Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १२९ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

महाभारत १२९
महाभारत १२९

 


                          महाभारत १२९


     " तू राज महालात लहानाची मोठी झाली आहेस , तुला
हे वनातील जीवन किती आवडेल कोण जाणे ?"
      " ह्या वनात मला तुमच्या रूपाने प्रेमच प्रेम दिसतंय मला
फक्त तुमचं प्रेम हवंय बाकी काहीही नको." असे म्हणताच
तिला मायेने जवळ घेत हिडींबा म्हणाली ," आता फक्त मला तुम्हां दोघां कडून एक बाळ पाहिजे, तो पण असा की माझ्या पती सारखा महावीर आणि तुझ्या पती सारखा बलवान. काय देशील की नाही ?" असे म्हणताच ती चक्क लाजली. त्यानंतर ती आंत जाणार असते. तर हिडींबा त्याना रोखते. "थांबा." असे म्हणून आंत पळतच जाते नि आरती चे ताट घेऊन बाहेर येते नि त्या दोघांना आरती ओवाळून घरात घेते. त्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू झाला. लवकरच त्यांच्या संसार वेली वर एक फुल उमलले. अर्थात मोर्वी ने  एका सुंदर शा बाळाला जन्म दिला. त्याचे घुंगरा सारखे केश असल्याने हिडींबा त्याचे नाव  बर्बरीक असे  ठेवले. त्यानंतर घटोत्कच ला हांक मारून आपल्या जवळ बोलवून घेतले नि मग म्हणाली, " पुत्र सुनबाई ने तुला बाळ दिलंय तिचे आभार मान बरं !"
     "  मी पण तर हिला बाळ दिलंय मग हिने नको का माझे
आभार मानायला."
     " पुत्र बाळावर आई- वडिलांचा समान हक्क असतो. परंतु पित्या पेक्षा मातेचे योग दान जास्त असते. कारण बाळाला जन्म देताना ज्या यातना ती भोगते त्या यातना पिता
भोगू शकत नाही. शिवाय परिवाराला अनमोल भेट देते. अशी
भेट तर दुसरी असू शकणार नाही. म्हणून तू इंद्रप्रस्थाला जा
नि आपल्या पित्याला हा शुभवार्ता दे ये आपल्या परिवारात पुत्र  जन्मला म्हणून त्याना फार आनंद होईल."
  
  घटोत्कच आपल्याला पुत्र झाल्याचा शुभवार्ता देण्यासाठी
इंद्रप्रस्थाला पोहोचला. आणि जशी ही शुभवार्ता आपल्या
वडिलांना दिली. आपण आजोबा झाल्याचे ऐकून
भिमासेनला फार  अत्यानंद झाला " खूप दिवसांनी एक आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. परंतु....? "
     " परंतु  काय पिताश्री ? काही समस्या आहे का ?"
     " हां पुत्र आमचं सारं जीवन समस्या ने भरलंय एक समस्या संपली नाही लगेच दुसरी ने दरवाजा खटखटविला."
     " मी समजलो नाही पिताश्री ?"
     " कधी कधी परंपरा सुद्धा दुःखाचे कारण बनते."
     " ते कसं काय ?"
     " दुर्योधन ने आम्हाला द्युतक्रीडेचे आमंत्रण दिले आहे,
आणि मोठ्या दादा ने क्षत्रिय धर्मानुसार द्युतक्रीडेचे आमंत्रण
स्वीकारले आहे."
     " मग त्यात चिंता करण्याचे काय कारण आहे पिताश्री ?
द्युतक्रीडा तर फक्त एक खेळ आहे, त्याचे फासे कधी काकाश्री दुर्योधनाच्या बाजूने पडतील किंवा जेष्ठ तातश्री च्या
बाजूने पडतील."
     " तशी शक्यता नाहीये."
     " का ?"
     " कारण फासे दुर्योधन टाकणार नाहीये."
     " मग कोण टाकेल ?"
     "  त्याचा पाताळयंत्री शकुनिमामा!"
     " पण तो का टाकेल ?"
     " सर्व डावपेच तर तोच खेळतोय. दुर्योधन फक्त कटपुतली आहे, तो जसा नाचवतोय तसा तो नाचतोय."
    " शकुनिमामा द्युतक्रीडेत इतका प्रवीण आहे का ?"
     " नुसता प्रविनच नाहीतर षड्यंत्री सुद्धा आहे. आपल्या  समोरच्याला प्रतिस्पर्धीला तो कधी जिंकूच देत नाही. आणि खरे सांगायचे तर ते फासे नाहीत तर त्याचे ते सैन्य आहे, नेहमी त्याच्या आदेशाचे पालन करतात आणि त्यांच्या
मनात आमच्या बद्दल द्वेशच द्वेश भरलेला आहे."
    " पण असं का ?"
    " त्याना वाटते की त्यांची लाडकी बहीण आणि आमची जेष्ठ मातोश्रीचा  विवाह एका नेत्रहीन माणसा बरोबर करून करुवंशाने फार मोठा अपराध केला आहे, त्या अपराधाची शिक्षा म्हणून साऱ्या करुवंशाचा विनाश करू पाहताहेत ते."
    " पण त्या करुवंशामध्ये काकाश्री दुर्योधन  पण तर आहे."
    " तेच तर कळत नाहीये ना दुर्योधनाला. त्याला वाटते की आपले मामाश्री आपले शुभचिंतक आहेत. परंतु ते कुणाचेच शुभचिंतक नाहीत ते अगोदर पांडवांचा विनाश करू पाहत आहेत. शेवटी मग आहेच दुर्योधन आणि त्याचे शुभचिंतक
त्या सर्वांची पाळी आहेच ! "
     " कोणी तरी हे काकाश्री ना सांगायला हवं "
     " तो सांगून ऐकण्यातला नाहीये."
     " असे आहे तर द्युतक्रीडेचे आमंत्रण स्विकारायला नाही
पाहिजे होते जेष्ठ तातश्रीनी "
     " असं करू शकत नाहीये ना ? हीच तर मोठी अडचण
आहे, क्षत्रिय धर्माचे पालन करायलाच लागणार. ते जाऊ दे
तुझी मातोश्री कशी आहे ते सांग."
     " ती तर सदैव आपल्यासाठी मंगल कामना करत असते."
     " मी तिचा खरा गुन्हेगार आहे, कधी कधी मला असं वाटतं की तिला जाऊन सांगावे की आपली प्रतिज्ञा तोड नि माझ्या सोबत इंद्रप्रस्थाला राहायला ये. तसा पण मी इंद्रप्रस्थाला एकटा पडलोय."
     " मातोश्रीला आपली प्रतिज्ञा तोडायला सांगायची म्हणजे
नदीला आपला प्रवाह बदलायला सांगण्या सारखे आहे."
     " मी तिचा आणि तुझा गुन्हेगार आहे, मी तुम्हां लोकांसाठी काहीच करू शकलो नाही. जेव्हा तिला माझी
जास्त गरज होती तेव्हा मी तिच्या पाशी नव्हतो. परंतु मी माझ्या नातवाच्या बाबतीत होऊ देणार नाही. तुला मी जे प्रेम
देऊ शकलो नाही ते मी माझ्या नातवाला देईन. मला  जशी इथून फुरसत मिळेल तसा मी तुम्हां लोकांना भेटायला येतोच म्हणून सांग तुझ्या आईला."
     
    महामंत्री विदुर आपल्या थोरल्या बंधूंस अर्थात महाराज
धृतराष्ट्राना भेटायला त्यांच्या कक्षेत गेले असता तेथे महाराणी
गांधारी पण उपस्थित होत्या. विदूरने दोघांनाही प्रणाम केला.
तेव्हा दोघांनीही त्याना आयुष्यमान चा आशीर्वाद दिला. त्या
नंतर विदुर ला विचारले ," अनुज विदुर !"
    " हां भ्राताश्रीss
    " आज तुझ्या आवाजा मध्ये हर्ष जाणवत होता. आज
काही विशेष घडलंय का ?"
   " हो विशेषच आहे."
   " अच्छा मग सांग बरं काय खुश खबर घेऊन आलास ?"
   " पांडवांच्या घरी एका नवजात बाळ जन्माला आले. घटोत्कच आणि मोर्वीचा पुत्र ,भीम आजोबा बनला नि आपण पणजोबा बनलेत. परंतु ह्याचे सारे श्रेय्य वासुदेव कृष्णाला जाते. कारण वासुदेव ने त्या दोघांचा जोड बांधून दिला होता.
    " ही काय शुभवार्ता आहे विदुर ?" महाराज धृतराष्ट्रानी
आपली नाराजी व्यक्ती केली. त्यावर गांधारी म्हणाली, " शुभवार्ता का नाही आर्यपूत्र आपल्या परिवारात  पणतू जन्माला आलाय हा आनंद नव्हे तर काय म्हणायचं ह्याला ?"
   तेवढ्यात गांधार नरेश शकुनी आला आपल्या बंधू ला पाहून गांधारी हर्षभराने म्हणाला ," दादा ऐकलेस का तू ?"
    " हां ताई ! पांडवां विषयी कोणतीही माहिती चांगली असो
वाईट ऐकण्यासाठी माझे कान एकदम टवकारलेलेच असतात." असे म्हणून विदूर कडे पाहत शकुनी ने विचारले,
     " बाळाचे नाव ठेवलं गेलंय काय ?"
     " हां !"
     " काय ठेवलंय नाव ?"
    " त्याचे केश कुरटे नि घुंघूर सारखे असल्याने पुत्रवधू हिडींबा ने त्या बाळाचे नाव बर्बरीक ठेवलं."
    " बर्बरीक काय ? म्हणजे अजून एक वैरी अजून जन्माला आला तर  " असे एकदम हळू आवाजात म्हटलं. आपली बहीण गांधारी ऐकू नये म्हणून ही सावधगिरी बाळगण्यात आली. परंतु गांधारीचे कान इतके तीक्ष्ण आहेत की त्यांनी ऐकलंच तश्या त्या नाराज होत म्हणाल्या ," हे काय रे दादा तू आता लहान बालना सुद्धा शत्र समजू लागलास ?"
     " नाही ताई , मी असं कसं म्हणेन बरं ? माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच होता की पांडव परिवारात अजून
एक सदस्य वाढला. ही तर सर्वात मोठी शुभवार्ता आहे."
     " निश्चितच शुभवार्ता आहे, मी तर म्हणते असेच जावे
नि नवजात शिशुस उचलून घ्यावे नि आपल्या हृदयाशी घट्ट धरावे." त्यावर गांधार नरेश शकुनी म्हणाला ," एवढी भावुक
होऊ नकोस. तू स्व इच्छेनेच पतीच्या नेत्रहीनता मध्ये सामील
झालीस नि स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीस. आता तू  तेथे जाऊन करणार काय ? कारण बाळ तर तू पाहू शकणार नाहीस. मग जाऊन त्याचा फायदा काय ?"
     " पाहता नाही आलं म्हणून काय झालं ? त्याला उचलून
तर घेऊ शकते. त्याचा गोड गोड पापा तर घेऊ शकते ना ?
आर्यपूत्र आपणच समजावून सांगा ना ह्याला."
      " गांधारी मी तुझी माया ममता स्नेह समजू शकतो. परंतु
परिस्थिती ने आम्हाला अश्या ठिकाणी आणून उभे केले आहे
की इच्छा असूनही आपण जाऊ शकत नाही तिकडे. परंतु
विदुर पुत्र भीम तर तिकडे आपल्या परिवार सोबत असेल ना ?"
    " नाही भ्राताश्री द्युतक्रीडामुळे पुत्र भीमाकडे  आपल्या
परिवाराकडे  जाण्यासाठी वेळच कुठं आहे ?"
     "  वेळ कुठं म्हणजे ? वेळ काढायला हवा. आपल्या
परिवारात पहिल्या पणतू ने जन्म घेतलाय त्याला पाहायला
पण जायला नको का  ? काय चाललंय काय हे ?"
      " गांधारी जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ? प्रसंग
तसा आहे, काय करू शकतो आपण ?"
     " करायचंच म्हटलं तर सर्वकाही शक्य आहे भ्राताश्री !"
     " काय उपाय आहे सांग बरं विदुर."
     " थोड्या दिवसासाठी द्युतक्रीडा टाळली पण जाऊ शकते."
    "  काय बोलतोहेस तू हे ?"
    " योग्य तेच तर बोलताहेत ते. द्युतक्रीडा नंतर पण होऊ शकते."
    " तुम्हां दोघांचे डोके तर ठिकान्यावर आहे ना ? का नेहमी
उलटाच विचार करताय ."
    " त्यात उलटा विचार काय आहे बरं ?"
    " द्युतक्रीडेचा दिवस वेळ सर्वकाही निश्चित केलंय पुत्र
दुर्योधन ने ती कशी बदलता येईल ? "
     " का नाही बदलता येणार ? दुर्योधन फक्त युवराज आहे पण आपण महाराज आहात ना , आपण बदला दिवस आणि वेळ आपला आदेश कोण मानणार नाहीये ?"
     " परंतु युधिष्ठिर ने पण तर होकार दिला आहे , क्षत्रिय
परंपरा कशी टाळता येईल ?" महाराज धृतराष्ट्रानी कारण
पुढं केलं. तशी गांधारी चिडून म्हणाली ," परंपरा परंपरा
परंपरा माणसा पेक्षा परंपरा अधिक मोलाची आहे काय ?
जी बदलता येणार नाहीये आणि खेळ पण कुठला तर द्युतक्रीडा ज्या खेळाने फक्त विनाश घडू शकतो दुसरं काही
नाही." त्यावर महाराज धृतराष्ट्र चिडून म्हणाले ," तुला दुसऱ्याची फार चिंता आहे, नि आपल्या पुत्रांची अजिबात चिंता नाहीये. तुला माहितेय द्युतक्रीडेत बाधा आणली तर आपला पुत्र दुर्योधन आत्महत्या करेल. तुझी अशी इच्छा आहे का की आपल्या पुत्राने आत्महत्या करावी ?"
     " मी असं कुठं म्हटलं ? माझं म्हणणं इतकेच की द्युतक्रीडा काही दिवसा करता टाळावी बस्स !"
     " काय बोलतेस तू गांधारी ? द्युतक्रीडेची सारी तयारी
झाली आहे, ती आता कदापि टाळता येणार नाहीये. तुला
माहितेय माझे फासे आपला चमत्कार दाखविण्यासाठी
उतावळे झाले आहेत. तू सुध्दा बघ माझ्या फासांचा चमत्कार ! " त्यावर गांधारी म्हणाली ," फार उत्सुक आहात
दादासाहेब, परंतु तुम्हांला हे माहीत असायला हवं होतं की
मी स्वतःच्या मर्जीने आपल्या पतीच्या नेत्रहीनताची भागीदारिणी झाले आहे. त्यामुळे मी तुमच्या फासांचा चमत्कार पाहू शकणार नाही आणि तशी पण मला त्याची आवड ही नाही. परंतु माझं मन मला सांगतंय की फार मोठा अनर्थ घडणार आहे, विनाशाची पाऊले आपला दरवाजा ठोठावत आहेत. " तेवढ्यात तेथे दुर्योधन आला नि त्याना विचारू लागला की , कोणत्या विषयावर वादविवाद सुरू आहे पिताश्री ?" तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," आम्ही विचार करत होतो की पुत्र भीमाच्या पुत्राला पुत्र झाला आहे तेव्हा द्युतक्रीडा थोड्या दिवस टाळावी."
      " पुत्रच झाला आहे ना,भीम द्युतक्रीडा नंतर पण तर आपल्या नातूला भेटू शकतो.  त्यासाठी द्युतक्रीडा कशाला
टाळायला पाहिजे ?"
    " अरे असे कसे म्हणतोस ? आपल्या परिवारात पहिला
नातू जन्माला आलाय. त्याला पाहायला जायला नको का ?"
    " मातोश्री साऱ्या संसार मध्ये लाखो नवजात शिशु जन्माला येतात म्हणून काय सर्व लोक आपली नित्याची
कामे करायची ठेवतात की काय ?" शकुनिमामा म्हणाला,
  " पुत्राचाच जन्म झालाय ना ? कोणाचा मृत्यू तर झाला
नाही ना ? मग त्यासाठी द्युतक्रीडा कशाला रोखायला पाहिजे
उलट अश्या प्रसंगी द्युतक्रीडा खेळून आनंद द्वगुणीत करायला हवा." त्यावर दुर्योधन म्हणाला ," मी मामाश्रीच्या
मताशी सहमत आहे, आणि एक गोष्ट द्यानात ठेवा सर्वांनी
काही झालं तरी द्युतक्रीडा टळणार नाही. ती ठरलेल्या दिवशी नि ठरलेल्या वेळीच होईल." एवढी कथा ऐकवून वासुदेव कृष्ण म्हणाले," पुढचे सर्वकाही तुला माहीतच आहे की भीमाला आपल्या नातवाचे मुख दर्शन करायला जायला मिळाले नाही. कारण द्युतक्रीडा नंतर त्यांचा मार्ग राजभवनच्या दिशेने नाही तर  वणाच्या दिशेने जाणार आहे , हे पांडवांना कुठे माहीत होते. शकुनीच्या फाशानी प्रथम पांडवांचे धन खेचून घेतले. त्यानंतर त्यांचे राज्य जिंकून
घेतले आणि त्यानंतर जिथं  नारीचा सन्मान व्हायला पाहिजे
तिथं नारीचा अपमान झाला." तशी द्रौपदी म्हणाली ," त्यानंतर जे झालं ते त्यांच्या सोबत व्हायलाच पाहिजे होते.
कारण ज्यांना आपल्या नारीचा सन्मान राखता येत नाही
त्यांच्या सोबत असंच घडायला हवं."
    " पांचाली घडणाऱ्या घटना पूर्वनियोजितच असतात. फक्त
निमित्त मात्र कुणाचे ना कुणाचे असते. परंतु विधात्याच्या प्रत्येक कृति मध्ये काही ना काही उपदेश लपलेला असतो.
पांडव जर द्युतक्रीडेत हरले नसते तर जगाला कसे कळले
असते की द्युतक्रीडा विनाशकारी खेळ आहे,ह्या खेळा पासून
दूर राहावे. पांडव तेथे वन वन भटकत होते नि इकडे बर्बरीक
आता पाळण्यातला राहिला नव्हता. तोआता किशोरवयीन
झाला. त्याला धनुर्विद्या शिकण्याची फार आवड होती. तो
आपल्या आजीला म्हणाला," आजी मला धनुर्विद्या शिकायची आहे." त्यावर हिडींबा म्हणाली," अवश्य शिक परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. तुला तुझ्या अर्जुन आजोबा सारखे लक्ष साधायचे आहे, त्यासाठी एकाग्रता पाहिजे. जसे की तुझ्या आजोबांना त्यांच्या गुरू ने विचारले ," तुला झाडावर काय दिसते ? तेव्हा तुझे आजोबा म्हणाले," मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. तसेच तुला सुध्दा आपले लक्ष दिसावयास पाहिजे.अन्य काही नाही. ते बघ समोर जे झाड दिसतेय ना, त्या झाडावरची फांदी तुझे लक्ष आहे,लक्ष साधं." असे म्हणताच त्याने नेम धरला नि बाण सोडला. आणि त्याने खरेच आपले लक्ष साधले. तशी हिडींबा खुश होत म्हणाली," आता माझी खात्री झाली की तू नक्कीच आपल्या आजोबा सारखा धनुर्धर होणार."

  
    क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..