मोठ्या दादा इंद्राला का मध्ये घेताय ? इंद्राने
तर ह्या धर्म युद्धा मध्ये आपली फार मोठी मदत केली आहे जर याचक बनून कर्णा कडून कवच नि कुंडल भिक्षा मध्ये घेऊन गेला नसता तर  कर्णाचा वध करणे अशक्यच होते आणि कर्ण वीरगतीचाला प्राप्त जर झाला नसता तर आज हा थकलेला निरुत्साह दुर्योधन इथं आपली वाट पाहत बसला नसता. म्हणून दुर्योधनला पाडा. हा विषारी वृक्ष आहे, ह्याला जमीनदोस्त करा."
    " अनुज दुर्योधन तुझ्या मुळेच सर्व शांतीचे मार्ग बंद झाले.
तुझ्यामुळे पितामहा आज बाणांच्या शय्येवर आहेत, तुझ्यामुळेच  गुरू द्रोण वीरगतीला प्राप्त झाले , तुझ्यामुळेच
जेष्ठ मातोश्री नव्यानव पुत्र वीरगती ला प्राप्त झाले . सर्व विनाश घडवून  इथं चोरा सारखा सरोवरात लपून बसला आहेस होय रे ? तुझ्या सारख्या महावीराला हे शोभत नाहीये, म्हणून सरोवराच्या बाहेर ये नि आमच्याशी युध्द कर. नाहीतर आपला पराजय स्वीकार कर. तोंड लपवून काय बसला आहेस ? तुला वाटत असेल की आम्ही तुझे संरक्षण कवच
तोडू शकत नाही तर ही तुझी चुकीची समजूत आहे. तुझे
संरक्षण कवच तोडू पण शकतो नि तुझा वध पण करू शकतो , म्हणून वीर जर असलास तर बाहेर येशील. हे महारथी तू भरतवंशी मध्ये जन्म घेतलास त्या कुलाची तरी लाज राख. राज्य हवे असेल तर राज्य माग. तेही मी तुला देईन. मोठ्या भावाकडे काहीही मागायला लाज कसली. शिवाय तू अनुज आहेस , म्हणून तुझा तो अधिकारच आहे. हे दुर्योधन जन्माने कुणी क्षत्रिय ठरत नाही. ते कृतीने  सिद्ध करावे लागते , म्हणून सरोवरातून बाहेर पडू न आमच्याशी युध्द करून तू सिद्ध कर तू क्षत्रिय आहेस."
     " हे युधिष्ठीर मी तुम्हां लोकांना घाबरून सरोवरात लपून
बसलो नाहीये. तुम्ही पाची भाऊ कपटी आहात, पितामहांना
तुम्ही कपटाने बाणांच्या शय्येवर झोपविले. गुरुद्रोण ना खोटे बोलून वध करविला. आणि माझ्या दु:शासनाच्या छातीचे रक्त पियुन हे सिध्द केलंत की तुम्ही लोक मनुष्य प्राणी नाहीयेत. माझा मित्र राधेय त्यालाही कपट करून त्याचा वध केला. तुम्ही सर्वजण डरपोक आहात. परंतु मी डरपोक नाहीये म्हणून  मी तुम्हां पाचांशी युध्द करेन. मी वीरगतीला प्राप्त  झालो तर विजय तुझाच आहे, परंतु मी जिंकलो तरी ते राज्य मी तुलाच देईन कारण आता मला सिंहासन नकोय. कारण ते सिंहासन घेऊन मी काय करू ? मी सिंहासणार बसल्यावर जे खुश झाले असते ते तर सर्वजण निघून गेले.माझे भाऊ गेले, माझा मित्र राधेय गेला. मामाश्री गेले. आता मला काय करायचे आहे ते सिंहासन ! परंतु मी तुमच्याशी युध्द अवश्य करेन ते हे सिद्ध करण्यासाठी की सर्वश्रेष्ठ वीर तुम्ही नाही तर मी आहे."
           " दुर्योधन कोणत्या सिंहासना बद्दल बोलतोयस  तू .... हस्तिनापूरच्या ? ते सिंहासन ते तर तुझं नव्हतं. ते सिंहासन आमचेच होते. परंतु तरी देखील आम्ही तुला ते  दिले. पण तू काय केलेस ? आम्ही नवीन वसविलेले इंद्रप्रस्थ राज्य तेही कपटाने बळकाविलेस म्हणून ती दोन्ही राज्ये आम्ही तुझ्या कडून खेचून घेतली. आता तुझ्या कडे आम्हाला देण्यासाठी काहीही नाहीये. फक्त प्राण आहेत. तेही आम्ही घेऊ !"
     " आपल्या तोंडाला लगाम दे अर्जुन नाहीतर मी तुझी जीभ छाटून टाकेन. तू मला एकटा समजू नकोस. मी स्वतःच एक नारायणीसेना आहे, मी तुम्हां पांचांना पुरून उरेन. "असे म्हणून दुर्योधन सरोवराच्या बाहेर आला. काठावर उभे असलेल्या पांडवसैन्याला पाहून म्हणाला ," तुम्ही खरेच सर्वच्या सर्व भ्याड आहात. म्हणून शस्त्रनिशी इथं आलात. मी एकटा आहे, निःशस्त्र आहे आणि घायाळ सुद्धा आहे."
        " माझा पुत्र अभिमन्यू सुद्धा  घायलच होता, निःशस्त्र होता, तुम्ही एक नाही तर सात - सात महावीरांनी एकट्याला घेरून मारलात  आणि वरून स्वतःला महावीर असल्याचा दावा करतोस ?
   " हां भ्राताश्री ! ते आता सोडा आणि तुमच्यापैकी कोण
लढणार आहे माझ्याशी ते बोला. नाहीतर सगळेच या माझ्या
बरोबर युध्द करायला."
    " तुझ्याशी एकच युध्द करेल. आम्हां पाचा मधून एकाची
निवड कर. जर तू त्याला पराजित केलास तर मी माझी हार
स्वीकार करेन. हे तुला मी वचन देतो. तू आपले शस्त्राची
पण निवड कर आणि प्रतिस्पर्धी सुध्दा !"
     " हे जेष्ठ भ्राताश्री मला वाटत होतं की आपण  बोलण्यात
कुशल आहात .परंतु तू कुशल नाहीत. मी गदायुद्ध खेळेन."
      " कोणा बरोबर ?"
     " मारायचे तर मला आहे तुम्हां पाची बंधूंना. ज्याला
अगोदर मरायचे असेल त्याने पुढे यावे." तेव्हा वासुदेव कृष्ण
युधिष्ठीर जवळ येऊन हळू आवाजात म्हणाले ," मोठ्या दादा
आपण वचन देताना थोडा  विचार करून द्यायचे होते, आज दुर्योधनाला आपण पाचही भाऊ गदायुद्धात पराजित करू शकत नाहीये. हातात आलेला विजय पुरस्कारा सारखा आपण दुर्योधन ला देऊन टाकला.
    " परंतु मी आता वचन देऊन चुकलोय."
   " महादेव सुद्धा हेच करतात.  वरदान देताना मागचा पुढचा विचार करत नाहीत. मग मला न जाणो काय काय करावे लागते ? हे कोणालाही माहीत नाहीये."
   " परंतु मी महादेव नाहीये." युधिष्ठीर बोलला.  तेव्हा भीम
म्हणाला ," मी दुर्योधनाला मारून मारून वीरगतीला नेईन."
    " जर एकट्या ला भीती वाटत असेल तर पाचीजण
एकसाथ या वाटल्यास अर्जुन सारथी वासुदेवाला पण घ्या."
    " दुर्योधन ssss " अर्जुन मोठ्या ने ओरडला.
   " थांब अनुज !" असे म्हणून भीम आपली गदा घेऊन पुढे
सरसावला. तेव्हा दुर्योधन म्हणाला," परंतु निर्णय कोण देईल ?" तेव्हा भीम म्हणाला ," हा खेळ नाहीये की तिथे
निर्णय द्यायला पंच पाहिजे. हे युद्ध आहे, इथं तू मला मारशील किंवा मी तुला मारेन."
    "  ओरडतो का आहेस भीमसेन मी यासाठी बोलत होतो
जर गुरू द्रोण आज असते तर त्यांनी पाहिले असते त्यांनी
शिकविलेली विद्या तशीच सशक्त आहे. परंतु ते आता येऊ शकत नाहीत. दुसरे गुरू बलराम जरी असते तर त्यांनी माझी
प्रशंसा जरूर केली असती. तू तर त्यांच्या आत्येचा पुत्र आहेस. परंतु त्यांनी मला स्वत:सांगितले होते की तुम्ही पाची
भाऊ मिळून ही मला पराजित करू शकत नाही. आणि हां भीमाशी युध्द करण्यासाठी मला कवच आणि शस्त्राचा गरज नाही. परंतु आपली इच्छा असेल तर कोणाला तरी माझ्या शिबिरात पाठवून माझे कवच आणि शस्त्र मागवून घ्या."
     " प्रिय अनुज तुझे  कवच आणि शस्त्र तुझ्या शिबिरातून मागवून घेतो आणि त्यासाठी कुणी दास जाणार नाही तर सहदेव स्वत: जाईल."
    " आज्ञा व्हावी भ्राताश्री !"
    " जा नि दुर्योधनाचे कवच आणि शस्त्र घेऊन ये."
    " भ्राताश्री !" अर्जुनला ते आवडलं नाही.
    " दुर्योधन सारख्या महावीरांचे कवच आणि शस्त्र  उचलणे
हा सुद्धा सन्मानच आहे. सहदेव sss "
    " आज्ञा व्हावी भ्राताश्री !"
    " जा घेऊन ये."
    " जशी आपली आज्ञा ! " सहदेव लगेच  आपल्या रथात
आरूढ झाला नि निघाला. तेव्हा झाडाच्या आड लपून पाहत
असलेले अश्वत्थामा , कुलगुरू कृपाचार्य, कृतवर्मा उभे होते.
तेव्हा अश्वत्थामा उद्गारला ,"  गदा युध्द ठरलं तर !"
    " गदा युध्दा मध्ये बलराम व्यतिरिक्त अन्य कोणीही दुर्योधन पराजित करू शकणार नाहीये."
    " याचा अर्थ दुर्योधनाच आज विजय निश्चितच आहे !"
    " हे विसरू नको वत्स पांडवा सोबत वासुदेव आहेत. भीम
त्याच्या कृपाछत्र छाये मध्ये आहे."
     सहदेव जेव्हा शिबिरात पोहोचला. तेव्हा महाराणी गांधारी
ने विचारले ," पुत्र सहदेव तिकडे युध्द भूमीवर काय चालले
आहे?"  तेव्हा सहदेव म्हणाला ," मजले दादा नि भ्राता दुर्योधन या दोघांमध्ये गदायुद्धा होणार आहे, म्हणून भ्राता
दुर्योधनाचे कवच आणि गदा घ्यायला मी इथं आलो आहे."
      असे म्हणून तो महारानी गांधारी चे चरणस्पर्श करतो.
तेव्हा त्या सहदेवाला आयुष्यमानाचा आशीर्वाद देतात.
युद्धाचा परिणाम काहीही होऊ दे. परंतु माझे पुत्र सुद्धा तुमचे
भाऊच होते......., कुंती ला भेटलास ?"
     " त्याना युध्द समाप्त झाल्या नंतरच भेट घेणार. मी इकडे
आलो होतो म्हणून म्हटलं , आपले दर्शन घेऊनच जाऊ !
आता मला जाण्याची परवानगी द्या." असे म्हणून तेथून निघाला. दुर्योधनाचे कवच आणि शस्त्र आणून दिल्यावर
दुर्योधनाने ते परिधान केले. तेवढ्यात तेथे बलराम आला.
बलरामला पाहून दुर्योधन म्हणाला ," या गुरुदेव मी तुमचीच
वाट पाहत होतो." त्यानंतर वासुदेव कृष्ण आणि बलराम
या दोघांनी एकमेकांना अलिंगन दिले. तसे वासुदेव कृष्ण
म्हणाले ," दाऊ आपण आलात ते बरं झालं. कारण आज आपल्या दोन्ही शिष्या मध्ये गदायुद्ध होणार आहे." तेव्हा बलराम म्हणाला ," मला ही सूचना देवर्षी नारदनी दिली. तसा मी लगेच निघून आलो." तेव्हा दुर्योधन म्हणाला," मी धृतराष्ट्र
पुत्र आहे या नात्याने मला चरणस्पर्श करण्याचा पहिला मान मिळावा."
    " अर्थात तुलाच आहे." बलराम उद्गारला. तसा लगेच
दुर्योधनाने बलरामाचे चरणस्पर्श केले. तेव्हा बलराम म्हणाले," परंतु मी तुला विजयीश्रीचा देऊ शकत नाहीये."
    " मी संपूर्ण युध्द विजयीश्रीचा आशीर्वादा शिवाय लढलो.
आणि हे युद्ध मी विजयीश्रीच्या आशीर्वादा शिवाय जिंकू
इच्छितोय. विजयीश्रीचा आशीर्वाद द्यायचा असेल तर ह्या
भीमाला द्या." त्यावर भीमसेन म्हणाला ," आज चे हे युद्ध
विना आशीर्वाद शिवाय होऊ दे." असे म्हणून त्याने बलराम
चे चरणस्पर्श केले. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. गदा
युद्धात दोन्ही निपुण होते. परंतु भीमा कडे फक्त बळ होते
तर दुर्योधनाकडे बळा पेक्षा त्याच्या आईने जे वज्र कवच
होते. ते त्याची रक्षा करत होते. त्यामुळे भीमाने मारलेला
गदेचा प्रहार त्याला बसत नव्हता. परंतु दुर्योधनाने मारलेला
गदेचा प्रहार भीमाच्या अंगावर वज्रा सारखा बसत होते. दोघांचे तुंबळ युध्द सुरू होते. कोणी कोणाला कमी पडत नव्हता. भीमाने त्याच्या मस्तकावर जोरदार प्रहार केला. दोन इंच तो जमीनीत घुसला. पण त्याला काहीच झाले नाही. कारण त्याचे शरीर वज्राचे झाले होते. त्यामुळे त्याची सरशी होत होती. तेव्हा तो वासुदेव कृष्णाला म्हणाला ,"  हा काय चमत्कार आहे, केशव ?" तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले,
    "  आज  दुर्योधन एकटाच उतरला नाहीये रणभूमीवर
त्याच्या सोबत त्याच्या मातेने घातलेले कवच त्याची रक्षा
करत आहे नियमानुसार युध्द सुरू राहीले तर मजले दादाची
हार निश्चितच आहे, म्हणून मजले दादाला त्यांच्या प्रतिज्ञेची
आठवण करू दे पार्थ !"
    " प्रतिज्ञा ,....कोणती प्रतिज्ञा ?"
    " विसरलास ? अरे कुरुराज सभेत मजले दादा ने घेतलेली
प्रतिज्ञा !" तेव्हा अर्जुनच्या द्यानात आले तेव्हा अर्जुन म्हणाला," परंतु गदा युध्द मध्ये कमरेच्या खाली वार करायला
वर्ज्य !" त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले," तू फक्त मजले दादाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करुन दे. बाकी ते पाहतील काय करायचं ते." परंतु अर्जुन त्या गोष्टीस तयार
झाला नाही. तसे वासुदेव पुढे म्हणाले ," मग युध्द पहा !"
परंतु नाईलाजाने वासुदेव कृष्णाला मजले दादाला त्यांच्या
प्रतिज्ञेची आठवण करून द्यावी लागली. भीमसेनाचे लक्ष
आपल्या कडे पडावे यासाठी मुद्दाम भीमसेनाची प्रशंसा केली. वाहवा ! मजले दादा ! " असे म्हणताच भीमाने वासुदेव
कडे पाहिले. तसे वासुदेव कृष्णा ने आपल्या जांगेवर थोपटून
सांगितले की इथं मार ! " मग भीमसेन संधी मिळताच  त्याने
त्याच्या जांगेवर प्रहार केला. एक नाही दोन नाही , लागोपाठ
दोन तीन प्रहार घातले. दुर्योधन भूमीवर कोसळला. तेव्हा
दुर्योधन म्हणाला ," भीम तू मला कपटाने मारलेस !"
     " विसरलास ! मी कुरुराज सभेत काय प्रतिज्ञा  केली
होती ती ! तुझी जंगा तोडण्याची प्रतिज्ञा मी केली होती. ती
आज मी पूर्ण केली. तू ह्या जांगेवर द्रौपदी ला बसायला
सांगत होतास ना ? म्हणून ही जंगा तोडणे जरुरी होते."
असे म्हणून भीमाने त्याच्या छातीवर आपला पाय ठेवला. तसा युधिष्ठीर धावत त्याच्या जवळ आला नि त्याला म्हणाला," नाही नाही भीम असं करू नकोस तो तुझा भाऊ
सुध्दा आहे आणि राजा सुध्दा ! त्याचा अपमान करू नकोस !" असे म्हणून युधिष्ठीर त्याला धरून जबरदस्ती ने त्याच्या पासून दूर केले. ते दृश्य पाहून बलराम चिडला नि म्हणाला," तो आता अपमान करायला जिवंत राहणारच नाहीये. त्याने माझाच नाही तर सारे गुरुजनांचा अपमान केला आहे. मी आणि गुरु द्रोणानी हे शिकविले नव्हते का ? की कमरेच्या खाली वार वर्ज आहे." असे म्हणून आपली गदा घेऊन भीमसेनाला मारायला त्याच्या अंगावर धावला. म्हणाला," तू आज आपल्या गुरूचा अपमान केला आहेस मी तुला जिवंत सोडणार नाहीये." तेव्हा त्याला वासुदेव कृष्णा ने अडविले. तेव्हा बलराम म्हणाला," तू आज मध्ये काहीच बोलू शकणार नाहीयेस." तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," जर बोलू शकलो नसतो तर मध्ये बोललोच असतो का मी ?"
    " मला वाटलंच मी बोलायला लागलो की तू मध्ये किंतु
परंतु काढणारच ? परंतु आज ह्याने मर्यादा चे उल्लंघन केले आहे. मी त्याला जिवंत सोडणार नाहीये ." तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," मान्य आहे की मजले दादा ने नियमांचे उल्लंघन केले आहे , परंतु आपल्या ह्या शिष्याने किती मर्यादांचे उल्लंघन  केले. याची कल्पना आहे ना आपल्याला. लाक्षागृहाची आग ह्यानेच लावली. द्युतक्रीडे मध्ये कपटी शकुनी कडून कपट करून हरविले, कुलवधू द्रौपदीला भर सभेत तिच्या केसांना पकडून फरफटत ओढून आणले. तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न ह्यानेच करविला, इतकेच नाही तर आपली जंगा थापटवून तिला आपल्या मांडीवर बसायला सांगितले. इतक्या साऱ्या मर्याद्याचे उल्लंघन केले तरी आपण त्याला कधी रोखले नाही आणि मजले दादा कडून एका मर्याद्याचे उल्लंघन झाले तर त्याला मृत्यूदंड हा तर न्याय नाही झाला. हा पक्षपात झाला. एकाला एक नियम आणि
दुसऱ्या ला दुसरा नियम हे तर सरासर चूक आहे ना ? आणि
आपण हे का विसरता ? युध्द आरंभ होण्यापूर्वी आपल्या कडे अर्जुन आणि दुर्योधन मदत मागायला गेले होते. आपण ह्यांची मदत करायची सोडून तीर्थ यात्रेला निघून गेले. जेथे धर्म नि अधर्माचे  युध्द सुरू आहे , तेथे रणभूमी शिवाय दुसरी तीर्थ यात्रा  असूनच शकत नाहीये. आणि आता युद्धाच्या अंतिम क्षणाला आलेत आपला प्रभाव टाकायला. तेव्हा  आपल्याला तो अधिकार नाहीये आणि मजले दादा वचन बध्द होते. म्हणू त्यानी आपली  प्रतिज्ञा पूर्ण केली. ह्या जांगेला तुटने आवश्यक होते आणि आपण  दाऊ आहेत. आपण नाही समजून घेणार तर मग दुसरा कोण घेणार ? पण तरी सुध्दा आपणाला वाटत असेल की मजले दादा ने दुर्योधनाची जांग तोडून मर्याद्याचे उल्लंघन केले आहे तर मी बाजूला होतो." त्यावर बलराम म्हणाला," मला वाटलंच होतं की तुला एकदा बोलायला दिल्यावर तू मला गप्पच करणार !"
    " आपण तर दाऊ आहात ना, मग समजून घ्या ना !"
    " परंतु मी अजूनही तुझ्या मताशी सहमत नाहीये. मला
सदैव खेद राहील की ह्या माझ्या शिष्याने माझी मान लज्जेने
खाली झुकविली आणि दुर्योधनाच्या वीरतावर सदैव मला
अभिमान राहील." असे म्हणून बलराम तेथून चालता झाला.
तेव्हा रुसलेल्या भिमाची समजूत काढत वासुदेव कृष्ण
म्हणाले," दाऊचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस मजले
दादा ! त्यांचा राग क्षणिक असतो. लगेच थोड्या वेळाने
विसरशील सर्वकाही !" त्यानंतर सर्वांकडे उद्देशून म्हणाले,
     " आता दुर्योधन ला एकट्यालाच राहू दे."
     " कुठं ?" युधिष्ठीर ने विचारले.
     " सूर्यास्त व्हायला थोडासा अवधी राहिलाय. आणि आज
विजयाची रात्र आहे, कौरवांच्या शिबिरातच घालविली पाहिजे." असे म्हणून तेथून निघून गेले.

क्रमशः
   
 
 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.