Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १२३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १२३
महाभारत १२३

 


                             महाभारत १२३

          राजमाता कुंती आपल्या पाची पुत्रा सहित महारानी
कुंतीच्या कक्षेत आलेत. तेव्हा कुंती ने महारानी गांधारीचे
चरणस्पर्श केले नि राजमाता कुंती म्हणाली ," माझ्या सोबत
आपले पाच पुत्र आणि वासुदेव पण आले आहेत." प्रथम
युधिष्ठीर ने त्यांचे चरणस्पर्श करत म्हटलं," प्रणाम जेष्ठ माता !" त्यावर त्या म्हणाल्या ," आयुष्यमान भव ! सुखी रहा ."
    " सुखी राहणे माझ्या नशिबात नाहीये माता. आम्हां
भावंडांमध्ये कुणीही विसरू शकणार नाहीये की अनुज भीम ने अनुज दु:शासनाच्या छातीचे रक्त प्राशन केले होते नि दुर्योधनाची मांडी गदेने फोडली होती." त्यावर महारानी
गांधारी म्हणाल्या ," भीम वचन बध्द होता. शिवाय त्या दोघांनी द्रौपदीचा , भरतवंशाचा आणि माणुसकीचा अपमान जो केला होता. माझ्या भिमाने केवळ त्याना दंड दिला होता. आणि दंड देणे कोणताही अपराध नाहीये. आणि कमीत कमी एवढा दंड तर त्याना मिळायलाच हवा होता." तेवढ्यात तेथे महाराज धृतराष्ट्र आले नि म्हणाले ," खरा अपराधी  मीच आहे गांधारी ! शाप द्यायचा तर मला दे, आणि शाप देऊन जेव्हा  तुझं मन हलकं होईल तेव्हा माझ्या बरोबर वनप्रस्थानाला जाण्याची तयारी कर."
     " वन प्रस्थानाला जाण्याची काय गरज आहे ?" युधिष्ठीरने विचारले. त्यावर राजमाता कुंती म्हणाली ," जोपर्यंत अतित
आपले स्थान रिक्त करत नाही तोपर्यंत वर्तमान त्यावर
विराजमान होऊ शकत नाहीये. म्हणून आम्हाला जाणे भागच
आहे." त्यावर अर्जुन ने विचारले ," म्हणजे जेष्ठ पिताश्री जेष्ठ
मातोश्री सोबत आपण पण जाणार का मातोश्री ?"
     " हां आत्याला पण जावेच लागेल पार्थ ! कारण आत्या
पण अतित आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणतेही झाड तोडण्या अगोदर हा विचार जरूर करा की त्या वृक्षा खाली जेष्ठ पिताश्री, जेष्ठ मातोश्री किंवा आत्या ने सुद्धा  त्या वृक्षाच्या सावलीत विश्राम केलेलाही असू शकतो."
     तेव्हा विदुर म्हणाला," आणि माझं नाव घ्यायला विसरलेत
वासुदेव ?"
    " काकाश्री आपण पण जाणार ?"
    " मी पण तर अतितच आहे, मलाही जावं लागणार."
    "  परंतु मोठ्या दादाचा राज्यभिषेक होत नाही तोपर्यंत सर्वांना इथं थांबावेच लागेल. कारण आई- वडिलांच्या आशीर्वादा शिवाय कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. हे आपल्याही चांगले माहीत आहे."
     " परंतु माझं इथं उपस्थित राहणे योग्य नाहीये वासुदेव !
मी एक असा राजा आहे की ज्याने देशहित , जनकल्याणाच्या
हिता पेक्षा पुत्रहीत पाहिले."
     " राज्यभिषेकाची गरज काय आहे ? हस्तिनापूरचे सिंहासन तर खाली नाहीये ना ."
     " नाही पुत्र, तू धर्मराज आहेस, सत्याचे प्रतीक आहेस
म्हणून ईश्वर कडे हे नको मागूस. मी तर फक्त तुझा पिता
अनुज पांडूचा प्रतिनिधी होतो, परंतु आता तू आपल्या पित्याचा राज्य कारभार सांभाळ  आणि  मला आता ह्या जबाबदारीतून मुक्त कर. आता इथं पुन्हा न्यायाचा सूर्योदय होईल.धर्माचा सूर्योदय  होईल. मी पाहू तर शकत नाही. परंतु
अनुमान जरूर लावू शकतो की तुझ्या डोक्यावर राजमुकुट
मस्त शोभेल." त्यानंतर युधिष्ठीरचा राज्यभिषेक होईपर्यंत
सर्वजण तिथेच राहिले. लवकरच एका शुभ मुहूर्तावर
राज्यभिषेक संपन्न झाला. स्वतः वासुदेव कृष्णांनी आपल्या
शुभ हस्ते राजमुकुट युधिष्ठीरच्या मस्तकावर ठेवला. तेव्हा
जमलेल्या जण समुदायाने महाराज सम्राट युधिष्ठीर की
जय असा नाद सर्वत्र उमटला. त्यानंतर चक्रवर्ती महाराज युधिष्ठीर उठून उभे राहात म्हणाले ," सर्व प्रथम मी हस्तिनापूरच्या जनसमुदायाला सादर प्रणाम करत आहे, की ज्यानी माझा हस्तिनापूरचा राजा म्हणून स्वीकार केला. त्यानंतर मी माझ्या पूर्वजांना सादर प्रणाम करत आहे, आणि त्याना मी हे वचन देत आहे की हस्तिनापूर आणि राज सिंहासन यांची मी  रक्षा करीन. त्यानंतर मी वासुदेव कृष्णाना सादर प्रणाम करत आहे नि त्यांच्या मार्गदशना खाली न्याय आणि अन्याय मध्ये अंतर करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझा सारा वेळ जनसमुदाय आणि  मानव कल्यासाठी घालवीण. वासुदेव कृष्णाला साक्षी मानून जनसमुदायाला अधिकार देतो की त्यांनी पाहावे मी लोकांच्या हिताचा राज्यकारभार करत आहे किंवा नाही. जर मी लोकांच्या
हिताचे राज्यकारभार करत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे की मी राजा बनण्याच्या लायक नाहीये. तसेच मी रिक्त स्थान असलेल्या स्थानांना सादर प्रणाम करतो. त्या स्थाना मध्ये एक पितामहांचे स्थान आहे तर दुसरे  गुरू द्रोणांचे स्थान आहे तर तिसरे  अंगराज कर्णा सारख्या महान आत्म्याचे स्थान आहे. ही स्थानं  सदैव रिक्त राहतील आणि आम्हाला आठवण करून देत राहतील की या युद्धात आम्ही काय कमविले नि काय गमावले आहे. ह्या युद्धामुळे आमचे अतितशी आमचे नाते तोडले आहे. नवीन परिभाषा बनवायला न जाणो किती वर्षे लागतील. म्हणून मी काकाश्री महात्मा विदुर यांना अतित मधून  वर्तमानात येण्यास मी आमंत्रित करीत आहे. आणि त्याना ह्या राज्याचा प्रधानमंत्री म्हणून नियुक्त करीत आहे. अनुज भीम युवराज राहतील. प्रिय अनुज अर्जुन सीमांच्या सुरक्षाचा भार सांभाळतील. नकुल ,सहदेव माझे प्रधान अंगरक्षक राहतील. आणि सर्वांत शेवटी माझे जेष्ठ पिताश्री कुरुश्रेष्ठ शिरोमणी धृतराष्ट्रांचे चरणस्पर्श करत आहे , ते माझे फक्त जेष्ठ पिताश्रीच नसून माझे गुरू सुध्दा आहे, एक नीतीचा अध्याय मी त्यांच्या कडून ही शिकलो आहे. माझ्या मनात कडवाहट अजिबात नाहीये.कडवाहटाचे युग आता
संपले आहे. जर राजा आपल्या अतितच्या कडवाहट मध्येच सारा वेळ घालवू लागला तर तो राजा देशासाठी आदर्श राजा ठरू शकत नाही. राजाला आपल्या प्रजाजणाना सोबत घेऊन भविष्याच्या दिशेने वाटचाल करायला आहे, कारण आपल्याला भविष्याच्या दिशेने जायचंय, हस्तिनापूर नागरिकांनी बऱ्याच संकटांशी सामना केला आहे, परंतु  आता त्यांच्यासाठी सुखाचे नि समूर्धी राज्य यायला हवं. परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा हस्तिनापूरचा प्रत्येक नागरिक हा विचार करील की त्याने देशासाठी काय केले आहे नि त्याला देशासाठी काय करायला हवं आहे. त्याने असा  कदापि विचार करता कामा नये की देशाने त्याच्या साठी काय केले आहे ? कारण राजा देशासाठी असतो, प्रजा देशासाठी असते. परंतु  राजा अथवा प्रजेसाठी  देश नसतो."

         दुसऱ्या दिवशी महाराज धृतराष्ट्र , महाराणी गांधारी, राजमाता  आपले राजवस्त्र उतारून श्वेतवस्त परिधान करतात नि वनांमध्ये प्रस्थान करण्याची पूर्ण तयारी करून
जेव्हा राजभवन मध्ये येतात. तेव्हा समस्त पांडव त्यांच्या दर्शनासाठी उपस्थित होतात. तेव्हा महाराज धृतराष्ट्रांनी
विचारले ," कुलवधू द्रौपदी नाही आली ?" तेव्हा युधिष्ठीर
उत्तरला ," आली आहे दरवाजाच्या बाहेर उभी राहून आपल्या आज्ञेची वाट पाहत आहे." त्यावर महाराणी गांधारी
म्हणाली ," हस्तिनापूरच्या पट्टराणीला आज्ञेची काय गरज
आहे ?"
      " भरपुर वर्षानंतर हस्तिनापूरला एक असा राजा मिळाला आहे की माझा सारखा नेत्रहीन नाहीये. त्याला पट्टराणी मिळाली आहे ती पण डोळ्यावर पट्टी बांधलेली नाहीये. खरे सांगायचे तर आज माझ्या लक्षात आले की प्रिय अनुज विदुर ने मला राजा बनविण्यासाठी का विरोध केला. नेत्रहीन राजा प्रजेचे हित पाहू शकत नाही. मी केवळ दुर्योधनालाच आपले हस्तिनापूर मानले, दुर्योधनालाच माझे जग मानले. असं जेव्हा कोणताही राजा करतो तेव्हा तो समाजापासून वेगळा  होतो नि एकटाच होऊन राहतो." तेव्हा कुंती म्हणाली ," जेष्टश्री ती पट्टराणी होण्या अगोदर आपली पुत्रवधू आहे, आपल्या आज्ञेशिवाय ती कशी येईल बरं ?" तेव्हा गांधारी म्हणाली ," ठीक आहे मी घेऊन येते तिला." तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले," तुम्ही दोघी जा नि आपल्या पुत्रवधू ला घेऊन या." त्यानंतर त्या दोघी  दरवाजावर गेल्या. तशी द्रौपदीने खाली वाकून चरणस्पर्श करत म्हटलं ," प्रणाम जेष्ठ माताश्री !" तेव्हा गांधारी आशीर्वाद देत म्हणाली ," सौभाग्यवती भव पुत्री ! "
    द्रौपदी म्हणाली ," जेष्ठ मातोश्री आपण जाऊ नका,कारण
आपण तर या राजभवनाचा आत्मा आहात."
    " आत्म्याला सुद्धा एक दिवस जावेच लागते पुत्री ! आणि
हे हस्तिनापूर ते नाहीये ज्यात मी राहात होते. हे हस्तिनापूर
नवीन आहे,म्हणून आपल्या अपमानाला आता विसर पुत्री !
आणि आता नवीन न्यायी हस्तिनापूर घडवा. चल तुझे जेष्ठ पिताश्री तुझी वाट पाहत आहेत." तशी द्रौपदी पुढे आली नि महाराज धृतराष्ट्राचे चरणस्पर्श करत म्हटलं, " जेष्ठ पिताश्री मला क्षमा करा." त्यावर महाराज धृतराष्ट्र म्हणाले,
    " क्षमा तर मला मागायला पाहिजे पुत्री ! माझ्या मुळेच
तुझा अपमान झाला. माझ्या मुळेच तुझी कोख उजडली.
माझ्या मुळेच अनेक स्त्रिया विधवा झाल्या. हे हस्तिनापूर मला क्षमा कर."
     " मी आपल्या नि हस्तिनापूरच्या मध्ये पडू इच्छित नाही.
परंतु आपण जर मला माफ केले असेल तर आपल्या पुत्राना
सोडून जाऊ नका." तसे महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," ही आता
आम्हाला जाऊ देणार नाही गांधारी ! परंतु पुत्री द्रौपदी मला
सांग तुझा अपमान केलेल्या अतित ना तू का रोखू इच्छितेस."
    " मी आपली पुत्रवधू आहे नि आपल्या परिवाराचे विभाजन मी होऊ देऊ इच्छित नाही आणि अपमान माझा नाही तर भरतवंशीचा झाला होता. अपमान माझं कर्म होते. आता माझी इच्छा आहे की मी आपली शुश्रूषा करून आपल्या वस्त्रावर पडलेली अपमानाची धूळ साफ करू इच्छिते."
     तसे खुश होऊन महाराज धृतराष्ट्र म्हणाले, " सौभाग्यवती
भव पुत्री ! मी आज तुझा ऋणी झालो पुत्री !"
     " कर्तव्य पालन करणे ऋण होत नाही जेष्ठ पिताश्री !"
     " हे आर्यपूत्र आता चला जाऊन भेटू तातश्रीना आणि
त्याना सांगू की आता हस्तिनापूर चारही दिशानी सुरक्षित
झाले आहे आता."
     " नाही गांधारी  तातश्रीचा सामना करण्याची माझ्यात
हिंम्मत नाहीये. कारण त्याना मला ही आहे नि त्यांनाही माहीत आहे की , त्याना बाणांच्या शय्येवर झोपविणारा दुसरा कोणी नसून मीच आहे गांधारी !"
     
    कुरुक्षेत्रावर बाणांच्या शय्येवर झोपलेले गंगापुत्र भीष्म
स्वतःशीच म्हणाले ," आता युधिष्ठीरचा राज्यभिषेक झाला
आहे, नि माझे हस्तिनापूर चारही दिशानी आता सुरक्षित
झाले आहे, आता मी माझे प्राण त्यागू शकतो. परंतु मी
वासुदेवाची वाट पाहत आहे, जेव्हा ते येतील तेव्हाच मी प्राण त्यागेन कारण माझी दृष्टी त्यांच्या चरणावर पडायला हवी आहे." तेवढ्यात तेथे पांडवासह वासुदेव कृष्ण पोहोचले. युधिष्ठीर सहित सर्व पांडवांनी त्याना प्रणाम केला नि वासुदेव कृष्ण म्हणाले,  " गंगापुत्र भीष्मांना माझा सादर प्रणाम !"
    " मला माहित होते वासुदेव आपण मला भेटायला जरूर
येणार , कारण आपल्या दर्शनाचा प्रसाद घेतल्याशिवाय
मी इथून जाऊच शकत नाही."
     " आपण पांडवांना उपदेश करा."
     " आपण त्यांच्या सोबत असताना त्यांना माझ्या उपदेशाची गरज नाहीये."
    " माझ्या कडे ज्ञान आहे परंतु आपल्या जवळ अनुभव
आहे. आपण त्याना आपले अनुभव सांगा."
     " जरा माझे अश्रू पूस वासुदेव मी पांडू पुत्र हस्तिनापूर
नरेश हे चक्रवर्ती सम्राट युधिष्ठीर तुझा विजय असो."
    "  मी आपल्याला जाऊ देणार नाही पितामहां !" अर्जुन
एकदम आर्त स्वरात बोलला.
    " हट्ट करू नकोस वत्स ! माझं आता इथलं कार्य संपले आहे, तेव्हा मला इथून जाणे भागच आहे."
    " प्रिय युधिष्ठीर एक गोष्ट लक्षात ठेव. राजा देशासाठी असतो देश राजा साठी नसतो. म्हणून पूर्ण विचार केल्या शिवाय कोणतीही प्रतिज्ञा करू नकोस. नाहीतर माझ्या सारखी अवस्था होईल. मी प्रतिज्ञेला जास्त महत्व दिले.
कोणतीही प्रतिज्ञा देश हिता पेक्षा मोठी असू शकत नाही.
मी महाराज धृतराष्ट्रा मध्ये आपल्या पित्याची छबी पाहिली.
नि हस्तिनापूर कडे दुर्लक्ष केले. हस्तिनापूर पेक्षा कोणीही
मोठा नाही ना पिता ना पुत्र ! मातृभूमी पेक्षा कोणीही मोठा
नाहीये. हे सदैव द्यानात ठेव." अर्जुन रडत असतो म्हणून
त्याची समजूत काढत गंगापुत्र भीष्म म्हणाले ," रडू नको वत्स ! आज खुश होण्याचा दिवस आहे,एक काम कर, माती
उचलून माझ्या भाळी लाव. आज मी मातृभूमी ऋणातून मुक्त
झालो. विदुर ने मला किती वेळा तरी सांगितले की तातश्री
आपण सिंहासनाला पाहू  नका हस्तिनापूरला पहा. कारण
हस्तिनापूरच नसेल तर राजा कोठून असेल ? परंतु मी त्याचे
ऐकले नाही. आपली प्रतिज्ञेला चिकटून राहिलो. त्याचा परिणाम असा झाला, की मी हस्तिनापूरच्या दूर गेलो नि
हस्तिनापूरचा होणारा विनाश पाहत राहिलो. बाणांच्या शय्येवर झोपलेला तुझा पितामहां देशद्रोही ठरला. देशाचे
विभाजन मीच केले,लाक्षाग्रह करणारा मीच , द्रौपदीचे
वस्त्रहरण करणारे माझेच हात होते. हे पुत्र मी एक असा
क्षत्रिय आहे की ज्याने आपल्या मातृभूमी पेक्षा आपल्या
पित्याच्या छबिला जास्त महत्व दिले. परंतु आज माझ्या
सोबतच मी मातृभूमीशी केलेला अन्याय समाप्त होईल.
    हे पुत्र तू कधी माझ्या सारखी प्रतिज्ञा करू नकोस. नहीतर
तू देखील माझ्या प्रमाणेच आपल्या देशापासून वेगळा होशील. जर अशी चूक केलीस तर तुला देखील माझ्या सारख्या बाणांच्या शय्येवर झोपविणारा अर्जुन जन्माला
येईल. कारण मातृभूमी पेक्षा कोणीही मोठा नाहीये.

         तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," ह्यांना धर्म आणि राजधर्म मधला फरक सांगा पितामहां !" तेव्हा गंगापुत्र भीष्म
म्हणाले ," आपल्या कर्तव्य आणि दुसऱ्याचे यांचे संतुलन ठेवणे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. राजधर्म ही तसाच आहे राजाची जबाबदारी नागरिका पेक्षा मोठी असते. जर देशाचे  विभाजन करण्याची पाळी आली तर कुरुक्षेत्रावर या. परंतु देशाचे विभाजन करू नका. जर तुम्हाला कोणी सांगितले की कुंती मातेचे पाच भागात विभाजन करा. तर शक्य आहे का ? नाही ना ? मग मातृभूमीचे विभाजन कसे होईल बरे ? युध्द टाळण्यासाठी मी देशाचे विभाजन केले.  परंतु त्याचा परिणाम तुम्हां साऱ्यांचा समोर आहे. आता तरी वत्स माझ्या देशाच्या मातीचा टिळा लाव."
     " टिळा मी लावतो पितामहां !"
     " माझी पण हीच इच्छा होती. परंतु मी आपल्याला आदेश देवू शकत नाही ना ? " वासुदेव कृष्णा ने त्यांच्या कपाळाला मातीचा टिळा लाविला."
     " आपल्या कडून मला प्रसाद मिळाला. आता मला जाण्याची आज्ञा द्या वासुदेव !" असे म्हणून किंचित थांबले, नि लगेच पुढे म्हणाले," हे मातृभूमी मला माझ्या आईकडे
जाण्याची आज्ञा दे, हे आकाश माझ्या देशाला ऊन, पावसाची कधी कमी पडू देवू नकोस. नदी नाले पाण्याने सदैव तुडूंब
भरून वाहू दे. माझ्या देशाची जमीन हिरवीगार शेताने डोलू दे. झाडे , वेली फळा फुलांनी बहरू दे. माझ्या देशाला राजनीतीचे कधीही ग्रहण लागू देऊ नकोस. अखेर मंत्राचे पठण करतच प्राण सोडला. त्याच वेळी आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी वर्षविली.

        क्रमशः

  महाभारत संपले नाहीये अजूनही पुढे आहे.



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..